लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7) Dhananjay Kalmaste द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7)

निशा विचारते, "हा संजय कोण आता? "सूरज तिला म्हणतो, "सपना चा एक्स बॉयफ्रेंड ". निशा चकित होऊन म्हणते, "पण तू तर आताच म्हणाला होतास ना तीच तुझ्या बरोबर रिलेशन चालू होते. " निशाला काहीच समजत नाही मग ती शांत बसते, पाणी पिते सूरज कडे बघते.

सूरज मघाशी लॉकेट काढून घेतलेल्या बॉक्स मधून काही वस्तू काढतो तिच्या समोर असलेल्या टेबलवर टाकतो. त्यात एक फोटो, वर्तमानपत्र, डायरी बर्याच वस्तू पडलेल्या असतात. त्यातला एक फोटो काढून तो निशाला देतो आणि म्हणतो हा, "संजय सुतार ". आणि मघाशी तू सपना च्या हातावर टॅटू बघितला तो ह्याच्या नावाचा आहे माझ्या नाही. निशा त्याच्या उत्तरा ला प्रतिउत्तर म्हणून म्हणते, "आणि ते लॉकेट?". सूरज तिला हात करून शांत रहायला सांगतो पुढे सांगायला सुरुवात करतो.

सुरज सांगता झाला-

सपनाची सुट्टी जवळजवळ संपत आली. कॉलेजला जाण्याची वेळ आली होती. ती पुण्याला यायला निघाली. महिना दीड महिना दररोज बोलण्याची सवय लागल्याने माझा एकटेपणा पण खूप कमी झाला होता. या काळात मित्रांच्या थोड्याफार लांब गेल्याची जाणीव माझ्या मनाला भासत होती. आता मला परत मित्रांकडेच जावे लागणार होते. कारण ती परत कॉलेज ला गेल्यावर आमचा परत संपर्क होणार नव्हता. मला परत पहिल्यासारखी वाटच बघावी लागणार होती म्हणून मी नाराज होतो.

अखेर तो दिवस आलाच जाताना शेवटची ती माझ्याशी बोलली की आईला फोन करत जा म्हणजे तुला एकटे वाटनार नाही. मला आई नसल्याने मी त्यांना आता आईच्या स्थानी मानायला लागलो होतो. अधूनमधून कधीकधी त्यांच्याशी थोडेफार बोलण चालू होते. यासाठी त्यांनी पहिल्याच फोन मध्ये दाखवलेला त्यांचा समजूतदारपणा कारणीभूत होता.

रात्र कुणाला आवडत नाही सगळ्याना आवडते. त्या दिवशीची रात्र ही माझ्यासाठी वेगळीच होती. तिच्याशी बोलून झाल्यानंतर झोपायला गेलो तर झोपच लागत नव्हती. डोक्यात एकच विचार यायचा कायम उद्या सपना जाणार.. उद्या सपना जाणार... माझ मन मलाच म्हणत होते आजच्या रात्रीच काय घेऊन बसलास? पुढच्या रात्री या अश्याच जायच्या.

दुसर्‍या दिवशी मला करमत नसल्याने मी सपना च्या आईला म्हणजे काकूंना फोन केला. कारण ती कॉलेज ला गेली होती व तिकडे फोन वापरण्यास बंदी असल्याचे मला ठावूक होते.मी काकूंना तिचा पोहोचली म्हणून फोन आला का याबद्दल विचारले. तेव्हा काकू म्हणाल्या, "ती पोहोचलीच नाही". हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. नक्की काय झाल तिला? अपघात तर नसेल झाला ना? अशा निरनिराळ्या शंका माझ्या डोक्यात घुमू लागल्या.

या सगळ्या गोष्टी माझ्यासंगेच का घडतात ..आधी आई बाबा ,आता सपना भेटली होती तीच पण असंच व्हावे. मी माझ्या विचारांचे पुल बांधत असतानाच पलीकडून काकू म्हणाल्या, "ती पुन्हा घरी आली ". ऐकुन थोड बर वाटल पण मला पुन्हा घरी येण्याचे कारण अद्याप समजले नव्हते. मला वाटल माझ्याशी बोलता येणार नाही म्हणून ती घरी आली असेल. पण कारण वेगळ होते. आज मला धक्क्यावर धक्के बसत होते. काकू म्हणाल्या, "एका मुलाने तिला गाडीतून खाली बोलवून तिला मारहाण केली."मी रागातच काकूना म्हणालो, "अस कसकाय कोणी पण तिला मारू शकतो? आणि बाकीचे लोक नव्हते का तिथे? आणि तुम्ही पोलिस कडे जायला हव होत? मला काहीच समजत नव्हत काय चाललाय."

काकू पुढे म्हणाल्या, "तो खूप दिवसापासून तिच्या मागे होता, त्याला सपना कॉलेज पासूनच आवडायची ,त्याच नाव संजय ". माझ्यापासून काहीही लपवून न ठेवता काकूंनी आपल्या मुलीचा भुतकाळ मला सांगितला होता.

तिचा भुतकाळ व माझा वर्तमान आता एकमेकांसमोर येऊन उभा होते. तिने तिचा भुतकाळ थोडक्यात मला सांगितला व वेळ आली की सगळे सांगून टाकेल अस सुद्धा सांगितल. मीही त्याचा जास्त विचार न करता तिला माफ केल. तसं पण तो तिचा भुतकाळ होता आणि प्रत्येकाचा काहीनकाही असतोच. फक्त मी तिला एकच गोष्ट सांगत आलो होतो ,तूला जर कधी जरा जरी वाटलं माझ्यापेक्षा तूला कोणी जास्त प्रेम करू शकेल तर तू त्या व्यक्ति चा स्वीकार करू शकते पण मला आधी सांग, मला कधीच अंधारात ठेवू नकोस. हव तर मी तुला मदत करेल.