रक्ताचा टिळा Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रक्ताचा टिळा

रक्ताचा टिळा या पुस्तकाविषयी

          रक्ताचा टिळा ही माझी एकशे एकविसावी पुस्तक. ही पुस्तक संपुर्ण इस्रायल, अमेरिका व इराण युद्धावर आधारीत आहे. 
           ही पुस्तक लिहिण्यामागील उद्देश एवढाच की इराण व अमेरिका युद्धाचा इतिहास जपला जाणे. लोकांना युद्धापेक्षा शांतता मोठी हा संदेश देणे. तोच विचार यातून मांडला आहे, एका कथानकाच्या रुपात. यात फक्त तीनच पात्र आहेत. मुस्कान, आलिशाबेगम व गुलजार. आलिशाबेगम म्हणजे नेमकी कोण? तिची यात भुमिका कोणती? मुस्कानचे कार्य कोणते व गुलजारनं काय केलं? हे सर्व सांगणारी पुस्तक. शिवाय इराणचा समृद्ध इतिहास यात वाचता येण्यासारखा आहे.
         ही पुस्तक पुर्ण स्वरुपात काल्पनिक असून यआतील वास्तविक घटना कधी पुस्तक वाचतांना आढळून आल्यास त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. 
       कृपया आपणास विनंती आहे की आपण ही पुस्तक वाचावी व लोकांना रा पुस्तकाचा लाभ द्यावा. तसेच आवडल्यास आपण एक अल्प प्रतिक्रिया मला द्यावी ही विनंती.

                          आपला नम्र
             अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०


रक्ताचा टिळा कादंबरी
          अंकुश शिंगाडे

**********************१*******************

         त्या आत्मा आवाज देत होत्या. अक्षरशः तेथून आवाज येत होता. 'वाचवा' 'वाचवा' कोण असतील ते ओरडणारे? त्या होत्या आत्मा. इराणच्या युद्धातील रणांगणावर मृत झालेल्या सैनिकांच्या आत्मा. त्या आत्मा जगाला संदेश देत होत्या की युद्ध नको. जगाला बुद्ध हवा.
         ते रक्त होतं सांडलेलं. इराणच्या सैनिकाचं रक्त. ज्या रक्ताचा टिळा लावला होता त्यानं. जो इराणचा रहिवाशी होता. म्हणूनच तो दररोज त्या भुमीवर जात होता. जिथं रक्त सांडलं होतं. 
          वर्षानुवर्ष लागलेली आग. तो आकस. तो आकस आजही धुमसत होता, त्याच्या मनात. त्यानं आपल्या मनाला शांत करण्यासाठी आपला धर्मही बदलवून पाहिला. परंतु तो सुखी झाला नाही. त्याला छळत राहिलं ते दुःख. जे दुःख त्याला इस्रायलकडून मिळालं होतं नव्हे तर ते दुःख त्याला त्याच्याच पत्नीनं दिलं होतं.
         आज त्यानं स्विकारलेला धर्मही बदलवला होता. परंतु तो सुखी झाला नव्हता. कारण त्याने जो रक्ताचा टिळा लावला होता गुल्फानशी. त्यामूळं तो सुखी होवू शकला नाही, आयुष्यभर. आयुष्यभर तो त्याच रक्ताच्या टिळ्यानं वेदना शोषतच राहिला होता. त्याचं नाव गुलजार होतं व गुलजार हा इराणचा रहिवाशी होता व तो शिया पंथाचा होता. 
           गुल्फाम...... ही इस्रायलची रहिवाशी होती. तिनंच दुःख दिलं होतं गुलजारला. जणू तिनंच त्याला दुःख सागरात ढकलून दिलं होतं, तेही आपल्या राष्ट्रभक्तीसाठी. जिच्यावर अगाढ विश्वास करुन गुलजारनं प्रेम केलं होतं निरतिशय. अन् तद्नंतर विवाहही केला होता तिच्याशी.
           गुलजारचं मुस्कानवरही प्रेम होतं. मुस्कान भारतातील रहिवाशी होती. ती फारशी वंशाची होती. धर्मानं मुस्लिम जरी नसली तरी मुस्लिम धर्मातील काही तत्व तिच्याही धर्मात होते. तिलाही अमेरिका व इराण युद्धाचा फटका बसला होता. घरगुती गॅस सिलेंडर महाग झाल्यानं घरची त्रेधातिरपीट उडत होती. त्यामुळंच ती जरी फारशी धर्माची असली तरी तिला बौद्ध धम्म आवडू लागला होता. तिलाही कधीकधी युद्ध नको बुद्ध हवा असं वाटायला लागलं होतं. 
         आज एक मे उजळला होता. लोकं हा दिवस महाराष्ट्र दिन व हाच दिवस कामगार दिवस म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करीत होते. असे असतांना यावर्षी बऱ्याच दिवसांनंतर बुद्ध पौर्णिमाही यावर्षी आली होती. ज्यातून तिला बुद्ध पौर्णिमेचं महत्व वाटू लागलं होतं व ती विचार करु लागली होती. 
         बुद्ध जयंती..... का साजरी केली जाते बुद्ध जयंती? तिच्या मनातील प्रश्न. त्याचं उत्तर होतं, तथागतांनी केलेलं कार्य. ती विचार करीत होती. जग आजही हिंसेच्याच मार्गानं चाललेलं असून गत काही दिवसांपासून अमेरिका व इराण युद्ध. त्यानुसार गत काही दिवसात अनेक सैनिक, जे निरपराध होते. ते होळपळून निघाले. अनेक निरपराध माणसं मरण पावलीत. जीवीतहानी सोबत वित्तहानीही झाली. त्यामूळे अशी हानी होवू नये म्हणून सर्व लोकं सुधारावीत म्हणूनच बुद्धजयंतीचं प्रयोजन चांगलं सादर होत आहे भारतात. कदाचित त्यापासून बोध घेवून तरी लोकं सुधरतील व युद्धापासून परावृत्त होतील. युद्ध करणार नाहीत. असा संदेश भारत देत आहे आणि तो जगानं घ्यायला हवा.
        मुस्कान विचार करु लागली, बुद्धजयंतीचा. तिला वाटत होतं की ही बुद्धजयंती केव्हापासून साजरी होत असेल? तसं तिनं गुगल उघडलं व त्याविषयी तिनं विचारणा केली. ज्यात गुगलनं तिला पुरेपूर माहिती पुरवली. तशी ती स्वतःलाच प्रश्न व उत्तर करु लागली.
         केव्हापासून साजरी केली जाते बुद्धजयंती? त्याचंही उत्तर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म घेण्यापुर्वी त्यांच्याच अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांतील वकील, शिक्षीत वर्ग, काही प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. सन १९५१ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. त्यानंतर १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. ही झाली दिल्लीची गोष्ट. महाराष्ट्रातही दिल्लीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. त्यानंतर १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातील बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. 
         दुःख....... जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
           सुरुवातीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धम्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी अर्थात ज्ञान प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार सत्यांचा साक्षात्कार झाला.
          जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या सत्याची जाणीव झाली. त्यातच दुःख कशामुळे उत्पन्न होते? यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता मग भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे सत्यही त्यांना कळून आले.
          हे जरी खरं असलं तरी बौद्ध व तत्कालीन काळात अस्तित्वात असलेला वैदिक धर्म यात थोडासा फरक नाही तर बराच फरक आहे. वैदिक धर्म हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवत होता व एक तत्व प्रतिपादन करीत होता की माणसाच्या जन्मानंतर येणारे भोग, संकटे दुःख ही त्याच्या पुर्वजन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार येत असतात. परंतु त्या गोष्टी बौद्ध धम्मानं खोडल्या. बौद्ध धम्मानं सांगीतलं की जन्म हा काही पुनर्जन्मावर आधारीत नाही. ज्या जन्मात माणसाचा जन्म होतो, त्याच जन्मात जर वाईट कर्म केले. करीत राहिलो, तर त्याचे फळ हे वाईटच मिळेल. ज्यातून दुःख येईल. जर आपण त्याच जन्मात चांगले कर्म केले तर त्याचे फळंही चांगलेच मिळेल. वाईट मिळणार नाही. हे जन्ममरणाचे रहाटगाडगे आपल्या याच जन्माच्या बऱ्यावाईट कर्मावर चालते. पुनर्जन्मावर चालत नाही. 
         काही लोकं मानतात की मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता. शिवाय या दिवशी जी सजावट केली जाते. त्यात अंधश्रद्धाही आणली जाते. म्हटलं जाते की तथागतांना ज्ञानप्राप्ती अलगद झाली. त्यावेळेस चमत्कार झाला. परंतु खरं सांगायचं म्हणजे बौद्ध धम्म हा चमत्कार मानतच नाही. अंधश्रद्धा पाळत नाही. हा धम्म वास्तविकतेला जास्त महत्व देतो. सदाचाराला हा धम्म जास्त महत्व व स्थान देतो. शिवाय प्रतिपादन करतो की हिंसा करु नये. अहिंसेने जगा. एवढंच नाही तर माणूस जरी वाईट असेल, तरी तो आपल्या चांगल्या कर्मानं बदलू शकतो. इतरांना बदलवू शकतो आणि हे परीवर्तन बुद्ध धम्माने चमत्काराने वा बुवाबाजीने नाही तर केवळ दृढनिश्चयाने व विचाराने करुन दाखवले. तेव्हाच अंगुलीमालचा अहिंसक बनला आणि आम्रपाली नावाच्या वेश्येची तपस्वी आम्रपाली. अशी बरीचशी दरोडेखोर मंडळी, व्याभिचारी मंडळी बौद्ध धम्मानं बदलवली आणि त्यांच्याच माणूसकी भरली. ज्यातून तत्कालीन काळात बौद्ध धम्म वाढला. एवढा वाढला की त्याची पाळेमुळे जगात पसरली व जगाने आनंदाने बौद्ध धम्माचा स्विकार केला. 
         आज जगाने बौद्ध धम्म स्विकारण्याची गरज आहे. युद्धाने होळपळून मरणारी निरपराध माणसं पाहता बौद्ध तत्वज्ञान अंगीकारण्याची गरज आहे. जर तसं झालं नाही तर प्रत्येक माणूस दुःखी होणार. हे सत्य आहे. युद्धातून काहीच साकार होत नाही. हेच सांगून गेले तथागत गौतम बुद्ध. कारण युद्धानं चांगले चांगले राजवंश संपवलेत. ज्या ब्रिटिशांचा सुर्य जगात मावळत नव्हता. ते ब्रिटिश संपलेत आपल्या आक्रमक युद्धनीतीनं. तसंच जी मोगली सत्ता स्वतःच्या सत्तेला आलमवीर बनविण्याची स्वप्न पाहात होती. ती आता कुठेच दिसत नाही. एवढंच नाही तर या भारतात असलेले पुरातन काळातील राजवंश, चोल, चालुक्य, परमार, चंदेल, होयसळ, वर्धन, गुप्त, मौर्य घराणे आज अजिबात दिसत नाहीत. हे सर्व युद्धामुळं घडलं. म्हणूनच आजच्या काळात युद्ध नको तर बुद्ध तत्वज्ञान हवे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 
          मुस्कानने गुगल उघडताच तिला बुद्धतत्वाची पूरेपूर माहिती झाली व तिला बुद्धतत्वाचं महत्व वाटायला लागलं. परंतु आपलाही धर्म तेवढाच तिला प्रिय वाटत होता. हे जरी खरं असलं तरी तिला आपल्या धर्मातील काही लोकांची चीडच येत होती. कारण तिच्या पुर्व पिढीचे वास्तव्य इराणमध्ये होते. परंतु इराणमध्ये आलेल्या इतर धर्माच्या मुस्लिम लोकांनी तिच्या पुर्वपिढीच्या लोकांना हाकलून दिले होते व तिचे पुर्वाश्रमीचे पुर्वज भारतात येवून भारतातच आश्रीत होवून स्थायीक झाले होते. आजपर्यंत तिला इराणचा राग येत होता. त्यातच इराणच्या लोकांचाही. परंतु जेव्हा अमेरिका व इराण युद्ध सुरु झालं. तेव्हा आपोआपोच तिला इराणबद्दल आत्मीयता वाटायला लागली होती व ती इराणच्याच बाजूनं बोलू लागली होती. 

********************२**********************

           कर्नल गुलजार हाही त्या युद्धातील एक सैनिकच. त्याचं मुस्कानवर प्रेम होतं व त्याच प्रेमातून मुस्कानशी तो विवाहबद्ध झाला होता. त्याचा संपर्क तिच्याशी तेव्हा आला. जेव्हा तो भारतात आला होता, शिक्षण घ्यायला. ज्यात एके दिवशी त्याला मुस्कान एका बागेत दिसली. जेव्हा तो एके दिवशी बागेत फिरायला गेला होता. मग काय, नजरेस नजर भिडली. तशी ती आवडली. त्यानंतर त्याचं प्रेम झालं. ते प्रेम हळूहळू वाढत गेलं व त्याची परियंती ही विवाहात झाली. त्यानंतर तो तिला भारतातच सोडून मायदेशी परतला. त्यातच तो सैनिकात भरती झाला. 
          आता गुलजार थकला होता व तो रोज रात्री त्या रणांगणावर येत असे. जिथं ते युद्ध झालं होतं. तो तिथं नेहमीच येत असे. त्याचं कारण होतं, त्याचे त्या सैनिकांशी असलेले संबंध. त्या युद्धात मरण पावलेले सैनिक हे कर्नलचे सोबतीच होते. कितीतरी दिवस सोबत राहून गप्पागोष्टी रंगल्या होत्या त्यांच्या. परंतु घात झाला. तो ज्या देशाकडून लढत होता. त्याचं नाव होतं इराण. तसं पाहिल्यास इराण व इस्रायलचं नेहमीच युद्ध व्हायचं. ज्यात लाखो सैनिक मरत असत. परंतु हे युद्ध थेट इराणचं अमेरिकेशी होत होतं.
         अमेरिका हा एक बलाढ्य देश होता. त्यालाही शांती प्रियच होती. परंतु घात झाला. इजराईलवर इराणनं हमला केला व अमेरिकेला मधात पडावं लागलं.
         अमेरिका मधात पडला. त्याचं कारण होतं, इजराईलशी अमेरीकेचे असलेले संबंध. सबंध जिव्हाळ्याचे होते. तो देश इजराईलला सोडूच शकत नव्हता.
          इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची होती आणि तेवढीच तुटकही. पहिलं महायुद्ध झालं होतं व पहिल्या महायुद्धात जर्मन राष्ट्र व त्याचे मित्र हरले होते. ज्यात जर्मनी देशात राहात असलेल्या ज्यु लोकांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच शांततेसाठी मित्रपक्षांशी वाटाघाटी केल्या. परंतु झालं उलट. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मन देश व त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव होताच जर्मनीतील जनता नाराज झाली. त्यातच जी जर्मनीत निवडणूक झाली. त्यात नाझी पक्ष निवडणूकीत निवडून आला. मग काय, अल्डाल्फ हिटलरच्या नेतृत्वात जर्मनीत सत्ता स्थापन झाली.
         हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनताच सर्वप्रथम त्यानं जर्मनीचं एकत्रीकरण केलं. त्यानंतर सर्व लोकांना एकत्र करुन व विचारात घेवून त्यानं तेथेच अधिवास करणाऱ्या ज्यू आणि यहुदी लोकांना दोषी ठरवलं. मग काय, त्यानं पहिल्या महायुद्धातील अपयशाचं खापर त्यांच्यावरच फोडलं व तेथील जनतेला विश्वासात घेतल्यानंतर तो त्यांच्यावर अत्याचार करु लागला होता. त्याचे त्यांच्यावर एवढे भयावह अत्याचार होते की त्यानं दहा लक्ष ज्यू लोकांना मारुन टाकले. तसाच तो सतत दवंडी पिटवत असे की तो जगातील सर्वच अधिवाशी असलेल्या ज्यूना यमसदनी पोहोचवेल. त्यानंतर भयानं जर्मनीतील काही ज्यू सैरावैरा पळाले. ते इराणच्या भुमीवर आले. ज्या भुमीवर काहीही पिकत नव्हतं. तेथील भुमी बंजर होती. कोणीच त्या भुमीकडे फिरकत नव्हते. कोणी त्या भुमीला मरुभुमीही म्हणत असत. अशातच दुसऱ्या महायुद्धाचे पडसाद पडले. 
           दुसरं महायुद्ध...... दुसऱ्या महायुद्धाचं कारण म्हणजे पुर्ण ज्यू हिटलरला संपवायचे होते. ज्यातील ज्यू वंशातील लोकं हे जर्मनीच्या बाहेर अर्थात दुसऱ्याही देशात राहात असत. ज्यूंना मारण्याची वा राग करण्याची दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की ज्यू वंशातील लोकं इतरही राष्ट्रात राहात असत. त्याचाही हिटलरला राग होताच. 
         दुसरं महायुद्ध सुरु झालं व ज्यूंना संपविण्याच्या हेतूनं हिटलर हे युद्ध अतिशय त्वेषानं लढू लागला होता. परंतु दुर्दैव असं की दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रपक्षांचा विजय झाला. परंतु तो विजय झाला असला तरी ब्रिटनची अपरिमित हानी झाली होती. त्यांच्या वसाहतींचा कारभार हाकणं त्यांना अवघड झालं होतं, हळूहळू ते वसाहतींमधून माघार घ्यायला लागले होते.
          ब्रिटनची सत्ता ही जगात होती. ती भारतातही होती. भारतातून ब्रिटनने सन १९४६ मध्ये माघार घेवून भारताला सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य बहाल केलं होतं. त्यातच अनेक देश ब्रिटनच्या शासनातून स्वतंत्र होवून मुक्त झाले होते. ज्यात पाकिस्तान हा देश देखील होता. 
         ब्रिटनची सत्ता जशी भारतात होती. तशीच ती पॅलेस्टाईनमध्येही होती. सन १८४८ च्या मे महिन्यात पॅलेस्टाईन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली आणि आपआपला देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. प्रश्न होता, ही भूमी नक्की कोणाच्या हातात जाणार. युद्ध तुल्यबळांचं नव्हतं. अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या अतिशय कमी होती. पण या दिवसाची तयारी गेले कित्येक वर्षं तिथे असणाऱ्या आणि इस्रायलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक ज्यू ने अनेक वर्षांपासून केली होती. त्यानंतर सन १४ मे १९४८ साली इस्रायलने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. मुस्लीमबहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश निर्माण झाला होता. ज्याला नाव दिलं गेलं होतं इस्रायल.   

*************************३************************

           गुल्फाम एक मुलगी होती. जी इस्रायलला राहात होती. आज ती लहानच होती. तरीही देशप्रेम तिच्यात कुटकूट भरलं होतं. तसं पाहिल्यास गुल्फाम शाळेत जात होती व शाळेत जात असतांना ती तोच इतिहास शिकत होती. ज्या इतिहासानुसार इस्रायल बनलं होतं. हिटलरनं कसा ज्यूं ना त्रास दिला? त्यानं किती ज्यू कापले? ज्यू अरबचा का शत्रू बनलेला आहे? या सर्व गोष्टी गुल्फाम शाळेतच शिकत होती. त्यातच ती लष्करी शिक्षणही घेत होती तिथं. तसं पाहिल्यास इस्रायलमध्ये लष्करी शिक्षण हे लहानमोठ्यांना सक्तीचं आणि नियमित होतं. 
         गुल्फाम लहानपणापासूनच वाचत होती तो इतिहास. जो इतिहास इस्रायलनं घडवला होता. त्यातच तोच इतिहास वाचतांना इतर मुलांबरोबर तिच्याही मनात देशभक्तीचे रणशिंग फुंकले जावू लागले होते. तसं पाहिल्यास गुल्फाम इस्रायलमध्येच लहानाची मोठी झाली. त्यातच ती महाविद्यालयात गेली. मग तिची उच्चशिक्षण शिकण्याची इच्छा झाली व तिला जे शिकायचं होतं. त्याची सोय इस्रायलमध्ये नसल्यानं गुल्फाम ब्रिटनमध्ये रवाना झाली. जिथं तिला साजेसं असंच शिक्षण होतं. 
         ज्याप्रमाणे गुल्फाम इस्रायलमधील रहिवाशी होती. तसाच गुलजार हा इराणचा रहिवाशी होता. तोही प्राथमिक शिक्षण शिकून पदवीपर्यंत गेला होता. ज्यात त्याला जे उच्चशिक्षण शिकायचं होतं. त्याची सोय ब्रिटनमध्येच होती व तोही इराणमधून ब्रिटनमध्येच आला होता भारतातून परतल्यानंतर. पर्यायानं गुल्फाम व गुलजार एकाच महाविद्यालयात जायला लागले होते.
         गुल्फामच्या मनात तशी बदल्याची भावना होतीच. ती बदल्याची भावना राष्ट्रभक्तीमुळं होती. त्याच बदल्याच्या भावनेतून ती इराणमध्ये प्रवेश करु पाहात होती. ज्यातून गुल्फाम आणि गुलजारची ओळख ज्या महाविद्यालयात झाली. दोघांनीही एकमेकांचा परीचय जाणून घेतला. गुलजारनं गुल्फामला अगदी खरं खरं सांगीतलं. तो कुठून आला आणि कशासाठी आला व पुढं काय काय करणार आहे? ते सारं त्यानं एका झटक्यात गुल्फामला सांगून टाकलं. 
           गुलजार भोळाभाबडाच होता. त्याचे वडील इराणमध्ये लष्करात नोकरी करीत होते. त्यातच ते मोठ्या हुद्यावर होते. नित्यनेमानं गुलजार आपल्या वडीलांसोबत सैनिक छावणीत जात असे व संपुर्ण सैनिक छावणी पाहून येत असे. तसं ते बालवय असल्यानं संपुर्ण लष्करी छावणी त्यानं पिंजून काढली होती. अशातच इराणमधील लष्करी स्थळाची त्याला खडान् खडा माहिती होती. जी माहिती गुल्फामनं विचारताच अगदी सहजपणानं त्यानं तिला सांगून टाकली. परंतु गुल्फाम हुशार होती. तशी ती खरी देशभक्तही होती. इस्रायलची स्वामीनिष्ठा तिच्यात कुटकूट भरली होती. त्यातच गुलजारला तो अरब देशातून म्हणजेच इराणमधून आलेला आहे. हे कळताच अगदी आनंदीआनंद झाला. वाटलं की आपल्याला आता या मित्राच्या मार्फत इराणमध्ये प्रवेश करता येईल. ज्यातून तेथील लष्करी तळाची इत्यंभूत माहिती मिळवता येईल. तसंच तिनं गुलजारचे वडील लष्करात आहे. हे कळताच त्याचाही फायदा करुन घेण्याचा विचार तिनं केला. मग काय, दोघांचं प्रेम झालं. परंतु तिचं त्याचेवर प्रेम नव्हतंच. ती प्रेमाचं नाटक करीत होती. त्यातच गुलजारनं तिला जेव्हा तिचा परिचय विचारला. तेव्हा तिनं आपला खरा परिचय त्याला दिला नाही. तिनं सांगीतलं की ती ब्रिटनमधीलच रहिवाशी असून ती तिथंच राहते.
          दोघंही महाविद्यालयात एकाच वर्गात शिकत होते. दोघंही एकमेकांवर प्रेम करु लागले होते. अन् आता महाविद्यालयातील शिक्षण पुर्ण झाल्यावर विवाह करु पाहात होते. परंतु गुलजारला विवाह करतांना येत होती तिच्या धर्माची अडचण. शेवटी त्यानं तिला म्हटलं,
          "जर तू माझ्या धर्माचा स्विकार करशील तर आपण विवाहबद्ध होवू शकतो."
          ते त्याचं बोलणं. त्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिनं होकार दर्शवला. कारण तिच्या मनात जे होतं. ते त्याशिवाय पुर्ण होणार नव्हतं. शेवटी तिनं त्याच्या धर्माचा स्विकार केला व ती त्याचेसोबत विवाहबद्ध झाली नव्हे तर त्यानं तिला कुंकू लावण्याऐवजी रक्ताचा टिळा लावला आणि आता तिनं आपलं नावही बदलवलं होतं. गुल्फामचं आता नाव बदलवून तिनं नवीन नाव धारण केलं होतं, आलिशाबेगम.
           आलिशा बनून गुल्फाम इराणमध्ये आली. तिनं नकलीच आयडी कार्ड तयार केला. तशी ती गुलजारची पत्नी बनून इराणमध्ये येताच इस्रायलची जासूसी करु लागली होती. त्यातच इराणमध्ये येताच काही दिवसानंतर गुलजारला नोकरी लागली आणि तिही अण्वस्त्र बनविणाऱ्या कारखान्यातच. आता तो लष्करातही दाखल झाला. त्यातच जेव्हा जेव्हा गुलजार आपल्या वडीलांसोबत गप्पागोष्टी करीत असे. तेव्हा देशात कुठं कुठं कोणकोणत्या ठिकाणी हत्यारे बनवितात. देशात कुठं कुठं काय चालले आहे, याचीच चर्चा होत असे. त्या सर्व बाबी गुल्फाम आपल्याजवळ नोंदवून घेवून त्याची माहिती इस्रायलला कळवित असे. ज्यातून इस्रायल इराणचे लष्करी तळ नेस्तनाबूत करण्याची योजना बनवीत चालला होता, गुल्फामच्या मदतीने. अन् तिनं असा परिंदा आपल्या जाळ्यात फसवला होता की ज्यानं मुस्कानचं मन तोडलं होतं. हळूहळू तो मुस्कानला विसरला व आता तो चक्कं गुल्फामशी दुसरा विवाह करुन मोकळा झाला होता. आता त्याला सतत मुस्कान नाही, गुल्फामच आठवायला लागली होती. 
           गुल्फामला आठवत होता तो इस्रायल निर्मितीपुर्वीचा काळ. जो इतिहास ती शाळेत शिकली होती. सन १०९५. नोव्हेंबर महिन्यातील तो एक दिवस. या दिवशी एका थंड सकाळी पोप अर्बन दुसरा याने फ्रान्सच्या क्लेअरमाऊंट शहरात एक प्रवचन दिलं. म्हणतात की त्या प्रवचनाने युरोपचा चेहरामोहरा बदलला. त्या प्रवचनाने दोनशे वर्षं चाललेल्या ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांच्या युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. या युद्धांना नंतर ख्रिश्चनांनी क्रुसेड्स असं नाव दिलं तर मुस्लिमांनी जिहाद असं नाव धारण केलं. मग संघर्ष सुरु झाला. त्यातच पहिलं धर्मांतरीत युद्ध हे लॅटिन चर्चच्या काळात झालं. त्याने १०९५ ते १२७१ या काळात होली लँड आणि होली सिटी हे भाग मुस्लिमांच्या अधिपत्याखालून काढून त्या प्रदेशावर पुन्हा आपला ताबा मिळवण्यासाठी युद्ध केले. होली लँड म्हणजे आजचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, सिरिया आणि लेबेनॉनचा काही भाग आणि होली सिटी म्हणजे जेरुसलेम.
          हाच तो काळ होता की जेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातल्या संघर्षांने तसंच चर्चच्या विभागणीमुळे धर्मसत्तेचं आसन डळमळायला लागलं होतं. यातून बाहेर पडायचा एक रस्ता पोप अर्बन दुसरा याला दिसला, तो रस्ता म्हणजे एका परकीय, पापी, धर्मबाह्य शत्रूविरोधात युद्ध घोषित करायचं आणि ख्रिश्चनांना एकत्रित करायचे. त्यावेळेस त्यानंच दाखविलेल्या मार्गानुसार एक लाख ख्रिश्चन स्त्रिया, काही पुरुष व लहान मुलं सैनिक बनून साडेचार हजार किलोमीटरचा रस्ता कापत जेरुसलेमच्या वाटेला निघाले होते. तेही योजनाबद्ध पद्धतीने. ते एकाच वेळेस न निघता त्यांनी निघण्याच्या वेगवेगळ्या वेळा ठरवल्या होत्या. तसेच ते एकत्रीत न निघता अनेक लहान लहान गटात निघाले होते. युरोप पार करताना हे गट तिथल्या वेगवेगळ्या भागातल्या ज्यू लोकांवर हल्ले करत. त्यांना ठार करत निघाले होते. कारण त्यांना जेरुसलेम काबीज करायचा होता. तसं पाहिल्यास जेरुसलेम ही ख्रिश्चन लोकांची पवित्र भुमी होती. ख्रिश्चनांचा मसीहा असलेला येशू ख्रिस्त. त्याचा जन्म जेरुसलेमलाच झालेला होता. त्यामुळंच ख्रिश्चन लोकं जेरुसलेमला मानत असत व ज्यूचा राग करीत असत. त्याचं कारण होतं, ज्यूचे येशू ख्रिस्तावरील अत्याचार. येशू ख्रिस्तांना क्रुसावर याच ज्यूनं चढवलं. असे त्यांचे मानणे व म्हणणे होते. 
         ते जेरुसलेमला पोहोचले. परंतु तेव्हापर्यंत जेरुसलेम मुस्लिम शासकांच्या हातात गेला होता व तो त्यांच्या हातात जावून आज चारशे वर्षं लोटली होती. ज्या भागात ज्यूंचे प्रमाण अतिशय कमी होते. ते प्रमाण कमी असले तरी त्यांचं अस्तित्व कायम होतंच.
           क्रुसेडर्सचा पहिला जथ्था लवकरच जेरुसलेमला पोहोचला. त्यांनी तेथे अस्तित्वात असलेल्या अरबांवर हल्ला चढवला. त्यातच आणखी वेगवेगळ्या गटातील लोकं तिकडे लवकरच पोहोचले. जे वेगवेगळ्या गटातून पोहोचले होते. त्यांचं युद्ध व तेही महाभयंकर निर्णायक युद्ध. ज्यातून चार वर्षांनी जेरुसलेम त्यांच्या ताब्यात आलं. ते साल होतं, सन १०९९. त्यानंतर जवळपास १०० वर्ष म्हणजेच सन १०९९ ते ११८७ पर्यंत याच लोकांनी जेरुसलेम आणि आसपासच्या भागात राज्य केलं. पुढं सालदिनच्या मुस्लिमांनी त्यांचा परत पराभव केला आणि होली लँड पुन्हा एकदा मुस्लिम शासकांच्या हातात गेलं.

*********************४*********************

          जेरुसलेम हे जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक होते. या ठिकाणी बऱ्याच शासकांनी राज्य केलं. इसवीसन पूर्व १७०० व्या शतकात इथे कॅननाईट लोकांनी राज्य केलं, मग इजिप्तच्या फेरोंनी या प्रदेशावर राज्य केलं. त्यानंतर आले इस्रेलाईट्स म्हणजेच आजचे ज्यू. त्यांनीही या प्रदेशावर बरेच वर्ष राज्य केलं. इसवीसन पूर्व १००० च्या पूर्वार्धात जेरुसलेम म्हणजे सध्याचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबेनॉन आणि सिरिया या देशांचा प्रत्येकी काही भाग मिळून इस्रेलाईट लोकांची दोन साम्राज्य होती. सध्याचं जेरुसलेम म्हणजे प्राचीन इस्रायल आणि जुडाहचं राज्य. जेरूसलेम ही जुडाहच्या राज्याची राजधानी होती. कालांतराने हा भाग हळूहळू बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक सम्राट अलेक्झांडर द ग्रेट ने आक्रमण केलं, तेव्हा रोमन, बायझेंटाईन आणि सरतेशेवटी मुस्लिम शासकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरही इथे सत्तापालट सतत होत राहिले. इथे राज्य करणारे शेवटचे शासक होते ऑटोमन. त्यानंतर या साम्राज्याला ब्रिटिशांनी जिंकलं व तेथे आपलं अधिपत्य तयार करुन या भागाला गुलाम केलं. तो काळ म्हणजे पहिल्या महायुद्धाचा काळ. सन १९१८ मध्ये इस्रायल ब्रिटिशांचा गुलाम झाला.
           ज्यू धर्मियांमध्ये आजही अशी मान्यता आहे की इथेच ज्यू धर्माचा उदय झाला, इथेच त्या धर्माचे कायदे तयार झाले आणि हीच भूमी देवाने वारसहक्काने ज्यू धर्मियांना दिलेली आहे. त्यांची ही धार्मिक मान्यता जेनेसिस आणि एक्सोडस या हिब्रू बायबलच्या भागांवर आधारित आहे.
            ज्यू लोकांची भुमी ही जेरुसलेम जरी असली तरी प्राचीन काळात याच भागात अरब लोकं बहुसंख्येने राहात असत. ज्यांना प्राचीन काळात पॅलेस्टाईनचा भुभाग म्हणून ओळखत होते. आज त्याच अरबांना पॅलेस्टिनी म्हणतात. परंतु ज्यु लोकांची ही भुमी असून एक ना एक दिवस ज्यू लोकं या भुमीत परत येतील. हाही एक संघर्षाचा विषय. ऑटोमन सम्राटांचं इथे राज्य असतांना लगतच्या इजिप्तकडून व सिरियाकडून या प्रदेशात आक्रमणं झाली. त्यातच जी आक्रमणं व्हायची. त्यात ऑटोमन शासकाने ही आक्रमणं थांबविण्यासाठी मध्यस्थीही केली. ज्यात ब्रिटिशांची मदत घेतली गेली. त्यातच धुर्त व हुशार असलेल्या ब्रिटिशांनी बदल्यात काही करार केले. जे त्यांच्या फायद्याचे होते. म्हणजेच भारतात जसे इंग्रजांनी पाय रोवले. तसेच पाय त्यांनी पॅलेस्टाईनमध्येही रोवले. 
          ब्रिटिशांनी मध्यस्थी केल्यानंतर या भागात अल्प काळ शांतता प्रस्थापित झाली. त्यातच पॅलेस्टाईन लोकांनी आपल्या साम्राज्याची उत्तमपणे भरभराटही केली. ज्यातून अरबांचं वर्चस्व वाढलं व ज्यू लोकांची संख्या कमी झाली. 
          युरोपचा पॅलेस्टाईनशी वाढता व्यापार. त्यातच ज्यू लोकांची संख्या कमी होणं. हा बदल व या बदलानं ज्यू लोकांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. ज्यातून झायोलिस्ट चळवळीचा उदय झाला. जी एक प्रकारची राजकीय चळवळ होती. 
         झायोलिस्ट चळवळ....... या चळवळीचा एकमेव उद्देश होता, ज्यू ची सत्ता स्थापन करणं. झायोलिस्ट चळवळ ही जेरुसलेमशीच संबंधीत होती. त्याचा अर्थ होता, जेरुसलेमला वाचवणं. ज्या जेरुसलेमला जन्मलेल्या येशूला ज्यू लोकं पुर्वी मानत नव्हते. ते आज त्यांना मानायला लागले होते. अशातच पहिलं महायुद्ध सुरु झालं. मग काय, पहिल्या महायुद्धात साहजीकच सर्वात मोठं अरबी साम्राज्य असलेल्या ऑटोमननं उडी घेतली आणि ते मित्र राष्ट्राच्या विरोधात लढायला लागले. 
         रशिया, फॉन्स व ब्रिटन हे मित्र राष्ट्र होते. त्यांच्या विरोधात ऑटोमननं युद्धात उडी घेतल्यानंतर जर्मनांशी हातमिळवणी केली. त्यातच सुएझच्या कालव्यावर ताबा मिळविण्यासाठी ऑटोमननं इंग्लंडच्या अधिकारात असलेल्या इजिप्तवर हमला केला. परंतु या युद्धात ऑटोमनचा पराभव झाला. त्यातच पराभवानंतर ऑटोमन साम्राज्याचे तीन तुकडे केले गेले. पहिल्या तुकड्याला नाव दिलं गेलं होतं पॅलेस्टाईन. दुसऱ्याला सिरीया व तिसऱ्याला नाव दिलं होतं लेबनॉन. यातीन पॅलेस्टाईनवर ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य स्थापीत करुन त्याला आपल्या अधिपत्याखाली घेतलं आणि लेबनॉन व सिरीयावर फ्रेचांनी आपलं अधिपत्य स्थापीत केलं. तसं पाहिल्यास ऑटोमनचं साम्राज्य विशाल होतं. 
           पॅलेस्टाईनचा भाग आता सरळ सरळ ब्रिटनच्या अधिपत्याखाली होता. त्यातच या भागात अधिवास करीत असलेले ज्यू. त्यांनी ब्रिटिश शासनाला स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्यांच्या पाठींब्याला युरोपियन झायोलिस्ट चळवळ होतीच. तशीच त्या मागणीला ब्रिटिशांनी उघडउघड पाठींबाच दिला. त्याचं कारण होतं, अरबी लोकांवर दबाव ठेवणं व पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांना केलेली ज्यूंनी मदत. ज्यातून आपल्याचमुळे ज्यूंनी वेदना भोगल्या. ही भावना ब्रिटिंशाच्या मनात निर्माण झाली होती. शेवटी हेच धोरण मान्य करण्यासाठी पुढं ब्रिटिशांनी बाल्फोर जाहिरनामा आणला. या बाल्फोरचा अर्थ होता. ब्रिटिशांचा ज्यू लोकांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला पाठींबा असणे. त्यातच तसे राष्ट्र निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं धोरण इंग्लंडनं जाहीर केलं. त्यातच त्यात आणखी बऱ्याच कलमा होत्या. इतर देशातील ज्यू लोकांच्या हक्काला धक्का न लावणे. तसेच ज्यू सोडून इतरही धर्माच्या हक्काला धक्का न लावणे. 
         पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. त्या संघाचा उद्देश होता, जगात शांतता प्रस्थापित करणे. त्यानंतर ज्यू च्या स्वतंत्र राष्ट्राचा मुद्दा राष्ट्रसंघानं ब्रिटिशांकडे हस्तांतरीत केला. बाल्फोर जाहिरनाम्यानंतर ज्यूसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याची जबाबदारी ब्रिटिशांकडे येताच या प्रदेशाबाबत ब्रिटनच निर्णय घेवू लागले. अशातच जर्मनीत सामाजिक क्रांती झाली. हिटलर सत्तेवर आला. मग हिटलरने जर्मनीच्या पराभवाला ज्यूंना जबाबदार ठरवून त्यांची हत्या करण्याचा विडा घेतला. मग काय, ज्यू जर्मनी सोडून मोठ्या संख्येनं याच प्रदेशाकडे स्थलांतरित होवू लागले. विशेष म्हणजे इथे येणारा सगळा ज्यू समुदाय युरोपातीलच असून तो सर्व हिटलरच्याच धाकानं आला. ते जीव वाचवून पळून आले होते. त्यातच आपल्यासाठी एक देश बनेलच. अशी आस बाळगणारे ज्यू. त्यांची संख्या या भागात विशाल स्वरुपात वाढत चालली होती. शेवटी १४ मे १९४८ ला इस्रायल नावानं नवीन राष्ट्राची ज्यू ने घोषणाच करुन टाकली. ज्यात तरुण वर्ग जास्त होता.
            तो तरुण वर्ग. त्या तरुण वर्गानं इस्रायल नावाचं स्वतंत्र राष्ट्र तयार करण्याचं ठरवलं होतं. ते कितीतरी पट जास्त होतं. पण दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांच्या बाजूने लढलेले आणि काही महत्त्वाच्या लढायांमध्ये मोक्याची भूमिका बजावलेले सैन्याधिकारी ज्यू होते आणि आता ते इस्रायललाठी लढत होते. अशातच जून महिना उजाडला. 
            जून महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सांगण्यावरून इस्रायल आणि अरब राष्ट्रांनी युद्धविरामाची घोषणा केली. इस्रायलला आपली रसद पुन्हा भरुन घेण्याची संधी मिळाली. रशियासारखी मोठी राष्ट्र त्यांना मागच्या दाराने मदत करत होती. त्यामानाने अरब सैन्यात सुसुत्रता कमी होती. 
          अरब विरुद्ध ज्यू, असा तो संघर्ष. त्यातच अरबांना आपलं अस्तित्व प्रिय वाटत होतं आणि ज्यूं ना आपलं. तसे पाच राष्ट्रांचं सैन्य मिळूनही इस्रायलचं अस्तित्व नकाशावरुन पुसू शकले नाही. पण इस्रायलचा काही भूभाग मात्र त्यांनी ताब्यात घेतला. जॉर्डनकडे वेस्ट बँक भाग गेला, इजिप्तने गाझा पट्टी मिळवली. पुर्व जेरूसलेमही त्यांच्या हातातून निसटलं. इस्रायलकडे पश्चिम जेरुसलेम व पॅलेस्टाईन उरलं.
         ते अस्तित्वावरुन व जागेवरुन निर्माण झालेलं अरब इस्रायल युद्ध. ते वाढतच चाललं होतं. मनुष्यहानी व वित्तहानी होत चालली होती. तेच संकट लक्षात घेवून पुढं युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला व सन १९४९ मध्ये इस्रायल, जार्डन, इजिप्त, लेबनॉन व सिरीया यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. या तहानुसार ज्यांना जी जागा मिळाली. ती सहखुशीनं स्विकार करायची. असं ठरवलं गेलं. 
         युद्धबंदी झाली होती. युद्धबंदी जरी झाली असली तरी तेथील लोकं काही खुश नव्हते. त्यातील काही लोकं गेलेल्या भुभागासाठी पश्चाताप करीत होते. जे जर्मनीमध्ये घडलं होतं. तेच इस्रायलमध्येही घडलं होतं. युद्धबंदीपुर्वी इस्रायलने केलेल्या बॉंबस्फोटानं, त्यांच्या आक्रमणानं व त्यांच्या धाकानं पॅलेस्टिनी लोकं आपलं घरदार सोडून सळो की पळो असेच पळाले. ते आपल्या घराची कुलूपं सुद्धा उघडायला परत आले नाहीत. तो दिवस त्यांच्यासाठी काळाच दिवस ठरला होता. ती तारीख होती, १५ मे १९४८. जे कारण पुढं जावून इस्रायलनं धुडकावून लावलं. पॅलेस्टिनी लोकं अरबांच्या आक्रमणामुळं पळाले, असं त्यांचं म्हणणं होतं. 
          युद्धबंदी झाली होती. परंतु १९४८ चं शल्य खदखदतच होतं, अरबांच्या मनात. अरबांना आपला पराजय युद्धबंदी झाली असली तरी स्विकार नव्हताच. ज्या राष्ट्रांच्या सैन्याला इस्रायलने मात दिली होती, त्या राष्ट्रांच्या सैन्याने आपल्याच देशात सत्तापालट करायला सुरुवात केली. सीरियामध्ये सतत सत्ताबदल होवू लागला होता. इस्रायलविरुद्ध केलेल्या युद्धात लढलेल्या अधिकाऱ्याने इतर तरुण अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन इजिप्तमध्ये बंड केलं आणि तिथल्या सुलतानाला पदच्युत केलं. या अधिकाऱ्याचं नाव होतं गमाल अब्दुल नासिर. नासिर १९५६ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यातच त्याच वर्षी त्यांनी ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलचा विरोध झुगारून सुएझ कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं. या एका कृतीने ते अरब राष्ट्रांचे हिरो ठरले होते. सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयीकरणानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि इस्रायलने एकत्रितरीत्या इजिप्तविरोधात कारवाई केली. पण यातून त्यांना माघार घ्यावी लागली. इजिप्तचा राजनैतिक विजय झाला होता. 
           अरब व ज्यू संघर्ष. ज्यू जिथं जिथं असतील, ते ज्यु च्या बाजूने व अरबांच्या विरुद्ध आग ओकत होते तर अरबही ज्या ज्या देशात असतील, ते त्यांच्याच बाजूने बोलून ज्यू विरुद्ध आग ओकत होते. आग धुमसत होतीच. अशातच सन १९४८ चं युद्ध कोणत्याही मोठ्या शस्त्रास्त्रांशिवाय लढणाऱ्या इस्रायलने आपलं सैन्य मजबूत करायला सुरुवात केली होती. सन १९६५ पर्यंत त्यांचं सैन्य घातक बनलं होतं आणि फ्रान्स, ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांकडून त्यांनी संरक्षण सामग्री विकत घेतली होती. त्यांनी अथक मेहनत घेतली होती. मनुष्यबळ वाढवलं होतं. त्यातच दहा लाखांहून जास्त ज्यू स्थलांतरितांना त्यांनी जागा दिली होती. इस्रायलमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांसाठी सैन्यात सेवा देणं अत्यावश्यक होतं. त्यातच सैन्यदल वाढविण्यासाठी इस्रायलचा असा प्रयोग अति आवश्यक होता. 

**********************५********************

           गुल्फामला आठवला पहिल्या महायुद्धाचा काळ. ज्या काळात हिटलरनं कितीतरी ज्यू लोकांना ठार केले होते. त्यातच हिटलर आणि नाझी वंशातील लोकांनी तिच्याच बिरादरीतील लोकांवर अतिशय विषन्न प्रकारचे अत्याचार केले होते. महिलांची अब्रू लुटली होती. तो इतिहास ती अद्यापही विसरली नव्हती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातल्या ज्यू लोकांनी नाझी सैन्याचा प्रतिकार केला नाही. निर्वासित झाले म्हणून त्यांना कमजोर समजणारी नवी पिढी इथे तयार झाली होती. पश्चिमेतील ताकदवान देशांना कळून चुकलं होतं की आता मध्यपुर्वेत युद्ध झालं तर कोणाचं पारड जड असेल. अमेरिकेच्या चीफ ऑफ स्टाफने म्हटलं होतं की इस्रायल कमीत कमी पुढची पाच वर्ष अरब राष्ट्रांच्या आघाडी सैन्याचा एकटाच मुकाबला करू शकतो. १९६७ साली तेल अवीवमध्ये तैनात असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने इस्रायली सैन्याच्या आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की नेतृत्व, प्रशिक्षण, संरक्षण साधनं आणि रसद या सगळ्या आघाड्यांवर इस्रायलचं सैन्य इतकं तयार झालं होतं, जितकं आधी कधीच नव्हतं. इजिप्तमध्ये नासिर यांना इस्रायलचा बदला घ्यायचा होता. पण त्यांचं आणि त्यांचा सहकारी देश सीरियाचं सैन्य इतकं प्रशिक्षीत नव्हतं. ते फक्त मोठमोठे दावे करत होते. नासिर यांना अरब जगाचं नेतृत्व तर करायचं होतं. पण या राष्ट्रांमध्ये एकवाक्यता नव्हती. अरब लोक राष्ट्रीयता आणि एकतेच्या गप्पा हाणायचे. पण वास्तवात त्यांच्यात दुफळी माजलेली होती. सीरिया आणि इजिप्तचं नेतृत्व आपल्याविरोधात जॉर्डन आणि सौदी अरब षड्यंत्र करत असल्याची तक्रार करायचे.
           सहा दिवसात बदललेलं मध्यपुर्वेचं राजकारण. धुमसणाऱ्या आगीचा भडका उडायला कारण ठरला इस्रायल-सीरियामधला सीमावाद. सीरियाने इस्रायलने हाकललेल्या पॅलिस्टिनी लोकांना आश्रय दिला होता. ज्यांना इस्रायलने हाकलून लावलं होतं. ते इस्रायलवर सतत हल्ले करत राहायचे. यात शेकडो इस्रायली नागरिकांचा जीव गेला होता. इस्रायलला त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. अशातच इस्रायलमधून निघालेले पॅलेस्टिनी लोकं इस्रायलच्या सीमेत शिरले. इस्रायल याला 'दहशतवादी हल्ला' म्हणतात.
           जॉर्डनचे प्रमुख शाह हुसेन इस्रायलशी गुप्त चर्चा करत असायचे. त्यांना विश्वास होता की इस्रायल त्यांच्याविरोधात कारवाई करणार नाही. पण नोव्हेंबर १९६६ मध्ये इस्रायलचं सैन्य जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक प्रदेशातल्या सामुआ गावात शिरले. शाह हुसेनांना धक्का बसला. त्यांनी अमेरिकन गुप्तहेर यंत्रणेला सांगितलं की ते तीन वर्षांपासून इस्रायलशी गुप्त चर्चा करत आहेत. इतकंच काय, अगदी इस्रायलच्या कारवाईच्या दिवशी सकाळी त्यांना इस्रायली पक्षकाराने सांगितलं होतं की वेस्ट बँक भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नाहीत. शाह हुसेन यांनी वेस्ट बँकेत मार्शल लॉ लागू केला. त्यांना आता जवळपास खात्री पटली होती की दुःख आणि रागाच्या भरात वेस्ट बँकेचे पॅलेस्टिनी लोक त्यांना सत्तेवरुन खाली खेचतील. त्यांना भीती वाटत होती की नासिर यांचे समर्थक असणारे त्यांच्या सैन्यातले अधिकारी बंडखोरी करतील आणि या नादात इस्रायल वेस्ट बँक आपल्या घशात घालेल. असं वाटत असल्यानं इस्रायल वादग्रस्त भागांमध्ये आक्रमक रितीने पुढे पुढे सरकत होता. तसेच अरबी लोकंही आपली पावलं मागे घेत नव्हते. इस्रायली लोकं जिथे सैन्य नाही, अशा भागात ते हत्यारबंद ट्रॅक्टर चालवून तेथील गवत कापत निघाले होते. दुसरीकडे सीरिया इस्रायल युद्धाचे ढग घोंघावायला लागले होते. ७ एप्रिल १९६७ साली सीरिया आणि इस्रायलचं युद्ध सुरु झालं. इस्रायलने सीरियाला सळो की पळो करुन सोडलं.
          त्या इस्रायली फौजा अतिशय निकरानं लढत होत्या. त्या इस्रायली फौजापुढे अरबांच्या सेना गलितगात्र होत होत्या. या हतबलतेने हैराण झालेले पॅलेस्टिनी युवक विचारत होते की इजिप्तचं सैन्य कुठे आहे. कारण त्यांना इजिप्तचाच जो काही एक पाठींबा होता. ज्यातून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासिर यांनी कारवाई करावी म्हणून दबाब वाढत होता. अशातच नासिर यांच्या म्हणण्यानुसार इजिप्तचे सैन्यप्रमुख फील्ड मार्शल आमिर यांनी आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले. पण इजिप्तचं निम्म्याहून जास्त सैन्य आधीच येमेनशी लढत होतं. सैन्याचे चीफ ऑफ ऑपरेशन्स अन्वर अल कादींनी आमिर यांना याची जाणीव करुन दिली. यावर जनरल अन्वर म्हणाले की युद्ध करायचं नाही, हे फक्त एक शक्तीप्रदर्शन आहे. शेवटी इजिप्त युद्धात सहभागी झालाच. 
         इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासिर. त्यांची इच्छा होती की जगभरात त्यांची ओळख ज्यू राष्ट्रासमोर उभं राहाण्याची हिंमत असलेला अरब नेता अशी बनावी. त्यांनी सिनाई सीमेवर सैन्य धाडलं, तिरानच्या सामुद्रधुनीत इस्रायलचा रस्ता रोखला. आधुनिक लढाऊ विमानं उडवणाऱ्या पायलटांच्या मधोमध उभे असलेले नासिर असा फोटो जगभरात फिरला. आपण किती कणखर आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशातच जॉर्डनचे शाह धर्मसंकटात सापडले होते. आसपास जे घडत होतं, ते पाहून आपली सत्ता टिकवणं इतकंच उदिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होतं. म्हणूनच इच्छा नसताना त्यांनी नासिर यांच्यासोबत समझौता केला.
         युद्ध सुरुच होतं. इजिप्त काही काळ समझौत्यानं चूप बसला होता. परंतु इराक...... इराकमध्येही अरब रहिवाशी होतेच. ते चूप बसले नव्हते. त्यांच्यात आजही युद्ध सुरुच होतं. ज्यू आणि अरबांचं ते युद्ध. युद्धाचं वातावरण निर्माण झालं होतं, एकमेकांना दंड-बलदंड दाखवले जात होते. अरब रेडियो स्टेशन्स आणि इस्रायली वृत्तपत्र रोज एकमेकांना धमक्या देत होते. या सगळ्यात इस्रायल मात्र निराशेच्या गर्तेत ढकलला जात होता. परिस्थिती अशी आली की सरकारने शवपेट्या जमा करायला सुरुवात केली होती. धार्मिक नेत्यांनी आणीबाणी समजून सार्वजनिक बागा दफनभूमीमध्ये बदलायला सुरुवात केली होती. पंतप्रधान लेवी एश्कोलही काळजीत पडले होते. त्यांनी केलेल्या २८ मेच्या भाषणाने लोक अजून घाबरले होते. भाषणादरम्यान भीतीच वाटत असल्यानं भाषण करताना ते अडखळत होते, त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. भाषणानंतर एका बैठकीत इस्रायलच्या सैन्याधिकाऱ्यांनी पंतप्रधानांची उपासना केली. अशातच बिग्रेडिअर जनरल एरियल शेरॉन ओरडले. 'आपल्याकडील सर्वात मोठं हत्यार तुम्ही आज गमावलं आहे. ते हत्यार म्हणजे आपल्याबद्दल इतरांच्या मनात असलेली भीती. आज आपल्याबद्दल जी भीती अरबांच्या मनात होती. ती नष्ट झालेली आहे.'
         युद्धाचा निर्णय झाला होता. जॉर्डनचं खोरं आणि इस्रायलच्या दिशेने इराकच्या सैन्याने कूच केलं होतं. म्हणूनच नासिर यांनी भविष्यवाणी केली होती की इस्रायल चार किंवा पाच जूनला हल्ला करेल. तशी त्यांची भविष्यवाणी खरी ठरली व युद्ध सुरू झालं होतं.
        पाच जूनला सकाळी पावणेआठ वाजता तेल अवीवचे धुरंदर नेते श्वास रोखून बसले होते. अशातच इजिप्त पासून सुरुवात करून जॉर्डन, सीरिया सगळीकडच्या विमानतळांना नष्ट करायला इस्रायलच्या लढाऊ विमानांनी झेप घेतली होती. इस्रायली वायूसेना गेल्या कित्येक वर्षांपासून ज्याची तयारी करत होते. त्यांचा अभ्यास इतका जबरदस्त झाला होता की अरब सैन्याधिकाऱ्यांचे आवाज ओळखणारी एक स्वतंत्र सिस्टीमही त्यांनी बनवली होती. त्यातच राष्ट्रांच्या सैन्यांची बैठक सुरु असताना वरुन धडाधड बॉम्ब पडायला लागले. त्यांचा मारा जोरदार होता. त्याचं कारण होतं, त्यांच्याकडे त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानानी बनविलेली अत्याधुनिक साधनं. तब्बल पाच दिवसात इस्रायलने इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाच्या सैन्याला मुळापासून उपटून फेकून दिलं. इजिप्तकडून गाझापट्टी आणि सिनाई, सीरियाकडून गोलनच्या टेकड्या आणि जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि पुर्व जेरुसलेम हिसकावून घेतलं. ज्या जेरुसलेमला ज्यू लोकं पवित्र स्थान मानायचे. दोन हजार वर्षांत पहिल्यांदा ज्यू लोकांचं पवित्र स्थान असलेले जेरुसलेम आज त्यांच्या ताब्यात आलं होतं. याही वेळेस पॅलेस्टिनी लोकांना इथून निर्वासित व्हावं लागलं. त्यांची हत्याकांडं झाली. परंतु आज सन १९४८ एवढी वाईट परिस्थिती त्यांच्याकडे आली नव्हती.
          युद्धात इस्रायलनं विजय मिळवला. ज्याचा परिणाम असा झाला की नासिर यांनी राजीनामा दिला. पण लोकांच्या विरोधानंतर त्यांनी तो मागे घेतला. आपल्या मृत्यूपर्यंत ते त्या पदावर कायम राहिले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या अन्वर सादत यांनी इस्रायलसोबत ऐतिहासिक शांतता करार केला. जो करार इजिप्तला मान्य नव्हता. तेथील नागरिकांना इस्रायलकडून झालेला पराभव मान्य नव्हता आणि कसा राहणार? शेवटी तो त्यांच्या अस्मितेचा प्रश्न होता. ज्यामुळे त्यांच्याच रक्षकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं.
         इजिप्तचे सैन्यप्रमुख आमिर यांचा मृत्यू रहस्यमयी स्थितीत झाला असं म्हटलं जातं. त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं होतं की त्यांना विष देऊन ठार मारण्यात आलं.
         इजिप्तमध्ये जे घडलं. तेच घडलं जार्डनमध्ये. जॉर्डनचे शाह हुसेन यांच्या हातातून पुर्व जेरुसलेम निघून गेलं. परंतु त्यांची सत्ता कायम राहिली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये १९९४ साली शांतता करार झाला.
          सिरियाचं याउलट घडलं. सीरियाचे वायूसेना कमांडर हफीज असद यांनी सन १९७० मध्ये सत्ता हस्तगत केली. सन २००० साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र बशर अल-असद त्यांचे उत्तराधिकारी बनले.
          सन १९४८....... इस्राईल स्वतंत्र झाला होता. त्यातच त्याला अमेरिकेनं मान्यता प्रदान केली होती. त्यानं देशातील भुमीतून आधीच रहिवाशी व मूळ असलेल्या संपुर्ण पॅलेस्टिनी नागरिकांना देशातून हाकलून लावलं होतं. ज्यातून पॅलेस्टिनी लोकांनी लगतच्या राष्ट्रात आश्रय घेतला होता. जी राष्ट्र अरब प्रणीत होती नव्हे तर इस्लामीक होती.
          इराण हा तेथीलच लगतचा एक देश. तोही अमेरिकेपाठोपाठ बलाढ्यच होता. शिवाय तो अरबी देश होता. त्यातच सर्व अरबांचा धर्मांध बाबतीत असलेला इस्रायल शत्रू, परंतु इराण जरी अरबी लोकांचा देश असला तरी तो इस्रायलच्या बाजूनं अगदी खंबीरपणे उभा राहिला त्यावेळेस. त्यानंही इस्रायलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती. जो रोष इराणच्या अरबी लोकांच्या मनात वर्षानुवर्ष खदखदत राहिला. हे सन १९७९ पर्यंत चाललं. परंतु पुढं इराणमध्ये सत्तेवर आलेल्या सत्ताधिशांनी तीच गरिमा ओळखली व त्यांनी इराणमधील अरबांची बाजू घेत आपली पावलं टाकण्यास सुरुवात केली. ज्यात त्यांनी इस्रायलमधील त्यांचा असलेला संपर्क तोडला. त्यांनी इस्रायलच्या ज्यू लोकांनी हाकलून लावलेल्या पॅलेस्टिनींची बाजू घेतली. तेव्हापर्यंत इस्रायल स्वतःच सक्षम झाला होता. 
         इराणमध्ये १९७९ मध्ये सत्तेवर आलेल्या सत्ताधिशांनी सर्वात पहिलं इस्रायलच्या विरोधात पावलं उचलतांना इस्रायलचा इराणमधील असलेला दुतावास बंद केला व तेथील रहिवाशी असलेल्या दुतांना हाकलून लावले. त्यातच इस्रायलचाच सोबती असलेल्या अमेरिकेनं या गोष्टीला विरोध केला. परंतु सामंजस्य पद्धतीनं विरोध करणाऱ्या अमेरिकेच्याही दुताला इराणनं हाकलून लावलं. अशातच अमेरिकेचे एक राजदूत आपला जीव वाचवत काही दिवस इराणमध्येच भुमीगत राहिले. अशाप्रकारे अमेरिकाही इराणचा शत्रू बनला. 
          एकेकाळचा अरबी जनतेचा विरोध झुगारुन इस्रायलशी घनिष्ठ संबंध ठेवून वागणारा अरबांचा इराण देश. त्यानं अचानकच १९७९ च्या नंतर आपल्या विचारात व वागण्यात परीवर्तन करताच एकाचवेळेस इराणचे दोन शत्रू निर्माण झाले. मग काय, जेव्हा जेव्हा इस्रायलशी बाचाबाची व्हायची. तेव्हा तेव्हा त्याच्या मदतीला अमेरिका धावून यायचा. अशातच अमेरिकेचं आणि इस्रायलचं चांगलं पटू लागलं होतं.
         इराण हा एकेकाळचा प्रगत असलेला देश. तिथं तेल निघत असे व तो तेल जागतिक स्तरावर इतर देशांना विकलं जात असे. तेथील प्रसिद्ध असलेलं होर्मूझ बंदर. हे इराणच्या ताब्यात होतं. ज्यातून सर्वच देशांशी तेलवाहतूक व्हायची. संपुर्ण आशियाही देशांना तेलवाहतूक करायची असल्यास याच होर्मूझ बंदरातून जावं लागायचं. कालांतरानं इराण हा जरी एकेकाळचा समृद्ध देश असला तरी तो आजच निर्माण झालेल्या अमेरिकेएवढा प्रगत देश नव्हता. त्यातच आता ज्यू लोकांनी बनविलेला इस्रायलही आज प्रगत देश बनला होता. त्याची इराणला कल्पना होतीच. याचीच संभाव्य कल्पना असलेल्या इराणला वाटायला लागलं होतं की अमेरिका व इस्रायल मिळून आपल्यावर हमले करु शकतात. त्यातच अमेरिकेची शक्ती वाढत चालली होती. त्यातच त्यांनी इतर अरबी शासन असलेल्या राष्ट्रांवर हळूहळू आपला ताबा व वचक अबाधित ठेवण्यासाठी आपले लष्करी तळ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यांनी त्यासाठी प्रत्येक अरबी देशांसोबत करार केले होते. हीच गोष्ट विचारात घेवून इराण आपली परमाणू ताकद वाढवत चालला होता. त्याला अमेरिकेचं तसं वागणं आवडत नव्हतं व तशी ताकद वाढवणंही त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत होते. शिवाय अमेरिका आपली ताकद वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होता. शिवाय तो देश वाटाघाटी करण्यात आघाडीवर होता. अशातच त्यांनी इराकची असलेली नासिरची ताकद, तीच पुढं सद्दाम हुसैनच्या नावानं जी सुरु होती. त्या सद्दाम हुसैनला पकडून त्याला फाशी देवून संपवली होती. त्यानंतर तिथं आपलेच मांडलिकत्व स्विकारणारं व मुंडकं वर न काढणारं सरकार अमेरिकेनं बसवलं आणि आपलं एक आणखी लष्करी तळ त्या देशात बनवलं. ही गोष्ट इराणला माहीत होती.
         इराण आज जरी अमेरिका व इस्रायल पेक्षा कमजोर वाटत असला तरी तो आपली परमाणू शक्ती वाढविण्यात अग्रेसर होता. हळूहळू इराण अमेरिकेचं खच्चीकरण करता यावं यासाठी अमेरिकेच्याच लष्करी तळावर क्षेपणास्राद्वारे हमले करु लागला होता. याच गोष्टीचा विचार अमेरिका करु लागला होता. शेवटी इस्रायल आणि अमेरिकेनं ठरवलं की एकदा युद्ध करावं व इराणलाही इजिप्तसारखंच नेस्तनाबूत करुन टाकावं.
         अमेरिकेला तसंच वाटलं व इराणची ताकद कमी करण्यासाठी इस्रायलच्या मदतीनं ते राष्ट्र विचार करु लागले. शेवटी इस्रायलनं योजना आखली. ती योजना होती लव्ह जेहाद. इस्रायलमधील प्रत्येक नागरिकात देशप्रेम कुटकूट भरलं होतं. तसं पाहिल्यास ज्यू हे कट्टर होते. त्या देशातील स्रियाही कट्टर होत्या आणि सद्यस्थितीत इस्रायलची लोकसंख्या जेमतेमच होती. परंतु सर्वांनाच लष्करी शिक्षण अनिवार्य होतं नव्हे तर ते लष्करी शिक्षण अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यातच इस्रायलमधील एका स्रीनं पुढाकार घेतला. ती ब्रिटनमध्ये गेली. तिनं तिथंच शिक्षण घेतलं. पुढं तिथंच ती सक्षम झाली व तिनं ब्रिटनमध्येच असतांना एका अरबी तरुणाशी प्रेम केलं. जो इराणचा रहिवाशी होता. पुढं त्याच स्रीनं त्याच अरबी युवकाशी विवाह केला. वाटलं की ती ब्रिटनचीच रहिवाशी आहे. अन् असं करतांना तिनं आपली ओळख लपवली. सांगीतलं की ती ब्रिटनचीच रहिवाशी आहे. त्यानंतर ती अरबी युवकाशी प्रेम करुन त्याचेसोबत राहायला इराणमध्ये आली. तिनं बनवाबनवी करण्यासाठी आपला धर्मही बदलवून अरबी धर्म स्विकारला. हळूहळू तिनं अरबी लोकांचा विश्वास जिंकला. त्यातच तिनं लष्करातच असलेल्या आपल्या पतीच्या सहाय्यानं इराणच्या परमाणू क्षेत्राची माहिती घेतली. इराण कुठं कुठं काय बनवतात. हेही लक्षात घेतलं. त्यानंतर लागलीच ती आपल्या पतीला सोडून भुमीगत झाली व ती पळून इस्रायलला आली. त्यातच तिनं इराणमधील परमाणू बॉंब बनविण्याची स्थळं इस्रायलला सांगीतली. ज्यातून इराणच्या परमाणू बॉंब बनविण्याच्या स्थळावर इस्रायलनं हमला केला व ती स्थळं नेस्तनाबूत केल्या गेली. ती गुल्फामच होती. 
           इराणवर इस्रायलनं केलेला हमला. ती इराणची नेस्तनाबूत झालेली परमाणू बॉंबची स्थळं. त्यातच इराणने संबंधीत प्रकाराचा शोध घेतला. शोध घेतल्यावर कळलं की ती गुप्तहेर इस्रायलची होती. जिनं चालाकीनं इराणची माहिती काढली व इराणला नेस्तनाबूत केलं. जी गुल्फाम होती व जी गुलजारची पत्नी होती.
          गुलजारची पत्नी असलेली गुल्फाम. तिनं इराणशीच नाही तर आपल्या खुद्द पतीशीही गद्दारी केली. ज्यात गुलजारचा दोष नव्हता. परंतु तो दोष गुलजारवर लावून त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आलं. त्याच्यावर व त्याच्या परिवारावर बंधन टाकण्यात आलं. त्याच्यावर व त्याच्या परिवारावर अत्याचार करण्यात आले. शेवटी गुलजारला आठवला त्याचा भुतकाळ. ज्या भूतकाळात त्यानं मुस्कानशी विवाह केला होता तरुणपणात. आता त्याला मुस्कान आठवायला लागली होती. त्यातच त्याला आठवायला लागलं होतं, तिच्यासोबत बागेत फिरणं.

*********************६********************

         इराण हा मध्यपुर्वेतील देश. इराणचे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक होती. आज खनिज तेल साठ्यात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश.
         इराणमध्ये शिया वंशाचे लोकं राहतात. आज तिथं फारसी, अझरबैजान, कुर्दिश (कुर्डिस्तान) आणि लूरे हे सर्वात महत्त्वाचे जातीय गट आहेत.
            आशिया खंडाच्या पश्चिमेला इ. स. पू. १५०० ते इ. स. ७०० या अस्तित्वात असलेल्या संस्कृतीला पर्शियन संस्कृती किंवा इराणी संस्कृती असे म्हणतात. ही समृद्ध संस्कृती होती. पूर्वेस काराकोरम व हिंदुकुश पर्वत ते टायग्रिस नदी व युफ्रेटीस नदीचे खोरे यात ही संस्कृती होती. प्राचीन ग्रीस व रोमनांशी इराणचा संबंध होता. या संस्कृतीने इस्लाम आक्रमणाला कडवा कृतीचा प्रयत्न केला. प्राचीन वैदिक संस्कृती आणि पर्शियन साहित्य आणि संस्कृती यांचा ऱ्हास इ.स. पूर्व ३३० पासून झाला. सन इस पुर्व ३३० मध्ये अलेक्झांडरने सम्राट दारिशचा पराभव केला व या संस्कृतीचा हा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. इलामाईट्स आणि मेडीज नंतर, सायरस द ग्रेटने इ. स. पू. ६ व्या शतकात विशाल अखेमेनिद साम्राज्य स्थापन केले, ज्याचा विस्तार ग्रीस ते सिंधू खोऱ्यापर्यंत होता. 
           इराणच्या इतिहासात काही टप्प्यांना विचारात घेणे आवश्यक आहे. इ. स. पू. १५०० ते इ. स. ३३०. या काळाला प्राचीन काळ संबोधले जाते. पर्शियन साम्राज्य, दारा उर्फ दारिश आणि सायरस यांचा हा काळ. या काळात इराणने कला, संस्कृती आणि तत्त्वज्ञानात प्रगती केली. त्यानंतर अलेक्झांडरने सन इ. स. पू. ३३० मध्ये सम्राट दारीशचा पराभव करून या संस्कृतीचा ऱ्हास सुरू केला. त्यानंतर अस्तित्वात आलं ससानियन साम्राज्य. हे साम्राज्य सन इ. स. पू. २४७ ते इ. स. ६५१ अस्तित्वात होते. या काळात रोमन साम्राज्याशी संघर्ष झाला आणि समृद्ध पर्शियन संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळाले. त्यानंतर आली इस्लामिक संस्कृती. त्या संस्कृतीची सुरुवात ही सातव्या शतकात झाली. 
         अरब आक्रमणामुळे इराणमध्ये इस्लामचा प्रसार झाला, तरीही काही दिवस पर्शियन भाषा आणि संस्कृती टिकून राहिली. त्यानंतर सोळावे शतक उजळले. ज्यात सफविद वंश राजसत्तेवर आला. या वंशाने शिया या इस्लामी राजधर्माचा स्विकार केला. त्यानंतर इराणची आधुनिक इराण म्हणून ओळख निर्माण झाली.
          आधुनिक इराण म्हणजे आजपर्यंतचा काळ. सन १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण एक इस्लामिक प्रजासत्ताक बनले. ज्याला पूर्वी पर्शिया म्हणून ओळखले जात असे. आजचा इराण हा मध्य पूर्वेतील एक महत्त्वाचा देश आहे, जो त्याच्या समृद्ध कला व स्थापत्य धोरणासाठी प्रसिद्ध आहे.
            इस्लामिक प्रजासत्ताकाच्या इतिहासातील एक सुरुवातीची घटना जिचा दूरगामी परिणाम झाला, ती घटना म्हणजे इराणचे ओलीस संकट. इराणचे माजी शाह यांना कर्करोगाच्या उपचारासाठी अमेरिकेत दाखल केल्यानंतर, ४ नोव्हेंबर १९७९ रोजी, इराणी विद्यार्थ्यांनी अमेरिकी दूतावासातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि दूतावासाला "हेरांचा अड्डा" असे संबोधले. बावन्न ओलिसांना जानेवारी १९८१ पर्यंत ४४४ दिवस ओलीस ठेवण्यात आले होते. ओलिसांची सुटका करण्याचा अमेरिकेचा लष्करी प्रयत्न अयशस्वी झाला. इराणमध्ये हा ताबा प्रचंड लोकप्रिय ठरला. जिथे हजारो लोक ओलीस घेणाऱ्यांच्या समर्थनार्थ जमले होते आणि असे मानले जाते की यामुळे अयातुल्ला खोमेनी यांची प्रतिष्ठा वाढली आणि अमेरिकाविरोधाची पकड अधिक घट्ट झाली. याच काळात खोमेनी यांनी अमेरिकेला महान सैतान म्हणायला सुरुवात केली. अमेरिकेत, जिथे राजनायिकांना हद्दपार केले जाऊ शकते. परंतु कैद केले जाऊ शकत नाही. या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दीर्घकालीन तत्त्वाचे उल्लंघन मानले जात होते, तिथे यामुळे इराणविरोधी तीव्र प्रतिक्रिया उमटली. दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत शत्रुत्वपूर्ण झाले आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला. 
           १९८८ हा काळ इराणी राजकीय कैद्यांची फाशी आणि इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकातील राजकीय दमन यासाठी प्रसिद्ध आहे. इराण-इराक युद्धादरम्यान गॅस मास्क घातलेला एका इराणी सैनिकाने या राजकीय आणि सामाजिक संकटाच्या काळात, इराकी नेता सद्दाम हुसेनने क्रांतीमधील गोंधळ, इराणी लष्कराची कमजोरी आणि पाश्चात्य सरकारांशी असलेला क्रांतीचा विरोध यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी बलाढ्य असलेले इराणी लष्कर क्रांतीदरम्यान बरखास्त करण्यात आले होते आणि शहा पदच्युत झाल्यामुळे, हुसेनला स्वतःला मध्यपूर्वेचा नवा शक्तिशाली नेता म्हणून स्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा होती. शहाच्या राजवटीत इराकने इराणकडून पूर्वी दावा केलेल्या प्रदेशांवर कब्जा करून पर्शियन आखातापर्यंत इराकचा प्रवेश वाढवण्याचा त्याचा प्रयत्न होता. इराकसाठी खुझेस्तान हे सर्वात महत्त्वाचे होते, जिथे केवळ मोठी अरब लोकसंख्याच नव्हती, तर समृद्ध तेलक्षेत्रेही होती. संयुक्त अरब अमिरातीच्या एकतर्फी वतीने, अबू मुसा आणि ग्रेटर व लेसर तुन्ब ही बेटे देखील लक्ष्य बनली. या महत्त्वाकांक्षा मनात ठेवून, हुसेनने इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची योजना आखली आणि दावा केला की त्याचे सैन्य तीन दिवसांत राजधानीपर्यंत पोहोचू शकते. २२ सप्टेंबर १९८० रोजी, इराकी सैन्याने खुझेस्तान येथे इराणवर आक्रमण केले, ज्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली. इराण-इराक युद्धाला सुरुवात झाली. या हल्ल्याने क्रांतिकारी इराणला पूर्णपणे अनपेक्षित धक्का बसला. सद्दाम हुसेनच्या सैन्याने सुरुवातीला अनेकदा आघाडी घेतली असली तरी, १९८२ पर्यंत इराणी सैन्याने इराकी सैन्याला इराकमध्ये मागे ढकलले होते. खोमेनी आपली इस्लामी क्रांती निर्यात करू पाहत होता. पश्चिमेकडे इराकमध्ये, विशेषतः देशात राहणाऱ्या बहुसंख्य शिया अरबांवर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे युद्ध १९८८ पर्यंत आणखी सहा वर्षे चालू राहिले, जेव्हा खोमेनीने, विषाचा प्याला प्राशन केला आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने झालेला युद्धविराम स्विकारला. इराकने आपल्या युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यामुळे हजारो इराणी नागरिक आणि लष्करी कर्मचारी मारले गेले. इराकला इजिप्त, पर्शियन आखातातील अरब देश, सोव्हिएत युनियन आणि वॉर्सा करारातील देश, अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, जर्मनी, ब्राझील आणि चीन प्रजासत्ताक ज्याने इराणलाही शस्त्रे विकली होती यांचा आर्थिक पाठिंबा होता. आठ वर्षांच्या युद्धादरम्यान इराकी रासायनिक शस्त्रांमुळे १,८२,००० हून अधिक कुर्द बळी पडले. युद्धातील एकूण इराणी जीवितहानी ५,००,००० ते १०,००,००० च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. जवळजवळ सर्व संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांनी पुष्टी केली आहे की इराणी मानवी लाटांचे हल्ले रोखण्यासाठी सद्दामने रासायनिक युद्ध केले, या संस्थांनी एकमताने पुष्टी केली की इराणने युद्धादरम्यान कधीही रासायनिक शस्त्रांचा वापर केला नाही.
        युद्ध हे १९ जुलै १९८८ रोजी सुरू होऊन सुमारे पाच महिने चाललेल्या या काळात, सरकारने इराणभर हजारो राजकीय कैद्यांना पद्धतशीरपणे फाशी दिली. या घटनेला सामान्यतः इराणी राजकीय कैद्यांची १९८८ ची फाशी किंवा १९८८ चे इराणी हत्याकांड म्हणून ओळखले जाते. याचे मुख्य लक्ष्य 'पीपल्स मुजाहिदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराणचे सदस्य होते, तुदेह पार्टी ऑफ इराण सारख्या इतर डाव्या गटांमधील कमी संख्येच्या राजकीय कैद्यांचाही यात समावेश होता. फाशी दिलेल्यांच्या संख्येचा अंदाज १,४०० ते ३०,००० पर्यंत वेगवेगळा आहे.
          इराणही कमजोर नव्हताच. त्यातच इराणची झालेली फसगत. ही फसगत विचारात घेवून इराणनं आपली पावलं उचलली. विचार केला की ही खेळी इस्रायलची असलेली गुप्तहेर, गुल्फामच्याच चालाकीनं झालेली आहे. मग काय, त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणनंही इस्रायलच्या काही स्थळावर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यातून युद्धाची ठिणगी पडली व युद्ध सुरु झालं होतं. अशातच सन २०२६ उजाडलं. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी, इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या विविध शहरांवर संयुक्त हल्ला केला. या ऑपरेशनचे सांकेतिक नाव गर्जना करणारा सिंह असं ठेवलं गेलं. इस्रायलने, ऑपरेशन शील्ड ऑफ जुडा आणि अमेरिकेच्या युद्ध विभागाने ऑपरेशन एपिक फ्युरी, तेहरान, इस्फहान, कोम, करज आणि करमानशाह यांच्याविरुद्ध हल्ल्यांच्या मालिकेने सुरुवात केली. इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ इस्रायली संरक्षण दलाने अर्थात आयडीएफने केलेल्या हल्ल्याची पुष्टी केल्यामुळे स्फोट झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की अमेरिकेने इराणवर इस्रायलच्या बाजूने हल्ले केले आहेत, इराणची क्षेपणास्त्र आणि लष्करी क्षमता नष्ट करणे, त्याला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे आणि शेवटी सत्ता उलथवणे हा उद्देश असल्याचे जाहीर केले. त्यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच आय. आर. जी. सी. च्या सदस्यांना प्रतिकारशक्तीच्या बदल्यात शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आणि इशारा दिला की नकार म्हणजे निश्चित मृत्यू असेल. सुरुवातीच्या हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या आवारासह प्रमुख अधिकारी, लष्करी कमांडर आणि सुविधांना लक्ष्य करण्यात आले. ज्या उपग्रह छायाचित्रांवरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे किंवा नष्ट झाल्याचे दिसून आले होते. परंतु इराणही कमजोर ठरला नाही. त्यांनी प्रत्युत्तर म्हणून इस्रायल, जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार आणि संयुक्त अरब अमिराती लक्ष्य करून मध्यपूर्वेत डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
           डिसेंबर २०२५ चा तो काळ. त्या काळाच्या उत्तरार्धात इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट, रियाल पतन आणि वाढत्या किंमतींमुळे देशव्यापी सरकारविरोधी निदर्शने झाली. शासन बदलाच्या आवाहनांचा समावेश असलेलं हे आंदोलन १९७९ च्या क्रांतीनंतरचं सर्वात मोठे प्रमाण बनले होते. हे लोण देशभरातील शंभरहून अधिक शहरांमध्ये पसरले. इराण सरकारने ८ आणि १० जानेवारी २०२६ रोजी झालेल्या सर्वात प्राणघातक घटनांसह निदर्शकांच्या हत्याकांडासह हिंसक दडपशाहीसह प्रतिसाद दिला. यूएस-आधारित मानवाधिकार कार्यकर्ते न्यूज एजन्सीने मृतांची संख्या ७००० असल्याचा अंदाज वर्तविला. इराण सरकारने मृतांची संख्या ३११७ असल्याचे सांगितले, तर डोनाल्ड ट्रम्प आणि इतरांनी मृतांची संख्या फुगवून बत्तीस हजार असल्याचे सांगितले. एपी न्यूजने नोंदवले की सरकारच्या हिंसाचाराच्या प्रचंड वापरामुळे इराणी लोकांमध्ये निराशा निर्माण झाली होती आणि अमेरिकन हल्ल्यासाठी काही नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली होती. अनेक लोकांनी असा युक्तिवाद केला होता की इराणी सरकारला आता नाजूक स्थितीला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे त्याचा नाश होऊ शकतो. परंतु घडलं उलट. अमेरिका व इस्रायलने इराणवर युद्ध थोपताच सर्व इराणवाशी एक झाले. ज्याची कल्पनाही अमेरिका आणि इस्रायलने केली नव्हती. 
          सन १३ जानेवारी २०२६ रोजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांना पाठिंबा दर्शवला. तद्नंतर २३ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी घोषणा केली की अमेरिकेच्या एका युद्धनौकांचा ताफा मध्य पूर्वेकडे रवाना होत आहे. ज्याला आरमाडा हे नाव होते. ज्यामध्ये यूएसएस अब्राहम लिंकन, यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहू नौका आणि अनेक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका यांचा समावेश होता. 
           सुरुवातीला अमेरिकन आणि युरोपीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनने इराणसमोर तीन मुख्य मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी होती, सर्व युरेनियम समृद्धीकरणावर कायमस्वरुपी बंदी, दुसरी मागणी होती, इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कठोर मर्यादा आणि तिसरी मागणी होती, हमास, हिजबुल्लाह आणि हौथी सारख्या प्रादेशीक पिढीजात गटांना दिला जाणारा पाठिंबा पूर्णपणे थांबवणे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण आणि अमेरिकेने ओमान राजधानी मस्कत येथे अप्रत्यक्ष आण्विक वाटाघाटी केल्या. इराणने यावर जोर दिला की प्रगती राजधान्यांमधील सल्लामसलतींवर अवलंबून असते. जिनेव्हा येथे अणु चर्चेची दुसरी फेरी नियोजीत आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसैदी म्हणाले की एक पाऊल उचलले गेले आहे आणि इराणने समृद्ध युरेनियमचा कधीही साठा न करण्याचे मान्य केले आहे आणि आय. ए. ई. ए. द्वारे पूर्ण पडताळणीसाठी इराणने त्याच्या सध्याच्या समृद्ध युरेनियमाची शक्य तितक्या कमी पातळीपर्यंत अपरिवर्तनीयपणे घसरण करण्यास सहमती दर्शविली आहे. अल-बुसैदी पुन्हा म्हणाले की शांतता आवाक्यात आहे. 
           फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला, अमेरिकेने इराणवर दबाव वाढविण्यासाठी मध्य पूर्वेला यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड ही दुसरी विमानवाहू युद्धनौका तैनात केली. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी, १९७९ च्या क्रांतीच्या सत्तेचाळीसव्या वर्धापनदिनाला सरकार समर्थक मोर्चे आणि अमेरिकन विरोधी जोरदार वक्तृत्वाने चिन्हांकित केले गेले. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता बदलणेही घडू शकणारी सर्वोत्तम गोष्ट असेल असे सांगितले व त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे सुरु केले. त्यानंतर एकाच दिवसानंतर म्हणजे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखांकन करुन सांगितले की अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध आठवडाभर चालणाऱ्या निरंतर मोहिमांसाठी तयारी करत आहे, आता केवळ मर्यादित हल्ला नाही, तर जे केवळ आण्विक सुविधा नव्हे तर इराणी राज्य आणि सुरक्षा पायाभूत सुविधांना लक्ष्य करु शकणारी व्यापक मोहीम राबवेल. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी, स्टेट ऑफ द युनियन मध्ये केलेल्या भाषणादरम्यान, ट्रम्प यांनी म्हटले की इराणने अण्वस्त्रे तयार करण्याच्या प्रयत्नांना पुनरुज्जीवित केले.
          हा एक गंभीर आरोप होता इराणला नेस्तनाबूत करण्याचा. तसाच दावा केला की इराणने वाढत्या प्रगत क्षेपणास्त्र क्षमता विकसित केल्या आहेत. ज्यामुळे अमेरिका, युरोप आणि परदेशातील अमेरिकेच्या तळांना धोका निर्माण होऊ शकतो. गरज भासल्यास कारवाई करण्यास अमेरिका तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
          तो अमेरिकेचा इशारा. तो इशारा इराणला दाबण्यासाठी वा धमकाविण्यासाठीच होता. हेच खटकलं इराणच्या सरकारला आणि तेथील इतर नागरिकांना. मग काय, इराण सरकारनंही त्याविरोधात इराणमध्ये जनमत तयार केलं. लागलीच जनमतातून युद्धास सुरुवात केली.  
            ते युद्ध....... त्या युद्धात अमेरिका व इस्त्रायलचा बराच खर्च झाला. त्यातच इराणचाही खर्च झाला. तीस दिवसाचा दोघांच्याही देशाचं नुकसान पाहिल्यास दर दिड मिनिटाला एक बॉम्ब, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन डागले गेले. अंदाजे एक महिन्याचा हिशोब काढल्यास या तीस दिवसात दोन्ही बाजूकडून विविध प्रकारची तीस हजार क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, बॉम्ब परस्परांवर टाकण्यात आले. तीस दिवसात जवळपास सरासरी दिड मिनिटाला एक असे क्षेपणास्त्र, बॉम्ब व ड्रोनचा वापर करण्यात आला. या हल्यात जवळपास पंधरा हजार ठिकाणे कमी जास्त प्रमाणात उध्वस्त झाली. काही पूर्ण नामशेष झाली. यात लष्करी तळ, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुविधा आणि नागरी वस्त्यांचा समावेश होता. 
           एका महिन्यात सर्व देशांचे मिळून आठ हजार सातशे नागरिक मृत्युमुखी पडले. तसेच चौतीस हजार नागरिक गंभीर, कमी गंभीर जखमी झाले. यातील सर्वाधिक अर्थातच इराण मधील होते. तीस दिवसात पाचशे नव्वद बिलियन म्हणजे पन्नास लक्ष कोटी रुपये साधनसामुग्री खर्च किंवा नामशेष झाली.
           फक्त तीस दिवसात सर्वात जास्त नुकसान इराणच्या अर्थव्यवस्थेचे झाले. अंदाजे तेरा लक्ष कोटी रुपये. युद्ध सुरू होण्यापूर्वी इराण दररोज अकराशे कोटी एवढ्या किंमतीचे तेल निर्यात करायचा. तेल निर्यात हा इराणचा सर्वात मोठा आर्थिक स्त्रोत होता. ती निर्यात जवळपास बंद पडली. युद्धामुळे इराणचा जीडीपी वीस प्रतिशतने कमी झाला व त्या देशाचे जवळपास चार कोटी नागरिक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. अमेरिका दररोज एक बिलियन डॉलर्स म्हणजे नव्वद हजार कोटी तर इस्रायल देखील जवळपास तेवढाच निधी दररोज युद्धावर खर्च करीत होता. या युद्धामुळे जगातील जवळपास तीस मोठ्या अर्थव्यवस्था कमीजास्त प्रमाणात बाधीत झाल्या होत्या. इतर देशाचे जे नुकसान झाले. त्यात मुख्य बाब ऊर्जेचा तुटवडा होती. कच्चे तेल इतर देशांना इराण पुरवत असल्याने, तेच बाधीत झाल्यामुळं महागड्या ऊर्जेचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे खते, पेट्रोकेमिकल आधारित उद्योग ठप्प झाले होते. जगभर त्यांच्या आयात निर्यातीवर विपरीत परिणाम झाला होता. त्यातच युद्धाच्या वर्षात विविध अंदाजानुसार जगाचा जीडीपी दर ०.५ ते ३ प्रतिशत एवढी कमी झाला होता. सर्वात गंभीर परिणाम पर्यावरणावर झाला होता. हवा, पाण्याचे प्रदूषण झाले होते. त्यातच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमिनी शेतीसाठी, वस्त्यांसाठी किंवा मानवी उपयोग यांसाठी निरुपयोगी झाल्या होत्या. लोकांनी मानवी यातना अनुभवली होती. साधी रक्ताची, जवळची माणसे, त्यातच अनेक आपल्याच पोटची मुले मुली यांचे डोळ्यादेखत मरणे? जी मेली नाही. पण जायबंदी झाली. त्यांना डोळ्यादेखत पाहणे आता नशिबी आले होते. त्यातच जगातील शेकडो लोकं हे युद्ध थांबवावं यासाठी देवाकडे साकडे घालत होते. कित्येक देशात सिलेंडर महाग झाले होते. लोकं सौर उर्जेवर व लाकडावर स्वयंपाक करु लागले होते. त्यातच दळणवळण व्यवस्था बाधीत झाली होती.
           अमेरिका एक बलाढ्य देश. त्यामानानं इराण म्हटलं तर एक लहानसा देश. परंतु आज तोच लहान देश बलाढ्य असलेल्या अमेरिकेवर भारी पडतोय. त्याचं कारण आहे, देशभक्ती. जी देशभक्ती इराणच्या जनतेत आज दिसून येत आहे. त्याचं कारण आहे, अमेरिकेनं केलेलं इराकचं पतन. त्यांनी यापुर्वी आपल्या ताकदीच्या भरवशावर इराकचा राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेनला पकडलं व त्याची हत्या करुन इराकवर आपला वचक बसवला नव्हे तर इराकमध्ये आपलं एक लष्करी क्षेत्र तयार केलं. हेच पाहात आहे इराणची जनता. जे इराणच्या जनतेला मंजूर नाही. त्यामुळंच मरते दम तक लढेंगे, कभी नही झुकेंगे, असं म्हणत इराणची जनता ही इराणच्या राष्ट्राध्यक्षासोबत आहे व त्यांना मदत करीत आहे. ज्यातून बलाढ्य असलेल्या अमेरिकेला आणि तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पलाही झुकायचा विचार करतांनाही विचार येतो.
          देशभक्ती........ सर्वच देशात त्या देशातील नागरिकात देशभक्ती ही कुटकूट भरलेली असते. त्याच देशभक्तीच्या भरवशावर देश लढत असतो. देशातील सैनिक लढत असतात. त्यातच ते आपला देश वाचविण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदानही देत असतात. तसेच सर्वच नागरिक देशासोबत युद्ध सुरु झाल्यावर अंतर्गत कितीही मतभेद असले तरी ते आपले आपापसातील वाद व मतभेद विसरुन एकत्र येवून अगदी मदत करीत असतात सत्ताधारी लोकांना. त्यावेळेस सत्ताधीश कोणतेही निर्णय घेत असेल आणि ते चुकीचे जरी असेल तरी त्या निर्णयाचं ते स्वागतच करीत असतात. ज्यातून देशात हिटलरचा व हिटलरशाहीचा जन्म होतोय. 
          हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर. त्यानं आपली हिटलरशाही प्रस्तुत करण्यासाठी आधी लोकांना विश्वासात घेतलं. त्यांना असं सांगीतलं की तो पहिल्या महायुद्धात जर्मनीचा गेलेला आत्मसन्मान परत आणून देईल. याच जोरावर सर्व देशवाशी एक झाले. त्यांनी हिटलरला मदत दिली. ते हिटलरच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. ज्यातून तो जे म्हणेल, त्याला पुर्वदिशा म्हटली त्यांनी. त्यातच त्यानं नाझी पक्ष स्थापन करुन पहिल्या महायुद्धातील पराभवाचे खापर ज्यू वर फोडले. लोकांनी तेही सहन केलं. त्यातच त्यानं कितीतरी ज्यूं ना अक्षरशः वेदना दिल्या. लोकांनी तेही सहन केलं. शिवाय अक्षरशः हिटलरनं ज्यूं ची कत्तलही केली आणि लोकांनी तेही सहन केले. कारण हिटलरनं जो विश्वास दाखवला होता, जर्मन नागरिकांना. ज्यातून लोकं त्याला देव मानायला लागले होते. हे देवपण तेव्हापर्यंत सुरु राहिलं. जेव्हापर्यंत हिटलरनं आत्महत्या केली नाही व ती आत्महत्या जगजाहीर झाली नाही. तो विश्वास एवढा प्रगाढ होता की त्याच विश्वासाच्या भरवशावर रशियन फौजा अगदी व्हाईट हाऊसमध्ये शिरल्या. तरी लोकांना वाटत नव्हते की जर्मनीचा पराभव होईल. लोकांना जेव्हापर्यंत हिटलर जीवंत होता. तेव्हापर्यंत वाटतच होतं की आपणच जिंकू व हिटलर देव असल्यानं तो आपल्याला आत्मसन्मान मिळवून देईल. परंतु दुर्दैवानं जेव्हा पराभव डोळ्यासमोर दिसला. तेव्हा पराभव न स्विकारणाऱ्या हिटलरला आत्महत्या करावी लागली. म्हणतात की हिटलर हा देशभक्त नव्हता. तो एक हुकूमशहा होता. परंतु तो हुकूमशहा कुणासाठी बनला? जर्मन लोकांसाठीच ना. जर्मनीचं गेलेलं वैभव परत आणण्यासाठी. परंतु तसं वैभव परत आणतांना त्यानं लोकांना जसं विश्वासात घेतलं. तसंच त्याच देशात राहणाऱ्या नागरिकांची हत्या करायला नको होती. जे एका लोकशाहीरुढ देशाला शोभत नाही. ती एक क्रुरताच झाली की त्यानं ज्यूं ची हत्या केली. परंतु हेर हा हेर असतो. मग तो देशातील का असेना. ज्यूं नी हेरगिरी केली शत्रूंची. असं हिटलरचं म्हणणं होतं. ज्यातून युद्ध हरावं लागलं जर्मनीला. म्हणूनच त्यांना शिक्षा व त्यातून हत्या. कारण मदत ही चांगल्या विचारांच्या माणसांना केली जाते. वाईट विचारांच्या नाही. यावर एक कथा प्रचलीत आहे. एक कोल्हा जाळीत अडकलेला असतांना त्या जाळीतून एका हरणानं त्याला सोडवलं. परंतु दुर्दैवानं तोच हरीण त्या जाळीत अडकला. त्यानंतर त्याला मदत करण्याऐवजी कोल्हा पळून गेला. पुढं त्यानं आपलं झुंड आणलं व जाळीतच अडकून असलेल्या हरणाला खावून टाकलं. दुसरी एक कथा हंस व कावळ्याची. कावळा दृष्ट व हंस सात्वीक. दोघांचीही दाट मैत्री. ते एकदा उडायला लागले. उडता उडता कावळ्याला एके घरी मांसाचे तुकडे वाळत असतांना दिसले. मग काय, हंसाची इच्छा नसतांना कावळ्याच्या इच्छेसमोर नतमस्तक होवून हंस खाली उतरला. हंसानं मांसाचा एक तुकडाही तोंडात टाकला नाही. कावळ्यानंच त्या तुकड्यावर यथेच्छ ताव मारला. अशातच मालक आला. त्यानं पाहिलं की कावळा मांसाच्या तुकड्यावर ताव मारत आहे व हंसही त्याच्या सोबतीला आहे. मग काय, त्यानं हातात काठी घेतली व तो त्यांना मारायला आला. त्यातच ते पाहात असतांना कावळा आपला जीव वाचविण्यासाठी उडाला. परंतु त्यानं हंसाला उडून जाण्याविषयी सांगीतलं नाही. शिवाय हंसालाही वाटलं की मी मांस खाल्लच नसल्यानं मी गुन्हेगार नाही. मी कशाला उडू. पर्यायानं न उडणाऱ्या हंसाचा जीव कावळ्यामुळं गेला. विशेष सांगायचं म्हणजे इथे जुव्वा खेळणारे लोकं पळून जातात व तोच जुव्वा पाहणारी मंडळी आपण जुव्वा खेळलोच नाही, असे समजून थांबतात. त्याचा परिणाम हा होतो की पोलीस त्यांनाच पकडतात व तुरुंगात टाकतात. तसंच आहे खुनाचं. खुन करणारेही पळून जातात व पाहणारेच तेवढे फसतात. हिटलरचं जरी बरोबर असलं तरी हिटलरनं अशी हत्या करण्याऐवजी त्यांच्याशीही विश्वास दाखवायला हवा होता. परंतु घडलं उलटच आणि उलट का घडलं? हिटलरनं लबाड कोल्ह्याची गोष्ट ऐकली असेल. दृष्ट कावळ्याच्या कथेचा त्याला अभ्यास असेल. त्यानं पत्ते खेळणारे लोकं पळून जातात व जे पळून जात नाहीत. तेच फसतात. हे अनुभवलं असेल. शिवाय खुन करणारेही पळतात व पाहणारेच फसतात. हे अनुभवलं असेल. म्हणूनच त्यानं ज्यू ची हत्या केली. परंतु ते फार मोठं पाप झालं होतं. ते आपल्या हातून पाप होत आहे. ही साधी गोष्ट हिटलर समजू शकला नाही. 
         हिटलरनं आत्महत्या केली. त्यानं जर आत्महत्या केली नसती तर कदाचित त्याला जर्मनच्याच लोकांनी देशभक्तही मानलं असतं. परंतु त्याला माहीत असेल संभाजींचा इतिहास. मी जर आत्महत्या केली नाही तर मी शत्रूंच्या हातात लागेल व शत्रू माझ्यावर अनन्वीत अत्याचार करुन माझे हाल हाल करुन मारेल. जीभ, नखे, हात कापेल. आंधळं करेल. अनन्वीत यातना देईल. ज्यातून मलाच जास्त त्रास होईल. जो त्रास असह्य असेल. त्यापेक्षा स्वतः मरण पत्करलेलं बरं. तोच विचार केला असेल त्यानं व आत्महत्या केली. अन् त्याच्या मृत्यूनंतर तेच घडलं. त्यानंतर तो मरण पावताच रशियन फौजांनी तेच केलं. त्याच्याच जर्मनीतील काही जर्मनवंशीय नागरिकांना मित्र राष्ट्रांच्या सैनिकांनी पकडलं. त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार केले. त्यांच्या स्रियांचा त्यात दोष नसतांना त्यांच्यावरही अनन्वीत अत्याचार केले. त्यांची अब्रुही लुटल्या गेली. हा इतिहास आहे व इतिहास तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आज त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, अमेरिका, इस्रायल व इराण युद्धात. परंतु अमेरिका हा काही इराण नागरिकांवर अत्याचार करु पाहात नाही आणि पाहणारही नाही. कारण जागतिक स्तरावरील दबाव आहे अमेरिकेवर. परंतु अमेरिका इराणमध्ये लष्करी तळ नक्कीच निर्माण करु शकतो. हे इराणच्या नागरिकांना माहीत आहे. आज इस्रायलची पाठराखण करणारा अमेरिका खामनेई मरण पावताच इराणवर दबाव आणू पाहात आहे की इराणनं नमावं. आपल्याला शरण यावं म्हणून. म्हणजे इराणला इराकसारखं दाबून धरुन हवं तर आपल्या मनासारखं वागवता येईल. ज्या गोष्टी इराणच्या नागरिकांना पटत नाहीत. म्हणूनच इराणचे नागरिक तन, मन, धनानं इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या पाठीमागं उभे आहेत व इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यांच्यात राष्ट्रभक्ती व देशभक्ती कुटकूट भरवली गेली आहे आपल्या राष्ट्राबद्दल. ज्यातून अमेरिका आणि इस्रायल दोघंही मिळून कितीही वार करतील इराणवर. तरीही ते दबणार नाहीत. असंच चित्र दिसते आणि अमेरिकेनंही त्यांच्याबद्दल तसं समजू नये. त्यांनी लवकरात लवकर युद्ध थांबवावं. तरच सर्वच देश त्यांना काल असलेला त्यांचा सन्मान परत देतील. जर त्यांनी तसं पाऊल उचललं नाही. तर इराणही त्यांच्या अस्तित्वाचं जागतिक नकाशावरील असलेलं स्थान पुसून टाकून दुसऱ्याच एखाद्या राष्ट्राचं नाव अस्तित्वाच्या लढाईत वरच्या स्थानावर आणेल. ती किमया इराण नक्कीच करु शकतं. यात शंका नाही. कारण तेवढी ताकद त्यांच्यात आहे. हे आजपर्यंतच्या त्या दोन्ही देशांच्या एकंदर संपुर्ण हालचालीवरुन व वाटचालीवरुन दिसून येत आहे. इराण लढत आहे अमेरिकेसोबत. त्यांचं ब्रीदच आहे, मरते दम तक लढेंगे, चाहे कुछ भी हो जाये. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. 

  **********************७********************

         मुस्कान भारतीय वंशाची एक मुलगी होती. ती भारतात राहात होती. तिलाही त्याची झळ पोहोचलीच होती. तसं तिला वाटत होतं की युद्ध बंद व्हावं. परंतु युद्ध काही बंद व्हायचं नावच घेत नव्हतं. 
         युद्ध सुरु होणं वा युद्ध सुरु करणं. हा दोन्ही देशांचा राजकीय खेळ. ही त्यांची अस्तित्वाची लढाई. परंतु त्या लढाईत इतरही देशाचं नुकसान होत होतं. ते पाहून मुस्कानला वाटत होतं की यात भारताचा दोष काय? भारताला युद्धाची झळ का बसावी? तसं पाहिल्यास सिलेंडर महाग झालं होतं व त्याचा तुटवडाही होत होता. शिवाय सिलेंडर महाग झाल्यानं लोकांच्या खाण्याच्या असलेल्या वस्तूही महागच झाल्या होत्या. 
         युद्ध सुरु झालं होतं. अमेरिका इराणवर करोडो रुपये किंमत असलेले क्षेपणास्त्र टाकत होता तर इराण अमेरिकेवर क्षेपणास्त्राऐवजी द्रोण हल्ले करीत होता. त्यातच इराणकडून येत असलेले कच्चे तेल. ते तेल येणं बंद झालं होतं. अशातच इतर देशांचा व्यापार बिघडत चालला होता. इतर देशांना कच्चे तेल येणं बंद झाल्यानं त्यापासून उत्पादीत होणारी गॅस बंद झाली होती. त्यातच गॅसवर चालणाऱ्या खानावळी बंद झाल्या होत्या. एवढंच नाही तर स्वयंपाक घरातही वापरला जाणारा गॅस मिळत नसल्यानं लोकांची कोंडी झाली होती. स्वयंचलीत वाहनांना गॅस व पेट्रोल मिळत नसल्यानं ती वाहनं रस्त्यावर धावणंही बंद झाली होती. अशातच दळणवळण सेवाही प्रभावीत झाली होती. 
          इतर देशाची स्थिती बरीच वाईट होती. तशीच वाईट स्थिती होती भारताची. भारतातही गॅस उत्पादन बंद झालं होतं. त्यातच गॅस उत्पादनात काळाबाजार सुरु झाला होता. त्यामुळे मुस्कानला भारताचा दोष न वाटणं साहजीकच होतं. त्यातच ती विचार करीत होती. 
          अमेरिका व इराणचं युद्ध. ज्याची क्षती इतर देशांना पोहोचली. ज्यातून इतर देशांचीही अर्थव्यवस्था कोलमडत आहे. बऱ्याचशा देशात लॉकडाऊन लागलंय. पेट्रोल, डिझेलवर चालणारी साधनं बंद झालीत. गॅस मिळणंही कठीण झालंय. तीच अवस्था भारताची आहे. भारतातही अलिकडील काळात गॅसचा तुटवडा भासू लागलेला आहे. त्यातच भारतानं अमूक करावं, तमुक करावं. असे काही राजकारणी म्हणतात. हे फुकटचे सल्लेच झाले. परंतु नेमकं काय करावं. हे शासन करणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखी बाब असते. वाद, वादाच्याच ठिकाणी राहतो. ज्यात इतरही देशांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अमेरिका इराण युद्धात इतर देशांसारखे भारताचे हेच हाल होत आहेत.
           इराण व इजराईल युद्ध. खरं तर हे युद्धच नाही तर तिसरं महायुद्धच समजा. कारण यात अमेरिका इजराईलच्या समर्थनार्थ उतरलाय. युद्ध सुरुच आहे व युद्ध विराम होण्याची चिन्हं दिसत नाहीत.
          युद्ध सुरु आहे. कारण ही दोन्ही देशांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. अमेरिकेला वाटते की मी सरस व्हायला हवा. सरस अर्थात जागतिक स्तरावर श्रेष्ठ. तसा अमेरिका कमजोर नाहीच. कारण अमेरिका त्या लोकांनी निर्माण केलाय. ज्याच्या साम्राज्यात सुर्य कधीच मावळत नव्हता. 
        अमेरिका निर्माण झाला हा काही उद्योगपतींमुळं. युरोपात औद्योगिक क्रांती झाली. ज्यातून उद्योगातून अतिरिक्त पैसा आला. आता तो पैसा गुंतवायचा कुठं? हा प्रश्न तमाम युरोपियन उद्योगपतींना पडला. ज्यात ब्रिटिश लोकं अग्रेसर होते. तसं पाहिल्यास ग्रेटबिटन मध्ये जास्त भुभाग नसल्यानं कारखानेही बऱ्याच प्रमाणात उभारता येत नव्हते. अशातच भुमीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. ज्यातून अमेरिकेची निर्मिती झाली. इजराईलही तसाच. इराणच्या ताब्यात असलेली ओसाड भुमी. ज्या भुमीत काहीच पिकत नव्हतं. त्या भुमीकडे दुर्लक्ष करीत इराणनं तिथं राहायला ज्यू ला परवानगी दिली. पुढं त्यांनी दिर्घकाळ अधिवास केल्यानंतर अधिकार मागीतले. ते बहाल करतांना इजराईल सन १९४८ ला स्वतंत्रच झाला. पुढं लहानशी लोकसंख्या व लहानशी भुमी. याच वादात ज्यू हे काटक असल्यानं आपली सक्षमता टिकवून ठेवण्यासाठी एका कोरड्या भुमीचं त्यांनी नंदनवन केलं व तिथं नंदनवनाचे मळे फुलवले. आज जगामध्ये इजराईल हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढा सक्षम देश ठरला आहे की त्याचे जगात आदरानं नाव घेतल्या जाते. ही त्यांची त्यांना अतिशय अल्पावधीत लाभलेली ओळख आहे. अमेरिकेचंही तसंच आहे. नवीनच निर्माण झालेला अमेरिका हा आज जगात आर्थिक बाबतीत सक्षम झालेला असून जागतिक स्तरावर महासत्ताच ठरलेला आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी काल, समृद्ध असलेला इराण आज कमजोर आणि लहानसा देश वाटत असला तरी एकंदरीत आजपर्यंतच्या वातावरणाचा अभ्यास केल्यास इराण कमजोर वाटत नाही. त्याच्या बाबतीत दिसते तसं नसते. म्हणूनच जग फसते. ही म्हण अगदी तंतोतंत बसलेली आहे.
        इराण कमजोर नाही. ते इजराईलच नाही तर अमेरिकेलाही प्रत्यूत्तर देत आहे. कालचा विशाल असलेला व आज एक लहानसा ठरलेला इराण अमेरिकेपुढे गुडघे टेकायला तयार नाही. यावरुन इराणची जागतिक स्तरावरील ताकद ओळखू येते. शिवाय सध्याच्या अवस्थेत तो अमेरिकेच्या धमकीला घाबरत नाही. म्हणतो की आमच्या नशिबात जर अमेरिकेची गुलामी असेल तर करु. परंतु सहजासहजी आम्ही अमेरिकेला शरण न जाता प्रत्युत्तर देवू आणि ते देत आहोत. शेकडो पक्षी बॉंब अमेरिकाच नाही तर इजराईलमध्ये धडकत आहे व अमेरिकेची जी अहंकाराची हवा होती. ती त्यांनी खराब करुन टाकलेली आहे. आता अमेरिका हे निव्वळ धमक्याच देवू शकतं. हे इराणलाच नाही तर जगालाही कळलेलं आहे. 
           अमेरिका व इराण युद्ध. इजराईल व इराण युद्ध. ज्यात भारताचा काही भाग नाही. भारत अलिप्त असून तो ना इजराईल, अमेरिकेकडून बोलत, ना तो इराणकडून बोलत. मात्र ही भुमिका जरी अलिप्त असली तरी संदिग्धपणा आहे त्यात. भारताचे इजराईलशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच संबध इराणशीही आहेत. इराणला वाटतं की भारतानं आम्हाला मदत करावी आणि इजराईलला वाटते की भारतानं आम्हाला मदत करावी. मात्र भारत यापैकी दोघांनाही मदत करु शकत नाही. त्याच कारण आहे, त्याचे दोन्ही देशांशी असलेले संबंध. आता भारत जर इजराईलच्या बाजूनं बोलला तर भारतावर इराण नाराज होईल. त्यातच इराण भारताला मदत करणार नाही. ज्यातून भारतात कच्चे तेल, जे इराणकडून येतं. इराणमार्गे होर्मूझ बंदरातून येतं. त्याबद्दल समस्या निर्माण होतील. असं जर झालं तर भारताच्या बहुतेक घरात चुली पेटणार नाहीत. ज्या चुली गॅसवर अवलंबून असतात. कारण गॅस हे उत्पादन क्रुझ ऑईल अर्थात कच्च्या तेलापासून निर्माण होतं. तसेच भारताची विमानसेवा, दळणवळण प्रभावीत होतील. हे झालं इराणबाबतीत. इजराईलचंही तसंच आहे. इजराईलला मदत केली नाही तर अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान जे इजराईलकडून आपण घेतो. ते आपल्याला मिळणार नाही. ज्यातून शेती विकसीत करता येवू शकते. ते आपल्याला करता येणार नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास प्रगत ज्ञानांतर्गत भारत हा कितीतरी वर्षपर्यंत मागे जावू शकतो. जर भारत अलिप्त राहिला. तो कुणाकडूनच बोलला नाही तर भारताची अवहेलना होईल. ती अवहेलना इराण आणि इजराईल दोन्ही देश करतील. तसंही भारतानं केलं तरीही हे दोन्ही देश भारताला मदत करणार नाही. त्यामुळंच अलिप्त तरी कसं राहावं? हा प्रश्न भारतापुढं निर्माण झालेला आहे. शिवाय युद्धबंदी करण्यात वार्तालाप करतो म्हटल्यास त्या दोन्ही देशाच्या अटीच जोरदार आहेत. इराणची पहिली आणि महत्वाची अट आहे की जो नरसंहार अमेरिकेनं केला. त्याची नुकसान भरपाई अमेरिकेनं द्यावी. त्यानंतर दुसरी आणि तिही महत्वपुर्ण अट आहे की अमेरिकेनं यानंतर कधीच इराणवर युद्ध थोपवू नये. दोन्ही अटी महत्वाच्या असून त्या माध्यमातून इराणला आपल्या स्वतःची सुरक्षा कालानुकालिक करुन घ्यायची आहे आणि कोणताही देश इराणच्या जागेवर असता तर त्यानं तेच केलं असतं.
         इराणच्या जशा अटी आहेत. तशाच अमेरिकेच्याही बऱ्याच अटी आहेत. इराणवर निर्बंध लादताना अमेरिकेच्या मुख्य अटींमध्ये त्यांचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करणे, क्षेपणास्त्र विकास थांबवणे, प्रादेशिक प्रॉक्सी गटांना पाठिंबा देणे थांबवणे. जसे, हिजबुल्लाह व हमासचा अतिरेक आणि अमेरिकन नागरिकांची सुटका करणे यांचा समावेश आहे. परंतु यात इराणचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका हे विसरतोय की ते जसं अणू परमाणू कार्यक्रम घेतं. परमाणू बॉंब निर्माण करतं. तसं इराणनं करु नये काय, आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेवून. परंतु त्याला अमेरिकेचा विरोध आहे.
         दोन देश व दोन्ही देशाच्या अटी जोरदार आहेत. शिवाय अस्तित्वाचा प्रश्नही बिकटच स्वरुपाचा आहे. असंच जर चालत राहिलं तर युद्धसमाप्ती होणार नाही व कदाचित त्यातून तिसरं महायुद्ध भडकू शकेल. 
        महत्वपुर्ण बाब ही आहे की जगाला आज युद्धाची गरज नाहीच. जगाला गरज आहे शांतीची. युद्धात विनाकारण ज्या सैनिकांचा दोष नसतो. त्यांचा जीव जातो. जर शांती असेल तर असे निरपराधांचे जीव जाणार नाही. परंतु अमेरिकेच्या व इराणच्या अटी पाहिल्यास त्यांना सैनिकांचं काही घेणंदेणं नसल्याचं जाणवतं. हे असंच सुरु राहिलं तर तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी सैन्यक्रांती होईल व राष्ट्राध्यक्ष मारले जातील. ज्यातून सार्वभौम सैनिकशाही अर्थात लष्करशाही जन्मास येईल. जी अमेरिका, इजराईल नव्हे तर इराणवर राज्य करेल नव्हे तर यातूनच बोध घेवून इतर राष्ट्रही राष्ट्राध्यक्ष हटवतील व नव्या स्वरुपाच्या लष्करशाहीला जन्म देतील व जगात लोकशाही संपून लष्करशाहीच वाढीस लागेल यात शंका नाही.
         मुस्कान ही फारशी वंशाची होती. ती भारतात राहात होती. परंतु तिचे आजेपणजोबे हे इराणचेच होते. ज्या फारशी वंशातील लोकांचा एक फार मोठा इतिहास होता. 
          ते युद्ध व त्या युद्धाची झळ ही कच्च्या तेलाच्या मार्फत भारतातील लोकांना पोहोचलेली होती. त्यातच जीवनावश्यक काही वस्तू महाग झाल्यानं त्या वस्तू अशा लोकांच्या वाट्याला येत नव्हत्या, जे गरीब होते. 
          गरीबी....... मुस्कानच्या मतानुसार देशात गरिबी नव्हती. तसं तिला वाटत होतं. त्यातच गरिबीबद्दल मुस्कान विचार करीत होती की जर लोकांनी मुलंच जास्त जन्माला घातली नाही, तर देशात गरिबी राहणार नाही. मुलांना जन्म देतांना? मुस्कानला प्रश्न पडला. प्रश्न पडला की की मुलांना जन्म देतांना लोकांनी विचार करायला हवा. देशात खाणारी तोंड जर वाढली तर देशातील अन्नधान्याचा पुरवठा व्यवस्थित करता येणार नाही. ज्यातून अन्नधान्य कमी झालं वा त्याचा तुटवडा निर्माण झाला तर सिलेंडरप्रमाणे तेही महागच होईल. तसं पुर्वी नव्हतं. पुर्वी लोकसंख्या कमी होती. ती नियंत्रणात असायची. पुर्वी बरेच युद्ध व्हायचे व त्या युद्धात बरीच माणसं मरण पावायची. तसेच ज्यांच्या घरचे पुरुष मरण पावायचे. त्या घरातील बऱ्याचशा स्रिया या आपल्या पतीसोबत सतीही जात असत. त्यातच जे कोणी उरलेले जीवंत राहात. ते उरलेले बरेचसे लोकं साथीच्या आजारात मरण पावत. त्या साथीच्या आजारात बरीच मंडळी लाखोंच्या संख्येनं मरण पावत. ज्यातून लोकसंख्या नियंत्रणात राहात असे. त्यानंतर खाणारी तोंड कमी असायची व अन्नधान्य विपूल प्रमाणात मिळायचं. 
         मृत्यूचा आकडा जन्मदरांपेक्षा जास्त होता. माणसं जास्त प्रमाणात मरण पावतात म्हणून लोकं जास्त मुलांना जन्माला टाकत असत. औषधोपचारांची विपूल प्रमाणात सोय नसल्यानं मृत्यू यायचाच. मृत्यू हा त्या काळातील एक सत्याचाच भाग होता. 
           मृत्यूबाबतचा विचार व मुलं जन्माला घालण्याबाबतचा विचार भारतीय वंशाची असलेली मुस्कान करीत होती. त्याचं कारण होतं. तिच्या घरी असलेले तिचे भाऊबहिण. त्यांची संख्या कितीतरी जास्त होती आणि त्याच कळा तिनं अगदी लहानपणापासूनच सोसल्या होत्या. तिच्या आईवडीलांनी तब्बल सोळा अपत्यांना जन्म दिला होता व ती मोठी असल्यानं त्यांचे होणारे हाल तिनं जवळून पाहिले होते. अंगात घालायचे कपडेही सर्वांना बरोबर मिळायचे नाहीत. कोणाला खालचे कपडे मिळायचे तर कोणाला वरचे. त्यातच लहान असलेले भाऊबहिण कमीतकमी दहा वर्षाचे होईपर्यंत उघडे नागडेच हिंडत असायचे. ती लाज तिलाच वाटत असायची. परंतु उपाय नसायचा. कारण तिचे वडील जो ही पैसा कमवायचे. तो पैसा घरातील जेवनाचीच सोय करण्यासाठी पूरेसा नसायचा. त्यातच कपडे कुठून घेवून देणार? जेवनातही भात आणि वरणाशिवाय दुसरं काही दिसायचं नाही. वरण बनवितांना तिची आई थोडीशीच डाळ घेवून त्यात भरपूर पाणी टाकायची. तसं पाहिल्यास त्या वरणासोबत भात खातांना पाण्यासोबतच आपण भात खात आहोत. असंच वाटायचं. परंतु कुरकूर करता येत नव्हती मुस्कानला आणि कुरकूर तरी ती कोणाजवळ करेल. ती मोठी असल्यानं समजून घेवून तिला कधीकधी पाणी पिवूनच राहावं लागत असे. 
           आज ती अशाच गस्ता खात खात लहानाची मोठी झाली होती. घरी आपलाही थोडासा आर्थिक आधार व्हावा. म्हणूनच ती कामाला लागली होती. परंतु तिचे विचार उच्च होते व ती उच्च दर्जाचा विचार करीत होती. कारण ती तेवढ्याही कठीण परिस्थितीत शिकली होती. तिनं उच्च शिक्षण घेतलं होतं. त्यातच तिनं इतिहास, समाजशास्राचा पुरेपूर अभ्यास केला होता. इतिहास तर तिचा आवडीचा विषय. तो तिचा अगदी तोंडपाठ झाला होता. तशी ती मुलं जन्मास घालण्याबाबत विचार करीत होती. ती त्याबाबत लोकांनाही सांगत असे. 
           'पुर्वी भरपूर मुलांना जन्माला घातलं जात असे. कारण होतं, सैन्यातील आवश्यकता व सैनिकांचा मृत्यू. त्यातच त्यांच्या पत्नीचेही मृत्यू. ज्या जोहार करतांना आत्ममरण पत्करत असत. आपली अब्रु वाचविण्यासाठी. त्यांचीही संख्या लाखोंच्या घरातच असायची. दुसरं कारण होतं, साथीच्या रोगात लाखोंच्या संख्येत मरण पावत असलेली पिढी. परंतु आज तसं नाही. आज ना जास्त प्रमाणात युद्ध होत, ना आज जास्त करुन साथीचे रोग येत. मग तरीही लोकं मुलांना जास्त प्रमाणात जन्म देतात. शिवाय महागाईच्या झळा शोषत बसतात. अन् सरकारवर दोषारोपण करुन त्यांनाच वेठीस धरून मदत मागत असतात.
         मला बरेचसे अनुभव असे आले की काही काही कुटुंबं गरीब आहेत. पुरेसा पैसा नाही. परंतु जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालत आहेत तर काही कुटुंब अशीही पाहिली की त्या कुटुंबात भरपूर संपत्ती आहे. परंतु त्यांच्या घरच्या मुलांनी विवाह केलेले नाहीत व काहींनी केले. परंतु त्यांनी मुलांना वय झाले असले तरी मुलं जन्मास घातलेली नाही. काहींनी घातली. परंतु त्यांची संख्या एक किंवा दोनच आहे. 
         मुलं...... काल प्रवाहात मुलं जन्मास घातली जातात. त्याचं कारण असतं वंशवाढ. त्यातच मुलगा हवा, मुली नकोच. म्हणत लोकं गर्भाची चाचणी करतात व मुलांनाच जन्मास घालतात. मुलींना नाही. मुलींचे चक्कं गर्भपात करतात. अलिकडे मात्र ही पद्धती बदललेली आहे. अलिकडील काळात मुलगाही काही देत नाही. म्हणूनच लोकं मुलींनाही जन्माला घालत आहेत. त्याचं दुसरं कारण आहे आपली सेवा. म्हातारपणात आपली सेवा मुलीच करीत असतात. याच हेतूनं मुली जन्माबाबत लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे.
         मुलं मुली जन्म टाकण्याबाबत लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. आज लोकं जास्त करुन मुलं जन्माला घालत नाहीत. मी व माझं एकच मुल, हाच दृष्टिकोन आज रुढ झालेला आहे. काही मुली तर अशा आहेत की त्या मुलं जन्माला घालण्याचा कंटाळा करतात. जास्त करुन हे प्रमाण शिकलेल्या मुलींमध्ये जास्त आहे. शिकलेल्या मुली या मुलं सांभाळून घेण्याची जबाबदारी घेत नाहीत. त्यांना कंटाळा येतो. तसाच त्यांना घरकामाचाही कंटाळा येतो. घरकाम करतांना कंटाळा येत असल्यानं अशा मुली वयात येत असल्या तरी लवकर विवाहही करीत नाहीत. बऱ्याचशा मुली तर तरुणपणाचा पुरेपूर आनंद मिळविण्यासाठी लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहतात. ही एक करार पद्धतीच आहे. ज्यातून तरुणपणाचा आनंद मिळतो. पुढं तरुणपण थकलं की एखादं मुल, जे समजदार असतं. ते दत्तक घेतात. ज्याची सेवा करावी लागत नाही. ज्याला सांभाळून घेतांना रात्रभर जागावं लागत नाही. ज्याची शौच धुवावी लागत नाही. उरल्या घरकामाच्या गोष्टी, तर त्याही ठिकाणी स्रिया या घरी जेवन बनवत नाहीत. जेवन महागड्या हॉटेलातूनच मागवतात. घरी जेवन बनवायचंच झालं तर मॅगी बनवतात. ज्याला जास्त मेहनत लागत नाही. या मुली पैसे कमविण्याकडे जास्त कल देतात. ज्यातून त्या आपल्या घरी प्रत्येक कामासाठी नोकरं लावत असतात. त्यांचा बराचसा पैसा हा नोकरांचे पैसे देण्यात जातो. काही मुली तर एका अतिभव्य मोठमोठ्या घरात एकट्याच राहणे पसंत करतात. तरुणपणाची मजा बाहेर, एखाद्या बागेत किंवा रेस्टॉरेंटमध्ये एखाद्या बॉयफ्रेंडसोबत घेत असतात.
         महिलांचं काम असतं मुलं जन्मास घालणं. ते काम पुरुष करीत नाहीत. कारण विधात्यानं ते कार्य महिलांनाच नेमून दिलेलं आहे, पुरुषांना नाही आणि ते कार्य पुरुषांपेक्षा स्रियाच उत्तम पद्धतीनं करु शकतात. बाळाची शौच धुणं, त्यांचं तेलपाणी करणं. त्यांना रडण्याच्या प्रक्रियेतून चूप बसवणं. या सर्व गोष्टी त्याच करीत असतात. परंतु अलिकडील काळात त्या कंटाळा करीत असल्यानं मुलं जन्मास घालण्याच्या प्रक्रियेवर अडथडा निर्माण झालेला आहे. आज शहराशहरात मुलंमुली आनंद साजरा करतात. परंतु मुलं जन्मास टाकण्याचा कंटाळाच करतात नव्हे तर तरुण वय निघून जातं. परंतु त्या विवाह करीत नाहीत. विवाहाला तयार होत नाहीत. मग असं आहे आणि शहराशहरात विवाह न करण्याबाबत हेच चित्र दिसत आहे तर मग देशाची लोकसंख्या दर जनगणनेच्या वेळेस वाढलेली का दिसते? तसंच कुटुंबनियोजन पद्धती आली तरी ती लोकसंख्या का वाढते? त्याचं कारण आहे काही समाजातील लोकं, माझ्याही समाजातील लोक. जी कुटुंबनियोजन शस्रक्रिया असूनही मुलं जास्त प्रमाणात जन्माला टाकत असतात. ज्यातून लोकसंख्या वाढते. त्यांच्या घरी मुलांना खायलाही नीट राहात नाहीत. मुलांना कपडे घालायला कपडेही नीट मिळत नाहीत. राहायला चांगलं घर मिळत नाही. मुलं आजारी पडलीच तर त्यांना डॉक्टरकडेही न्यायला पैसे मिळत नाहीत. यात छत्तीसगडी समाज, आदिवासी समाज, राजस्थानी समाज. यांचा समावेश होतो. काही काही धर्माचे लोकंही असेच असतात. जसा माझा मुस्लिम धर्म. हा माझा धर्म, अल्लाची देण म्हणत बरीच मुलं होवू देतात. ते कुटुंबनियोजन शस्रक्रियेला पाप समजतात. त्यातच कुटुंबनियोजन प्रक्रियेतून मुलं जन्मास घालतांना त्याला कात्री लावणं म्हणजेच अल्लाच्या कामात व्यत्यय आणणं मानतात. जनगणनेच्या वेळेस हेच दिसून येतं. काही काही माझ्या मुस्लिम समुदायांनी भरपूर लेकरं जन्मास घातलेली आहेत. ज्यातून लोकसंख्या वाढलेली आहे. माझ्याही घरात तेच हाल आहेत. माझ्याही कुटुंबात मला धरुन अठरा अपत्य. 
          पुर्वी असं नव्हतं. पुर्वीच्या काळात औषधोपचाराच्या पद्धती होत्या. परंतु अलिकडील काळात आहे, एवढं प्रशिक्षीत तंत्रज्ञान पुर्वी नव्हतं. त्यातच प्रत्येकवर्षीच साथीचे रोग यायचे. ज्यात लोक मरायचे. शिवाय अनेक ठिकाणी राजांची राजवट असायची व युद्ध पाचवीलाच पुजलेलं असायचं. ज्यातून युद्धाला असंख्य सैनिक लागत असत. शिवाय काही ठिकाणी राजे मरण पावताच अस्मितेच्या व अब्रुच्या दृष्टीकोनातून बऱ्याच स्रिया या जोहाराचा मार्ग अवलंबीत असत. अशावेळेस लोकसंख्या ही कमी होत असे. त्यामुळंच ती वाढवावी लागत असे. ज्यातून अल्लाची देण म्हणत मुलं जन्मास टाकणं ठीक होतं व लोकं मुलास जन्मास टाकतही असत. मुलं जीवंत राहायचा नेम नसल्यानं. परंतु आज तसं नाही. आज जास्त करुन युद्ध होत नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत असल्यानं युद्ध झालीच तर सैनिक रुपातील लोकं जास्त प्रमाणात शहीद होत नाहीत. त्यातच जे आजार होतात. त्या आजारातून लवकरच लोकं बरेही होत असतात. मृत्यूचा दर कमी झालेला आहे. मग लोकसंख्या वाढेल नाही तर काय? अन् वाढतेच. कारण जरी आजच्या काळात कुटुंबनियोजन आलं, जरी आजच्या काळात महागाई निर्माण झाली असली तरी काही समाज अनेक अपत्यांना जन्म देते. मुस्लिम समुदायातील काही लोकं आजही अल्लाकी देण म्हणत व अल्लाच्या कार्यात अडथडा म्हणत अनेक अपत्यांना जन्म देतात. कारण त्यांना निःशुल्क राशनचे तांदूळ, गहू देवून सरकार पोषतं. आज तंत्रज्ञान विकसीत असलं तरी माझ्याही घरात माझ्या आईवडिलांनी तेच केलं. कुटुंबनियोजन शस्रक्रिया केली नाही. ज्यातून आम्हा भावाबहिणींची आबाळ झाली. 
         महत्वाचं म्हणजे काही लोकं हे विवाह करीत नाही. ती मंडळी मुलं दत्तक घेवून दुसऱ्यांच्या मुलांचं लालनपालन करतात. ते मुलांना जन्माला न घालून वा विवाह न करुन लोकसंख्या नियंत्रणास एकप्रकारे मदतच करतात. मुलांना जन्मास टाकणं. याला कुणाचाच विरोध नाही. परंतु विरोध आहे, लोकसंख्या नियंत्रणात अडथडे आणणाऱ्या त्या लोकांचा. अल्लाकी देण म्हणत सर्वच समाजांनी व धर्मांनी अपत्यांना जन्म जरी दिला तरी ती लेकरं त्यांनाच पोषणं आहे. सरकारला नाही. ती त्यांनी कशी पोषावी? हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु असं जरी असलं तरी अशा जास्त अपत्ये असणाऱ्या लोकांना सरकार मदत करीत असते, रेशनच्या सोयीसवलती देवून. कितीतरी किलो तांदूळ व गहू सरकार त्यांना देत असते. तसंच त्यांच्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत असते. एवढंच नाही तर अशा लोकांची मुलं ज्या शाळेत शिकतात. त्या शाळेत खिचडीची सोयही केली जाते. ही मुलं उपाशी राहू नयेत म्हणून. तरीही घरी विश्वकोटीचं दारिद्र्यच असते.
         महत्वपुर्ण बाब ही की लोकांनी का बरं एवढी मुलं जन्मास घालावी की ज्या घरी मुलांना कपडेही मिळत नाहीत. ज्या घरी मुलांना चांगल्या उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या सोयी मिळत नाहीत. ज्या घरी आजाराला पैसे सहज उपलब्ध होत नाहीत आणि ज्या घरी खायलाही व्यवस्थित अन्न मिळत नाही. विशेष म्हणजे मुलं जन्मास घालावीच. घालू नये असं नाही. परंतु कोणी? जे कुटुंब खरंच लायक आहे, सर्वच जन्माला घातलेल्या मुलांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी. ज्या घरी भरपूर पैसा आहे की ज्या पैशातून जन्मास घातलेल्या सर्वच मुलांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होवू शकतात. अशाच लोकांनी मुलं जन्मास घालावीत. जेणेकरुन सर्वच अपत्यांच्या सर्वच गरजा पुर्ण करता येतील. विनाकारण कुणावर वा सरकारवर अवलंबून असलेल्या वा राहणाऱ्या लोकांनी जास्त मुलांना जन्मास टाकून त्यांचं भवितव्य खराब करु नये. हे तेवढंच खरं.'
           मुस्कान अनुभवाचे बोल सांगत होती लोकांना. ती सांगत असे लोकांना की त्यांनी जास्त मुलांना जन्मास घालू नये. आपण गरीब होतो व देशात गरिबी येते. परंतु लोकं तिचं ऐकतील तेव्हा ना. लोकं तिलाच म्हणायचे की पहिलं आपल्या घरी झाकून पाहा. मग गोष्टी सांग. शेवटी तिलाच ते ऐकून खाली मान टाकावी लागत असे.
          आज मुस्कान विचार करीत होती. विचार होता, मुलं जन्मास न घालण्याचा. तसं तिला मुलबाळ नव्हतंच. विवाह झाल्यानंतर अगदी अल्पकाळातच तिचा असलेला पती गुलजार तिला सोडून मायदेशात निघून गेला होता. ती विचार करीत होती, मुलं जन्मास घालू नये. मग काय करावे? आपण विवाहबद्ध होवू नये. दुसरा विवाहच करु नये. म्हणजे मुलंच होणार नाहीत. परंतु असं जीवन. असं जीवन कसं जगता येईल? 
          ती त्यावर विचार करीत होती. विरंगुळा म्हणून पुस्तकं वाचू लागली. कारण एकाकी जीवन जगतांना तिच्या मनात कंटाळा येत असे. त्यावर मात करण्यासाठीच पुस्तके वाचण्याचा मार्ग. अशातच तिच्या हातात पडलं आम्रपाली नावाचं पुस्तक. जी एक वेश्या होती. परंतु तिनं बौद्ध धम्म स्विकारुन आपल्या संपुर्ण जीवनाचा उद्धार केला होता. त्यातच तिनं वाचला अंगुलीमालचा इतिहास. ज्यात तो दरोडेखोरापासून अहिंसक बनला होता. ज्यातून त्याचं संपुर्ण जीवन बदलून गेलं होतं. त्यानंतर तिनं वाचला देवीचा इतिहास. जी देवी आयुष्यभर एकटीच राहिली होती सम्राट अशोकाविना. तिची असलेली मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र श्रीलंकेत गेल्यानंतर ती एकाकी झाली होती. परंतु ती एकाकी झाली असली तर बौद्ध धम्मातील तत्वामुळे तिला बरंच सुख मिळालं होतं. शेवटी विचारांती तिला मार्ग सापडला. विचार केला की आपण बुद्ध धम्माची दिक्षा घ्यावी. संन्याशी व्हावं. म्हणजेच आपल्याला विवाह करण्याचीही गरज उरणार नाही व आपलं आयुष्यही आनंदातच जाईल. तशी ती गोष्ट तिनं आपल्या घरी सांगितली. मात्र धर्माच्या अगाढ श्रद्धेनं तिला तिच्या कुटुंबानं विरोध दर्शवला. परंतु तिनं विचार केला होता नव्हे तर निर्धार. आपण बौद्ध धम्म स्विकारायचाच. मग काहीही घडलं तरी. शेवटी तिनं बौद्ध धम्म स्विकारला व ती अगदी आनंदानं बौद्ध धम्मातील भिख्खू बनून आपल्या उरलेल्या आयुष्याचा प्रवास करु लागली. आता ना तिला गुलजारची आठवण येत असे, ना तिला परिवाराची. त्यातच ती बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर धम्म प्रसारासाठी विदेशी प्रवासही करु लागली होती. 
           
  **********************८*******************

            इराण कमजोर नाही? मुस्कानचं तेच मत होतं. तसं अमेरिकेनं समजू नये. असंही ती मानत होती. युद्ध बंद व्हावं. असं तिलाही वाटत होतं. कारण त्याची भारताला झळ पोहोचतेय. असं तिलाही वाटत होतं. परंतु अमेरिका काही युद्ध बंद करीत नव्हता. कारण तो एक बलाढ्य देश होता व तो एक बलाढ्य देश आहे. याचा अहंकार त्याला चढला होता. तो इराणला कमजोरच समजत होता. त्यावर वक्तव्य करतांना ती लोकांशी संवाद साधत असे. कधी जनजागृती करण्यासाठी वर्तमानपत्रातून लिहितही असे. असाच एक लेख तिनं वर्तमानपत्रातून लिहिला होता. त्यात तिनं लिहिलं होतं. 
          'इराण कमजोर नाहीच. आज आपण पाहतो की देशात सिलेंडरचा तुटवडा आहे. पेट्रोल डिझेलच्या साठ्यावर संक्रात येईल असे दिसत आहे. याला जबाबदार आहे युद्ध. कारण इराण व अमेरिकेचं युद्ध सुरु आहे व आखाती देशामधून येणारं कच्च तेल इराणमार्गे येत असल्यानं सध्या देशातही येवू शकत नाही. म्हणूनच सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. हा तुटवड्याचा मुद्दा तेव्हाच सोडवता येईल. जेव्हा युद्ध थांबेल.
          युद्ध हे महाभयंकर विनाशकारी असतं. त्यात अपरिमीत हानी होते. मनुष्यहानी आणि वित्तहानीही होते व त्या नुकसानाचं आपण मोजमाप करु शकत नाही.
         महायुद्ध जगात दोन झाली. एक पहिलं महायुद्ध नावानं प्रसिद्ध आहे व दुसरं आहे, द्वितीय महायुद्ध. पहिल्या महायुद्धात जो गट होता. तोच गट दुसऱ्याही महायुद्धात होता. मात्र दुसऱ्या महायुद्धात जास्त विनाशकारी काम झालं. पहिल्या महायुद्धात बिस्मार्कची भुमिका महत्वपुर्ण होती. त्यानं जर्मनीला सशक्त बनवलं होतं. परंतु त्याच्याबद्दल जागतिक स्तरावर संशय निर्माण झाल्यानं व त्याच्या अति महत्वाकांक्षेनं पहिलं महायुद्ध झालं. ज्यात जर्मनीचा पराभव झाला. 
        जर्मनीचा झालेला पराभव. म्हणतात की जर्मनीचा पराभव झालाच नसता. परंतु तो तेथीलच अधिवाशी असणाऱ्या ज्यू लोकांमुळं झाला. ज्यात ज्यु लोकांना जबाबदार धरलं गेलं. त्याचं कारण आहे, त्यांनी जर्मनीमध्ये राहून शत्रूराष्ट्राला मदत करणं. म्हणतात की ज्यू लोकांनी विविध देशातील सैन्यात सेवा दिली. काही ज्यू नेत्यांनी युद्धाला समर्थन देणारी वक्तव्य केली. त्यातच जर्मनी व ऑस्ट्रिया हंगेरीत ज्यू लोकांना देशद्रोही समजलं गेलं. तसंच त्यांनी शत्रूचे हेर समजण्यात आलं. 
          ज्यू समुदायाने शत्रू राष्ट्रांना मदत केली. त्यांच्यासाठी शत्रूराष्ट्रांनी स्वतंत्र राष्ट्रीय गृह स्थापन केले. जसे सन १९१७ मध्ये ब्रिटिशांनी बाल्फोरची घोषणा केली. ज्यातून ज्यूसाठी पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र राष्ट्रीय गृह स्थापन झाले. सन १९१९ मध्ये पॅरीसने ज्यू लोकांच्या पॅलेस्टाईन मधील राष्ट्रीय गृहाला समर्थन दिले. त्यानंतर त्यांच्या अधिकारांनाही समर्थन दिले. त्यातच अनेक युरोप खंडातील ज्यूनी शत्रूराष्ट्रांना मदत केल्यानं त्या सर्वांना पॅलेस्टाईनध्ये अधिवासासाठी स्थान देण्यात आलं. काही दिवस जाताच ज्यू लोकं हे पॅलेस्टाईनमध्ये स्थायीक झाले व त्यांनी आपल्यासाठी स्वतंत्र भुमी मागीतली. त्यातच इस्रायल हे राष्ट्र बनलं. 
          पॅलेस्टाईनचा तो भाग. ज्या भागात जेरुसलेम होतं. तशी ही एक बंजर भुमी. ज्यात पाण्याचा अंश नव्हता. ज्यूंनी तिथं शरण घेताच त्यांनी त्या जागेत नंदनवन फुलवलं. मग काही काळानंतर त्यांनी स्वतंत्र भुमी मागीतली व ते इस्रायल नावानं स्वतंत्र झालं. त्यातच भुमी कमी पडत असल्यानं त्यांनी हळूहळू लगतच्या प्रदेशातील सीमा हिसकावून घेणं सुरु केलं. मग वाद निर्माण झाला. आता इराणला वाटायला लागलं की ही आमची अधिस्थापीत असलेली भुमी. ज्यात आम्ही दया घेवून त्यांना राहायला जागा दिली. पुढं तेच सक्षम झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र भुमी मागितली. आम्ही तिही दिली. असे असतांना ज्यू ने महत्वाकांक्षा सोडून शांत बसावं. परंतु ते बसत नसल्यानं वाद. तो अंतर्गत वाद इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील. ज्यात अमेरिका आणि इराणनं उडी घेतली. तसा वाद शांततेतच सुरु होता. अशातच इराणच्या काही लष्करी तळावर हमला झाला व ते तळ नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. चौकशी केली असता त्यात इस्रायलचाच हात असल्याचा खुलासा झाला. मग काय, त्याला प्रत्युत्तर म्हणून युद्ध. ज्या युद्धात अमेरिका उतरली व त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या केली. वाटलं की त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या करताच इराणमधील लोकं नवीन राष्ट्राध्यक्ष बसवतील व तो राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला दबेल वा मदतीचं आव्हान करेल. मग काय, इराणमध्येही आपला दबाव निर्माण होईल. परंतु घडलं उलट. जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धानंतर जो प्रकार घडला. तोच प्रकार इथंही घडला. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत आलेल्या हिटलरने लोकांमध्ये अशी महत्वाकांक्षा भरली की ते त्याला देवच मानू लागले. तोच जर्मनीला गतवैभव प्राप्त करुन देवू शकतो. असं मानण्यात येवू लागलं. त्यातच हे करण्याच्या नादात त्यानं जे ज्यू तेथून पॅलेस्टाईनला पळून जावू शकले नाही. त्या संपुर्ण ज्यूवर त्यांनाच पहिल्या महायुद्धातील पराभवाचे दोषी मानून महाभयंकर अत्याचार केला. ज्यातील अंदाजे सहा दशलक्ष ज्यूंची त्यानं हत्या केली.'
           पेपरला लिहिलेला लेख. तो लेख मुस्काननं समजून घेतला होता. तिला संपुर्ण गोष्टी समजल्या होत्या. त्याच गोष्टी तिनं लेखाच्या माध्यमातून मांडल्या होत्या. त्यातच ती जगाला सांगत होती नव्हे तर संदेश देत होती की महत्वाकांक्षा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हीच महत्वाकांक्षा दाखवून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेबाबत कंबर कसली. त्यातच न हारता व इराणच्या जनतेला न डगमगू देता संघर्ष सुरु आहे व इराणची जनताही त्यांच्या बाजूला आहे. आता पाहायचे आहे की इराण हा अमेरिकेसमोर झुकतो की अमेरिकेलाच शरणागती पत्करावी लागते ते. महत्वपुर्ण बाब ही विचारात घेण्यालायक आहे की सध्याच्या काळात कोणीच कमजोर नाही. मग तो देश गरीब वा श्रीमंत का असेना. साधी मुंगीही हत्तीला नेस्तनाबूत करु शकते. कारण हा काळच कलियुगाचा आहे. या काळात कोण केव्हा शिरजोर होईल ते काही सांगता येत नाही. तेव्हा अमेरिका जरी स्वतःला इराणपेक्षा श्रेष्ठ समजत असेल तरी त्यानं लक्षात घ्यावे की इराणही तेवढा कमजोर नाही. अमेरिकेची निर्मिती होवून जास्त काळ झाला नाही. परंतु इराण...... इराण आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यानं बरीच युद्ध पाहिलेली आहेत. जेवढी अमेरिकेनं नाही. त्याला प्रदिर्घ स्वरुपाचा अनुभव आहे. जेवढा अमेरिकेला नाही. पुर्वी याच इराणमधील लोकं अनेक देशांशी व्यापार करीत होते. 
         इराणचा असलेला समृद्ध इतिहास...... त्याचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. तो फक्त आता अमेरिकेला खेळवत आहे. ज्या दिवशी इराणला वाटेल की आता पाणी डोक्यावरुन जात आहे. तेव्हा इराण अशी खेळी खेळेल. ज्यातून अमेरिका ध्वस्त होवू शकेल. हे तेवढंच खरं. तेव्हा अमेरिकेनंही याच बाबींचा विचार करावा व युद्ध थांबवावं. तसा अमेरिकाही हुशारच देश आहे. तो समजदार देश आहे. त्यानं समजून घ्याव्यात या गोष्टी व युद्ध समाप्त करावं कायमचं. जेणेकरुन जगात शांती व अमन निर्माण होईल. जग शांततेनं वागेल. त्यातच कोणत्याच बाबींचा जगात तुटवडा निर्माण होणार नाही.'
          झाकली मूठ सव्वालाखाची? हाही मुस्कानचाच विचार. तसा इराण कमजोर नाही, ही वर्तमानपत्रातून भुमिका मांडल्यानंतर ती लोकांशी प्रत्यक्ष संवाद करु लागली. संवादात ती म्हणाली की आज अमेरिका जागतिक क्षेत्रात आघाडीवर आहे. तो आतून काय आहे. हे कोणालाही माहीत नाही. तसं पाहिल्यास काही लोकांना आपल्याकडील गरीबी दाखविण्याची आवड असते. जसा भारत. परंतु काही लोकांना आपल्याकडील श्रीमंती दाखविण्याची आवड असते. जसं अमेरिका. अमेरिकेतही प्रत्यक्षात परिस्थिती अशीच आहे. तिथंही गरीब, मजूर वर्ग आहेच. परंतु त्यांना इतर देशांना आपल्या विचारानं गुलाम करुन ठेवायचंय. म्हणूनच त्यांची श्रीमंतपणाची जाहिरात. जर इराण आणि अमेरिकेचं युद्ध काही दिवस चाललं तर ही श्रीमंतपणाची जाहिरातही बंद होईल व अमेरिका रस्त्यावर येईल. यात शंका नाही. तेव्हा अमेरिकेनं तुर्तास युद्ध थांबवून आपली मूठ झाकून ठेवून सव्वालाखाचीच आहे हे दाखवावं. ती मूठ उघडी करुन इतर देशांना आपणही तुमच्यासारखेच आहोत. हे दाखवू नये म्हणजे झालं.

************************९*********************

           ती रात्र महाभयंकर होती. शत्रुंचे सैन्य केव्हा आपल्यावर वार करेल. हे काही सांगता येत नव्हतं. केव्हा कोणतं विमान येईल व आपल्या राष्ट्राला बेचिराख करुन जाईल तेही काही सांगता येत नव्हतं. कारण भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रात्रीच पाकिस्तानातील दहशतवादी स्थानावर हमला केला होता.
          एखाद्या कादंबरीला शोभेल असंच दृश्य. कादंबरी ही काल्पनीक असते. काही कादंबऱ्या वास्तविकही असतात. तशीच ही वास्तविक परिस्थिती. इराण आणि अमेरिकेचं युद्ध. अमेरिका आपलं मिसाईल पाठवतं, इराणला नेस्तनाबूत करण्यासाठी. परंतु प्रत्यक्षात इराणही त्याच मिसाईलचा वेध घेवून आपले द्रोण पाठवते व करोडो रुपयाची लागत लागून तयार केलेलं मिसाईल एका क्षणात नष्ट होते. ही वास्तविकता. शिवाय अशाच वास्तविकतेत देश असतांना जे सौदे अमेरिकन डॉलरमध्ये आखाती देश करायचे. आता इराणला वाटत होतं की डॉलर संपावा आणि ते त्याच्या दृष्टीकोनातून संपणं गरजेचं होतं. असं वाटत असतांना तो आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कच्च्या तेलाचे सौदे युनानमध्ये करायला सांगत होता. युनान हे चीनचं चलन होतं. याचाच अर्थ चीनचं युनान मजबूत होणार आणि तेवढाच डॉलर कमजोर. असं वाटत होतं. हे असं का? तर त्याचं पहिलं कारण होतं. अमेरिकेचं शत्रुत्व आणि दुसरं महत्वपुर्ण कारण होतं. इराणला त्या देशाची झालेली मदत.
           इराण हा एक लहान देश. तसं सर्वांनाच सुखासमाधानानं जगण्याचा अधिकार होता. हो, पुर्वीच्या काळात इराण देशानं इतर देशावर हमले केले. पुर्वीपासूनच इराण मजबूतच होता. परंतु सध्या तेवढी ताकद त्याच्याकडे नाही असं अमेरिकेला वाटत होतं. तसं पाहिल्यास इराण कमजोर वाटत होता. त्याचं कारण होतं, त्याचं जाहिरात न करणं. जेवढी जाहिरात अमेरिकेनं केली होती, तो जागतिक महासत्ता असल्याची. तेवढी जाहिरात इराणनं केली नव्हती व कोणाला आपण बलशाली आहोत. हेही दाखवलं नव्हतं. तशी इराणची वास्तविक परिस्थिती वेगळी होती व दिखाव्याची परिस्थिती वेगळी होती. शिवाय इराणमध्ये महत्वपुर्ण भाग असलेलं कच्चे तेलच सापडत असल्यानं इराण किती मजबूत असू शकते. ही कल्पना वेगळीच होती. आज प्रत्यक्षात युद्धाचे वारे वाहात असतांना इराण जे प्रत्युत्तर देत होता. त्यावरुन इराणबाबत नक्कीच जाणवत होतं की इराण मजबूत आहे. परंतु त्यानं आधी तसं दाखवलं नव्हतं. तसंही पडताळून पाहिल्यास काही लोकांचे दाखवायचे दात वेगळे व आतील दात वेगळेच असतात. तेच आज इराणबाबतीत दिसत होतं. कारण इराणला माहीत होतं, कधी ना कधी अमेरिका त्याचेवर हमला करु शकते. म्हणूनच इराणनं अमेरिकेला न दाखवता आपलं तंत्रज्ञान विकसीत केलं होतं व आता तो जागतिक स्तरावर निर्माण झालेली अमेरिकेची सैन्यतळे नष्ट करीत सुटला होता. त्यातच अमेरिकेचे इतर देशांशी असलेले व्यापारी संबंधही समाप्त करु पाहात होता. डॉलरशी व्यवहार त्याला होवू द्यायचा नव्हता. त्याला कच्चे तेल मिळू द्यायचे नव्हते. आता या धुमश्चक्रीत इराणला काही देश मित्र बनवूनच मदत करीत होते. जसे इराणमध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारार्थ औषधी पाठवणं. त्यांना मिसाईल पाडण्यासाठी लागणारे द्रोण बनविण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध करुन देणं. प्रत्यक्षात मिसाईल देखील पुरवणं. ही जी मदत होती. ही मदत जे अमेरिकेचे शत्रू होते. तेच करीत होते इराणला. काही गुप्त रुपात तर काही उघडपणे. उघडपणे मदत करणारे देश म्हणजे जपान आणि रशिया होते. रशिया यासाठी मदत करीत होता की रशियाला तोडण्यासाठी अमेरिका सतत आघाडीवर असायचा व बरेचसे भाग अमेरिकेनं रशियाचे तोडले होते व विस्तारीत असलेल्या रशियाची शक्ती कमी केली होती. तो मदत करणारच होता. त्यानं इराणमधील जखमींना मदत करण्यासाठी औषधी पाठवली होती. तसाच दुसरा देश जपान. जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या ठिकाणी याच अमेरिकेनं अणूबाँब टाकले होते. ज्यात जपान अख्खा नेस्तनाबूत झाला होता. ती गोष्ट जपान अजुनपर्यंत विसरला नव्हता. तसेच इतरही देश होते की जे अमेरिकेची जागतिक महाशक्ती पाहून द्वेष करीत असत. त्यांनाही वाटत असायचं की अमेरिकेची शक्ती कमी व्हायलाच हवी. तेही इराणला मदत करीत होते. शिवाय इराणला मित्र राष्ट्रही मदत करीत होते. जे त्यांच्या धर्माचे होते. शिवाय हे धार्मिक युद्ध असल्यानं सर्व संबंधित धर्मवाले लोकं एकत्र येणारच. याही दृष्टीकोनातून इराण मजबूत झालेला होता व तो बलाढ्य असलेल्या अमेरिकेला पेलवत नव्हता. तसं पाहिल्यास अमेरिका जरी शक्तीशाली वाटत असला तरी त्याचं शक्तीशालीपण वरवर दिसत होतं. जो केवळ दिखावा होता. प्रत्यक्षात आतून अमेरिका खचलेला होता व प्रत्यक्षात दिखाव्यानुसार व प्रतिष्ठेनुसार त्याचं खचलेपण इतरांना दिसत नव्हतं. परंतु इराणला तसं दिसत होतं. 
          मुस्कान लोकांना तेच सांगायची की आज अमेरिका खचलाय. परंतु प्राण जाये, पण वचन न जाये यानुसार सांगायचं झाल्यास आता अमेरिकेनं तुर्तास माघार घ्यावी. युद्ध थांबविण्याचा विचार करावा. जेणेकरुन अमेरिकेची झाकली मूठ सव्वालाखाची राहील व अमेरिकेचीही जागतिक महाशक्तीची प्रतिमा शाबूत राहील. जर अमेरिकेनं युद्ध थांबवलं नाही व तो लढतच राहिला तर तो दिवस दूर नाही की इराण हा छोटासा देश असूनही जागतिक महासत्ता म्हणून त्याचाच उदय होईल किंवा तो इतर त्याच्या मित्र देशाला जागतिक महासत्तेचा दर्जा मिळवून देईल. त्यातच अमेरिकेचा जागतिक नकाशावरील महासत्तेचं स्थान मिटून जाईल. तेव्हा अमेरिकेनं याचा विचार करावा. अन् हेही लक्षात घ्यावं की अव्वल बनविण्याच्या नादात अमेरिकेचीही हार होवू शकते. एक लहानसा देश त्याला नेस्तनाबूत करु शकतो. 
            मुस्कानचा तो संवाद. कदाचित आपल्या लहानशा वक्तव्यानं युद्ध थांबू शकते असं तिला वाटत होतं. त्याचं कारण होत, तिचं प्रभावशाली व्यक्तिमत्व. 
          आज युद्धबंदी झाली होती. त्यानंतर इराणनं त्यांच्या ताब्यात असलेलं होर्मूझ बंदर जहाज वाहतूकीसाठी खुलं केलं. आता सर्व राष्ट्राची जहाजं होर्मूझ बंदरातून जायला लागली. परंतु घात झाला. युद्धबंदी जरी झाली असली तरी इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षानं सायंकाळी सीजफायरचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळं पुन्हा इराण चिडला व पुन्हा त्यानं होर्मूझ बंदराचा रस्ता अडवला. आता होर्मूझ बंदर वाहतूकीच्या दृष्टीकोनातून बंद असल्यानं काही दिवस लोकांना घरगुती वापरातील गॅससाठी त्रास होवू लागला होता. 

***********************१०*******************
          
          आज गुलजार इराणमध्येच होता. आज गुलजारला पश्चाताप होत होता. वाटत होतं आपण मुस्कानशी विश्वासघात केला. असा विश्वासघात की ज्या विश्वासघाताचं प्रायश्चित्त नाही. तसा आज त्याला त्याच्याच कर्तृत्वावर पश्चाताप होवू लागला होता. शेवटी त्यानं ठरवलं. आता आपण भारतात जायचं. मुस्कानला भेटायचं. तिच्यासोबतच शेवटपर्यंत राहायचं.
          गुलजारचा तो निर्णय. तो लागलीच भारतात आला. त्यानं मुस्कानला शोधलं. त्यानंतर लागलीच तो तिच्याघरी आला. परंतु त्याचाही घात झाला. कारण मुस्काननं त्याची बरेच वर्ष वाट पाहिली होती आणि तो तिला न गवसल्यानं तिनं बौद्ध धम्म स्विकारला होता व ती आता संन्याशी अर्थात भिख्खू बनली होती.
         मुस्कान भिख्खू बनली होती. ती धम्माचा प्रचार करीत होती. त्यातच ती युद्ध नको, बुद्ध हवा. हेच तत्व प्रतिपादन करीत होती. आता तिला संसारात रस नव्हता. ना ही जीवनात रस होता. फक्त धम्म आणि शांतता याचाच ती पुरस्कार करीत होती. तसं तिनं गुलजारला ओळखलं होतं. परंतु ती विश्वासघाती नव्हतीच. त्यामुळंच तिनं त्याला आपल्याच घरी ठेवलं. शरीर लोभ याचनेच्या दूर उभी राहून.
          मुस्काननं आज जरी बौद्ध धम्म स्विकारला असला तरी तिनं गुलजारला स्विकारलं होतं. ज्यात मुस्कान आता त्यालाही बौद्ध धम्म स्विकारायला सांगत होती. परंतु गुलजारला बौद्ध धम्म मंजूर नव्हता. त्याला भारतात तसं बुद्धतत्वाखाली वागत असतांना जीव घुटमळल्यासारखा वाटत असे. शेवटी त्यानं ठरवलं. परत आपल्याच देशात परत जायचं आणि तसा विचार करुन तो परत आपल्याच देशात परत गेला. 
         गुलजार आपल्या मायदेशी परत आला होता. परंतु त्याला इथंही करमेनासं वाटत होतं. वाटत होतं की जगूच नये. भारतात आलं तर मुस्कानचा बौद्ध धम्म खटकत होता. दुसरा विवाह करायचा तर गुल्फामनं केलेली दगाबाजी आठवत होती. विवाह केल्यानंतर येणारी पत्नी कशी निघेल? हे काही त्याला माहीत नव्हतं. शेवटी आपलं जीवनच संपवून टाकायचा विचार कधीकधी तो करायचा. परंतु तेही करता येत नव्हतं. शेवटी त्यानं ठरवलं. ठरवलं की आपण इराणच्या जनतेतील लोकांमध्ये अहिंसक प्रेम निर्माण करायचं. ज्या प्रेमानं इराणचा पुर्ण मनसुबा बदलेल व इराण देश युद्धाची भाषा बदलवून शांतीचा मार्ग पत्करेल.
        गुलजारचा तो विचार. लागलीच तो भारतात आला. त्यानं मुस्कानची भेट घेतली व त्यानं बौद्ध धम्म स्विकारला. त्यानंतर परत तो आपल्या देशात तिला घेवून गेला व तिथे तो बौद्ध तत्वज्ञानाचे धडे लोकांना देवू लागला होता. सोबतीला ती होतीच. परंतु लोकं त्याचं तत्त्वज्ञान ऐकतील तेव्हा ना. ते आजही बदल्याच्याच भावनेने वागू लागले होते.   
           बरेच दिवस झाले होते. आता गुलजार व मुस्कान म्हातारे झाले होते. ते आजही एकत्रच राहात होते. जरी पुर्वकाळाचे पतीपत्नी असले तरी आज ते संन्यासी म्हणून एकत्रच राहात होते. त्यातच त्याच्यासोबत बरीच शिष्यमंडळीही राहात होती. त्यातच ते सर्वजण जागतिक शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असत.
          युद्ध बंद झालं होतं. त्या गोष्टीला आज बरीच वर्ष झाली होती. आता दोन्ही देशात शांतता होती व दोन्ही देशातील लोकं व्यापार करण्यासाठी एकमेकांच्या देशात येवू लागले होते. त्यातच एकमेकांच्या देशात सर्वच प्रकारच्या व्यवहारीक गोष्टी करण्यासाठी जावू लागले होते. आता ना चौकशी केली जात असे, एकमेकांच्या देशात जात असतांना. कारण त्या दोन्ही देशांचे एकमेकांशी पुर्वीसारखेच मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले होते.
            गुलजार हा रोजच नित्यनेमानं युद्धाच्या गोष्टी करीत नसे. कारण आता जगात शांतता होती. त्यासोबतच इस्रायल व इराणमध्येही शांतता होती. ज्यातून इराणचा विकास होत चालला होता. मात्र आजही इराणमध्ये शांतता असली तरी त्यांना गतकाळातील अमेरिका व इस्रायलनं दिलेले चटके आठवत होते. त्या वेदनामयी आठवणी आठवत होत्या. ज्या वेदना अमेरिका व इस्रायल देशांनी दोन्ही मिळून गतकाळातील युद्धात दिल्या होत्या. असं असलं तरी इराण कमजोर ठरला नाही. हा स्वाभिमान आजही इराणी जनतेत होता. 
          गुलजार म्हातारा झाला होता. त्यानं बुद्ध धम्मही स्विकारला होता. परंतु तो युद्ध विसरला नव्हता. तो रोजच नित्यनेमानं युद्धभुमीवर जात असे. तिथं तो नतमस्तक होत असे. त्याचबरोबर आठवत असे, त्याला त्या गतकाळातील युद्धाच्या आठवणी. ज्या आठवणी आज युद्ध समाप्त झालं असलं तरी अजुनही त्याच्या काळजात जीवंत होत्या. परंतु बदल्याची भावना नव्हती. ती बदल्याची भावना त्याच्या मनातून केव्हाच मावळून गेली होती. 
          गुल्फाम ही आता इस्रायलमध्येच होती. ती हेरच होती इस्रायलची. तिच्याचमुळं इस्रायल, अमेरिका व इराणला युद्धाला सामोरे जावं लागलं होतं. याची कल्पना संपुर्ण इस्रायलाही होती. परंतु जेव्हा युद्ध थांबलं व इस्रायलला त्या युद्धातून काहीही लाभ झाला नाही. तेव्हा मात्र इस्रायलनंही तिला विचारणं बंद केलं होतं. त्यातच आता तिच्या दुर्गतीलाही पारावार उरला नव्हता. ती सतत आजारीच असायची व तिला त्याच अवस्थेत आठवायचा तिचा पती. ज्या पतीसोबत ती बरीच वर्ष इराणमध्ये राहिली होती. तिनं त्याचेसोबत राहात असतांना संसार केला होता. त्यातच दोन मुलं जन्मासही घातली होती. परंतु आता इस्रायलमध्ये असतांना तिनं तिची मुलं परत न आणल्यानं ती आयुष्याच्या शेवटच्या पाडावरही एकटीच होती. तिला आता तिच्या पतीची आठवण येत होती. त्याच आठवणीनं तिचा जीवही कासावीस होवू लागला होता. 
         आज छान वादळी वारा सुटला होता. गुल्फाम घराच्या अंगणात बसली होती. तो वारा तिच्या मनाला स्पर्शून गेला होता. तोच झाडाचं एक पान तुटलं व ते अलगद उडून तिच्या गालावर चिकटलं. तो तिचे केसं उडायला लागले आणि आठवला तो समुद्र. ज्या सागराच्या किनार्‍यावर गुल्फामला तिचा प्रियकर गुलजार भेटला होता. त्यातच तिला आठवले ते महाविद्यालयातील त्याच्यासोबत फिरणे. आयुष्यभर संतापाच्या लाटेत जळत असलेली गुल्फाम. तोच आठवला तिला इस्रायलचा रक्तरंजित इतिहास. अन् त्यासाठीच केलेलं तिनं कार्य. जे कार्य उचीत नव्हतंच. तरीही तिनं केलं होतं. ज्या कार्यानं दोन नाही तर तीन देशांची हानी झाली होती. ती जेव्हा जेव्हा इस्रायलचा रक्तरंजित इतिहास वाचन करीत असे. ज्यातून तिच्या मनात बदल्याची भावना निर्माण होत होती व त्याच बदल्याच्या भावनेतून हे युद्ध घडलं होतं. परंतु आज ना तिच्या मनात बदल्याची भावना होती, ना तिला आता युद्ध हवंहवंसं वाटत होतं. आज याच आयुष्याच्या म्हातारपणात तिला गुलजार महत्वपुर्ण वाटत होता व त्याला अखेरच्या क्षणी भेटावंसं वाटत होतं. परंतु भेटणार कसं? तसं एकदा तिनं ऐकलं. ऐकलं की तिच्याच इस्रायल देशात प्रवचन देण्यासाठी एक व्यक्ती येणार आहे. त्याचं नाव गुलजार आहे. कदाचित तोच गुलजार असावा असं तिला वाटू लागलं होतं नव्हे तर तोच गुलजार निघायला हवा असंही वाटू लागलं होतं. अर्थातच तो योगायोगच होता.
         तसा तो एक दिवस उजळला. प्रवचनाचाच तो दिवस. नित्यनेमान भिंतीला लागलेली जाहिरात पाहून ती कार्यक्रमाला गेली. कार्यक्रम स्थळी तिनं गुलजारला पाहिलं. तसं तिनं प्रत्यक्षदर्शी पाहताच ओळखलं. तसा ती विचार करु लागली, त्याला प्रत्यक्ष भेटायचा. मग प्रवचन सुरु झाले व प्रवचनादरम्यान तिला त्याला भेटताच आले नाही.
          प्रवचन संपलं होतं. तोच ती लगबगीनं त्याला भेटायला गेली. जेव्हा गुलजार तिला भेटला. तोच तिनं त्याला विचारलं,
           "आपण गुलजारच आहात ना. जे लंडनमध्ये शिकले."
           "होय."
           "आपल्या पत्नीचे नाव गुल्फाम होतं काय?"
           "होय."
           "आपण एक सैनिक होता काय?"
           "होय, परंतु आपण, आपण मला कसे काय ओळखता?"
            "मी गुल्फाम. आपलीच पत्नी. तशी मी आपल्या माफीच्या लायक नाही. तरीही हवं तर मला माफ करा."
             तिनं त्याचे पाय धरले. तोच त्यानं तिला दूर सारलं व म्हणाला,
           "अहो, माफी माझी कशाला मागता? माफी या जनतेची मागा. ज्या जनतेनं तुमच्यावर विश्वास केलाय. ज्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलाय. ज्या तुमच्या कृतीमुळं तुमचं चुकलं व तुमच्या कृतीनं सर्वांना भोगमान भोगावं लागलं. माहीत आहे, तुमच्या एका कृतीनं किती लोकं मरण पावलेत. शिवाय वित्तहानी जी झाली, ती वेगळीच. आज तुमच्यामुळे केवळ माणसंच नाही तर पशूपक्षीही कितीतरी मरण पावलेत. तशीच कितीतरी हेक्टर जागा पडीक झाली. त्या ठिकाणी आजही काहीच उगवत नाही. एवढंच नाही तर तुमच्याच कृतीनं आम्ही दोनच देश नाही तर कितीतरी देश बाधीत झालेत. त्या देशातील साधा स्वयंपाकाचा गॅस महाग झाला होता. शिवाय जी महागाई वाढली होती. ती वेगळीच. ज्या महागाईनं लोकांनी आपल्या चांगल्या सरकारवरही ताशेरे ओढले होते."
            गुलजारचं ते म्हणणं. त्या बोलण्यानं तिच्या मनात पश्चातापाची लहर उठली होती. ती ओक्साबोक्सी रडत होती. त्याचबरोबर तिच्या डोळ्यातून तिच्या अश्रुधारांनी तिचे दुःख दूर होत होते. 
            तिचं ते रडणं. ते पाहून शेजारीच उभी असलेली व गतकाळातील त्याचीच पत्नी असलेली मुस्कान हळूच म्हणाली,
          "काय झालं गुलजार? ही का रडत आहे?"
          तिचा तो प्रश्न ऐकताच गुलजार तिला एकांतात सांगेन असे म्हणाला. शेवटी तिचं ते रडणं एक रहस्यच बनलं होतं. 
           गुल्फाम रडत होती. रडता रडता ती म्हणाली,
           "गुलजार, आपण मला घेवून चला. मला आता माझीच भुमी खायला धावत आहे. जवळचे होते नव्हते सर्व गेलेत. आता मला करमत नाही."
            तिचं ते बोलणं. तसा गुलजारनं नकारच दिला होता तिला. ते पाहून त्याला सल्ला देत मुस्कान म्हणाली,
            "गुलजार, ती येतो म्हणत आहे तर का येवू देत नाही तिला. अरे, एका भिख्खू व्यक्तीनं असा क्रोध करुन कसं चालेल? अरे, आपलं बुद्ध तत्व त्या गोष्टीची परवानगी देत नाही. आपलं बौद्ध तत्वज्ञान काम, क्रोध, लोभ, मोह, माया, राग, अहंकार या सर्व गोष्टींना थारा देत नाही. चल तिला घेवून."
            "मुस्कान, तिच्यासोबत भयंकर असं पाप आहे. जरा एकांतात चल. तुला सांगतोय. मी सांगतोय तिचे सर्व पाप."
            गुलजारनं मुस्कानला एकांतात नेलं. त्यानंतर तिला सर्व गोष्टी सांगण्यात आल्या. ती कशी अमेरिका व इराण युद्धाला कारणीभूत आहे. तेही सांगीतलं. अशातच मुस्कानला तिचं सर्व पाप समजलं. त्यावर ती म्हणाली,
           "गुलजार, तुझं ते सर्व बरोबर आहे. परंतु आपलं बुद्ध तत्वज्ञान सर्वांना माफ करणारं तत्वज्ञान आहे. अरे, तुला माहीत आहेच ना आम्रपालीचे पाप. जी एक वेश्या असूनही व तिच्यात कितीतरी मोठा अहंकार भरलेला असूनही तिच्या इच्छेसमोर तिला तथागतांनी दिक्षा दिली व देवी आम्रपाली बनवलं. त्यानंतर अंगुलीमालही एक दरोडेखोरच होता. ज्यांच्यावर कितीतरी मोठं पाप होतं. परंतु आपल्या बुद्ध तत्वज्ञानानं त्यालाही माफ केलं व अहिंसक बनवलं. गुलजार, असे बरेच वीर महापुरुष या बौद्ध धम्मात आहेत की ज्यांचं पाप बरंच मोठं आहे. परंतु त्यांचा स्विकार तथागतांनी केला. त्यादृष्टीनं या स्रीचं पाप काहीच नाही. अन् हं, तू ज्याला विश्वासघात म्हणतोस, तो विश्वासघात नाही. ते तिच्याकडून घडलेलं याच जन्मातील वाईट कर्म आहे. ज्या कर्माची शिक्षा तिनं याच जन्मात भोगली. कारण पुनर्जन्म नाही व पुनर्जन्म आपला बौद्ध धम्म सांगतही नाही."
           मुस्काननं गुलजारला बौद्ध तत्वज्ञान व पाप यातील सर्व फरक एकांतात सांगीतल्यानंतर तो काय समजायचं ते समजला. तद्नंतर तो बाहेर आला व त्यानं गुल्फामला म्हटलं,
            "गुल्फाम, मी एकाच गोष्टीवर तुला माफ करायला तयार आहे. जर तू बुद्धतत्वाचा स्विकार करशील तर?"
            तिनं ते ऐकलं. तशी ती म्हणाली,
           "अर्थात?"
           "अंग, बुद्ध तत्व म्हणजेच शांतीचं तत्वज्ञान. आजपर्यंत ज्या गोष्टी अनावधानाने तुझ्या हातून घडल्यात. त्या गोष्टी पुन्हा घडू नये म्हणून तू जगाने युद्ध करु नये म्हणून शांतीच्या संदेशाचा प्रसार कर. बस, हेच सांगतोय आमचं बुद्ध तत्वज्ञान. समजलं."
             गुलजारचं ऐकताच गुल्फाम जे समजायचं ते समजली. त्यानंतर तिनं बुद्ध धम्माची दिक्षा घेतली व आता ती बुद्धतत्वाचा गावोगावी व देशोदेशी जावून प्रसार करु लागली होती. आता तिला बुद्ध तत्वज्ञान चांगलं समजलं होतं. त्याच प्रसारानं ती तिनं केलेलं पाप धुवून काढत होती.

 *******************११*********************

            गुल्फाम एक भिख्खू बनली होती व ती शांततेचा प्रसार करीत होती. तिला आता बरं वाटत होतं. परंतु तरीही ती निराश होती. त्याचं कारण होतं, तिच्यामुळं घडलेला विनाश. ज्यातून जुल्फामला आठवत होतं तिच बालपण. ते बालपण अतिशय रमणीय होतं. 
            ते बालपण व त्या बालपणात स्वाभिमान जोपासणारी त्यांची जात. त्यातच त्यांचा तो धर्म. त्याच बालपणात तो धर्म तिला स्वतःचा स्वाभिमान शिकवीत होता. धर्माचे बाळकडू हे घरातच मिळत होते. घरातूनच शिकविलं जात होतं की आपल्या लोकांना नाझी पक्षानं भरपूर त्रास दिला. आपल्याला हाकललं. म्हणूनच आपण इथं आलो. आपला मसीहा येशू हा आपल्यासाठी अतिशय प्रिय असून तो कैदेत आहे. आपल्याला त्याला सोडवायचंय. त्यासाठी आपल्यात लहानपणापासूनच ताकद निर्माण करायचीय. आपण या ठिकाणी संख्येने लहान आहोत. आपण इतर लगतच्या देशाचा मुकाबला करु शकत नाही. परंतु आपण संख्येने जरी लहान असलो तरी ताकदीने अति पुढे आहोत. हिंमतही फारच आहे आपल्यात. परंतु ही हिंमत खचू शकते. जर आपण स्वतः कमजोर पडलो तर..... आपण स्वतः कमजोर पडूच नये. त्यासाठी आपल्याला लहानपणापासूनच सैनिकी प्रशिक्षण घ्यायला हवं. शिवाय एक गोष्ट महत्वपुर्ण. आपण संधी मिळाल्यास आपल्या लगतच्या देशावर आक्रमणही करायला हवं. कारण ते काफीर आहेत. 
            आपण या ठिकाणी आलो. अधिवाशीत झालो. आपला देशही बनला. परंतु आपण संख्येनं लहान आहोत इतर देशांपेक्षा. त्याचबरोबर आपला भुभाग ही कमी आहे. आपल्याला भुभागाची कमी आहे. शिवाय आपल्याला पवित्र असणारा आपला मसिहा पॅलेस्टाईनच्या ताब्यात आहे. ज्या पॅलेस्टाईनमधील अरब हे प्रभू येशूला मानत नाहीत. तर ते मानतात अल्लाला. आपल्याला जेरुसलेम हवं आणि जेरुसलेमला मिळविण्यासाठी आड येणाऱ्या अरबांना आपल्याला हळूहळू करीत एकेक समाप्त करायचे आहे.
          ते बालपण व त्या बालपणात घरातूनच शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी गुल्फाम लक्षात घेवू लागली. मग तिच्यात त्वेषाचीही भावना लहानपणापासूनच तयार होवू लागली होती. तेच घडलं गुलजारच्याही बाबतीत. त्याचेही वडील घरात आपला शत्रू इस्रायल आहे, असेच सांगत होते. 
           मध्यंतरीचा काळ दोघांचाही व्यवस्थित गेला. याच दरम्यान गुलजार भारतात आला. त्यानं भारतातच सैनिकी शिक्षण घेतलं आणि मुस्कानशी विवाह केला. परंतु तोही काही तेवढा समाधानी नव्हताच. घरातूनच मिळणारं बाळकडू. त्याच बाळकडूनं कोण काफिर व कोण आपला. ह्या गोष्टी लहानपणापासूनच शिकविल्या जात होत्या त्याला. मग काय, इतर धर्मीय मंडळी गुलजारशी कितीही चांगली वागत असली तरी त्यांचा त्याला महाभयंकर रागच येत असे. ज्यातून त्याच्याही मनात त्वेषाची भावना वाढू लागली होती.
            पारीवारीक सुख महत्वपुर्ण. गुलजारला तसंच वाटत होतं अगदी. तसं त्याला गुल्फामच्या वागण्यानं पारीवारीक सुख मिळालंच नव्हतं. त्याही गोष्टीचा त्याला रागच येत होता. तसा तो त्याच पारीवारीक गोष्टीवर विचार करु लागला.
         'पारीवारीक सुख ही महत्वाची गोष्ट आहे. ते पारीवारीक सुख ज्याला मिळत नाही. त्या माणसाला जगूनही मेल्यासारखंच वाटतं. कारण सगळ्यांना सगळ्यांची गरज असते. कोणाला जास्त प्रमाणात गरज असते तर कोणाला कमी प्रमाणात गरज असते. तसाच परिवार अतिशय महत्त्वपूर्ण असतो आपल्या जीवनात. म्हणतात की परिवार जर असेल तर आपल्यावर येणारं संकट, तेवढं तीव्र वाटत नाही.
         वाद...... वाद घरादारात असतात. तसेच ते परीवारातही असतातच. यातूनच आता विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. ज्यानुसार मी, माझी पत्नी व माझी मुलं. एवढंच विश्व निर्माण झालं होतं. मग घरात असलेल्या सासू, सासऱ्यांसारख्या पवित्र नात्यांना दूर ढकलण्यात आलं. जे मी गुल्फाममुळंच केलं. मी वेगळा राहिलो. कारण गुल्फामला माझी आई पटत नव्हती. ती तिचा राग करायची. परंतु आता कळलं की ती तिचा का राग करायची ते. होवू शकते, गुल्फामला जे करायचं होतं. ते आई जवळ असतांना कदाचित करताही आलं नसतं. म्हणूनच तिनं सर्वात प्रथम माझी आई तोडली. 
          माझा विवाह हा प्रेमविवाहच होता. त्या विवाहातही मोठ्या माणसांना पाहिजे त्या प्रमाणात महत्व दिलं जावू लागलं नाही. कारण मी ब्रिटनमध्येच असतांना विवाह केला. तिथंच आपलं करीअर घडवलं आणि जेव्हा इथं आलो. तेव्हा इथं संसार केला. इथंच माझं चुकलं. ज्याची झळ मलाच पोहोचली. एका मुलीला भावी जीवनाची स्वप्न दाखविणारा तिचा प्रियकर. त्या प्रियकरानं तिला मोठी मोठी आश्वासने देवून भुलथापा देत तिला पळवून नेलं. त्यानंतर एके दिवशी तिला, तिचा उपभोग घेवून बोर होताच तिला घरातून हाकलून दिलं. यादरम्यान ती त्याचेवर विश्वास ठेवणारी मुलगी, ती आपल्याच परीवारातून तुटल्यानं तिनं आत्महत्या केली. अशी बरीच प्रकरणं आहेत. परंतु मी असं केलं नाही. मी नक्कीच तिला तिच्या आईवडिलांकडून तोडून आणलं होतं. परंतु तिच्या शरीराचा उपभोग घेवून तिला हाकलून दिलं नाही. उलट तिनंच तिचं काम होताच पळ काढला. मला व माझ्या लेकरांना एकाकी सोडून.' 
         गुलजारचा तो विचार. गुलजार परत विचार करु लागला.
           'एक परीवार असाही दिसला की ज्यानं पळून जावून विवाह केला आणि असं अक्षरशः घडतंच. तरुणपणा जेव्हा येतो. तेव्हा शारीरिक आकर्षणानं मुलाला मुलगी व मुलीला मुलगा आवडायला लागते. मुला मुलींच्या या शारीरिक आकर्षणानं सख्खे जीवाला जीव लावणारे भाऊबहिण आणि सख्खे नात्यातले आईवडील की जे लहानाचं मोठं करतात. उन्हातून सावलीत नेतात. आपल्या इच्छा पुर्ण करतात. तेच परके वाटायला लागतात. तेच घडलं त्या दोघांच्याही बाबतीत. मग काय, पळून जावून लग्न करताच सारेच तुटतात. अर्थात मुलाचे आईवडील व नातेवाईक आणि मुलींचेही नातेवाईक व आईवडील. असंच घडलं त्या एका मुलीबाबतीत. मुलगा व मुलगी एकमेकांवर निरतिशय प्रेम करणारे. पारीवारीक वाद निर्माण झाल्यानं ते काही आपल्या आईवडिलांच्या घरी जावू शकत नव्हते. अशातच एक मोठा दुर्धर आजार मुलीला झाला. जिचा उपचार तो मुलगा रुग्णालयात करु लागला. अशातच काम निकालू मित्र दोन दिवस आले. तिसऱ्या दिवशी तेही निघून गेले. आता मुलीला व मुलाला पश्चाताप होवू लागला की आपण प्रेमासाठी पळून जावून विवाह करायला नको होता. परंतु प्रेमासाठी वाट्टेल ते. काही दिवसानं ती बरी झाली. परंतु पश्चाताप तर होतच राहिला ना त्यांना आयुष्यभर. कारण परीवारानं अगदी शेवटपर्यंत त्यांना मिळवलं नव्हतं.
         माझंही तसंच झालं. मला तिच्या आईवडिलानं काही मदत केली नाही. ते बोलतही नव्हते माझ्यासोबत. अन् मी जातही नव्हतो त्यांच्या घरी. कारण त्यांना माझा धर्म प्रिय नव्हता. ते मलाच काफिर समजायचे. वाटायचं त्यांना की गुल्फामनं या गुलजारशी विवाह केला. ती काफिर ठरली त्यांच्यासाठी. तसेच दाखवत होते ते. परंतु ते दुहेरी चाल खेळत होते. ते गुल्फाम पळून जाताच कळलं. ती व तिचे आईवडील हे कट्टर इस्रायली. ती आईवडीलांच्या संपर्कातच असेल. जिनं सांगीतलं असेल की ती तिच्याच शत्रूच्या राष्ट्रात निवास करते. मग त्यांनी व्यवस्थित चाल चालली. ज्या चालीतून आमच्या देशावर युद्ध थोपलं गेलं. 
         प्रेम.... प्रेम अजरामर नेहमीच असतं आणि ठरतं. तरुणपणात निर्माण होणारं प्रेम हे अगदी हवंहवंसं वाटतं. जे परीवाराला मंजूर नसतं. परीवारवाले आपल्या लेकरांकडून विवाहाच्या आशा अपेक्षीत ठेवतात. विचार करतात की अमूक अमूक आपल्या मुलानं आपल्याच नातेवाईकात नव्हे तर जातीत विवाह करावा. अशा मुलामुलींनी जातीत विवाह केल्यास त्यांना आईवडील मिळवून नेतात शेवटपर्यंत. समाजात इज्जत वैगेरे वाढून राहते. इज्जत शाश्वत राहते. तीच गोष्ट घडते जर आपण परीवाराचं न ऐकून आपल्याच मर्जीनं विवाह केला तर...... परीवारवाले आपल्याला तोडतात. खुद्द आईवडील, जे आपल्याला उन्हातून सावलीत नेतात. तेही तोडतात. नातेवाईकही तोडतात. अगदी शेवटपर्यंत आपल्याला मिळवीत नाहीत. खस्ता खात खात जिंदगी कापावीच लागते मजबुरीनं. अन् जोडीदारांपैकी जर एकानं तोडल्यावर मरणासारखी दुसरी गोष्ट नसते आयुष्यात. हेच वास्तव सत्य आहे. प्रेम करुन पळून जाणाऱ्या परीवाराची आयुष्यभर समाजात पाहिजे त्या प्रमाणात इज्जत दिसत नाही. राहिली मित्रांची संगत. तर मित्र हे संधी साधूच असतात. त्यांना खायला मिळालं की तो चांगला आणि नाही मिळालं की तो वाईट. अशी मित्रांची स्थिती असते. आयुष्यभर सुख जर हवं असेल तर मित्र नाही, परीवारच कामात येतो. म्हणूनच आपले पुर्वज प्रेमांना नाकारत होते आणि आजही नाकारतात व जातीत विवाह करायला मजबूर करतात. असं असलं तरी आज आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढले आहे. कारण समाजातील हुंडा प्रकरणे आणि समाजातील मुलामुलींच्या अपेक्षा. परंतु हे प्रमाण कमी आहे. लोकं पारीवारीक सुख जीवनात आयुष्यभर मिळावं म्हणून जातीतच विवाह करण्याची पद्धती अंगीकारत आहेत. जरी समाजात लेनदेण पद्धती असेल तरी आणि मुलांमुलींच्या अपेक्षा ह्या जास्त असल्या तरी. 
         मीही प्रेम केलंच होतं तिच्यावर. निरतिशय प्रेम. मुस्कानला भारतात सोडल्यावर मी गुल्फामच्या संपर्कात आलो. तेव्हा मित्र म्हणायचे की हे बरोबर नाही. ही मुलगी एक ना एक दिवस तुला धोका देवून निघून जाईल. परंतु मी ना मित्रांचं ऐकत होतो. ना त्यांचं ऐकून त्यावर अंमल करीत होतो. मी आधीपासूनच मित्रांना संधीसाधूच म्हणायचो आणि मी सहज तिच्यावर विश्वास केला. कारण ज्यावेळेस ती माझ्यावर प्रेम करीत होती. त्यावेळेस ती कधी कधी माझ्याशी भेटायला येतांना नकाब वापरत होती. ते नकाब वापरणं म्हणजे मला अगदी हायसं वाटत होतं. वाटत होतं की हिनं आपली संस्कृती आपल्या निकाहाच्याच पुर्वी आत्मसात केलेली आहे. 
          हाच तिनं प्रभाव टाकला माझ्यावर. ज्यातून मी तिच्या प्रेमात फसलो. निव्वळ प्रेमातच नाही तर चक्रव्यूहात फसलो होतो. ज्यातून मी तिला ओळखू शकलो नाही व फसलो. ती डाव खेळून गेली होती व आता ती परत आलेली आहे, तेच सर्व विसरुन. काल तिनं माझ्याशी लाडी गोडी लावून संसार केला. जो संसार तिनं एका क्षणात उध्वस्थ केला होता. 
         मित्र..... मित्र हे काही कामात येत नाहीत असं प्रत्येकांचं वैयक्तिक मत. ते संधीसाधू असतात. म्हणूनच मित्रमंडळ हे क्षणीक असतं व ते सतत बदलत असतं. एक असाच व्यक्ती त्या मित्राचा मित्र की ज्याला परीवार नव्हताच. त्यानंही पळून जावून विवाह केला. परंतु दुर्दैवी ठरला तो. कालांतरानं त्याला शोधून मुलीच्या परीवारानं आपली मुलगी त्याच्याजवळून हिसकून नेली. त्यानं तो तुटला व आता तो एकाकी राहू लागला. परंतु त्याची समाजात ओळखपारख होतीच. त्याच भरवशावर आपल्याला आपलं काय करायचंय असा विचार करुन तो सतत दारु पिवू लागला. परंतु त्यानं एक काम चांगलं केलं. त्यानं आपल्या नोकरीचा विचार न करता आपल्या मित्राला नोकरी लावून दिली. काही काळानं ज्यानं नोकरी लावून दिली. तो आजारी पडला. तशी त्याची परिस्थिती बेताचीच होती. कसाबसा तो आपल्या मित्राच्या घरी गेला. मग मित्राला गयावया करु लागला की त्यानं त्याला रुग्णालयात भरती करावं. त्यानंतर मित्रानं त्याला भर्ती केलं व पहिल्या दिवशी तो पुर्ण दिवस राहिलाही उपस्थित. वाटल्यास नोकरी लावून दिल्याचं उपकार म्हणून त्यानं त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला हवी होती. कारण त्यानं आपल्या ओळखीनं त्याला सरकारी नोकरी, तिही आजच्या काळात विनापैशानं लावून दिली होती. परंतु घडलं उलटच. दुसऱ्या दिवशीपासून त्याला त्याचा तो मित्र अजिबात रुग्णालयात दिसलाच नाही. त्यानंतर त्याला कळलं की आपलं वागणंच वाईट. आपण दारु प्यायला नको होती. कसाबसा त्यानं रुग्णालयात आपल्या स्वतःचा उपचार केला व तो काही दिवसानंतर रुग्णालयातून बाहेर पडला. त्यानं दारु सोडली. काही दिवस जाताच त्यानं आपला विवाहही केला. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले व एक दिवस त्यालाही सरकारी नोकरी लागली. ही गोष्ट त्याच्याच त्या संधीसाधू मित्राला माहीत झाली. त्यानंतर तो भेटायला आला. तेव्हा त्या मित्रानं त्याला प्रश्न केला की तो पहिल्या दिवशी त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर कुठे गेला होता? त्यावर त्याचं उत्तर होतं की त्याला रुग्णालयातील वास सहन होत नव्हता. म्हणून तो दुसऱ्या दिवशीपासून रुग्णालयात आलाच नाही. असे असतात मित्र. काही मित्र हे जीवाला जीव देणारेही असतात, हंस आणि कावळ्याच्या दंतकथेतील हंसासारखे. तर काहीजण त्याच कथेतील कावळ्यासारखेही असतात. यात विचार करण्यालायक बाब अशी की जर त्याच मित्राचे आप्त वा मुलगी वा पत्नी जर त्या रुग्णालयात भरती झाले असते. तर त्याला रुग्णालयातील वास आलाच नसता. ही वास्तविकता आहे. म्हणूनच परीवार महत्वपुर्ण ठरतो या ठिकाणी. आपले आईवडील, आपली मुलं वा आपली पत्नी. कधीच आपल्याला सोडून जात नाही अशा संकटसमयी. माझी गेली होती. जी परत आली. ती परत येणार. याचं मी कधीच स्वप्नही पाहिलं नव्हतं. 

***********************१२********************

        गुलजार बौद्ध भिख्खू बनला होता. परंतु त्याच्या सतत मनात गुल्फाम येत होता. त्यातच गुल्फामसोबत घालविलेल्या आठवणी येत होत्या. गुल्फामनं केलेली दगाबाजीही रोज रोज त्याला आठवत होती. त्यातच कधीकधी बौद्ध धम्म सोडावासाही त्याला वाटत होतं. तसा परीवारही त्याला आठवत होता. मित्रमंडळ आठवत होतं. तसा तो आणखी विचार करु लागला. 
         मलाही माझ्या मित्रानं मदत केली नाही. परंतु परीवारानं? परीवारानं अगदी चांगल्या प्रकारची मदत केली. ज्यातून गुल्फाम पळून गेली तरी मी सावरलो. मला त्यांनीच आधार दिला. माझा धीरही खचू दिला नाही. आज मी जो काही दिसत आहे. ती माझ्या परीवाराचीच देण आहे. जर ती गेल्यानंतर माझा परीवार माझ्या सोबतीला राहिला नसता तर कदाचीत आज मी जीवंतही दिसलो नसतो. मात्र तिची योजना फोल ठरली व तिचा देश कितीही सक्षम असला तरी त्याचा सक्षमपणा आमच्या देशासमोर टिकू शकला नाही. त्यानंतर आमचा वरचढपणा पाहून त्यांनीच शस्त्रसंधी केली. आम्ही गेलो नाहीच त्यांच्याकडे. 
         पुर्वी असं नव्हतं. पुर्वी संयुक्त कुटुंबपद्धती असायची. ज्यात घरातील प्रौढ व्यक्तीच निर्णय घ्यायचा व त्याच व्यक्तीच्या सल्ल्यानं सर्वजण चालायचेही. मग विवाह असो की आजारपण. ज्याला सर्व पैसे तोच प्रौढ व्यक्ती लावायचा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची सेवा ही परिवारातील सदस्य करायचे.
         सेवा....... संकट काळात आपली सेवा घडावी म्हणूनच विवाह निर्माण केला विधात्यानं. त्यानुसार मिही विवाह केला. वाटलं होतं की गुल्फाम माझ्या आयुष्याच्या काळात कामात येईल. परंतु नाही. ती तर चक्कं विश्वासघात करुन निघून गेली होती त्या इस्रायलमध्ये. केवळ माझ्याशीच नाही तर तिनं माझ्या देशाशीही गद्दारी केली होती.  
           आमची बिरादरी. आम्हाला नित्यनेमानं सांगत आली की विवाह हा जातीतच करावा. आपल्याच धर्मात करावा. तसं तिनं कधीच मला तिचा धर्म सांगितला नव्हता. ती माझ्या जेव्हा संपर्कात आली. तेव्हा ती मला माझ्याच धर्माची वाटली. तो तिचा पेहराव. महाविद्यालयात तिचं अतिशय शालीन वागणं. त्यातच तिचं ते बुरख्यात वावरणं. ते पाहून मलाही ती माझ्याच धर्माची वाटली. मग विवाह हा जातीतच करण्याची पद्धती माझ्या धर्मात निर्माण निर्माण झाल्यानं मी तिच्या प्रेमात फसलो व मी तिच्याशी विवाह केला. कारण जातीत विवाह केल्यानंतर असा व्यक्ती आजारी पडल्यावर त्याचा आत्मीक सुख परीवार व नातेवाईक यांच्याकडून प्राप्त व्हावं. ज्या आत्मीक सुखाच्या भरवशावर आजारी असणारा तो व्यक्ती लवकरच दुरुस्त व्हावा ही अपेक्षा. तसं प्रेमविवाह केल्यानंतर घडत नाही. हे मलाही माहीत होतंच. परंतु प्रेम ते प्रेम असते. तेच घडलं माझ्यासोबत. म्हणूनच जातीत विवाह करण्याची पद्धत.
          मित्रमंडळी संकटात कामात येत नाही. ही संकल्पना आधीपासूनच रुढ आहे माझ्या मनात. मित्र हे वारंवार बदलत असतात. बालपणाचे मित्र हे उतारवयापर्यंत साथीला नसतात. कधी ते आठवतही नाहीत. तसेच दहावी, बारावीचे मित्रही सोबतीला शेवटपर्यंत नसतातच. तेही कालांतरानं आठवत नाही. नोकरीपेशातील मित्र हे नोकरीवर आहोत, तेव्हापर्यंतच. ते म्हातारपणात आठवत नाहीत. परंतु परीवार हा शेवटपर्यंत असतो. त्यांचे नातेसंबंध शेवटपर्यंत आठवतात व ते जोडून ठेवण्याचा प्रयत्न माणूस शेवटपर्यंत करतोच. म्हणूनच परीवार महत्वाचा. फक्त गुल्फाम नावाची तीच एक मैत्रीण पकडली. तिचंही मित्रपणाचं नातं संपुष्टात आलं होत. जे आता पुन्हा जुळलं.
          वाद...... पारिवारीक वाद नेहमीच असतात. तसे वाद होतातच. हे वाद होतात अपेक्षेने. बरेच वाद पैशावरुनंच होत असतात. परिवारात जेव्हा पैसे मागीतले जातात व उपकारांची जाणीव न ठेवता पैसे परत केले जात नाही. तेव्हा नातेसंबंध बिघडत जातात. तसेच एखाद्यावेळेस एखाद्या अपेक्षेनं वाद होवून परीवार तुटतो. प्रेमविवाहातून तर परीवार हमखास तुटतोच. तेव्हा अशा अपेक्षाच ठेवू नये की परीवार तुटेल. असा पैशाचा व्यवहार करु नये की पारीवारीक नातं संपुष्टात येईल आणि असा प्रेमविवाह करु नये की आयुष्यभऱ्यासाठी नातंच संपून जाईल. पारीवारीक नातं टिकून राहावं. ते टिकवून ठेवावं. जेणेकरुन त्याच नात्यातून आपल्याला भविष्यात आत्मीक सुख प्राप्त होईल. जे आत्मीक सुख आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत टिकेल. तेच आत्मीक नातं आपल्या भविष्याची ताकद ठरेल. आपल्याला आपल्या जीवनात मोलाची मदत करेल. तसंच तेच आत्मीक सुख आपल्याला सतत जीवन जगायला प्रेरणा देखील देईल. यात शंका नाही. माझंही तसंच झालं. मी केलेला प्रेमविवाह, तोच प्रेमविवाह माझ्या परिवाराला मंजूर नसल्यानं मी परीवाराला तुटलो. बरेच दिवस माझा परीवार माझ्यासोबत बोलत नव्हता. परंतु माझ्याच परीवारानं आज मिळवलं मला. 
          चर्चेतून घडवावे आपलं आयुष्य. गुलजारचा तो विचार. त्याला वाटत होतं की गुल्फामनं जाण्यापुर्वी माझ्याशी एकदा तरी चर्चा करायला हवी होती. परंतु कशी करणार? ती इस्रायलची होती व मी इराणचा. शिवाय तिला जे काही करायचं होतं. ते खरच माझ्याशी चर्चा केल्यानंतर करु दिलं असतं का? 
           चर्चा...... चर्चा कोणत्याही विषयावर व्हायलाच हवी. कारण चर्चेतून मार्ग निघतो. तसेच जो मार्ग निघतो. तो मार्ग आपलं मार्गदर्शन करणारा ठरतो वा आपलं आयुष्य घडविणारा ठरतो. परंतु गुल्फाम जी हेरगिरी करीत होती. त्यावर चर्चा होवू शकतच नव्हती. अन् जर तिनं साधा विषय जरी माझ्यासमक्ष काढला असता तरी मी तिला तशा स्वरुपाचं पाऊल उचलू दिलं नसतं. विरोध केला असता. कारण तसं करु देणं म्हणजे माझ्याच देशाबद्दल गद्दारी झाली असती. 
           गुलजार विचार करीत होता. तसं त्याचं बरोबर होतं. कारण जसा गुल्फामला देश प्रिय होता तिचा. तसाच त्यालाही त्याचा देश प्रिय होता. भारतातील हालत मात्र वेगळी होती. 
          भारतात अलिकडील काळात आत्महत्या होत आहेत. कधी शेतकरी आत्महत्या तर कधी घरगुती वादातून पती पत्नीची आत्महत्या तर कधी गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थी वर्गाची होणारी आत्महत्या तर कधी सासू सुनेच्या आत्महत्या कधी आपल्या म्हातारपणाच्या वयोवृद्ध जीवनाला कंटाळून वयोवृद्धांच्या आत्महत्या. कधी स्रिच्या आत्महत्या तर कधी पुरुषांच्या आत्महत्या. कधी लहान बालकांच्याही आत्महत्या तर कधी तरुणवर्गाच्या आत्महत्या. 
          आत्महत्या होण्याला जबाबदार आहे निराशता. निराशता ही नेहमीच जीवनात येत असते. ज्याप्रमाणे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख येतं. तशीच निराशताही येत असते. तसं पाहिल्यास आजच्या काळात कोणताच घटक सुखी नाही. साधं दगडाचं उदाहरण घेतल्यास तोही सुखी नाही. त्यालाही उन, पाऊस, थंडी, वारा झेलावं लागतं. ज्यातून त्याचे तुकडे होतात. तसा सजीव घटकही सुखी नाही. सजीव प्राण्यांनाही दुःख नसतं असं नाही. त्यांनाही दुःख असतंच. त्यांना तर जंगलात असतांना सुरक्षीतता नसते. तेच दुःख. सरपटणाऱ्या प्राण्यांनाही दुःख असते सरपटावं लागते याचं. वृक्षवल्लींनाही दुःख असतंच. त्यांना एकाच जागेवर राहावं लागतं. इकडे तिकडे स्थलांतरीत होता येत नाही त्याचं. झाडंही आत्महत्या करतंच. कधी त्याची एखादी फांदी. हे दिसतं, अचानक झाडं वाळण्यातून. यातून त्या झाडाची आत्महत्या दिसत असते. लोकं म्हणतात की त्या झाडाला कीड लागली. परंतु असं कधीकधी होत नाही. तसं माणसांनाही दुःख असतं. परंतु त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. परंतु आत्महत्या घडतातच.
         आत्महत्येबाबत सांगायचं झाल्यास आत्महत्या थांबवता येवू शकतात. त्या रोखताही येवू शकतात. जर आपण एखाद्या गंभीर प्रश्नांवर निराशता न बाळगता चर्चा केली तर....... आपण चार लोकांना त्याबद्दल सांगीतलं तर....... काहीजण काहीबाही बोलतात. बोलू शकतात. कारण त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु काही लोकं असेही असतात की जे उगाच बोलत नाही तर त्यावर उपायही सांगतात. चर्चेतून आत्महत्या थांबतात.
          गुल्फामनं चर्चाच केलेली नव्हती गुलजारसोबत. परंतु आज म्हातारपणात तिला तेवढ्या प्रमाणात देश महत्वाचा वाटत नव्हता. वाटत होतं महत्वाचं तिचं म्हातारपण. वाटत होतं की हे म्हातारपण आपलं सुरक्षीत जाईल काय? त्याचाच विचार ती करीत होती. 
         मुस्कान, गुलजार आणि आता गुल्फाम. तिघांनीही बौद्ध धम्माचा स्विकार केला होता. तिघंही बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी जागोजागी फिरत होते व धम्माचा प्रसार करीत होते. अशातच गुलजारला आठवलं पुर्वीचं त्याचं देशप्रेम. वाटत होतं, आपलं काहीतरी चुकतंय. आपण आपल्या देशाप्रती काहीतरी अघटीत करीत आहोत. ज्यानं देश आपल्याला गद्दार म्हणून संबोधेल. तसं त्यानं मुस्कानला बोलून दाखवलं. कारण चर्चा करायला हवी असं त्याला वाटत होतं. आपण बौद्ध भिख्खू बनलो. याचंही त्याला बरंच वाईट वाटत होतं. बौद्ध धम्म सोडायला हवा. असंही त्याला वाटत होतं. तसा तो भिख्खू बनताच त्याचा परीवारही त्याच्यासाठी तुटला होता. तसा तो एक दिवस उजळला. तो मुस्कानला भेटला. त्यानंतर चर्चात्मक सत्र सुरु झालं. तसा गुलजार सल्ला घेण्याखातर म्हणाला,
          "मुस्कान, मला वाईट वाटतंय की मी बौद्ध धम्म घेतला व मी भिख्खू बनलोय. तसं बौद्ध भिख्खू बनण्याबद्दल मला जास्तीत जास्त पश्चाताप होत आहे. मला आता बौद्ध धम्म सोडावासा वाटत आहे. परंतु तुझा सल्ला हवाय. सांग मी काय करु?"
          मुस्काननं ते ऐकताच तिला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. तिनं त्याचं ऐकून घेतलं. तशी ती म्हणाली,
          "गुलजार, बौद्ध धम्म घेणं वा सोडणं ते आपल्या हातात आहे. खरा बौद्ध तोच की ज्याची दुःखातून मुक्ती झालेली आहे. ज्याला त्याचा भुतकाळ आठवत नाही. ज्याला संबोधी प्राप्त झालेली आहे. ज्याला राग, लोभ नसतोच. ज्याच्या मनात द्वेषही नसतोच अजिबात. तुझ्या मनात तर सतत गुल्फाम असते. तिनं केलेला विश्वासघात असतो. त्यातच तुला तिनं केलेल्या विश्वासघाताचा महाभयंकर राग येतो. त्यामूळं तू बौद्ध धम्माला न्याय देवू शकत नाही. बौद्ध धम्माचं कार्य तू करु शकत नाही. आता तू तुझ्याच इच्छेसमोर बौद्ध धम्म सोडलेलाच बरा."
         मुस्काननं त्याला दिलेला सल्ला. तो सल्ला ऐकून गुलजारला हायसं वाटलं व त्यानं बौद्ध धम्म सोडण्याचा विचार केला. लागलीच त्यानं बौद्ध धम्म सोडला होता. मात्र गुल्फाम आजही बौद्ध धम्म धरुन होती. तशीच मुस्कानही बौद्ध धम्म धरुन होती.
        दिवसामागून दिवस जात होते. तशी गुलजारसोबत मुस्कान राहातच होती एकत्र. कालांतरानं काही दिवसानं मुस्कानलाही वाटलं की आपणही बौद्ध धम्म सोडावा. तशी ती विचारच करीत होती. तोच एक दिवस तिनंही बौद्ध धम्म सोडला व तिनं त्याच्याच बिरादरीतील धर्म स्विकारला होता. आता त्या घरात दोन अरबी व एक बौद्ध धम्म होते. 
           आज गुल्फामला माफ करुन गुलजार जगत होता. तशी काही कालांतरानं का असेना, गुल्फाम, मुस्कान व गुलजार एकत्र आले होते. त्यानं बौद्ध धम्म सोडला होता. परंतु गुल्फामबद्दलचा आकस त्याच्या मनात आज नव्हता. तो आकस मुस्कानच्या बोलण्यातून दूर झाला होता. मुस्काननं आज बौद्ध धम्म जरी सोडला असला तरी काल तिनं गुलजारच्या मनातील गुल्फामबद्दलचा राग, द्वेष, आकस बाहेर काढला होता. 
          ते एक घर. त्या एकाच घरात दोन धर्माचे लोकं एकत्र राहात होते. आज ना वाद होता. ना विवाद होता त्या घरात. तो सुखी होता व तेवढाच संपन्न होता. तसं म्हातारपण येतच होतं त्याच्या आयुष्यात. परंतु ते म्हातारपण आता त्याला त्याच्या कार्यात बाधा बनलं नव्हतं. कारण तरुणपणात ज्या त्याच्या दोन भार्या सोबतीला होत्या, जरी त्या वेगवेगळ्या राहात असल्या तरी. परंतु आता आयुष्याच्या उतारवयात त्या दोन्ही भार्या त्याच्या सोबत होत्या. एक बौद्ध बनून तर दुसरी त्याच्याच धर्माची बनून. ना आता त्याच्या मनात क्लेश होता ना कोणताही एकमेकांबद्दल हेवादेवा होता. ना आकस, ना राग. सर्वच त्या घरात अगदी गुण्यागोविंदाने राहात होते. 
          म्हातारपण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. गुल्फाम व मुस्कानची मुलं मोठी झाली होती. ती आपल्या आपल्या कामाला लागली होती. परंतु आईवडिलांवर प्रेम करीत होती निरतिशय. ना त्यांच्यातही कोणताच वाद होता. कदाचित त्यांच्या आईवडिलांनी वेगळं राहून भोगलेल्या यातनांचा परिपाकच होता.
            मुस्कान भारतातही येत असे. त्यातच आपल्या परीवाराला भेटत असे. तसं तिच्या परीवारालाही तिचं येणं आवश्यक वाटत होतं. कारण स्नेहसंबंध जुळले होते.
           आज गुल्फाम जरी इराणमध्ये राहात होती. तिनं बौद्ध धम्म स्विकारुन आपलं अखेरचं जीवन सार्थक केलं होतं. ती अरबमध्ये असूनही आता ती सौजन्यानं राहात होती. वागत होती. आता ती इस्रायलची असली तरी ना तिच्या मनात अरबांबद्दल आकस होता. ती आता सर्व आपल्या मनातील राग, द्वेष विसरुन इराण व इस्रायलच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न करीत होती. प्रत्येकच जीव हा स्वतंत्र असून प्रत्येकच जीवाला जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. असेच ती सांगत होती. ज्या गोष्टीची आज इस्रायल, इराण, अमेरिकेलाच नाही तर जगालाही गरज आहे. तेच सत्य ती प्रतिपादीत करत होती. तसंच जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. असंही ती सांगत होती. आता ना जगात रक्त होतं, ना रक्तपात होत होता. ना युद्ध होत होतं, ना कुणीही रक्ताचा टिळा लावणारे दिसत होते. सगळीकडे अमन व शांती नांदत होती. अर्थातच जिच्यामुळं युद्ध घडलं होतं. तिच्याचमुळं आज जगात शांतताही टिकत होती.
          दिवसामागून गुलजार जात होते. आज गुलजार जगात नव्हता. ना मुस्कान जगात होती. कालांतरानं ते दोघंही मरण पावले होते. परंतु त्यांच्या आठवणी जगात होत्या. त्या गुल्फामच्या मनात होत्या. तसं पाहिल्यास गुल्फाम जगात शांततेसाठी फिरत होती. जगात शांती टिकावी यासाठी शांततेचा प्रसार करीत होती. जगाच्या विचारपीठावर शांततेचं तत्व मांडत होती. अशातच जाहीर झाला शांततेचा सोहळा. तिला तद्नंतर शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला होता, जो पुरस्कार तिनं आपल्या पतीलाच समर्पीत केला होता. तिला वाटत होतं की जर त्यानं तिला कदाचित माफ केलं नसतं तर ती आज जगाची शांततादूत बनली नसती व तिला शांततेचा नोबल पुरस्कारही मिळाला नसता. 

****************************************************************************समाप्त*********