लिंग्या गुरवाला लॉटरी लागली

(3)
  • 225
  • 0
  • 975

कालवीतून टेंबवलीत जाणाऱ्या रस्त्यावर भिड्यांच्या घराकडून जरा पुढे गेल्यावर मळे जमीन सुरू व्हायची. तिथे सड्यावरून आलेल्या व्हाळावरची मोरी ओलांडून जरा पुढे गेलं की जवळ जवळ दीडेक फर्लांग अंतरा पर्यंत गोड्या पाण्याची प्रचण्ड मोठी गोड्या पाण्याची कोंड पसरलेली होती. कोंडीत बारा महिने पाणी असायचं. ऐन उन्हाळ्यात कोंडीत कमरभर पाणी असायचं. पूर्वी तिथे फक्त पांढरी कमळं असायची. पण पराडकरांच्या सुनेन कुठून कुठून शोधून लाल नी तांबड्या कमळांचे कंद आणून टाकलेन. सात आठ वर्षात त्यांच बियाणं पसरलं. आता बारमास लाल ,निळ्या, पांढऱ्या कमळानी कोंड भरलेली असायची. कोंड शेवटली की तिथून डाव्या अंगाला दरड सुरू व्हायची. त्या कोपऱ्यावर ठेंगू मुळमाचं घर होतं. मग घाडी वाडी सुरू होई नी वाडीच्या टोकाला लिंग्या गुरवाचा चौसोपी वाडा होता. सहा पिढ्यांमागे गावच्या वीर भद्रेश्वराच्या पूजेसाठी दापोलीकडच्या कुठच्याशा गावातून लिंगायत गुरव गावात आणून त्याला ईश्वराच्या ईनामतीपैकी खंडीभर भात पिकेल एवढी खरी दिलेली होती.

1

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 1

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 1 कालवीतून टेंबवलीत जाणाऱ्या रस्त्यावर भिड्यांच्या घराकडून जरा पुढे मळे जमीन सुरू व्हायची. तिथे सड्यावरून आलेल्या व्हाळावरची मोरी ओलांडून जरा पुढे गेलं की जवळ जवळ दीडेक फर्लांग अंतरा पर्यंत गोड्या पाण्याची प्रचण्ड मोठी गोड्या पाण्याची कोंड पसरलेली होती. कोंडीत बारा महिने पाणी असायचं. ऐन उन्हाळ्यात कोंडीत कमरभर पाणी असायचं. पूर्वी तिथे फक्त पांढरी कमळं असायची. पण पराडकरांच्या सुनेन कुठून कुठून शोधून लाल नी तांबड्या कमळांचे कंद आणून टाकलेन. सात आठ वर्षात त्यांच बियाणं पसरलं. आता बारमास लाल ,निळ्या, पांढऱ्या कमळानी कोंड भरलेली असायची. कोंड शेवटली की तिथून डाव्या अंगाला ...अजून वाचा

2

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 2

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 2लिंग्या गुरवाकडे माल द्यायची नी घ्यायची मापं वेगवेगळी असत. खरेदी किंवा उसनवारी परतफेड मापून केलेल्या मापाच्या माथावळीला दोन- दोन आंगळं रुंद पितळी पट्ट्या बसवून फऱ्याची उंची वाढवलेली असे. साहजिकच त्यात किमान अच्छेरभर धान्य जादा मावत असे. विठलिंगाला एवढी बरकत आली की म्हातारपणी त्याने टोलेजंग सातखणी चौसोपी वाडा बांधला. लिंग्या गुरवाचे दुकान म्हणजे जवळ जवळ व्यापारी पेढी सारखं खटलं होतं. सिझनल नारळ, सुपारी, रातांब्याची सोलं, रातांब्याच्या बिया, रिंगी, काजू बिया हरतऱ्हेची खरेदी केली जायची. कुटूंबातला एखादा बापया देवस्थान सांभाळी आणि बाकीचे बापये नी बायका माणसंही दुकान सांभाळीत. स्वातंत्र्या नंतर तराजू ...अजून वाचा

3

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 3

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 3मुळात लाख म्हणजे किती हे त्याला तरी कुठे माहिती होतं. दोन दिवसानी लोके मास्तर घ्यायला आले तेंव्हा राधेला अकस्मात आठवलं नी तिने त्याना विचारलं. त्यानी मग शंभराच्या शंभर नोटांचं एक बंडल अशी दहा बंडलं म्हणजे एक लाख होतात. गावतले लिंगायत नी देसाई या असामीना गावात लाखे सावकार म्हणत. तो संदर्भ दिल्यावर लाख रुपयाचं मोल राधेच्या लक्षात आलं. “ बाय माज्ये... लाटरीच्ये इतके पैशे भेटतत काय...... मी चार रोजामागे टिकीट काडलीहा...... माजो जल्म एकादशी रोज झालो तोच आक्डो मी घितलल्या टिकीटीवर हा. म्हंज्ये बवतेक माका भक्षिस मिळात आसा माका वाटता हा......” तीने लोके मास्तराना आप्ण ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय