एक प्रेमकथा अशीही.... - भाग 4 Adv Nikhil Deore द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक प्रेमकथा अशीही.... - भाग 4

एक प्रेम कथा अशीही... भाग 4 


    भाग 3 वरून पुढे. 


   ऋतुजा पहाटेच हॉस्टेलवरून घरी जायला निघाली होती. वनस्पतीशास्त्राची सहल जात असल्याने तिला बरीच तयारी करायची होती. कित्येक दिवसानंतर आज तिने घरी पाऊल ठेवले होते. आपल्या लाडक्या आई वडिलांना भेटल्यावर तिच्या दुविधा मनाची पालवी पल्लवित झाली होती. तिने लवकर लवकर सर्व आवरायला सुरवात केली. अंघोळ करून झाल्यावर केस सुकविण्यासाठी ती आरश्यासमोर उभी होती. आरश्यात आपले रूप न्याहाळून बघत होती आणि तिथूनच सुरु झाला तिच्या चंचल  द्विमनाचा खेळ. 

पहिलं मन :- कॉलेजमध्ये पहिल्यांदाच नजरेला नजर
                  भेटली... तो आवडला... आम्ही 
                  एवढे चांगले मित्रही बनलो.... प्रत्येक 
                 मुलीला हवंहवंसं वाटणार स्वप्न आपल्या
                आवडत्या मुलाबरोबर कपल डांस 
                करणं ते ही अनपेक्षित पूर्ण झालं. जणू 
                संपूर्ण सृष्टीचं आम्हाला एक करण्यासाठी 
                 प्रयत्न करतेय. 😊😊💕💕

दुसरं मन :-  ऋतू या जगात योगायोग ही गोष्टही 
                 असतेच ना. मग ते सर्व योगायोगही असू 
                शकते ना... ☹️☹️☹️

पहिलं मन :- त्यांच एवढं वेळ माझ्यासोबत राहणं....
                  माझ्याशी whatss app  वरील चॅट.. 
                 कॅन्टीनमधील नजरेच्या लपंडावाचा 
                खेळ.... प्रॅक्टिकल मधील स्मित हास्याचा 
                खेळ... ह्या सर्वांना काही तर अर्थ 
                असेलच ना? 💕💕😊

दुसरं मन :- अर्थ असेलही पण अवनीशी त्याची 
               वाढती जवळीक. वैष्णवीने काय 
              सांगितलंय लक्षात आहे ना " माणसं 
              बदलायला वेळ लागत नाही. जर तुझ्या 
             मनात प्रेम भावना असेल तर सांगून मोकळी 
              हो ".
तिचं दुविधा मन आणखीनच बैचेन होत होतं. शेवटी आज आपल्या मनातल्या प्रेम भावना अभिमन्यू जवळ काहीही करून व्यक्त करायच्या हे तिने ठरविले  आणि लगबगीने सर्व काही आवरायला सुरवात केली. 

    आज सहलीसाठी तिने खास तिच्या आवडीच बटाट्याची भाजी, पुऱ्या, मसालेभात आणि बदामचा  शिरा बनवला होता. अभिमन्यूचा डबाही तिनेच बनवला होता. सोबत थोडासा चिवडा, चॉकलेटस आणि फळेही घेतली होती. 

         हॉस्टेलमधील अभिमन्यू आणि अनिकेतही तयार झाले होते. करकरीत इस्त्री मारलेला शर्ट आणि पॅन्ट त्यांनी परिधान केला होता. अभिमन्यू आणि अनिकेत यांची एवढ्या सकाळी मेस बंद असल्यामुळे  त्यांनी  चिप्स, कुरकुरे, सँडविच आणि काही बिस्किटे सोबत घेतली होती. 

           सकाळी 8:30 वाजता प्रथम वर्षाची सर्व विद्यार्थी कॉलेजजवळ जमली होती. ट्रॅव्हल्स समोर नारळ फोडल्या गेलं त्यानंतर सर्व  विद्यार्थी ट्रॅव्हल्समध्ये बसली. सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ट्रॅव्हल्स  मधून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे ऋतुजाच्या चेहऱ्यावर तिचे रेशमी केस पिंगा घालत होते. ट्रॅव्हल्समध्ये एकच हास्यकल्लोळ सुरु होता. अनिकेत आणि अभिमन्यू एकाच सीटवर बसले होते तर मुलींमध्ये ऋतुजा आणि अवनी एकाच सीटवर बसल्या होत्या. मुला आणि मुलींनी गाण्याच्या भेंडया खेळायला सुरवात केली. मुला आणि मुलींमध्ये तर गाण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. " स " हा अक्षर मुलींवर  आला होता. ऋतुजाने अभिमन्यू कडे पहिले त्याचे लक्ष तिच्याकडे नव्हतच .. तो तर मुलामध्ये मदमस्त होऊन मजा करत होता. ऋतुजाने स वरून 💕💕💕 " सांगू कसे प्रिया मी शब्दात आज सारे समजून घे मला रे आहे तुझीच मी रे " 💕💕💕 हे गाणं अभिमन्यूसाठी म्हटलं पण तो तर आपल्याच जगात मदमस्त होता. 

         ट्रॅव्हल्स भरघाव वेगाने चालत होती. ऋतुजाने अभिमन्यूला चॉकलेट्स खातो का म्हणून ईशाऱ्यातच विचारल. अभिमन्यूने नकारार्थी मान डोलावली. ट्रॅव्हल्समध्ये गाण्यांना तर ऊतच आला होता. मुलं आणि मुली गाण्यावर थिरकताना दिसत होते. 

             शेवटी ट्रॅव्हल्स एकदाची डोंगरावर थांबली. काही वेळ मुक्तपणे फेरफटका मारल्यानंतर वनस्पतीचे निरीक्षण सुरु झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या डायरी उघडल्या होत्या. तिथे दिसणाऱ्या वनस्पतीचे बीजपत्री आणि अबीजपत्री असे वर्गीकरण करण्यात आले. दोन ग्रुप पाडल्या गेले. एक ग्रुप बीजपत्री वनस्पतीचे तर दुसरा ग्रुप अबीजपत्री वनस्पतीचे वर्गीकरण करून त्याची डायरीत योग्य माहिती नमूद करेल हे ठरलं होत. बीजपत्री वनस्पतीच्या ग्रुप मध्ये अभिमन्यू, वरुण आणि अवनी होते तर अबीजपत्री वनस्पतीच्या ग्रुपमध्ये अनिकेत आणि ऋतुजा होते. 

क्रमश..