लग्नाआधीची गोष्ट - (भाग 5) Dhananjay Kalmaste द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 5)

त्या दोघींनी सलाईन लावण्यासाठी माझा हात हातात घेऊन त्यावर एका कापसाने तो भाग साफ करायला सुरुवात केली कि जेणे करून त्यांना हाताची नस सापडेल व तेथे सुई टोचता येईल. पण माझ्या हातावरील नस त्यांना काही केल्या दिसेना तेव्हा त्यांनी दुसर्‍या एका नर्सला बोलावले. ती धावत आली व माझा हात हातात घेऊन बघू लागली. मी जेव्हा तिच्याकडे बघितले तेव्हा मला विश्वासच बसला नाही कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून सपना होती. एकाच ठिकाणी राहत असून आमची एवढ्या दिवसानी भेट झाली होती.

बाकीच्या दोघी निघून गेल्या आता फक्त ती व मी उरलो होतो. मी तिला तिचा नंबर मागितला. ती म्हणाली, "जस मला शोधल, तस बघ तुला मिळविता येतो का ?.... मी तिला म्हणालो," याला चॅलेंज म्हणायच की अपमान ? ". त्या सात दिवसामध्ये दररोज तिचा चेहरा दिसायचा, त्यामुळे डोक्‍यात मला लागलेला विचार कमी व तिचा विचार जास्त असे होऊ लागले. तिचा हसरा चेहरा बघून कायम वाटायचे सपना म्हणजे वार्याची मंद झुळूक मनाला स्पर्शुन जाणारी… आता येता जाता माझ्या मनात तिचाच विचार डोकावायचा…. कशी असेल ती घरी?? खळखळणारी हास्याची लकेर की घरभर कानाकोपर्यात धिम्या पाउलांनी चालणारी श्रृखंलाच … अखेर घरी जाण्याची वेळ आली पण तिचा नंबर काही भेटला नाही. एक दिवस असाच मी हॉस्पिटलमध्ये फोन लावला व तिच्या कॉलेजमधून फोन असल्याचे सांगून सपनाचा नंबर मिळवला.

इतक्या दिवस हॉस्पिटल मध्ये राहून मला एक गोष्ट की सपना सकाळच्या शिफ्ट ला असते. त्यामुळे मी ठरवून संध्याकाळी फोन केला. माझा फोन आलेला पाहून तिला धक्काच बसला. मी नंबर कसा मिळवला हे अजूनही तिला समजले नाही व मीही कधी सांगितले नाही . ती माझ्या चतुराई वर खूप खुश झाली व आमच बोलण सुरू झाल. मला आता ती आवडायला लागली होती. एक दिवस माझ्या डोक्यात तिला प्रपोज करावा ही कल्पना डोक्यात आली. अशाच एका दिवशी अवचित साधून तिला प्रपोज केला व तिनेही काहीही न बोलता त्याचा स्वीकार केला. त्या दिवशी आम्ही दोघे खूप वेळ बोलत होतो. पण तिने संध्याकाळी मला सांगितले की माझा उद्या त्या हॉस्पिटलमध्ये शेवटचा दिवस आहे. कारण तीची पोस्टिंग परत तिच्या काँलेजला होणार होती. कारण ती फक्त फायनल एअर च्या इंटर्नशिप साठी तेथे काम करत होती. मी म्हणालो, "काही प्रोब्लेम नाही आपण फोनवर बोलू आणि मी येईल भेटायला तुला." नंतर मला समजले की त्यांच्या कॉलेजला फोन वापरला बंदी असल्यानं मोबाईल जमा करावा लागतो. म्हणजे फक्त तिकडून फोन येईल तेव्हाच आम्हाला बोलता येणार होते. दुसर्‍या दिवशी ती निघून गेली.

वाट वाट म्हणजे तरी किती पाहावी. एक तर प्रेमात पडू नये आणि पडले तर माघार घेऊ नये. फक्त दहा दिवस आमच काय ते बोलण झाल असेल त्यात ते हॉस्पिटल चे सात दिवस धरून. नंतर फक्त ना माझ्या वाटेला आला एकांत आणि रात्रीची स्मशान शांतता. दिवसामागून दिवस जात होते मला माझी फसवणूक झाल्याचा भास होत होता. प्रेमात हृदयाची धडधड दोन्ही बाजूने झाले तरच बरे नाही का ! पण तरीही मी माझ्या कडून सोडून देणार नव्हतो मी वाट बघत होतो……. बघत होतो…….. बघत होतो. ….....

एक दिवस फोन वाजला मी उचलला तर सपना बोलत होती. मी कॅलेंडर मध्ये तारीख बघावी म्हणून बघितले तर तब्बल पंधरा दिवस होऊन गेले होते. मी वाट बघून बघून आशा सोडून दिली होती कारण करून करून तरी काय करणार होतो तिच्या बदल काही माहीत पडायच्या आधीच ती माझ्यापासून दूर गेली होती. ती तिकडून म्हणाली, "ओळखले का?" . मी थट्टा करण्यासाठी म्हणालो," अजून थोडे दिवस उशीर केला असतास तर नक्कीच विसरलो असतो. " ….मी पुढे तिला बोलू न देता लगेच पुढचा प्रश्न विचारला, " कुठे आहेस ?" तिने घरी असल्याचे सांगितले. मला ती कॉलेज ला असेल अस वाटल होते.