एक प्रेम कथा अशीही..... भाग 6
भाग 5 वरून पुढे
खिडकीच्या काचेवर साचलेल्या थेंबाला ऋतुजाने हळुवारपणे स्पर्श केला. " किती सुंदर असतात ना हे थेंब काही क्षण या काचेवर व्यतीत करतात आणि दुसऱ्याच क्षणी ते काचेवरून घसरुन जमिनीत विलीन होतात पण जमिनीशी एकरूप होतांना त्या थेंबाना काचेची आठवण येत असेल का? " ऋतुजा स्वतःशीच म्हणाली. या प्रश्नामुळेच कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते वनस्पतीशास्त्राच्या सहलीपर्यंतचा संपूर्ण आठवणींचा उजाळा झाला होता. त्याची ती पहिली नजर... पहिल्या नजरेतच मनाला आवडलेला तो, स्मितहास्याचा लपंडाप, त्याच्यासोबत केलेला पहिला कपल डान्स सर्व... सर्व.. काही परत अनुभवतेय असेच तिला भासत होते.
" काय झालं गं ऋतू? काही दिवसापासून बघतेय खूप नाराज दिसतेय तू काही झालं का? आपल्या आईच्या प्रश्नांनी ती भानावर आली.
" काही नाही ग आई सहजच "
" तुझ्या आवडीचा इलाईचीचा चहा देऊ का? " आई म्हणाली.
" चहा आवडत नाही गं आई आता मला "
" का गं? तुला तर खूप आवडायचाना चहा एका वेळी दोन - दोन कप प्यायची तू तर मग आता काय झालय ? "
" काही आवडी वेळेनुसार बदलू लागतात. आई मला काही वेळ वाचण करायचंय तू plzzzzz मला काही वेळ एकटं सोडशील का? " ऋतुजा म्हणाली.
आई तिला एकटं सोडून रूम बाहेर जाऊ लागल्या. आपल्या एकुलत्या एक लेकीच अस कोड्यात बोलण ऐकुन तिला ऋतुजाची फार काळजी वाटायला लागली होती. ऋतुजाने मन रमाव म्हणून " प्रेमा तुझा रंग कसा " ही कादंबरी वाचायला घेतली. कादंबरीच्या पहिल्याच प्रकरणाच नाव होत प्रेमभंग.... " प्रेमभंग... माझ्याही प्रेमाचा भंग झाला होता ना. आठवतोय ना मला तो दिवस.. " ऋतुजा स्वतःच्या मनाशीच संवाद करीत होती. तिच्या नेत्राच्या पापण्या हळुवारपणे मिटल्या गेल्या आणि त्या मिटणाऱ्या पापण्याला अश्रू ओले करून जात होते. मिटलेल्या नेत्रातून तिला परत आठवला तो दिवस..
वनस्पतिशास्त्राची सहल संपून ट्रॅव्हल्स भरघाव वेगाने परतीच्या मार्गावर होती. ऋतुजा उदास होऊन खिडकीतून मागे जाणारे झाडे एकटक बघत होती. त्या मागे जाणाऱ्या झाडाला बघून तिला काय आठवत होतं हे तिचं तिलाच ठाऊक. अधून -मधून तिच्या नेत्रातून अलगदपणे अश्रुंचे दोन टपोरे थेंब गालावर येत होते. ती नकळतपणे अभिमन्यूकडे पाहते. अभिमन्यू नरजेतूनही तिची टाळाटाळ करीत होता. जीवन एकदम भकास झालं आहे असच तिला वाटू लागलं होतं.
रात्रीचे 9 वाजले होते. ऋतुजा जेवण न करताच अंथरुणात पडून झोपण्याचा प्रयत्न करीत होती. झोप येणार तरी कशी होती आज तिचे स्वप्न भंगले होते. रूममध्ये सर्वत्र काळोख पसरला होता. ऋतुजाने एवढ्या वेळ साठवून ठेवलेले अश्रू नयनामधून भळाभळा ओघळत होते. तिने आपला मोबाईल हातात घेतला. सहलीत काढलेला त्यांच्या दोघांचा फोटो ती अश्रू भरलेल्या नयनांनी पाहत होती आणि एक हुंदका देऊन परत रडण्यास सुरवात केली.
सकाळचे 7 वाजले होते. शनिवार असल्यामुळे कॉलेज सकाळीच होत.
" ऐ ऋतुजा ऊठ कॉलेजला जायला उशीर होईल ना " वैष्णवीच्या शब्दांनी तिला जाग आली. कॉलेजला जायची तिला बिलकुलच इच्छा नव्हती पण रसायणशास्त्राच्या प्रॅक्टिकल बुकची तपासणी असल्यामुळे तिला कॉलेजला जाणं भाग होत. ऋतुजाला रात्रभर झोप लागली नव्हती म्हणून तिचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते. डोकंही थोडं जड वाटायला लागलं होत. सर्व भराभर आवरून ती कशीबशी कॉलेजला पोहचली.
पहिल्या प्राणिशास्त्राच्या तासाला शिक्षकच न आल्यामुळे सुट्टी होती. आपला ग्रुप कुठे दिसतेय का म्हणून ऋतुजा सर्वत्र शोधाशोध करू लागली. दूरवर वनस्पतीशास्त्र विभागात बसलेले अवनी, अभिमन्यू आणि वरुण तिला दिसले पण कालच्या प्रकरणामुळे काही वेळ ती सर्वांच्या दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती म्हणून ती एकटीच कॅन्टीनमध्ये जाऊन बसते.
" काय ऋतुजा आज एकटीच कॅन्टीनमध्ये आम्हाला बोलावलं सुद्धा नाही. इतके थोडी ना तुझे पैसे खर्च केले असते आम्ही " अनिकेतच्या आवाजांनी आपण कॅन्टीनमध्ये आहो हे तिच्या लक्षात आलं आणि बनावट स्मितहास्य देऊन ती म्हणाली
" अरे सहजच आली "
" आपला ग्रुप कुठे आहे अवनी, वरुण, आणि अभिमन्यू? "
" ते सर्व वनस्पतीशास्त्र विभागात बसले आहे " ऋतुजा म्हणाली.
" मग तू एकटीच इथे का बसली आहेस? "
" अरे सांगितलं ना सहजच म्हणून... "
" तुला नक्कीच काहीतरी झालंय? नाराज आहेस का आमच्यावर? म्हणजे काल मी तुला जातांनी Bye केलं तरी तू ढूंकूनही पहिलं नाही म्हणून विचारतोय " अनिकेत म्हणाला.
" खरंच तसं काही नाही रे "
" चहा आणि पोहे घेणार का? तसंही पैसे तूच देणार आहेस " अनिकेत हसून म्हणाला.
" नाही नको "ऋतुजा म्हणाली.
" घे गं "
समोर गरम गरम पोहे आणि वाफाळलेला दोन चहाचे कप आलेले असतात. अनिकेतला सर्व अभिमन्यूकडून माहित व्हायच्या आधी आपणच सर्व काही सांगून टाकलेलं बरं अस ऋतुजाला वाटल.
" अनिकेत मला सांग कुणावर प्रेम करणं वाईट असतं का रे? "
" नाही नक्कीच नाही पण तू का हे विचारतेय? "
" कारण मी ही कुणावरतरी प्रेम केलंय ".
" कुणावर? "
" अभिमन्यूवर "
" वाटलंच मला तुझं प्रेम अभिमन्यूवरच असेल म्हणून पण मग तू तुझ्या मार्मिक भावना अभिमन्यूजवळ व्यक्त केल्याय का? "
" हो कालच त्याला माझ्या मनाची घालमेल सांगितली "
"मग त्यांच उत्तर काय होत "
" नकार...... " तिच्या डोळ्यातून अश्रू तराळनार होते पण कसबसं तिने अश्रूंना रोखून ठेवल.तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली होती.
" पण कारण तरी काय? " अनिकेत विचारू लागला.
" मला तर अस वाटतं त्याच अवनीवर प्रेम आहे "
" शक्यंच नाही.... मी त्याला लहानपणापासून तर नाही ओळखत पण जेव्हापासून ओळखतो त्यावरून सांगतो त्याला अवनी नसेलच आवडत. मी बोलतो त्याच्याशी या विषयावर " अनिकेत म्हणाला.
अचानक खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या झोतामुळे कादंबरीचे पाने फडफडू लागली आणि फडफडणाऱ्या पानाच्या आवाजामुळे ऋतुजा वर्तमानात आली.
" तुमने कितनी आसानि से कह दिया..
ना कि तुम समझते नही..
अरे समझते तो बहुत है
बस हम कहते नही..
तुझे ही गले लगा कर
तेरी ही शिकायत करने का
दिल करता है क्या करे जनाब प्यार मे
ऐसा ही होता है " (चारोळी क्रेडिट :-रागिणी काकडे )
ती स्वतःच्या मनाशीच म्हणाली.
" यापुढील आठवणीत न रमलेलंच बरं " तिच्या हृदयात असलेल्या शब्दांना तिने वाट मोकळी करून दिली.
---------------------------------------------------------------
वीज गेली होती. समोर असलेला टी.व्ही बंद झाला होता . अभिमन्यू त्या आभासी जगातून परतून परत वर्तमानकाळात आला होता.
" त्या वनस्पतीशास्त्राच्या सहलीत मी ऋतुजाला नकार का दिला याचं उत्तर तर फक्त मलाच माहित होत. ज्याप्रमाणे पेन्सिलनि काही चुकीच उत्तर लिहलं तर रबर त्याला संपूर्णपणे खोडून टाकतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही एक असा खोडरबर असावा जो आपल्या वाईट आठवणींनाही पूर्णपणे खोडू शकेल कारण यापुढील आठवणी न आठवलेल्याच बऱ्या " अभिमन्यू स्वतःच्या मनाशी हितगुज करीत होता.
काही गोष्टी न आठवलेल्या बऱ्या ही गोष्ट जरी खरी असली तरी ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्या आहेत त्या गोष्टी तर बदलू शकत नाही ना. यांच्या कॉलेजच्या दुनियादारीत नक्की काय घडलंय हे विस्तुतपणे मी तुम्हाला सांगेल पण पुढच्या भागात.
to be continue....
आपल्याला हा भाग कसा वाटला हे अभिप्रायाने कळवा