मनस्वी आणि बोलणारी जादूची बाहुली gauri kshirsgar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनस्वी आणि बोलणारी जादूची बाहुली

मनस्वी 6वर्षांची गोड मुलगी होती. ती गावाकडे  राहायची. तिला गोष्टी ऐकायला आणि प्राण्यांशी खेळायला खूप आवडायचं. तिचे बाबा तिला नेहमी म्हणायचे "बेटा, चांगली मुलगी बन".वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच घरात धामधूम होती. आईने मनस्वीचा आवडता पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. सगळे पाहुणे आले आणि गिफ्ट देऊ लागले. आज वाढदिवस होता. तिला खूप सारे गिफ्ट मिळाले. पण सगळ्यात आवडलेली भेट होती एक सुंदर बाहुली. तिचे डोळे मोठे मोठे आणि फ्रॉक गुलाबी रंगाची होती.रात्री झोपताना मनस्वीने बाहुलीला जवळ घेतले आणि म्हणाली, "शुभ रात्री मैत्रिणी."बरोबर रात्री 12 वाजता... "टिक टिक" मनस्वी जागी झाली. तिने पाहिलं तर बाहुली हसत होती! "हॅलो मनस्वी, मी परी आहे. मी एक जादूची बाहुली आहे" बाहुली बोलली."खरंच? तू बोलतेस?" "हो, आणि मी तुला जादूच्या बागेत घेऊन जाणार आहे. चल जाशील का?" मनस्वीने होकार दिला.परीने काठी फिरवली आणि एकदम झोपळा आला. दोघी झोपळ्यात बसल्या आणि आकाशात उडू लागल्यामनस्वी झोपळ्यात बसली होती तेव्हा तिला खूप भीती पण वाटत होती आणि मजा पण येत होती. "मी खरंच उडतेय का?" ती स्वतःलाच विचारत होती. खाली जमीन लहान लहान दिसत होती. तारे तिच्या जवळून जात होते. तिला वाटलं हे स्वप्न आहे का? पण परीचा हात घट्ट धरल्यावर तिला खात्री झाली की हे खरं आहे.थोड्याच वेळात त्या एका सुंदर बागेत पोहोचल्या. तिथे बोलणारी झाडं होती, रंगीबेरंगी फुलं होती.एका कोपऱ्यात एक छोटं ससा रडत बसला होता. मनस्वीने त्याचा काटा काढला आणि पट्टी बांधली. "धन्यवाद मैत्रिणी" ससा म्हणाला.एक छोटा पक्षी पण पडला होता. मनस्वीने त्याला पाणी पाजलं आणि घरट्यात ठेवलं."तुला बाग कशी वाटली बागेतून जाताना मनस्वीने सगळ्या प्राण्यांना बाय केलं. ससा म्हणाला "परत ये". माकड म्हणाला "धन्यवाद". फुलपाखरू तिच्या डोक्यावर बसलं. परी म्हणाली "बघितलंस, एका छोट्या मदतीने किती आनंद मिळतो". मनस्वीने मान हलवली. तिला खूप अभिमान वाटला. परीने विचारलं."प्राण्यांना मदत करून खूप मजा आली" मनस्वी म्हणाली.परी हसली. "खरी जादू काय आहे माहिती आहे? चांगुलपणा हीच खरी जादू आहे मनस्वी. आपण इतरांना मदत करतो तेव्हा जादू होते."पहाट झाली. "जायची वेळ झाली. चांगुलपणाची जादू पसरव" परी म्हणाली.मनस्वी डोळे उघडते तर ती खोलीत होती. त्या दिवसापासून ती रोज कोणाला मदत करते.पुढे गेल्यावर त्यांना एक माकड दिसला. त्याचा हात झाडाच्या फांदीत अडकला होता. मनस्वीने हळूच त्याला सोडवलं. "तू खूप धाडसी आहेस" माकड म्हणाला.नंतर एक फुलपाखरू रडत होतं. त्याचे पंख ओले झाले होते. मनस्वीने त्याला वाळवून परत उडायला मदत केली. "तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली की नशीब" फुलपाखरू म्हणालं.दुसऱ्या दिवशी शाळेत मनस्वीने एका नवीन मुलीला मदत केली. तिची पेन्सिल तुटली होती. मनस्वीने तिला आपली दिली. तेव्हा तिला परीचे शब्द आठवले - "चांगुलपणा हीच खरी जादू".आता मनस्वी रोज कोणाला ना कोणाला मदत करते. कधी आईला भांडी घासायला, कधी आजोबांना वाचायला. आणि तिला वाटतं तिची जादूची मैत्रीण परी तिला वरून बघतेय आणि हसतेय.पहाट झाली आणि परी म्हणाली "आता जायची वेळ झाली". मनस्वीला खूप वाईट वाटलं. "तू परत येशील का?" तिने विचारलं. परी हसली आणि म्हणाली "मी नेहमी तुझ्या मनात आहे. जेव्हा जेव्हा तू कोणाला मदत करशील तेव्हा मी तुझ्याजवळ असेन". डोळे उघडल्यावर मनस्वीला कळलं की खरी जादू बाहेर नाही, आपल्या मनात आहे. त्या दिवसापासून ती शाळेत, घरी, रस्त्यात... जिथे जाईल तिथे मदत करते. आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असतं.दुसऱ्या दिवशी मनस्वीने आईला स्वयंपाकात मदत केली. बाबांचा चष्मा शोधून दिला. शेजारच्या आजीला भाजी आणून दिली. सगळे म्हणाले "किती चांगली मुलगी आहे". मनस्वी फक्त हसली. तिला माहित होतं हीच खरी जादू आहे. लेखिका.गौरी क्षीरसागर