ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड

(39)
  • 98.7k
  • 3
  • 56.2k

या कथेतील सर्व पात्रे ठिकाणे आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कथेमधील पात्र प्रसंग घटना यांच्याशी काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड.......... प्रकरण एक आपल्या ऑफिस चे दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृत धाडकन दार उघडून आत आला. “ कुक्कुटपाल कंपनी चा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली.! ” एका दमात त्याने सांगून टाकले. स

Full Novel

1

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 1

या कथेतील सर्व पात्रे ठिकाणे आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा अन्य कोणत्याही कथेमधील पात्र प्रसंग घटना काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड.......... प्रकरण एक आपल्या ऑफिस चे दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृत धाडकन दार उघडून आत आला. “ कुक्कुटपाल कंपनी चा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली.! ” एका दमात त्याने सांगून टाकले. सुकृत हा एक अत्यंत धसमुसळ्या स्वभावाचा, पुस्तकी किडा पण व्यवहार शून्य असा माणूस होता.पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस चा किरकोळ कार्यभार तो ...अजून वाचा

2

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 2

प्रकरण दोन. ओजस,पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस मधे आला.आज जरा निवांत वाटत होता.अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीवर , पाणिनी पटवर्धन समोर खास त्याच्या पद्धतीने बसला. आपले दोन्ही पाय गुढग्यापाशी खुर्चीच्या उजव्या बाजूच्या हातावर ठेऊन आणि पाठ खुर्चीच्या डाव्या बाजूच्या हातावर टेकवून. “ पाणिनी अचानक तुला कुक्कुटपाल कंपनी मधे कसा काय रस निर्माण झाला ?” “ मला चिकन खायचा मोह झाला त्यामुळे असेल बहुतेक.” पाणिनी ने गुगली टाकला.त्या दोघात कायमच असे वाक् युद्ध चालायचे. “ ती कुक्कुटपाल कंपनी म्हणजे जादूचीच कंपनी वाटते मला.मधेच ती जिवंत होते,मधेच गायब होते.” “ म्हणजे? ” पाणिनी ने गोंधळून विचारले “ म्हणजे कित्येक दिवस ती प्रसिद्धीच्या झोतात ...अजून वाचा

3

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 3

प्रकरण तीन “ पद्मनाभ पुंड ला भेटायचंय ” पाणिनी पटवर्धन दारावरच्या रखवालदाराला म्हणाला. “ तुमचं काय नाव? ” “ ” “ तुम्ही येणार होतात हे त्यांना माहीत होते? ” “ नाही ” “ थांबा मग , विचारतो मी.” तो उठून फोन पर्यंत पोचला आणि अगदी हळू आवाजात काहीतरी बोलला फोन मधे तोंड घालून.काय बोलला हे कळायला पाणिनी ला काही मार्ग नव्हता. “ पद्मनाभ घरी नाहीयेत अत्ता.आणि रात्री उशिरा येतील घरी.” “ बायको असेलच ना त्यांची घरी, काही हरकत नाही.भेटतो मी तिला.” सहज बोलल्या सारखा पाणिनी म्हणाला. रखवालदार पुन्हा फोन मधे तोंड घालून बोलला.आणि पाणिनी ला म्हणाला, “ त्यांच्या लक्षात ...अजून वाचा

4

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 4

प्रकरण चार बाहेर आल्यावर पाणिनी ने सौम्या ला फोन लावला. “ जेवलीस का सौम्या ?” “ नाही,नाही.तुम्ही मला थांबायला होत ना?” “ मी जेवायलाच गेलो होतो.” पाणिनीम्हणाला. “ हे बर आहे तुमचं.मला थांबायला........” “ आणि जेवणा ऐवजी खून सामोरा आला.”पाणिनीम्हणाला. “ कोणाचा खून झाला?” “ पद्मनाभ पुंड ”“ अरे देवा ! ” सौम्याउद्गारली.“ असं कसं काय झालं पण? ” “ काय माहिती ? झालं खर ” पाणिनीम्हणाला “ आपलं अशील कोण आहे? ” “ कोणीच नाही. अशिला शिवाय आपण खुनाचा खटला घेऊ शकत नाही का? ” पाणिनीने विचारले. “ बहुतेक नाही घेऊ शकत.” सौम्याउत्तरली. “ कनकला वर्तमान पत्र वाल्यांकडे ...अजून वाचा

5

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 5

प्रकरण पाच. काया प्रजापति पाणिनी पटवर्धन ला घेऊन एका इमारतीच्या पार्किंग जवळ आली. “ इथेच असणार ”ती म्हणाली. “ ? वडील ? ” “ नाही , माझ्या वडलांचा उजवा हात,जतीन भारद्वाज ” “ त्याला खुना बद्दल माहिती आहे? ” पाणिनी ने विचारले “ हो.” “ तू अत्ता कुठे चालल्येस हे पण माहिती आहे? ” “ कार मधे टाकी भरून पेट्रोल भरायचं आणि वडील किंवा मी सांगू तिकडे जायचं या व्यतिरिक्त त्याला काही माहिती नसते.” कायाने उत्तर दिले. तेवढ्यात एक गाडी रोरावत आली आणि त्यांच्या जवळ येऊ लागली.आतील माणसाने गाडी पार्कींग चालवणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिली आणि कुपन घेतले. “आलाच जतीन ...अजून वाचा

6

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 6

प्रकरण सहा. “ खायला घालण्याचा विचार आहे का मला ? ” पाणिनी ने विचारले. “ भूक लागली? ” तिने चालवताना विचारले. “ प्रचंड ” पाणिनी म्हणाला “ आपण वाटेतच कुठेतरी खाऊ रस्त्यात.वडलाना शोधायची घाई आहे.” ती म्हणाली “ त्यासाठी आधीच खूप उशीर झालाय , पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले असेल.” पाणिनी म्हणाला “ मला पण तीच शक्यता वाटत्ये.” “ आपण त्या हॉटेलात पोचायच्या आधी किती वेळ आधी तुझे वडील तिथून निघाले असतील असं तुला वाटतंय?”पाणिनी ने विचारले. “ मला नाही येणार सांगता.” काया म्हणाली. “ मला आश्चर्य वाटतंय ” पाणिनी म्हणाला “ आपण ज्या मोटेल मधे वडलाना शोधलं, तिथून ...अजून वाचा

7

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 7

प्रकरण सात पाणिनीपटवर्धन आपल्या ऑफिस ला आला आणि आपल्या जवळच्या किल्लीने दाराचे लॅच उघडले.आत पाहतो तर सौम्या टेबला वर ठेऊन, हात उशाशी घेऊन चक्क झोपलेली दिसली. “ काय ग अजून घरी नाही गेलीस? ” पाणिनी ने विचारले. “ तुम्ही काया बरोबर गेलात तिथे काय झालं त्याची उत्सुकता होती त्यामुळे थांबले इथेच ” सौम्याम्हणाली. “ जेवण तरी झालाय का तुझं?” “ नाही , मी बाहेरून सॅण्डविच मागवले फक्त.” “ तू आता तातडीने घरी जा.इथून पुढे मी तुला कायम माझ्याच बरोबर नेत जाईन म्हणजे तुझ्या खाण्या पिण्याची अळंटळं होणार नाही”पाणिनी म्हणाला नंतर पाणिनी ने तिला सर्व हकीगत कथन केली.नंतर पाणिनी तिला ...अजून वाचा

8

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 8

प्रकरण ८....सौम्याआणि पाणिनी, कोर्नीस होटेल च्या स्वागत कशात उभे होते.वयाने थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला एक माणूस तिथे होता. “ शिल्लक नाही.” तो म्हणाला.“ गर्ग नावाच्या माणसाचे इथे बुकिंग आहे? ” पाणिनीने विचारले.“ आहे.खोली नंबर सहाशे अठरा . काही निरोप आहे? ” त्याने विचारले.“ त्याला फोन करून सांगा मी इथे आलोय म्हणून.”पाणिनी म्हणाला.“ तुम्ही त्याला अपेक्षित आहात का? ”“ तसचं नाही म्हणता येणार.”पाणिनी म्हणाला.“ खूप उशीर झालाय अत्ता पण , एखाद्याला भेटायच्या दृष्टीने.” तो म्हणाला.“ माझ्या हातावर घड्याळ आहे. ” पाणिनी म्हणाला.नाईलाजाने त्याने इंटरकॉम वर ६१८ नंबर ला फोन लावला. “ एक गृहस्थ तुम्हाला भेटायला आलेत.त्यांच्या बरोबर एक बाई आहेत.” ...अजून वाचा

9

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 9

प्रकरण 9 पाणिनी व सौम्या बाहेर पडले. “ मी तुला तुझ्या घरी सोडतोय.आणि तू निमूटपणे झोपणार आहेस.”पाणिनी म्हणाला. “ करू नका सर. मला तो गर्ग आवडलाय.त्याचं बोलणं ऐकत रहावं अस होत. तुम्ही ती पत्र कधी वाचणार आहात ?” सौम्याने विचारलं “ उद्या ऑफिस ला आल्यावर, अर्थात ! ” “ छे ! एवढा धीर कुणाला आहे इथे? आपण आपल्या गाडीत बसून गाडीतील दिव्यातच वाचून काढू.” सौम्याम्हणाली. त्या दोघांनी ती सर्व पत्रे वाचून काढली.साहसचे आडनाव बेलवलकर होते., सात आठ पत्र होती.मागच्या दीड-दोन महिन्यातच हा पत्र व्यवहार झाला होता.प्रत्येक पत्रात दोघांतील जवळीक वाढत गेल्याचे लक्षात येत होते. “ चांगला वाटतोय पोरगा.” सौम्याम्हणाली. ...अजून वाचा

10

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 10

प्रकरण १० “सौम्या , प्रणव पालेकर नावाच्या माणसाला शोधायला आपण अत्ता बाहेर पडलोय.”पाणिनी म्हणाला. “ कसा आहे हा माणूस?” विचारणा केली. “ भयंकर हट्टी, बैला सारखे डोके , अशी मूर्ती डोळ्यासमोर येते.मी बघितलेलं नाही त्याला अजून ”पाणिनी म्हणाला. थोड्याच वेळात ते दोघे पालेकर च्या दारात उभे होते. “ मला पालेकर ला भेटायचं होत. ”पाणिनी म्हणाला. “ तुमच्या समोर उभा आहे त्या देहाला तेच नाव आहे.”पालेकर म्हणाला. रुंद छातीचा ,भडक कपड्यातला माणूस त्याच्या समोर उभा होता. “ कोण तुम्ही? ” “ या देहाला पाणिनी पटवर्धन म्हणतात , लॉयर ! ”पाणिनीने त्याच्याच भाषेत उत्तर दिले. पाणिनी पटवर्धन हे नाव ऐकताच त्याच्या ...अजून वाचा

11

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 11

प्रकरण ११ “ मॅडम खात्री ने सांगतो , कोणीही आपला पाठलाग करत नाहीये. कुठे घेऊ गाडी?” टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले. “ मेन स्टॅण्ड ” त्याने तिथे गाडी थांबवली आणि आपले कार्ड तिला दिल. “ तुम्हाला पुन्हा कुठे जायचे असेल तर मला फोन करा. पाठलाग होऊ न देता मी तुम्हाला हवं तिथे नेईन.” “ आभार.” सौम्या म्हणाली त्याचं बिल दिल आणखी वर बक्षिशी दिली.समोरच्या फोन बुथ जवळ तिला काया उभी असलेली दिसली. “ पाणिनी पटवर्धन सरानी मला खास सूचना देऊनच तुझ्या कडे पाठवलंय ” सौम्या तिला म्हणाली. “ आणि तू अगदी तसेच करायचे आहेस.” कायाहसली. “ मी स्वतः त्यांना वकील ...अजून वाचा

12

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 12

प्रकरण १२ पोलीस चौकीत आल्यावर सौम्याने पुन्हा निक्षून सांगितलं , “ मला फोन करायचाय.” त्या पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे ढुंकूनही नाही. “ आम्ही तुझ्यावर आरोप पत्र दाखल केलं की मग तुला फोन करता येईल तुझ्या वकिलाला.” “ माझा हक्क तुम्ही हिराऊन घेऊ शकत नाही.” सौम्यापुन्हा म्हणाली. “ पुन्हा तेच तेच बोलून काही उपयोग नाही होणार ” पोलीस म्हणाला. “ मी माझ्या हक्काची मागणी केली आहे हे तुम्ही ऐकलेच आहे.या संदर्भात कायदा आहे.” “ तुम्ही इन्स्पेक्टरला सांगा हे.” “ ठीक आहे सांगते मी त्यांना.” सौम्याम्हणाली. “ साहेब मोकळे झाल्यावर भेटतील तुम्हाला.” “ माझे वकील आणि मालक दोन्ही पाणिनी पटवर्धन आहेत.आणि त्यांना ...अजून वाचा

13

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 13

प्रकरण १३ पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसात काया बसली होती. “ किती वेळ हातात आहे आपल्या? ” तिने विचारले. “ सांगता येणार.,तुझ्या वडलाना अटक झाल्ये का आणि झाली असेल तर त्यांनी काय सांगितलंय पोलिसांना यावर ते अवलंबून आहे.”पाणिनी म्हणाला. “ मला नाही वाटत त्यांना अटक करण्या एवढे त्यांचेकडे काही आहे म्हणून ” काया म्हणाली. “ मला अत्ता सर्व काही सांगून टाक गोल गप्पा मारण्य पेक्षा.”पाणिनी म्हणाला. “ मी सर्व सांगितलं तर तुम्ही आमची वकिली घेणार नाही. ”काया म्हणाली “ मूर्खासारखे बोलू नको. या घडीला मी मागे घेऊ शकत नाही. तू स्वत: बरोबर सौम्या ला सुद्धा यात गुंतवल आहेस.” पाणिनी म्हणाला. ...अजून वाचा

14

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 14

प्रकरण १४ न्यायमूर्ती नारवेकर यांच्या कोर्टात रेयांश आणि काया प्रजापति यांचे विरुद्ध प्राथमिक सुनावणी साठी प्रकरण सादर झाले आणि गर्दीने फुलून गेले.याचे कारण,सरकार पक्षा तर्फे ज्येष्ठ सरकारी वकील हेरंब खांडेकर जातीने उपस्थित होते आणि आरोपीचे वकील पत्र पाणिनी पटवर्धन ने घेतले होते.बरेच दिवसा नंतर पाणिनी पटवर्धन आणि खांडेकर यांचे वाक् तांडव, परस्परांवरील कुरघोड्या जनतेला अनुभवायला मिळणार होत्या.मोहक पितांबरे, हेरंब खांडेकर यांचा पट्ट शिष्य हा सरकार पक्षातर्फे खटला चालवणार होता.“ न्यायमूर्ती महाराज, आशा प्रकारच्या प्राथमिक सुनावणी मधे कोणतेही प्रस्तावनेचे भाषण करणे प्रथेस धरून नाही पण तरीही मला ते करावे लगत आहे याचे कारण असे की आम्ही सादर करणार असलेले पुरावे ...अजून वाचा

15

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 15

प्रकरण १५ “डॉक्टर तुम्हाला मी एक फोटो दाखवतो तुम्हाला ओळखता येतो का सांगा.” मोहक ने विचारले आणि पद्मनाभ पुंड फोटो दाखवला. “ ज्याचे मी शव विच्छेदन केले त्याचा हा फोटो आहे.” निनाद नानिवडेकर म्हणाले. “ प्रथम केव्हा पहिले तुम्ही शव?” मोहक ने विचारले “ पोलिसांनी जेव्हा त्याचे प्रेत बोटीवर पहिले तेव्हाच मला पाचारण करण्यात आले.” “ नंतर दुसऱ्यांदा कधी ?” मोहक ने विचारले. “ रविवारी सकाळी शव विच्छेदनाचे वेळी.” डॉक्टर निनाद नानिवडेकर म्हणाले. “ मृत्यूचे कारण काय होते?” “ डोक्याच्या मागे जोरात फटका बसल्यामुळे कवटीला तडा गेला आणि अंतर्गत रक्त स्त्राव झाला.” डॉक्टर म्हणाले. “ हे मी तुम्हाला अत्यंत ...अजून वाचा

16

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 16

प्रकरण १६ पटवर्धन च्या ऑफिसात कनक ओजस बसला होता. “ पाणिनी, तुला त्या वाकलेल्या मेणबत्तीचा सुचलेला मुद्दा माझ्या बिलकुल आला नाही. काय भानगड आहे ही?” “ न्यायाधीशांच्या बरोब्बर ध्यानात आला तो म्हणून बर झालं. सोपी गोष्ट आहे समजायला कनक, साधारण ९९% खून हे जमिनीवरच होतात त्यामुळे पोलिसांना समुद्रावरील वातावरणाचा , तिथे घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज नसतो. एखाद्या दर्यावर्दी माणसाला समुद्र विषयी काही प्रश्न विचारून बघ तो प्रथम भरती आणि ओहोटी याच विषयावर येईल.” “ त्या रक्ताच्या ठशा चा आणि मेणबत्तीचा काही संबंध आहे का? कोणी केले असावेत ते ठसे? काया ने? ” सौम्या ने विचारले. “ ती म्हणतेच आहे की ...अजून वाचा

17

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 17

प्रकरण १७ पाणिनी ने प्रकाशाचा झोत गोल फिरवून चित्रांगद पागनीस ला आपण कुठे आहोत याचा इशारा केला. त्या नंतर भरातच चित्रांगद पागनीस त्याची बोट घेऊन आला.पाणिनी आणि सौम्या मोठ्या बोटीतून त्याच्या मोटार बोटीत बसले. “ पटकन चालव.आपल्याला एका रोइंग बोटीचा पाठलाग करायचाय.तू आलास त्याचं दिशेनी ती गेली.”पाणिनी म्हणाला. “ रोइंग बोट? मी तर कुणालाच भाड्याने दिली नाहीये.” “ ते काहीही असो.अत्ता फक्त आपल्याला त्याला गाठायचं आहे.”पाणिनी म्हणाला. “ हे काम सोप नाहीये. पाण्यावर धुकं पसरलय, टॉर्च लावला तरी तो आपल्याला दिसणार नाही.कारण ठराविक अंतराच्या पुढे झोत जाणारच नाही.” बराच वेळ त्यांनी शोधाशोध केली.आता त्याच्या वल्हवण्याचा आवाज पण येत नव्हता. ...अजून वाचा

18

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 18 - अंतिम भाग

प्रकरण १८ न्यायाधीश नारवेकरआपल्या आसनावर बसले. “ दोन्ही बाजूचे वकील हजर आहेत? ” त्यांनी विचारले.“ पटवर्धनआज येणार नाहीत त्यांनी त्यांचे कामकाज पुढे चालवण्याची सूचना दिली आहे. ”सुकृतम्हणाला.“ मी आधीच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, भरती ओहोटीच्या अधिकृत वेळापत्रकाचा विचार कोर्ट करेलच पण प्रत्येक ठिकाणी अगदी त्याचं वेळेनुसार भरती ओहोटी येत नाही, एखाद्या विशिष्ट जागी पाण्याची खोली किती आहे , खाडीचे मुख किती रुंद आहे इत्यादी बाबींचा परिणाम अचूक वेळ काढण्यासाठी विचारात घ्यावा लागतो.प्रजापतिची बोट ज्या विशिष्ट ठिकाणी नांगरली होती त्या ठिकाणी भरती-ओहोटी च्या वेळ आणि अधिकृत वेळापत्रका प्रमाणे असणारी वेळ यात किती तफावत आहे याचा पुरावा समोर आणणे सरकारी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय