मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही प्रेम कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेगळे रंग, प्रेमाबद्दल असलेल्या वेगळ्या भावना, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय हे या प्रेमकथेला जरा वेगळं बनवत. wait.. wait.., मी तुम्हाला एवढ का बोर करत आहे चला सुरु करूया आपण या प्रेम कथेला.
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1
एक प्रेम कथा अशीही भाग 1मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेगळे रंग, प्रेमाबद्दल असलेल्या वेगळ्या भावना, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय हे या प्रेमकथेला जरा वेगळं बनवत. wait.. wait.., मी तुम्हाला एवढ का बोर करत आहे चला सुरु करूया आपण या प्रेम कथेला. " शेवटी तुझा निर्णय तरी काय? " हे शब्द अभिमन्यूने फोनवर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे धुके जमा झाले.. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जीवनात एवढ्या लवकर ही वेळ येईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. कॉफीचा कप घेऊन तो ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 2
एक प्रेम कथा अशीही.... भाग 2 भाग 1 वरून पुढे अभिमन्यू आणि अनिकेत हे दोघेही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून घेतात. त्यांना खोलीही एकच मिळते. ऋतुजा मॅडम तर तिथल्याच मुळच्या रहिवासी असतात पण थोडं स्वछंदी जीवन जगावं. आपल्या कॉलेजच्या दुनियेत मुक्तपणे वावरावं म्हणून तीसुद्धा होस्टेलला ऍडमिशन करून घेते आणि घरी काय सांगतेय मला शिस्त लावून घ्यायचीय.. खरंच शिस्तच ना. अभिमन्यू आणि अनिकेत चालतच कॉलेजला पोहचतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कॉलेजमध्ये थंडगार असे वातावरण होते. कॉलेजच्या मुख्य द्वारावर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून टप.. टप. करत पाण्याचे तुषार अभिमन्यूच्या अंगाला स्पर्शून जात होते. थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करीत होती. ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 3
एक प्रेम कथा अशीही.... भाग 3भाग 2 वरून पुढे. बाहेर कसल्यातरी कर्कश्य आवाजाने अभिमन्यू भानावर आला. कॉफीचा कप तर थंड झाला होता. "छे ! साला हे जगही काही काळ एकांत भेटू देणार नाही वाटतं" अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. खिडकीच्या बाहेर असलेल्या जगाला तो न्याहाळत होता." दुसऱ्याच्या जीवनात काय सुरु आहे.... ते कुठल्या टप्यावर येऊन पोहचलंय याच काही एक घेणं -देण नाही या जगाला. म्हणजे बघा ना रोजच सकाळी पुष्पे उमलणार, पेपर टाकणारा दूध टाकणारा रोजच येणार, तेच ते चित्रपट त्यांच त्या मालिका, तिच भेसूर वाटणारी दुपार.... काही वेळ झाल्यावर शांतपणे येणारी सायंकाळ आणि शेवटी या सगळ्याला संपवून निद्रिस्त करुण टाकणारी ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 4
एक प्रेम कथा अशीही... भाग 4 भाग 3 वरून पुढे. ऋतुजा पहाटेच हॉस्टेलवरून घरी जायला निघाली होती. वनस्पतीशास्त्राची जात असल्याने तिला बरीच तयारी करायची होती. कित्येक दिवसानंतर आज तिने घरी पाऊल ठेवले होते. आपल्या लाडक्या आई वडिलांना भेटल्यावर तिच्या दुविधा मनाची पालवी पल्लवित झाली होती. तिने लवकर लवकर सर्व आवरायला सुरवात केली. अंघोळ करून झाल्यावर केस सुकविण्यासाठी ती आरश्यासमोर उभी होती. आरश्यात आपले रूप न्याहाळून बघत होती आणि तिथूनच सुरु झाला तिच्या चंचल द्विमनाचा खेळ.पहिलं मन :- कॉलेजमध्ये पहिल्यांदाच नजरेला नजर भेटली... तो आवडला... आम्ही ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 5
एक प्रेम कथा अशीही... भाग 5 भाग 4 वरून पुढे डोंगराच्या उजव्या बाजूला एक ग्रुप वनस्पतीचे वर्गीकरण करीत होता डाव्या बाजूला दुसरा ग्रुप वर वनस्पतीचे निरीक्षण करण्याची जवाबदारी होती. अभिमन्यू आणि अवनी एक एक वनस्पतीला योग्यपणे न्याहाळत होते आणि त्याची योग्य माहिती डायरीत लिहत होते. वरुण सर्वांचे मोबाईल मध्ये फोटो टिपण्यात दंग होता. अनिकेत आणि ऋतुजा तिथे दिसणाऱ्या फुलांचे फ्लोरल रचना वहीत नमूद करीत होते. दूरवरून ऋतुजाची नजर अभिमन्यू आणि अवनीवर पडली. हसत -हसत ते सर्व माहिती डायरीत लिहत होते आणि अतिशय जवळ येऊन काहीतरी हितगुज करीत होते. क्षणातच ऋतुजाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तिच्या कपाळावर ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 6
एक प्रेम कथा अशीही..... भाग 6भाग 5 वरून पुढे खिडकीच्या काचेवर साचलेल्या थेंबाला ऋतुजाने हळुवारपणे स्पर्श केला. " किती असतात ना हे थेंब काही क्षण या काचेवर व्यतीत करतात आणि दुसऱ्याच क्षणी ते काचेवरून घसरुन जमिनीत विलीन होतात पण जमिनीशी एकरूप होतांना त्या थेंबाना काचेची आठवण येत असेल का? " ऋतुजा स्वतःशीच म्हणाली. या प्रश्नामुळेच कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते वनस्पतीशास्त्राच्या सहलीपर्यंतचा संपूर्ण आठवणींचा उजाळा झाला होता. त्याची ती पहिली नजर... पहिल्या नजरेतच मनाला आवडलेला तो, स्मितहास्याचा लपंडाप, त्याच्यासोबत केलेला पहिला कपल डान्स सर्व... सर्व.. काही परत अनुभवतेय असेच तिला भासत होते." काय झालं गं ऋतू? काही दिवसापासून बघतेय खूप ...अजून वाचा
एक प्रेमकथा अशीही.... - भाग 7
एक प्रेम कथा अशीही.... भाग 7 बाहेर असलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने अभिमन्यूचे डोळे उघडले. खिडकीतून उन्हाचा एक छोटासा त्याच्या पलंगावर येऊन बसला होता जणू तो ही त्याला निद्रेतून जागे होण्यास सुचवीत होता. अभिमन्यूने घडाळ्यात पहिले. सकाळचे 9 वाजले होते. एक लांब जांभई देऊन आळस घालविण्याचा तो अपुरा प्रयत्न करीत होता. रविवार असल्यामुळे आज त्याची मनसोक्तपणे झोप झाली होती आणि आता वेध लागला होता एका गरमा गरम चहाच्या कपाचा. डोळे चोळत त्याने सर्व आवरायला सुरवात केली. सकाळची सर्व आवरा आवर करून अनिकेत आणि अभिमन्यू होस्टेलच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा प्यायला निघाले. रविवार असल्यामुळे आज कसलीही घाई नव्हती. नेहमीचा वर्दळीचा ...अजून वाचा