Ruthless Love - 7 My imaginary world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • मुक्ता....??️ - 6

             6.मला जगायचे आहे.....आ ssss विकास sss अरे विकास sss...

  • ऑपरेशन ब्लॅक ताज - 8

      पावसाचा जोर आता जीवघेणा झाला होता. मुंबईच्या कोस्टल रोडच्य...

  • Mr. Money - भाग 6

    जफर खान आणि शेट्टी भाईच्या अंतानंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगत...

  • Ruthless Love - 7

    त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाल...

  • तोतया वारसदार - भाग 59

     तोतया वारसदार पात्र रचना निशांत                      - शोधक...

श्रेणी
शेयर करा

Ruthless Love - 7

त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाली आला होता, ज्यामध्ये तिचे अंतर्वस्त्र दिसत होते, तर समोरं चा माणूस तीची क्लि्वेज साफ पाहू शकत होता,.



त्याला ड्रेस म्हणावं का हा ही प्रश्नच होता, ती बिचारी कसतरी त्याला सांभाळून घालत असे आपली लाज झाकण्यासाठी.




मागून तीची पूर्ण पाठ मोकळी दिसत होती, तिच्या साईजपेक्षा किती तरी मोठा साईझ तिला दिला होता, आणि ही सर्व त्या डायरेक्टरं ची कृपा होती,.



त्याने धाडकन गेट उघडलं आणि तो आत मध्ये गेला,. तस त्यांनी तिला सोडलं,.. 


तिने बिचारीने आपला ड्रेस सावरत भिंतीचा सहारा घेऊन उभी झाली,..

ती डायरेक्ट आत मध्ये आल्याने ते दोघे घाबरले,. त्यातील डायरेक्टरं म्हणाला,

"मिस्टर ठाकूर तुम्ही इथे, यावेळी! ती तिचं इंजेकशन घेत नव्हती त्यामुळे तिला पकडून देत होतो बाकी काही आमचा उद्देश नव्हता ".


"तुमचा काय उद्देश होता आणि काय नाहीं तो मी चांगलाच पाहिला, now get out ".  असं म्हणून आर्यन गरजला,..


घाबरून उभी राहिलेली, तिने त्यांच्याकडे पाहण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीं,.

आणि का म्हणून पाहिलं ती, ज्याच्या मुळे ती या हाल अपेष्टा सहन करत होती त्याच्या कडे पाहायचं तरी काळीज होईल का तिचं..


ती सुन्न मनाने तिथे उभी होती,..


तो चालत तिच्याजवळ गेला,..
आणि तिच्या जवळ जाऊन तिच्याकडे एकटक पाहत होता, हळूच त्याने तीची हनुवटी वरती उचलली आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला,..


तिने आपली नजर खाली केली होती, तीची तर त्याला पाहायची सुद्धा इच्छा होत नव्हती.


"नजर वर करून मला पाहणार सुद्धा नाहीं, का?

च्यू... च्यू.. च्यू... की तुझी स्वतः ची नजर एवढी कमजोर झाली इथे राहून की तुला मी तुझ्या पुढे दिसणं बंद झालं." आर्यन म्हणाला..


तिने नजर वर करून डोळ्यात पाहिलं त्याच्या, पण हे काय त्याला त्या नजरेत पश्चाताप दिसायला पाहिजे होता, तिच्या वडिलांच्या कृत्यासाठी तिथे तीची नजर अगदी खाली होती,.. बिल्कुल निस्तेज,...


"जर तुझं पाहून झालं असेल, किंवा हसायचं असेल तर तु हसू शकतो,.. 


तसही तुला समाधान वाटेल असं आता मी काही करू शकत नाहीं,..


पण मी तुला मरणाची भीक मागते की प्लिज मला मारून टाक,. 


त्याने तरी तुझं मन शांत होईल एकदाच " असं म्हणून ती उदास हसली,...




आणी शेवटी तिचा बांध फुटला, ती खाली कोसळून त्याच्या पाया जवळ बसली आणि त्याचे पाय पकडून विनंती करत होती की तिला मारून टाकाव.




"प्लिज.... प्लिज... तु कधी माझ्यावर प्रेम केलं असेल तर प्लिज मला मारून टाक...

तु एका झटक्यात माझा जीव घे, मी पाया पकडते तुझ्या,.. 


मला या नरकात नाहीं राहायचं आहे जिथे मला रोज ह्युंमिलेट व्हावं लागतं,..


रोज अशा हवशी नजरांना समोर जावं लागतं, ती त्याच्या पाया पडत मरणाची भीक मागत होती,..."..



******

क्रमशः

काय आर्यन तिला त्या नरकातून मुक्त करू शकेल?
की त्या निर्दयी डायरेक्टरचा पुढचा डाव आर्यनलाच अडचणीत आणेल?

आर्यनच्या त्या निर्विकार चेहऱ्यामागे नेमकी कोणती योजना दडली आहे? तो शांत आहे... की वादळ येण्यापूर्वीची ती भयावह शांतता आहे?

त्या असायलममध्ये नेमकं काय चाललं आहे? त्या मुलीच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांचा खरा चेहरा जगासमोर येईल का?

या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत कथेच्या पुढील भागात!

आर्यनचा खरा अवतार, त्याची बुद्धिमत्ता, धाडस आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष पाहण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की वाचा!

💬 तुमच्या मते पुढे काय घडेल?
आर्यन आत गेल्यानंतर त्याची पहिली चाल काय असेल?

तो सत्याचा पर्दाफाश करेल, की त्याच्यासमोर आणखी एखादं धक्कादायक रहस्य उघड होईल?
तुमचे अंदाज आणि मतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇

❤️ कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आताच फॉलो करायला विसरू नका! 🔔✨

प्रत्येकाचे मत माझ्या साठी महत्वाचे आहे, तर प्रत्येक वाचकाने कमेंट करा 🙏