कोंदण पर्व एक - भाग 6 Shabdbhramar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंदण पर्व एक - भाग 6

क्लास सुटला होता. मी आणि सुनी चालत थोडंच पुढं आलो तसं आम्हाला नेहमीची त्या सचिनच्या सायकलीची खडखड ऐकू आली.


" आलाच!!" सुनी माझ्याकडे बघत हसत म्हणाली.


" एकदम वेळेवर हा सचिन!! अजिबात चुकत नाहीस तू!" सुनी म्हणाली.


तो जवळ येऊन थांबला. सुनीने ने तिच्या बॅग मधून वही काढली आणि त्याच्यासमोर धरली.


" thanks गं.. तुझ्यामुळे खूप सोपं झालंय मला हे सगळं. " तो म्हणाला. त्याने वही घेण्यासाठी हात पुढे केलाच होता.
तेवढ्यात मला काही सुचलं.. अचानक...


"मी आज काहीच लिहीलं नाहीये क्लास मध्ये. सुने तुझी वही हवीये मला आज." छातीतल्या वाढलेल्या धडधडीला दुर्लक्षित करत मी त्या दोघांच्यात निर्लज्ज होत नाक खुपसलं.


दोघे चमकून माझ्याकडे बघू लागले. मग एकतर मी काहीही करत नव्हतो त्या सचिनला, समरला किंवा आणखी कोणाला. तरीही माझ्याच नादाला लागून मला त्रास देत होते ते लोक. माझ्या सुनीच्या मध्यें येत नाक खुपसण्याचं कारण काय??


"खरं कि काय? मग काय करत बसला होतास क्लासमध्यें?" सुनी म्हणाली.


" काही नाही लक्ष नव्हतं लागत माझं आज. " मी म्हणालो.


" अरे मग मी सांगते तूला काय शिकवलं ते. त्याला नेऊ देत कि वही. " ती म्हणाली. 


" नको मागच्या दोनचार तासाचं बाकी आहे. आजचं नाही फक्त. माझं एका दिवसात नाही लिहून व्हायचं. दोन दिवस तरी लागतील. " मी अतिशय लहान मुलासारखा हट्ट करत होतो. हे मला समजत होतं. मला त्या सचिनचा राग आला होता. पण त्या भरात मी सुनीला अवघडलेपण देत होतो हेही मला कळत नव्हतं.


" नेत्रा.. असू देत. दे त्याला वही. असं कर मी रविवारी येतो तुझ्याकडे. अर्धातास फक्त. मला फक्त काय शिकवलं तेवढं सांगशील .. कारण मग पुढचं व्याकरण शाळेत समजणं फार अवघड जातंय. आणि हो आणखी एक.. ते बीजगणितातले दोन तीन अवघड प्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे ते पण सांग.. प्लिज हा!! " तो म्हणाला आणि लगेच तिच्या हो नाहीची वाट सुद्धा न पाहता निघून पण गेला.


नेत्रा?!! हा सचिन तीला नेत्रा बोलावतो? हे कधी झालं? आणि इतका अधिकारवणीने कसा काय बोलू शकतो तिच्याशी. इनमीन दोन अडीच महिन्याची ओळख. त्यावर हा एवढी मजल गाठू शकतो? असं काय आहे याच्यात? सुनी मला मी काही मागितले असता कधीच आढेवेढे घेत नव्हती. तिने चक्क त्याच्यासमोर मला नकारात्मक उत्तर दिल्यासारखं केलं. पण त्याने माझा प्लॅन उलटवला होता. ती रविवारी त्याच्यासोबत अभ्यास करणारं होती. डोकं भारीच चाललं त्याचं. मीच मूर्ख होतो. 


" काय चाललंय रे? " सुनी माझ्याकडे वळत मला म्हणाली.


" कुठं काय? " मी म्हणालो.


" तू वही का देऊ नाही दिलीस त्याला? मला माहिते तू तसाच बसत नाहीस कधी वर्गात. लक्ष असतं बरंच तुझं. थोडा केला तरी मन लावून करतो तू अभ्यास म्हणालं कि.. मी खूप अभ्यास करते तेव्हा कुठे मला इतके मार्क्स पडतात. तू एकपाठी आहेस आणि एकदा समजवलं कि तूला समजतं. तूला एवढा अभ्यास न करता पण बऱ्यापैकी मार्क्स असतात. खरंतर माझ्या वहिची गरजच नाहीये तूला. मी काही तूला आत्ता नाही ओळखत जाडू. काय झालं? सांग बरं खरंखरं. " तिने विचारले. 


गोची हीच होती कि हि सुनी मला खोटं बोलताना किंवा लपवताना लगेच पकडत असल्यामुळे मी फारसं नाटक लांबवू शकत नव्हतो. मला मग सांगणं भाग पडलं.


"सुने!! तो सचिन.. तो मला नीट मुलगा वाटत नाही." मी बोललो.


" का रे? कशावरून असं म्हणतोस?" तिने विचारले.


" माहित नाही. पण फार नाटकी वाटतो मला तो. काहीतरी लपवून खोटं खोटं वागतं असल्यासारखा. खूप वरवरचं असं वागतोय आत काही शिजत असल्यासारखं.." मी म्हणालो. अजूनपण मला नीटसे तीला काही सांगायला जमत नव्हते.


" अरे काय नाटकीपणा केला त्याने, असं काय जाणवलं तुला ते तरी सांग? " ती विचारत होती.


"जाऊदे मला नाही नीट सांगता यायचं आणि तूलाही नाही समजायचं मरू दे. असं पण मी म्हणतोय म्हणून तू थोडीच लगेच विश्वास ठेवणारेस." असं वैतागत म्हणून मी भरभर चालत निघालो.


"ए जाडू!! असं काय करतो? अरे थांब की. नीट बोल तरी.. जाडू.. वेड्या.." सुनी ओरडत होती पण मी ऐकत नव्हतो. मी तिथून निघून आलो.


पहिल्यांदा असं झालं असावं.. मी सुनीवर वैतागलो होतो. तिचा काय दोष होता? माझ्या अशा वागण्याने ती दुखावली जाईल याची मी परवा त्यावेळी केली नाही. नंतर रात्री झोपताना मात्र मला फार वाईट वाटू लागलं. 


आपल्या सहज नात्याला आपणच असं नुकसान पोहोचवू लागलो तर मग इतकी वर्ष जपलेल्या मैत्रीला हळूहळू ताणत नेऊन तोडू. यामुळे तर सुनीचं दूर जाईल. सुनी आयुष्यात हवीये. कुठल्याही रूपाने हवी. तिचं मैत्र महत्वाचं आहे आपल्याला...ती मला अंतर देत नाहीये. मी उगाच रागाच्या भरात तीला समजून न घेता चिडचिड करत आहे हे मला प्रकर्षाने वाटू लागले. एकतर माझ्या समवयीन मुलांमध्ये सुनी सोडून तसं कोणीच जवळ नव्हतं मला. सुनीला उद्या सॉरी बोलायचं असं ठरवून मी झोपलो.


🍁🍁🍁🍁🍁


तिच्याकडे जायला मी घरातून निघणार तेवढ्यात सुनीच घरी आली. मी तिच्याकडे बघून कसनूस हसलो.


"झालास का रे शांत." तिने विचारलं.


" सॉरी यार सुने!! असं वेड्यागत नाही होणार परत माझ्याकडून. उगाच रागाच्या भरात मी काहीपण बोललो तुला. तू सचिनला वही दे.. त्याला अभ्यासात मदत कर. उगाच तुझ्या चांगल्या स्वभावाला चूक समजत मी यावर बोलणं बरोबर नाही हे मला कळलंय." मी म्हणालो.


" ए जाडू!! अरे सॉरी काय म्हणतोस? तू बोल कि मला कितीपण.. . इतर कोणापेक्षाही तू खूप महत्वाचा आहेस मला. सगळा वर्ग एकीकडे आणि जाडू एकीकडे समजलास न? आणि राहिलं सचिन किंवा इतर कोणाचं. कोण कशासाठी जवळ येत मैत्री करतं. हे न बघता आपल्याकडून काय चांगलं करता येईल ते करायचं असं बाबा म्हणतात मला.


जाडू तू खूप हुशार आहेस माझ्यापेक्षा पण खूप.. मला माहित आहे. तू खूप मोठा होशील. फक्त आत्ता एक कर मन जरा मोठं कर.. ते पण तूला जमेल. तू माझ्यासारखा नाहीस. तूला सहसा राग येत नाही. आला तर तूला छान कंट्रोल करता येतो.. माझे बाबा मला म्हणतात तुझ्या मित्राकडून शांतता शिक. मी शिकतीये तुझ्याकडून.. पण जाडू काल तर टोमॅटो झाला होता तुझा." ती हसत म्हणाली.


"त्या सचिनचा विचार तू नको करू. मला काही वेगळं असं जाणवलं तर मी होऊन त्याला शिस्तीत आणेन. तूला माहिते ना आपली सुनी कशीये ते? " सुनीने मला समजावले.


खरच तर होतं. मी सुनीच्या क्षमतेवर अविश्वास दाखवणं चुकीचच होतं. ती मजबूत होती. मैत्रीचं नातं मुक्त असायला हवं हे मी जाणलं होतं. एकमेकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत जमेल तिथे फक्त आधार देत पुढं न्यायचं असतं. सुनीच्या म्हणण्यात तथ्य होतं.


माझा संभ्रम दूर झाला होता. हलक्या वावटळीना वादळ समजण्याची चूक मी पुन्हा करणारं नव्हतो. उलटं माझं शिड मजबूत करत प्रवासाची अगेकूच करणारं होतो. त्यात सुनी सोबत असणारच होती.


🍁🍁🍁🍁


"अविश्वासाचं धुसर अच्छादन
तुझ्या माझ्यात येणार नाही.
आपल्या गलबतासमोर येणारे तकलादू भवरे
हा प्रवास भरकटवणार नाही."

- क्रमशः 

शब्दभ्रमर 🍁🍁