अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 Reshma द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3

♥️अभिजित ♥️3

समोर जिजा उभी होती, आपल्या पदराने आपले ओले झालेले अंग झाकत होती.. भेदरलेल्या तिच्या डोळयांतून पाणी वाहत होते, शरीर भीतीने थरथरत होते... तिच्या कोवळ्या मनगटा वर त्या रानटी भीकाच्या बोटांचे ठसे उमटले होते... ते पाहून आबासाहेबांचे रक्त सळसळून उठले....


"बस!!!.... बस झाल!... डोळे मिटून घेत त्यांनी आपल्या संतापाचा उद्रेक होण्यापासून अडवला... पण तरी ही तो संताप रोखला जात न्हवता...

आज पर्यन्त त्यांना वाटतं होत आपण शांत राहिलो तर समोरचा ही शांत होईल पण नाही मल्लपूर वाल्यांना लाथेचीच भाषा समजते आणी त्यांना ज्या भाषेत समजत ते त्याच भाषेत त्यांना समजावून सांगणार होते....

"अभिजित "... डोळे उघडत ते जोरात कडाडले..

त्याचे कान हा आवाज ऐकून  लगेच सतर्क झाले.. बोनेटला टेकून उभा असलेल्या त्याने लगेच सावध पवित्रा घेतला अन त्या आवाजाची लय हवेत विलीन होण्या अगोदरच त्याच्या पायांनी गती घेतली.. त्याच्या पाठी त्याचे भाऊ देखील धावत होते... जणू सगळे याच क्षणाची वाट पहात होते...


"लाल मातीचा गुलाल उधळत वाऱ्याशी स्पर्धा करत तो क्षणात आबासाहेबानं समोर उभा राहिला"...

"निडर, निर्भड, मुत्सद्दी,श्वेतपूरच काळीज,ईनामदरांचा ढाण्या वाघ, आबासाहेबांच्या समोर उभा होता.. त्याला पाहताच श्वेतपुरचा मावळलेला जोश पुन्हा परतला.. कंबरेला लाल पागोटा, कपाळावर टिळा डोळयांत अंगार आणी चेहऱ्यावर हजारो सूर्याचे तेज घेऊन तो समोर उभा होता..


"अभिजित म्हणजे ललकार, अभिजित म्हणजे विजय, अभिजित म्हणजे शवेटचा उपाय, अभिजित म्हणजे जोशाचे कारक, अभिजित म्हणजे श्वेतपुरच मनुष्य रुपी दैवत,. अभिजित म्हणजे आया बहिणीचा रक्षणकर्ता, अभिजित म्हणजे ईनामदरांच्या गळ्यातील ताईत..
समोर त्याला पाहून श्वेतपूर मधील प्रत्येक पुरुषाची छाती अभिमानाने फुगली आणी आया बहिणीच्या चेहऱ्यावर चैतन्य पसरले...

'कोणालाच फरक न्हवता पडत मल्लपुरची पालखी किती लांब गेली याचा',.. त्यांचा दादा आला म्हणजे अंतिम विजय त्यांचाच होता...त्यांचा दादा म्हणजेच विजय होता....गुलालाने भरलेले हात आस्मानात सरसवण्या साठी सळसळत होते...

" जिजाला स्पर्श केलेल्या त्या नाराधमाचा हात मुळापासून उखडून टाक,...
आणी सांग त्या सर्जेरावाला आया बहिणीवर हात टाकणाऱ्याची श्वेतपूर काय गत करते ते"... 
पुन्हा कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे आपल्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची ..
हा आबासाहेब ईनामदार गुन्हे माफ करतो पाप नाही"..... आबासाहेबांच्या डोळयांतून अंगार बरसत होता...
रक्त सळळून उठले होते त्यांचे...
अहिंसा वादी होते ते, पण जगंली श्वापदानां प्रेमाची भाषा नाही समजत त्यांना वेसणच गालावी लागते आणी ती घालायला त्यांच्या कडे ढाण्या वाघ होता....
"अभिजित"...

"अभिजीत ची नजर जिजा वर गेली,खाली मान घालून ती लहानगी पोर थरथरत होती "...

जे कृत्य भिकाजीने केले होते त्याला माफी न्हवती... मुली समान पोरीला हात लावला होता त्याने.. ज्या हाताने त्याने जिजाला स्पर्श केला होता त्या हाताला मुळापासून उपटल्या शिवाय तो ही शांत बसणार न्हवता...त्याचा राग उफाळून वर आला... 
आपल्या अंगावरील शर्ट काढून त्याने तो भिजलेल्या जिजाच्या अंगावर टाकला... 

अन ताडताड पावले टाकत तो पालखी जवळ गेला...
आजचा काठी पालखीचा मान काहीही करून मिळवायचा होता त्याला जेणे करून उद्या सर्वासमक्ष तो भिकाला शिक्षा करेल...
त्याची उघडी छाती स्पूरन पावली... पुढे होत त्याने पालखीची पुढची धुरा संभाळली... तसे त्याचे बलदंड  भाऊ फुगले गेले....शिरान शिरा ताठरल्या... अगदी माने पासून हातापर्यंत त्या टरटरून फुगल्या गेल्या...
गावातील स्त्रिया बाहेरून आलेला स्त्री वर्ग सगळे भान हरपून त्याच्या कडे पहात होते...
तो केवळ बलदंडच न्हवता तर तितकाच देखणा ही होता... बल आणी रुप दोन्हीची देणगी प्राप्त होती त्याला...
खांद्यावर पालखी घेत त्याने तसेच आपले कडे माघे सरकवले...

" मगSs चलायचे "ss..माघून आवाज आला तश्या डोळयांतील बाहुल्या किंचित माघे फिरवत त्याने ओठ किंचित वर सरकवले.. जिथे अभी तिथे तो असणारच हा अस्सललिखित नियमच होता..
माघे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ही स्माईल होती..
इतक्या वर्षानी त्यांनी पालखी खांद्यावर घेतली होती...इतके वर्ष ज्या गोष्टी साठी ते  तगमगत होते.. ती गोष्ट करण्याचा त्यांना चान्स भेटला होता... आजतर यश त्यांचेच होते..

"माता जोगेश्वरीच्या नावानं sssss"चांगभल".... आसमानात ललकार उमटली आणी दोघे भाऊ वाऱ्याच्या वेगाने धावू लागले..

'पुढे अभी माघे अजय'..
ती राम लक्ष्मणाची जोडी एका लईत एका तालात धावत होती..
जिथे अभीचा पाय उमटत होता त्याच ठिकाणी अजयचा पण पाय पडत होता...
पांदीचा रस्ता सोडून ते डोंगराच्या चड्यावर चडू लागले ...
एकसारखी सरळ चढण ती,..पण ते भाऊ पालखी खांद्यावर घेऊन धावत चढत होते.. जिथे आधारा शिवाय पाय ठेवणे कठीण होते तेथे हे भाऊ धावत होते.. लोकांनी तर तोंडावर हात ठेवले होते... पण त्या दोघांच्या चेहऱ्यावर मात्र हसू होते.. अखेर त्यांची इतक्या वर्षाची प्रतीक्षा जी संपली होती..
गेले पाच वर्ष आबासाहेबांच्या माघारीच्या धोरणा मुळे त्यांना शांत बसाव लागत होते, .. नाहीतर मल्लपूर वाल्यांना क्षणात सुता सारखे सरळ करण्याचा दम होता त्या मनगटा मधून....प्रतापच्या सात पिढ्यांनी गाजवला नसेल इतके शौर्य दाखवण्याची ताकद होती त्या दोन वादळानं मध्ये... पण हे वादळ फक्त आणी फक्त आबासाहेबांन मुळे आजवर शांत होतीत.

"त्या दोघांच्या माघे, अरुण संजय आणी इतर तरुण मुले ही धावत होतीत पण ते त्यांच्या जवळ पोहचत पर्यन्त अभी अजय नजरे आड झालेले"...

"प्रतापची व्हाईट मर्सडीज देवळाच्या आवारात येऊन उभी राहिली,डोळ्यां वरचें सनग्लासेस काढत तो  उडी मारूनच गाडीतून खाली उतरला"..

"बाज्या कुठ वर आलीत र ही "?..अंगाला आळूके पीळुके देत प्रताप ने विचारले... त्या खडबडीत कच्चा रस्त्यामुळे शरीर अवघडून आले होते त्याचे...

एका उंच दगडा वर चढत बाज्या न खाली पाहिले...

"खिंडीत आल्यात"..तो खुशीत म्हणाला..

ते ऐकून प्रतापच्या ही चेहऱ्यावर आनंद पसरला.. खिंडीत आल्यात म्हणजे पुढच्या पाच दहा मिनिटात ते इथ असतील.. म्हणजे या वेळेस ही विजय आपलाच... एकदम खुश होत प्रताप त्या उंच दगडावर चढला..अन खाली डोकावले... मल्लपूर वाल्यांचे आवाज ऐकू येत होते...
आणी दुरवर श्वेतपूर वाले ही चालत येताना दिसत होते.

"मला समजत नाही हा आबा नक्की श्वेतपुरचा पुढारी आहे का  आपला?". 
नाही म्हणजे.. प्रत्येक वेळी आपल्याच भल्याच करतो म्हणून विचारलं... बज्या डोक खजवत हसत म्हणाला 

"हुम्म्म ss यड हाय ते आबा... स्वतःला गांधी समजतो आणी आपल्याला इंग्रज त्याच्या मते शांत राहून आंदोलन केले म्हणजे आपण पळून जाऊ".. खिश्यात ठेवलेले सनग्लासेस पुन्हा डोळ्यांवर चढवत प्रताप गालात हसून म्हणाला...

पण त्याला माहित नाही इंग्रज चरख्या मुळे नाही तर काठी मुळे पळून गेलीत... असो आपल्याला काय करायचय?..जो पर्यन्त अहिंसेचें भूत त्याच्या मानगुटीवर आहे तो पर्यन्त आपण आपली चांदी करून घ्यायची बस ...प्रताप एटित उभा रहात म्हणाला..

आणी हे भूत कधीच नाही उतरणार त्या आब्याच्या मानगुटी वरून तो गांधी भक्त जो हाय.. बज्या..

आणी आपण कधी ते उतरू पण द्यायचे नाही.. त्याच्याच हातांनी त्याचा वंश संपवून टाकायचा.. आणी मल्लपूर सारख श्वेतपूर वर ही ताब्यात घ्यायच . 
बज्या लिहून ठेव,..या दोन गावावर एकदिवस माझ राज्य असेल,.. आणी या दोन गावांचा मी राजा असेल .. आणी तुम्ही भिकारडे लोक माझी प्रजा... दोन्ही हात हवेत पसरवून प्रताप क्रूर हसत म्हणाला..

त्यावर बज्या ही कसनुसा हसला.. नाही म्हणल तरी भिकारड म्हणलेले कोणाला आवडेल...


"त्याच वेळी मल्लपुरची पालखी खिंड चढून वर आली ".. तसा प्रताप आणखी खुश झाला..



झाली बर का टशनला सुरवात,..कथेच्या सुरवाती पासूनच युद्धाची ललकार छेडलिया.... लवकरच हिरोईन सुद्धा येईल... सोबत पूर्ण इनामदार कुटूंब ही.....बाकी पार्ट कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा,.आणी स्टोरी आवडत असल्यास फॉलो सुद्धा करा 
धन्यवाद 🙏🤗🙏🥰

"क्रमश "...




"