वेळ Kartik Kule द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वेळ

"निघता वेळ जपायला शिका" 

आयुष्य खूप भारी आहे पण त्याला आपण जर जगायला शिकलो नाही तर स्वतःच्या मनावर खूप आणि खूप परिणाम होतो . प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही होतच असत जे होत तर प्रत्येकाचा आयुष्यात असत पण त्याला वाटतं की हे फक्त आपल्यासोबत होत आहे आणि हेच आपण चुकीच समजतो आपल्या सोबत जे जे होत ते प्रत्येकासोबत होत असत फक्त आपल्याला ते माहित पडत नाही आणि त्याच कारण की लोक आपल दुःख आपल्या माणसांना कधीच सांगत नाहीत आणि ही खूप बेकार गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली आपण आपला चेहरा एवढा मॅनेज करतो ना की आपल्या आयुष्यात कितीही दुःख असलं ना तरी ते आपण चेहऱ्यावर आणत नाही आणि समोरचा दुखवू नये म्हणून त्याला हसवायला बघतो ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या आणि या समाजात या जगभरात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्ती साठी तो एक pired असतो जेव्हा आपण आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या आनंदात राहू लागतो जरी कितीही टेन्शन असू द्या आपण ते विसरतो थोड्या का कारण साठी होई ना पण विसरतो आणि त्यामुळे आपण आतमधल्या आत खूप तुटत जातो . आपल्याला वाटत की आपल्याला कोणाचा सोबतीची गरज नाही आहे पण हे खूप चुकीचं आहे आपल्याला कितीही वाटल की कोणाची गरज नाही तरी आपल्याला एकतरी व्यक्तीची गरज असते जो आपल्या ला समजून घेऊ शकतो मेबी हे आपल्याला तेव्हा नाही समजत जेव्हा ते आपल्या सोबत असतो हे आपल्याला तेव्हा कळत जेव्हा आपण त्याच्या पासून खूप दूर निखून जातो तेव्हा त्याला relet होत की हा व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्वाचा होता तो जे जे शब्द बोलतो ते आपल्याला कधीन कधी तरी आठवतात आणि ही वेळ खूप बेकार असते कारण त्या वेळी तो आपल्या सोबत नसतो काहीलोक आपल्याला खूप जवळची असतात आणि अशी वेळ येते की ते अचानक आपल्या ला सोडून जातात आपल्याला माहित हि नसत की हे आपल्याला सोडून जाऊ शकत नाही . 
अस कधी झालं का की आपल्या जवळचे लोक जे आपल्या सोबत लहान पण पासून असतात पण एक वेळी ते त्यांच्या कामासाठी असे निघून जातात जिथे त्यांना आपण विचार ही केलेला नसतो की आपण त्यांना किंवा त्यांच्यापासून लांब जाणार आहोत एवढी वर्ष सोबत होतो पण एकदाही असा वाटल नाही की ते सोडून जातील ते सोडून गेल्यावर काय होईल देवास रात्र सोबत राहिलो आणि ते आपल्यापासून लांब गेले आणि त्याचा कारण नोकरी करणं स्वतःचा पोटासाठी ते आपल्याला सोडून गेले प्रत्येकाच्या आयुष्यात हे झालंय आपला मित्र आपल्याला सोडुन जातो आणि ज्याला आपण कधी रडतान्हा पाहील नाही ज्याच्यासाठी आपल्याला काहीही वाटत न्हवत फक्त सोबत म्हणून सोबत रहायचो फक्त खेळायला आणि तो ज्यावेळी सोडून जातो त्यावेळी डोळ्यात पाणी येत आणि ढसा ढसा आपण रडतो आणि हे आपण कधी except केलं न्हवत . की वेळ अशी निघून जातेना की ती वेळ आहे आली आणि गेली ही काळात सुद्धा नाही आणि ही कळायला आपल्याला वेळ सुधा नाही भेटत आणि हे आपल्या सोबत नाही तर भरपूर म्हणजे सर्वांच्या सोबत हे एकदातरी घडत आपल्याला वाटत की हे काय अस नाही होणार अशी वेळ नाही येणार पण आपण खूप चुकीचं विचार करतो कारण वेळ ही अशी गोष्ट आहे जी असताना समजत तर नाही पण तिचा असण्याचा एक तरी असा छोटासा प्रश्न आपल्याला सारखा वीणावत असतो सांगत असतो की मी आहे वेळ आहे काय ते आताच मिनीघुन गेली तर तू खूप दुखावशील त्यामुळे आताचा वेळ समजून घे आणि आपण हे नाही समाज आणि एक वेळ ती निघून गेली की आपल्याला ती लोक ती माणसं ते मित्र त्या वेळी घालवलेली ती आनंदी क्षण ही आपल्याला आठवत जे आपण ज्याचा विचारसुद्धा नाही केला की ज्या गोष्टी आपण सहज पणे एक वेळ जाण्यासाठी एखादी छोटीशी मजा केली तिच आज वेळ गेल्यावर आपल्याला त्याचं गोष्टी आठवून आपण रडतो आठवतो का काय वेळ होती आपण तेव्हा कशा प्रकारे दिवस घालवायची याची पुन्हा पुन्हा मनात विचार करून खूप रडायचो जे नकळत घडलं त्या साठी यात काहीही बदल नसतो फक्त आणि फक्त वेळ या एका शब्दाने पूर्ण जनरेशंचा 
 आठवणी पुसटतात तुम्ही कधी इमॅजिनच केलं न्हवत की तुम्ही शाळेत जाऊन आशा आठवणी गोळा करणार ज्या तुम्ही मरणापर्यंत त्याच आठवणी लक्षात ठेऊन मनात ठेऊन आनंदही होणार आणि दुःखी ही आनंदी यासाठी की त्यावेळी आपण किती मज्जा करायचो आणि दुःखी यासाठी की आता आपण हे नाही करु शकत अशी मज्जा अशा अशा गप्पा कारण काय याची वेळ, किती छोटासा शब्द आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचा किरदार निभावतो. मला अजून ही आठवतंय की मी आणि माझे मित्र आम्ही 17 वर्ष एकाच वाडीत राहिलो एकत्र भांडलो परत एकत्र झालो पण कधी अस वाटलच नाही की आम्ही एक मेकांसाठीन रडू मला अजून ही तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही त्यांना सोडायला गेलो आणि जाता जाता खूप रडलो सर्वांना माहीत आहे की आपण परत प्रत्येक सणाला भेटणारच आहोत पण आम्हाला हेही माहीत होत की यापुढे अशी सात अशी मस्ती अशा आठवणी परत होणार नाही आणि याच कारण आहे वेळ कारण जेव्हा वेळ होती तेव्हा एन्जॉय केलं पण तस नाही जसं की ते सोडून जातील एकदम अचानक यासाठी नाही तर मनात आलं म्हणू वेळ घालवाची म्हणून . ही वेळ आहेना यासारखं तुम्हाला रडवणार कोण्ही नाही ना पैसा ,प्रेम काही नाही आणि म्हणून वेळेला महत्त्व द्या कधी निघून जाईल नाही सांगू शकत पण आहे तेव्हा तरी जगून घ्या आणि आठवणी गोळा करा कमीत कमी त्या आठवून तरी आनंद होईल आणि वेळेसोबत जगायला शिका नाहीतर अस वाटेल की काहीच नाही आहे या जगात फक्त राहायचा पैसे कमवायचे आणि मरण पावायचं म्हणू. जगा आणि त्यासाठी वेळ काढा 

की विसरतील त्या कळ्या जिवंत पाणी च्या जगण्याला 
 वेळ एखादा काढून बघ नाहीतर व्यर्थ आहे या जगण्या ला व्यर्थ आहे या जगण्याला
 
वेळ निघता निजून जाईल आठवणी मात्र सोबत ठेवा
पुस्तकाच्या या शेवटा सारख्या
आठवणी मात्र जमवून ठेवा आठवणी मात्र जपून ठेवा 

                #k.k.raiter 
  आवडल्यास नक्की सपोर्ट करा एक खेड्यातला साधा raiter 🙏
🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩