डॉमिनंट सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी तिचा संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. भाग एक डिग्री गेल्यावर सर्वप्रथम मंदार संपूर्ण रूमची पाहणी करत काही आक्षेपार्ह मिळतेय का ते पाहू लागला. परंतु रूममध्ये तसे काही त्याला आढळले नाही. घडलेल्या सर्व घटना जरी सामान्य माणसासाठी नॉर्मल वाटत असल्या तरी, एका डिटेक्टीव्हच्या दृष्टिकोनातून नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होते.' दुपारी दोन वाजता कल्याणच्या फलाट क्रमांक सहावर येऊन गाडी हळूहळू स्लो होऊ लागली तसं मळकट निळ्याशार रंगाची अमेरीकन टुरीस्टर सॅक त्यानं खांद्यावर अडकवली. गर्दीतून रस्ता मोकळा करत तो बाहेर येऊ लागला. एकदोन आडदांड शरीरयष्टीच्या माणसांना बाजूला करत कोल्हापूरी

Full Novel

1

डॉमिनंट - 1

डॉमिनंट सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी तिचा संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. एक डिग्री गेल्यावर सर्वप्रथम मंदार संपूर्ण रूमची पाहणी करत काही आक्षेपार्ह मिळतेय का ते पाहू लागला. परंतु रूममध्ये तसे काही त्याला आढळले नाही. घडलेल्या सर्व घटना जरी सामान्य माणसासाठी नॉर्मल वाटत असल्या तरी, एका डिटेक्टीव्हच्या दृष्टिकोनातून नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होते.' दुपारी दोन वाजता कल्याणच्या फलाट क्रमांक सहावर येऊन गाडी हळूहळू स्लो होऊ लागली तसं मळकट निळ्याशार रंगाची अमेरीकन टुरीस्टर सॅक त्यानं खांद्यावर अडकवली. गर्दीतून रस्ता मोकळा करत तो बाहेर येऊ लागला. एकदोन आडदांड शरीरयष्टीच्या माणसांना बाजूला करत कोल्हापूरी ...अजून वाचा

2

डॉमिनंट - 2

डॉमिनंट भाग दोन भाग एकपासून पुढे.... "हम्म्..." ....................... "वो फोटोग्राफर तो अपना खासमखास है.......... हार्ड कॉपी कल तक मिल ..................... "ठिक..." ..................... "उसकी फिक्र छोड दो.... काम लगभग पूरा होने को है....." भारदस्त आवाजात पठाणी घातलेला तो अंगणातल्या व्हरांड्यात पाठमोरा उभा राहून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. शरीरयष्टीही त्याच्या आवाजाला साजेशी अशीच तगडी होती. फोनवर बोलताना त्याच्या उजव्या हातातला चांदीचा जाडजूड कडा मागून सहज दिसून येत होता. बोलणे संपताच त्याने आपल्या स्मार्टफोन वरून लगेच दुसरा नंबर डायल केला. "हॅलो..." .................... "फोटोग्राफर को पैसा देकर निकलने बोल... और उसको कलकी डिलीव्हरी का याद दिला दे..." ........................... "हा उसका भी काम हो ...अजून वाचा

3

डॉमिनंट - 3

डॉमिनंट भाग तीन मंदारला कोल्हापूरहून इथे आणण्याचा प्लॅन एकाचा. त्यात त्याने लोकल भाईला समाविष्ट करून घेणे. मंदार आणि मौसमची मौसमचा खुन होणं, तेव्हा खुनाचं हत्यार डिग्री अथवा नसीर किंवा चंदूच्या हातात असणं.. मग नेमकं तिला मारलं कोणी...? मंदारची त्या लोकल भाईच्या गुंडांशी हातापाई होणं, मंदारचं तिथून पळून जाणं... पण मंदार का बरं पळाला असावा तिथून..? डॉमिनंट – भाग दोनपासून पुढे.... लॉजच्या मागच्या बाजूला असलेल्या माणूसभर उंच कट्ट्यावरून धडपडत उडी मारत मंदार तिथल्या चिंचोळ्या गल्लीतून मेनरोडवर आला. आजूबाजूला पसरलेली बारीक झाडी तुडवत पुढे येताना त्याला शरीरावरच्या जखमांची जाणीव होत होती. इतक्या रात्रीही वाहनांची रहदारी तुरळक प्रमाणात सुरू असल्याने अधूनमधून रस्त्यावर ...अजून वाचा

4

डॉमिनंट - 4

डॉमिनंट भाग चार डॉमिनंट भाग तीनपासून पुढे.... शहराच्या एका बाजूला असलेल्या खडकपाड्यासारख्या पॉश ठिकाणी नव्यानेच बांधलेल्या मनोरा टॉवरमधल्या फ्लॅटमध्ये भरदिवसा काळोखी पसरली होती. तसा तो फ्लॅट सातव्या मजल्यावर असून बिल्डिंगच्या आसपास मोकळेच होते, त्यामुळे प्रकाश आणि हवा येण्यासही चांगलाच वाव होता. परंतु तरीही त्या फ्लॅटच्या सर्व काचाखिडक्या बंद अवस्थेत होत्या. फ्लॅट तसा बर्यापैकी ऐसपैस होता. हॉलची सजावट आणि सामानही जेमतेमच होते. मेन डोअरला लागून असलेल्या भिंतीवर टांगलेल्या अडतीस ईंची एल् सी डी वर मौसमच्या खुनाची इत्यंभूत माहीती मीठमसाल्यासह विश्लेषित करून दाखवली जात होती. काही वेळा अगोदर टेबलवर ठेवलेले गरमगरम ब्रेडटोस्ट आता थोडेसे थंड पडू लागले होते. मस्तकावर प्रचंड ताण ...अजून वाचा

5

डॉमिनंट - 5

डॉमिनंट भाग पाच डॉमिनंट भाग चारपासून पुढे.... मंदार, आरीफ आणि मनूचा एक गट तयार होऊन पुढे आखण्यात येणार्या योजनांवर विनिमय करत होते. नाही म्हणायला सध्यातरी त्यांच्याकडे फक्त चार माणसांचा शोध घेण्याचे काम होते. इतर अजून कोणकोण त्या कारस्थानात सहभागी आहेत, याची कल्पना अजून कोणालाच नव्हती. आरीफला त्या चौघांबद्दल जेवढी माहीती होती ती सर्व त्याने मंदारसमोर मांडली. "वो चारों एक लोकल भाय के लिये काम करते है.. पर अपने को उन चारों से उसका नाम उगालना होगा.. हम डायरेक्ट जाके भाय से नहीं भीड सकते.. उसके लिये उसे हमारे जाल में लाना होगा..." आरीफ. "हा पर ये कैसे हो सकता ...अजून वाचा

6

डॉमिनंट - 6

डॉमिनंट भाग सहा डॉमिनंट भाग पाचपासून पुढे.... 'किती कमी वेळात मंदारबाबतचे गैरसमज दूर झाले आणि किती पटकन त्या क्षणापर्यंत आपण त्याच्यासोबत गेलो.. त्याची पर्सनॅलिटी बाकी आपल्याला साजेशी अशीच आहे.. उंच, मजबूत बांध्याचा.. बिनधास्त.. कसल्याही प्रसंगाला न घाबरणारा.. निडर.. असाच तर जोडीदार हवा होता मला.. छ्या.. माझ्यात मुळी टिपीकल बायकांसारखे लटकेझटके नाहीत.. बाईलचाळे करत मला तर धड लाजताही येत नाही.. नाहीतर त्याला आजच माझ्या प्रेमात वेडं केलं असतं..' मनू आपल्याच मनाशी संवाद साधत होती. मुळात धाकडशाहीसारखा स्वभाव असल्याने तिनं कधी असल्या गोष्टींवर फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आज त्याच्यातल्या पुरूषानं तिच्यातल्या बाईला जागं केलं होतं. जीवनात अशी वेळ एकदातरी येतेच ...अजून वाचा

7

डॉमिनंट - 7

डॉमिनंट भाग सात डॉमिनंट भाग सहापासून पुढे.... रूममध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. कुणीही कसलीच हाचचाल करत नव्हते. मेहजबीन शांतपणे डाव्या अंगाला कोपरा पकडून बसली होती. चंदू अकस्मात् परीस्थिती त्याच्या बाजूने वळवून देणार्या संधीची वाट पाहत होता. दरवाज्यातील व्यक्ती भावनाशून्य होत चंदूला न्याहाळत होती. त्याची ती भेदक नजर चंदू आणि मेहजबीन दोघांनाही खायला उठत असल्यासारखे त्यांच्या चेहर्यावरून वाटत होते. न राहवून एकदाचे काय ते फायनल होऊनच जाऊ दे या अनुषंगाने चंदूने तोंड उघठले. "कोण आहेस तू.. आणि काय पाहीजेय तुला..?" "मी कुणीही असो काय फरक पडतो.." "मग इथं कश्याला आलायस.. आम्हाला मारायला..?" पुढची शक्यता मनात धरत चंदूने विचारले. "नक्कीच तुला ...अजून वाचा

8

डॉमिनंट - 8

डॉमिनंट भाग आठ डॉमिनंट भाग सातपासून पुढे.... चंदूचा फोन काही केल्या लागत नव्हता. वैतागलेल्या डिग्रीने टेबलवर ठेवलेला दारूचा भरलेला तोंडाला लावत गटागट रिकामा केला. थोडासा गळ्याला शेक बसल्यावर डोकं शांत ठेवत त्याने भायला फोन लावला. त्याला आवश्यक ती सर्व माहीती सांगितली. नसीरच्या खुनाबद्दल ऐकून भाय बहुधा चवताळला असावा, कारण पलीकडून डिग्रीला शिव्या पडत होत्या. "तुम लोगों को बोला था मैंने, यहा से दूर निकल जाओ.. लगता है तुम चारों को पर निकल आये है..." भायचा पलीकडला आवाज मदनलाही ऐकायला आला. "नहीं भाय.., पर हमने सोचा.. कुछ पता लगा लेंगे उस हरामी का.. तो आपके सर से भी टेन्शन कम ...अजून वाचा

9

डॉमिनंट - 9

डॉमिनंट भाग नऊ डॉमिनंट भाग आठपासून पुढे.... भाईने आपण बारमध्येच असून चंदूही सोबत असल्याची माहीती डिग्रीला कॉलवर अगोदरच दिली शिवाय तिथून निघून ताबडतोब आपल्या घरी बोलावले होते. इरफान भाईशी बोलून झाल्यावर डिग्रीने मदनला भायच्या घरी निघण्यास सांगितले. पण मदनने डिग्रीला जरूरी कामासाठी त्याला बाहेर जायचे असल्याचे सांगत तिथून भायच्या घरी डायरेक्ट येऊन भेटण्याचे नक्की केले. मदन डिग्रीला सांगून तेथून निघून गेला. डिग्रीच्या मनात मदनबाबत काहीसा गोंधळ असल्याने आणि आता भायही तिथून निघणार असल्याकारणाने नसीरच्या खुनाची खबर पोलिसांना देण्याचा विचार आला. आणि त्याने फारसा विचार न करता तसे लगेचच केले. तसेही पोलिस तिथं पोहोचेपर्यंत तो आणि इरफान भाय शिवाय चंदू ...अजून वाचा

10

डॉमिनंट - 10

डॉमिनंट भाग दहा डॉमिनंट भाग नऊपासून पुढे.... पोलिसांच्या जीप निघाली आणि थंडगार वार्याच्या झुळकीमुळे अगोदरच घायाळ झालेला मंदार आपले सर्वांग सैल सोडून भूतकाळ आठवू लागला. विक्रमचे त्याच्या गावात येणं, त्याच्याशी झालेली दोस्ती.. विक्रमची श्रीमंती आणि रूबाब यांनी तर मंदारवर सुरुवातीपासूनच भुरळ घातली होती. त्यात समाजसेवेच्या नावाखाली असलेले विक्रमचे काळेधंदे मंदारला माहीत पडले होते. शिवाय गावोगावी स्त्रीयांच्यासाठी चालवण्यात येणार्या एन् जी ओ ला मिळणार्या पैश्यात विक्रमचा हिस्सा ठरलेला असायचा. या सर्व बाबींचा जाब मंदारने विक्रमसमोर बेधडकपणे विचारला होता. मुळात निडर असलेला मंदार म्हणजे विक्रमसाठी एक आयतीच संधी होती. त्याने शांत डोक्याने मंदारला पैसा दाखवत आपल्या बाजूने वळवून घेतले होते. मग ...अजून वाचा

11

डॉमिनंट - 11

डॉमिनंट भाग अकरा डॉमिनंट भाग दहापासून पुढे.... दुसर्या दिवशी उन्हं पडायच्या आतच मनूची स्वारी आरीफला भेटण्यासाठी तो ज्या हॉस्पिटलमध्ये तिकडे वळाली. काल रात्री मोठ्या मुश्किलीने तिने विक्रमला आपल्या निवासाच्या जागेपासून दुर थांबवत माघारी जाण्यास सांगितले होते. जेणेकरून त्याला आपले घर नक्की कुठे आहे ते सहजासहजी सापडू नये, असा उद्देश तिच्या मनात होता. आणि त्यात ती यशस्वीही झाली होती. विक्रम तिच्यासमोर डिसेंट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, हे मनूने चांगलेच ओळखले होते. म्हणूनच तो तिचा पाठलाग करेल असे तिला जराही वाटत नव्हते. तरीही खबरदारी म्हणून रात्री घरी पोहोचेपर्यंत ठराविक अंतराने ती मागे वळून वळून पाहत होती. आरीफला शोधून मनू त्याच्या ...अजून वाचा

12

डॉमिनंट - 12 - अंतिम भाग

डॉमिनंट भाग बारा भाग अकरापासून पुढे-------- काहीश्या सामसूम झालेल्या त्या वस्तीच्या बाहेर रोडवर मनूने बाईक थांबवली. आरीफ आणि मंदार उतरले आणि तिथल्याच एका गल्लीत घुसले. मनू बाईक स्टार्ट करून पुढच्या रस्त्याने तिच्या घराकडे वळली. ठरवल्याप्रमाणे तिला एकटीलाच पुढे जायचे होते. आणि वेळ पडल्यासच आरीफ आणि मंदार समोर येणार होते. काही क्षणांतच मनूने मुख्य वस्तीपासून थोड्या बाजूला असलेल्या आपल्या घराजवळ बाईक साईडला लावली आणि ती घराचा दरवाजा उघडण्यासाठी म्हणून पुढे गेली. तिकडे आरीफ आणि मंदार देखिल मनूची घराबाहेरील हालचाल दिसू शकेल अश्या अंतरावर येऊन थांबले होते. "क्या कहते हो मंदार भाय... कौन रहेगा इस सब के पीछे..." आरीफने दबक्या आवाजात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय