Complicated Love - 5 Adv Nikhil Deore द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Complicated Love - 5

भाग 4 वरून पुढे 

" आता कसं वाटतय तुला ?" डॉक्टरांच्या प्रेमळ शब्दांनी भूतकाळात हरवलेली अदिती वास्तविक जगात परतली. 
केळीच्या गाभ्यासारखे तिचे नाजूक हात वेदनेने  जखडले होते. चेहऱ्यावरील तेजस्वी कांती कुठेतरी विरून गेली  होती. लहानशी हालचाल करण्यातही तिला बराच त्रास जाणवत  होता. लांबसडक अगदी झुपक्या झुपक्याने बहरणाऱ्या देवदार वृक्षाप्रमाणे  तिच्या  मनात भूतकाळातल्या आठवणी  बहरल्या होत्या. 
" हो आता ठीक आहे मी" शब्दांची जुळवाजुळव करीत अदिती म्हणाली. 
" तुझ्या घरच्यांना आम्ही तुझ्याबद्दल कळवलंय काही वेळातच तुझे आई बाबा येईल इथे.   तुझी प्रकृतीही  आता काहीशी स्थिरावलीय तुला आता जनरल खोलीत हलवायला काही हरकत नाही". धीर देत डॉक्टर म्हणाले. अदितीनेही फक्त होकारार्थी मान डोलावली. अदितीला ICU मधून  जनरल खोलीत  हलविण्यात आले. अदितीच्या चेहऱ्यासमोर त्याच्याच चेहरा परत परत येत होता. तिच्या मनाच्या सरोवरात त्याच्येच प्रतिबिंब दिसत होते. 
प्यार तो होना ही था... अदितीचा मोबाईल खणाणला. बराच त्रास सहन करून कसाबसा तिने तो मोबाईल उचलला.
" हॅलो... अदिती कशी आहेस ग ? काकूचा  फोन आला होता कि तुला काहीतरी गंभीर दुखापत झाली आहे म्हणून...नक्की काय झालं आहे ग?" मेघाचा वाढलेला श्वास तिची काळजी दर्शवित होता.
" जास्त सिरीयस असं काही नाही ग....तुला माहित आहे आज मला कोण भेटलं ?" 
" कोण ? "
" ईशांत...ईशांत कर्णिक कितीतरी दिवसानंतर आज पहिलं मी त्याला" गोड स्वरात अदिती म्हणाली.
" काय .....ईशांत...तू अजूनही त्यातच गुंतली आहेस का अदिती. माहित आहे ना  जेव्हा तुझं शेवटचं  बोलणं झालं होत तेव्हा त्यांनी काय सांगितलं होत कि त्याचा साखरपुडा झालंय म्हूणन. आता तर त्याच लग्नही झालं असेल. तो त्याच्या जीवनात खूप समोर गेलाय अदिती. तूच फक्त त्या  वळणावर एकटी थांबली आहेस. त्याच्यात नको गुंतू अदिती तुलाच त्रास होईल ". मेघा अक्षरशः तिच्यावर ओरडली. 
" हो गं माहित आहे मला मी फक्त सहज सांगितलं तुला... माझ्या मनात आता तसं काही नाही आहे".
" नसलेलंच बरं आहे अदिती... चल मी येते तुला काही तासात भेटायला". मेघाने फोन ठेवला.

    मनाच्या गाभाऱ्यात जमा झालेल्या आठवणी किती त्रास देतात माणसाला. अगदी पांढऱ्याशुभ्र धुक्यात डोळे मोठे करून रस्ता शोधावा तसा मनुष्य आठवणींच्या धुक्यात  सुखाचा एक किरण शोधत राहतो पण त्या सुखाच्या किरणांनीही केव्हाच आपली पाठ फिरवली असते. 

   त्या दिवशी रेल्वेस्टेशनवर त्याची भेट होऊ शकली नाही. पण त्याच बोलकं स्मितहास्य जणू सर्वकाही सांगून जात होत....खरंतर स्मितहास्याची परिभाषाही माणूस आपल्या परीनेच विस्तारित करतो निदान त्या मागचं सत्य काही वेगळं असू शकत याची साधी तसदही तो घेत नाही. माझ्याबाबतीतही तेच झालं. रेल्वे भरघाव वेगाने धावत पुण्याला पोहचली होती. मुंबई शहराने मला बरच काही दिलं होत...खरंतर सर्वस्व असं आधी मला वाटायचं पण कधीही न संपणार विरहगीत मुंबई शहराने मला दिलंय हेच सत्य आहे. 

     पुण्याला पोहचल्यावर ईशांतशी माझी जवळीक आधीपेक्षा जरा जास्तच वाढली होती. गुड मॉर्निंग पासून ते गूड नाईटपर्यंत आमचे मेसेज चालायचे फोनवरही आम्ही तासान तास बोलायचो..त्याच्या वाढदिवसाला सर्वात आधी शुभेच्छा देणारी मी त्याच्या हृदयात  अगदी  मर्मस्थानी माझे स्थान असेल अशी भाबडी समजूत माझी झाली होती. पण त्याच्या हृदयात तर माझ्यासाठी फक्त मैत्रीचे स्थान होते  ही गोष्ट मला बऱ्याच उशिरा कळली. 

मध्यंतरीच्या कालावधीत   मुबंईला दोनदा येऊनही  ईशांतशी माझी भेट होऊ शकली नाही. जणू ही त्या विरहाची पूर्वसूचनाच होती. फेब्रुवारीचा महिना सुरु झाला होता....फेब्रुवारी म्हणजे प्रेमीजोडप्यानसाठी आनंदाची उधळणंच असते... 14 फेब्रुवारी म्हणजे valentine Day च्या एक दिवशी त्याचा मला फोन आला आणी फोनवर एवढंच सांगितलं कि उद्या व्हिडिओ कॉल कर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून. खरंतर मला वाटलं तो मला प्रोपोज करेल पण मला काय माहित त्याच्या मनात कुणी दुसरंच बसलंय म्हणून. दुसऱ्या दिवशी अगदी हरीणीच्या दृष्टीने मी त्याला व्हिडिओ कॉल केला. त्याच्या हातात असलेले गुलाबपुष्प आणी गुडघ्यावर बसून मला I Love You अदिती हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते पण त्याने जो दुःखद धक्का दिला त्यातून अजूनही मी सावरले नाही..
त्याचे ते  पाशवी शब्द अजूनही माझ्या कानात घुमतात 
" ही गौरी...हिच्यासोबत माझा साखरपुडा झालाय आणी काही दिवसातच आम्ही लग्न करतोय".
गौरी या नावाचा मला त्या दिवसापासून फार तिटकारा वाटत असे. पण का वाटावा खरंतर गौरी ही त्याच्यासारखीच अनाथ होती. त्याने  तर  तिच्याशी लग्न करून तिच्या जीवनाला संजीवनी दिली होती. ज्या मुलीला  आयुष्यात कधीच कुणाचं प्रेम मिळालं नाही तिला जर कुणाचतरी प्रेम मिळतंय तर चांगलंच आहे ना. अश्या बऱ्याचश्यागोष्टी स्वतःच्या मनाला सांगून मी स्वतःला सावरलं होत. 
" गौरी......." अदितीचा स्वर त्या हॉस्पटिलच्या खोलीत आरपार घुमला. 
अदिती अगदी निरागस नजरेने त्या खोलीला न्हाहाळत होती. मनात एकच नाव वारंवार येत ते म्हणजे गौरी.. 
खोलीत कुणाच्यातरी धारदार शस्त्र हाती असलेल्या  सावल्या गडद होत चालल्या होत्या.

क्रमश .... 

यानंतरचे सर्व भाग दीर्घ असेल...आणी एक दिवस आड प्रकाशित होईल