❤️अभिजित ♥️6
जसे दरवर्षी त्यांचे लोक ईनामदरांच्या रक्ताने आपली तहान भगवायचे अगदी तसाच अभी विक्रमच्या रक्तात न्हाहून निघाला होता...
म्हणजे उद्या आखड्यात ते विक्रमला आव्हान करणार आणी त्याला यमसदणी धाडणार... विक्रमचे हात पाय भीतीने कापु लागले, सर्जीरावांच्या छातीत ही कधी न्हवे ती धडकी भरली..
पण प्रताप मात्र अजून ही मगरुळीने अभी कडे पहात होता..
त्याच रक्त जणू खवळून निघाले होते.... हार सहन होत न्हवती त्याला....हाताच्या मुठी घट्ट आवळून धरत तो अभी वर धावून आला...
आणी अजय समोर आडवा हात धरलेला अभिजित ही त्याला पाहून सरळ पुढे आला..
आत्ता अभ्या भिडणार प्रतापला म्हणून अजयचा आनंद गगनाला भिडला होता.... याच क्षणाची तो वाट पहात होता...
"विक्रमला सोडून सर्जीरावांनी प्रतापला रोखून धरले, पण त्याच्या लोकांना कोणी रोखावे ... प्रताप धावून पुढ गेला म्हणजे त्याची पाळीव कुत्री ही पुढे धावणारच ना ... हातात काठ्या घेऊन ते पुढे सरसावलेच कि अचानक मंदिराच्या दोन्ही बाजूना असलेल्या किवाडातुन... संजय आणी अरुणनी आत झेप घेतली सोबत अनंता ही होता त्याच्या हातात ही काठ्या होत्या ... अभिवर धावून जाण्या आधी त्या लोकांना अगोदर यांच्या बरोबर सामना करावा लागणार होता...
मल्लपूरचे लोक त्यांच्यावर धावले खरे पण इतक्या वर्षांचा राग डोक्यात साठवून ठेवलेले ते ईनामदरांचे पुत्र समोर येणाऱ्यावर जणू तुटून पडले होते... समोरचा धावून येण्याअगोदरच ते त्यांना लाथा बुक्यानीं धुवून काढत होते...कित्येकानं वर काठ्या पडत होत्या आणी आपण त्यांच्यावर धावून जाऊन किती मोठी चूक केली हे श्वेतपूरच्या लोकांना लगेच समजले...
त्यांना तर पळता ही येत न्हवते... पुढे मार खाणारा पाठीवर हात ठेवत गर्दीतुन माघे सरत होता अन मागचा पुढे होत मार खात होता तो माघे सरताच त्याच्या मागच्याचा नंबर लागत होता... कोण कुणाला मारतय हेच समजत न्हवते...
सगळ्यांना वाटतं होते इतके सगळे धावून गेले म्हणजे नक्कीच ते ईनामदार बंधू धुवून निघाले असतील पण खरी व्यथा तर वेगळीच होती....
त्या सभामंडपात नुसता आवाज घुमत होता, कित्येक शिव्या बाहेर पडत होत्या... त्या पवित्र ठिकाणची श्वेतपूरवाल्यांनी अवहेलना केली होती...
"काय चाललं होत हे देवीच्या देवळात,..मारहाण"...
अनर्थ घोर अनर्थ...
पूजा पूर्ण झाल्याने गुरुजी रागात पाटावरून उठले आणी बाहेर आले...
त्याच वेळी आबासाहेब आणी श्वेतपूरचे लोक ही तेथे आले होते....
आबासाहेब येताच त्यांनी सगळा गदारोळ थांबवला.. संजय आणी अरुण सगळ्यांना मारून निमूटपणे बाजूला येऊन उभे राहिले...अभी तर अगोदर पासूनच किवाडा मध्ये बसला होता त्याची नजर प्रताप वर होती.. तो वाट पहात होता प्रतापची आत घुसण्याची... तो त्यात शिरला असता तर अभिने त्याला फाडून काढला असता...
"हे काय चाललंय सर्जीराव.. हे असल वर्तन तुम्हाला शोभत का?"....गाभाऱ्यातून बाहेर आलेले गुरुजीनीं रागाने विचारले ....
"माफ करा गुरुजी, चूक झाली लोकांन कडून,".. सर्जीराव हात जोडत म्हणाले...
सर्जीरावांचे जोडले गेलेले हात पाहून प्रतापने रागाने त्यांच्या कडे पाहिले... सर्जीरावांनी त्याला शांत राहण्याचा ईशारा केला...
म्हणे माफ करा... आहो गावचे जाणकार ना तुम्ही... अस मंदिरात मारहाण करणे योग्य आहे का?.. आज पर्यन्त कधीच अस झाल न्हवत... आज पहिल्यांदा..
तुमच्या मुळे आणी तुमच्या लोकांन मुळे उरसाच्या या शुभ घटकेला गालबोट लागले...
आहो गाव देवी आणी माता जोगेश्वरिचा भेटीचा दिवस हा.. दूर अंतरावर असलेल्या या बहिणी आज एकमेकींची गळा भेट घेतात आणी तुम्ही या पवित्र क्षणाचा असा अपमान केला...
आहो देवींचा कोप झाला तर त्याचे परिणाम दोन्ही गावच्या लोकांना भोगावे लागतील... आणी तुम्ही साधी चूक झाल्या सारखे माफी मागत आहात... गुरुजी संतापाने बोलत होते.. आणी सर्जीराव निमूटपणे ऐकत होते...
खर तर त्यांना ही राग येत होता... पण ते आपला राग व्यक्त करू शकत न्हवते...
पण अगोदरच चिडलेला प्रताप आजोबांचा होत असलेला अपमान पाहून आणखी बिथरला....
तो तसाच पुढे जाऊ लागला पण सर्जीराव सगळ्यांच्या नकळत त्याच्या पुढे उभे राहिले आणी त्याला माघेच रोखून धरले...
"हरल्या मुळे लोकांची थोडी निराशा झाली.. त्यामुळे धरपकड झाली"..सर्जीराव शांत पणे म्हणाले...
धरपकड तुम्ही याला मामुली धरपकड म्हणता... मारामारी होती ही...
आणी हार जीत होतच रहाते... दरवर्षी श्वेतपुरची पालखी तुमच्या माघून मंदिरात प्रवेश करते.. पण ते लोक कधीच असा गदारोळ नाही घालत...कधीच अशी भांडणे नाहीत करत...
मान्य आहे आमंच्या लोकांनी गदारोळ केला पण गुरुजी त्याला कारण ही तसच होत... हे लोक आमंच्या इतके माघे होते, तरी ही मंदिरात पहिले आले ते कसे?... आम्हाला वाटेत पण कुठेच दिसलें नाहीत... हे काय आकाशातून उडत मंदिरावर उतरले का?.. विक्रमने रागात विचारले..
"विक्रम तू विसरतोस मंदिरात येण्यासाठी फक्त एकच रस्ता नाही... माघे, डावीकडे, उजवीकडे तिन्ही बाजूनां डोंगर आहेत... अजय आणी अभी शिवरीच्या चढाने वर आले... आत्ता ते कसे आले हे विचारणार अशील तर ते देवालाच ठाऊक..कारण इतका भार घेऊन ती निमूळती वाट चढणे फक्त देवालाच शक्य होते... आणी आज त्यांना माँ जोगेश्वरी त्यांना सहायक होती... म्हणूनच हे कार्य पार पडले त्यांच्या हातून... अभिजित कडे पहात गुरुजी अभिमानाने म्हणाले... त्यांच्या डोळयांत अभीसाठी कौतुक दिसत होते... जे पाहून सर्जीराव आणी त्याच्या दोन्ही नातवांचा नुसता चरफडाट झाला होता...
कौतुकास्पद कामगिरी केली दोन्ही भावांनी आणी तुम्ही मात्र गालबोट लावले....
नकार्थी मान डोलवत गुरुजींनी आपल्या शिष्याच्या हातून आरतीची थाळी घेतली आणी मल्लपूर वाल्यांच्या पालखीतील देवीच्या पूजनास निघाले...
जिंकण्याची सवय आहे आमंच्या लोकांना, हार कधी पाहिली नाही त्यांनी,.त्यामुळे झाला थोडा संताप...तरी ही सर्जीरावांनी मगरुळीने उत्तर दिले...
सांगून समजेल असे गुण न्हवते सर्जीरावांच्यात... त्यामुळे गुरुजींनी शांत रहाणेच योग्य वाटले....
"कसा वाटला पार्ट कमेंट्स करून नक्की सांगा आणी फॉलो ही करा "..
धन्यवाद 🙏🤗
"क्रमश"....