बरसुनी आले रंग प्रीतीचे - 3 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 3

"वाहिनी खूप गोड दिसतेय ...." सुर्ष्टी ने बोट मोडत तिची नजर काढली ... आरश्यासमोर बसलेल्या प्रणिती ची नजर खालीच होती.... 



खर्च ती आज एखादी राजकुमारी दिसत होती.... हिरवी साडी .... केसाचा अंबाडा ..... हातात हिरव्या बांगड्या ..... गळ्यात हार हार आणि त्याच्यावर diamond च मंगळसूत्र ... जे तिने स्वतःच जबरदस्ती काल घातलं होत.... 


तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब खाली पडला..... 



"प्रणिती ... झाली का तयारी बेटा ....."मॉम बोलतच रूममध्ये आल्या.... आणि तिला बघून शांतच झाल्या... 


तिच्याजवळ येत त्यांनी स्वतःच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं... 


"ओह्ह्फो .... काकी ... मी आह वाहिनीची नजर काढली...."सृष्टी 


"असू दे ग... एवढी गोड दिसतेय कि कितीही वेळा नजर काढली तरी कमीच आहे..."मॉम 



पण त्यांना कुठे माहित होत .... तिच्या आयुष्यात नजर नाही तर ग्रहण लागलं होत .... 


"थोड्यावेळाने प्रणिती ला घेऊन खाली ये... मी बाकीच्या तयारी बघते....."मॉम नि सृष्टी ला सांगतलं.... आणि त्या बाकीचं काम बघायला गेल्या .... घरात एवढे नोकर होते पण त्यांना सगळ्या कामात सस्वतःच लक्ष घालायची सवय होती.... आणि आता एकुलत्या एक मुलाचं लग्न झाली म्हटल्यावर तर बघायला नको.... 


"ब्ररो .... काकी ने खाली बोलावलं चल...." सर्वेश धावतच ऋग्वेद च्या बेडरूम मध्ये आला.. 


"किती वेळा सांगितली रूममध्ये येताना knock करून येत जा...." ऋग्वेद 



"ब्रो ... उद्यापासून करेन ना ... म्हणजे मला करावंच लागेल...." सर्वेश ने डोळा मारला... पण ऋग्वेद चे डोळे त्याच्या कडे रोखून बघत होते... तस तो शांत झाला.... 


"तू जा पुढे मी आलोच... एक कॉल येणार आहे.... मिटिंग चा..."ऋग्वेद 



सर्वेश ने काढता पाय घेतला... ऋग्वेद पण फोन वर बोलून झालं तस कंटाळा करत च खाली आला... 


ह्या सगळ्या गोंधळात त्याला एक मिटिंग कॅन्सल करावी लागली होती... त्यामुळे त्याची चिडचिड होते होती.... 


पंडित जी आले तस तो पूजेला बसला.. थोड्यावेळात प्रणिती पण खाली आली .... तिच्या पैजणांच्या आवाजाने ऋगवेड ने वळून बघितलं ... ... आणि पापण्या न मिचकावता बघत राहिला.... आतापर्यन्त त्याने खूप मुली बघितल्या होत्या... पण .... हे सौन्दर्य ...... त्याने कधीच बघितलं नव्हतं... 



"भाई ... वहिनी तुझीच आहे... नंतर बघत बस.... " सर्वेश बोलला... तस सगळेच गालात हसायला लागले.... 


ह्यच्यावर ऋग्वेद ने पुन्हा एकदा सर्वेश ला किलर लूक दिला कि तो गप्प च बसला... 

प्रणिती येऊन ऋग्वेद च्या बाजूला बसली .... अंगचोरूनच .... तो समोर दिसला तरी तिचे हातपाय थरथर कापायचे.... आता त्याच्या बाजूला बसल्याने तर तिला घाम फुटत होता.... 


पूजा करताना मधेच दोघांच्या हाताचा स्पर्श होत होता.... आणि ती घाबरून डोळे बंद करत होती.... 



मधेच पंडितजी दोघाना हातावर हात घेऊन पाणी सोडायला सांगितलं... पण ... तिचा हात उचलत नव्हता... त्याने रागातच तिचा हात घाला आणि स्वतःच्या हातावर ठेवला... 


प्रणिती च्या डोळ्यात पाणी भरलं होत... 

पूजा झाली तस दोघांनी सगळ्या घरातल्याच आशीर्वाद घेतले.... 



ऋग्वेद लागोपाठ त्याच्या रूममध्ये गेला.... आणि change करून खाली आला.... 



"वेड ब्रेकफास्ट ...???" मॉम 


"ऑफिस मध्ये कारेन मॉम..." ऋग्वेद 


"बर ऐक रात्री ल्लवकार घरी ये.... प्रणितीचा उपवास आहे... तुझ्या हातून खाल्ल्यावरच सुटणार समजलं....?..." मॉम 


"try करतो..." तो blazer नीट करत बाहेर पडला... 



"प्रणिती बाळा तंतूला साडी जाड जात असेल ना... सृष्टी सोबत जाऊन change करून ये..." मॉम 

प्रणितीने मन हलवली.... सृष्टी ने तिला अनारकली ड्रेस दिला.... तस तिने तो घातला.... आता थोडं तरी हलकं वाटत होत... नाहीतर त्या वजनदार साडीत तिला कुठेतरी पडण्याची भीती वाटत होती.... 


"वहिनी तुमची बेडरूम बघितीसच नाही ना तू ....?... चाल मी दाखवते..." सृष्टी तिला घेऊन ऋग्वेद च्या बेडरूम मध्ये आली.. 

रूम मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या आधी प्रणिती ला त्याच्या त्या इंपोर्टेड perfume चा सुगंध आला... तिने आजूबाजूला नजर फिरवली.... आणि डोळे खूप मध्ये झाले... 

"एवढी मोठी रूम ..."प्रणिती 

"आग हे एकच भाग आहे... अजून खूप मोठी आहे.." सृष्टी तिला घेऊन एका बाजूला असलेल्या private pool कडे अली... त्या पूल च्या आजूबाजूला च छोटी छोटी फुलाची झाड ल्यालेली होती.... एका बाजूला जिम होत.... 


मागच्या बाजूला छोटा kitchen होत.... रूम च्या दुसऱ्या बाजूला मोठी gallary होती.... 


"तुम्ही इथे आहेत ... बार झालं .... हे बघ मी room designers ला बोलावलंय.... प्रणितीचा wardrobe arrange करायला..." मॉम आपल्या सोबत दोन मुलींना घेऊन आल्या...  


"wadrobe ..?...." प्रणिती

मॉम नि आरशाच्या बाजूला असलेलं बटन प्रेस केलं तस ती भिंत बाजूला झाली.. आणि त्याच्यामागे असलेलं ते भलंमोठं wardrobe ओपन झालं... जिथे ऋग्वेद चे सगळे suit , watich , shoes , perfume , tie .. सगळं काही होत... 


"या..."मॉम त्यांना घेऊन आत आल्या... 

त्या दोन मुली सगळ्या पिशव्या घेऊन आल्या .... आणि एक बाजूच्या भिंतीवर दुसरं wardrobe लागोपाठ arrange करायला लागल्या.... 


"म ... मॉम .... हे एवढं .... सगळं...." प्रणिती ला ते सगळे ड्रेस बघूनच धडकी भरली... एवढे ड्रेस तर तिने दुकानात पण बघितले नव्हते.. 



"लागणार ग .." मॉम नि तिच्या डोक्यावरून हात फिरवला... 


"आता तू सृष्टी च्या रूममध्ये अराम कर... इथे आवाजात त्रास होईल तुला..."मॉम 

"हो . चाल वाहिनी..." सृष्टी तिला घेऊन पुन्हा रुमध्ये अली.... आणि दोघी गप्पा मारत बसल्या .... प्रणिती थोडी खुलली होती.... मधेच काकू पण त्याच्यासोबत आल्या ... 

हळू हळू घरातल्या सगळ्या माणसाबरोबर ती खुलेपानाने बोलायला लागली... 


राती सगळे जेवायला बसले होते... पण ऋगवेड चा मात्र काही पत्ता नव्हता.... प्रणिती ने सकाळपासून फक्त पाणी पीळ होत... 


"फोन लावून बघितलं का..?..." डॅड 

"लावलेला ... जॉर्ज बोलला कि घाई मिटिंग मध्ये आहे..." सर्वेश 


"मी... थांबते... तुम्ही जेवून घ्या...." प्रणिती 


"असं कास बाळा... तू उपाशी आहेस...."मॉम 

"मला .... सवय आहे... तुमची औषध आहेत ... तुम्ही सगळे जेऊन घ्या... "प्रणिती ने त्यांना जेवण वाढायला मदत केली... नाईलाजाने सगळे जेवले... 


मॉम ला तरऋग्वेद वर खूप राग येत होता.... आधीच पेनीती नाजूक होती.... त्यात उपाशी ... त्यांना तिची खूप काळजी वाटत होती... 


"मी थांबते तुझ्यासोनबत ..." सगळे झोपायला गेले तस मॉम प्रणिती सोबत हॉल मध्ये बसल्या..... दोघी खूप वेळ एकत्र बसल्या होत्या.... पण नंतर मॉम ला झोप येऊ लागली.... 


"मॉम .... तुम्ही please झोपा .... नंतर त्रास होईल.... मी आहे "प्रणिती बोल्ट होती पण आतमधून त्या राक्षसाला ऐकत सामोरं जायचं म्हणजे तिच्या अंगावर काटा.... आला... 


"एक काम करते .... मितुमच्या दोघंच जेवण वरती तुमच्या बेडरूम मध्ये arrange करायला सांगते..... तू पण वरती जाऊन अराम कर.... म्हणजे व्हडल्यावर तुम्हाला डीनर करायला मिळेल...."मॉम 


त्याच्या सोबत एका रूम मध्ये राहायचं म्हणजे प्रणिती खूप घाबरत होती... पण वरवर हसत तिने मान हलवली... 


मॉम नि maid ला सांगून त्या दोघांचा डिनर लागोपाठ gallary मध्ये arrange करायला सांगितलं ... आणि त्या झोपायला गेल्या .... 

प्रणिती हळू हळू वरती रूम मध्ये अली.... आणि त्या भल्यामोठ्या बेड वर एका बाजूला अंग चोरून बसली... मागच्या भिंतीवर डोकं टेकत तिने डोळे मिटले... तस गालावरून पाणी वाहायला लागले .... 


दोन दिवसापूर्वी किती छान आणि साधं आयुष्य चाललं होत तीच... एकदम सगळंच बदललं .... तसेच ती कधीतरी झोपी गेली.... 



अचानक अंगावर पाणी पडल्यामुळे तिला जग अली... आणि समोर त्याचा रंगीत चेहरा बघून ती लागोपाठ उभी राहिली... 


"तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बेड वर झोपायची..." ऋग्वेद ने तिचे हात मागे नीट मुरगळले .... 

"आह ...." तिच्या डोळ्यात पाणी भरलं.. 



"मी...मी....ते...."तिला बोलायच होत पण जीभ उचलत नव्हती ..... 


"हे बघ लग्न केली ह्याचा अर्थ असा नाहीये इथे सगळ्यावर तुझा हक्क आहे... स्वतःची लायकी ओळखून राहायचं..." त्याने तिचे हट्ट सोडले.... आणि change करायला wardrobe मध्ये गेला.... 
पण तिथे पुन्हा झालेला बदल बघून .... त्याचा राग पुन्हा उफाळून आला.. 
आधीच एकटे मिटिंग उशिरा झाल्याने त्याच डोकं तापलेलं होत... आणि त्यात रूम मध्ये आल्या आल्या तिला बेडवर बघून सगळं राग तिच्यावर निघाला.... 

change करून तो बाहेर आला तर ती अजून बेड कडेच उभी होती... 

"तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का...?... माझ्या डोळ्यासमोरून बाजूला हो... "ऋग्वेद 

"मी... ते ... जेवण..." प्रणिती ने कसतरी जीभ उचलली... 


"माझी बायको बनण्याचा प्रयत्न पण करू नको... तुझ्याशी लग्न मी फक्त आईच्या सांगण्यावरून केली... त्या तुझ्या जाळ्यात फसल्या असतील पण मी नाही... तुझा हा जो innocent चेहरा आहे ना मी तो चांगलाच ओळखतो....माझ्यासमोर हे चांगलं बनायचं नाटक करायचं नाही.." तिचा चेहरा चिमटीत धरत तो बोलला ... आणि तसेच मागे ढकलून दिल.... आणि बेड वर जाऊन पडला... 


प्रणितील आता गरगरायला लागलं होत... ती हळू हळू चालत gallary मध्ये अली .... जेवण तर आता जाणारच नव्हतं... तिथेच सोफ्यावर कसबस अंग चोरून घेत ती पाय वर घेऊन बसली... आणि गुडघ्यात तोड घालून रडायला लागली.... उशिरा कधीतरी रडत रडत तिचे डोळे बंद झाले...... 




क्रमशः

"हे बघा.. मी हे लग्न फक्त आणि फक्त ... मॉमच्या सांगण्यावरून केली... त्या मुलीशी माझा काही एक संबंध नाहीये..."ऋग्वेद ने जर आवाज चढवत सांगितलं... 
"are you mad ...?... लग्न आहे ते वेद ... कोणतं खेळ नाहीय ... स कास बोलू शकतोस तू...? तुझ्यामुळे त्या मुळीच आयुष्य तू असच वाया घालवणार आहेस का...? राकेश 
खर्च ऋग्वेद साठी हे लग्न फक्त एक फॉर्मलिटी होती का....??? आईसाठी केलेल्या ह्या लग्नात तो स्वतः अडकत चालला नव्हता का ...!!!