प्रश्न Ankush Shingade द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रश्न

आधी माणूस बना         के एक गाव.त्या गावात सर्वच जातीधर्मातील लोकं राहात होते.गावात तसा भेदभाव नव्हता.सर्वच लोकं एकमेकांच्या घरी जेवायला जात असत.एकमेकांच्या सणउत्सवात सहभागी होत असत.तसेच एकमेकांना चांगले लेखत असत.जर एखाद्या घरी मयत झाल्यास ते मयतीला तर जात.जेवायलाही जात असत.मात्र त्या गावात असाही माणूस होता की जो स्वतःला उच्च जातीतील समजून तो मयतीलाही जात नसे व जेवायलाही जात नसे.तो जुन्या प्रथांचं काटोकाट पालन करीत असे.           कलिराम त्याचं नाव होतं.तो गावात राहात होता.तो स्वतः उच्च जातीतील असून त्याच्या मनात अहंकार होता.तो स्वतःला उच्च जातीतील समजून कोणाच्याही घरी मयतीला जाणं टाळायचा.कनिष्ठ जातीच्या घरी मयतीला जाणे म्हणजे त्याला शुल्लक गोष्ट वाटायची.तो रुढी प्रथा परंपरा आवर्जून पाळायचा.अशाच या गावात एक विश्वास नावाचा व्यक्ती राहात होता.त्याचा विवाह झाला होता व तो आपल्या मुलाबाळासमवेत खुश होता.गावात कोणी मरण पावलं तर तो मयतीला जात असे.मात्र तो जुन्या रुढी,प्रथा,परंपरा पाळत नव्हता.जसा देश सुधारला.तसं गावंही सुधरावं असं त्याला वाटत असे.तो सुधारणावादी होता.         अलिकडे परीवर्तनशील पणाला सुरुवात झाली होती.जुन्या रुढी,परंपरा कालबाह्यं होतांना दिसत होत्या.मुलींनी आता लुगडे हद्दपार केलेले असून आता साड्याही हद्दपार केलेल्या होत्या.आता तर सलवार व पायजमाही कालबाह्य होतांना दिसत होता.त्याची जागा आता जिन्स आणि टी शर्टनं घेतलेली होती.पूर्वी लांबलचक वेणी राहायची.आता ती वेणी जावून मुलींनी आपली केससज्जाही बदलवली होती.तसेच आता कानात डुलं,नाकात नथनी घालण्याची प्रथाही नष्ट होते की काय असे वाटायला लागले होते.तसेच पुर्वी गळ्यातील मंगलसुत्राला फार मोल होतं.ते उतरलं तर पती मरण पावतो असा संकेत होता.तो आता कालबाह्य झालेला असून त्याची जागा सोन्याच्या आणि चांदीच्या माळेनं घेतलेली होती.बहुतःश विवाहित मुली आता ती सोनसाखळीच वापरतांना दिसत होत्या.त्यामुळं आता पतीमोल किंवा पत्नीमोल राहिलेलं नव्हतं.त्यातच ह्या काही प्रथेंचं कालबाह्य होणं आता विचार करायला लावणारी बाब झाली होती.           एकदा त्या कलिरामच्या घरी मयत झाली.त्याची पत्नी मरण पावली.त्याला अतीव दुःख झालं.मयत स्मशानाकडं रवाना होणार.इतक्यात लोकं विचार करु लागले की मयतीला जायचं की नाही.कारण कलिराम कोणाच्या मयतीला कधीच जात नसे.तरीही लोकांनी ठरवलं की मयतीला जायचं.कारण तो जरी मुर्ख बनला असला तरी आपण मुर्ख नाही.तसे लोकं मयतीला गेले.         मयत आटोपली होती.तसा जेवनाचा कार्यक्रम होता.मयतीतील जेवनाचा कार्यक्रम.तशी त्या घरची मंडळी कोणाच्या मयतीला येत नव्हते.खायला तर दूरच.स्वतःला उच्च जातीची समजायची की काय? कारण त्यांची जात त्या भागात उच्च होती.           विशेष सांगायचं म्हणजे जाती ह्या माणसानच बनविलेल्या असून त्या कधीही उच्च नसतात वा कनिष्ठ नसतात.तरीही काही लोकं स्वतःला उच्च जातीतील समजतात.ते इतर जातींना कनिष्ठ समजतात.तसंच ते कुटूंब.स्वतःला उच्च जातीतील समजत होतं.          जेवनाचा कार्यक्रम.काही लोकांचा विचार की जो माणूस कोणाच्या मयतीला येत नाही.त्याच्या घरी आपण मयतीला गेलो.पण जेवणाला कसं जायचं.काही लोकं मात्र जेवायला जायला तयार होते.पण त्यांना प्रथा आडवी येत होती.त्यातच पत्रीका छापली गेली.ती पत्रीका लोकांना दिली गेली.तसेच जी मंडळी मयतीला आली.ती मंडळी जेवायला नक्की येतील असे वाटून घेवून त्या कलिरामनं लोकांना चिल्लर समजत स्वयंपाक तयार केला.तसेच तो स्वयंपाक तेराव्या दिवशी होता.           त्या गावात असलेला विश्वास जरी अशा प्रथा पाळत नसला तरी बाकीची मंडळी प्रथा पाळत होते.त्यांना मयतीचं जेवन तेराव्या दिवशीचं चालत नव्हतं.त्यातच ती तेरावी जरी असली तरी मयत होवून बाराच दिवस झाले होते.पण कट्टर पंथी प्रथा पाळणारी गावातील मंडळी त्या बाराव्या दिवशी त्या माणसाच्या घरी जेवायला गेली नसल्यानं बनवलेलं अन्न जागच्या जागीच राहिलं.अन्नाची नासाडी झाली.त्यातच त्याला ते अन्न फेकावं लागलं.त्यातच एक दिवस तो विश्वासला भेटला.सहजपणे म्हणाला,            "माझ्या घरचं तेरवीचं जेवण करायला तुम्ही आला नाहीत. कोणीही फिरकलं नाही.मी जे अन्न फेकलं.त्याचा तुम्हा सर्वांना शाप लागू शकतो!"           त्यावर विश्वास म्हणाला,            "कसा काय शाप लागेल?"             "मला अन्न फेकावं लागलं ना."             "कोणं बनवायला लावलं?"             "तुम्हाला चारणं भाग होतं.कारण तुम्ही मयतीला आले होते."            "विचारलं होतं का तुम्ही जेवणाला येणार की नाही ते?"            "मग मयतीला का आले? तुम्ही मयतीला आले आणि जेवायला नाही आले.म्हणून तुम्हाला शाप लागणार."             विश्वास कधी कलिरामचा राग करीत नव्हता.पण त्या कलिरामच्या तशा बोलण्याचा त्याला राग आला व तो म्हणाला,           "हे बघा,कलिरामजी,तुमचा शाप तरी कसा लागणार.तुम्ही एकतर कोणाच्या मयतीला येत नाही.आम्ही आलोत.शिवाय तुम्ही तेरावी बाराव्या दिवशीच केली.आमच्यातील काही मंडळी प्रथा पाळणारी आहेत.ती शुद्ध अशुद्धपणा पाहतात.पाळतातही.तेव्हा त्यांना तुमच्या घरचं जेवन चालत नाही.म्हणून ते आले नसतील.तेव्हा असा शाप बरा नाही."          तसा कलिराम म्हणाला,          "आम्ही उच्च जातीतील माणसं.आमच्यात बाराव्या दिवशी शुद्ध होतात लोकं.आमच्या पेक्षा या गावात उच्च जातीचा कोणी नाही की जो आमच्यापेक्षा श्रेष्ठ असेल."           "याचा अर्थ असा की तुम्हाला तुमची प्रथा आमच्यावर थोपवायची आहे तर.......आता मी एकच बोलतो ते ऐका कलिरामजी, या जगात कोणीही उच्च आणि कनिष्ठ नाही.आईच्या गर्भात काही कोणी जास्त दिवस राहात नाही.तसेच जातीवरुन श्रेष्ठपणा ठरत नाही.अहो जगात तोच माणूस श्रेष्ठ आहे की जो माणूसकी जोपासतो.माणूसकीनं बोलतो.वागतो नव्हे तर आचरण करतो.जो कधीच खोटे बोलत नाही.दुस-याच्या जसा आनंदात सहभागी होतो.तसाच दुस-याच्या दुःखातही सहभागी होतो.ज्याच्याजवळ राग,लोभ,द्वेष,मद,मत्सर हे शत्रू कधीच भटकत नाही.तो या जगात श्रेष्ठ आहे.त्याचा शाप लागू शकेल कदाचित.पण तुमचा शाप लागणार नाही.कारण तुम्ही जरी जातीनं उच्च असले तरी तुम्ही व्यसनाधीन आहात.तुम्हाला सकाळ सायंकाळ व्यसन केलेलं जमत नाही.त्यातच तुम्ही धंदे करतांना खोटंही बोलता.राग तर तुमच्या नाकावरच असतो.लोभ करुन तुम्ही मोठी इमारत बांधली.तसेच तुम्हाला उच्च जातीचे असल्याचा मोठा अहंकार आहे.शिवाय तुम्ही आपली स्वतःची चूक कबूल न करता या गावातील सगळ्या लोकांचा हेवा करता.महत्वाचं म्हणजे हे पाच शत्रू ज्याच्याजवळ भटकत नाहीत आणि ज्यांना व्यसन नसतं व जे सदैव खरं बोलतात.मग धंदा का असेना.तसेच ज्यांचं आचरण चांगलं असतं.त्यांचाच शाप लागतो."           "अर्थात?" कलिराम विश्वासचा रागात म्हणाला.             "अर्थात तुम्ही आपलं आचरण बदलवा.गावातील लोकांचा द्वेष करु नका.लोकांच्या जसे आनंदात सहभागी होता.तसेच मयतीलाही जात चला.सर्वांशी प्रेमानं वागा.शक्यतोवर खरं बोला.माणूसकीनं वागा.माणूस बना.लोकं तुमच्या घरच्या खाण्याचे भुकेले नाहीत.तर ते प्रेमाचे भुकेले आहेत.त्यांना तुमच्या घरचं जेवन चालत नाही असं नाही तर तुम्ही त्यांच्याशी यापुर्वी जसे वागलात.तसं त्यांनी यावेळी तुमच्या जेवणावर बहिष्कार टाकून दाखवून दिलं.अहो,कशाचा एवढा अहंकार.मी श्रेष्ठ व तो कनिष्ठ.मरणानंतर सर्व जाग्यावर राहातं.कोणीच काही आपल्यासोबत नेत नाही.फक्त स्नेह व गोडवाच तेवढा नेतो.बाकी सगळं इथलं इथंच राहतं.तुम्ही जसं वागलात.ते वागणंच आठवतं लोकांना.चांगलं आणि वाईट वागणं.तेव्हा शक्य असेल तर आपल्या वागण्यानं माणूस बनण्याचा प्रयत्न करा.आपल्याला दुस-याचं जर चांगलं करता येत नसेल तर वाईटही करु नका.आपल्याला ही जिव्हा चांगलं बोलायला दिली आहे.तिचा वाईट उपयोग करु नका.नाहीतर याचे परिणाम वाईट होतात.मग हे परिणाम जेव्हा दिसायला लागतात.तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.मग आपण म्हणतो की मला कोणीतरी काहीतरी केलंय.त्याला अंधश्रद्धेचं शेपूट जोडतो.म्हणून हे परिणाम  दिसू नये असे जर वाटत असेल तर आधी माणूस बनायला हवं."           कलिरामनं विश्वासचं सगळं ऐकलं.त्याला आलेला विश्वासचा राग पुरता मावळला.त्या दिवसापासून त्यानं आपलं आचरण बदलवलं व तो चांगल्या आचरणानं वागू लागला.लोकं आता त्याचं मोठ्या आदरानं नाव घेवू लागले.कारण तो आता माणूस बनला होता.        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०