दीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक होता.
Full Novel
निर्भया -( part -1 )
दीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. ...अजून वाचा
निर्भया - part 2
मी माझ्या जबाबदा-या पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचारही करू शकत नाही. इतके दिवस तू माझ्यासाठी थांबावंस असं मी म्हणणार नाही. मार्ग तुला मोकळा आहे. दीपाने स्पष्ट शब्दात राकेशला उत्तर दिलं. ...अजून वाचा
निर्भया- part 3.
जे काही घडलं त्यात तुझी काहीही चूक नाही. स्वतःला दोष देऊ नको. काळ पुढे जाईल तसा तसा तुला मिळत जाईल. फक्त हे काही दिवस स्वतःला सांभाळ. आईच्या या बोलण्यातला आशावाद दीपाला जगण्याचं बळ देऊन गेला. ...अजून वाचा
निर्भया - part- 4.
तीन मित्र पार्टीसाठी एकत्र येतील, तेव्हा दोन पेग पोटात गेले, की मर्मबंधातील गुपित ओठावर यायला वेळ लागणार नाही, याची खात्री होती. ...अजून वाचा
निर्भया- part -5.
सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा मोठा भाऊ असतानाही महेश वाईट मार्गाला लागला, याचं श्रेय या त्याच्या मित्रांनाच जातं. दीपाच्या विचार आला. ...अजून वाचा
निर्भया - part- 6
आई-बाबांचं निमित्त करून राकेश स्वतःचे विचार सांगतोय, हे दीपाच्या लक्षात आलं होतं. ...अजून वाचा
निर्भया -८
निर्भया- ८ त्यादिवशी सकाळी इन्स्पेक्टर सुशांत पाटील खूप उशिरा उठले. कालचा पूर्ण दिवस धावपळीत गेला होता. उत्तर खंडणी आणि खुनासाठी पोलिसांना हवा असलेला एक सराईत गुंड मुंबईत आला होता आणि इथल्या एका झोपडपट्टीत लपला होता. झोपड्यांचं गच्च जाळं असणा-या त्या विभागात त्याला शोधणं जेवढं जिकीरीचं होतं, तेवढीच ती जिवावरची जोखीम होती. तिथे नेहमीच अनेक अट्टल गुन्हेगारांना आसरा दिला जात असे. त्यांना शोधायला आलेल्या पोलिसांवर हल्ले झाल्याच्याही अनेक घटना घडल्या होत्या. पण त्या खतरनाक एरियात बेडरपणे जाऊन सुशांतने ती मोहीम यशस्वी करून दाखवली होती. खुन्याला बेड्या घालून ...अजून वाचा
निर्भया - ९
निर्भया- ९ निर्मलाबाईंनी- दीपाच्या आईने दरवाजा उघडला. समोर पोलीसांना पाहून त्या थोड्या घाबरल्याच! झालं? तुम्ही- कशासाठी आला आहात साहेब?" तिने चाचरत विचारलं."मी इन्स्पेक्टर सुशांत पाटील. दीपा इथेच रहाते नं? तिला जरा बोलावून घ्या.""काय झालंय साहेब?" निर्मलाताईंनी विचारलं. त्यांचा आवाज थरथरत होता." एका केसच्या संदर्भात तिच्याशी बोलायचं आहे. " सुशांत म्हणाले. त्यांच्या स्वरात पोलिसी जरब नव्हती , त्यामुळे निर्मलाताईंची भीती थोडी कमी झाली. " ती झोपली आहे." त्या म्हणाल्या. " इतक्या उशिरा पर्यंत?" इन्स्पेक्टर आश्चर्याने ...अजून वाचा
निर्भया - १०
निर्भया - १० त्या संध्याकाळी लॅबचे रिपोर्ट. आले. ग्लासमधील सरबतात विष होतं. आणि ग्लासवर आणि दीपा दोघांच्याही बोटांचे ठसे मिळाले होते. दीपाचे ठसे ग्लासवर मिळाले, म्हणजे तिच्यावरचा माझा संशय खरा ठरला. " मानेंच्या स्वरात त्यांचा संशय खरा ठरल्याचा आनंद होता."तिने स्वतःच मला सागितलं, की निघताना तिने सरबत बनवून दिलं होतं. त्यामुळे तिच्या बोटांचे ठसे ग्लासवर असणं स्वाभाविक आहे, नाही का माने?" सुशांत म्हणाले. आज तिला पाहिल्यापासून तिचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून ...अजून वाचा
निर्भया - ११
निर्भया- ११- -------------- राकेशच्या फ्लॅटकडे लक्ष होतं, हे लक्षात आल्यावर सुशांतला झालेला आनंद, त्यांच्या पुढच्या उत्तराने विरून गेला. "दीपा गेल्यावर कोणी आलं होतं का? " या त्यांच्या प्रश्नाला मराठेंचं उत्तर होतं," कोणी आलं असेल तरी मला माहीत नाही. कारण मी पाच-दहा मिनिटातच पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो आणि अर्ध्या तासाने परत आलो." मराठे म्हणाले. " बरोबर आहे! दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं होतं, त्यामुळे कुठे जाता ...अजून वाचा
निर्भया - १२
निर्भया - १२ - "जेव्हा राकेशने नयनाला बघून लग्नाला होकार दिला तेव्हा आम्हाला वाटलं की आता सुरळीत होईल. पण आता कळलं की, ऑफिसच्या निमित्ताने घरी यायला जमणार नाही, असं आमहाला सांगून तो आमच्या दुसर्या घरात अजूनही दीपाला भेटत होता. शेवटी तिच्या प्रेमानेच माझ्या मुलाचा जीव घेतला." राकेशचे आई-वडील आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सुशांतला न लपवता सांगत होते होते, राकेशच्या मनावर ताण वाढायला या दोघांचे विचारच कारणीभूत असावेत. दीपाच्या मनाचा विचार यांनी केला नाहीच; पण सामाजिक प्रतिष्ठा जपतांना ...अजून वाचा
निर्भया - part 13
निर्भया- १३ सुशांतने दीपाला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी येणार असल्याचं सांगितलं. ते तिच्या घरी गेले, तेव्हा ती त्याची बघत होती. गेल्या काही दिवसांत तिने सुशांतच्या स्वभावातले अनेक पैलू पाहिले होते. त्यांचा धाडसी स्वभाव, बुद्धिमत्ता यांची स्तुती नेहमीच वर्तमानपत्रात वाचायला मिळत होती पण त्याचबरोबर तो किती सहृदय आहे हे तिने स्वतः अनुभवलं होतं. तिला तिच्या दु:स्वप्नातून बाहेर काढण्यासाठी त्याने किती प्रयत्न केले होते, हे ती विसरू शकत. नव्हती. राकेशच्या आई - वडिलांकडून नक्कीच तिच्याविषयी सर्व माहिती त्याला मिळाली ...अजून वाचा
निर्भया - 14
दुस-या दिवशी सुशांतचे आई - बाबा ठरल्याप्रमाणे दीपाच्या घरी सुंदर आणि सोज्वळ दीपा त्यांना पाहिल्याबरोबर पसंत पडली. महिन्याभरात दोघांचं लग्नही झालं. सुशांतच्या सहवासात हळूहळू ती पूर्वीच्या कटु स्मृती अाणि दुःख विसरून गेली आणि नव्या जोमाने आयुष्य जगू लागली. शिवाय नाशिकमध्ये तिच्याविषयी माहिती असणारे परिचित लोक आजूबाजूला नसल्यामुळे तिला नको असलेल्या नजरांचा सामना करावा लागत नव्हता. नवीन वातावरणात ती आत्मविश्वासाने वावरू लागली. पण सहा महिन्यातच सुशांतची बदली परत मुंबईला झाली. शेतीकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे सुशांतच्या आई-बाबांना गावी रहाणे भाग होते. सुशांतच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. ब-याच वेळा ते रात्री उशीरा घरी येत. घरी दिवसभर एकटे रहाण्यापेक्षा दीपाने परत हाॅस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. ...अजून वाचा
निर्भया - Part 15
निर्भया- १५. आईच्या विरोधाकडे लक्ष न देता सुशांतने मूल दत्तक घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. त्याला जो दोन मुलगा-- सिद्धेश आवडला होता त्याच्याविषयी बोलताना संचालक म्हणाले, "त्याचे आई- वडील गेल्या वर्षी झालेल्या भूकंपात दगावले. याची एक पाच वर्षांची बहीण- शिल्पा, इथेच आहे आहे. जेव्हा भावंडं आमच्याकडे असतात, तेव्हा दोघांनाही एकाच घरात दत्तक द्यावे असा अामचा आग्रह असतो कारण त्यामुळे त्यांच्यातले भावबंध कायम राहतात; पण जर तुम्हाला एकच मूल पाहिजे असेल तर तुम्ही इतर मुलांमधून निवडू शकता." पण दीपाला गोबऱ्या गालांची आणि मोठ्या डोळ्यांची गोंडस शिल्पा खूप आवडली होती. "आपण ...अजून वाचा
निर्भया - 16
निर्भया - १६ दीपाची मानसिक अवस्था इतकी वाईट झाली होती की ती सोसायटीच्या कार्यक्रमालाही गेली नाही. तिचं डोकं झालं होतं. पंधरा वर्षांपूर्वीच्या- आठवणी तिच्याभोवती फेर धरून विकट हास्य करत होत्या. तिला बरं वाटत नाही, हे पाहून सुशांतच्या आई-बाबांनीही कार्यक्रमाला जाण्याचा बेत रद्द केला. सासू- सासऱ्यांना कसंबसं जेवायला वाढून ती बेडरूममध्ये जाऊन झोपली. पण जुन्या आठवणी पाठ सोडत नव्हत्या. पडल्या- पडल्या तिला झोप लागली. तिच्या मनातले विचार स्वप्नांमध्ये मूर्तरूप घेऊ लागले. स्वप्नात ती जीव तोडून धावत होती. पण दुस-याच क्षणी तिला स्वतःच्या जागी शिल्पा दिसू लागली. तिला नराधमांनी घेरलं होतं आणि ती दीपाला जिवच्या आकांताने हाका मारत ...अजून वाचा
निर्भया - १७
- निर्भया - १७ - दीपाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. शिल्पाची वाट पहात उशीला टेकून बसली. तिच्या मस्तकातील विचारचक्र चालूच होतं. रात्रीचा एक वाजला तरीही ईशा आली नव्हती. मोबाइल वाजू लागला. दीपाने पाहिलं; सुशांतचा फोन होता. "हॅलो! सुशांत! शिल्पा अजून घरी आली नाही. यासाठीच मी तिला रात्री बाहेर पाठवायला तयार नव्हते. पण तुम्ही कोणीच माझं ऐकायला तयार नव्हता." त्याला बोलायची संधी न देता दीपा बोलत होती. तिचा आवाज थरथरत होता. "मी ते सांगायलाच फोन केलाय! शिल्पाला आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन माने व्हॅनमधून येतायत! तू काळजी करत असशील हे मला माहीत ...अजून वाचा
निर्भया - part -18
निर्भया - १८. दीपाला कळून चुकलं, की शिल्पाला समजावण्याच्या भरात तिला कळू नये, अशी गोष्ट ती बोलून होती. जर शिल्पाला अर्धवट सत्य समजलं तर ती गैरसमज करून घेईल; "पण शिल्पा अजून लहान आहे. तिला या सगळ्या गुंतागुंतीचं आकलन होईल का? तसं असलं तरी आज अशी वेळ आली आहे की, तिला सगळं समजायलाच हवं. मला सुद्धा माझी बाजू मांडायला परत कधी संधी मिळेल की नाही ; हे सांगता येत नाही." दीपाचं हेलकावे घेत होतं.शेवटी तिने शिल्पाला सगळं सांगायचा निर्णय घेतला. ...अजून वाचा
निर्भया - १९
निर्भया- १९ - शिल्पा तिच्या खोलीत जाऊन काॅलेजला जाण्याची तयारी करतेय याची खात्री करून घेऊन सुशांत बोलू "अशा गोष्टी मुलांकडे बोलू नयेत हे तुझंच मत आहे ; मग आज शिल्पाला सर्व का सांगत होतीस? ती लहान आहे अजून! " " माझा नाइलाज झाला! तुमची डायरी चुकून तिच्या हातात पडली, शिल्पा वाचलेल्या गोष्टींविषयी उलटसुलट विचार करत राहिली असती. अर्धवट ज्ञान नेहमी नुकसान करतं! म्हणून मी तिला सगळं सांगून टाकलं. चांगलं - वाईट ठरवण्याइतकी ती नक्कीच ...अजून वाचा