एक प्रेमकथा अशीही.... - भाग 5 Adv Nikhil Deore द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक प्रेमकथा अशीही.... - भाग 5

एक प्रेम कथा अशीही... भाग 5

   भाग 4 वरून पुढे 


  डोंगराच्या उजव्या बाजूला एक ग्रुप वनस्पतीचे वर्गीकरण  करीत होता तर डाव्या बाजूला दुसरा ग्रुप वर वनस्पतीचे निरीक्षण करण्याची जवाबदारी होती. अभिमन्यू आणि अवनी एक एक वनस्पतीला योग्यपणे न्याहाळत होते आणि त्याची योग्य माहिती डायरीत लिहत होते. वरुण सर्वांचे मोबाईल मध्ये फोटो टिपण्यात दंग होता. अनिकेत आणि ऋतुजा तिथे दिसणाऱ्या फुलांचे फ्लोरल रचना वहीत नमूद करीत होते. 

           दूरवरून ऋतुजाची नजर अभिमन्यू आणि अवनीवर पडली. हसत -हसत ते सर्व माहिती डायरीत लिहत होते आणि अतिशय जवळ येऊन काहीतरी हितगुज करीत होते. क्षणातच ऋतुजाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तिच्या कपाळावर आठ्यांनी गर्दी केली आणि चेहरा रागाने लाल झाला होता. आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन " तुमच्या दोघांचं चाललंय तरी काय? " हा जाब विचारावा असे तिला वाटल पण ती काहीच करू शकत नव्हती. 

           अभिमन्यूने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि whatss app उघडलं.  " Life is unpredictable Be ready for best and worst " हा qoutes त्याच्या मित्राच्या status ला होता. 
" किती योग्य लिहलंय या quotes मध्ये. जीवन खरंच खूप अनपेक्षित आहे. जीवनाला कधी दुःखाचा वणवा लागेल तर कधी सुखाची वर्षा होईल हे कोणीही सांगू शकत नाही " अभिमन्यू स्वतःशीच बोलत होता. 
" अभिमन्यू स्माईल प्लीज " वरूण मोबाईल मध्ये त्याचा फोटो टिपत होता. काही वेळानंतर वरुण, अवनी आणि अभिमन्यू सेल्फी घेत होते. झालं होत्याच नव्हतं ! सेल्फी घेतांना अवनी अभिमन्यूच्या अगदी खेटून उभी आहे हे ऋतुजा मॅडमनि बघितलं आणि परत तिच्या रागाचा पारा चढला. 

            सूर्य माथ्यावर चढला होता. दुपारचे 12:30 वाजले होते. दोन्ही ग्रुपनि वनस्पतीची योग्य माहिती जमवून डायरीत नमूद केली होती. सर्वजण एकत्र जमले होते. 
" ऐ अवनी तुझा एक  pic काढू का? " वरुण म्हणाला. 
" नको काहीही गरज नाही " अवनी म्हणाली. 
सर्वांनी एक ग्रुप सेल्फी घ्यायची ठरवली म्हणून ऋतुजा पहिलेच अभिमन्यूच्या बाजूला जाऊन उभी राहिली. सेल्फी घेतल्या गेली आणि सर्वांनी भटकंती करण्यास सुरवात केली. 
" हे अनिकेत माझा आणि अभिमन्यूचा एक फोटो काढतोस का?  " ऋतुजा म्हणाली. 
" हो काढतो ना ".
फोटो काढण्यासाठी अभिमन्यू आणि ऋतुजा उभे राहिले होते. अवनी मनातल्या मनात बारीक हसत होती. 
" मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर एकाच फोटोमध्ये... काहीतरी गडबड आहे " मागून वरुणने हास्यमय टिपणी केली होती. 
फोटो काढून झाला तरीही ऋतुजा बाजूलाच उभी होती. 
" काय मॅडम ! काय इरादा आहे तुमचा?  " अवनीने थोडी खोडी काढत म्हटले. 
" तुला काय करायचंय?  तुला काही प्रॉब्लेम आहे का?  " ऋतुजाने फटकारत तिला प्रतिउत्तर दिले. 

      बाजूलाच अतिशय विस्तीर्ण जवळपास तीन एकरच अमर उद्यान होत. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची तिकिटे काढली आणि मनसोक्तपणे उद्यानात मजा करण्यास परवानगी दिली. उद्यानात कुणी झोपाळ्यावर झुलत होते.... कुणी निरागस लहान मूल  होऊन घसरगुंडीवर घसरत होते... तर कुणी फोटोसेशन मध्ये रमले होते. उद्यानात वेगवेगळी पुष्पे उमलली होती. अवनी रंगबिरंगी प्राजक्ताची फुले जमवीत होती तिला त्यात विलक्षण आनंद मिळत होता. वरुण झाडामागे उभा राहून तिला चोरनजरने बघत होता. तिचा निखळ आनंद आपल्या नेत्रात  साठवत होता. अवनीची नजर त्याच्यावर स्थिरावली. तिचा रागीट चेहरा पाहताच त्याने तीथून काढता पाय घेणेच बरे हे ओळखले आणि नजर चुकवून तेथून निघून गेला.

         दुपारचे 2 वाजले होते. सर्वांना कडाक्याची भूक लागली होती. उद्यानात प्रशस्त असा सिमेंटचा ओटा होता. सर्वांनी तिथेच आपले बस्तान मांडून जेवण्यास सुरवात केली. छोटे छोटे ग्रुप बनवून सर्वजण जेवणावर ताव मारत होते. 

       ऋतुजा आणि अभिमन्यू एकत्र जेवत होते तर अनिकेत आणि वरुण एकाच टिफिन वर ताव मारत होते .  फक्त अवनी  स्वतःचा डबा उघडून एकटीच अधाश्यासारखी जेवत होती. सर्वांपासून त्यांचा ग्रुप थोडा दूरच बसला होता. 
" बदामचा शिरा आणलाय हा तर माझ्या आवडीचा आहे " अभिमन्यू ऋतुजाला म्हणाला. 
" हो ! मलाही फार आवडतो " ऋतुजा म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर हास्याचे वलय उमटले होते आणि ती एकटक अभिमन्यूकडे पाहत होती. 
" ऐ अवनी मी पण जेवू का तुझ्या डब्यात? " वरुण म्हणाला. 
" कशाला चुपचाप आपल्याच डब्यात जेव" अवनी बनावट रागानी म्हणाली. 
" मित्रा तू तिच्यावर रेषा ओढतोस का?" अतिशय बारीक आवाजात अनिकेतने वरुणला विचारले. 
" म्हणजे? " 
" म्हणजे तू तिच्यावर लाईन मारतोस का? ".
" तसं काही नाही फक्त मजा घेतो तिची "
" तू लाजत आहेस मित्रा म्हणजे......" 😊😊  दोघेही गालातल्या गालात खुदकन हसले. 

        सर्वांची जेवणे आता आटोपली होती. आता सर्वजण उद्यानात मौजमजा करत होते. वरुण उगाचच अवनीच्या मागे चालून तिची मजा घेत होता. अवनीलाही वरवरून वरुणचा राग येत असला तरी त्याच्याविषयी तिच्या मनात कुठलाही द्वेष नव्हता. 

उद्यानाच्या शेवटी उजव्या बाजूला वाहत जाणारा  लहानसा  तलाव होता. तिथे बोटींग करण्याची सोय होती. सर्वांचा मोर्चा आता तलावाकडे वळला होता. अभिमन्यू आणि त्याचा ग्रुप फोटोसेशन मध्ये व्यस्त होता.  जसं वरुणला बोटींग बद्दल कळलं तसा तो अनिकेतला घेऊन तलावाकडे गेला. अभिमन्यू आणि ऋतुजा अजूनही फोटो काढण्यात मग्न होते. अवनीही बोटींग करायला तलावाकडे जायला निघाली. 
" ऋतुजा येतेस का गं बोटींगला?  " अवनी विचारू लागली. 
" हो.. हो.. तू जा समोर ". 
अभिमन्यूही बोटिंगसाठी तलावाकडे जायला निघाला. 
" अभिमन्यू  थोडा थांबतो का?  मला तुझ्याशी काही बोलायचंय " ऋतुजा म्हणाली. 
" बोल ना " 
"कसं सांगू कळतंच नाही मला. फक्त तू माझ्याबद्दल काही पूर्वग्रहदूषित करून घेऊ नको किंवा माझ्याविषयी कुठलं  मतही बनवू नको माझं सांगून  झाल्यावर ".
" नाही बनवणार पण झालंय तरी काय?  "
" Acually मला तू खूप आवडतोस.... माझं प्रेम आहे तुझ्यावर... I LOVE YOU " ऋतुजाने एकदमातच सर्व काही सांगितलं. 
अभिमन्यू तिचे शब्द ऐकुन स्तब्ध झाला होता. हे जग कुठेतरी थांबले आहे असेच त्याला भासू लागले होते. भानावर येऊन तो म्हणाला. 
" माफ कर ऋतुजा तू माझी खूप चांगली मैत्रिण आहेस आणि मी तुझ्या भावनेचा 
आदरही  करतो. सुंदर, शांत, मनमेळावू, सर्वांना समजून घेणारी असे सर्वगुणसंपन्न आहेस तू पण माझ्या मनात तुझ्याविषयी तश्या भावना नाही आहे गं... माफ कर मला ".
" का रे तुला अवनी आवडते का?  "
" ऋतुजा हे जीवन खूपच अनपेक्षित आहे. जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही... ते कुठल्या टप्प्यावर येऊन पोहचेल हेही सांगता येत नाही " 
अभिमन्यूने आपले शब्द मोकळे केले  आणि तेथून निघून जाऊ लागला. 
ऋतुजा त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे भरून पाहत होती. तिच्या हृदयात दुःखाचे मेघ दाटले  होते आणि डोळ्यातुन अश्रुधारा ओघळत होत्या. 

to be continue... 

आपल्याला हा भाग कसा वाटला हे अभिप्रायाने कळवा. 🙏