स्वर्गातील साहित्य संमेलन

(87)
  • 166.9k
  • 3
  • 53.6k

'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभलेखक असून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रवींद्र यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताईं ह्या एक उत्तम कवयित्री असून त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित आहे. रवींद्र

Full Novel

1

हसरी हसणावळ भयवाळ' हे आड

**************************** हसरी हसणावळ ****************************** *** 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभलेखक असून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रवींद्र यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताईं ह्या एक उत्तम कवयित्री असून त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित आहे. रवींद्र ...अजून वाचा

2

माझ्या मामाचा गाव मोठा

सायंकाळी शिरीषचे बाबा कंपनीतून घरी आले. शिरीष त्यांचीच वाट बघत दारातच उभा होता. बाबा आल्याबरोबर त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत आत घेऊन आला. त्याच्या बाबाला काही ही बोलायची संधी न देता सोफ्यावर बसवून म्हणाला, बाबा, आज की नाही, आमच्या शाळेत एक आजीबाई आल्या होत्या... असे सांगत पुन्हा सारे ऐकवून म्हणाला, बाबा, दिवाळीच्या सुट्टीत आपण मामाच्या गावाला जायचे म्हणजे जायचे... शिरीष हट्टाने तसे म्हणत असताना तिथे त्याची आई आलेली पाहून त्याच्या बाबांनी विचारले, अग, हा काय म्हणतोय, सोपे आहे का जाणे? शिवाय तिथे कुणी राहत नाही.... पण आपला मामा तर अधूनमधून जातोच ना, तसेच आपणही जाऊया. नाही तरी आपण नेहमी पिकनिकला जातोच ना, तसेच मामाच्या गावाला जाऊया.... शिरीष बोलत असताना त्याचे बाबा काही बोलू पाहत असताना त्यांना थांबायला सांगून शिरीषची आई म्हणाली, ...अजून वाचा

3

मायेचे पंख

चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण बैठकीत असलेल्या सोफ्यावर पाठीवरचे 'ओझे' फेकले. कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहात असणाऱ्या त्याच्या कारकडे तो धावतच गेला. कारमध्ये बसताच त्याला प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने कार पळवायला सुरूवात केली. त्यावेळी तो त्या बैठकीचा महाराजा होता. एका तासाने म्हणजे बरोबर सहा वाजता त्याचे आईवडील कंपनीतून येणार होते. माधवा, झाले का तुझे सुरू? आधी हातपाय धुऊन घे. काय खायचे ते सांग आणि मग कार पळव. थांब ना ग आजी. दिवसभर मला कारमध्ये बसायला मिळते का? माधवने विचारताच आजी म्हणाली, ...अजून वाचा

4

स्वर्गातील साहित्य संमेलन

* स्वर्गातील साहित्य संमेलन! * अखिल भारतीय मराठी साहित्य महानमंडळाची भव्यदिव्य इमारत! एखाद्या देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला नसेल अशा त्या सुसज्ज इमारतीच्या एका मनमोहक दालनात महानमंडळाची सभा सुरू होती. अध्यक्ष ठोके पाटील आसनस्थ झाले. सचिवांनी रीतसर सभेचे कामकाज चालू केले. महानमंडळाच्या अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधानांच्या बरोबरीचा असला तरीही अध्यक्षांना पंतप्रधानापेक्षा काकणभर अधिक सवलती होत्या. सोबतच महानमंडळाच्या प्रत्येक सभासदाला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा होता. गत् दोन दशकांपासून अधिक वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही अभाषिक मराठी ...अजून वाचा

5

दुधायण

दुधायण ! त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत असताना एका बातमीने माझे वेधले. बातमी वाचय असताना मी स्वयंपाकघराकडे पाहून आवाज दिला,"अ..ग, ए... लवकर ये.""असं ओरडायला काय झालं?" चहाचे कप घेऊन आलेल्या सौभाग्यवतीने विचारले. "काय भयंकर बातमी आहे. ऐक. बायकोने तापायला ठेवलेल्या दुधावर लक्ष न दिल्यामुळे दूध ऊतू गेले. त्यामुळे चिडलेल्या, संतापलेल्या बायकोने स्वतःच्या नवऱ्याला चक्क दोन दिवस उपाशी ठेवले..." मी ती बातमी घाबरलेल्या अवस्थेत वाचत असताना बायको खळाळून हसत 'ऐकावे ते नवलच' असे ...अजून वाचा

6

शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा

शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा शहरापासून काही अंतरावर एक हिरवेगार जंगल होते. तिथे नानाविध प्रकारची झाडी फुला-फळांनी बहरली होती. जमीनीवर सर्वत्र पसरलेले मऊशार गवत अनवाणी फिरणारांच्या पायाला गुदगुल्या करीत असे. ते जंगल तसे जवळ असल्यामुळे माणसांनी नेहमीच गजबजलेले असे. विशेषतः सायंकाळी तिथे भरपूर गर्दी असायची. त्यादिवशीही सकाळी सकाळी त्याठिकाणी भरपूर गर्दी होती. परंतु ती गर्दी माणसांची नव्हती तर खास अशा प्राण्यांची होती. तसे त्या जंगलात राहणारे ते प्राणी असले तरी त्यातले काही प्राणी त्यादिवशी मुद्दाम एकत्र येत होते. त्या त्यांच्या 'गेट टुगेदर' या कार्यक्रमाला त्यांनी ...अजून वाचा

7

वाघाच्या डोळ्यात धुळ...

★★ वाघाच्या डोळ्यात धूळ ★★ दुपारचे बारा वाजत होते. दडके अगदी रमतगमत, हलतडुलत कार्यालयात पोहोचले. अधीक्षक भाऊसाहेब यांनी एकदा दडकेंकडे आणि नंतर घड्याळाकडे पाहिले. त्यांच्यासमोरचे हजेरी पत्रक ओढून घेत त्यावर स्वाक्षरी करत दडके म्हणाले,"भाऊसाहेब, बारा तर वाजलेत आणि तुम्ही घड्याळाकडे पाहता? जसे काय मी आजच पहिल्यांदा उशिरा आलोय किंवा दुसरे कुणी लेट येतच नाही. 'आता वाजले की बारा, आता आलोय ना कार्यालया...' काय झाले सांगू का, आज ना एक माणूस भेटला. त्याला विम्याची माहिती सांगताना वेळ कसा ...अजून वाचा

8

दंतनिर्मूलन

** दंतनिर्मूलन ** त्यादिवशी सकाळचा चहा घेण्यासाठी मी सज्ज झालो असताना बायकोने ग्लासभर पाणी आणि कप समोर ठेवला. मी पाण्याचा ग्लास उचलला परंतु तो नेहमीप्रमाणे थंडगार लागला नाही म्हणून मी पत्नीकडे पाहिले. माझ्या कटाक्षाचा अर्थ जाणून ती म्हणाली,"अहो, असे काय पाहता? तुमची दाढ दुखतेय ना म्हणून फ्रीजमधील पाणी दिले नाही.""अग, तुला माहिती आहे, मला बारा महिने अठरा काळ फ्रीजमधलेच पाणी लागते ते. शिवाय चार दिवसांपासून गोळ्या चालू आहेत, तेव्हा आता काहीही त्रास होणार नाही. आण.""तुम्ही नाही ऐकणार तर..." ...अजून वाचा

9

भाजीसम्राट

** भाजीसम्राट ** "अहो, ऐकलत का? भाजी आणायला जाताय का? नाही तर मी जाऊ का? सांगा. मला कुणी खात नाही. ओरडून ओरडून तोंडाला फेस यायची वेळ आली. परंतु तुमच्या कानात माझा आवाज शिरत नाही. सारख आपलं मोबाइल... मोबाइल! वीट आलाय बाई." आतून पद्माचा आवाज आला."जातोय. चाललोय. निघालोय. आणि प्रत्येक वेळी तुझे 'तुम्ही जाताय का मी जाऊ?' हे ब्रम्हास्त्र वापरत जाऊ नकोस. नुसती भीती दाखवून दाखवून एखादेवेळी वापरायची वेळ आली तर फुसका बार ठरेल.""व्वा! ब्रम्हास्त्र काय? ...अजून वाचा

10

टोळी मुकादम

::::: टोळी मुकादम ::::: हातातल्या वर्तमानपत्रातवर फिरणारी शंकरची नजर एका बातमीवर स्थिरावली. बातमीचे शीर्षक आणि ती बातमी त्याने अधाशासारखी वाचून काढली. तो मनात म्हणाला,'वॉव! हवे ते सापडले. 'मनी वसे, स्वप्नी दिसे ते प्रत्यक्षात असे !' याच बातमीची तर मी चातकासारखी वाट बघत होतो. ही बातमी अगोदर विठ्ठलला सांगितली पाहिजे...'असे पुटपुटत शंकरने विठ्ठलचा भ्रमणध्वनी लावला."बोला. शक शक बुम बुम, काय म्हणता?""माउली, ऐका ना, मला की नाही, हवे ते सापडले. ज्याची मी वाट पाहात होतो ना तशी....""काय? सापडली कुठे? कशी? काय नाव आहे ...अजून वाचा

11

चकाकते ते सोने...

चकाकते तेच सोने! भर दुपारची वेळ होती. सूर्यदेव डोक्यावर आले असले तरीही उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. सूर्यकिरणांनी सृष्टीला कवेत घेतले असले तरी धग जाणवत नव्हती. असे वाटत होते की, आलेली किरणे ही सूर्याची नसून चंद्राची आहेत. अशा मोठ्या प्रमाणात थंडी सर्वत्र पसरली होती. गेल्या अनेक दिवसांपासून आलेली थंडीची लाट तळ ठोकून होती. शहरातील एका नवीन वसाहतीत असलेल्या एका इमारतीत राहणाऱ्या बायका घरातील थंडी टाळण्यासाठी गरम गरम उन्हात बसल्या होत्या. "अग बाई, काय ही थंडी म्हणावी. स्वेटर, शाल कशानेही ...अजून वाचा

12

चला जाऊ आमराईत

चला जाऊया आमराईत! एका मोठ्या शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एक मुलींची आश्रमशाळा होती. शाळेला लागून दुसऱ्या भव्य इमारतीत मुलींचे वसतिगृह होते. ती शाळा आणि ते वसतिगृह राज्यात नामांकित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालक आपापल्या मुलींना तिथे प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करीत असत. शाळा आणि वसतिगृह यांच्या अवतीभोवती फार मोठे जंगल असले तरीही त्याची व्यवस्थित निगा राखली असल्यामुळे एक सुंदर वन तयार झाले होते. शाळा आणि वसतिगृह यांच्या दोन्ही बाजूला छान छोटी छोटी तळी होती. या तळ्यांपासून काही अंतरावर आंब्याची मोठमोठी झाडे होती. दोन्ही इमारतीच्या भोवताली कुंपणाच्या मोठमोठ्या भिंती असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी किंवा आत येण्यासाठी एक मोठे फाटक होते. ...अजून वाचा

13

मी एक मुंगी, तू एक मुंगी

°° मी एक मुंगी, तू एक मुंगी °° प्रशिक्षणासाठी उशीर होतो आहे मी गडबडीने निघालो. घाईघाईत जात असताना अचानक ठेसाळलो. ठेस पायाच्या अंगठ्याला लागली असली तरीही वेदनेची एक कळ पार सर्वांगात शिरली. कुणीतरी शिव्या दिल्या हा अंधश्रध्देला खतपाणी घालणारा विचार माझ्या डोक्यात शिरलाच.शिव्या जरी दिल्या नसल्या तरी कुणी तरी आठवण नक्कीच केली हा विचार डोक्यात शिरत असताना एक मूर्ती चटकन डोळ्यासमोर आली....संभामामा! तसे पाहिले तर संभामामा ना माझ्या नात्यातला ना गोत्यातला. मात्र, गेली काही वर्षे तो माझ्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय