जातीय द्वेष कारणे व उपाय Ankush Shingade द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जातीय द्वेष कारणे व उपाय

जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग कसा असावा          अंकुश शिंगाडे लेखक नागपुर       ९३७३३५९४५०,९९२३७४७४९२           भारत स्वतंत्र्य झाला.भारतात प्रजासत्ताक आलं.पण जातीय द्वेष अजुनही कायम आहे.२५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाळली.१९ मार्च १९२७ ला चवदार तळ्याचं आंदोलन केलं गेलं,तो आंदोलनाचा खटला ही १९३७ पर्यंत लढला गेला.हवं तर त्या खटल्यात बाबासाहेबांनी जीवाचे प्राण ओतुन तो खटला जिंकलाही.तसेच दलितोद्धारासाठी संविधान ही लिहिल्या गेलं असलंं तरी आजही जातीय द्वेष कायम आहे.त्याची कारणे पुढीलप्रमाणे       अ)कारणे        १)चवदार तळ्याच्या आंदोलनात इतर अस्पृश्य समाजाचा पाहिजे तेवढा सहभाग नव्हता           इतर समाज अस्पृश्य असुनही स्वतःला ग्रेट समजत होता.काही समाज प्रगत होते.तर काही समाज हे अत्यंत मागास होते.शिवाय अज्ञानीही जसे चांभार,मेहतर सधन होते.तर मांग, खाटीक हे अत्यंत मागास होते.तसेच हे अज्ञानी असल्याने यांना पाहिजे तेवढी अक्कल नव्हती.म्हणुन त्यांनी चवदार तळ्याच्या आंदोलनात उत्स्फुर्तपणे भाग घेतला नाही.आजही कोणत्याही आंदोलनात हिरीरीने भाग घेेत नाही.त्यामुळे आजही जातीय द्वेष दूर करता येत नाही.       २)आम्ही पोटजातीतील वादात स्वतःच भांडलो.          आमच्या अठरापगड जाती होत्या.त्यातही आमच्या पोटजाती होत्या.जसा जातीजातीत विटाळ होता.तसा आमच्या पोटजातीतही विटाळ होता.आम्ही आमच्या पोटजातीच्या हातचे साधे पाणीही पित नव्हतो.एवढा विटाळ होता.आम्ही आमच्याच पोटजातीत भांडत राहिलो.आजही भांडत आहोत.आजही आम्ही मनाने एक झालो असलो तरी विचाराने एक नाही.आजही आम्ही पोटजातीत लढतो आहोत.पोटजातीत लग्न करतांना एकबैल्याला दोनबैली,तिरील्याला खैरे कुणबी मराठ्याला परदेशी,कोस-याला लाडवण चालत नाही.आमचे आजही पोटजातीतच भांडणं आहेत.         ३)इतर समाजाने अस्पृश्यांना समजुन घेतले नाही.          इतर समाज तर मनुस्मृती च्या धोरणानुसार चालत होता.वागत होता.त्यांनी फक्त समातन्यांच्या विचारावर विश्वास ठेवला.अस्पृश्य समाजाला समजुनच घेतले नाही.त्यांनाही भीती होती की ते जर अस्पृश्यांशी लगट करतील तर त्यांना वाळीत टाकले जाईल.म्हणुन जातीय द्वेष कायम राहिला.आजही अस्पृश्य समाजाचा वापर तो सनातनी समाज करुन घेतो.पण बदल्यात आम्हाला काय मिळते.कोरभर तुकडा भेटला की त्यात धन्यता मानणारे आम्ही आजही पुर्ण पोळी मिळविण्याचा प्रयत्न करीत नाही.इतर समाजही आम्हाला कोरभरच तुकडा देतो.        ४)आम्ही आमचा इतिहास जाणुन घेतला नाही.          अस्पृंश्यांचाही मोठा इतिहास होता.ते राजेमहाराजे होते.पण त्यांनी लढतांना आपली ताकद हरवली..त्यामुळे त्यांना लढता आले नाही.त्यांना वाटले की या सनातनी समाजापुढे आपण टिकु शकणार नाही.ज्यांचा मोठा इतिहास होता.ते आपल्याच तालात मश्गुल होते.त्यांचे पुर्वज राजे महाराजे होते.एवढेच नाही तर त्यांच्या पुर्वजांनी या सनातनी लोकांच्या राजांनाही वाचविले होते.जसे शिवाजीला मदारी मेहतरने आग्र्याच्या कैदेतुन तर जीवा महालाने अफजलखान भेटीदरम्यान सय्यद बंडाच्या वारापासुन.तसेच संभाजीचे तुकडे गोळा करुन त्याला दहन करुन मराठ्यांची अस्मीता जोपासणे एका एका महाराने पाचशे पेशव्यांना मारणे हा इतिहास होता.पण त्या इतिहासाचा अस्पृश्यांनी फायदाच घेतला नाही.        ५)आम्हाला आमच्याच नेत्यांनी गुमराह केले         आमचे दिशा देणारे काही नेते त्या सनातन्यांच्या मायाजालात फसुन आम्हाला गुमराह करीत होते.त्यांनी कधीच आम्हाला त्यातुन बाहेर काढले नाही.त्यांनी बाबासाहेब यांना त्यावेळी सहभाग दिला नसल्याने आजही जातीय द्वेषाची धग दिसते आहे आजही आमचे नेते तेच करीत आहेत.जे आमच्या पुर्वजांनी केले.भाजपा,आर पी आय काँग्रेस बसपा सपा यासारख्या तत्सम पार्ट्या काढुन लोक आपल्या समाजाचा विभागणी मतदानात करीत आहेत अस्पृश्य लोक.याच दुहीचा गैरफायदा घेत ते लोक राज अन् जुलूमही करीत आहेत अस्पृश्य लोकांवर.पण ते आम्हाला कळत नाही.          ६)आमच्यात स्वार्थीपणा कुटकुट भरला आहे.         आज देशात असंख्य लोक आहेत अस्पृश्य समाजाचे.पण त्यातील बहुसंख्य लोकांमध्ये स्वार्थीपणा कुटकुट भरला होता.वेगवेगळ्या पक्षात राहणारी मंडळी.आजच नाही तर कालपासुन स्वार्थ साधत आहे.कालही चवदार तळ्याच्या आंदोलनात स्वार्थीपणा मुळे भाग घेतला नाही,अन् आजही संक्रीय पणे साथ देत नाही.           ७)साहित्यीकांचा सहभाग नाही.             अस्पृश्य जात आधीपासुन अज्ञानी होती.पण जेव्हा लिहायला लागली तेव्हा पासुन तरी ते अभयपणे लिहीत नाही.साहित्यीकांच्या लेखनीत दिशा देण्याचे तंत्र असतांनाही हे अस्पृश्य साहित्यिक सनातन्यांना घाबरुन आजही जातीय द्वेष दूर करण्याचा प्रयत्न करीत नाहीत.पर्यायाने जातीय द्वेष कसा दूर होईल?हे प्रश्न चिन्ह आहे.          जातीय द्वेष आजही आहे.यामुळेच त्या वढु गावात जातीय दंगल उडाली.खुप लोक जखमी झाले.दगडफेक,काचफेक यात गाड्या फोडल्या गेल्या.बसचेच नाही तर देशाचेही नुकसान झाले.यावर साहित्यिक यांनी आपआपल्या लेखन्या तळपवल्या,पण त्यांना फारसे यश आले नाही.         ब)जातीय द्वेष दूर करण्यासाठी साहित्यीकांनी काय करायला पाहिजे?        १)लोकांची मनं बदलविणारे लेखन उच्च समाजाने करावे.         साहित्यीकांनी मनं बदलविणारे लेखन करावे.लोकांच्या मनातील कलुषीतपणा बदलविण्यासाठी लेखकांनी लेखन करावे.उच्च समाजानेही आपण उच्च जातीचे आम्हाला काय?अशी भुमिका घेण्याची गरज नाही.          २)नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षात वावरु नये यासाठी साहित्यीकांनी आपले लेखन करावे.           समाज लेखकांच्या मार्गदर्शनावर नाही तर नेत्यांच्या भाषणावर जास्त विश्वास ठेवतो.तेव्हा लेखन करतांना आधी नेतेच बदलतील अशा प्रकारचे लेखन करावे.साहित्यीकांनी ह्या नेत्यांनी आपली राजकीय पोळी शेकु नये.याचा विचार करुन लेखन करावे.जेणेकरुन नेते एकत्र येवुन देशात जातीय तेढ निर्माण होणार नाही याचा प्रयत्न करतील.जातीय सलोखा निर्माण करतील.          ३)अस्पृश्य समाजातील लेखकांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.          अस्पृश्य समाजातील लेखकांनी लेखन करतांना जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.तसेच एखाद्या वेळी एखादी घटना घडल्यास त्या घटनेवर रोष न दाखवता ती घटना शांतिपूर्वक कशी हाताळता येईल याचंच लेखन करावं.म्हणजे जातीय द्वेष निर्माण होणार नाही.          ४)उच्च जातीतील साहित्यीकांनी अस्पृश्य जातीतील लोकांच्या वास्तुचा इतिहास बदलणार असे लेखन करु नये.          सर्वांचा इतिहास असतो.न मिटणारा इतिहास.ती ती मंडळी आपल्या आपल्या पुर्वजांचा वारसा जपत असतात.पण काही साहित्यिक हे हा वारसा बदलविणारे लेखन करतात.जसे वढु येथे चक्क संभाजी महाराजांचे तुकडे गोविंदा महाराने गोळा करुन त्याला अग्नी दिला.पण हा अग्नी कोण्या शिवले नावाच्या मराठ्यांनीच केला.तसा फलक तिथे लावण्यात आला अशा प्रकारचं लेखन करु नये.           ५)जातीय द्वेष निर्माण होणार नाही याची साहित्यीकांनी व्यासपीठावर चर्चा करु नये.साहित्य संमेलनातुन तसा सुर उमटु नये.            जातीय एकोप्यासाठी सभा संमेलने भरवावीत.संमेलनात एकोप्यावर चर्चा व्हावी.पण ह्या संमेलनातुन जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारची भाषणं होता कामा नये.साहित्यीकांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावा.          ६)साहित्यीकांनी भेदभाव करु नये           महत्वाचे म्हणजे साहित्यिक हा साहित्यीक असतो.तो कोणत्याही जातीतील धर्मातील नसतो.त्याची जात आणि धर्म साहित्यिक असावं.तसे त्याने मानावे.त्याने भेदभाव करु नये.भेदभाव युक्त लेखन करु नये.पण आजचेच नाही तर पुर्वीचे साहित्यिक ही असाच भेदभाव पाळायचे.भेदभाव युक्त लेखन करायचे.जसे मनुस्मृतीतुन स्रीयांनी व दलितांची अधोगती दाखवली.अधोगतीयुक्त लेखन केले.          ७)प्रसारमाध्यम हे जातीवादी नसावे           प्रसारमाध्यम जातीवादी नसावे.लेखकांनी प्रसारमाध्यमातुन जातीवादी भुमिका मांडुन ही जात श्रेष्ठ ही कनिष्ठ असे दाखवु नये.तसेच जाती धर्माला उच्च स्थान न देता समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा.जसे १९२७ ला चवदार तळ्याचे आंदोलन झाले त्यावेळी वर्तमानपत्रांनी जातीवादी लेखन केले होते.त्याचे कारण म्हणजे समाज अस्पृश्यांना अस्पृश्यच समजत राहावं.त्याने इतर समाजाच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न करु नये.          ८)अभ्यासक्रम जातीवादी तयार करु नये           सगळे संस्कार शाळेतील वर्गखोल्यातुन करता येतात.वर्गखोल्यातुन लहान वयात मोठेपणाच्या कार्याचे बीजारोपन होते.पण त्यासाठी अभ्यासक्रम तसा असावा.जसे- दादोजी कोंडदेव हेच शिवरायांचे गुरु आहेत.असा अभ्यासक्रम होता.पण आता वेगवेगळ्या शिक्षकांनी शिवरायांना शिकविले.एकट्या दादोजींनी नाही असा अभ्यासक्रम आहे.तसेच शिवरायांच्या राज्यभिषेक वेळी ब्राम्हण काशीहुन आणला होता.असे विधान असु नये.यामुळे साहजिकच बालवयात महाराष्ट्रात ब्राम्हण असतांना काशीहुन का आणावा लागला असा प्रश्न पडतो.त्याचे उत्तर शोधण्याचा ही मुले प्रयत्न करतात.त्यानंतर जातीय तेढ निर्माण होते.शिवाय हे अस्पृश्य होते हे उच्च होते.संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले होते.एकनाथांनी अस्पृश्यांचे पोर कडेवर घेतले.असे भाग अभ्यासक्रमात नसावे.याने जातीय तेढ तसेच द्वेष निर्माण होतो.          सांगण्याचे तात्पर्य हेच की साहित्यिक हे जगाला जगण्याचा आरसा दाखवतात.पण त्यांनीच जर जातीवादी लेखन केले.ते लेखन लोकांना सांगीतले.गाजावाजा केला.अभ्यासक्रमातही त्याच लेखनाचा राबविला तर कधीच जातीय द्वेष समाप्त होणार नाही.जातीय हिंसा अस्मीता नष्ट करण्याची गरज आहे.आपण सगळे एक आहोत.कोणीही आईच्या गर्भात दहा महीने वास्तव्य करीत नाहीत.त्यामुळे हा कनिष्ठ हा उच्च असुच शकत नाही.तसं समजण्याचं कारण नाही.साहित्यीकांनी तशी भुमिका घेवु नये.        पण आम्ही साहित्यिक च जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.जे जगाला चांगल्या विचाराचा आरसा दाखवु शकतात.ते साहित्यीक जर आपल्या लेखन शैलीतुन जातीवादी भुमिका मांडत असतील तर कधीच भेदभाव नष्ट होणार नाही.एकंदरीत सांगायचे झाल्यास साहित्यीक हे विशिष्ट जातीचे जरी असले तरी आपण फक्त एक साहित्यीक समजावे.त्यांनी जातीवादी भुमिका घेवुन लेखन करु नये.           अंकुश शिंगाडे लेखक नागपुर१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपुर ४४००३५ मो. नंबर ९९२३७४७४९२, ९३७३३५९४५०