"कोथिंबिरीची वडी "
"मी 3 वर्षांपासून पुण्यात Job ला आहे.
वडील मी लहान असतानाच गेले... त्यामुळे आई गावी एकटीच राहते....
पुण्या पासून गाव लांब नाही..
त्यामुळे दर शनिवार रविवार गावी जाते आणी सोमवारी सकाळी सकाळी कामावर परतते.....
काल ही रविवार असल्याने गावीच गेले होते.. आणी आत्ता कामावर परतत होते..
"नेहमी सारखा आज ही आईने दोन दिवस पुरेल इतका डबा भरून दिलाय... रात्री खाते मी पण दुपारी मात्र ऑफिस मध्ये नाही नेत...
ऑफिस मधील माझा स्टाफ पिझा बर्गर वाला...
ही भाकरी आणी कोथिंबिरीची वडी पाहून नाक मुरडतात..
अगोदरच माझ्या माघे मला गावठी चिडवतात त्यात हा असा स्टीचा डबा आणी त्यातील भाजी भाकरी पाहून आणखी चिडवतील...
म्हणून तो डबा मी तसाच तळाशी ठेवला...
"आई रोज रात्री फोन करून विचारायची
"बाळा, जेवलीस का?"..
'आज ही विचारले... मला आवडतात म्हणून तिने खास कोथबिरीच्या वड्या ही केल्या होत्या.. पण आत्ता मला बाहेरच खायची सवय लागल्याने हे जेवण नको वाटायच..
पण आईच्या जेवणाचा अपमान नको म्हणून मी ते फेकून दयायचे नाही..
रस्त्यावर असलेल्या उपाशी लोकांना दयायचे.. मी नाही तर ते तरी आईच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचे...
या आठवड्यात गावाला जाताच आले नाही... आणी काम जास्त असल्याने फोन ही केला नाही..
आई रात्रीची फोन करायची.. पण ऐका मैत्रिणीचा बर्थडेचीं पार्टी असल्याने आम्ही बाहेर गेलो.. त्यात तिचा कॉल रिसिव्ह केला नाही... आणी पुढे तिचा फोन आला ही नाही..
पण रविवारी मी गेले नाही तरी माझा डबा मात्र न चुकता आला... जवळच्याच ओळखीच्या माणसा जवळ ती तो न चुकता पाठवत होती..
आणी मी ही तो न चुकता.. गेट जवळ उभ्या असलेल्या भिकाऱ्याचा ताटात टाकून देत होती..
"असे किती दिवस झाले समजलंच नाही.. पण काल अचानक आठवले... आपण गेले महिनाभर झालो गावाला गेलो नाही की पंधरा दिवस झाले आईशी बोलो नाही..
माहित नाही पण का मनात उगाच हुरहूर दाटली... तिच्या पोळी भाजीची ओढ प्रकर्षाने वाटली....
का कुणास ठाऊक?.. पण अपराधी पणाची भावना मन तीळ तीळ तोडू लागलेली...
मी लगेच बॅग भरली, आणी गावाला निघाले..
गावाच्या वेशी जवळ गाडी थांबली... आणी माझी पावले झप झप घराच्या दिशेने निघालीत..
"दारातच लोकांचा जमाव जमलेला होता,..
शेजारच्या काकू जोर जोरात ओरडत होत्या..
"ती बघा प्रिया आली... कोणी तरी माझ्याकडे बोट दाखवले... तश्या काकू रडतच माझ्या गळ्यात पडल्या..
"काय झाल काकू?"..
विचारायच ही माझ धाडस झाल नाही... मन भीतीने ग्रासल होत...
काय झाल असेल?.. हा विचार ही हृदय तोडत होता..
रात्री भेटलेल्या मला.. म्हणाल्या प्रियाला डबा बनवून दयायचाय... बाहेरच खाऊन तब्बेत बिघडेल तिची सारखं बाहेरच खाते.. ऐक दिवस तरी घरच ताज सकस अन्न गेल पाहिजे तिच्या पोटात,..
पण सकाळी नऊ वाजले तरी दरवाजा उघडला गेला नाही म्हणून पहायला गेले तर तुझ्या साठी डबा बनवता बनवताच त्या ss "..
काकूंना हुंदका आडवता आला नाही.
"आई ss ".. मी टाहो फोडला..
आणी धावत आत गेले..
"आई किचन वट्या जवळ पडली होती...तिला हृदय विकाराचा झटका आलेला... आणी त्यांतच ती ss..
" तिच्या हाताला अजून ही पीठ लागले होते.. किचन वर माझ्या साठी बनवलेला डब्बा होता....
त्यावर चिट्टी होती..
"आठवणीने खा"..
"मी रडता रडताच ऐक घास तोंडात टाकला...
आणि हाय ओकून रडले.
त्या रात्री स्वप्नात आई आली.
हातात डबा घेऊन म्हणाली "बाळा, आज तरी वेळेवर जेवलीस का?"
"मी तरसते तिच्या हातातील डब्यातील दोन घास खाण्यासाठी "..
"आई पाठव ना ग डबा, पण आत्ता आई न्हवती डबा पाठवायला... "..
"दर रविवारी मी वाट पहात उभी असते... पण माझ्या वाट्याचा डब्बा येणे बंद झालंय..
"आज ही गेट जवळ उभी राहून डब्याची वाट पहात उभी आहे..
तोच समोरून ऐक मुलगी आली आणी तिने हातातील डबा त्याच भिकाऱ्याच्या थाळीत खाली केला..
कोथबिरीचीं वडी आणी भाकरी...
ते बघून माझे डोळे चकाकले...
ती निघून गेली आणी मी धावत जाऊन त्या भिकाऱ्याच्या थाळीतील जेवण आधाश्या सारखी खाऊ लागले..
त्या जेवणाला आईच्या हातची चव होती..
जणू हा डबा माझ्यासाठीच होता....
*समाप्त*