लग्नाआधीची गोष्ट

(259)
  • 153.8k
  • 33
  • 81.3k

ट्रेन दुपारच्या तीनची वेळ सूर्य भलताच तापला होता .ऑफिसमध्ये भयाण शांतता पसरली होती. मॅनेजर त्याच्या केबिनमधून अधूनमधून काचे मधुन बाहेर नजर भिरकावत होता .अचानक मोबाईल वाजू लागला. सूरज थोडा बाजूला येऊन बोलू लागला. सूरज तसा दिसायला सावळा जेमतेम उंची असलेला एक सत्तावीस वर्षाचा तरुण. पलीकडून सागर उत्सुकतेने विचारतो, "सूरज कुठे आहेस? तुला ठाऊक आहे ना ,आज आपल्याला निघायच् आहे नागपूरला? झाली का तयारी?" खरतर सूरज च्या लक्ष्यात नसते कि आज निघायचे आहे . त्याने उद्या निघायचे आहे असे गृहित धरलेले असते . 6:15 ला ट्रेन पुणे स्टेशनवरून निघणार असते. आता कसे पोहोचायचे याचा विचार करत शिफ्ट संपवून तो 3:05 ला ऑफिस

Full Novel

1

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 1)

ट्रेन दुपारच्या तीनची वेळ सूर्य भलताच तापला होता .ऑफिसमध्ये भयाण पसरली होती. मॅनेजर त्याच्या केबिनमधून अधूनमधून काचे मधुन बाहेर नजर भिरकावत होता .अचानक मोबाईल वाजू लागला. सूरज थोडा बाजूला येऊन बोलू लागला. सूरज तसा दिसायला सावळा जेमतेम उंची असलेला एक सत्तावीस वर्षाचा तरुण. पलीकडून सागर उत्सुकतेने विचारतो, "सूरज कुठे आहेस? तुला ठाऊक आहे ना ,आज आपल्याला निघायच् आहे नागपूरला? झाली का तयारी?" खरतर सूरज च्या लक्ष्यात नसते कि आज निघायचे आहे . त्याने उद्या निघायचे आहे असे गृहित धरलेले असते . 6:15 ला ट्रेन पुणे स्टेशनवरून निघणार असते. आता कसे पोहोचायचे याचा विचार करत शिफ्ट संपवून तो 3:05 ला ऑफिस ...अजून वाचा

2

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 2)

तीन वर्षापुर्वी तीन वर्षापुर्वी....ट्रेन नगरच्या दिशेने धावत असते.. मुलांचा ग्रुप टवाळक्या करत बसलेला असतो. प्रशांत, सागर, वैभव , अक्षय, आणि सूरज. तेवढ्यात एका स्टेशनवर तीन मुली येऊन पुढच्या बाकावर बसतात . नेहमीप्रमाणे सूरज खिडकीजवळ बसलेला असतो . त्याच्या समोर एक सलवार घातलेली सुंदर मुलगी बसते .. तिचे ते काळेभोर डोळे व हवेत उडणारे केस यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते .सूरज च्या मनात एका कवि ने म्हटलेले काही शब्द घुमू लागले, "समोर एखादी सुंदर स्त्री असेल तर तिच्याकडे न बघणे हा तिच्या सौंदर्याचा केलेला अपमान असतो " त्याच्या तिच्याकडे बघण्यात कोणतीही वासना नव्हती. ती एवढी सुंदर होती की इंद्र लोकमधल्या अप्सरा ...अजून वाचा

3

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 3)

तिला सीट वर झोपवून बाकीचे पुढे हीच काय करायचे असा विचार करत असताना सूरजकडे बघतात. सूरज त्यांचे भाव ओळखून म्हणतो, "अस माझ्याकडे नका बघु यार, माझ नुकताच लग्न झालंय आणि निशाला सुद्धा मी काहीच नाही सांगितलेले हिच्या बद्दल "….. बाकीच्यांशी बोलल्यावर सूरजच्या लक्ष्यात येते की हिला आता आपल्याच घरी न्यावे लागणार कारण तीन जण तर बॅचलर म्हणून राहतात व दोघांना कामानिमित्त इकडे -तिकडे फिरावे लागते. ट्रेन थोड्याच वेळा मध्ये स्टेशनला पोहोचेल म्हणून शेवटी त्याला तिला घरी नेण भाग पडत .आता त्याचा भुतकाळ आणि भविष्यकाळ यांची लवकरच गाठ पडणार असते. ती ,पत्नी आणि ...अजून वाचा

4

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 4)

सोफ्यावर बसुन आता निशा ने आपल्याला तिच्या बदल विचारले तर काय व कस सांगायच या विचारात असताना त्याच्या हातातून लाँकेट सुटते व निशा बेडरूम मधून आली असतानाच तिच्या पायाखाली जाऊन पडते. निशाचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तेवढ्यात ते पडलेले लाँकेट व त्यावरील कोरलेली नावे व सपना च्या हातावरील टॅटू वरील नावे यामुळे तिचा राग अजूनच वाढतो. निशा आता विचार न करता सूरजवर जोरात ओरडते, " एवढच करायच होत तर माझ्याशी लग्न कशाला करायच ? कोण आहे ती तुमची ? कशाला आणली तिला इकडे ? संबंध काय तुमचा तिच्याशी?" सूरज तिला शांतपणे म्हणतो," निशा ...अजून वाचा

5

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 5)

त्या दोघींनी सलाईन लावण्यासाठी माझा हात हातात घेऊन त्यावर एका कापसाने तो भाग साफ करायला सुरुवात केली कि जेणे त्यांना हाताची नस सापडेल व तेथे सुई टोचता येईल. पण माझ्या हातावरील नस त्यांना काही केल्या दिसेना तेव्हा त्यांनी दुसर्‍या एका नर्सला बोलावले. ती धावत आली व माझा हात हातात घेऊन बघू लागली. मी जेव्हा तिच्याकडे बघितले तेव्हा मला विश्वासच बसला नाही कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून सपना होती. एकाच ठिकाणी राहत असून आमची एवढ्या दिवसानी भेट झाली होती. बाकीच्या दोघी निघून गेल्या आता फक्त ती व मी उरलो होतो. मी तिला तिचा नंबर मागितला. ती म्हणाली, ...अजून वाचा

6

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 6)

मला ते ऐकून धक्काच बसला, "घरी आहेस तर फोन का नाही केलास तू? " मला काहीच समजत नव्हते. मनात शंकानी घर केले होते. रागवून तिला म्हणालो. तिला कदाचित समजले नसेल मी रागात बोललो. ती तेवढ्याच प्रेमाने, "अरे राजा आजच आले मी घरी " . तिच्या ते राजा म्हंटल्यावर मी मेणबत्ती सारखं वितळलो.. का कुणास ठावूक स्त्रियांच्या अश्या बोलण्याने माणसे वितळत असतिल. जगातल्या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत असच होत असेल का? ... भले रती महारती यांना जे वाटत असेल तसा भास मला झाला. नंतर दररोज बोलण सुरू झाल. तो अनुभव माझ्यासाठी वेगळाच.कधी कधी बोलता बोलता मला जेवायचे भान रहायचे नाही. तासा मागे ...अजून वाचा

7

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7)

निशा विचारते, "हा संजय कोण आता? "सूरज तिला म्हणतो, "सपना चा एक्स बॉयफ्रेंड ". निशा चकित होऊन म्हणते, "पण तर आताच म्हणाला होतास ना तीच तुझ्या बरोबर रिलेशन चालू होते. " निशाला काहीच समजत नाही मग ती शांत बसते, पाणी पिते व सूरज कडे बघते. सूरज मघाशी लॉकेट काढून घेतलेल्या बॉक्स मधून काही वस्तू काढतो व तिच्या समोर असलेल्या टेबलवर टाकतो. त्यात एक फोटो, वर्तमानपत्र, डायरी व बर्‍याच वस्तू पडलेल्या असतात. त्यातला एक फोटो काढून तो निशाला देतो आणि म्हणतो हा, "संजय सुतार ". आणि मघाशी तू सपना च्या हातावर टॅटू बघितला तो ह्याच्या नावाचा आहे माझ्या नाही. निशा त्याच्या उत्तरा ला प्रतिउत्तर म्हणून म्हणते, "आणि ते लॉकेट?". सूरज तिला हात करून शांत रहायला सांगतो व पुढे सांगायला सुरुवात करतो. सुरज सांगता झाला- सपनाची सुट्टी जवळजवळ संपत आली. कॉलेजला जाण्याची वेळ आली होती. ती पुण्याला यायला निघाली. महिना दीड महिना दररोज बोलण्याची सवय लागल्याने माझा एकटेपणा पण खूप कमी झाला होता. या काळात मित्रांच्या थोड्याफार लांब गेल्याची जाणीव माझ्या मनाला भासत होती. आता मला परत मित्रांकडेच जावे लागणार होते. कारण ती परत कॉलेज ला गेल्यावर आमचा परत संपर्क होणार नव्हता. मला परत पहिल्यासारखी वाटच बघावी लागणार होती म्हणून मी नाराज होतो. अखेर तो दिवस आलाच जाताना ...अजून वाचा

8

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 8)

तिने माझा स्वीकार केल्याचे मला सांगितले मी हि खुश झालो.फोनवर फोन चालू झाले.एव्हाना तिच्या घरच्यांशी ही माझं बोलणं सुरु वडिलांशीही मी आता थोडा मनमिळाऊ बोलू लागलो होतो.एक घटना ऐकून मला तिच्या आईचा अजूनच अभिमान वाटू लागला.खूप वर्षापूर्वी जेव्हा सपना लहान होती तेव्हा त्यांना एक लहान मुल भेटल होते त्यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवला होता.त्या मुलाच्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. मी त्या कुटूंबाशी जोडलो गेलो होतो. ते मलाही एक कुटूंब वाटत होते. सपना व मी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता व त्यानंतर मी घरच्यांना भेटायला पण जाणार होतो.तिचे गाव कोल्हापूर असल्यामुळे मी तिला रंकाळा या तलावाजवळ भेटण्याचे ठरवले. ...अजून वाचा

9

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 9)

डायरीच्या पानातून …आफरिन ऐसा देखा नहीं खूबसूरत कोईजिस्म जैसे अजंता की मूरत कोईजिस्म जैसे निगाहों पे जादू कोईजिस्म नगमा खुशबू कोईजिस्म जैसे मेहक्ती हुई चांदनीजिस्म जैसे मचलती हुई रागिनीजिस्म जैसे कि खिलता हुआ एक चमनजिस्म जैसे कि सूरज की पहली किरणजिस्म तर्शा हुआ दिलकश ओ दिलनिशिंसंदलिं संदलिंमरमरिं मरमरिं मार्च- आजचा दिवस बाकीच्या दिवसांसारखा नव्हता .. दोन महिन्यापासून संजय दररोज माझ्याकडे बघतोय .आजूबाजूला त्याचे मित्र पण बसलेले असतात. मी आले की वहिनी -वहिनी म्हणून ओरडायला लागतात . दररोज तो फक्त लांबूनच बघायचा पण आज चक्क त्याने सगळ्या कॉलेज समोर मला प्रपोज केले. सगळे कॉलेज माझ्याकडे बघत होते. मला तो अजिबात आवडत नव्हता आणि त्याच हे वागण तर अजिबात आवडत नव्हत.त्यामुळे मी सगळ्यांसमोर त्याच्या कानशिळात एक लावून दिली.तो मान खाली घालुन निघून गेला. मी ही घरी निघून आले.त्यानंतर कित्येकदा तो माझ्या जवळून किंवा समोरून गेला.पण मला न बघताच निघून जायचा. एप्रिल- का कुणास ठावूक ? पण मला त्याच्याबद्दल वाईट वाटू ...अजून वाचा

10

लग्नाआधीची गोष्ट (भाग 10)

लग्नाआधीची गोष्ट (भाग 10) ऑक्टोबर(2 वर्षानंतर परत)- एवढ्या दिवस मला लिहायला काही जमल नाही. काही विशेष घडलेच नाही. कॉलेज रूम… तीच रात्र ,तीच सकाळ…. काही दिवसांनी इंटर्नशिप सुरू होणार अस समजलंय. मला पुण्याला पिंपरी चिंचवडला वाय. सी. यम मध्ये जाव लागेल. सहा महिने कसे जातील तिकडे या मैत्रिणी सुद्धा नसणार. असणार तो फक्त एकटेपणा. आता कुठे मी थोडीशी येथे रमायला लागली होती. फेब्रुवारी- स्मृती मधून संजयच्या आठवणी मधून बाहेर आले होते. तोच आज सूरज नावाचा एक जण भेटला. त्याच्याशी बोलून खूप बरे वाटले. नंतरसुद्धा योगायोगाने हॉस्पिटल मध्ये आमची भेट झाली व त्याने प्रपोज केला. संजय पासून खूप दिवस मी लांब होते. पण आता तसंपण तो मला भेटणार नाही. सूरजला खूप दिवस मी टाळत होते पण तो मात्र मनापासुन प्रेम करत होता त्या दिवशी मी त्याला हो म्हणाले. मार्च- मी परत घरी येऊन जवळ जवळ एक महिना झाला होता. सूरज व मीदररोज एकमेकांशी बोलतो. आज पुन्हा पुण्याला जायला निघाले तेव्हा अचानक संजयने एस .टी थांबवून मला खाली बोलावले व मला मिठी मारली. कारण तो खूप दिवसातून मला बघत होता. मी त्याला मागे ढकलून दिले. मी त्याला म्हणाली, मी आता तुझ्यावर प्रेम नाही करत मी दुसर्‍या एका वर प्रेम करते . त्याला हे सहन झाले नाही ……त्याने माझा हात धरून माझ्या कानाखाली मारली व मला म्हणाला, मी तुझ्यासाठी पोलिसांचा मार खाला, जेल मध्ये गेलो, माझ्या गावांत पण माझी बदनामी झाली आणि तू... नंतर तो निघून गेला पण माझ्याकडे एक प्रश्न राहून गेला मी हे का केल? सूरजला मी आवडते गाणे विचारले तर त्याने मला मी ‘आफरिन’ हे गाणे दररोज ऐकतो अस सांगितल. मी पण ते गाणे ऐकल इतके अप्रतिम होते ते की काय सांगू.... मी माझ्या डायरीच्या पहिल्याच पानावर ते गाणे लिहिले. जेव्हा जेव्हा डायरी उघडते तेव्हा ते एकदा म्हणावेसे वाटते आणि गाणे चालू असताना मला फक्त सूरज दिसतो का कुणास ठाऊक? संजय त्यामधे नसतो. सूरजने त्याला समजल्यावर मला सांगितले तू दोघांमध्ये कोणाचाही स्वीकारकर. पण सूरज ला रिजेक्ट करण्याचे काहीच कारण मला सापडत नव्हते. मी विचार न करता सूरज ला तुझा स्वीकार केला ,असे त्याला सांगून टाकले. मी याआधी सूरजला खूप वेळा म्हणाले होते की मी ज्याच्यावर प्रेम करेल त्यालाच हे लव असलेले लॉकट देईन. उद्या मी त्याला भेटायला जाणार आहे. तेव्हा मी हे लॉकेट व माझा भूतकाळ असलेली डायरी त्याला देईन. NOTE: माझ प्रेम कोणावर आहे यापेक्षा माझ्यासाठी कुणी काय गमावलं याचा विचार करून मला सध्या संजयकडे जावेच लागेल. सूरज तुला काय वाटेल माहीत नाही. कदाचित मी चुकले असेल पण मला क्षमा कर. मी त्याच्याकडे जात आहे. माझ काही चुकल का ? कधीकधी ...अजून वाचा

11

लग्नाआधीची गोष्ट (भाग 11)

लग्नाआधीची गोष्ट (भाग 11) खून का आत्महत्या सुरज सांगता झाला- मी सपनाच्या मोबाईल वर फोन केला तर फोन लागत नंतर मी तिच्या आई ला फोन केला. तिच्या आईने ती पळून गेली असल्याची बातमी दिली. तिची आई खूपच नाराज होती. मला जी शंका होती तेच घडले होते. माझी फसवणूक झाल्याचे मी मान्य केले. मी तिच्याशी बोलणे बंद केले व तिच्या घरी सुद्धा फोन करणे बंद केले. मी एकटा पडलो होतो पुन्हाएकदा….. एक दिवस सपना च्या आईचा मलाफोन आला. काकू मला म्हणाल्या,"तिने नाते तोडले म्हणून तू आम्हाला सुद्धा विसरणार आहेस काय?,आम्ही काय चुकीच केलय ?" त्यांच्या त्या मातृत्वाकडे बघून मलाच माझी कीव आली. त्यांची मुलगी त्यांच्यापासून लांब गेली होती तरीही मी माझ्या जिवाला बरे वाईट करून घेईल अशी चिंता त्यांना होती. आणि मी मात्र पोरका असूनही त्या आईची माया जानू न शकणारा दरिद्री मुलगाहोतो …. त्यामुळे मी त्यानंतर सुद्धा त्यांच्याशी बोलणे चालू ठेवले. मध्ये एकदा मला सपना च्या घरी जाण्याचा योगायोग आला होता. घरी गेल्यानंतर मला जाणवलं की काकूंची तब्येत खरच खूप खालावलेली होती. घरातील मुलगी पळून गेली म्हणून घरातले वातावरण खूप बिघडलेले होते. गावत लोकांनी जवळजवळ वाळीतच टाकले होते. पण माझ्या प्रति त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. काही दिवसानी मला समजले की काकूंना आधी होणारा त्रास पुन्हा व्हायला लागला आहे. त्याच्या डोक्यात रक्ताच्या गाठी होत्या. दवाखाना चालू होता. मला त्याची चिंता लागलेली असायची मी अधून मधून फोन करायचो. त्यांच्यावर उपचार चालू होते त्यांची तबेत आता थोडी सुधारली होती. आता सगळे व्यवस्थित चालू होते ती निघून गेल्या पासून सात महिने उलटून गेले होते. एक दिवस संजय ने मला भेटायला त्याच्या घरी बोलावले. माझी कोणती तरी वस्तू मला द्यायची आहे व काहीतरी महत्वाचे काम आहे असे तो म्हणाला. आणि मला सुद्धा अचानक ऑफिसच्या कामानिमित्त कोल्हापूरला जावे लागणार होते त्यामुळे त्याला भेटून मग ऑफिसच्या कामासाठी जायच अस मी ठरवल.. आणि सपनाच्या वस्तू पण मला देऊन टाकायच्या होत्या. मी याबद्दल फोनवर काकूंना सांगितले व काकू मला म्हणाल्या, "सपना मला फोन करती कधी कधी, मी तिच्याशी बोलण बंद केल होत पण काय करणार आईच काळीज, ती सांगत होती तो खूप त्रास देतो, मारामार करतो, दारू पिणे तर दररोजच चालू आहे." मला काकूंच्या पण काही गोष्टीचा राग आला होता मी त्यांना म्हणालो,"तुम्ही फक्त जात वेगळी म्हणून त्याला नकार दिलात, तुम्ही खूप चुकीच केलत." …यावर काकू मला म्हणाल्या," जातीसाठी आधी माझा विरोध होता पण त्याचे व्यसनाचे गुण बघता मला त्याला माझी मुलगी द्यायची नव्हती."……… मलाही त्यांचे म्हणणे पटले कारण मी फोनवर संजय च उद्धट बोलण ऐकल होते. ******* ...अजून वाचा

12

लग्नाआधीची गोष्ट (भाग 12)

लग्नाआधीची गोष्ट (भाग 12) संजय च्या घरी सुरज सांगता झाला- ठरल्याप्रमाणे मी त्याला भेटायला गेलो होतो. त्याने मला व्हॉटसपला व त्याचे लोकेशन सुद्धा पाठवले होते. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मी इस्लामपूरला जाण्यासाठी बस पकडली. गावातला एक वृद्ध माणूस सकाळी दुधाची किटली घेऊन दूध घालायला जात असताना मी त्याला विचारले, " बाबा ,हे संजय कुठे राहतात? , " …… वृद्ध बाबा म्हणाले, "व्हतीत हाय नव, सरळ खालच्या अंगाला जावा ,आण गेल्यावर कुणासनी भी एचारलसा तरी कोण भी सांगल." . नंतर मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घराचे दार आतून बंद होते. पण खिडकी मात्र उघडी होती. व्हॉटसपवरच्या फोटोमुळे व सपनाच्या डायरी मधल्या फोटोमुळे मी ...अजून वाचा

13

लग्नाआधीची गोष्ट (भाग 13)

लग्नाआधीची गोष्ट (भाग 13) कालच्या प्रवासाचा थकवा व ही अनपेक्षित घटना यामुळे मी पुरता हादरून गेलो होतो. राऊत जवळ आले व म्हणाले’ कदम ‘आम्हाला सगळीकडे लक्ष द्यावे लागते. कोण खर ?कोण खोट ? हे अगोदरच सांगता येत नाही. नंतर हवलदार गायकवाड यांना आवाज देऊन मला चहा द्यायला सांगितला.. फोरेन्सिक रिपोर्ट यायला जवळ जवळ एक दिवस लागणार होता असे मलायांच्याकडून कळाले .मला एक रात्र काढायला लागल्याने मला संजय व सपनाचा खूपच राग आला होता. दुसर्‍या दिवशी फोरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समजले कि त्याचा मृत्यू विष खाल्ल्यामुळे झाला होता त्याने सकाळी 2 ते 3 च्या दरम्यान ग्लास मध्ये विष टाकून त्याचे प्राशन केले ...अजून वाचा

14

लग्नाआधीची गोष्ट (भाग 14)

लग्नाआधीची गोष्ट (भाग 14) मुंबईला गेल्यावर त्याच्या एका मित्राच्या मदतीने आम्ही एका ठिकाणी रूम घेतली. व तेथे राहू लागलो घरून येताना काही पैसे पण आणले असल्याने चार महिने आम्हाला काहीच वाटले नाही. पण जसजसे पैसे कमी व्हायला लागले तसतसे आम्ही आता काम शोधावा असा विचार केला. पण माझ कॉलेजचे काही महिने बाकी असल्याने मला माझा रिजल्ट व डॉक्युमेंट न मिळाल्याने काम भेटत नव्हते. मला माझ्या या निर्णयाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे चिडचिड होऊ लागली. आता भांडण दररोज चालूच झाली. एके दिवशी आजारी असल्यामुळे एका दवाखान्यात गेलो असता मला माझी एक मैत्रीण भेटली. संजय गोळ्या आणण्यासाठी केमिस्ट कडे गेला ...अजून वाचा

15

लग्नाआधीची गोष्ट (भाग 15) - अंतिम भाग

लग्नाआधीची गोष्ट (भाग 15) सपनाच्या घरी पोहोचल्यावर आपल्या मुलीला बघून तिच्या घरच्यांना खूप बरे वाटले. सूरजने निशा व काकूंची सपनाच्या आईची ओळख करून दिली. कारण त्यांच्याच रूपाने त्याला आई वडील मिळाले होते जेव्हा त्याच्याकडे कोणीच नव्हते. सपनाच्या आईने सूरजचे आभार मागितले. जाता जाता सपनाला सूरजने दोन गोष्टी दिल्या. डायरी व लॉकेट. सूरज सपनाला म्हणाला, "मी हे फेकून किंवा जाळून टाकू शकलो असतो, पण मला कोणाच्या प्रेमाचा अपमान करायचा नव्हता. " जपून रहा, काळजी घे. नंतर सूरज व निशा दोघे तेथून निघून गेले. घरी जाता जाता घरी जाता जाता सूरज निशाला म्हणतो, "चल तूला एक ठिकाण दाखवतो. गाडी 80 ते ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय