lag aadhichi gosht - 3 books and stories free download online pdf in Marathi

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 3)

तिला सीट वर झोपवून बाकीचे पुढे हीच काय करायचे असा विचार करत असताना सूरजकडे बघतात. सूरज त्यांचे भाव ओळखून त्यांना म्हणतो, "अस माझ्याकडे नका बघु यार, माझ नुकताच लग्न झालंय आणि निशाला सुद्धा मी काहीच नाही सांगितलेले हिच्या बद्दल "….. बाकीच्यांशी बोलल्यावर सूरजच्या लक्ष्यात येते की हिला आता आपल्याच घरी न्यावे लागणार कारण तीन जण तर बॅचलर म्हणून राहतात व दोघांना कामानिमित्त इकडे -तिकडे फिरावे लागते. ट्रेन थोड्याच वेळा मध्ये स्टेशनला पोहोचेल म्हणून शेवटी त्याला तिला घरी नेण भाग पडत .

आता त्याचा भुतकाळ आणि भविष्यकाळ यांची लवकरच गाठ पडणार असते.

ती ,पत्नी आणि ती

सकाळची वेळ असते. सकाळचा गारवा आजूबाजूला पसरलेला असतो. अशातच एक टॅक्सी सूरजच्या घरासमोर येऊन थांबते. टॅक्सी चा आवाज ऐकुन निशा बाहेर येते. निशा हि एक सुंदर सूरजला शोभेल अशी स्त्री आहे. सूरज पेक्षा दोन इंच कमी, गोरा रंग, आणि नीटनेटकी साडी नेसलेली. एक वर्षापूर्वी दोन्ही पाखरे एकमेकांच्या बंधनात अडकलेले असतात. सुखाने संसार सुरू असतो.

आजपर्यंत सूरज कधी अशी टॅक्सी करून आला नव्हता तो रिक्षा किंवा बसने येत असे. पण आज मात्र सागर सुद्धा त्याच्या सोबत आलेला निशाला दिसतो. टॅक्सीमधून कुणाला तरी ते बेडरुम मध्ये नेत आहेत असे तिला दिसते. दिसण्यावरून तरी ती एक सुंदर मुलगी पण कपड्यावरून तिच्याकडे बघून एखाद्याला शंका यावी तस तिलाही आली. तिला आतमध्ये ठेऊन सागर निघून जातो. नंतर निशा त्या स्त्रीबद्दल सूरजला जेव्हा विचारते तेव्हा तो मैत्रीण असल्याच सांगून तिच्याकडे दुर्लक्ष करून फ्रेश होण्यासाठी निघून जातो. निशा ला थोडी शंका येते पण ती शांतच राहण पसंत करते.

सपना अजूनपण बेशुद्ध अवस्थेतच असते. तिला घरी आणण्याच्या आधी सूरज व सागर तिला दवाखान्यात दाखवून मगच घरी घेऊन आलेले असतात. डॉक्टरानी ती लवकर शुद्धीवर येईल असे सांगितलेले असते. निशा तिच्या कामात गुंतलेली असताना सूरज मात्र कुठल्या तरी विचारात गुंतलेला असतो. निशा च किचनमधून त्याच्याकडे बारीक लक्ष असते. पण सूरज ला याबद्दल काहीच कल्पना नसते. अचानक तो उठतो व कपाटात ठेवलेल्या पेटी मधून एक वस्तू काढतो व ती वस्तू पाहण्यात तो मग्न असतो. किमान दोन वर्षानंतर त्याने ही पेटी उघडलेली असते. या आधीपण कोणी त्या पेटीला हात लाऊ नये अशी सक्त ताकीद त्याने घरात दिलेली असते.

सूरजच्या हातात असलेली वस्तू म्हणजे एक बदामाच्या आकाराचे लाँकेट असते त्यावर दोन वेळा S आणि S ही नावे कोरलेले असतात. निशा मघाशी काही बोललेली नसते पण तिला आज सूरज च्या वागण्यात काहीतरी बदल जरूर जाणवत असतो. आणि त्यात आज या मुलीचे अश्या अवस्थेत घरी येण यामुळे तिच्या मनात संशयाचे वादळ उठायला लागते . ती काम थांबवून त्या मुलीला ज्या बेडरूममध्ये झोपवले असते त्या ठिकाणी जाते . मघाशी तिला घाईत असल्यामुळे त्या मुलीकडे नीट बघायला मिळालेले नसते पण आता लक्ष देऊन बघते तर तिचे कपडे फाटलेले असतात. तिच्या डोक्यात निरनिराळे विचार यायला सुरुवात होते. तिची ही अवस्था कशी झाली? कदाचित सूरज व त्याच्या मित्रांनी तर काही केल नसेल ना? एवढ्यात तिच्या हातावर काढलेला एक टॅटू पाहून तिचे रक्त उसळते. एका बदामामध्ये दोनदा S आणि S ही नावे दिसतात. थोड्या वेळा पुर्वी सागर जाताना त्याने त्या मुलीला सपना अस म्हणायचे तिच्या लक्ष्यात येते. सूरज ने आपल्या डोक्यावर सवत आणलेली आहे या विचाराने ती रागाने बेडरूम च्या बाहेर पडते. तिला आता S आणि S चा अर्थ कळलेला असतो 'सपना आणि सूरज. "

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED