दिवाना दिल खो गया

(75)
  • 117.1k
  • 8
  • 50.4k

हे गाणं ऐकत ऐकत सिलू झोपी गेला. सकाळी ८.१५ ची ट्रेन जी पकडायची होती त्याला. अहो, हे आता रोजचं झालं होतं. सकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. फक्त तिची एक झलक बघण्यासाठी. ती नेहमी तिच्या एका मैत्रिणीबरोबर त्याच ट्रेनला असायची. पहिल्या दिवशी जेव्हा सिलूने तिला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. पिंकीश चुडीदार, त्यावर नाजूकसे कानातले, डायमंड टिकली आणि हातात घुंगरूवाल कडं जे ती चालताना आवाज करायचं. तिच्या बरोबर नेहमी तिची एक मैत्रिण असायची. तिला रोज बघता बघता आता सिलूला दोन आठवडे झाले होते. सिलू म्हणजे सलील अय्यर. त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक चिराग. तो साऊथ इंडियन ब्राह्मण होता. अभ्यासात भयंकर हुशार होता. तसेच हल्लीच तो एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला लागला होता. त्याचा पगारही लाखाच्या घरात होता. पण दोन आठवड्यांपूर्वी अम्माच्या इडलीने घात केला.

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

दिवाना दिल खो गया (भाग १)

♬♬दीवाना दिल खो गयाबेगाना दिल हो गयामुझे चैन नहीं बेचैन हूं मैंबस ये मेरा दिल खो गयादीवाना दिल खो दिल हो गया♬♬ (Movie name : Jab dil kisi pe aata hai /1996) हे गाणं ऐकत ऐकत सिलू झोपी गेला. सकाळी ८.१५ ची ट्रेन जी पकडायची होती त्याला.अहो, हे आता रोजचं झालं होतं. सकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहायचं. फक्त तिची एक झलक बघण्यासाठी. ती नेहमी तिच्या एका मैत्रिणीबरोबर त्याच ट्रेनला असायची. पहिल्या दिवशी जेव्हा सिलूने तिला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला.पिंकीश चुडीदार, त्यावर नाजूकसे कानातले, डायमंड टिकली आणि हातात घुंगरूवाल कडं जे ती चालताना आवाज ...अजून वाचा

2

दिवाना दिल खो गया (भाग २)

सिलू आज ऑफिसला थोडा उशीराच पोहोचला. त्याने त्याचे आजचे काम पूर्ण केले आणि तो घरी आला. आज अम्माने जेवणासाठी बेत केला होता. सगळेकाही सिलूच्या आवडीचे होते. दरवाजात येताच जेवणाचा खमंग वास सिलूच्या नाकात शिरला. मग लगेच फ्रेश होऊन सिलू आणि त्याचे अम्मा-अप्पा जेवायला बसले. सिलू आज अगदी तृप्त होईपर्यंत जेवला. हे पाहून अम्माला ही खूप बरे वाटले. झोपताना ही सिलूला आज मुग्धाचे विचार येत होते. आज पण त्याने त्याचे आवडते गाणे ऐकले आणि तो झोपी गेला. सिलूला आज एक सुंदर स्वप्न पडले होते. त्यामध्ये त्याला एक सुंदर बाग दिसली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडे होती. अगदी वेगवेगळ्या फुला-फळांनी ती ...अजून वाचा

3

दिवाना दिल खो गया (भाग ३)

"हाय, सिलू", मुग्धा म्हणाली."हाय, मुग्धा", सिलू म्हणाला."तू झोपला नाहीस अजून", मुग्धा म्हणाली."आता झोपतच होतो तर तुझा मेसेज आला", सिलू आय एम सॉरी मी तुला डिस्ट्रब केले का?", मुग्धा म्हणाली."हेय, इट्स ओके. डोन्ट वरी. तू बोलू शकतेस माझ्याशी. तसे पण मी बारा वाजेपर्यंत जागा असतो रोज", सिलू म्हणाला."अच्छा. तुझ्या घरी कोण कोण असते", मुग्धाने सिलूला विचारले."मी आणि माझे अम्मा-अप्पा आणि तुझ्या घरात कोण कोण असते", सिलूने विचारले."माझ्या घरी माझे आई-बाबा, माझी एक लहान बहीण, माझे दोन काका-काकी, त्यांची मुले आणि कधी कधी माझी आत्या आणि तिची फॅमिली ही राहायला येते घरी. एकंदर आमची जॉइन फॅमिली आहे”, मुग्धा म्हणाली.“मस्त किती मजा ...अजून वाचा

4

दिवाना दिल खो गया (भाग ४)

सिलूचे हे पुढचे चार दिवस भलतेच व्यस्त जाणार होते. त्याला त्याच्या बॅगेत सध्या तरी गरजेचे सर्व सामान भरणे आवश्यक कारण कंपनी पॉलिसीनुसार पुढचे २ वर्ष तरी सिलूला भारतात येता येणार नव्हते आणि तशीच काही एमर्जन्सि आली तर त्याला स्वत:च्या खर्चाने येण्या-जाण्याचा प्रवास करावा लागणार होता. आज त्याचे मामा-मामी त्याला शुभेच्छा द्यायला घरी आले होते. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. जेवण आटोपल्यावर सगळे गप्पागोष्टी करायला बसले. थोडावेळ झाल्यावर सिलूने मामा-मामीचा आशीर्वाद घेऊन त्यांचा निरोप घेतला आणि मग तो त्याच्या खोलीत आराम करायला गेला. त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि मेसेज बॉक्स ओपन केला व तो मुग्धाबरोबर केलेला पहिला ...अजून वाचा

5

दिवाना दिल खो गया (भाग ५)

(सिलू लॉबीमध्ये त्याच्या फ्लाइटची वाट बघत बसला होता. त्याने वेळ जायला म्हणून एक रॅंडम सॉन्ग मोबाइलवर लावले आणि ते तो मुग्धाच्या आठवणीत रमून गेला. आता पुढे ..) साहीलने मुग्धाला सुखरूप घरी सोडले. मुग्धाने साहीलचे मनापासून आभार मानले. “बस काय वहिनी, इतके तर मी करूस शकतो माझ्या मित्रासाठी”, असे म्हणत साहील त्याच्या घरी निघून गेला. मुग्धा घरी आली आणि फ्रेश झाली. आज तिला झोपच लागत नव्हती. सारखी सिलूची आठवण येत होती. ती मनात विचार करू लागली, “आता हा क्षण जाणे इतके कठीण होत आहे. मग २ वर्ष मी सिलू शिवाय कशी काय सरवाइव करेन.”इतक्यात सिलूचा तिला मेसेज आला. त्याचे फ्लाइट ...अजून वाचा

6

दिवाना दिल खो गया (भाग ६)

(मुग्धाने पुन्हा ‘हॅपी जर्नी’ असा मेसेज सिलूला सेंड केला. त्यावर सिलूने रिप्लाय केला की, “प्लीज स्वत:ची काळजी घे. मी मॉर्निंगला कॉल करेन. आता तू शांत झोप. मी तुझ्याजवळच आहे मुग्धा आणि नेहमी राहीन”. तो मेसेज वाचताच मुग्धाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती मंद हसली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आता पुढे..) आज मुग्धाला ऑफिसला जायचा बिलकुल मूड नव्हता. तिला आज एकांत हवा होता आणि तो घरात मिळणे तर बिलकुल शक्य नव्हते म्हणून ती ऑफिसला जाते असे सांगून घरातून ती दुपारी जेवून निघाली. ती थेट कॉफी शॉपवर पोहोचली. तिथे कॉफी पित २-३ तास सहज निघून जाणार होते. कॉफी शॉपमध्ये आल्यावर ...अजून वाचा

7

दिवाना दिल खो गया (भाग ७)

(मुग्धाबद्दल एव्हाना सिलूने जॉर्ज आणि मीराला सांगितले होते. ती दोघे मुग्धाला अमेरिकेत येण्याचा नेहमी सल्ला देत असत. त्यांचे ऐकून ही क्षणभर वाटे की, सगळं सोडून सरळ सिलूकडे अमेरिकेला निघून जावे. पण सध्यातरी ते तिला शक्य नव्हते. आता पुढे..) मुग्धा सुद्धा तिच्या ऑफिसच्या कामात व्यग्र असे. जर तिला सिलूची खूपच आठवण झाली तर कॉफी शॉप किंवा चौपाटी ही तिची ठरलेली एकांतात बसायची ठिकाणे असत. कधी कधी उमा ही तिला कंपनी द्यायला तिच्याबरोबर येत असे. असेच सहा महीने निघून गेले. सिलू आणि मुग्धा यांनी एव्हाना एकमेकांना कामात बरेचसे व्यस्त करून घेतले होते. त्यामुळे फक्त एकमेकांशी बोलण्याइतपत ते वेळ काढत असत. सिलूच्या ...अजून वाचा

8

दिवाना दिल खो गया (भाग ८)

(सिलू एक शांत, संस्कारी आणि सुस्वभावी मुलगा होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा होता तो. मग रोजेला तर सिलूचा एक महिन्याचा सहवास मिळाला होता. तर मग ती सिलूच्या प्रेमात नाही पडणार असे कसे बारे नाही होणार!! आता पुढे..) सिलू दिवसरात्र त्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे होता. त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. रोजेला कामाबरोबर सिलूच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देत होती. तिला माहीत होते की, सिलूचे मुग्धावर खूप जास्त प्रेम आहे आणि आता एक आठवड्यानंतर सिलूला पुन्हा कधी भेटता येईल ह्याची तिला शाश्वती नव्हती. पण रोजेला मनातल्या मनात सिलूवर प्रेम करायला लागली होती. तिला सिलूचा सहवास हवाहवासा वाटत होता. रोजेला इतकी ...अजून वाचा

9

दिवाना दिल खो गया (भाग ९)

(दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली. त्यांना झोपून काही तास उलटले असतील. रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले. पुढे पाहतात तर काय????) आता पुढे.... सिलूने दरवाजा उघडला तर समोर एक पोलिस उभा होता आणि सगळीकडे धावपळ चालली होती. सिलूला काहीच कळत नव्हते. नक्की काय चाललय ते. तो पोलिसाला काही विचारणारच होता तेवढयात तो पोलिस स्वत:च सिलूला म्हणाला, “तुमच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे आणि ती हवेमुळे सगळीकडे पसरतेय. म्हणून आम्ही ही इमारत पूर्णपणे खाली करत आहोत. कृपया तुमच्या घरात अजून कोण ...अजून वाचा

10

दिवाना दिल खो गया (भाग १०)

(साहीलने आधी डॉक्टरांना फोन करून सिलूचा पत्ता दिला आणि मग लगेच मुग्धाला फोन करून सद्यपरिस्थिती सांगितली. मुग्धाला हे कळताच विचार न करता ती तडक सिलूच्या घरी पोहोचली.) आता पुढे..... साहीलने अम्माला फोन करून सांगितले की, “आंटी, मी एका महत्वाच्या कामात अडकलो आहे आणि मला पोहोचायला उशीर होईल त्यामुळे सिलूची ऑफिस मधली सहकारी डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचेल. तिचे नाव मुग्धा आहे.” असे म्हणून त्याने फोन ठेवला व मुग्धाला ही ह्याची कल्पना दिली. तसेच मुग्धाला डॉक्टरांचा नंबर देऊन कॉनटॅक्ट करायला सांगितला. काहीवेळातच मुग्धा सिलूच्या घरी डॉक्टरांना घेऊन पोहोचली. मुग्धाने दारावरची बेल वाजविली. अम्माने दरवाजा उघडला. तेव्हा मुग्धा पटकन बोलली, “अम्मा मी ...अजून वाचा

11

दिवाना दिल खो गया (भाग ११)

(त्याचे मन आता इथे लागत नव्हते कधी एकदा घरी जाऊन अम्मा – अप्पा आणि मुग्धाला भेटतोय असे झाले होते आता पुढे..) पण त्याच्या ऑफिसच्या कॉंट्रॅक्ट प्रमाणे त्याला त्याचा येण्याजाण्याचा खर्च स्वत: करावा लागणार होता. कारण २ वर्ष पूर्ण व्हायला अजून एक वर्ष बाकी होते. पण सिलूला त्याची फिकीर नव्हती. त्याने १५ दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि तो त्याच्या बॉसच्या रीप्लाय चा वेट करू लागला. ह्या एक वर्षात त्याच्या हुषारीमुळे बॉस त्याच्या कामावर खूप खुश होते. त्यांनी लगेच सिलूची सुट्टी अप्रूव केली. सिलूला बॉसचा मेल आलेला पाहून खूप आनंद झाला. आता मोठे टेंशन होते ते टीकेट्सच. इतक्या कमी वेळात सगळे ...अजून वाचा

12

दिवाना दिल खो गया (भाग १२)

(मुग्धा निघताच सिलू अम्माला म्हणाला, “अम्मा माझ एक महत्वाचे काम आहे ऑफिस मध्ये. मी अर्ध्या-एक तासात येईन परत” असे तो मुग्धा पाठोपाठ निघाला. आता पुढे..) सिलूने मुग्धाला फोन केला. ती गेट बाहेरच उभी होती. तिला माहीत होते सिलू तिला भेटल्याशिवाय ऑफिसला जाऊच देणार नाही. म्हणून तिने लंच टाइम पर्यंत ऑफिसला येईन असे ऑफिसमध्ये आधीच कळविले होते. सिलूने लगेच साहीलला फोन केला. सिलूला माहीत होते की, साहील घरी एकटाच आहे. म्हणून सिलू मुग्धाला घेऊन तिथेच गेला. त्या दोघांना आलेले बघून साहील काहीतरी कारण सांगून बाहेर निघून गेला. आता साहीलच्या घरात सिलू आणि मुग्धा दोघेच होते. दोघे इतक्या दिवसांनंतर एकमेकांना भेटत ...अजून वाचा

13

दिवाना दिल खो गया (भाग १३)

(सिलूला तर त्याच्या कानांवर विश्वास होत नव्हता. इतक्या सहजासहजी अम्मा मुग्धाला अॅक्सेप्ट करेल असे सिलूला कधीच वाटले नव्हते. त्याने घट्ट मिठी मारली. अप्पाने ही त्याच्या डोक्यावरून हात फिरविला. आता पुढे..) त्याला हे सगळे कधी मुग्धाला सांगतोय असे झाले होते. पण त्या आधी त्याला साहीलची खबर घ्यायची होती. रात्री साहील जेवायला सिलूच्या घरी आला. मस्तीमजा करत सगळ्यांची जेवणे झाली आणि सगळे गप्पा मारायला बसले. काहीवेळाने अप्पा झोपयला निघून गेले. मग हॉलमध्ये फक्त अम्मा, सिलू आणि साहील बसले होते. साहील हा सिलू भारतात आल्यापासून त्याच्याशी एकदाही मोकळेपणाने बोलला नव्हता. काहीतरी चुकीचे वागल्याचे भाव सिलूकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावर असायचे. सिलूने ते अचूक ...अजून वाचा

14

दिवाना दिल खो गया (भाग १४)

मग अम्मा पुढे म्हणाली, “अग आजकालच्या तुम्हा मुलींना आमची ओल्ड फॅशन थोडी ना आवडणार म्हणून तुला खरेदीला नेत आहे. ना? अम्मा हसू दाबत म्हणाली. बिचारी मुग्धा अम्माला काय उत्तर द्यावे हा विचार करू लागली. तिने सिलूकडे पाहिले पण सिलू शॉक झाल्यासारखा मुग्धाकडे बघत होता. मग अम्माने परत विचारले, “येशील न मुग्धा?” पण मुग्धाने खोटे खोटे हसत हो म्हटले आणि मला उशीर होतोय घरी जावे लागेल असे म्हणत कोणी काही बोलायच्या आत ती निघून पण गेली. सिलूसाठी सुद्धा हे अनपेक्षित होते. तो ही मुग्धाच्या मागे गेला. पण तो गेटच्या बाहेर येईपर्यंत मुग्धा ऑटोमध्ये बसून निघून गेली होती. सिलूने मुग्धाला फोन ...अजून वाचा

15

दिवाना दिल खो गया (भाग १५) (पर्व १ समाप्त)

(हे सर्व ऐकून खरे तर मुग्धाला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण तिच्या अश्रूंचा बांध तुटला आणि ती अम्माला मारून रडू लागली. अम्माने तिला शांत केले आणि ती मुग्धाच्या आई वडिलांना म्हणाली, “तुमची मुलगी फार गुणी आणि संस्कारी आहे. मी शोधून पण इतकी चांगली बायको सिलूसाठी शोधू शकले नसते. आमच्याकडून ह्या नात्याला होकार आहे. मी आशा करेन की, तुम्ही या दोघांच्या प्रेमाला समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्याल. मी सकारात्मक उत्तराची वाट पाहीन. धन्यवाद”, असे बोलून अम्मा, सिलू आणि आप्पांना घेऊन तिथून निघाली. आता पुढे...) सिलूची फॅमिली निघून गेल्यावर मुग्धा मान खाली घालून खुर्चीवर बसली. तिला वाटले की, आई ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय