भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली

(202)
  • 186.8k
  • 40
  • 77.8k

मे महिन्याचा शेवटचा आठवडा,... तारीख.. कोणाला माहित.... तरीही काय फरक पडणार होता तारीख जाणून. ना तारीख माहित , ना वार .... त्यात सकाळ होतं होती. आकाश तर आधीच जागा झालेला. घड्याळात न बघताच हल्ली त्याला वेळेचाही अंदाज बांधता यायचा. यावेळेसही त्याने अंदाज लावला. पहाटेची ६:१५ ते ६:३० ची वेळ... डोंगर -दऱ्यात रात्रीची वस्ती असली कि सूर्य देवाची पहिली किरणे अंगावर घेणं आलेच. आकाश तर कधी पासून सूर्य देवाची वाट पाहत होता. उंच ठिकाणी उभा होता... गेल्या १०-१५ मिनिटांपासून. आज उशीरच झाला ना.... सूर्यदेवाला... आकाश मनातल्या मनात बोलला. आभाळात नजर फिरवली त्याने. समोरचे आभाळ रिकामंच होतं. पाठीमागे

Full Novel

1

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १

मे महिन्याचा शेवटचा आठवडा,... तारीख.. कोणाला माहित.... तरीही काय फरक पडणार होता तारीख जाणून. ना तारीख माहित , ना .... त्यात सकाळ होतं होती. आकाश तर आधीच जागा झालेला. घड्याळात न बघताच हल्ली त्याला वेळेचाही अंदाज बांधता यायचा. यावेळेसही त्याने अंदाज लावला. पहाटेची ६:१५ ते ६:३० ची वेळ... डोंगर -दऱ्यात रात्रीची वस्ती असली कि सूर्य देवाची पहिली किरणे अंगावर घेणं आलेच. आकाश तर कधी पासून सूर्य देवाची वाट पाहत होता. उंच ठिकाणी उभा होता... गेल्या १०-१५ मिनिटांपासून. आज उशीरच झाला ना.... सूर्यदेवाला... आकाश मनातल्या मनात बोलला. आभाळात नजर फिरवली त्याने. समोरचे आभाळ रिकामंच होतं. पाठीमागे ...अजून वाचा

2

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २

"बघ ..... कसं होते ते बघ ... " संजना म्हणाली. सुप्री आणि आकाशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... " काय बोलते तू नक्की " , " म्हणजे तुमच्या लग्नाचे बोलते आहे रे.... त्यात फोटोग्राफी तूच करणार असशील ना... " संजना हसत म्हणाली. तसे सुप्री, आकाश दोघेही हसू लागले. " तू पण ना संजना... म्हणून सांगतो, जास्त राहत जाऊ नकोस या येडी बरोबर... लागली ना सवय... " , " ओ मिस्टर A ..... लहानपणापासूनच एकत्र आहोत आम्ही... या संजू मुळेच माझ्यात वेडेपणा आला आहे.." , " हो का .... " , " हो ... ".... आकाश. " मग काय ... हिच्यामुळे मला ...अजून वाचा

3

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ३

पुढच्या दिवशी , ऑफिस सुटल्यावर नेहमी सारखे हे तिघे एकत्र निघाले. घरीच जाणार होते, वाटेत सुप्रीने थांबवलं. " आकाश कॉफी घेऊया का ... छान थंड हवा आहे , मूड झाला आहे माझा कॉफीचा ... " ," मूड झाला तर चलो .... " आकाश सुद्धा तयार झाला. संजना होतीच सोबत. नेहमीच्या ठिकाणी आले. बसले थोडावेळ. यांचे टेबल सुद्धा ठरलेले. संजनाने त्यातल्या त्यात एक पुस्तक शोधून काढलं. ते वाचत बसली एका कोपऱ्यात. या दोघांना मोकळीक म्हणून. कॉफी साठी वेळ होता. आकाशचे लक्ष पुन्हा आभाळाकडे लागलं होतं. आणि सुप्री त्याच्याकडे पाहत होती. गुपचूप तिने , काल संजनाने दिलेला पेपर आकाशच्या पुढयात ठेवला. त्याचे ...अजून वाचा

4

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ४

पूजा आणि कादंबरी जरी भटकत असल्या तरी उपजीविकेसाठी आणि रोजच्या , नित्याच्या वस्तू , कपडे यासाठी पैसे लागणारच. " blog " लिहायची आयडिया कादंबरची. actually, लिहणारी पूजाच. पूजा अगदी लहानपणासूनच छान लिहायची. अक्षर तर मोत्याचे दाणे, कविताही करायची कधी. हा ग्रुप भारतात जिथे जिथे जाईल, त्या जागेची माहिती पूजा , एका वेगळ्याच , म्हणालं तर काळजाला हात घालणाऱ्या शब्दात लिहून काढायची. त्या जागेचे फोटो रूपात दर्शन घडवायची ते कादंबरी. असा दोघींचा मिळून एक "Travel blog " बनला. एका नामांकित ' TV channel ' ला त्यांचा ब्लॉग आवडला आणि झालं सुरु. प्रत्येक महिन्याला एका जागेची माहिती , फोटोसहित या दोघी ...अजून वाचा

5

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ५

" कधी कधी तर असा भास व्हायचा.... आपण कुठंतरी उंच ठिकाणी उभे आहोत... आपण म्हणजे मी एकटाच , बरं .... समोर नजर जाईल तीत पर्यंत पसरलेलं फेसाळणाऱ्या नदीचं पात्र... उधाणलेला वारा... त्यात मुसळधार पाऊस... हे सर्व बघत असतो मी आणि एका क्षणाला मी स्वतःला झोकून देतो त्या पाण्यात... उंचावरून खाली येतं असतो मी , आजूबाजूला वरून कोसळणाऱ्या झऱ्यांचे पांढरे शुभ्र पाणी.... सोबत पाऊस तर असतोच... वाराही येतो मग साथीला.. आणि एकदम आम्ही तिघे त्या थंड पाण्यात खोल डुबकी मारतो.... हे असं व्हायचं मला... कधी कधी तर सकाळी उठलो कि डोळ्यासमोर एखादा हिरवा कंच डोंगर शोधायचो... नजरेसमोरून एखादा मोठ्ठा पक्ष्यांचा ...अजून वाचा

6

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ६

कुठेतरी चिमण्यांचा कलकलाट होतं होता. दुरुनच येतं होता आवाज, मधूनच कोकीळ त्याचे मधुर स्वर काढत होता. वाऱ्याचा अगदी मंद " सू ... सू ... " आवाज, झाडाच्या पानांची मग प्रचंड सळसळ करी. अंग शहारून जायचे. थंडावा तर आहेच. आकाश हे सर्व डोळे मिटून अनुभवत होता. कदाचित स्वप्न असावे , डोळे उघडले तर संपून जायचे. पण तसे काही होणार नव्हते. कारण ..... कारण तो जे डोळे मिटून अनुभवत होता , ते प्रत्यक्षात त्याच्या आजूबाजूला घडत होते. आकाश सकाळपासून त्या माळरानावर लोळत पडलेला. काय ...अजून वाचा

7

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ७

आकाशला आता खूप मोकळ मोकळं वाटतं होते. गेले ३ दिवस नुसता भटकत होता. कोणाचेच आणि कसलेच tension नाही. कोणाला करायचा नाही कि कोणाचा फोन येणे नाही. असा विचार आला मनात आणि त्याला आठवलं. सुप्रीला तर फक्त मेसेज केला, फोन करायला पाहिजे. लगेच त्याने मोबाईल बाहेर काढला. range कुठे होती. या मोबाईलचे असेच असते, जेव्हा पाहिजे असतो तेव्हा उपयोग नाही होतं. बाकीचे तासनतास कसे डोके खुपसून बसलेले असतात काय माहित मोबाईल मध्ये. त्याने पुन्हा मोबाईल बॅगेत टाकला. आणि गावात फेरफटका मारू लागला. गाव ...अजून वाचा

8

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ८

विचार करता करता डोकं दुखायला लागलं. सुप्री डोक्याला हात लावून बसलेली. संजना चहा घेऊन आली. " उरलेलं डोकं पण वाटते. " संजना सुपारीला हसून बोलली. " बोला बोला ... गरिबांना काय पण बोलतात लोकं .. " ," तुला काय झालं डोकं पकडायला. " ," आकाश गं ... " ," हा ... त्याचा आलेला का कॉल ... मेसेज.. " संजनाने लगेच विचारलं. " एकदा आलेला .. पण आवाजच येतं नव्हता त्याचा. पुन्हा केला मी, तर लागला नाही. मेसेज आलेला कि मी सुखरूप पोहोचलो. कुठे आहे ते सांगितलं नाही. मी उद्या निघायचं ठरवलं आहे. पण जाऊ कुठे " सुप्रीने अडचण सांगून टाकली एकदाची. तश्या दोघी ...अजून वाचा

9

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ९

कादंबरीने फक्त छान smile केले त्यावर. हसत बाहेर लक्ष टाकलं तिने. आभाळ गच्चं भरलेलं होते. तरी पाऊस सुरु झाला ती तंबूमधून बाहेर आली. " कुठे चालली... पाऊस येतो आहे.. " ," जास्त दूर जाणार नाही.. " म्हणत कादंबरी त्या ठिकाणापासून जरा दूर आली. एका झाडाखाली उभी राहिली. भरलेल्या पावसाकडे पाहत होती. तिचेही काही खास नातं होते पावसाशी. कारण अश्याच एका पावसात तिने घर सोडायचा निर्णय घेतला होता . ============================== ============================ " कुठे आहेस .... हॅलो .... आवाज येतो आहे का ... " सुप्रीने आकाशला कॉल लावला. " हॅलो... हॅलो... सुप्री ... हॅलो... काहीच ऐकू येतं नाही.... " आकाशचे हेच उत्तर ...अजून वाचा

10

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १०

सुप्री- संजनाची गाडी आली एकदाची आणि त्यांचा प्रवास सुरु झाला. " काय गं ... काय सांगितलं घरी तू.. " काय सांगणार ... खोटेच बोलली ना ... मैत्रिणीचे लग्न आहे असं सांगितलं. दोन्ही ठिकाणी. घरी आणि सरांना... आता सरांना काय माहित आहे सर्व.. मी तुझ्यासोबतच जाणार ते.. हे माहीत असते त्यांना. so , ते झालं... पण घरी किती चौकशी केली. कोणती मैत्रीण , नाव काय.. कुठे राहते... सांगितलं मग ... गावाला लग्न आहे.. म्हणून चालली.. तू काय सांगितलं घरी " ," सवाल आहे काय ... तुझंच नाव सांगितलं... बोलली , संजना सोबत चालली आहे.. तिला सोबत पाहिजे म्हणून मला घेऊन जाते ...अजून वाचा

11

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ११

कुठेतरी दूरवर , ढगांच्या आड सूर्योदय होतं होता. ढगांमध्ये राहून गेलेल्या मोकळ्या जागेतून सूर्याची किरणे गुपचूप त्या हिरव्या माळरानावर होती. मधेच गुडूप होऊन जातं, ढग जरा बाजूला सरले कि पुन्हा उजेड. ऊन पावसाचा खेळ नुसता. वाऱ्याने झाडे डोलत होती. जणू काही आनंदाने गाणी गात होती सर्वच. पावसाळा सुरु झालेला ना.. सारेच आनंदात होते. सुप्री ते सर्व , हॉटेलच्या बाल्कनीत उभी राहून पाहत होती. संजना अजूनही झोपलेली होती. काल रात्रीच त्यांचे आगमन झालेलं. रात्री कुठे जाऊन आकाशला शोधणार म्हणून स्टेशन जवळच असलेल्या एका हॉटेल मध्ये मुक्काम केला. सुप्रीला लवकर जाग आली तशी ती बाल्कनीत उभी ...अजून वाचा

12

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १२

पूजा - कादंबरी गावातून काही खायच्या वस्तू , काही औषध घेऊन आल्या. आजचा दिवस सुद्धा त्याच ठिकाणी. कदाचित उद्याचा इथेच काढावा लागेल. असा विचार कादंबरीच्या मनात येऊन गेला. काय करणार, हे असं फिरणं असले कि अशी आजारपणं आलीच सोबतीने. हि अशी पहिलीच वेळ नव्हती. पण पूजाची अशी कोणती स्पेशल जागा आहे , हे जाणून घ्यायची हुरहूर लागलेली कादंबरीला. असो, कादंबरीने तिच्या कामाला सुरुवात केली. पावसाने सकाळपासून नुसता काळोख करून ठेवला होता. कालच तर सुरुवात केलेली त्याने. आज त्यामानाने शांत होता पाऊस. बघता बघता संध्याकाळ झाली. कादंबरीने घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे ५ ...अजून वाचा

13

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १३

कादंबरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पूजा पुढे सांगू लागली. " एक दिवस काय झालं, बाबा अगदी शुल्लक कारणावरून चिडले त्यात मधेच भावाचा विषय निघाला. तो किती चांगला आहे , मी कशी नको आहे ... का कस माहित नाही ते .. पण त्यांचा माझ्यावरचा राग बाहेर आला. त्या बोलण्यातून , मी त्यांना किती नको आहे , ते सांगून टाकलं त्यांनी. आईने माझ्या बाजूने काहीतरी बोलवं अशी अपेक्षा होती. तीही काहीच बोलली नाही. मी कोणासाठी बोलू आणि काय बोलू , माझ्याकडे विषयच राहिला नाही. त्यादिवसापासून एक विचित्र अबोला सुरु झाला घरात. आई-बाबा-भाऊ आणि बाजूला मी वेगळी. ते तिघेच बोलायचे एकमेकांशी. माझ्याकडे ...अजून वाचा

14

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १४

पहिल्या दिवशी जो पाऊस झाला, त्यानंतर ३ दिवस पाऊस झालंच नाही. आज सकाळी जरा वाटतं होते पावसाचे. तरी काही दाखवून पुन्हा पसार झाला तो. कदाचित कुठे दूरवर पडत असेल पाऊस. या भागात यायचे नसेल त्याला, असा विचार करत कादंबरी सकाळ सकाळीच तिचा कॅमेरा घेऊन जरा लांब आलेली. त्यांच्या ग्रुप मध्ये आणखी काही लोकं सर्दी - खोकला ताप घेऊन बसले होते पावसाचे. ते काय दरवर्षीचे , म्हणत कादंबरी फोटो काढत चालली होती. एका ठिकाणी उभं राहून कॅमेऱ्याच्या लेन्सने, जरा zoom करून दूरचे काही दिसते का ते पाहू लागली. कॅमेरा डावीकडे वळला आणि तिला एक ...अजून वाचा

15

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १५

तर हे असं आहे तर गणित .... मलाही तिने ते नाव कधी सांगितले नाही कधी... असो , By the ... तुला ओळखते मी , खूप आधीपासून .... , ते कस शक्य आहे ... मी तर तुला पहिल्यांदा भेटलो आज ... आणि निरूकडे माझा फोटोही नाही .... बरोबर ना निरू ... पूजाने होकारार्थी मान हलवली. हि सांगत असते तुझे किस्से... आठवणी... नाव सांगितलं नाही हा कधी तिने ... सारखं सारखं ... तो असा करायचा , तो तस करायचा... तुला कधी बघितलं नाही तुला , तरी ओळखायची. nice to meet you .. कादंबरीने हात पुढे केला. आकाशने हात ...अजून वाचा

16

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १६

थोडावेळ शांततेत गेला. " तू कुठे निघाली आहेस. कुठे चालला सर्व... " आकाशने पूजाला प्रश्न केला." योगायोग बोललास ना इथेही आहे योगायोग... इथेच आपली ताटातूट झालेली. तोच प्रवास आहे हा.. आठवलं का काही... " आकाशने नकारार्थी मान हलवली. " आपण त्याच देवळात बसून शेवटच्या गप्पा मारल्या होत्या. कदाचित तुला जो अपघात झालेला ना .. त्यात या आठवणी विसरला असशील... पण मला आठवते सर्व. " आकाशला काही आठवलं." स्पष्ट नाही.... पण अंधुक आठवलं , तू बोललीस तेव्हा.... एक मिनिट ... म्हणजे तू ... तीथे निघाली आहेस का .... " आकाश पूजाकडे पाहत म्हणाला." हो ... तो प्रवास नंतर पूर्ण झालाच ...अजून वाचा

17

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १७

" म्हणजे मी तर जोड्या जुळवणारी झाली तर.. पहिलं आकाश आणि पूजा ..... आता आकाश - सुप्री... तुम्ही सगळे get together खेळत आहात का ... " कादंबरी काहीही बडबडत होती." कसा आहेस ? " सुप्रीने आकाशला विचारलं." आहे ... ठीक आहे... " ...आकाश..." निघूया का .... " ," कुठे ? " ," घरी ... शहरात... " सुप्रीकडे बघतच राहिला आकाश. पूजाला कळलं, पुन्हा याच्या मनात घालमेल सुरु झाली आहे." डब्बू .... या दोघी दमलेल्या , भुकेलेल्या वाटतात.... आराम करा आज. उद्या पाहिजे तर निघा ... चालेल ना सुप्री... " पूजाला सुप्री नकार देऊ शकत नव्हती. तरी आकाशच्या चेहऱ्यावरून काहीच ...अजून वाचा

18

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १८

" नको ना विचार करू इतका ... आपण जाऊ शहरात पुन्हा... नव्याने सुरु होईल सर्व.. "," कसं सांग ... आलीस इथे ... मागोमाग ... तेही मला आवडले कि नाही ते सांगू शकत नाही... तू आलीस , त्याचा आनंद मानावा कि मी पुन्हा शहरात जाईन त्याचे दुःख... मी काय करू सांग, तो गणू सुद्धा नुसता हसत बघत असतो माझ्याकडे .... काहीच मदत करत नाही... आणि शहरात गेल्यावर कस ठीक होणार आहे सर्व .. मन तर इथेच राहणार ना माझं ... " बोलता बोलता आकाश अचानक थांबला." काय झालं ... " सुप्री त्याला बिलगून बसलेली." मी आपल्या भविष्याचा काही विचार केला ...अजून वाचा

19

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १९

" गुरुजी .... माझे आजोबा सांगायचे मला , त्यांच्या गावाच्या गोष्टी.... मोठ्ठ गाव होते, बाजूला दोन नद्या १२ महिने असायच्या. आजूबाजूला डोंगर... ", पूजा पुढे काही बोलणार तर गुरुजींनी मधेच तिचे वाक्य तोडलं आणि स्वतः बोलू लागले. " गावात मोठी मोठी झाडे.... सुखाने नांदलेले गाव... शेत जमिनींनी फुललेलं गाव... वाऱ्यावर डोलणारे गाव .... बरोबर ना " पूजा हरखून गेली." हो ... हो ... हेच .... तेच ते गावं.. तुम्हाला कस माहित ... हे असे माझे आजोबा वर्णन करायचे ... " ," आजोबा ... !! महाद्या.... हा..... महादेव नाव त्याच .... वाड्यातल्या महाद्याची नात का तू .... " गुरुजी आठवून ...अजून वाचा

20

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २०

गप्पा -टप्पा मारत दुपारपर्यंत पुढे चालत गेले. आकाश - पूजा ग्रुपच्या पुढे , बाकी सर्व मागे. सुप्री - संजना कादंबरी रमलेल्या गप्पात. जणू काही जुन्या मैत्रिणी." तुम्हाला कसं जमते ... शहरापासून दूर राहायला. " संजनाने विचारलं कादंबरीला." सवय झाली .... निघाले तेव्हा घाबरली होती. आता चालून जाते सर्व .. " ," आकाशला कधी पासून ओळखते तू ... " आता सुप्रीचा प्रश्न." तुम्ही आलात ना .... त्याच्या आदल्या दिवसापासून... पूजाचा जुना मित्र आहे तो... " , " तरी तुम्हाला कधी वाटतं नाही ... शहरात परत जाऊ असे ... " सुप्री. " आधी एक -दोनदा वाटलं ... त्या सोयी-सुविधा या अश्या ठिकाणी मिळत ...अजून वाचा

21

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २१

काळ्या ढगांनी सारे आभाळ भरून गेलेलं. जोराचा वारा वाहत होता. पाऊस कधीही सुरु होईल , मुसळधार पाऊस. त्यात हे एका पठारावर. त्यामुळे आणखी जोराचा वारा आला तर एखादं - दुसरा तंबू उडून जाण्याची शक्यता. मधेच विजांचा कडकडाट... काळोखी पसरलेलं आजूबाजूचे माळरान, एका क्षणात स्पष्ट दिसून जाई. एव्हाना सारेच आपापल्या तंबूत बसलेले. सुप्री अजूनही बाहेर पाहत होती. त्या ढगांचा काळा रंग .. आज जास्तच गडद आहे.. नाही का... !! सुप्री मनातल्या मनात बोलत होती. आकाशचा तंबू तिला दिसतच नव्हता. गेला असेल का आकाश बाहेर , वादळात. कि त्याच्या तंबूंत येऊन बसला असेल. किती विचार करतो आपण... कि करूच नये विचार... ...अजून वाचा

22

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २२

कादंबरी आकाश सोबतच चालत होती. " ओ सर ... दाखवा कि फोटोग्राफी... मघाशी सांगितलं म्हणून कॅमेरा आत ठेवला मी. तरी दाखव ... . फोटोग्राफी... ती .. तुझी निरू ... किती काय काय सांगायची तुझ्या फोटोग्राफी बद्दल.. एकतरी फोटो काढून दाखव मला ... " आकाश कडे कॅमेरा नव्हता त्यावेळेस..." हे काय ... कॅमेरा कुठे आहे तुझा... " ," दुसऱ्या बॅगमध्ये... " ," का ... आणि फोटोग्राफी चे काय ... " आकाशला गंमत वाटली." तुझा आहे कि कॅमेरा... त्याने कर तुझी हौस पुरी... " ," चालेल ... हा घे कॅमेरा... " कादंबरीने स्वतःचा कॅमेरा पुढे केला." तुझ्याकडेच ठेव... तुला सांगतो तसे ...अजून वाचा

23

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २३

" सॉलिड आहेस तू ... " कादंबरी चालता चालता बोलली आकाशला." का ?? " ," पूजा बोलते तस... तुलाच हे निसर्ग सौंदर्य सापडतं... मला बुवा असे काहीच दिसले नाही इतक्या वर्षात. " ," निसर्ग जेवढे देतो ना ... तितकेच परत सुद्धा घेत असतो... समोर बघ.. " कादंबरी समोर बघू लागली. गावाच्या वेशीपाशी आलेले दोघे. वादळाने काही झाडे मुळापासून उपटून काढली होती. काही घरांची पडझड झालेली. शेतात काही उभी पिके झोपली होती. जागोजागी पाणी." निसर्गाची काळजी घेतली कि तो आपली काळजी घेतो. " आकाशचे असे बोलणे आवडले कादंबरीला." पूजा आणि तू ... खूप जुने सोबती आहात ना... कधी प्रेम वगैरे ...अजून वाचा

24

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २४

" सॉरी सुप्री ... खरंच तुला दुखवायचे नाही. डोक्यात खूप काही सुरु असते सध्या.... त्यामुळे तुझ्याकडे यायला सुद्धा कसं वाटते. तुझ्यापासून दूर जात नाही. तरी तूच दूर जाशील असा भास होतो. काहीच सोडायचे नाही मला आणि काही मनात भरूनही ठेवायचे नाही. अशीच द्विधा मनःस्तिथी होते माझी. तुला गमवायचे नाही आणि या निसर्गापासून दूर राहायचे नाही.... " सुप्रीने आकाशच्या खांदयावर डोके ठेवले. " इतका कधी कोणाचा विचार केला नाहीस ना तू .... म्हणून होते हे . जसा मोकळा होतास ना आधी, तसाच रहा .... कोणी अडवणार नाही तुला. " दोघे तसेच बसून होते काही वेळ. अचानक .... सुप्रीला ... पुढे ...अजून वाचा

25

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २५

" डब्बू आणि मी .... बालमित्र , त्यांचे घर माझ्या सोसायटीपासून १० मिनिटांवर, त्यामुळे शाळेत जाताना एकत्र जायचो, त्याची आणि माझी आई मैत्रीण... माझ्या आईला तर माझ्यासाठी वेळ नसायचा. डब्बूची आई मला शाळेत घेऊन जायची. घरी सुद्धा सोडायची. तेव्हापासून ओळख. एका वर्गात होतो. मला ना तेव्हा डब्बू मुका वाटायचा. कधीच बोलायचा नाही. शाळेत सुद्धा टीचरने काही विचारलं , तरी बोलायचा नाही. का ते अजूनही माहित नाही. पण आधीपासूनच हुशार..... चित्रकला , स्केचिंग जास्त आवडायची. पावसात भिजायचा नाही, पाऊस बघायला आवडायचे त्याला. लहानपणीच या सर्वांचे वेड ... तेव्हाही एकटाच रहायचा. त्याचे मित्र का नाहीत .... कळलं का आता...... अबोल त्यात ...अजून वाचा

26

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २६

आताही छान प्रवास झाला. संध्याकाळ होतं आली. तेव्हा आकाश एका ठिकाणी थांबला." काय झालं डब्बू ... " ," वादळ आहे .. थांबायला पाहिजे ... समोर बघ... " पूजाने समोर पाहिलं. ढग गोलाकार फिरत होते. अधूनमधून विजा चमकत होत्या." किती वेळ आहे आपल्याकडे ... " आकाशने घड्याळात पाहिलं." अजून एक तास तरी... पाऊस येईल का माहित नाही .. तरी तयारी करावी लागेल. " काळोख तर झालेला. आणि मोठयाने वीज कडाडली. आकाशला त्या प्रकाशात काही दिसलं. पूजाचा हात पकडला त्याने." काय झालं डब्बू .... " ...." निरू .... कदाचित आपण पोहोचलो .... तुझ्या गावात ... " पूजाही उत्सुकतेने पाहू लागली. समोर ...अजून वाचा

27

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २७

आजोबांचा वाडा .... आजोबा सांगत, वाड्या पुढे मोठे अंगण.... त्यात विविध प्रकारची झाडं... फुलझाडे, फळझाडे... होती तिथे झाडं... आजोबांच्या नसतील तरी अंगण आता झाडा-झुडुपांनी , वेलींनी भरलेलं होते. केवड्याचे एक मोठ्ठ झाडं होते. त्याचा सुगंध वातावरण मोहवून टाकत होता. वाडा तर नजरेत सामावत नव्हता. इतका मोठा. वाड्याचा दरवाजा लाकडी. तो तर कधीच नाहीसा झाला होता. राहिल्या होत्या त्या फक्त त्याच्या आठवणी. पूजासहित सर्वंच वाड्यात शिरले. वाड्याला वेलींचे मोठे जाळे... कुठून कुठून येऊन त्यांनी वाड्याला वेढले होते. भरीसभर पावसाने सुरुवात केली. पूजा पूर्ण वाडा फिरत होती. हाताने स्पर्श करत होती. वाड्यातल्या लाकडी वस्तू निसर्गात मिसळून गेल्या होत्या. आजोबांचा ...अजून वाचा

28

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २८ (अंतिम भाग)

आकाशच्या डोळ्यात पाणी जमा झालेले. सुप्रीच्या डोळ्यातून आधीच पाणी वाहत होते. मात्र ती हसत होती. तुला डब्बू हेही माहित नव्हतं मला. मीच प्रत्येक वेळेस तुला माझ्यात अडकवून ठेवलं. तुझ्याबाबत कधी काही जाणून घेण्याचा प्रयन्त ही केला नाही. तू जेव्हा हरवला होतास ना ... तेव्हा काय बोलला तू , माझ्यामुळे पुन्हा माणसात आलास तू.. नाही आकाश.... तुला त्या निसर्गाने जिवंत ठेवले. तोच तर तुझा सोबती आहे ना पहिल्यापासून... आणि मी तुला त्याच्या पासून दूर ठेवत आले. आकाश आता नॉर्मल वाटत होता . तोही बोलू लागला . कधी कधी आई बोलते मला...... तुझ्या अंगात रक्त नाही.... उधाणलेला वारा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय