अनुबंध बंधनाचे. - भाग 54 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 54

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५४ )

प्रेम तिच्या मॅसेजला कोणताही रिप्लाय देत नाही. तो ऊठुन आवरतो. नाष्टा वैगेरे झाल्यावर मैदानात क्रिकेट खेळायला जातो. दुपारी जेवणानंतर थोडा वेळ वरती जाऊन झोपतो. 
संध्याकाळ झाली होती, वैष्णवी खालून त्याला आवाज देते. तिच्या आवाजाने त्याला जाग येते. तो ऊठुन मोबाईल मधे टाईम बघतो. संध्याकाळचे पाच वाजले होते. वैष्णवीची साडी चेंज करायची होती. त्यासाठी मार्केटला जायचं होतं. तो खाली येऊन फ्रेश होतो. चहा पिऊन तो त्याची सॅक घेऊन घरातुन निघतो. निघेपर्यंत साडेपाच वाजुन गेले होते. आता जर मार्केटला जाऊन साडी चेंज करायची म्हटलं तर खुप उशीर होईल, कारण अंजली सहा वाजता त्याला भेटणार होती. तिला भेटायला जायचं हे त्याने ठरवलं तर होतं, पण तिला गिफ्ट काय द्यायचं हे त्याला कळत नव्हतं. 
तो गाडी काढतो आणि तिथुन अंजली तिथे भेटणार होती तिकडे जायला निघतो. वाटेत खुप विचार त्याच्या डोक्यात येत होते. त्याकडे दुर्लक्ष करून तो एका गिफ्ट शॉप समोर गाडी थांबवतो. गाडीवरून उतरून तो त्या शॉप मधे जातो. तिला गिफ्ट देण्यासाठी इकडे तिकडे पहात होता. काय घ्यावं हे त्याला सुचत नव्हतं. शेवटी त्याचं लक्ष एका सुंदर अशा घड्याळाकडे जाते. अंजलीला वॉच खुप आवडतात हे त्याला चांगलं माहित होतं.
प्रेम त्या घड्याळाची किंमत विचारतो. शॉप मधील मुलगी त्याला त्याची किंमत सांगते. त्याला जरा जास्त आहे असे वाटते, पण आता त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणुन, त्यांनी सांगितलेल्या किमतीमधे तो ते घड्याळ गिफ्ट पॅक करून घेतो आणि पैसे देऊन बाहेर येतो. त्या शॉपच्या बाजुलाच एक फुलांचे शॉप होते. तिथे जाऊन तो तिथुन एक लाल गुलाब उचलुन ते त्या माणसाला रॅप करायला देतो. नंतर त्याला थोडं वेगळं वाटतं, तो त्या माणसाला थांबवतो. आणि त्या लाल गुलाबाच्या जागी एक पिवळे गुलाब उचलुन देतो. रॅपिंग झाल्यावर ते घेऊन तो तिथून निघतो. 
सहा वाजुन गेले होते. अंजली पावणेसहा वाजताच त्यांच्या भेटीच्या ठिकाणी पोचली होती. ती प्रेमची खुप आतुरतेने वाट पहात होती. तिला माहित होतं आजची भेट ही आजपर्यंतच्या त्यांच्या भेटींपेक्षा खुप वेगळी असणार होती. तो समोर आल्यावर काय करायचं, काय बोलायचं याचा विचार ती मनातल्या मनात करत होती. मधेच ती घड्याळ बघत होती. सव्वा सहा वाजले होते. 
आता मात्र ती थोडी बेचैन होऊ लागली होती. हातातील मोबाईल वर त्याचा नंबर काढून त्याला कॉल करण्याचा विचार करते. पण पुन्हा स्वतःवर आवर घालून त्याची वाट पहायला लागते. 
खरं तर प्रेम बाईक पार्किंग मधे पोचला होता. बाईक पार्क करताना त्याने तिला पाहिलं होतं. तिची बेचैनी त्याला जाणवत होती. 
तो बाईक पार्क करून आतल्या बाजूने तिच्या दिशेने जायला निघतो. अंजलीला मात्र तो दिसत नाही, कारण तिचे लक्ष मेन रोड कडे होते. प्रेम हळूच तिच्या जवळ पोचतो. सॅक मधुन ते गुलाब काढून हातात घेत तिला आवाज देतो.
प्रेम : हॅप्पी बर्थ डे.... !💐😊
 * त्याचा आवाज ऐकून ती पटकन मागे वळून पाहते, समोर प्रेमला पाहून ती इतर कोणताच विचार न करता त्याला मिठी मारते. प्रेमला याची कल्पना होती. त्यामुळे तो काहीच बोलत नाही. शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. यातून सावरण्यासाठी तिला थोडा वेळ देतो. 
थोड्या वेळाने तिला जाणीव होते. ती तिची मिठी सैल करून त्याच्यापासून थोडी दुर होत बोलते. 
अंजली : सॉरी प्रेम... कंट्रोल नाही झालं...!
प्रेम : इट्स ओके....! मैत्रीमधे तेवढं चालतं.! 😊
 * त्याच्या अशा बोलण्याने तिला थोडसं वेगळं फिल होतं... ती त्याच्याकडे पहात असते. प्रेम तिला आपल्या हातातील ते गुलाब देतो. त्यावर ती बोलते.
अंजली : थॅन्क्स...! खुप छान आहे हे...!
प्रेम : सॉरी...! पण दुसरं काही गिफ्ट नाही आणलं तुला....!
अंजली : ठिक आहे ना...! तु आलास हेच खुप आहे माझ्यासाठी...! यापेक्षा मोठं गिफ्ट काय असु शकतं.
प्रेम : म्हणजे...? 🤔
अंजली : अरे म्हणजे...! मला वाटलं... आता तु तुझ्या संसारात बिझी झाला आहेस, मग माझ्यासाठी म्हणजे तुझ्या मैत्रिणीसाठी तुझ्याकडे वेळ असेल की नाही....
प्रेम : अच्छा...! हा टोमणा होता का...?
अंजली : नाही रे...! असच बोलले...! तु सिरियस नको होऊ.
प्रेम : बरं मग ठिक आहे....!
अंजली : आता मला सांग...! कसा आहेस तु...?
प्रेम : तुझ्यासमोरच तर उभा आहे...! कसा दिसतोय...?
अंजली : एकदम हिरो...!😊
प्रेम : अच्छा...! 
अंजली : हा....! तु नेहमीच हिरो सारखा दिसतोस आणि आहेसच हिरो. 
प्रेम : बरं....! खुप झालं आता... पुरे.
अंजली : अरे...! खरच बोलतेय मी...! किती नशीबवान आहे वैष्णवी, कदाचित तिला हे माहित नाही तिने काय मिळवलं आहे. 
प्रेम : बस्....! ते जाऊ दे....! तु बोल... पार्टी कशी झाली रात्री....?
अंजली : नेहमीसारखीच....! 
प्रेम : खुप गिफ्ट वैगेरे मिळाले असतील. बघितले की नाही सर्व ओपन करून...
अंजली : अजुन तरी नाही...!
प्रेम : का बरं....?
अंजली : म्हटलं... आधी तु काय गिफ्ट देतोय ते बघावं...!
प्रेम : अच्छा...! मग दिले ना... हे गुलाब...!
अंजली : हो...! ते तर मिळाले... पण यासोबत जे आणलं आहेस ते...!
प्रेम : काय....! मी तर काहीच नाही आणलं.
अंजली : माहित आहे मला...! चल दे आता पटकन....!
 *असं बोलुन तिने त्याच्यासमोर हात केला. प्रेमने सॅक मधुन ते गिफ्ट बाहेर काढून तिच्या हातात ठेवलं. ते पाहून अंजली त्याला बोलली.
अंजली : मला माहित होतं...! 
प्रेम : अच्छा...! मग यात काय आहे ते सांग बघु....?
 * तो असं बोलल्यावर तिने हातातील गिफ्ट त्याच्याकडे देऊन ते त्याला ओपन करायला सांगत आपल्या हातातील त्यानेच आधी गिफ्ट दिलेले वॉच काढून स्वतःच्या पर्स मधे ठेवते. प्रेम तो गिफ्ट चा बॉक्स ओपन करायच्या आधीच तिने आपला हात त्याच्याकडे केला आणि त्याला बोलली.
अंजली : हे माझं खरं गिफ्ट आहे....!
 * प्रेम ते गिफ्ट ओपन करून ते वॉच तिच्या हातात घालत तिला बोलतो. 
प्रेम : म्हणजे तुला आधीच माहीत होतं की, मी तुला वॉच गिफ्ट करणार आहे ते...!
अंजली : हो...! तेवढं तर ओळखते ना तुला.
पण खरच खुप सुंदर वॉच आहे. मला खुप आवडलं. थँक्यु वेरी मच...! या छान गिफ्ट साठी. 
प्रेम : अच्छा....! इट्स ओके. एवढं पण छान नाही ते, तुझ्या कलेक्शन सारखं.
अंजली : ते तुला नाही कळणार...!
प्रेम : बरं...! नको कळू दे मला...! आता मला सांग...! अभ्यास वगैरे कसा चाललाय तुझा...? आणि घरी मॉम डॅड वगैरे सर्व कसे आहेत.
अंजली : अभ्यास तर चालुच आहे, आणि मॉम डॅड पण मजेत आहेत. 
प्रेम : गुड....! 
 * एवढं बोलुन दोघेही काही वेळ शांत होतात. दोघांनाही पुढे काय बोलायचे ते सुचत नव्हते. काही वेळाच्या शांततेनंतर अंजली त्याला बोलते.
अंजली : चल ना तिथे जाऊन बसु थोडा वेळ. 
प्रेम : नको....! आभाळ भरून आलं आहे. पाऊस येईल असं वाटतं, तु घरी जा, पाऊस यायच्या आधी. 
अंजली : नाही येणार पाऊस...! आणि आला तर बघु... थोडा वेळ फक्त बसूया ना पाच मिनिटे...!आणि इथे मित्र मैत्रिणी पण बोलत बसु शकतात. असं काही नाही. 
प्रेम : तु ऐकणार नाहीस...चल...! 
* असं बोलुन तो तिच्यासोबत तिथून निघतो. ते दोघे त्या तलावाकाठी पसरलेल्या दगडावर जाऊन बसतात. तिथे बसल्यावर दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवतात. ते दोघे फक्त एकमेकांना पहात असतात. काही वेळ पुन्हा शांतता.... 
थोड्या वेळाने अंजली त्याला बोलते...!
अंजली : तहान लागलीय, घसा थोडा कोरडा पडलाय असे वाटते.
प्रेम : माझ्या सॅक मधे बॉटल असेल बघ पाण्याची, माहित नाही पाणी आहे का त्यात...! बघ जरा....!
* ती त्याची सॅकची चैन खोलते, तिला त्यामधे साडीची बॅग दिसते, ती बॅग बाहेर काढून ती त्या बॅग मधुन ती साडी बाहेर काढते आणि प्रेमला बोलते.
अंजली : व्हॉट अ सरप्राइज....!😊 किती सुंदर साडी आहे, माझा फेवरेट कलर... आणि हे कधी देणार होतास. घरी गेल्यावर.
* अंजली ती साडी पाहून एवढी खुश होते. ती खांद्यावर टाकून वगैरे बघायला लागते. आता तर तिला तो हे सांगुही शकत नव्हता की, ती साडी वैष्णवीसाठी घेतली होती. थोडा वेळ तो तिच्याकडे पहात राहतो आणि मग तिला बोलतो.
प्रेम : आवडली तुला साडी...?
अंजली : खुप म्हणजे खुप छान आहे. खरच खुप आवडली मला. आणि थॅन्क्स अजुन एक सरप्राइज दिल्याबद्दल. आय एम वेरी हॅप्पी. थँक्यु सो मच....!😊
प्रेम : इट्स ओके...! पण थोडासा प्रॉब्लेम आहे. 
अंजली : कसला प्रॉब्लेम....?
प्रेम : त्या साडीवर एक छोटासा डाग आहे, ती बदलायला लागेल. 
अंजली : असु दे....! मी लॉन्ड्रीला देईन, निघेल तो डाग...
प्रेम : बरं ओके...! मग ठेऊन दे आता ती. 
 * अंजली ती साडी त्या बॅग मधे ठेऊन देते आणि ती बॅग आपल्या छातीशी कवटाळून बसते. 
* पुन्हा थोडा वेळ शांतता.... मग प्रेमकडे पाहून ती बोलते...
अंजली : प्रेम...! एक गोष्ट विचारू...? खरं खरं सांगशील...?
प्रेम : काय...बोल...?
अंजली : तु खुश आहेस ना...? 
प्रेम : हो...!
अंजली : खरच ना...?
प्रेम : अरे...! हो...! बोललो ना आता, अजुन किती वेळ विचारशील....?
अंजली : ओके...ओके...! सॉरी, मी उगाच हा प्रश्न विचारला. 
प्रेम : असं का विचारावं वाटलं तुला...?
अंजली : अरे...! असं काही नाही, मी अगदी सहज विचारलं.
प्रेम : अंजु....! एक गोष्ट खरी सांगु...! वैष्णवी खुप चांगली मुलगी आहे. माझ्या या परिस्थितीत सुद्धा ती माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली. आणि ती जॉब करत खुप चांगल्या प्रकारे घर , आई - भाऊ यांना सांभाळत आहे. 
अंजली : खुप प्रेम करत असेल ना तुझ्यावर...?
प्रेम : हो...! खरच खुप प्रेम करते, फक्त एवढच नाही तर, घरातील सर्वांना सांभाळून घेते. 
अंजली : तुझ्यावर कोणीही प्रेम करू शकतं रे...! तु आहेसच छान. आणि तु खुश आहेस ना, मग बस् झालं. अजुन काय हवं. 
प्रेम : हो....! तु पण आता तुझ्या करिअर वर फोकस करावा असं मला मनापासून वाटतं.
अंजली : प्रेम...! मी तुला प्रॉमिस केलं आहे आणि ते मी पाळतेय. मी करतेय रे अभ्यास.
प्रेम : गुड गर्ल...! बरं आता निघूया का, थोडा थोडा पाऊस चालु झाला आहे. उगाच भिजायला नको, आजारी पडशील.
अंजली : प्रेम....! पुन्हा कधी भेटशील, तुझ्या या मैत्रिणीला...?
प्रेम : माहित नाही....! पण भेटू असच कधीतरी.
अंजली : प्रेम...! मला एक प्रॉमिस हवं आहे.
प्रेम : कसलं...?
अंजली : काहीही झालं तरी, तु माझ्यापासून कधीच दूर जाणार नाहीस. म्हणजे आपली मैत्री ही अशीच कायम राहील.
प्रेम : अंजु....! पुढे आपल्या आयुष्यात काय होणार आहे ते आपल्याला काहीच माहीत नसतं. मग आत्ता हा विचार करणं चुकीचं आहे ना...!
अंजली : हो...! ते मलाही माहीत आहे, पण तु एवढा विश्वास तरी दे ना, की तु कायम असशील माझ्यासोबत. एक मित्र म्हणुन तरी.
प्रेम : बरं ओके....! पण तु समजुन घेशील मला यापुढे. कारण तुला सांगायला नको.
अंजली : त्याची काही गरज नाही, तेवढं कळतं मला...! मी पुन्हा एकदा तुला प्रॉमिस करते की, मी कधीच तुला भेटायला किंवा बोलायला फोर्स करणार नाही, मग तर झालं.
*ते दोघे बोलत असतात तेवढ्यात अचानक पाऊस चालु होतो. प्रेम पटकन ऊठुन उभा राहतो आणि अंजलीला हात देतो. ती पण तिथून उठते आणि ते दोघे एका बाजुला असलेल्या झाडाखाली येऊन थांबतात. 
पावसामुळे बरेचशे कपल तिथे यायला लागतात. हळूहळू तिथे गर्दी व्हायला लागते. 
अंजली त्याच्या बाजुला उभी होती. ती थोडीशी भिजली होती. तिच्या बाजुला एक मुलगा उभा होता. नकळत त्या मुलाचा स्पर्श तिला होत होता. म्हणुन ती प्रेमच्या समोर येऊन उभी राहते. दोघे एकमेकांना पहात असतात. परत काही जुन्या आठवणी जाग्या होतात. प्रेम तिच्यावरून नजर हटवतो आणि इकडे तिकडे पहात असतो. अंजली मात्र एकटक त्यालाच पहात तिथे उभी होती. 
एवढ्यात मागुन एका मुलीचा तिला धक्का लागतो, तिचा थोडा तोल जाऊन ती प्रेमच्या अंगावर येते. हे पाहून प्रेम तिला थोडं सावरतो. ते दोघे नकळत अजुन जवळ आले होते. पावसाचं पाणी आता झाडाच्या पानांवरून त्यांच्या अंगावर पडत होतं. दोघेही काही प्रमाणात भिजले होते. 
थोड्या वेळाने पाऊस थोडा कमी झाला. तिथली गर्दी कमी होऊ लागली होती. ते दोघे पण तिथून निघून बाईक पार्किंग केली होती तिथे येतात. प्रेम खिशातून गाडीची चावी काढून गाडीला लावतो. गाडी पार्किंग मधुन बाहेर काढून तो अंजलीला बोलतो. 
प्रेम : स्कुटी कुठे आहे तुझी...? 
अंजली : घरी....!
प्रेम : मग कशी आली होतीस येताना....?
अंजली : ऑटो ने...!
प्रेम : का आणली नाहीस...?
अंजली : असच....!
प्रेम : बरं...! चल... बस आता... सोडतो. 
* अंजली त्याच्याकडे पाहून छान स्माइल करत त्याच्या गाडीवर बसते. आणि दोघांमध्ये थोडा गॅप ठेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते. प्रेम तिथून अंजलीच्या घरच्या दिशेने जायला निघतो. वाटेत अंजली त्याला बोलते. 
अंजली : कधी घेतली बाईक...? 
प्रेम : खुप दिवस झाले...!
अंजली : छान कलर आहे...! 
* ते बोलत असतात तेवढ्यात अचानक समोरचा ऑटो वाला अर्जंट ब्रेक लावतो, त्यामुळे प्रेमला पण अर्जंट ब्रेक लावावा लागतो. त्यामुळे गाडीला झटका बसतो अंजली सीटवरून पुढे सरकते, प्रेम एका बाजूने गाडी पुढे काढतो. अंजली स्वतःला सावरत पुन्हा थोडी मागे सरकुन बसते. 
थोड्याच वेळात ते दोघे अंजलीच्या घराजवळ पोचतात. 
प्रेम गाडी थोडी लांबच थांबवतो. अंजली गाडीवरून उतरते आणि त्याला बोलते.
अंजली : थॅन्क्स फॉर एव्हरिथिंग्...! तु आज माझ्यासाठी वेळ काढलास. खुप दिवसांनी आज खुप छान वाटलं.
प्रेम : अच्छा....! 
अंजली : हो....! खरच बोलतेय मी...! आज खुप खुश आहे मी...!
प्रेम : बरं...मग आता जा घरी, वाट बघत असतील घरी.
अंजली : हो... पण तु येतोय का घरी...?
प्रेम : नको...! 
अंजली : का...? चल ना...!
प्रेम : आज नको...! 
अंजली : मग कधी येशील...?
प्रेम : येईन असच कधीतरी...!
अंजली : बरं ठिक आहे, पाऊस कमी आहे तोपर्यंत जा घरी मग. आणि पोचल्यावर मॅसेज कर.
प्रेम : ठिक आहे...! पुन्हा एकदा हॅप्पी बर्थ डे. 😊
* असं बोलुन तो तिला हात मिळवायला हात पुढे करतो. ती थोडी पुढे येऊन गाडीवरच त्याला हलकीशी मिठी मारते आणि त्याला बोलते. 
अंजली : प्रेम...! मी पुन्हा एकदा सांगतेय...! तु जे काही सांगितले आहेस ते सर्व मी करतेय, आणि यापुढेही करत राहीन. फक्त तु मला माझ्या आयुष्यात नेहमी हवा आहेस, जसा आहेस तसा, अगदी कसाही, पण हवा आहेस. बस्.... बाकी काही नाही.
प्रेम : जा आता घरी, उशीर होतोय. 
 * अंजली तिथून घरी जायला निघते. तिच्या एका हातात प्रेम ने गिफ्ट केलेलं घड्याळ होतं. दुसऱ्या हातात साडीची बॅग. ती आज खुप खुश होती. हळू हळु ती पुढे चालत रहाते. प्रेम गाडी चालु करतो, पण ती दिसत होती तोपर्यंत तसाच तिथे उभा असतो. अंजली पण घरी जाताना दोन तीन वेळा मागे वळून त्याला पहात पुढे चालली होती. अख़ेरिस ती तिच्या सोसायटीच्या गेट मधुन आत जाते.
 प्रेम गाडीला टर्न मारतो आणि समोर बघतो तर त्याच्या गाडीसमोर मेघा उभी होती. तिला असं अचानक समोर पाहून प्रेम थोडा टेन्शन मधे येतो. तिला पाहून तो गाडी बंद करतो. मेघा त्याच्याजवळ येते, तिच्या चेहऱ्यावर खुप राग दिसत होता. त्याला थोड्या मोठ्या आवाजातच ती बोलते.
मेघा : काय चाललंय तुझं...! लग्न केलं आहेस ना...! मग का अंजुला फसवतोय.
प्रेम : अरे... ! तसं काही नाही...!
* मेघा त्याच्या अजुन जवळ येते आणि त्याची कॉलर पकडून त्याला बोलते.
 मेघा : हे बघ तुला शेवटचं सांगतेय, यापुढे जर तु तिला भेटलास किंवा तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्याएवढी वाईट कोण नसेल हे लक्षात ठेव. 
प्रेम : अरे...! ऐक तरी माझं...! तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
मेघा : काही गैरसमज वगैरे नाही, कळतंय मला सर्व, ती तुझ्यामागे पागल झालीय, याचा फायदा घेतोय तु...! एवढी पण मूर्ख नाही मी, हे समजायला.
प्रेम : अरे यार...! काय बोलतेय तु...?
मेघा : खरं तेच बोलतेय मी...! आणि जर तसं नसतं तर, का भेटले तुम्ही आज...?
प्रेम : मी फक्त विश करायला आलो होतो तिला, तेही तिने फोर्स केला म्हणुन.
मेघा : अच्छा...! तिला अक्कल नाही, पण तुला तरी आहे ना, का त्या लग्न करून आणलेल्या मुलीला पण फसवत आहेस.
प्रेम : मेघा बस् झालं....! तु खुप चुकीचं बोलतेय. मी असं काहीच करत नाही.
मेघा : जाऊदे रे, मला वाटलं होतं की, तु खुप चांगला मुलगा आहेस, पण तूही तसाच निघाला. पण मी आहे तोपर्यंत तरी तु हा विचार डोक्यातुन काढून टाक. अरे मूर्खा... आधीच तु फसवलं आहेस तिला, त्याच्यातून मरता मरता कशीबशी वाचली आहे रे ती, आता का परत आला आहेस तिच्या लाईफ मधे. जरा कुठे विसरली होती सर्व...
मी तुला परत एकदा सांगतेय, परत जर तिला तुझ्यामुळे काही त्रास झाला किंवा तिने काही करून घेतलं तर मग बघच...
प्रेम : मेघा....! प्लीज शांत हो... ऐक तरी माझं, मला काही बोलुन देणार आहेस का...? का जे मनाला येईल ते बोलणार आहेस तु...
मेघा : मला काहीच ऐकायचं नाही तुझं, निघ तु इथुन आणि पुन्हा इथे कधी दिसु नको, नाहीतर मी विसरून जाईन सर्व...
प्रेम : अरे...! एकदा मला बोलायची संधी तरी दे. 
मेघा : तुला बोलायचं होतं तर एवढे दिवस कुठे लपून बसला होता, तेव्हा का नाही समोर आलास बोलायला. जाणून बुजून केलं ना, तू हे सर्व, मुळात तुला तिच्याशी लग्न करायचच् नव्हतं. मग कशाला फसवलं तिला. का टाईमपास केला एवढी वर्ष तिच्यासोबत. कशाला तिला स्वप्न दाखवली. तुझ्यात दम नव्हता तर कशाला केलस प्रेम.
प्रेम : मला नव्हतं माहीत तेव्हा की, पुढे जाऊन काय होणार आहे ते....
मेघा : मग झालं ना आता, जे व्हायचं होतं ते. मग आता संपलं आहे सर्व, आता तु तुझं बघ. आणि तिला जगू दे सुखाने. मी हात जोडते तुला आणि जा आता तरी कायमचा तिच्या आयुष्यातून.... प्लीज...🙏🏻
 * मेघा काहीच ऐकुन घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. प्रेम गाडी चालु करतो आणि तिथून घरी निघून येतो. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️