lag aadhichi gosht - 9 books and stories free download online pdf in Marathi

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 9)


डायरीच्या पानातून …

आफरिन

ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई

जिस्म जैसे अजंता की मूरत कोई

जिस्म जैसे निगाहों पे जादू कोई

जिस्म नगमा कोई

जिस्म खुशबू कोई

जिस्म जैसे मेहक्ती हुई चांदनी

जिस्म जैसे मचलती हुई रागिनी

जिस्म जैसे कि खिलता हुआ एक चमन

जिस्म जैसे कि सूरज की पहली किरण

जिस्म तर्शा हुआ दिलकश दिलनिशिं

संदलिं संदलिं

मरमरिं मरमरिं

मार्च-

आजचा दिवस बाकीच्या दिवसांसारखा नव्हता .. दोन महिन्यापासून संजय दररोज माझ्याकडे बघतोय .आजूबाजूला त्याचे मित्र पण बसलेले असतात. मी आले की वहिनी -वहिनी म्हणून ओरडायला लागतात . दररोज तो फक्त लांबूनच बघायचा पण आज चक्क त्याने सगळ्या कॉलेज समोर मला प्रपोज केले. सगळे कॉलेज माझ्याकडे बघत होते. मला तो अजिबात आवडत नव्हता आणि त्याच हे वागण तर अजिबात आवडत नव्हत.त्यामुळे मी सगळ्यांसमोर त्याच्या कानशिळात एक लावून दिली.तो मान खाली घालुन निघून गेला. मी ही घरी निघून आले.त्यानंतर कित्येकदा तो माझ्या जवळून किंवा समोरून गेला.पण मला न बघताच निघून जायचा.

एप्रिल-

का कुणास ठावूक ? पण मला त्याच्याबद्दल वाईट वाटू लागले.मी सगळ्यांसमोर अस करायला नको होत.आजकाल तो बघतच नाही माझ्या कडे ! पण माझ्या मनात मात्र त्याच्याविषयी विचार कायम चालू असतात.आता मला त्याच्याशी बोलाव अस वाटू लागतय सारख .मी मात्र मुदाम त्याच्या गाडीची हवा सोडून टायर पंचर करून देते.त्यामुळे तो पण बसनेच येतो.आता थोडफार एकमेकांकडे बघून हसणं होत आमचं.त्याच्याकडे बघन त्याच्याशी बोलण यामुळे सध्या मला वेगळच वाटू लागले आहे. यालाच प्रेम म्हणत असतील का? आजपर्यंत डायरी वरच कुठेतरी पडलेली असायची. आता डायरी कोणाच्या तरी हातात लागेल म्हणून कायम मनाला एक रुखरुख लागून असते.

मे-

मला आता त्याच्याशिवाय राहणं होत नाही. आता आम्ही कॉलेज सुटल्यानंतर सोबत राहायला लागलोय. त्यांने मला पुन्हा प्रपोज केला मी ही हो म्हणाले. त्याने मला त्याचा एक फोटो पण दिला आहे आणि तो. मी माझ्या डायरीत असलेल्या एका कप्प्यात व्यवस्थित ठेवला आहे. आमची कास्ट(cast) वेगळी आहे.पण मला फरक पडत नाही.आम्ही दोघे एकदा गगनगिरीला फिरायला गेलो होतो. कोल्हापूर पासून 75 किलोमीटर लांब अस हे ठिकाण. आम्हाला खूप दिवसांतून तेथे मोकळीक मिळाली. खूप भरभरुन गप्पा मारल्या. घरी परतन्याची वेळ जवळ येत होती पण हे क्षण कधीच संपू नये अस वाटत होते. माझ्या एका चुलत बहिणीला माझ त्याच्या सोबत फिरणं आवडत नाही. . कारण माझ्याकडे संजय सारख बॉयफ्रेंड आहे ती एकटी आहे म्हणून मला अस वाटत ती माझ्या वर जळते. तिने माझ्या घरी त्याच्याबद्दल सांगितले. या बद्दल मला काहीच ठाऊक नव्हते. नंतर मला समजले की माझ्या चुलत भावानी त्याला कॉलेज मध्ये येऊन खूप मारले मोबाईल मध्ये व्हीडिओ काढून पूर्ण कॉलेज मध्ये पसरवला. जो तो त्याच्यावर हसू लागला. पुर्ण कॉलेजमध्ये त्याच नाव खराब झाल.

मला त्याचा अपमान सहन होत नव्हता. पण मला काही करता ही येत नव्हते. एके दिवशी माझ्या घरच्यांनी त्याला माझ्या घरी बोलवून त्याचा पाणउतारा केला माझ्यापासून लांब होण्यास सांगितले. त्यावेळी मला घरातले असे सुद्धा सांगत होते की तो व्यसनी आहे. कारण आमच्या दोघांचे गाव जवळच होते त्यांना कोणीतरी सांगितले असे ते म्हणत होते. पण मी संजयवर पूर्ण विश्वास ठेवला होता. तो ही माझ्यापासून दूर जाण्यास तयार नव्हता. मला सुद्धा त्याच्या पासून लांब जायचे नाही. घरात पण सारखं त्याचाच विचार चालू असतो.. घरच्यांना तो का आवडत नाही कुणास माहीत. आम्ही जास्त भेटत आहे हे बहुतेक सगळ्यांमधे पसरल आहे.

शेवटी जेव्हा घरच्यांना याबद्दल समजले तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली की तो माझी छेड काढतो. तस माझ वय सुद्धा कमीच आहे अजून 18 सुद्धा पूर्ण नाही 2 महिने बाकी आहेत. म्हणून त्याच्यावर केस झाली त्याला पोलिसानी जेल मध्ये काही दिवस ठेवले. आमचा हा प्रकार सार्या कॉलेज मध्ये माहित पडला.आमची खूपच बदनामी झाली होती.त्यामुळे कॉलेजमध्ये जाऊ वाटत नाही.तसाही जाऊनही काय उपयोग? समोर सगळे चांगलच बोलतात पण माघारी लोकांचे कुजबुजने चालूच असते.

जून -

पोलिसांनी समज देऊन सुद्धा त्याने त्याचे ऐकले नाही. आणि मला सुद्धा त्याच्या पासून लांब करण्यासाठी लांब पुण्याला पाठवले. जेणे करून मी त्याच्यापासून लांब होईल.कॉलेजला आल्यावर मला एक गोष्ट लक्ष्यात आली कि कॉलेज मध्ये प्रत्येक मुलीला बॉयफ्रेंड हा आहेच.. क्वचितच कोणी तरी असेल एकटी. मी त्यातली एक अभागी त्याला सोडून एवढया लांब आले काहीच करू शकले नाही. तो मात्र तिकडे काय काय करत असेल कुणास ठावूक. मी केल ते बर केल का? कॉलेजमध्ये काही गोष्टी खूपच कडक पाळाव्या लागतात. गावाकडे थोड वेगळ होत.

कडे मोबाइल वगेरे काही नाही.... मला त्याची खूप आठवण येते.

ऑक्टोबर-

मेडिकल कॉलेजमध्ये एक वेगळीच दुनिया आहे. दररोज होणारे प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर.. लॅब त्यातील निरनिराळे अनुभव.. कॉलेज मध्ये खूप कार्यक्रम होत असतात. कॉलेज मध्ये थोडस मन रमत.... . पण त्याची आठवण येते... . माझ्यामुळे त्याचे नुकसान झाले असे सुद्धा वाटते. एक दिवस हॉस्टेलला असताना मी वाइन पिले खूप आठवण येत होती मला त्याची. दुःख विसरण्यासाठी कधी कधी दारूचा सहारा घ्यावा लागतो... माझ्याकडे बघितल तर कोणाला विश्वास बसणार नाही.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED