रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा होता. हमरस्त्यावरून 'नक्षत्र 'कडे जाणाऱ्या वाटेवर दुतर्फा दाट झाडी होती. त्या झाडांच्या पसाऱ्यात लाईटचे खांब हरवल्या सारखे उभे होते. त्यांच्या प्रकाशाला पानांच्या फटीतून मार्ग हुडकावा लागत होता. डार्क ब्लु जीन आणि काळा शर्ट घातलेल्या रुद्राने आपली मोटरसायकल एका झाडाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात स्टँडला लावली. सव्वा सहा फूट उंचीचा रुद्रा, कपड्याच्या रंगामुळे त्या अंधाऱ्या वातावरणातली एक छाया होऊन गेला होता. त्याने काही दिवसान पूर्वी या परिसराची कुरियर वाला बनून रेकी करून ठेवली होती. सेक्युरिटी म्हणून एकच दणकट बाउन्सर वाटावा असा गार्ड मेन गेट जवळच्या केबिन मध्ये

Full Novel

1

रुद्रा ! - १

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. रहदारीच्या रस्त्यापासून दोन एक किलोमीटर तो एकाकी 'नक्षत्र' नावाचा टुमदार दोनमजली बांगला ऐटीत उभा हमरस्त्यावरून 'नक्षत्र 'कडे जाणाऱ्या वाटेवर दुतर्फा दाट झाडी होती. त्या झाडांच्या पसाऱ्यात लाईटचे खांब हरवल्या सारखे उभे होते. त्यांच्या प्रकाशाला पानांच्या फटीतून मार्ग हुडकावा लागत होता. डार्क ब्लु जीन आणि काळा शर्ट घातलेल्या रुद्राने आपली मोटरसायकल एका झाडाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात स्टँडला लावली. सव्वा सहा फूट उंचीचा रुद्रा, कपड्याच्या रंगामुळे त्या अंधाऱ्या वातावरणातली एक छाया होऊन गेला होता. त्याने काही दिवसान पूर्वी या परिसराची कुरियर वाला बनून रेकी करून ठेवली होती. सेक्युरिटी म्हणून एकच दणकट बाउन्सर वाटावा असा गार्ड मेन गेट जवळच्या केबिन मध्ये ...अजून वाचा

2

रुद्रा ! - २

रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता. "रुद्रा ! बोलतोय. ""भेट हवीय!""कशाला?""मुका घ्यायचाय! बेवकूफ काहीतरी काम असल्याशिवाय कोण कोणाला फोन करील ?" बोलणाऱ्याचा सोलापुरीहेल स्पष्ट जाणवत होता. " काय काम? ""भेटीत सांगेन!""आत्ता दोन झाल्यात! तिसरी पास झाली कि ये !""तिसरी?""बियर !" रुद्राने फोन कट केला. तिसरी बियर संपवून त्याने रोस्टेड चिकन आणि फ्राईड राईस जेवणासाठी मागवले. फिंगर बाऊल मध्ये बोट बुडवताना, तो बुटकेला माणूस किंचित फेंगडे चालत त्याच्या पुढ्यात येऊन बसला. रुद्राने ...अजून वाचा

3

रुद्रा ! - ३

इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. जाधव फोनवर होता. "हा. जाधव काका बोला. सकाळीच आठवण काढलीत. काही विशेष?"हवालदार जाधव हा रिटायरमेंटला आलेला डिपार्टमेंट मधला आदरणीय सदस्य होता. अनुभवी आणि अत्यंत हुशार,पण तत्वनिष्ठ ! मागेच राहिला. त्यांच्या बरोबरीचे बरेच वर सरकले होते. राघव त्यांना आदराने वागवत असे व ते त्याच्याशी अदबीनेच वागत. एक लोभस बंध दोघात निर्माण झाला होता. आणि 'कामाशी इमान' हा त्यांच्यातील कॉमन दुवा होता!. "सर , एक खून झालाय!""कोठे? आणि कोण ?"" 'नक्षत्र 'बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये. बंगल्याचे मालक संतुकराव सहदेव यांचा! मी नाईटला होतो. ...अजून वाचा

4

रुद्रा ! - ४

राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते. "सर, कोणी तरी एक म्हातारा तुम्हाला भेटायचं म्हणुन आलाय. अर्जंट काम आहे असं म्हणतोय." शिपाई निरोप घेऊन आला. राघवच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे लोक नको त्या वेळेला येतात. कामात डिस्टरब झालेलं राघवला चालत नसे. पण एका वृद्धाला टाळणे त्याच्या जीवावर आले. "ठीक आहे. पाठव त्यांना. " राघवन उघड्या फाईल्स बंद करून ठेवल्या. पांढऱ्याशुभ्र रेशमी केसांचा स्लिम म्हातारा ताडताड पावले टाकत ताठ मानेने आत आला. तजेलदार चेहरा, साठीच्या आसपासचे परिपकव वय, 'मना सारखे करीन! ...अजून वाचा

5

रुद्रा ! - ५

फोनची रिंग वाजली म्हणून रुद्राने फोन उचलला. अननोन नंबर होता. "रुद्रा बोलतोय!""हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे कोण बोलतंय? असल्या फडतूस गोष्टीन साठी माझ्या कडे वेळ नाही!""असं डोक्यात राख घालून घेण्यात काही अर्थ नसतो. सध्या मला फक्त तीन लाखाचं पाहिजेत! आणि ते तू देणार आहेस!""आबे हट !"रुद्रा फोन कट करत म्हणाला. पुन्हा रिंग वाजली. पण या वेळेस काही तरी मेसेज आल्याची होती. मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती! पुन्हा ...अजून वाचा

6

रुद्रा ! - ६

राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला. "हॅलो राधा, मी राघव बोलतोय.""कोण राघव? मी नाही ओळखत कुण्या राघवला !" राधेने तुसडेपणाने उत्तर दिले. "अहो मी इन्स्पे. राघव बोलतोय!"मग मात्र राधा घाबरली. दोन दिवसाखाली पोलिसांनी तिच्या ऑफिसात येऊन सगळ्या स्टाफची जबानी घेतली होती. या मोठ्या लोकांच्या भानगडी अन मधेच बाकीच्यांना ताप होतो. तिच्या कंपनीच्या मालकाचा मुडदा त्याच्याच आऊट हाऊस मध्ये सापडला म्हणे. त्याच्या चौकशीसाठी अख्या स्टाफला पोलिसांनी दिवसभर वेठीस धरले होते. सगळ्यांचे फोन नम्बर, घराचेपत्ते आणि इतर माहिती पोलीस घेऊन गेले होते. तेव्हा हा राघव कडक ...अजून वाचा

7

रुद्रा ! - ७

मनोहरने हात डोक्याच्यावर ताणून मोठा आळस दिला. आपला हरामखोर बाप कुबेर आहे आणि त्याचा काटा परस्पर काढायचाय हे त्याने नक्की केले,तेव्हा त्याचा घरातील बित्तंबातमी हाती असणे आणि ती पुरवणारी व्यक्ती हुडकणे गरजेचे होते. जसवंत शिवाय इतर कोणीच हे काम करू शकणार नव्हते. जसवंताताचा इतिहास शोधताना, मनोहरला ते हुकमी शस्त्र घावले! जसवंतला गांजाचे जबरदस्त व्यसन होते! मनोहरने अर्थात त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला!"जसवंत, मी तुला गांजाच्या पुड्या देत जाईल, त्या बदल्यात तू मला संतुकरावची माहिती दे!" मनोहरने एक दिवस जसवंत समोर सरळ प्रस्ताव मांडला. विना पैशाच्या 'माल' मिळतोय! अशी संधी जसवंत सोडणार नव्हता!"काय माहिती? अन कशाला?" जसवंतने सावध पैंतरा घेतला. "तुला काय करायचंय?""तुला काही ...अजून वाचा

8

रुद्रा ! - ८

कालच्या 'राजयोग' डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते. संतुकराव अति श्रीमंत, तर तो त्या मानाने दरिद्री! काही नाते असेल का? हा भेटायला आल्या पासून संतुकराव आऊट हाऊस मध्ये का झोपू लागले? का तो फक्त त्यांचा विक्षिप्त पणा होता? नाही तो विक्षिप्तपणा खचितच नसावा. कारण विक्षिप्तपणा चार-दोन दिवस टिकेल, महिनाभर नाही! मनोहर पासून काहीतरी धोका आहे हे संतुकरावांना जाणवले होते! मनोहर ...अजून वाचा

9

रुद्रा ! - ९

मनोहर 'पंजाब ढाब्या'च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला. "जसवंत, राघवला तुझा संशय आला आहे! कारण सापडलेल्या पुराव्या नुसार समभाव्य खून्याचे वर्णन तुझ्याशी तंतोतंत जुळतंय म्हणे!"" येऊ दे मला पकडायला! मी तयार आहे! तो आला तर मी सांगेन कि खुनाच्या रात्री तू आऊट हाऊस मध्ये गेला होतास!"" तू पेपर वाचत नाहीस का? आजच्याच पेपरमध्ये संतुकरावांचा खून साडे दहा ते ...अजून वाचा

10

रुद्रा ! - १०

राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता. "हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!""सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ""धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!""हो, सांगितलं शकीलने.""बर, तुम्ही ताबडतोब व्हॅन आणि फोर्स घेऊन जसवंतच्या घरी जा. तो 'नक्षत्र'च्या आऊट हाऊस मध्ये राहतो हे तुम्हाला ठाऊक आहे. मी पाच मिनिटात तिकडेच येतोय. त्याला ताब्यात घ्यायचंय. आपल्याला आज बरीच ...अजून वाचा

11

रुद्रा ! - ११

मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य! आणि त्यामुळेच तो वैतागला होता. मनोहरचा नसला तरी जसवंतचा मोबाईल होताच कि! त्यात मनोहरचा नम्बर होता. कॉल हिस्ट्री मिळू शकणार होती! त्याने सायबर सेलच्या राकेशला फोन लावला. " राकेश, मी काल जसवंतचा फोन तुझ्या डिपार्टमेंटला जमा केलाय, त्यात मनोहरचा नम्बर असेल. कारण जसवंत आणि मनोहर सम्पर्कात होते. मला मनोहरची कॉल हिस्ट्री हवी आहे. "" सर, ...अजून वाचा

12

रुद्रा ! - १२

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेल तर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! तरी त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागला तर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! रुद्राला काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते. ट्रेनला अजून बराच बराच ...अजून वाचा

13

रुद्रा ! - १३

वेळ सकाळी अकराची होती. न्यायमूर्ती श्री हरिप्रसाद यांचे कोर्ट, खचाखच भरलेले होते. त्याला तसेच कारणही होते. कोट्याधीश संतुकराव सहदेव खुनाची केस त्या दिवशी सुनावणीस असणार होती. न्याय निष्टुर जजेस मध्ये हरिप्रसादांचे नाव बरेच वरच्या बाजूस होते. अपराध्याला जास्तीजास्त शिक्षा सुनावण्याकडे त्यांचा कल असतो, असा आजवरचा इतिहास सांगत होता. त्याच बरोबर ते आरोपीस निरपराधत्व सिद्ध करण्याची संधी पण आवर्जून देत, हे हि खरे होते. दुसरी महत्वाची बाब होती ती, संतुकराव सहदेव यांचे जगजाहीर 'इच्छापत्र!'. आरोप सिद्ध होऊन, जर आरोपी सही सलामत सुटला तर, पंधरा शे कोटीचे साम्राज्य त्याचे स्वागत करण्यास सज्ज होते, पण ते अशक्य होते! आणि न्या. हरिप्रसादजी असताना तर केवळ अशक्य!!तिसरी ...अजून वाचा

14

रुद्रा ! - १४

आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कोर्टाचे कामकाज सुरु झाले. "रामगोपाल हाजीर हो SSS !!" साक्षीदारांचे नाव पुकारण्यात आले. रामगोपालने दबकतच कोर्टात पाऊल टाकले. कोर्टाची पायरी चढण्याची हि त्याची पहिलीच वेळ असावी. तो खूप भेदरलेला दिसत होता. त्याने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात,पिंजऱ्याचा लाकडी काठ गच्च धरून ठेवला होता. त्याचे हात आणि पाय लटपटत होते. घश्याला कोरड पडली होती. हि श्रीमंतांची लफडी अन गरिबाला हकनाक ताप असे काहीसे भाव ...अजून वाचा

15

रुद्रा ! - १५

संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते. कोर्ट स्थानापन्न झाल्यावर दीक्षितांनी रुद्राची फेर तपासणी करण्याची परवानगी कोर्टास मागितली. 'आता अजून कसली तपासणी?'अशा आशयाच्या आठ्यापाडत नाराजीनेच कोर्टानी परवानगी दिली. "आरोपी रुद्रा, आपण काय प्रताप केलात हे जग जाहीर झालाय! माझा फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. रात्री आकाराच्या ऑड वेळेला, तुम्ही त्या बंगल्याच्या मागील आडबाजूच्या आऊट हाऊस मध्ये कशाला गेला होतात?"रुद्राच्या कपाळावर आठ्या पसरल्या. हा प्रश्न त्याला अनपेक्षित होता. खून करतानाच व्हिडीओ हाती असताना 'तेथे का गेलात?' हा प्रश्न ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय