चतुर व्हा 1 MB (Official) द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चतुर व्हा 1

चतुर व्हा

© COPYRIGHTS

This book is copyrighted content of the concerned author as well as MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.

MatruBharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

लग्नातली देणी—घेणी

उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसर्‌या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वतरूचं मरण स्वतरूच ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्‌यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.

एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, श्कोन तुम्ही ?

प्रधान म्हणाला, श्मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.

ते एकुण गोसाव्यान विचारलं, श्राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्‌यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?

यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसर्‌या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ श्राम रामश् म्हणत राहून स्वतरूचीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?

प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, श्प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्‌यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?श् तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.

दुसर्‌या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, श्महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?

राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, श्महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.

राजा प्रधानाला म्हणाला, श्प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फिरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.श् राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या—जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.

संध्याकाळी फिरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, श्बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?

त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक कल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, श् महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला

सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.

यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, श्महाराज ! त्या फांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, श्तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर स्त्रीधन म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?

राजा आश्चर्यानं म्हणाला, श्अरे वारू ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?

गोसावी म्हणाला, नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.

वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फरक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन—पोषण करु लागला.

अग्रपूजा

यज्ञ, विवाह, इत्यादी धार्मिक विधींचे वेळी पूअग्रपूजेचा—म्हणजे प्रथम —पूजेचा मान कोणत्या देवाला

द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले. अखेर हा तंटा ब्रम्हदेवाकडे गेला असता, ते म्हणाले, आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा. श्सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला.

मग प्रत्येकजण आपापल्या वाहनावर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर ! श्री गणपतीनं विचार केला श्आपलं वाहन उंदीर ! एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य ! हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली.

त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, श्आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? पार्वती म्हणाली, ही रे काय थट्टा आरंभलीस? श्यावर गणपती म्हणाला, आई ! वडिलाधार्‌यांचं लहानांनी कावं, पण वडिलधार्‌यांनी मात्र लहानांच कू नये असा काही नियम आहे का? मी काही तुझी थट्टा करण्याच्या हेतूनं तुला बाबांजवळ बसायला सांगत नाही. तसं सांगण्यामागे माझा काही हेतू आहे. श्गणपतीचे हे उदगार कून भगवान शंकर म्हणाले, पार्वती, गणपती म्हणतो आहे ते खरं आहे. तो कारण असेल तेव्हाच बोलतो व योग्य असेल तीच कृती करतो. तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ?

पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणपतीनं त्या दोघांना सात पृथ्वीप्रदक्षिणेला निघून गेले असता, हा स्थूलदेही गणपती ती प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणपतीनं आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच म्हणणं मान्य करावं लागलं.त्यानंतर कमी अधिक कालांतरानं इतर सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करुन ब्रम्हदेवांकडे परत आले व विजयी स्पर्धक कोण, याबद्दलच्या निकालाची उत्कंठेनं वाट पाहू लागले.

तोच ब्रम्हदेव सवार्ंपूढे उभे राहून म्हणाले, श्आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणपतीनं त्याच्या आई—वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सवार्ंच्या आधी मजकडे आलाय म्हणून अग्रपूजेचा अधिकारी तो असल्याचा निर्णय मी देत आहे.

मोहिनी

एका धिप्पाड व शक्तीमान राक्षसानं आपल्याला सिध्दी प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या सुरु केली.खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, श् हे राक्षसा ! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहेय तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो तुला देइन.श्यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला, श् हे शंकरा ! मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल, अशी सिध्दी तू मला दे. मला दुसरे तिसरे काही नको.श्या राक्षसाला आपण हा वर दिला, तर तो काय अनर्थ करुन सोडील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी श्तथाऽस्तुश् म्हणून त्याला तो वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले.

परंतु त्या वरामुळं तो राक्षस एवढा उन्मत्त बनला की, जो दिसेल व त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करु लागला. जग त्याला श्भस्मासूरश् या नावानं ओळखू लागलं व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागलं.

एकदा तर भस्मासूर प्रत्यक्ष वर देणार्‌या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचं भस्म करण्यासाठी त्यांचा पाठलाग करु लागला, तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले.सरळ द्वंद्वयुध्दात या भस्मासुरांपुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्यानं भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रुप घेतलं आणि भस्मासूरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनींच ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर, ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करु लागला.

आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून, मोहिनीचं रुप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवलाय त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले. आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वतरूच स्वतरूचे भस्म करुन घेतले !

अक्काबाईची आराधना

एका गृहस्थाची परिस्थिती अगदीच बेताची होती. त्याला एका अधिकारी सत्पुरुषाकडून लक्ष्मीला, त्याचप्रमाणे दारिद्रयाची देवता अवदसा हिला प्रसन्न करुन घेण्याचे, असे दोन प्रभावी मंत्र मिळाले.

तो गृहस्थ लक्ष्मीच्या मंदिरात गेला, पण तिला प्रसन्न करुन घेण्यासाठी तिची प्रार्थणा करायला आलेल्या लोकांची तिथे एवढी झुंबड उडाली होती की, बराच प्रयत्न करुनही त्याला त्या मंदिरात प्रवेश मिळेना.तितक्यात त्याचं लक्ष जवळच असलेल्या अवदसेच्या मंदिराकडे गेलं ते मंदीर पाहताच त्याच्या मनात एक वेगळीच कल्पना चमकली व त्याची पावले त्या मंदिराकडे वळली.

त्या मंदीरात शुकशुकाट होता. गार्भायात असलेल्या मुर्तीपुढे त्याने अनुष्ठान सुरु केले व ते संपताच त्याने तिला प्रसन्न करुन घेण्याचा प्रभावी मंत्र म्हटला. त्याबरोबर प्रकट होऊन तिनं त्याला विचारलं, श्ओळखलंस का तू मला? मी अवदसा उर्फ अक्काबाई आहे. माझी आराधना करुन, मला प्रसन्न करु पाहणारा तू पहिलाच माणूस आहेस. बोल, तुला काय हवंय ? आहे त्यापेक्षा अधिक दारिद्रय हवं ? की दुर्बुध्दी हवी ? की व्यसनाधीनता हवी ? यापैकी तू मागशील ते मी देइन.श्

यावर तो गरीब चतूर माणूस हात जोडून तिला म्हणाला, हे अवदसे! तुझी किंचीतही द ष्टी माझ्यावर किंवा माझ्या वंशजावर पडू नये, एवढेच माझे तुजकडे मागणे आहे.श्अवदसा शब्दात अडकून गेली होती, तिला त्या गृहस्थाचं मागणं मान्य कराव लागलं. पण त्यामुळे त्या गहस्थाच्या घरातलं दारिद्रय जाऊन त्याची परिस्थिती भराभर सुधारु लागली.

शंकराचं उत्तर

सबंध वर्षभर उनाडक्या करण्यात घालविलेला एक विद्यार्थी परीक्षा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरच्या शंकराच्या देवळात गेला, आणि गार्भायाच्या तोंडाशी उभा राहून व शिवलिंगाकडे तोंड करुन नमस्कार करीत म्हणाला,

भगवन, शेर हजारोंकी किस्मत तेरे हाथ में है ध्तो मुझे पास करना, क्या तेरे लिये बडी बात है

?त्याची ती विनंती पूर्ण होताच गार्भायातून आवाज निघाला — शेर किताबोंकी किल्ली तेरे हात में है ?