श्रावणात दाजी प्रभू मिराश्यांची वरसल सुरू झाली आणि ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप लागलं. दत्तंभट सालाबाद प्रमाणे सकाळीच पूजा साहित्य घेवून एकादष्णी करायला देवळात गेले. बळाणीवर सामान ठेवून गाभाऱ्या बाहेरची कळशी घेऊन विहीरीवर गेले. विहीर म्हणजे छोटेखानी तळंच होतं. सहा हात औरस चौरस घडीव चिऱ्याच चौकोनी बांधकाम केलेली ती विहीर कायम तोंडोतोंड भरलेले असायची. पावसाळी उमळं फुटल्यावर अगदी माघापर्यंन्त उगवतच्या बाजूने छिनेलानी बांधलेल्या हातभर रुंद आणि ढोपरभर खोल पाटातून व्हावटीचं पाणी सदू लिंगायताच्या गोठ्यामागच्या व्हाळीत जात असे. पाऊसकाळात दर्शनाला येणारी माणसं त्या पाटातच हातपाय धुवून मग देवदर्शनाला जात असत. दत्तंभटाने हातपाय धुवून कळशी घेवून देवळात गेले. मुकटा नेसून पंचाचा पिळा बळाणीवर ठेवून पूजा साहित्य घेवून ते गर्भागाराच्या चौकात गेले. गाभाऱ्या समोरच्या नंदीवर कळशीतलं पाणी ओतून मागे जावून ताजी कळशी भरून आत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गाभाऱ्याला कुलूप घातलेलं आहे. गेली पन्नास वर्षं श्रावणातल्या दर सोमवारी आणि वर्षभरात अधेमधे ते एकादष्णी करायला ईश्वराच्या देवळात यायचे. पण त्यांच्या आठवणीत आज प्रथमच गाभाऱ्याला कुलूप अघून ते थक्क झाले.
जया देव तारी - भाग 1
जया देव तारी - भाग ०१ श्रावणात दाजी प्रभू वरसल सुरू झाली आणि ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप लागलं. दत्तंभट सालाबाद प्रमाणे सकाळीच पूजा साहित्य घेवून एकादष्णी करायला देवळात गेले. बळाणीवर सामान ठेवून गाभाऱ्या बाहेरची कळशी घेऊन विहीरीवर गेले. विहीर म्हणजे छोटेखानी तळंच होतं. सहा हात औरस चौरस घडीव चिऱ्याच चौकोनी बांधकाम केलेली ती विहीर कायम तोंडोतोंड भरलेले असायची. पावसाळी उमळं फुटल्यावर अगदी माघापर्यंन्त उगवतच्या बाजूने छिनेलानी बांधलेल्या हातभर रुंद आणि ढोपरभर खोल पाटातून व्हावटीचं पाणी सदू लिंगायताच्या गोठ्यामागच्या व्हाळीत जात असे. पाऊसकाळात दर्शनाला येणारी माणसं त्या पाटातच हातपाय धुवून मग ...अजून वाचा
जया देव तारी - भाग 2
जया देव तारी - भाग ०२ म्हाजनाचे लग्न उंच वयात झाले. त्याला हारोहार अकरा मुलीच झाल्या. मुलग़ी झाली त्या बाळंतपणानंतर म्हाजनाची बायको अंथरूणाला खिळली. साताठ महिन्यांच्या भरीला तिने गुट् केले. त्यावेळी म्हाजन साठीच्या जवळ पोचलेला होता. त्यावेळी कानडी मुलखातले काही ब्राह्मण आतून पैसे घेवून कोकणात कुठेही, बिजवर, तिजवर, भुके कंगाल , व्यंगी कोणालाही मुलगी देत. अशी कामे करणारे काही मध्यस्त असायचे. पावसाळी चिव्याच्या काठ्या तोडून कोल्हापूर मिरजेकडे व्यापाऱ्याला घालणाऱ्या लखू देवधराची नी म्हाजनाची बरेच वर्षांची दोस्ती होती. मुली पुरवणारा अथणीचा शंभू देसाई नावाचा मध्यस्त लखूच्या ओळखीचा होता. म्हाजनाशी सल्लामसलत करून लखूने देसायाला गळ घातली. त्या स्वस्ताईच्या ...अजून वाचा
जया देव तारी - भाग 3
जया देव तारी - भाग ०३म्हणून दत्तंभट खोतांकडे जायला निघाला. तो गेला लगेचच बापू दात्ये रोजच्या रिवाजाप्रमाणे आले. ते तेंव्हा दत्तू गुरव बळाणीवरच बसलेला होता. दात्यानी गाभाऱ्याला कुलूप बघितल्यावर गुरवाला विचारले तेव्हा त्याने मिराशांची काय ताकिद आहे त्याची उजळणी केली. त्यावर काहीही न बोलता बापूनी गाभाऱ्या बाहेर कोनाड्यातला गणपती नी समोरचा नंदी यांची पुजा केली. गाभाऱ्याच्या चौकटीच्या उंबऱ्यावर पाणी ओतून ईश्वरासाठी बिल्वदल नी फुलं ठेवली. मग आवाठातल्या लक्ष्मीकेशव, काळभैरव , मुळवसाची पूजा करून ते निघून गेले. मात्र त्या दिवासानंतर त्यानी ईश्वराची नित्यपूजा कायमची बंद केली. श्रावणात नेमधर्माच्या निमित्ताने कोणकोण गावकरी देवदर्शनाला येत. तेही ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप बघून अजाब करीत. ...अजून वाचा
जया देव तारी - भाग 4
जयाव तारी - भाग ०४वैद्यबुवानी नाडी परीक्षा केली. मग ते म्हणाले की, मुलगा मंद बुद्धी आहे. मेद फार वाढलेला मी उपचार करतो पण शंभर टक्के गुण येईल याची शाश्वती नाही देता यायची. आता आहे त्यापेक्षा खूप सुढारणा होईल एवढे मात्र नक्की. असे निदान करून त्याच्या खाण्यापिण्याचे कोष्टकच वैद्यानी करून दिले. तसेच सकाळ संध्याकाळ चलन वलन होण्यासाठी काय काय हालचाली करून घ्यायच्या तेही समजावून सांगितले. दोन वर्षे नेमाने वैद्यबुवानी आखून दिल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर मात्र येशा हिंडाफिरायला लागला. बोलताना मात्र तो लागे..... काही काही शब्द तो असे उच्चारी की तो काय गल गल करतोहे त्याचा उलट होईना. कोणीतरी तो मुंज केल्यावर ...अजून वाचा
जया देव तारी - भाग 5
जया देव तारी - भाग ५प्रतिवार्षिक रिवाजा प्रमाणे पुराण संपले आणि ‘पार्वतीपते हर हर महादेव’ असा उद्घोष करीत जोशीबुवानी दात्यांकडे कटाक्ष टाकला. दात्यानी शंभू देसायांकडे मोहरा वळवून त्याना खूण केली. इशारा ओळखून देसाई उठले. त्यानी बुक्क्याचे ताम्हन उचलले. गाभाऱ्याच्या दिशेने बुक्क्याची चिमूट उधळून ते जोशीबुवांच्या समोर गेले. चिंतू जोशी म्हणजे हळयातले ‘किटाळ’ म्हणून ओळखले जात. गावात तंटा बखेडा झाला नी न्यायसभा भरली तर दात्ये, म्हाजन यांच्या बरोबरीने पंच म्हणून चिंतूकाका जोशी , माधवराव दांडेकर आणि विठू घाडी या तीन असामीना बोलावायचा रिवाज होता. शंभू ताम्हन घेवून जोशीबुवांच्या समोर उभा राहिल्यावर त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष ...अजून वाचा
जया देव तारी - भाग 6
जया देव तारी - भाग ०६ खोतांच्या महापुरुषा जवळ अवास्तुक उंबराचे रोप उगवले. ते चांगले उंच झाल्यावर एक दिवस शंभूच्या नजरेला पडले. तो दिवसभर त्यावर विचार करीत होता. रात्री अकस्मात त्याला युक्ती सुचली. महिनाभराने योजने प्रमाणे सगळी जम झाली. मग शुक्रवारी सकाळी गडी कामाला आले त्याना हाकारीत शंभू म्हणाला, “आज पहाटे मला स्वप्नात दृष्टान्त झाला. आगरात महापुरुषाच्या बाजूला उंबराचे झाड आहे त्याच्या डाव्या अंगाला गाणगापुरच्या पादुका आहेत. मी गेली पन्नास वर्षं इथे पडून आहे....... तू मला वर काढ आणि माझी प्रतिष्ठापना कर असा साक्षात दत्तगुरूनी मला आदेश दिलेला आहे. ” गडी माणसं भारावून म्हणाली, ...अजून वाचा