Story Title: टोपलीवाला काका आणि जादूचे फळकराड जवळच्या "सुखगाव" नावाच्या छोट्याशा गावात टोपलीवाला काका राहत होते. त्यांचं वय सत्तर वर्षं होतं. अंगावर नेहमी जुनं धोतर आणि डोक्यावर फळांची टोपली असायची. पायात चपला नसल्या तरी त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा.काका सकाळी 4 वाजता उठायचे. जंगलात जाऊन आंबे, पेरू, चिकू गोळा करायचे. मग ते गावातल्या शाळेच्या बाहेर उभे राहायचे. सुट्टी झाली की जी मुलं गरीब होती त्यांना हात 1-1 फळ द्यायचे आणि म्हणायचे, "बाळांनो, पोट भरून खा. अभ्यास करून मोठे व्हा. गावाचं नाव मोठं करा."गावात जवळपास 50 घरे होती. त्यातली 15 घरं खूप गरजू होती. पावसाळ्यात त्यांच्या घरात चूल पण पेटत नव्हती. काका आपलं पोट अर्धपोटी ठेवून पण त्या मुलांना फळं द्यायचे. म्हणून लोक त्यांना "देवमाणूस" म्हणायचे.पण गेल्या 2 महिन्यांपासून पाऊस पडला नव्हता. झाडांना फळं लागेनाशी झाली. काकांची टोपली पण रिकामी राहू लागली. एके दिवशी काका जंगलात गेले. खूप शोधूनही काही मिळालं नाही. ते एका मोठ्या झाडाखाली बसले आणि रडायला लागले, "हे देवा, या गरजूंचं काय होणार? माझ्यामुळे एका मुलाचं पोटही भरत नाहीये."तेवढ्यात त्या झाडावरून एक सोनेरी प्रकाश आला. आणि एक चमकणारा आवाज आला. "काका, रडू नका. मी जादूचे झाड आहे. तू 40 वर्षांपासून निस्वार्थपणे सेवा केलीस. म्हणून मी तुला मदत करायला आलो आहे. तू जे फळ तोडशील ते लगेच 10 पटीने वाढेल. पण एक अट आहे. हे फक्त गरजू लोकांसाठीच वापरलं पाहिजे. स्वार्थासाठी वापरशील तर फळं मिळणार नाहीत."काका खूप खूश झाले. त्यांनी हात जोडले आणि घरी आले. त्यांनी 1 आंबा तोडला आणि काय आश्चर्य! तो 1 आंबा 10 आंबे झाला. काकांनी सगळ्या गरजू मुलांना, आजी-आजोबांना वाटले. सगळे खूप खूश झाले. "काकांचा चमत्कार" अशी चर्चा गावभर झाली.पण गावातला सावकार हरिया शेठ हे बघत होता. त्याच्याकडे आधीच खूप पैसा होता. पण त्याला अजून लालच आली. "हे झाड माझं झालं पाहिजे. म्हणजे मी रातोरात श्रीमंत होईन" असा विचार करून तो रात्री 12 वाजता चोरून जंगलात गेला. त्याने पिशवीत झाडाची 100 फळं तोडली आणि हसत हसत म्हणाला, "आता मी सगळ्यात श्रीमंत."पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने पिशवी उघडली... तर आत 100 फळांऐवजी 1000 काटे होते!! सावकाराच्या अंगाला सगळे काटे टोचले आणि तो "आऽ आऽ" करून पळाला. गावकरी हे बघून खूप हसले.काका घाबरून झाडाकडे गेले. तेव्हा झाड हसून म्हणालं, "काका, ही माझी परीक्षा होती. स्वार्थी माणसांसाठी मी काटे देते, आणि गरजूंच्या सेवकांसाठी फळं देते. तू काळजी करू नकोस."त्याच आठवड्यात गावात मोठा दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या झाल्या. शेतात धान्य नव्हतं. लहान मुलं भुकेने रडू लागली. काका धावत झाडाकडे गेले. त्यांनी फक्त 1 दाणा गहू तोडला. आणि काय चमत्कार! 10 पोती गहू तयार झाले. काकांनी 3 महिने संपूर्ण गावाला खायला दिलं. कोणतंच मूल उपाशी झोपलं नाही.ही बातमी ऐकून राजा पण बक्षीस द्यायला आला. राजा म्हणाला, "काका, मागा काय हवंय? सोनं, चांदी, महाल?" काका हात जोडून म्हणाले, "महाराज, मला काही नको. फक्त एक विनंती आहे. हे जादूचे झाड आमच्या गावातल्या शाळेत लावा. म्हणजे मुलांचं भलं होईल."राजाने तसंच केलं. झाड शाळेच्या मोठ्या अंगणात लावलं. आणि मग सगळ्यात मोठा Twist झाला... त्या झाडावर आता फळं येणं बंद झालं. त्याऐवजी फांद्यांवरून पुस्तकं पडू लागली!! जी मुलं मन लावून अभ्यास करायची, चांगले गुण मिळवायची, त्यांच्या हात नवीन पुस्तक, वही, पेन्सिल पडायची.तेव्हा काका मुलांना म्हणाले, "बाळांनो लक्षात ठेवा. फळं एक दिवसाचं पोट भरतात. पण ज्ञान मात्र आयुष्यभराचं पोट भरतं. गरजूंना मदत करा, स्वार्थ सोडा, आणि नेहमी चांगलं वागा."तेव्हापासून त्या गावाचं नाव "ज्ञानगाव" पडलं. आणि टोपलीवाला काका आजही शाळेत बसून मुलांना गोष्ट सांगतात. शिकवण: सेवा करा, स्वार्थ सोडा, आणि ज्ञान वाटा - हेच खरे दान आहे.लेखक. गौरी क्षीरसागर