हरवल्या प्रेमाच्या कथा रोमियो, हिर राजा , लैला आणि मजनू जगात आपल्या प्रेमानं विख्यात पावलेलीही प्रेम युगलं आज ही तरुण पिढीला भुरळ पडणारी ठरतात . पण वास्तवात काही प्रेमाच्या कथा एक आपल्याच प्रेमाची शोकांतिका होऊन बसतात त्या प्रेमाच्या कथा कधीच कुणापर्यंत पोहचत नाही . त्या प्रेमाची वास्तविकता तिथं पर्यंतच मर्यादित असते . प्रेमाचा बोलबाला होतोच पण प्रेम कधी कधी कुणाचं उघडकीस ही येत नाही . अशाच अनोन लव्ह स्टोरी हरवलेल्या प्रेमाच्या कथातुन त्यांची प्रेम कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहे .
Full Novel
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 1)
अनामिका,इथे का बसलीस तू अशी एकटीच? आस्मतांच्या सानिध्यात निरभ्र काळसर ढग कुणाचा आवाज नव्हता की कुणी असण्याचा शुकशुकाट नव्हता तो समुद्रालगतचा किणारा होता..पाठमोरी आकृती मागे करत आवाजाचा दिशेने अनामिका वळली... अं , तू इकडे छान वाटतं मला .बघं निसर्गांच्या सानिध्यात असं एकांतात बसायला.. तू हि ये बसं ना इथे दगडावर ! माझ्या मनात एक प्रकारचं नैराश्यच दाटलय बघं . का रे ! काय झालयं असं तुला ? होय गं ,मी काय विचारले तू त्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले मला? आलोककडे बघतं अनामिका आलोक काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात ती शोधावी लागतात, शोधुनही ती नाही सापडली तर मिळून जातात वेळ आल्यावर , हा प्रश्नाचा उत्तराचा गुंताच ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 2)
प्रेमाला वय नसतं असं म्हणतात हे खरंच असावं . बालपणीच ते अल्लड वयात झालेलं प्रेम तरूण पणात मिळणं म्हणजे किती अल्हादायकच ना जणू काही सारी सृष्टी आपल्यावर प्रेम सुमनाचा वर्षाव करीत असल्याचे भाकीत ... जया ही आठवीत शिकणारी मुलगी ती ही ह्या तारूण्याच्या उबरंठ्यावर आपले पहिले चरण ठेवताना कुणाच्या तरी प्रेमात पडते ... कोण असावा तो खुशनशीब जयाचा राजकुमार ?? दुसरा तिसरा कुणीही नाही तो तिचा सख्खा आतेभाऊच होता दिनेश ... जयाला आईसोबत मंदिरात जाण्याची आवड ती मंदिरात जाऊन दिनेशचा नावाचा तिथे शिक्का आपल्या अंगठ्याने लावते . जेव्हा तिची ही वेडीभाबडी कृती तिचा आईला समजते तेव्हा तिची आई तिला विचारते ...अजून वाचा
हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 3)
लव्ह झोन ( भाग - 2 )सौम्या उन्हाळ्याच्या नुकत्याच सुट्या संपवून मामाच्या गावावरून आली होती .जॉनी ती मामाकडे गेल्यावर येऊन गेली हे तिने तिच्या मॉमच्या तोंडुन आल्याआल्याच ऐकलं . जॉनी सौम्याची बेस्ट फ्रेंड . उन्हाळ्यात सुट्या आपल्या मैत्रिणीसोबत घालवण्याचा सौम्याचा तिच्या मॉम समोर फसला मॉमच्या आग्रहाने तिलामामाच्या आजोळी जावंच लागलं .सौम्या आठवीत गेली ... स्कूल सुरू झाली . तो पहिलाच दिवस होता स्कूलमध्येसुट्या नंतर . तिचं मन रमेना . जॉनी तिला म्हणाली ," सौम्या , मला आज निव अँड्रॉइड फोन घेऊन मिळणार आहे दिप्तीकडे आहेनातसा ... "तिला जॉनी आनंदाच्या भरात सांगत होती ." ओहहह wow .... यार ! छान ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 4)
शेवटी जातीने प्रेमाचा घात केला .सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .मंद संचारलेला गारवा पहाटेच्या वातावरणात हसमुख झालेला उत्साही चेहरा नव्या जोमाने कामाला लागला पहाटेचे पाच वाजले होते मश्जीद मध्ये नमाजचे प्रयोजन सुरू होते .अवतीभोवती अल्लाहा हो अकबर ह्या ध्वनीने कानात आवाज गुंजत होता .त्या आवाजाने तायराला जाग आली .नेहमी प्रमाणे ती उठली .तेजस्वी गौरवर्ण चेहरा गुलाबाच्या पाकळ्या सारखे तिचे ओठ ..डोळे मिटलेले दोन्ही हात त्या सुंदर चेहर्यासमोर अल्लाहाचे स्मरण ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -5)
लिव इन चा फंडाजसं वय वाढत जातं बालपणाला दुर सारत तारूण्याच्या उबंरठ्यावर पाऊले पडू लागतात ..मनाची घालमेल होते .... उसळू लागतात ... चुक की बरोबर काहीच कळत नाहीअल्लड वय असतं ना ते !प्रेम वैगरे फार कमी जपतात हो अधिकतर आकर्षणालाच बळी पडतात ...न समजलेल्या प्रेमाच्या काहाण्या पण फार करूण आहेत ... त्यात ही दोघे ह्यांना हेच समजूनघ्यायला तयार नाही तर आपण काय समजून घेऊ ??" निमिशा अगं ये ऐक ना माझं , का असा अट्टाहास करते नको जाऊ ना मला सोडूनदुर ..... तुझ्याविणा इकडे मला सारं काही भकास वाटेल गं ..."विनयचा आपला लागलीच सुर निमिशाला जाण्यापासून थांबवत होता ...तळ्यात ...अजून वाचा
हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 6)
________________________________________________द लार्वे - हरवलेला देवमासासायंकाळची वेळ माणसाची नसतेच रहस्यमय ओढयात बंधिस्त करून घ्यायला खोल खोल दरीत भू मातेच्या शोधात हा देह न थकता महासागरी प्रवासाच्या दिशेने झुकलेला असतो . भूगर्भ त्या दिवशी खवळलेल्या लाटांशी एकजूट होऊन मला ओढत खोल खोल दरीत ढकलू पाहत होता अंगातलं सर्व त्राण एकटवून मी बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होती . त्या खवळनाऱ्या लाटा मला ओढुन घेणाऱ्या असफल ठरावयात असचं काही झालं . बाहेरचा परिसर नजरेच्या दृष्टीक्षेपात पडला आकाश निरभ्र होतं . सूर्य क्षितिजाच्या पल्याड जाऊन मला हसतं असावा असा भास झाला त्याची आणि माझी गट्टी न हरणाऱ्या भावनिक ओढीची होती . पण आता लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 7)
आम्ही तिघांनी अर्धी रात्र त्या किनारपट्टीवरच घालवली . मी मॉमच्या खांद्यावर डोकं ठेऊन बसलेली होती माझ्या बाजूला जॉन ..तो करतं होता त्या बालपणीच्या खोड्या आमच्या आज पूर्ण होत होत्या आणि मी मॉमला सांगत होती मॉम बघ ना ब्रदरला . गिटो काहीच न बोलता हसतं होता आमच्याकडे बघून . जवळ जवळ मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही किनारपट्टीवरून घरी परतलो ते पाऊस आल्यामुळे . मला पावसात भिजायचं होतं आणि जॉन म्हणतं होता , " आता कुठे पाऊस पडायला सुरवात झाली अन घामाच्या धारा ओघळून निघू लागल्या ये तू चल हा लवकर इथून लुसिआ पावसात भिजायचं नाही अजिबात ... " मी त्याच्याकडे बघतं मॉमला ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 8)
>मी स्विमिंगसाठी पाच महिने घराच्या बाहेर पडले . कारण आता मॉम एकटी नव्हतीच गिटो सोबत होता आधी सारखं आता नातं रुळावर आलं होतं .. मला माझ्या ध्येयाने झपाटून टाकलं होतं दोन वर्षात ऑलम्पिक मध्ये मला सुवर्णपदक मिळवायचं होतं ... हे माझं स्वप्न नाही तर जगणं होतं त्या स्वप्नाचा मी उठता बसता खाता पिता पाठलाग करायची .जॉन देखील एक महिना आमच्या सोबत वेळ घालवून लंडनला निघून गेला आता तो एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचा मुख्य झाला होता . जॉन नेहमीच घरी पैसे पाठवायला लागला होता आता गिटो आणि मॉमला पैशाची अजिबात काळजी नव्हती त्यांची आर्थिक मदत जॉन भागवायचा .माझं जॉन सोबत ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 9)
“Knock, And He'll open the door Vanish, And He'll make you shine like the sun Fall, And He'll raise to the heavens Become nothing, And He'll turn you into everything.” ― Rumi also saidthe long डार्क - माझ्या प्रिय वाचकांना समर्पित_________________________________तरुणपणात घडलेला अपराध त्याला नाबालिक ( juvenile ) म्हणून त्याच्यावर लादलेले सर्व गुन्हे माफ करतो .त्या झालेल्या किरकोळ घटनेला विसरून तो पुढे जातो त्याच्या आयुष्याच्या वळणावर तो एक रोमंकित द मॅनऑफ डेस्टिनी म्हणून गाजलेला नावाजलेला तरुण ... त्याला नियती आणि नशिबानेच तर शेवटी घडवले होते ...@@@रात्रीचे बारा वाजले होते .... सर्वदूर काळोखाने विळखा घातलेला .... भयाण शांततेचं साम्राज्य ....हिमवर्षा ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -10)
रस्ता अरुंद होता ..... वाटेत त्याच्या आता रोझा आली होती .... उंचीच्या शिखरावर पोहचलेला फेनिक्स आताडगमगणारं होता का ?भूतकाळाच्या आढावा घेतं ... रोझाकडे पाठ फिरवणार होता !तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडला होता त्याचं रात्रीची ती घटना ....त्या भयाण डोंगराच्या माथ्याशी फेनिक्स एकटाच वाईन च्या नशेत तल्लीन झाला होता ...वयचं काय होतं त्याचं अवघ्या पंधरा वर्षयाचा .... तारुण्याच्या पहिल्या पाहिरीवर चरण पडतांचत्याचे हार्मोन उसळू लागले .... भावना सुसाट झाल्या .... हा पंधरा वर्षयाचा फेनिक्स सेक्स बद्दलकाहीच जाणलेला नव्हता ... स्त्री पुरुष सम्बंध होतातही ह्याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती ....आणि ते जाणून घेण्याची त्याला उत्सुकता ही नव्हती .... दारूची बाटली ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा (भाग -11)
वातावरणात संचारलेला गारवाच एवढा तीव्र होता की तिला आज अंथरुणाच्याबाहेर पडावं वाटतं नव्हतं ...दिनू ला कॉल करू का ? नको शाळा सुटायची असेल त्याची . वर्गावर असणार तो तरउगाच खोळंबा होईल त्याला आपल्यामुळे म्हणून ती डायरी आणि पेन घेऊन काहीतरी मनातलासाचलेला गाळ कोऱ्या पानावर उतरवत होती .....दिनू हा काव्याचा खूप जवळचा मित्र जवळचा म्हणण्यापेक्षा अगदी हृदयालगतचातिच्या जीवनात काहीही बरं वाईट घडलं तर त्याची पहिली न चुकता खबर जायची दिनूला .काव्याची आणि दिनूची मैत्री म्हणजे अल्लड अवघड आणि खट्याळ बॉंडिंग .....कवितेत प्रथम क्रमांक आलेल्या लिस्ट मध्ये सर्वात उंचावर त्याचंच नाव होतं . सर्टिफिकेटलाफोटो पाहिजे आहे तुमचा म्हणहून हिने त्याला इंफॉर्म ...अजून वाचा
हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -12)
काळोख दाटलेला होता सर्व दूर किर्रर्र अंधाराचा विळखा . रातकिडयांचा गोघावणारा आवाज व्हावा एवढंच बाकी सारं अंधारात विलीन . भयाण शांततेत त्याला हिंस्त्र पशुची भीती नव्हती तो एक महान योद्धा रणभूमीवर लाखो शत्रूसैनिकांचा पराभव करणारा युद्धाच्या वेळी तलवार हातात घेऊन विजयाने धुंद धावणारा तो ह्या जंगली प्राण्यांना कसा घाबरणार . रात्रीच्या नीरव शांततेत तो गाढ झोपी गेला होता . झोपेत असताना एक पुसटशी आकृती अभिमन्युच्या डोळ्या समोर आली ." अभिमन्यु ...."तो कर्कश घरगरणारा घसा सुकलेल्या गळ्यातून निघणारा आवाज ऐकून अभिमन्यु शहारला जणु तो आवाज अभिमन्युच्या खूप जवळच्या व्यक्तीचा होता तो चाचपडतं उतरला ," गुरु गुरु तुम्ही , तुम्ही कुठे ...अजून वाचा