मुक्ता....??️ - 1 sabdhpriyaa द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • ते घर अजूनही जागं आहे

    पावसाळ्याची ती रात्र होती.रात्रीचे साडेअकरा वाजले होते. अमोल...

  • मन मस्त मलंग

    भूतकाळातील गडद सावल्या त्यांच्या  आयुष्यावर किती खोल परिणाम...

  • The Anti-Hype Books (Part-1)

    **अस्वीकरण (Disclaimer):**  ही समीक्षा केवळ माहितीपूर्ण आणि...

  • नाते जन्मापलिकडचे - भाग 2

    ती पुन्हा त्याला शोधू लागली. तिची इच्छा होती एकदातरी त्याचे...

  • 50 minutes

    Prologueकाही लोक आयुष्यात येतात सगळं बदलायला आणि मग निघून जा...

श्रेणी
शेयर करा

मुक्ता....??️ - 1

1.मुक्ता.....मला जगायचे आहे.....

एक वेगळाच विषय घेउन लिहलेली ही माझी स्टोरी आहे.(लघुकथा)..... चला पाहूया "तिला जगायचे का आहे." ....का "ती जगण्याची भिक मागत आहे ."... कथेत समजेल च.... कोण आहे ती  चला वाचूया,........

 
 
अरे  विकास ss तुला सांगते ऐक माझं कित्ती दिवस असच नुसते पैसे घालवणार आहेस? " 
 
 
ती सतत आजारी असते मला तर वाटतेय हिला आधीच काही तरी मोठ्ठा आजार असणार बघ..... हिच्या आई बापाने आपल्या माथी मारली हिला ते झाले मोकळे....... आणि ही रोगी ssss बाई ...सुखाने जगू देणार नाही आपल्याला फक्त कमवायचे आणि हिच्या दवाखान्यात उधळायचे..... इतकंच चालू आहे...
 
 
ते काही नाही हया रविवारी बोलवते मी त्यांना काय तो निर्णय लावूनच टाकायचा..... अरे ये बाबा लक्ष कुठाय तुझ कळतय ना काय बोलले ते ... विकास ssss 
 
 
"अग आई किती ओरडतेस... बहिरा आहे का मी..... !"विकास चिडतच बोलला 
 
 
"मग काय करू त्या महारोगी च्या हातात देऊ तुला हा बोल की ?" विकास ची आई वैशाली त्याला म्हणाली 
 
 
महारोगी sssss आई ती काय महारोगी आहे का काहीही बोल तू तो हसतच त्यांना बोलला 
 
 
दात काढू नकोस.....  थोबाड फोडेन ह तुझ.....मी इतक्या कळकळीने सांगते आणि हसण्यावारी नेतोयस तू .... त्याची आई रागात बोलली.
 
 
"आई मला पण तिच्याकडून सुटका हवी ! " पण काय करणार ...तो बोलला 
 
 
"तूच सगळ काही करू शकतोस" .... आणि राहिला प्रश्न आपल्या चिकू चा तर वारस आहे तो आपला आपल रक्त आहे ते....तो आपल्याशीच राहणार आधीच सांगते... त्याची आई बोलली 
 
 
अग पण कोर्टाचा निर्णय मानावा लागतो आई मुल लहान असले तर ते आई पाशीच राहणार ना... विकास 
 
 
"झाल लढायच्या आधी राजीनामा दिला.....😡" अरे कोर्टाची पायरी शाहण्याने चा चढू नये ... आणि तिच्या त्या भिकारी आई बापाकडे कुठला आलाय इतका पैसा भिकारी कुठले.... त्या तोंड वाकडे करीत बोलल्या 
 
 
रविवारी तयार रहा... ऐनवेळी तूझी कारणे नकोत मला सांगून ठेवते.... त्या धमकी देतच त्याला बोलल्या 
 
 
हो ग माझी आई...... जेऊया आता भूक लागली आहे मला चल... तो हात जोडून आईला किचन मध्ये नेत बोलला 
 
 
अरे त्या महाराणीला उठव जा.... जेवायचं बघा म्हणावं नाहीतरी मार उपाशी मला या वयात.. त्या रागात बोलल्या...
 
 
"तु बस ग इथ मी उठवतो तिला! " तो बोलतच रूम मध्ये निघाला 
 
 
ये लगेच बोलव तीला आणि सरळ बाहेर ये.... नाहीतर बसशील तिथं गुलू गुलु करत जा....त्या बोलल्या 
 
 
इतका वेळ दाराच्या आडून सगळ ऐकणारी ती सावध झाली डोळे पुसून घाईतच बेड वर झोपली 
 
 
विकास दार उघडुन आत आला..... ये sss (शिवी देतच) उठ भूक लागली आहे मला चल जेवण वाढ..... तुला कळत नाही का आईला भूक लागली असेल ते... तिच्या गालाला हाताने दाबत तो रागातच बोलत होता....
 
 
 
ती रडतच त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करीत होती...... विकास ची नजर तिच्यावर फिरत होती नवरा असूनही त्याची ती किळसवाणी वासनेने भरलेली नजर तिला सहन होत नव्हती ....🥹
 
 
 
असाच होता तो विकास ने कधी तिच्याकडे एक जिवंत माणूस म्हणून कधी बघितलच नव्हते.... त्याच्यासाठी ती तो .... त्याच्या घरात 24 तास राबणारी त्याच्या गरजा पूर्ण करणारी आणि मुलांना जन्म देणारी...एक बिनकामाची सतत आजारी असणारी व्यक्ती जी फक्त अडगळीची बाहुली होती त्याच्यासाठी गरज असली की वापरा गरज संपली की फेकून द्या...
 
 
 
आ ssss ह sss आहो..... सोडा मला येते मी .... आ sss आई ग ...ती ओरडली त्याने तिचा हात मागे मुरगळला..... 
 
 
 
"हा आधी कळत नाही तुला नुसता आराम करायला पाहिजे तुला घरातली कामं काय तुझा बाप करणार?? " ....विकास 
 
 
यावर तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं ..... मला डोळे दाखवतेस तुझ्या तर...... सटाकssss सटाकssss त्याने तिच्या कानाखाली वाजवली....
तो अजून मारणार इतक्यात.....
 
 
 
" विकास बाळा...... ये ना रे भूक लागली आहे! मला..... बघ चिकू घरी आलाय! " ...... आई बोलल्या 
 
 
 
माझ्या बछड्या मुळे वाचलीस तू..... तूझ्या आ***** तो बोलतच होता की ती कशीबशी धावतच बाहेर पळाली...
 
 
 
जेवणाच्या टेबल वर तीची सासु आणि तिचं 8 वर्षाचं लेकरु बसल होत..... त्याला पाहिल्यावर तिला हुंदका अनावर झाला.... तो एकच या नरकात तिचा आधार होता 😔🥹
 
 
मम्मी ssss चिकू धावतच तिला बिळगला...... कीती ते सुख त्या आईच्या जीवाला.... तिच्या काळजाचा तुकडा जेव्हा छातीशी घट्ट पकडून तीने समाधानाने डोळे मिटून घेतले....
 
 
 
अरे चिकू बाळा इकडे ये तू तुला माहिती आहे आजी ने काय आणलाय तुला..... त्यांनी अक्षरशः तिच्या कुशीतून तिचं लेकरु हिसकावून घेतल .....
 
 
रिकाम्या हाताकडे बघत तिने आवंढा गिळून टाकला... रोजचच तर होत हे..... तिने जेवण वाढायला सुरुवात केली 
 
 
 
"चिकू पप्पा कडे नाही येणार का?" ... विकास 
 
 
जा रे जा पप्पा कडे जा बघ किती प्रेम करतो पप्पा तुझ्यावर... जा शहाणं बाळ ग ते .... वैशाली मायाने त्याच्यावरून बोटे मोडतच चिकू ल बोलल्या ....
 
 
 
चिकू आता विकास सोबत खेळत होता.... सासूबाई..... ते ssss जेवण sss वाढलय .... जेवून घ्या.. ती घाबरतच अडखळत बोलली 
 
 
 
"डोळे फुटले नाहीत माझे! दिसतय मला ....😡 आता तू शिकव मला मी काय करायचं ते.....त्या रागातच बोलल्या 
 
 
 
आई सोड ना .... तीला अक्कल नाही ss तू कशाला तुला त्रास करुन घेतेस... जेव बघू पोटभर.... विकास बोलला 
 
 
मम्मी हे घे...... चिकू ने त्याच्या इवल्या इवल्या हातात छोटासा घास पकडून तिच्याकडे पाहिलं ....
 
 
"मम्मी ssss आ कर ना.... हे खा .... तुला भूक लागली असेल ना?" त्या च बरोबरच तिच्या अंगावर सरसरून काटा आला काळजात चर्र झालं...... डोळ्यात आसवांची गर्दी झाली..... ती आनंदाने घास खाणारच इतक्यात .....😱😱😱😱😱
 
 
 
आ sss अं आम्... आम्.... मी खाल्लं कशी गंमत झाली एका पिल्लाची ......विकास ने पुढे होत घास खाल्ला आणि चिकू ल गुदगुल्या करत हसत बोलला......
 
 
 
तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले....... काय नशीब आहे....😭😭🥺🥺🥺🥺
 
 
चिकू अजुन तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पहात होता..... तिच्या आतले वादळ तिने आतच अडवले डोळे पुसत ती बोलली असू दे रे सोन्या ......तू दुसरा घास भरव मला.....ती हसण्याचा प्रयत्न करीत बोलली 
 
 
"पण मम्मी.....? "...... चिकू 
 
 
चिकू बेटा सोड तिला .....तू हे बघ पप्पा ने तुझ्यासाठी game 🎯 आणलाय..... विकास 
 
 
इकडे तिला तिथं एक क्षण ही थांबावे वाटत नव्हतं..... तिचा आत्मा ही आज रडत होता.....😭
 
 
 
सगळ्यांची जेवण उरकता ती धावत रूम मध्ये आली दार बंद करून....ती धाडकन जमिनीवर पडली ...... डोळ्यातले पाणी थांबायचे नाव घेत नव्हत आणि ..... यातना सहन होत नव्हत्या.... प्रश्न आता तिच्या बाळाचा होता......
 
 
तिचं मन नकळत भूतकाळात हरवले.....🤔😔
 
मागच्या 5 वर्षात......
 
क्रमशः