Complicated Love - 4 Adv Nikhil Deore द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Complicated Love - 4

भाग 3 वरून पुढे 

दिवसेंमागून दिवस जात होते. त्या तरुणाला भेटून अदितीला जवळपास  एक सप्ताह झाला होता. त्याच्या भेटीसाठी अदितीचे मन सैरभैर होत होते .
" इंद्रधनुष्या तूझ्या या सप्तरंगासारखा त्यालाही घेऊन ये माझ्या खिडकीजवळ" आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याला बघून अदिती म्हणाली. 
" काय मॅडम कुणाशी बोलताय...कि एकट्याच बडबड करायला लागल्याय आता " खोडी काढत मेघा म्हणाली. 
" नाही ग सहजच " अदितीने लाजून तोंड लपवले .

          सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता.साधारणतः सायंकाळचे 6 वाजले असेल . सर्व परिसर तांबूस किरणात न्हाहून निघाला होता. जणू अस्ताला जाणारा सूर्य सर्वत्र पिवळे सोने पसरवीत आहे असेच भासत होते. अदिती खिडकीत कॉफीचा कप घेऊन बाहेरच्या परिसरावर दृष्टी फिरवीत होती .
" Complicated Love माझ्या कादंबरीच नाव हेच असेल....कितीतरी दिवसापासून विचार करतेय एखादी छानशी प्रेमकादंबरी लिहावी आणी माझ्या प्रेमकादंबरीचा हिरो असेल तरी कोण.. तोच असेल हे काय विचारणं झालं  ...पण प्रेमकादंबरीचा विषय तरी काय असावा " कॉफी पीत अदिती स्वतःशीच बोलत होती. मनात प्रेमभावना हिंदोळत होत्या आणी गाल निखळ लाजेने झाकोळले होते.
" अरे कादंबरीवरून आठवलंय आपल्याला Only Love Is Real ही Dr Brian Weiss यांची नॉवेल विकत घ्यायची आहे " डोक्यावर टपली मारून अदिती खुदकन हसली. सर्व आवरून जवळच असलेल्या बुक शॉप वर ती नॉव्हेल विकत घ्यायला निघाली 

" काका Only Love Is Real ही नॉव्हेल आहे का तुमच्याकडे ?" अदिती विचारू लागली.
" हो आहे ना " 
" मग द्या ती नॉव्हेल" 
बुकशॉप वाले काका ती नॉव्हेल देणारच एवढ्यात 
" काका त्या नॉव्हेलची एक प्रत आणखी द्या .मलाही ती नॉव्हेल हवी आहे " कुणाचेतरी स्वर अदितीच्या कानावर पडले. हो ते स्वर त्याचेच  होते. जे तिच्या मनाच्या शिल्पात एका सप्ताहापासून घुमत होते. अदिती त्याला वळून पाहणारच इतक्यात 
" काय मॅडम परत पर्स विचारलात वाटत" त्याचे प्रतिस्वर तिच्या कानावर धडाडले.
" खूप खूप खूप धन्यवाद देवा  परत एकदा त्याच्याशी भेट करण्यासाठी.. कितीतरी दिवसांपासून याच क्षणाची वाट पाहत होते मी" अदिती मनोमन देवाचे आभार मानत होती.
" ओह्ह मॅडम कुठे हरवलात " हास्य देत तो तरुण म्हणाला. 
" कुठे काय...आज पर्स आहे माझ्याजवळ. नॉव्हेलचे पैसेही  आधीच दिलेय मी आणी तुमचेही पैसे देणारच आहे  " एकादमात अदिती म्हणाली.
" राहू द्या हो..मी सहज मस्करी करत होतो. तुम्हालाही इंग्लिश नॉव्हेल्स आवडतात वाटत .बऱ्याच दिवसांपासून मला ही नॉव्हेल वाचायची होती. जवळपास 1.5 million प्रति या नॉव्हेलच्या विकल्या गेल्या आहेत " 
" हो...ना मी पण या नॉव्हेलबद्दल बरंच ऐकलं आहे..आणी  प्रेमकथा नॉव्हेल्स वाचायला मला   खूप आवडतात. भविष्यात माझीही अशी एखादी  नॉव्हेल्स नक्कीच प्रकाशित होईल" हसून अदिती म्हणाली.
"हो का  लेखिका आहात वाटत .माझ्याकडून तुम्हाला तुमच्या नोव्हल्ससाठी  खूप खूप शुभेच्छा "
" अरे एवढ्या वेळपासून मी इतकं बडबडतेय आणी तुम्हाला साधं नावही सांगितलं नाही  ...मी अदिती पठारे..मी  मुळची पुण्याची आहे पण बँकिंग स्टडी मटेरियल घेण्यासाठी मुंबईला मैत्रणीकडे आली आहे" 
" मी ईशांत कर्णिक " आपला परिचय करून देतांना तो तरुण म्हणाला.
" ईशांत...गोड नाव आहे " अतिशय सूक्ष्म सुरात अदिती म्हणाली.
" काय म्हणालात आपण ?" 
" कुठे काय तुम्ही काही ऐकलंय का ?" अदितीच्या चेहऱ्यावर सावधतेचे भाव निर्माण. 
" किती वेडी  आहे ना मी...जराही नियंत्रण नाही माझ्यावर " अदिती स्वतःशीच म्हणाली.
अदिती आणी ईशांत बराच वेळ बोलत असतात ...बोलता बोलता अनपेक्षितपणे ईशांत सांगून जातो कि तो भारताचे प्रसिद्ध नॉव्हेलिस्ट  अमित गुप्ता यांच्या Love Life या नॉव्हेल्सच्या launching ceremony साठी तो सेंट्रल हॉल ला जात आहे.  अदितीला चलण्यासाठी तो फक्त फॉर्मॅलि विचारतो. अदिती बराच विचार करते तिचीही नॉव्हेसमध्ये रुची असल्यामुळे तीसुद्धा ईशांतबरोबर जायला तयार होते. खरंतर अदिती कधीच कुणावर एवढ्या लवकर विश्वास ठेवत नाही पण त्याच्या नेत्रात खोलवर असणाऱ्या खरेपणाच्या बिंदूंनी ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. दोघेही सेंट्रल हॉलला पोहचतात.

          सेंट्रल हॉलमध्ये अमित गुप्ता आपल्या नॉव्हेलची माहिती देतांना सांगू लागतात 
" आयुष्यात पहिल्या नजरेत होणार प्रेम काही वेगळंच असतं. अगदी मनाला हुडहुडणाऱ्या रेशमी थंडीसारखं .आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते  अनुभवलं असेलच " 
अदिती अगदी डोळे भरून ईशांतकडे पाहू लागते. ईशांतही क्षणातच तिच्यावर आपला कटाक्ष टाकतो.ईशांतची दृष्टी तिच्यावर पडताच तो आपली नजर समोर वळवते. त्याच्या नजरेची लपाछपी बराच वेळ सुरु असते. अदिती आता लक्ष्य देऊन अमित गुप्ता यांचे शब्द कानात साठवत होती 
" एका वळणावर तो आणी ती भेटतात. दोघांनाही पहिल्या नजरेतच प्रेम होत. प्रेमात अडचणी  तरी किती असतात..वय, आंतरजात ,श्रीमंती  -गरीबी , आर्थिक आणी बरेच काही पणयापेक्षाही भयंकर रहस्य जर  त्यांच्या जीवनात गर्भगळीत असेल  तर ..नक्की हेच तुम्हाला या कादंबरीत वाचायला मिळेल " टाळ्यांच्या कडकडाटीने अमित गुप्ता यांच नॉव्हेल्सची लौंचिंग झाली. अदिती आणी ईशांतही.. ही नॉव्हेल्स सर्वात जास्त विकली जाईल याचीच चर्चा करीत होती. नॉव्हल्सची लौंचिंग सेरोमणी पूर्ण झाली . अदिती आणी ईशांतही आपपल्या दिशेने परतु लागले होते . ईशांत अदितीला  तिच्या रूमपर्यंत सोडायला येतो. दोघात मोबाईल नंबरची अदलाबदलीही होते.

      त्या रात्री अदितीच्या मनात आनंदाच्या धारा बरसत होत्या. प्रतिक्षेचे काळपट ढग बाजूला सरुन भेटीच्या पौर्णिमेचा चंद्र अखेर उगवला होता. रात्री मोबाईलवर बराच वेळ ती  ईशांतशी चॅट करीत होती. पुढले दोन दिवसही त्यांची भेट झालीच पण जास्त विशेष अदितीच्या मनासारखं काही घडलं नाही. ईशांत हा अनाथ आहे 12 पर्यंतचे शिक्षण त्याने आश्रमशाळेतच पूर्ण केले. बारावीनंतर ईशांतने जॉब करत बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेन्ट  ही पदवी संपादन केली. आता तो कुठल्यातरी मोठया  हॉटेलमध्ये शेफ आहे आणी भविष्यात त्याला स्वतःचे हॉटेल उघडायचे आहे. एवढीच माहिती तिला ईशांतकडून कळली. तिसऱ्या दिवशी मात्र अदितीला पुण्याला परत जायचं होत. जायच्या आधी किमान तिच्या मनात असलेल्या भावनेची पुसटशी कल्पना ईशांतला व्हावी यासाठी ती त्याला रेल्वे स्टेशनवर बोलावते.

    साडेसात वाजताची ट्रेन होती. अदिती सात वाजताच रेल्वेस्टेशनवर पोहचली होती . स्टेशनवरील गर्दीमुळे तील फार चिडचिड होऊ लागली होती. शिवाय कुणाचीतरी जास्त वाट पाहणं तिला बिल्कुल आवडत नसे. रेल्वेस्टेशनवर ट्रेन सुटण्याची सूचना   झाली. ट्रेनही हळूहळू वेग धरू लागली होती. पण ट्रेनने  स्टेशन अजूनही पूर्णपणे पार केलं नव्हतं .खिडकीतुन दूरवर तिला ईशांतची अस्पष्ट अशी आकृती दिसली. त्याच्या चेहऱ्यावर बोलकं स्मितहास्य होत जणू काही बोलायची गरजच नाही असंच ते दर्शवित होत. अदितीच्या नेत्रातून मात्र अश्रुंचे दोन टपोरे थेंब ओघळले होते. बाजूच्या सीटवर बसलेल्या मुलीच्या मोबाईलमधून सुरु असलेलं गीत जणू त्या विरहाची अनामिक  साद देत होत.
💕 तेरी आँखों के सहारे मै ख्वाब देखू सारे 
     अब लम्हा लम्हा गुजरे तेरी पलको के सहारे 
     पहले थी मै तन्हा मै थी आवरा लम्हा 
      अब थम गयी तुझमे दुनिया मेरी थम नये नजारे 
      तुझसे दूर जो होती हू तुकडा तुकडा सोती हू 
      आँखों मे पिरोती हू मै राते ..💕( song credit :- गजेंद्रसिंघ वर्मा female version ) 
क्रमश ...