पतंग खेळच बंद करावा Ankush Shingade द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पतंग खेळच बंद करावा

पतंग खेळच बंद करावा?             *अलिकडील काळात पतंगानं गळे कापत आहेत. जीव जात आहेत. पशुपक्षी जखमी होत आहेत. त्यांचे जीवन जात आहेत. एकंदरीत सांगायचं झाल्यास बरेच नुकसान होत आहेत. हे पाहता असं वाटायला लागलं आहे की हा पतंग उडविण्याचा खेळच कायमचा बंद करुन टाकावा.*         सरकार राबवीत आहे नायलॉन मंजा बंद करण्याचा उपक्रम. लोकं सर्रास नायलॉन मंजा वापरत आहेत. जो मंजा सडत नाही. खराब होत नाही व वर्षानुवर्ष टिकून राहतो. ज्या मंजानं अनेकांचे गळे कापले जातात. अनेक पक्षी त्या मंज्यात लटकून त्यातून सुटका न झाल्यानं उपासानं व विना अन्नपाण्यानं मरण पावतात.            सरकारचं म्हणणं आहे की नायलॉन मंजावर बंदी आणणं. परंतु पतंग हा लोकांचा आवडता खेळ असल्यानं सरकारनं जरी नायलॉन मंजावर बंदी घातली तरी या नायलॉन मंज्याची विक्री लोकं लपूनछपून करतातच. करीत आहेत व लोकांचे गळे कापले जात आहेत.           नायलॉन मंज्याच्या अनुषंगानं विचार केल्यास पुर्वी पतंग उडत नव्हते काय? उडत होते. मग त्यात जो मंजा वापरला जात होता,  तो घातक नव्हता काय? तो घातकच होता. कारण त्यात काच राहात होता. परंतु त्यावर बंदी घातली गेली नव्हती. कारण त्यात काच जरी असला तरी ते धागे कालांतरानं कुजत असत व नष्ट होत असत. याचा अर्थ असा नव्हता की ते धागे माणसाचे आजच्यासारखे गुण कापत नव्हते. तसेच त्याच धाग्यात आजच्यासारखे पशुपक्षी लटकून पडत नव्हते.         अलीकडील काळात पतंग उडविणे या खेळाला लोकं जास्त महत्व देवू लागले आहेत. पतंग उडविण्याचा छंदही तसा वाढत चाललेला आहे. यातूनच माणसांचे गळेच कापले जात नाहीत तर पशुपक्षांचेही जीवच जात आहेत.             सरकार राबवीत आहे नायलॉन मंजा बंद करण्याचा उपक्रम. लोकं सर्रास नायलॉन मंजा वापरत आहेत. जो मंजा सडत नाही. खराब होत नाही व वर्षानुवर्ष टिकून राहतो. ज्या मंजानं अनेकांचे गळे कापले जातात. अनेक पक्षी त्या मंज्यात लटकून त्यातून सुटका न झाल्यानं उपासानं व विना अन्नपाण्यानं मरण पावतात.            सरकारचं म्हणणं आहे की नायलॉन मंजावर बंदी आणणं. परंतु पतंग हा लोकांचा आवडता खेळ असल्यानं सरकारनं जरी नायलॉन मंजावर बंदी घातली तरी या नायलॉन मंज्याची विक्री लोकं लपूनछपून करतातच. करीत आहेत व लोकांचे गळे कापले जात आहेत.           नायलॉन मंज्याच्या अनुषंगानं विचार केल्यास पुर्वी पतंग उडत नव्हते काय? उडत होते. मग त्यात जो मंजा वापरला जात होता,  तो घातक नव्हता काय? तो घातकच होता. कारण त्यात काच राहात होता. परंतु त्यावर बंदी घातली गेली नव्हती. कारण त्यात काच जरी असला तरी ते धागे कालांतरानं कुजत असत व नष्ट होत असत. याचा अर्थ असा नव्हता की ते धागे माणसाचे आजच्यासारखे गळे कापत नव्हते. तसेच त्याच धाग्यात आजच्यासारखे पशुपक्षी लटकून पडत नव्हते. ते धागे त्यावेळेसही माणसाला क्षति पोहोचवीत होते आणि त्या धाग्यानही पशुपक्षी मरण पावत होते.          पतंग हा खेळ राष्ट्रीय नाही. म्हणतात की तो खेळ चीनमधून आला. तसा तो खेळ वाईटच. कारण पतंग कटल्यानंतर ती पतंग उडत उडत लांब अंतरावरुन जमीनीवर पडते आणि ती पडतांना माणसाला क्षति पोहोचवते. यामुळंच हा खेळच मुळात बंद करायला हवा. नायलॉन मंजावर बंदी आणण्याऐवजी. कारण या खेळात फक्त क्षणीक सुख मिळत असते. मात्र दुःख पाहता जन्मभराचं होते. कुणाचा एकुलता एक लहान मुलगा मरण पावतो तर कुणाच्या घरचा मोठा जीव मरण पावतो. जो कमवता असतो. मग तो नायलॉन मंजा का असेना आणि साधा मंजा का असेना. मंजा विचारच करीत नाही की मी नायलॉन आहे वा मी साधा आहे.            देशानं नायलॉन मंजावर बंदी घालणं हा व्यक्तीगत अधिकार आहे. भारतीय संविधानानं बहाल केलेला. भारतीय संविधानात अनुच्छेद १९ ते २२ मध्ये काही कलमानुसार आपल्याला स्वंतत्र्य वागण्याचे अधिकार दिले आहेत. स्वतंत्र्य व मुक्त विहार करण्याचे अधिकार. त्यात कलम २१ मध्ये व्यक्तीगत स्वातंत्र्य बहाल केले गेले आहे. पतंग उडविणे हा आपला व्यक्तीगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळंच त्यावर बंदी आणता येत नाही. परंतु त्या छंदानं जर कुणाचे जीव जात असेल तर असे छंद कोणत्या कामाचे? असे छंद वा खेळ बंद केलेले बरे. उदाहरणार्थ एखाद्यानं जर म्हटलं की मला अनुच्छेद १९ ते २२ नुसार व्यक्तीगत स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. मला त्यानुसार मुक्तपणे वागता येते. त्याच वागण्यातून मला हत्या करायची आहे. तर हत्या करण्याचा अधिकार अनुच्छेद १९ ते २२ बहाल करीत नाहीत. पतंग उडविणे ह्या गोष्टीही अशा हत्येच्याच प्रकारात बसतात. त्यामुळंच तसे खेळच मुळात बंद करण्याची गरज आहे. फक्त नायलॉन मंजा बंद करणे नाही. त्यासाठी केवळ जनजागृतीचीच गरज नाही तर तसा कायदा बनविण्याची गरज आहे. जेणेकरुन शेकडो लोकांचे प्राण वाचवता येईल. पशुपक्षाचेही प्राण वाचवता येतील.           महत्वाचं सांगायचं झाल्यास पतंग हा खेळ जरी लोकांना रोजगार देणारा असला तरी तो विध्वंसक खेळ आहे. असे खेळ बंद केलेले बरे. ते खेळ जर बंद झाले तर भविष्यातील कित्येक लोकांचे प्राण वाचवता येवू शकतील हे तेवढंच खरं. तशी बंदी आणल्यास लोकं नक्कीच भडकतील. परंतु काही दिवसानंतर हळूहळू सवय पडेल व तद्नंतर लोकांना वाटेल की ही गोष्ट बरी झाली की पतंग उडविण्याचा छंद बंद झाला.             पतंग उडविणे हा छंद असून तो छंद बंद करणे अतिशय आवश्यक आहे. तो बंद केल्यास उद्या भावी पिढी आपले उपकारच मानतील. म्हणतील की प्राणी पक्षांचा जीवाची आमच्याही जुन्या पिढीनं दखल घेतली व पतंग उडविण्याचा खेळ बंद केला म्हणून बरे झाले.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०