हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -12) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -12)



काळोख दाटलेला होता सर्व दूर किर्रर्र अंधाराचा विळखा . रातकिडयांचा गोघावणारा आवाज व्हावा एवढंच बाकी सारं अंधारात विलीन . त्या भयाण शांततेत त्याला हिंस्त्र पशुची भीती नव्हती तो एक महान योद्धा रणभूमीवर लाखो शत्रूसैनिकांचा पराभव करणारा युद्धाच्या वेळी तलवार हातात घेऊन विजयाने धुंद धावणारा तो ह्या जंगली प्राण्यांना कसा घाबरणार . रात्रीच्या नीरव शांततेत तो गाढ झोपी गेला होता . झोपेत असताना एक पुसटशी आकृती अभिमन्युच्या डोळ्या समोर आली .

" अभिमन्यु ...."

तो कर्कश घरगरणारा घसा सुकलेल्या गळ्यातून निघणारा आवाज ऐकून अभिमन्यु शहारला जणु तो आवाज अभिमन्युच्या खूप जवळच्या व्यक्तीचा होता तो चाचपडतं उतरला ," गुरु गुरु तुम्ही , तुम्ही कुठे होता इतके दिवस ?? ."

रडवलेल्या स्वरात वियोगाच्या आकांताने तो गुरूच्या चरणावर नतमस्तक होतं विव्हळलाच .

" शांत हो माझ्या लेकरा शांत हो अभिमन्यु ..." त्याला धीर देतं दोन्ही हाताने कुरवाळीत गुरूने उभे केले .

" गुरु तुम्हाला मी कुठे कुठे नाही शोधले मी एवढा वाईट झालो तुमच्यासाठी की तुम्ही मला न सांगता माझ्या गैरहजरीत वानप्रस्थान होण्याचा निर्णय घेतला ? "

" हो अभिमन्यु तुझ्यासाठीच म्हणून मी एवढे दिवस राजमहलात काढले नाहीतर कधीचा वानप्रस्थ होण्याचा निर्णय घेतला होता , राजाला माझ्या शिकवणीत भेद आढळतं होता मी तुला योग्य रीतीने राज्यचालवण्याची शिकवण नाही दिली अशी महाराणी अर्थादेवीने माझ्यावर टीका केली एवढेच नाहीतर तो धूर्त तुझा जेष्ठ भाऊ अलवार त्याने माझ्या कुटीला मी नसताना आग लावली . तूच सांग अभिमन्यु तिथे माझे राहणे कसे शक्य होते ? "

गुरूने सांगितलेले हे सत्य ऐकून अभिमन्युला खूप वाईट वाटले . खरं तर अभिमन्युला आतापर्यंत गुरु त्याला सोडून असे अचानक का निघून गेले हेच कळतं नव्हते . त्यांच्या मनात घोगावणाऱ्या वादळाला शांत करण्यासाठी तरी राजमहलातील प्रधानाने गुरूबद्दल त्याला काहीच सुचविले नाही . गुरूला सर्वत्र शोधून शेवटी अभिमन्युला गुरूचा थांगपत्ता लागला नाही . तेव्हा निराश होऊन आता गुरु आपल्याला भेटतील ही भोळीआशाच त्याने सोडून दिले . पण तो जिथे कुठे असेल तिथे गुरूला आठवून एकांतात रडायचा आक्रोश करायचा . कारण आचार्य अशवंतानी त्याला एक पराक्रमी महान योद्धा म्हणून घडवले . 

गुरु आता परत आपल्याला सोडून दूर कुठेच जाऊ नये म्हणून गुरूच्या झाल्या गेल्या भूतकाळाला विसरून अभिमन्यु गुरूला म्हणाला ," गुरुदेव मी जगाच्या दृष्टीने एक महान योद्धा असलो तरी सर्व प्रथम तुमचा न्याय प्रिय शिष्य आहे , विनंती करतो की तुम्ही मला सोडून आता कुठेच जाणारं नाही . " 

" कसं शक्य आहे अभिमन्यु मी अनंतात विलीन झालो , तुझी सोबत करणं आता मला कठीण जाईल वानप्रस्थ झाल्यावर आषाढ महिन्याच्या तिसऱ्या प्रहरी रात्रीला मी देह त्यागाला ."

हे गुरुचे शब्द ऐकून अभिमन्यु दुःखाने विलाप करू लागला .

" गुरु तुम्ही तर मला असं पोरकं करून कायमचे सोडून गेलात आता आपली भेट होणं वियोगात पण शक्य नाही ."

" हो अभिमन्यु हो पराक्रमी वीरा तुझ्यासोबत माझा अंतरात्मा संवाद साधीत आहे , जीवन मरणाचा हा सिद्धांतच आहे जन्म झालेल्या प्रत्येकाला मरण आहेच त्याला तू किंवा तुझा हा सर्व ज्ञानी सर्वव्यापी गुरुही रोखु शकत नाही ."

" गुरु पण तुमचं मरण तुमचा वियोग मला हे सारं अघटित घडल्याप्रमाणं वाटतं आहे ? "

" नाही अभिमन्यु अघटित काहीच नाही त्यात नियतीचा खेळच तसा असतो , माणूस भाग्याला सोबत घेऊनच जन्माला येतो आणि मृत्यूला सामोरे जातो . माणसाचा प्रत्येक जन्म त्यांच्या कर्माचं हितचिंतक असते त्यासाठी तर हा जन्म होतो . तू एक न्याय प्रिय राजा आहेस तू माझा शिष्य शोभून दिसतो ." न्यायप्रिय राजा हे शब्द ऐकताच अभिमन्युला आपल्या जनतेची आठवण येते त्यांच्या डोळ्यात अश्रूचा बांध साचतो तो गुरूला म्हणतो ,

" नाही नाही नाही .... गुरुदेव मी ना राजा आहे ना रंक नाही युद्धभूमी जिंकून जनतेचं प्रेम शाबूत करणारा राजा तो तुमचा शिष्य अभिमन्यु मी आता नाही राहिलो , गुरुदेव कृपया मला स्वतः जवळ बोलवून घ्या त्या यमाला आदेश द्या ! तो तुमच्या आदेश्याचं पालन नक्की करेल . मला हे जगणं नकोस झालं आहे ." 

" अभिमन्यु तू आजही तोच पराक्रमी राजा आहे , आठ वर्ष झाले तुला ह्या परिस्थितीत असा रानोवनीं भटकत आहे . कधी मागे वळून बघितलं त्या निष्पाप जनतेकडे डोळ्यात आशेचअंजन लेवून आजही तुझ्या प्रतिक्षेत ते जगत आहे . "

" गुरु माझं ह्या जगात असलेलं अस्तित्वच कायमस्वरूपी संपलेलं आहे , माझं सर्वस्वपणाला लावून मी कायमचा गृहत्याग करून राजमहलापासून कोसो दूर आलो त्या विचारांचं वादळंही आता माझ्या अंगाला मी शिवू देणारं नाही ."

" नाही अभिमन्यु मी तुला अशी शिकवन कधीच दिली नाही , उठ अभिमन्यु उठ ..जागो हो हातात तलवार घे आणि पुन्हा राजमहालात प्रवेश कर जा जा अभिमन्यु जा ......."

अभिमन्यु ताड्कन झोपेतून जागा झाला . त्यांच्या डोळ्यासमोरून गुरु अदृश्य झाले . दिसतं होता तो सर्व दूर काळोख त्या अंधाऱ्या काळोखात अभिमन्युने गुरुदेव गुरुदेव....... म्हणून हंबरडा फोडला . 

अभिमन्युने बघितले ते एक स्वप्न होते . गुरु त्यांच्या सोबत स्वप्नात बोलून गेले होते . तो ते स्वप्न पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याला स्वप्न आठवतं नव्हते फक्त गुरुचं शेवटचं वाक्य त्यांच्या कानातं गुंजत होतं .." उठ उठ अभिमन्यु उठ ..जागो हो हातात तलवार घे आणि पुन्हा राजमहालात प्रवेश कर जा जा अभिमन्यु जा ......." ह्या गुरूच्या शेवटच्या वाक्याने त्यांच्या मनात घरच केले . रात्रभर तो त्याचं विचारात गुंतलेला होता . 

दाढी वाढलेल्या एखाद्या संन्याशाचं रूप धारण करावं तशीच अवस्था अभिमन्युने स्वतःची करून घेतली . युद्धभूमीत अभिमन्युने हरवलेल्या राज्यांनाही त्याचं हे रूप पाहून ओशाळायला यायचं . कोणी राजे तर चक्क त्याला ओळ्खण्यासही नकार देतं होते . 

रात्रीच्या त्या स्वप्नाने तो पार भांबावून गेला त्याला गुरु आता ह्या दुनियेत नाही ह्याचे अतीव दुःख होतं असले तरी त्याचं वेडं मन स्वस्थ बसतं नव्हतं त्याला परत वाटलं गुरु आपल्याला सोडून कसे जाऊ शकतात ते अनंतात विलीन नाही होऊ शकतं . स्वप्न हे स्वप्न असते वास्तविकतेत गुरूच मरण आपल्या डोळ्या सामोरं झालं नाही . त्याला आठवलं एकदा गुरु धनुर्विद्या शिकवतांना आपल्याला म्हणाले होते , " हे महानयोध्या मी स्वतःला भाग्यशाली समजतो तुझ्या सारख्या योध्याला ज्ञान प्रदान करून माझी अंतिम इच्छा हेच असेल मी आपला देह ह्या पराकर्मी वीराच्या मांडीवर त्यागावा ." 

मग गुरूचीही अंतिम इच्छा अपूर्ण ठेऊन ते ह्या जगाचा निरोप कसे काय घेऊ शकतात ? मरण हातात नसले तरी प्रबळ इच्छाशक्ती अंतरात्म्याला साद घालते . मी गुरूचा शोध घ्यालाच पाहिजे . तो पुन्हा गुरूच्या शोधार्थ निघाला . 

सकाळ झाली होती सूर्याची लाल तांबूस किरणे अंभिमन्युच्या त्या दाढी वाढलेल्या चेहऱ्यावर पडतं होती . अभिमन्यु वाट भटकंत सैरावैरा मिळेल त्या वाटेने चालतं होता . चालता चालता त्याला धाप लागली त्याचा तो शीन देह विसावा घेण्यासाठी एका झाडाखाली थांबला . तो मनात म्हणतं होता " गुरु कुठे आहात तुम्ही एकदा ह्या पामराला भेटा ." त्याचा जीव पाण्याने व्याकुळ झाला होता . तहानेसाठी तो उठला जवळ पास कुठे नदी दिसते का म्हणून शोध घेऊ लागला . तिथून एक दोन मैलावर त्याला नदी दिसली . नदीच्या किनारी जाऊन तो ओंजळभर पाणी हातात घेऊन पीत होता . एवढ्यात मागून त्याला आवाज आला आली . 

" ओंजळीने पाणी पिता ?? तहान नाही भागायची हे घ्या भांड ..." असं म्हणतं त्या भिक्षूने अभिमन्यु समोर रिकामं पाणी प्याला भिक्षापात्र ठेवलं .

एक कंटाक्ष त्याच्याकडे बघतं अभिमन्युने ते भिक्षापात्र हातात धरलं वहात्या धारेच पाणी भिक्षापात्रात घेतं त्यांनी पाणी पिलं आणि नदीत पुन्हा पात्र बुडवतं भरलेलं पात्र भिक्षुकांसमोर ठेवलं . दाढी वाढलेली होती तरी त्याच्या त्या चेहऱ्यावर त्या भिक्षुकाला एक वेगळंच चैतन्य दिसून आलं . त्यांच्या नजरेत तेज सामावले होते धीर गंभीर पण आदरयुक्त त्याचा ती स्वाभिमानी कृती बघून भिक्षुकाला जाणवलं होतं . आपण ह्या व्यक्तीला कुठे तरी बघितलं ..पण कुठे ?? ह्याचा चेहरा डोळे नजरे सामोरं येतो पण आता आठवतं का नसावं ? खूप दिवसाची भेट असावी म्हणून कदाचित . एवढ्या वेळच्या कालावधीत मात्र अभिमन्युने त्याला चटकन ओळखले . त्यांनी त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला , " प्रणाम महात्मा , तुम्ही गुरुदेव आचार्य अश्वतानीचे अनुयायी ना ?" त्याच्या ह्या एका प्रश्नानेच त्या भिक्षुकासमोर राजा अभिमन्यूच्या चेहरा आला . आणि त्यांनी ओळखलं हे तर राजे अभिमन्यु पण ह्या दशेत आणि इथे काय करत आहेत ते विचारात पडले . अभिमन्युने त्यांना परंत आवाज दिला . " महात्मा ......महात्मा गुरुदेव अश्वतानी कुठे आहेत ?"

" अअं ह्ह्हह्ह ते ते पण तुम्ही राजे अभिमन्युचं ना ? "

त्यांनी विचारलेला प्रश्नाला टाळत अभिमन्यूने पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला .

" मला अश्वतानी आता कुठे असतील हे तुम्ही सांगू शकता का ? "

त्या भिक्षुकांना आता पूर्ण खात्री झाली होती हे राजा अभिमन्यूचं आहे म्हणून . पण एका राज्याची अशी दशा व्हावी ह्यासाठी ते चिंतव्यस्थ झाले . ते गुरुदेव अश्वतांनीचे अनुयायी असल्यामुळे त्यांना त्यांचा बद्दल माहिती असणे शक्य होतेच आणि अभिमन्यूला तेच गुरूबद्दल सांगू शकणारे एकमेव होते . भिक्षुकांच्या हे देखील लक्षात आले . राजा अभिमन्यु हा अश्वतानीचा खूप जवळचा आणि प्रिय शिष्य होता बालपणापासून धनुर्विदेत त्याला पारंगत करणारे तर राजपाठ शिकवणारे गुरु अश्वतानीच होते . पण दहा वर्षाचा काळ लोटला होता ह्या गुरु शिष्याची एकदाही भेट न होऊन .

" गुरुदेव अश्वतानी राजमहाल सोडून गेल्यावर काहीदिवस अवंतिका मध्ये वास्तव्य केले , तिथून पुढे गुरुदेव साधनेसाठी हिमालयाच्या शिखरावर निघून गेले दोन महिन्यापूर्वी गुरुदेव मला हिमालयाच्या शेजारी बर्फाळ भागात भेटले होते तिथे बर्फाने आच्छादलेल्या गुहेत ते वास्तव्यास होते . "

" तुमची शेवटची भेट गुरु अश्वतानी सोबत कधी घडली ? "

" शेवटची भेट तिथेच हिमालयाच्या शिखरावर , तिथून मी इकडे प्रस्थान केले . "

" काय गुरुदेव मला आता तिथे भेटू शकतील ??"

" ते आता कुठे असतील हे निश्चित सांगू शकतं नाही . "

" झाडाखाली निवांत बसून बोलू आपण चला ...."

" हो ..."

दोघेही झाडाच्या सानिध्यात आले आपली झोळी खाली ठेवतं , भिक्षुकांनी झोळीत हात घातला आणि पालवीने बांधलेली भाकर बाहेर काढली .

" या जेवून घेऊ इथेच आपण ..."

" नाही मला भूक नाही तुम्ही करा जेवण .."

" असं काय करता महाराज आमच्या झोळीतलं जेवण तुम्हाला नाही जमायचं का ? तुम्ही कितीही आमच्या पासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची ती करारी मुद्रा ते तीष्ण डोळे तेजस्वी चेहरा ह्या दाढी वाढलेल्या चेहऱ्या मध्येही झळकतोच , तो राजा अभिमन्यु तर प्रजेच्या घरी गेल्यावर प्रजेने जेवणाची विनंती केल्यास त्यांच्या विनंतीचा मान राखता चटणीभाकर ही मोठ्या आवडीने खायी . "

" गरीब श्रीमंत कुणीच नसतं महात्मा तुम्ही कशाने गरीब आणि मी वणवण भटकणारा हा पामरा कशाने हो श्रीमंत हा भेद तर पृथ्वीवरील मानवाने निर्मिला , मी कोणी राजा नाही महात्मा आता एक अन्नाचा कण ही घशाखालून उतरतं नाही . "

" थोडं खाऊन घ्या जरा ." भिक्षुकांच्या आग्रहाने अभिमन्युने त्यांचा सोबत जेवण केले . त्यानंतर अभिमन्युने स्वप्नातला शेवटचा क्षण भिक्षुकांजवळ कथन केला . 

" महात्मा , गुरु मला सांगत होते उठ अभिमन्यु उठ जा राजमहालात जा , स्वप्नातला एवढाच वृत्तांत मला आठवतो स्वप्नात असं आठवते गुरु माझ्या सोबत खूप वेळ बोलत होते पण काय बोलतं होते ते आठवण्याचा खूप प्रयत्न करूनही आठवतं नाही आहे . गुरूला वाटतं मी आपला राजकारभार सांभाळावा ."

" हो , राजे तुमच्या गुरुपासून तुमचे हे रूप तुम्ही लपवू शकतं नाही ते दिव्यज्ञानी आहेत . म्हणून त्यांनी स्वप्नातून तुमच्या सोबत संवाद साधला ते जे म्हणतील ते योग्यच असते .गुरुविना न दुजा कोई ह्या जगतासी . "

" पण मी पुन्हा त्या राजमहालात प्रवेश नाही करू शकतं . "

" का राजे राजमहालात प्रवेश का नाही करू शकतं तुम्ही ?? "

" मला त्या भूतकाळात आता नाही शिरायचं आहे महात्मा येतो मी .." तिथून उठून डोळ्यातलं पाणी पुसत अभिमन्यु निघून गेला....

________________________________________________________________________________________


अभिमन्युला राजत्याग करून जवळ जवळ दहा वर्ष पूर्ण झाली . राजमहाल त्यांच्या नसल्याने एखाद्या जीविता प्रमाणे हिरमुसून गेला होता . राजमहालाच्या त्या निर्जीव भिंतीही अभिमन्युच्या प्रतीक्षेत उभ्या ठाकलेल्या होत्या . अभिमन्युच्या जाण्याचे दुःख राजमहालातल्या सेवकापासून तर त्याला देव समजणाऱ्या प्रत्येक जनतेला होते पण त्यांचेच संगेसोयरे त्यांचा घात करायलाही मागे सरसावले नाही . राजमहालाच्या गादीवर कोण बसेल ह्याच्यासाठी वाद एवढा टोकाला गेला की अभिमन्यूचे तिथे राहानेही महाराणी अर्थादेवी हिला खटकतं होते लहानपणापासून ती अभिमन्यु आणि पोटचा मुलगा अलवार , अभिराज , वृजय ह्यांच्यात भेद करीत असे . राजा रुद्रनाथ ह्याच्या बायका अभिमन्यु हा दुसऱ्या बायकोचा मुलगा . अभियमन्यूची आई राणी शताब्दीदेवी ही अभिमन्यु सात वर्षयाचा असताना जवराने निधन पावते . तेव्हापासून राणी अर्थादेवी अभिमन्यूच्या सांभाळ करते . राणी अर्थादेवी ही एका धनवंन्त गौरकराज्याची राजकन्या देखणी सुंदर चाणाक्ष्य बुद्धीची राजा रुद्रनाथची तिसरी महाराणी होते राज्याची चवथी बायको राणी कृपिता हिला दोन्ही मुली झाल्या म्हणून राजा सोडून देतो . पण तिच्या मुली राजमहालात आपला उत्तराधिकार मागण्यासाठी येतात . कृपिताच्या मोठ्या मुलीचे नाव शोभना ती आज सहा वर्षयांनी राजमहालात पाऊल ठेवते . तिला बघून रानी अर्थादेवी हर्षउल्हासीत होते कारण राणी तिला मुली सारखी बघते . ती येताच तिच्या स्वागतासाठी महाराणी अर्थादेवी स्वतः हजर होती औक्षवंण करीत तिला म्हणाली , " एवढ्या वर्षांनी आज येणं केलं ह्या मातेची आठवण असूदेत जरा . "

" हो माते , तुम्हाला भेटण्याकरिता तर मी आली आहे आणि आता नेहमीसाठी तुमच्याच जवळ असणार आहे . "

" हो हो राहा ..." 

" एक दुःखद घटना आहे ."

" का काय झालं सर्व क्षेमकुशल आहे ना तिकडे , तुझी माताश्री ??"

" ती ह्या दुनियेत नाही राहिली ? "

" शोभना , काय सांगत आहे तू हे ? महाराजांना निरोप तरी पाठवायचा ? "

" निरोप ?? महाराजांना हहाहा ." ती हसतं म्हणाली .

" काय झालं शोभना ? " 

" माते महाराजांना वेळ तरी आहे का ?? आमच्याकडे लक्ष्य द्यायला आम्ही दोघी झालो म्हणून त्यांनी महाराणीला सोडून दिले तेच मला भाऊ असते तर राज्याच्या गादीसाठी वादविवादाची स्पर्धा रंगली असती . " 

" तू इथेच राहा आता मी पण तुझी माताच आहे ते सर्व विसरून जा . "

" हो माते तुम्ही आहात म्हणूनच मी तुमच्यासाठी इथे आली . "

शोभना आली म्हणून वृजय फार आनंदला तिच्यात त्याला अप्सरेचं रूप दिसतं होतं . तो सारखा तिच्या शयनकक्षेकडे ती एकटी कधी मिळते म्हणून पाळत ठेवतं होता . त्या रात्री चंद्राच्या प्रकाशात शोभना बाहेर निसर्गाच्या सानिध्यात आईच्या आठवणीत हरवलेली होती . तिच्या खांद्यावर हाताचा स्पर्श्य होताच ती शहारली . हात खांद्यावरून झळकाळात ती म्हणाली , " युवराज तुम्ही ...."

" हो मी का ? काय झालं एवढं मला बघून चेहऱ्यावर आठ्या आणायला ." वृजय असं बोलतच एवढ्यात अभिराज आला . 

" वृजय मंत्रीगणांची महालात सभा भरली आहे , पिताश्रीने बोलवले जाऊन यावे . " महाराजांचा आदेश वृजयला सांगितल्यावर तो पुन्हा चोरट्या नजरेने शोभनाकडे बघतं तिथून निघून गेला . शोभनाला वाटले अभिराज आपल्या सोबत काही बोलेल पण अभिराजला जाताना बघून ती म्हणाली ," जेष्ठ , नाराज आहात आमच्यावर ? " 

" नाही , तुमच्यावर नाराज राहणारे आम्ही कोण ? "

" मग असं एकही शब्द न बोलता निघून जाणं ? आणि असं ओढाताण करतं बोलणारा माझ्या जेष्ठांचा स्वभाव नव्हताच ." त्या घरात महाराणी अर्थादेवी महाराज आणि त्यांचे दोन पुत्र सोडले तर अभिमन्यूच्या जाण्याचे दुःख सर्वाच्याच हृदयाला पीळ देणारे होते त्यात अभिराज त्याचे तर खाण्यापिण्यावरून मन उडाले होते त्याचा सखा भाऊ अलवार ह्याच्या राज्यभिषेकावर तो नाराज होता . तो स्वतःशीच पुटपुटायचा राजा असावा तर महान योद्धा अभिमन्युसारखा जनतेच्या मनावर राज करावा त्यानेच . पण खरचं अभिमन्युला एकदाही माझी आठवण नसेल आली का ? शोभना तिला तर ह्या राज्यात काय घडलं ह्याचा काहीच अंदाज नाही . 

" शोभना क्षमा असावी मला गुरुमुनींच्या आश्रमाकडे निघायचे आहे . "

" जेष्ठ मी पण येते तुमच्यासोबत ? "

" मला एकांत हवा आहे शोभना . "

" तुमच्या एकांतात सहभागी व्हायला मी पण येते नाही म्हणू नका जेष्ठ . "

" चला देवी बहिणाबाई , रथावर चालणार की पायदळ ..."

" जेष्ठ रथाची गरज मला नाही .. " अंधाऱ्यारात्री शोभना पहिल्यांदाच महालाच्या बाहेर पडली . बोलता बोलता राजद्वार पार करतं ते बाहेर पडले . 

" जेष्ठ अभिमन्यु महल सोडून गेल्याचे दुःख आहे ना ! "

" हो शोभना तुमचं म्हणं अगदी खरं आहे , जेष्ठ अभिमन्यु असल्यास मन कसे भरून यायचे आणि आता ते निघून गेल्यावर जगणं ही निरर्थक वाटते . "

" हो जेष्ठ कोणी आपल्या जीवनात आल्यावर तो व्यक्तीच सर्व नात्याची उणीव भरून काढतो आणि आपल्याला सोडून गेल्यावर त्याच्या आठवणीत बांधून ठेवतो , नियतीचा हा खेळ किती अघोरी वाटतो नाही ? "

" नियती काय शोभना जेष्ठांनी तर एकदाही मागे वळून बघितलं नाही , मी जेष्ठांना खूप शोधलं पण शेवटी तो महान पराक्रमी योद्धा आहे दुसऱ्याला कसं जिंकूदेणार इथेही . स्वतःला मात्र त्रास करून घेतं तो वणवण भटकत फिरतं असेल ." 

" हो जेष्ठ महल सोडून का गेले सांगू शकता ? "

" सांगतो निवांतपणाने ..."

" शोभना , माणूस कधी कधी जागा असूनही बेध्यान होतो ."

" का जेष्ठ ? तुम्हाला काय म्हणायचं आहे ?"

"आपल्याला जायचे होते गुरुमुनींच्या आश्रमाकडे आणि आलो नगरद्वाराजवळ . " दोघेंही खळखळा हसले आणि नगरद्वार ओलांडत महालाच्या दिशेने निघाले . 

रात्र खूप झाली होती म्हणून शोभना आपल्या शयनकक्षेत गेली . अभिराज आपल्या शयनकक्षेत जाऊन बिछान्यावर पडून विचार करू लागला जेष्ठ कुठे असेल तो कसा असेल त्याने स्वतःला संपवलं तर नसेलना ! साऱ्या विचाराची कालवाकालव डोक्यात असंख्य विचारांची गर्दी करून तो निद्रस्थ झाला . 

सूर्यनारायण आपल्या सोनेरी छटांची झालर घेऊन वसुंधरेच्या उपस्थित अवतरले . आज राजा अलवार चा जन्मदिन सोहळा मोठ्या थाटात पार पडणार होता तोच वृजयला बघण्यासाठी महाराजा प्रताप धनविजय आपल्या मुलीचं स्थळ घेऊन येणारं होते . सर्व महालात आज आनंदाचे चोघडें वाजतं होते . ह्या सर्वापासून अभिराज फार दूर होता तो भल्या पहाटेच आपल्या घोड्याला घेऊन शिकारीसाठी महालाच्या बाहेर पडला . महाराणी अर्थादेवी शोभनाच्या कक्षेत जाऊन म्हणाल्या , " शोभना , हे राजवस्त्र तू आज पासून परिधान करणार हे घे ." राजवस्त्राकडे बघत शोभना महाराणीला म्हणाली ," माते , ह्या राजवस्त्राची मला गरज नाही . "

" पोरी असं म्हणू नये शोभना , आज वृजयचं विवाहस्थळ जुळून आलं की आपण तुझ्यासाठी चांगला वर बघून एकाचं मांडवात दोन्ही विवाह करून घेऊ . माझ्या ह्या आदेशाचं पालन तुला करावंच लागेल तुझ्या भल्यासाठी ."

" ठीक आहे माते तयार होऊन येते मी बाहेर ." 

राज्यवस्त्र पहिल्यांदाच शोभनाने परिधान केले होते ती त्या वस्त्रात अधिकच सुंदर दिसू लागली होती .




शोभना आपल्या कक्षेत एकटीच बसलेली होती वृजय शोभनाच्या कक्षेत जाऊन तिला म्हणाला , " हे सुंदरिके , माझी राणी हो सोन्याने मढविणं तूला आणि ह्या महालाची राणी बनवीन हे वचन देतो . "

" जेष्ठा तुमचं हे वायफळ बोलणं बंद करा जरा ." असं म्हणून ती बाहेर जायला निघाली तेव्हा वृजय म्हणाला , " महाराणी शोभना की जय हो महाराणी शोभना की जय हो . " शोभना मागे न बघता निघून गेली . 

ती महालात युवराज अभिराजला शोधतं होती तो कुठे दिसतो का म्हणून पण तिने खूप शोधल्यावरही तो दिसत नाही . आहे म्हणून ती महलद्वारजवळ जाऊन रंजक नावाच्या सेवकाला म्हणाली , " जेष्ठ अभिराज तुम्हाला महालातून बाहेर जाताना दिसले का ? " 

" हो महादेवी युवराज पहाटेच आपला घोडा घेऊन निघाले . "

" कुठे गेले असतील काही कल्पना आहे का तुम्हाला ? "

" ते कुठे गेले असतील हे नाही सांगू शकतं पण , युवराज इथे आम्रवनात काही दिवसासाठी राह्यला अशवन्ती दासी आल्या होत्या त्यांच्या भेटीला जात होते . तिथे गेले असेल कदाचित तर तुम्ही जाऊन बघू शकता . "

" मी तिकडेच जाते ते तिथे नसतील आणि महालात आले तर तुम्ही त्यांना सांगा मी त्यांच्या शोधार्थ आम्रवनात गेली आहे म्हणून . "

शोभना आम्रवनात जाऊन इकडे तिकडे अभिराजला शोधू लागली पण अभिराज काही तिच्या दृष्टीस पडतं नव्हता . 

तिकडे महाराणा धनविजय विवाहाचा प्रस्ताव स्वीकारून आपल्या राज्याकडे जायला रवाना झाले .

शोभना अभिराजला इकडे तिकडे शोधून वैतागली आता तिची पाऊले आम्रवनाच्याकुटीकडे वळली . तिला कुटीच दार उघडं दिसलं म्हणून तिला वाटलं जेष्ठ इथे दासी सोबत गप्पा करीत बसले असणार . म्हणून तिने कुटीत प्रवेश केला आत शिरल्यावर तिला तिथे कोणी तरी बसलेलं दिसलं . पडदा बाजूला सारताच तिच्या निदर्शनास आलं तिथे वृजय बसलेला होता . ती जवळ जाताच तो जागेवरून उठला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतं म्हणाला , " या महाराणी या .. किती वाट बघायला लावता ह्या भुकेल्या लेकराला . " खांद्यावरचा हात बाजूला सारतं शोभना म्हणाली ," जेष्ठ तुम्ही माझा पिच्छा करणं सोडून द्या अन्यथा मी माते जवळ तुमची तक्रार करेल . " वृजय हसतच म्हणाला ," माझ्या माते जवळ माझी तक्रार घेऊन जाणार हे नको विसरू ती माझी जन्मदात्री माता आहे ती माझ्या हिताचाच सर्वप्रथम विचार करेल . " असं म्हणत त्याने शोभनाला घट्ट पकडून घेतले शोभना आता पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडली होती . 

तिकडे महालात अभिराज गेला आणि आपल्या कक्षेत जाऊन विचार करू लागला ह्या राज्यच काय होईल संपूर्ण राज्यच निस्नाबूत करून ठेवले होते राजा अलवारने . महाराणी अर्थादेवीने तर संपूर्ण महाल डोक्यावर घेतला होता शोभना कुठे दिसतं नाही म्हणून तिचा शोध घेत त्या अभिराजच्या कक्षेत येऊन पोहचल्या तेव्हा कुठे अभिराज भानावर आला . 

" युवराज शोभना कुठे गेली काय ठाव संपूर्ण महालात शोधले पण तिचा कुठेच थांगपता नाही . " 

" काय माते ती असेल इथेच कुठेतरी नगरद्वाराकडे गेली असेल प्रजेच्या भेटीला . "

" पण रात्र होतं आली सांगून जायला पाहिजे होते नाही का मला ? "

" हो माते तुम्ही चिंता मुक्त राहा मी बघते शोभनाला .."

" हो ..." अभिराज महालाच्या द्वारजवळ येताच सेवकाने त्याला सांगितले . शोभना तुमच्या शोधार्थात आम्रवनात गेली आहे . वेळ न दवडता अभिराज आम्रवनाच्या दिशेने निघाले . आम्रवनात काय चालले ह्याची तीळ मात्र कल्पना अभिराजला नव्हती . 

वृजय एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणे शोभनावर तुटून पडला होता . शोभनाचे राजवस्त्र त्याने फाडले . तिला ओरबडून घेतले होते . शोभना त्याला सोडण्याची विनंती करू लागली . " जेष्ठ मला जाऊद्या मला सोडा जेष्ठ हे नका विसरू मी जरी तुमच्या सावत्र आईची मुलगी असली तरी नात्याने तुमची बहीण लागते . " तो मोठ्याने हसतं तिला म्हणाला , " हाहाहाहाहाहाहं माझी बहीण लागते म्हणे हे नाते मी नाही जपत , तुला आधीच सांगितलं होत माझी महाराणी हो सोन्याने मढवीन ह्या सुंदर राज्याची महाराणी बनवीन पण नाही तुला अमान्य होते . आता भोग सजा माझी काय मी कुणाचीच राणी नाही होऊन देणार तुला . " वृजय तिला सोडणार नाहीच होता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या . तीच लक्ष अचानक भिंतीवर टांगलेल्या तालवारीकडे गेले . जीवाचा आटापिटा करीत तिने वृजयला प्रतिकार करतं हाताचा चावा घेतला आणि भिंतीकडे धाव घेतली वृजय जमिनीवरून उठतं पर्यन्त तिने तलवार काढली . तोच वृजय तिच्या जवळ येताना बघून ती म्हणाली , " हे कपटी नीच पुरुषा दूर हो माझ्यापासून . "

" ती तलवार फेकून दे शोभना तू मला नाही मारू शकतं तलवार फेक नाहीतर खूप वाईट हाल करेल मी तुझा . " आम्रकूटीच्या बाहेर अभिराज परिसरात शोभनाला शोधतं होता . वृजयला तिच्या अगदी जवळ आलेला बघून ती किंचाळलीच तिच्या त्याच आवाजाने अभिराजने आम्रकूटीकडे धाव घेतली तो द्वाराजवळ जातंच तर , शोभनाने वृजयच्या पोटात हातात असलेली तलवार खुपसली . त्याच्या आक्रोशाने आम्रवन दणकूनउठले . अभिराज समोरच दृश्य बघून जागेवरचं थांबला . शोभना मात्र अश्रू गाळत जागेवरच उभी होती . अभिराजनेच शांततेचा भंग केला . " शोभना काय केले हे तू ?? "

त्याच्या नजरेत एकीकडे भावाचा मृत्यू देह तर दुसरीकडे उभी असलेली त्याची सख्खी बहीण नसून त्याने मनातून मानलेली बहीण दिसतं होती . त्याने कुणाला दोषी ठरवावे आणि कुणाला गुन्हेगार ?? सत्याची पाठराखण करणारा अभिराज होता . त्याने स्वतःच्या खांद्यावरची शाल काढून शोभनाला गुंढाळून दिली . शोभनाचा हात हाती घेऊन तो म्हणाला ," शोभना मी कधीच तुला काही मागितलं नाही आज मला एक वचन दे ! तू कुणाजवळ ही जेष्ठाचा मृत्यू तुझ्या हातून झाला हे सांगणार नाही . " शोभनाने मानेनं होकार देतं अभिराजला आलिंगन देतं घट्ट पकडले . " जेष्ठ मला खूप भीती वाटतं आहे . " तिला कुरवाळीतच अभिराज म्हणाला , " भिऊ नको मी असल्यावर तुला काहीही होऊ देणार नाही . " 

अमावस्येची रात्र होती किर्रर्र अंधार दोघेही महाला कडे निघाली . काहीच न बोलता आपल्या कक्षेत गेले . शोभना कपडे बदलवून बाहेर आली ती महाराणी अर्थदेवीच्या कक्षेकडे जात होती तोच तिला अभिराज त्यांचा सोबत बोलताना दिसला . " माते शोभना नगरद्वाराकडे जाऊन प्रजेचे प्रश्न जाणून घेतं होती मी तिला तिथून घेऊन आलो तिला सांगितलं तुम्ही किती चिंतेत होतात ते आता ती तिचा कक्षेत विश्राम घेतं आहे . " अभिराजचे ते बोलणे ऐकून ती आपल्या कक्षेकडे जायला निघाली . अभिराज मातेला म्हणतं होता , " माते उद्या मी जेष्ठ अभिमन्यूला शोधायला आठवड्या भरासाठी बाहेर पडणार आहे . सोबत शोभनाला घेऊन जाणार आहे . " तेव्हा शोभना ही जाताना त्याचे बोले ऐकून थांबली . महाराणी अर्थादेवीने त्याला जाण्यास आज्ञा दिली . " जावे युवराज पण शोभनाला सांभाळ . " त्यावर अभिराज खुश होऊन म्हणाला " हो माते तुम्ही निश्चित राहा . " रात्री त्याने उदयाला इथून निघायची तयारी करून ठेव म्हणून शोभनाला सांगितली . सकाळपर्यंत वृजयच्या मरणाचा सुगावा कुणालाच लागला नाही महाराणी अर्थादेवीला वाटले तो रंगभवनात गुंतलेला असेल . महाराज आणि महाराणीच्या निरोप घेऊन शोभना आणि अभिराज महालाच्या बाहेर पडले राजा अभिमन्युच्या शोधात .

_________________________________________________________________________________________________