Featured Books
  • नाते डायरीशी ... - 3

    सोमवारची सकाळ... आज कॉलेजच्या गेट जवळ नेहमीपेक्षा जास्तच गर्...

  • अंतर्मन - भाग 8

    भाग: सत्तर दुकानांचा सौदामी रात्रभर झोपलो नाही. अण्णा कोण अस...

  • झपाटलेला वाडा - भाग 15

    झपाटलेला वाडा - भाग 15: शेवटचा बळी आणि वाड्याचा अंत [शेवटचा...

  • धैर्य

    प्रस्तावना:-धैर्य हे पुस्तक जो कोणी हातात घेईल, त्याला असंच...

  • काळी बाहुली - भाग 3

    काळी बाहुलीभाग ३ बंद खोलीतला आवाजदरवाजावर झालेल्या त्या तीन...

श्रेणी
शेयर करा

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1

♥️अभिजित ♥️ ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा , भाग 1

"ॐ नमो भगवते वासुदेवाय "...

"अभिजित पर्व तीन  द्वारकाधिशाच्या चरणी अर्पण🙏"..

"तुम्हा सर्व वाचक प्रेमिकांन सारखीच अभिजित माझ्या  देखील हृदयाच्या खूप जवळची कथा आहे,. म्हणूनच मी तिचे नवखेपण टिकवून ठेवण्या साठी  एकाच पर्वाचे पुढील पर्व लिहण्या पेक्षा त्या मध्ये नवीन कथा लिहते, या वेळेस ही पात्र तीच असतील, आपला लाडका अभिजित असेल,दिशा असेल, सर्व इनामदार फॅमिली देखील असेल,पण कथा नवीन असेल, चला तर म जुन्या संवगड्या सोबत नवीन खेळास  सुरवात करूयात "..


"जय माँ जोगेश्वरी sss"... मातेच्या जय जयकारात अवघे मल्लपूर आणी श्वेतपूर दुमदुमुन निघाले होते, सोबत ढोल, ताशा, लेझीम झांजेचा आवाज आस्मानात दुमदुमूत होता ..

ढोल लेझिम  पथक रस्त्याने हळूहळू पुढे पुढे सरकत होते... गुलालाने अवघे लोक, भूमी गुलाबी होऊन गेली होती...

घामाने न्हाहून ही लोकांचा उत्साह तीळ मात्र कमी झाला न्हवता.. ताशाच्या तडतड आवाजा मध्ये सगळे भान हरपून ठेका धरून नाचत होते...
पुरुषांन इतक्याच स्त्रिया ही उत्साही होत्या.. डोक्यावर  तुळस, पाण्याच्या घागरी घेऊन त्या हळूहळू पुढे सरकत होत्या मध्येच ठेका धरत होत्या, तर मध्येच त्या गर्दीत फुगड्या ही खेळत होत्या... सगळीकडे उत्साहा आणी आनंदाचे वातावरण होते.. पण एका ठराविक ठिकाणा पर्यंतच हा आनंद टिकून होता,..

जसजशी पाण्याची टाकी जवळ येऊ लागली तस तसे नाचणाऱ्या लोकांनी हातातील कडे माघे सरकवले...
ढोलाच्या तालावर थिरकणारी पावले आत्ता समोरच्या दिशेने दमदारपणे पडू लागलीत..शर्टच्या माघे धारदार शस्त्र खोचली जाऊ लागलीत .

यात स्त्रिया ही कमी न्हवत्या, जिथे पुरुष उणे पडणार होते तेथे त्या उभ्या राहणार होत्या...डोक्यावरचे पदर ठीक करत ते कंबरे जवळ खोचत त्या ही तयार झाल्या...

इतका वेळ कानाला उल्हाद प्रदान करणाऱ्या संगीता मध्ये ही आत्ता ललकार ऐकू येऊ लागली होती ...

इतका वेळ आनंदी दिसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर आत्ता वेगळाच जोश मुसद्द दिसत होती ..
त्याला कारण ही तसच होते 

'पाण्याच्या टाकी जवळ दोन्ही गावांच्या वेशी एक होत होत्या'.. इथून पुढचा प्रवास मल्लपूर आणी श्वेतपूर वाल्यांना एकत्र करायचा होता समोरच्या अरुंद वाटेने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरा जवळ एकत्रच जायच होत... 

आणी हे सहज सोपे न्हवते!

'दोन्ही कडच्या लोकांनी आत्ता पालखी धारक बदल्ले कारण त्या अरुंद वाटे वरून कोणालाच आपली पालखी माघे ठेवायची न्हवती..
पाण्याची टाकी जवळ येताच दोन्ही गावाकडचे जाणकार पुढे आले,..दोन्ही गावामधून विस्तव जात न्हवता... आणी एकत्र जायचे म्हणजे दर वर्षी प्रमाणे वाद होणार....

'श्वेतपूरचें सर्वस्वा विश्वासराव ईनामदार म्हणजेच आबासाहेब पुढे आले,.. त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र अर्जुनराव, जयंतराव,आणी अनंता  देखील पुढे आले.. त्यांच्या बरोबर गावातील इतर वडीलधारे लोक ही होते .. 
पुढे येताच आबासाहेबांनी आपला हात हवेत वर केला अन त्यांच्या त्या एका ईशाऱ्यावर सर्व जनता एका जागी थांबली गेली...

तरुण पिढी  पुढे जाण्यास अतीउत्साही  होती... 
पण आबासाहेबांचा शब्द त्यांच्या साठी ही प्रमाण होता..
जो पर्यन्त ते ईशारा करत न्हवते तो पर्यन्त एक ही व्यक्ती जाग्यावरून हलणार न्हवती..
सगळ्यात पुढे असलेल्या आबासाहेबांच्या माघे आख्खा गाव उभा होता...

'तर इकडे मल्लपूरच्या सर्जीराव सरपोतदारांनी मात्र पाण्याची टाकी जवळ येताच आपले लोक पुढे केले.. सगळे धडधाकट पुरुष हातात काठ्या घेऊन पुढे आलेले...
काहीही करून या वर्षी ही त्यांना आपली पालखी सगळ्यात आधी मंदिरा जवळ नेत पहिला मान पटकवायचा होता..आणी त्यासाठी श्वेतपूर वाल्यांन बरोबर दोन हात करण्यासाठी ही ते तयार होते...

ज्याला हा मान भेटत होता त्यालाच उदया रिंगणात आपला पहिला प्रतीस्पर्धा निवडायचा ही मान होता..

आणी या वेळेसची प्रतापची शिकार ठरलेली होती... तो गेला तर ईनामदरांची दहशतच संपेल सगळे आधु होऊन जातील...ईनामदरांच्या गळ्यातील ताईतच काढून टाकायचा होता त्याला.. दरवर्षी असंच एक एक करत त्याला पूर्ण ईनामदार कुटुंबच संपवून टाकायचे होते म्हणून तर त्याला आजचा मान मिळवायचा होता...

व्हाईट मर्सडीज मध्ये पसलेल्या प्रतापच्या चेहऱ्यावर खूनशी हसू पसरले होते...

"आबासाहेब या वेळेस ही माघार घेणार आणी त्याचे फळ त्यांना उदया भोगाव लागणार ".. उदया त्यांचा एक नातू कायमचा या जगातून नाहीसा होणार... आरशात दिसणाऱ्या आपल्याच प्रतीबिंबा कडे पहात तो तिरक्स हसला....

"विक्रम sssउदया ईनामदरांच्या काळजात हात घालून त्यांच काळीज चिरून टाकायचय ...त्यासाठी आज जिंकणे गरजेचे आहे...लक्षात ठेव "... सोन्याच्या अंगठ्यानी भरलेली पाची बोट गोल फिरवत त्याची मूठ घट्ट आवळत प्रताप आपल्या हुकमी आवाजात म्हणाला......
मागच्या वर्षी जस त्या ईनामदरांच्या भीमाचे हात पाय मोडून त्याला अपाहीज केले होते तसेच या वर्षी ही ठरलेल्या शिकारिला यम सदणी धाडायच आहे विसरू नकोस ...


"व्हय दादा! आज बी जींकणार ते आपुनच आणी उदया त्यांना पाणी बी आपुनच पाजू "... व्हाईट शर्टची कॉलर माघे टाकत विक्रम गुर्मीने म्हणाला आणी लागलीच गर्दीत घुसला...

प्रताप फक्त आत्ता  उद्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पहात होता.... बोटांनी मिशीला पीळ देत तो गालात हसत होता...

त्याच्या माणसांनी  अगोदरच पालखी उचलली होती, पुढची धुरा स्वतः संभाळत विक्रम वेगात पुढे निघाला त्याला पुढे जाताना पाहून प्रतापने मिशीवर ताव दिला..