वृद्धाश्रमातलं प्रेम

(27)
  • 71.3k
  • 2
  • 30.1k

“हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही या रविवारी आणि रविवारी नाही जमलं तर सोमवारी या. आठवड्याचे सर्व दिवस आम्ही हजर असतो. त्यामुळे निश्चिंत रहा.” नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने ‘निवारा’ वृद्धाश्रमाचे मॅनेजर बाहेर पटांगणात येऊन बोलत होते. ‘निवारा ओल्ड केयर’ हा मुंबई-पुणे हाय वे च्या मध्ये कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात उभारलेला वृद्धाश्रम होता. भलेमोठे पटांगण, समोर ऑफिस, ऑफिसच्या एका बाजूला किचन, वाचनालय वगैरे होते आणि दुसर्‍या बाजूला कॉमन हॉल. तिथं टीव्ही वगैरे होता, पण आयुष्याच रस्ता असा संपत आलेला असताना यांच कशात मन लागणार होतं? असो, शिवाय ऑफिसवर वृद्ध कपल्स साठी सोय, पटांगणाच्या एका बाजूला वृद्ध स्त्रिया आणि दुसर्‍या बाजूला वृद्ध पुरुषांची सोय होती. पटांगणाच्या मधोमध एक मंदिर होते. तिथे रोज सायंकाळी प्रार्थना व्हायची. पटांगणाच्या आवारात भरपूर झाडे वगैरे लावली होती आणि तिथेच बसायला बाकं होती. महिन्याभारत एखादं म्हातारं व्यक्ती हमखास यायचं. आता तिथल्या व्यक्तींची संख्या सुमारे पन्नास झाली होती.

Full Novel

1

वृद्धाश्रमातलं प्रेम - 1

The Love story in Second Innings..... भाग – १ “हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही या रविवारी आणि रविवारी नाही तर सोमवारी या. आठवड्याचे सर्व दिवस आम्ही हजर असतो. त्यामुळे निश्चिंत रहा.” नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने ‘निवारा’ वृद्धाश्रमाचे मॅनेजर बाहेर पटांगणात येऊन बोलत होते. ‘निवारा ओल्ड केयर’ हा मुंबई-पुणे हाय वे च्या मध्ये कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात उभारलेला वृद्धाश्रम होता. भलेमोठे पटांगण, समोर ऑफिस, ऑफिसच्या एका बाजूला किचन, वाचनालय वगैरे होते आणि दुसर्‍या बाजूला कॉमन हॉल. तिथं टीव्ही वगैरे होता, पण आयुष्याच रस्ता असा संपत आलेला असताना यांच कशात मन लागणार होतं? असो, शिवाय ऑफिसवर वृद्ध कपल्स साठी सोय, पटांगणाच्या एका बाजूला ...अजून वाचा

2

वृद्धाश्रमातलं प्रेम - 2

भाग – २ सकाळची वेळ होती. साधारणतः नऊ वाजले होते. हवेत अजूनही बर्‍यापैकी गारवा जाणवत होता. इतक्यात पटांगणात एक येऊन उभी राहिली. सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधलं गेलं. अर्थातच त्या गाडीतून त्यांच्यामध्ये सामील व्हायला कुणीतरी आलं होतं. पुणे पासींगची गाडी होती. सामनसुद्धा भरपूर होता. महाजन, बर्वे वगैरे काका मंडळी दुरूनच गंमत बघत होती. गाडीचं मधलं दार उघडलं गेलं. त्यातून एक साधारणतः पासष्ट वगैरे वयाची महिला उतरली. पांढरे केस, कपाळावर गोंदलेल्याचा छोटासा हिरवा ठिपका भ्रुकुटीमध्यच्या अगदी थोडासा वर, हातात एक चांदीची अंगठी सोडली तर काहीही आभूषणं नव्हती. खोल गेलेले डोळे, पाठीला किंचितसा बाक कदाचित संसारगाडा ओढताना आलेला असावा असं चेहर्‍यावरून दिसत ...अजून वाचा

3

वृद्धाश्रमातलं प्रेम - 3

भाग – ३ सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मॅनेजर आवर्जून उपस्थित होते. निवार्‍यात कुणी नवीन आलं की त्यांची ओळख करून द्यायला ते सायंकाळी प्रार्थनेला हजर असत. प्रार्थनेची वेळ होत आली तशी सर्वांची पावले मंदिराकडे वळू लागली. या लोकांसाठी प्रार्थना म्हणजे मनाला समजूत घालण्याची एक तर्‍हा होती. प्रार्थना सुरू झाली. नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वजण एकामागून एक श्लोक म्हणत होते. या श्लोकांचा अर्थ मात्र सर्वांना माहिती नसावा बहुतेक. पण मनाला तेवढाच एक आधार म्हणून ते म्हणायचे. प्रार्थनेची मात्र एक गंमत असते, प्रार्थना केली की सर्वांना वाटतं आपलं काम संपलं आता चेंडू देवाच्या कोर्टात. पण तसं नसतं हो. असो, उगाच तत्वज्ञान वगैरे. प्रार्थना झाली. सर्वजण ...अजून वाचा

4

वृद्धाश्रमातलं प्रेम - 4

भाग – ४ दुर कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. दाट धुकं पडलं होतं. गुलाबी थंडी सर्वांना सुस्तवून सोडत होती. नेहमीप्रमाणे उगवला होता. नव्हे, तो त्याच्या जागेवर अनादि काळापासून अविचल आणि अविरतपणे होता तसाच होता. एखाद्या चक्रवर्ती सम्राटासारखा. खरं तर पृथ्वी त्याच्याभोवती फिरते आणि आपल्याला वाटतं सूर्य उगवला. पृथ्वी फिरते हे माहीत असूनही सगळे सूर्य उगवला असंच म्हणतात. त्रिकालबाधित सत्य असूनही ते नाकरतात. आयुष्याचं सुद्धा असंच नाही का? एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा आपण या जगात नसू, आठवणी असतील पण काही काळाने काळपुरुष त्यांना आपली शिकार बनवेल. हे सर्व सृष्टीला ज्ञात आहे. पण तरीही मायमोहाची लक्तरं काही गळून ...अजून वाचा

5

वृद्धाश्रमातलं प्रेम - 5

भाग – ५ “आपण दोघं मिळून शोधूयात का?” तिने मला असं विचारलं तेव्हा मी जास्तच घाबरलो. तिथं आमच्या गावाचा मुलगा शेवटच्या वर्षाला होता. त्याने जर पाहिल्याच दिवशी मला मुलीसोबत पाहिलं असतं तर मला घरात काय गावातसुद्धा घेतलं नसतं. मी त्या आपत्तीचं चिंतन करत होतो आणि पहिलाच दिवस असल्याने उशिरा जाणंसुद्धा योग्य नव्हतं. मी द्विधा मनःस्थितीत होतो. मला असं बघून तीच म्हणाली, चला, लवकर वर्ग शोधूयात नाहीतर पाहिल्याच दिवशी बॅड इंप्रेशन पडेल. मी तिच्या मागोमाग जाऊ लागलो. ती बिनधास्तपणे रस्त्यात दिसणार्‍या कुणालाही वर्ग विचारू लागली. मागे वळून मला म्हणाली, “चला लवकर. कुठे हरवलात?” आम्ही आता सोबतच चालू लागलो. मला ते ...अजून वाचा

6

वृद्धाश्रमातलं प्रेम - 6

भाग – ६ “चला, आपण लायब्ररीत जाऊ. मी सांगते तुम्हाला सर्व.” असं म्हणून ती उठली आणि निघाली. मला लायब्ररी नसल्यामुळे मी तिच्या मागे जाणं भाग होतं. चालता चालता तिच्यासोबत केव्हा चालायला लागलो हे कळलं देखील नाही. तिच्यासोबत असं शांतपणे चालताना कसंतरीच वाटत होतं आणि पहिल्या दिवसापासून ती मला मदत करत होती. आतसुद्धा तिचं काम नसताना माझी मदत म्हणून ती येत होती. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने काहीतरी बोलणं भाग होतं. म्हणून मी विचारलं, “तुमचे बाबा कुठं असतात? काल तुम्ही डबा द्यायला गेला होतात म्हणून विचारलं.” “बाबा पोलिसांत आहेत. दगडूशेठ गणपतीच्या बाजूला जिथं पोलिस चौकी आहे ना, तिथं इन्स्पेक्टर आहेत ते.” तिच्या ...अजून वाचा

7

वृद्धाश्रमातलं प्रेम - 7

भाग – ७ “तुमची जागा रिझर्व्ह करून ठेवली होती.” माझ्या या वाक्यानंतर ती जास्तच हसू लागली. मग आम्ही अभ्यासाला केली. त्या दिवशी तिने माला भरपूर अडचणी विचारल्या. माला शक्य तेवढ्या सोडवल्या. त्या दिवशी माझा बर्‍यापैकी अभ्यास झाला आणि तिचा भरपूर. मी खोलीवर येईपर्यंत, आल्यावर, झोपताना आणि झोपेतसुद्धा माझ्या मनात सुधाचेच विचार सुरू होते. तो रुमाल मी सांभाळून पेटीत ठेऊन दिला. असाच अभ्यास होत राहिला. परीक्षा झाली. दोघं उत्तम गुणांनी पास झालो. रिझल्ट लागला तेव्हा ती खूप आनंदात माझ्याकडे आली आणि म्हणाली, “अभिनंदन.” मीसुद्धा तिला तेवढ्याच आनंदात म्हणालो, “तुमचंसुद्धा.” “तुमचीच कृपा. तुम्ही लायब्ररीत मदत केली नसती तर काही खरं नव्हतं ...अजून वाचा

8

वृद्धाश्रमातलं प्रेम - 8

भाग – ८ सायंकाळ होत आली होती. प्रार्थनेची वेळ जवळ येत होती. महाजन काकांनी तसं सांगितलं. सर्वजण उठून मग मंदिराकडे जाऊ लागले. आज महाजन काकांचा दिवस होता. आज फक्त तेच बोलणार होते आणि बाकी सर्वजण ऐकणार होते. प्रार्थनेला अजून काही वेळ होता आणि कुणी आलं नव्हतं त्यामुळे जोशीकाकांनी अतिशय उत्कंठेने विचारलं, “मग पुढे काय झालं?” महाजन काकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “जोशी, अरे दिवसभर लेक्चर देऊन दामलोय मी. कॉलेजमध्ये शिकवायला असतांनासुद्धा इतका बोललो नव्हतो कधी.” त्यांच्या ह्या वाक्यावर सर्व मंडळी खळखळून हसू लागली. त्यांना असं हसताना पाहून बर्वेकाकू जवळ आल्या आणि बर्वेकाकांना म्हणल्या, “काय चाललंय आज? आम्हाला कळू तरी ...अजून वाचा

9

वृद्धाश्रमातलं प्रेम - 9

भाग – ९ त्या दिवशी जेवणानंतर सर्वांनी मिळून महाजन काकांना समजावलं, “बघ, इतक्या वर्षानी तुझं प्रेम तुला परत मिळालंय. तुझ्या समोर आलंय. तुझं आपलं आणि हक्काचं असं कुणी राहिलेलं नाही. त्यांनासुद्धा कुणी नाही असं दिसतंय नाहीतर त्या वृद्धाश्रमात आल्या नसत्या. तू स्वतःहून बोल त्यांच्याशी. त्यांना चांगलं वाटेल. त्या इथं नवीन आहेत. मन रामायला वेळ लागेल. कर विचार.” महाजन काकांनी विचार केला, मंडळी सांगत होती ते देखील खरंच होतं म्हणा. दोघांच्या आयुष्यात एकाकीपणा अगदी अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारासारखा भरला होता. इतक्या वर्षांनी पहिलं प्रेम समोर येणं हे केवळ योगायोगाने झालं नव्हतं, ती नियतीची एक ठरवलेली गोष्ट होती. आयुष्याच्या शेवटी का असेना ...अजून वाचा

10

वृद्धाश्रमातलं प्रेम - 10 - अंतिम भाग

भाग – १० महाजन काका आणि सुधाकाकू आता खुलले होते. त्यांनी मस्त आणि आनंदी आयुष्य जगायला सुरुवात केली होती. केसांत रोज एक फूल मळायच्या आणि महाजन काका त्यांची स्तुती करायचे. त्या दोघांना असं आनंदात बघून बर्वेकाका, जोशी आदि मंडळींच्या चेहर्‍यावर समाधानाची एक झलक दिसू लागली होती. आयुष्याच्या उतारवयात का होईना त्यांच्या मित्राला त्यांचं प्रेम मिळालं होतं. महाजन काका आता खुलले होते. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. सुधाकाकूंचं काही वेगळं नव्हतं. त्यासुद्धा झालं-गेलं ते विसरून छान जगत होत्या. रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी, जेवताना, सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी, किचनमध्ये मदतीला या ठिकाणी दोघं भेटत असत. त्यांच्यात नेहमी सकारात्मक संवाद व्हायचे. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय