पुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास A P DHANDE द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास

पुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास

लेखक, मुद्रक, प्रकाशक

प्रा. डॉ. . पी. धांडे

पी. आय. सी. टी. पुणे

९८२२४०६९६७

मुखपृष्ठ

श्री. अविनाश अंभोरे

पी. आय. सी. टी. पुणे

मनोगत

मंत्रज्ञान म्हटले कि आपण एकदम पुराणयुगात जातो ज्या काळात मंत्र लोकांना इच्छाशक्तिनुसार फळत असत आणि तंत्रज्ञान आपणास आजच्या आधुनिक युगात घेऊन जाते जिथे सर्व व्यवहार तंत्राने (Technology )चालतात. आधुनिक युगात मंत्रज्ञान हे खोटे पडले आहे कारण या युगात मंत्राचा प्रभाव राहिलेला नाही. मुळातच मंत्र हे मनुष्याची एक आत्मकेंद्रित शक्ती आहे जी एकाग्र मनाने विशिष्ट परिस्थितीत, वातावरणात, शुद्धरूपी मनाने, विशिष्ट मंत्र सामुग्री व निरनिराळे घटक (parameters) वापरून प्राप्त करता येते. यावर संपूर्ण विवेचन पुढे केलेलेच आहे.

आता थोडा युगाचा विचार करू पण तत्पुर्वी धर्म आणि संस्कृती यातील फरक थोडक्यात समजावून घेऊ. जगात मुख्यताः तिन धर्म आहेत जे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन. या व्यतिरिक्त इतर अनेक धर्म/पंथ जसे बौद्ध, जैन, शिया, सुन्नी, कॅथॉलिक, प्रोटेस्टंट आणि इतर अनेक. येथे धर्म हा ईश्वराच्या अस्तित्वाशी निगडित आहे म्हणजे त्याचे अस्तित्व आहे अथवा नाही. परंतू संस्कृती हि साधारणतः लोकांची समाजातील राहणी, आचारविचार यांच्याशी निगडित आहे. तसे पहिले तर धर्म आणि संस्कृती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजायला हरकत नाही.

वरील तिन धर्मांपैकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माला उगम (सुरवात) आहे परंतु हिंदू धर्माला उगम (सुरवात) नाही. तो काळाच्या सुरुवातीपासुन अस्तित्वात होता आणि म्हणुनच सर्वात जुना असा धर्म मानण्यात येतो. याच धर्मात चार युगे सांगितली आहेत ती म्हणजे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलीयुग. प्रत्येक युगात मनुष्याची वागणूक देखील वर्णन केली आहे व ती युगाप्रमाणे बदलली आहे जसे सत्ययुगात माणसे प्रामाणिक होती जी कलियुगात नाहीत वगैरे आणि म्हणुनच हिंदू धर्माचा संदर्भ या पुस्तकात घेतला आहे.

येथे ज्ञान आणि विज्ञान यातील फरक स्पष्ट करतो कि ज्ञान म्हणजे जे मनुष्य निसर्गाकडून गुरूंकडून आकस्मात होते तर विज्ञान म्हणजे मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून इतर लोकांसाठी वापरणे. ज्ञान हे स्वतः पुरते सीमित असते ते अनुभवालागते तर विज्ञान हे प्रयोगाने दाखविता येते.

जुने मंत्र आधुनिक तंत्र, या युगात मंत्र न फळण्याची शक्यता याचा एक शास्त्रोक्त विचार मांडला आहे. वाचकांना हे पुस्तक आवडेल अशी आशा करतो.

आपला

प्रा. डॉ. . पि. धांडे

पि. आय. सि. टी. , पुणे

9822406967

apdhande@pict. edu

प्रकरण 1: मंत्रयुग आणि मंत्र

प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे येथे फक्त पुराणातिल युगांचाच विचार मांडला आहे कारण हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे ज्याला उगम नाही. यात चार युगांचा प्राचीन ऋषी, मुनींनीलिहिलेला संदर्भ आहे तो म्हणजे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. या युगांचाकाळ जो दिला आहे तो सत्ययुग (४८००वर्ष), त्रेतायुग (३६००वर्ष), द्वापारयुग (२४००वर्ष) वकलियुग (१२००वर्ष). एक युग संपतांना आणि दुसरे सुरु होतांना मधल्या काळात संधी काळ (सुमारे १००० वर्ष) असतो जसे दिवस संपुन रात्रारंभ होण्यामधील काळ. येथे स्पष्ट म्हटले आहे कि हि चार युगे संपल्यावर मनूचे(ब्रह्मदेवाचा) एक शासन संपते व दुसरे सुरु होते.

डॉ. पि. व्ही. वर्तक लिखित 'वास्तव रामायण' या पुस्तकानुसार सुमारे पंधराहजार वर्षांपूर्वी महाप्रलय झाला होता असे आजचे भुशाश्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी 'मनू' हा झाला. या मनूपासून जो काळ सुरु झाला त्याला मी 'मन्वन्तर' म्हणतात. युगांतकाळ जर बारा हजार वर्ष म्हणजे एक युग जर धरले तरी सुद्धा मनुपुर्वी सहा मनू झाले असे आपल्या प्राचीन क्रुषींनी लिहून ठेवले आहे.

साहजिकच सत्ययुग हे देवांचे * (?) युग होते. त्यांच्या जवळ अनेक प्रकारच्या शक्ती होत्या. या शक्ती त्यांच्या जवळ उपजतच असाव्या कारण कोण्याही देवाने शक्ती मिळविण्यासाठी काही यज्ञ, तप केले असे सांगितले नाही. तसेच या काळात लोक सत्यवचनी, अतिशय प्रामाणिक होते किवां निस्वार्थी, निष्कलंक होते. याच काळात ऋषी, मुनींनी मंत्र संस्कृत भाषेत लिहुन ठेवले होते कारण संस्कृत हि देवांची भाषा होती असे मानले जात होते व हि भाषा आजही जगात सर्वसमृद्ध भाषा आहे.

मंत्र म्हणजे देवांकरिता व त्याला प्रसन्न करण्याकरता गायलेली स्तुतीसुमने आहेत जी होम, हवन, एका विशिष्ट वेळी श्रद्धा, तत्परता, संयम व एकग्रतेने सांगितलेल्या चालीवरच म्हणायला हवे. असे करण्यामागचा उद्देश हाच कि प्रत्येक देवाजवळ एक विशिष्ट शक्ती आहे व ती शक्ती प्राप्त करण्यासाठी केलेली पुजा कि जेणेकरून देव प्रसन्न होऊन ती शक्ती आपल्याला मिळावी. याच प्रमाणे शक्ती प्राप्त करणारा मनुष्य देखील सत्वशील असावा. उदाहरणार्थ भगवान शंकराजवळ अनेक शक्ती होत्या ज्या कि फक्त त्याला प्रसन्न करूनच मिळवता येत होत्या. कालीमाता जीची अघोरी मंत्र सिद्ध करण्यासाठी मंत्र सिद्धी केली जाते, या प्रमाणे अनेक मंत्र सांगितले आहे त्यापैकी काही असे:गायत्री मंत्र, शांती मंत्र , शिवसूत्र मंत्र, जय गणेश, जय हनुमान, गुरु मंत्र , महा मृत्युंजय मंत्र आणि पुष्कळसे.

* देव कोण होते आणि इतर * ने दर्शिविलेले याचे सर्व स्पष्टीकरण ब्रह्मांड आणि ईश्वर हे मी लिहिलेल्या पुस्तकात दिले आहे जे पुस्तक इ -साहित्य किंवा बुकगंगा या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

मंत्र सिद्ध होण्याकरिता काही नियम आहेत ते थोडक्यात सांगता येण्यासारखे म्हणजे तपश्चर्या करणे, दृढविश्वास, शुद्ध आचरण, काळ, वेळ, ज्या देवतांना प्रसन्न करावायचे आहे त्यांची विधिवत स्थापना, पुजा, पथ्य पाळणे ईत्यादी.

काही जीवनावश्यक मंत्र व त्यांचे महत्व खालील प्रकारे सांगता येईल.

ॐ: विश्व निर्माण होतांना महास्फोटाच्या वेळी जो ध्वनी निर्माण झाला तो ॐ या प्रकारे झाला असे म्हटले जाते. हा मंत्र दिव्यशक्तीची जाणीव करणारा आहे. यामुळे शरीरातील सातही चक्र जागृत होतात.

ॐ:नमो:शिवाय :हा मंत्र मन शुद्ध करण्यासाठी तसेच आत्मविश्वास , मानसिक स्थिती उंचावण्यासाठी आहे.

ॐ:शांती मंत्र:याचा उपयोग शांती, सुरक्षा, आशीर्वाद, एकता या कामासाठी करतात.

गायत्री मंत्र:मनाला अधिक उत्प्रेरिक करण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो.

लक्ष्मी गायत्री मंत्र:हा मंत्र चांगल्या भवितव्या साठी, धन वृद्धी , स्वस्थ शरीर , मैत्रीपूर्ण समंध उपयोगात येतो.

ॐ:राम रामौ रामःहा समतौल राखण्यासाठी , ऊर्जा, शक्ती साठी उपयोगात येतो.

ॐ:मणी पदम हम:याचा उपयोग गायत्रीमंत्रा सारखा होतो.

यानंतर मंत्र , मंत्रविद्या आणि तंत्रविद्या या बद्दल थोडेसे पाहू. मुळात विद्या हा शब्द विद+ द्या =विद्या असा आहे. येथे विदयाचा अर्थ परिश्रमरुपी मिळविलेले ज्ञान आणि द्या म्हणजे देणे. याचाच अर्थ परिश्रमाने मिळविलेले ज्ञान दान करणे. मंत्र हे अध्यात्मीक शक्तीचे रूप आहे ज्याच्या पठणाने मनुष्य आनंदी होतो व ईश्वरराच्या चरणी लिन होतो तर मंत्रविद्या ही सरावाने केलेल्या मंत्राचा मध्यबिंदू आहे जी एकामनुष्या कडून दुसऱ्याला मंत्राचे सतत पठण करून किंवा गुरु-शिष्य परंपरेने दिल्या जाते जी गुरु कडून शिष्याला अथक परिश्रम करून ज्ञान रूपाने मिळवता येते. परंतु ती फक्त गुरु प्रसन्न झाल्यावरच मिळते आणि गुप्तरूपाने शिष्याजवळच राहते. तंत्रविद्या/ज्ञान हे देखील लिखित स्वरूपाचे मंत्र आहेत जे(पुरातन युगात)विविध लिखित, आकृत्या, चिन्हे याप्रकारात मोडतात. सहसा:हे झाडांपासून बनविलेले पात्र जसे भोजपात्र, तांब्यापासून बनविलेले ताम्रपात्र आणि आताच्या युगात कागदांवर आढळतात.

मंत्रविद्येचे तिन प्रकार आहेत १) अस्त्र २)काम ३) परा. यापैकी अस्त्रविद्या ही शस्त्रांशी निगडित आहे, काम विद्या हि इच्छित फळ प्राप्तीसाठी आहे तर परा हि मुक्ती किंवा मोक्ष प्राप्तीसाठी आहे. विद्या प्राप्त करण्यासाठी काही विशिष्ट देवतेची आराधना करावी लागते ज्यांची माहिती वेद आणि पुराणात दिली आहे. मंत्र सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी या गुपित ठेवाव्या लागतात त्यापैकी काही अशा.

१) मंत्र हे एका विशिष्ट भजल्या जाणाऱ्या देवतेचे ध्वनिरूप आहे आणि म्हणुनच भजक आणि भाज्य या मधला गुप्तदुवा आहे आणि म्हणुनच हे गुप्त ठेवणे आवश्यक आहे.

२) मंत्रविद्या हि अनुभवावी लागते याची जाहीर वाच्चता केल्या जाऊ शकत नाही.

३) गुरुकडुन दिलेले ज्ञान हे प्रत्येक शिष्याच्या शिकण्याच्या कुवतीवर अवलंबून असते आणि म्हणुनच गुरु अशाच शिष्यांना देतात जो त्यांना योग्य वाटतो.

४) मंत्रविद्या हि वेगळ्या प्रकारच्या विज्ञाना प्रमाणे आहे ज्याला निश्चित नियम व

पद्धत आहे. ज्या प्रमाणे नाभिकीय विघटन (Nuclear fission) हा शब्द मंत्र जाणणाऱ्याला समजू शकतो त्याच प्रमाणे तंत्रशास्त्रातील तज्ञाला.

मंत्रांचे मुख्यतः तिन प्रकार आहेत. १) वैदिक मंत्र २) तांत्रिक मंत्र आणि ३) पौराणिक मंत्र.

वैदिक मंत्र:वेद हे संस्कृतातील मंत्र आहेत. हे मंत्र आचार्य वेदव्यासांनी लिहीलेले आहेत. वैदिक काळ हा पुराणात दिलेल्या माहितीनुसार जवळपास . सा पुर्व. ६०० चा आहे. या काळात वैदिक मंत्र, कर्मकांड केले जात. वेद हे पुन्हा:चार आहेत. ऋग्वेद, यजुर्रवेद, साम आणि अथर्ववेद. वरील वेद हे देखील चार भागात आहेत. १)मंत्रभाग २)ब्राम्हणभाग ३)अरण्यकभाग आणि ४)उपनिषेद अथवा वेदांत. गायत्री मंत्र, महामृत्युंजय, महापंचाक्षरी आणिअष्ठाक्षरी मंत्र हे काही महत्वाचे वैदिक मंत्र आहेत. आता हा मंत्रविधी सामूहिकपणे होता एकट्याने जपले जातात. सादारणतःहे मंत्र मन:शांती साठी जपले जातात. याला देखील तिन प्रकार सांगता येतील १) आदिदेविका तप २) आदीभौतिका तप ३) अध्यात्मिक तप. पहिले तप हे नैसर्गिक आपत्ती, भुकंप वादळं पासुन, दुसरें युद्ध, कीटकांचे उपद्रव तर तिसरे स्वतःच्या शारीरिक व मानसिक संतुलनासाठी. एका हातात खर्टल (चिपळ्या) गळ्यात विणा घेतलेले भूलोक आणि स्वर्गात प्रवास करू शकणारे नारद मुनी हे याच काळात जन्मले.

तांत्रिक मंत्र: याची मुळ रचना तन + विस्तार अशी आहे. याचा गाभा शुद्धी हा आहे. शुद्धी म्हणजे स्वतःची व इतरांची. याचे तिन भाग तंत्र, मंत्र आणि यंत्र असे आहेत. या पैकी तंत्र हे धार्मिक, मंत्र हे उच्चरित आणि यंत्र हे रेखित आणि पंचधातुंची(तांबे, पितळ, सोने किंवा पंचलोहा) पुजा करण्यासाठी आहेत. याची काही उदाहरणे अशी देता येतील. ओं इम ऱ्हिम ष्रीम श्री मात्रे नमः, का ये ला ऱ्हिम सा का ला ऱ्हिम ष्रीम. तांत्रिक मंत्र नेहमी शुद्ध अंतकरणाने पूजा आणि पाठ करून प्राप्त होतात. याचे देखील दोन मार्ग आहेत ते म्हणजे वाम मार्ग आणि दक्षिणा मार्ग. वाम मार्ग हा नेहमी कामुकतेचा आहे तर दक्षिण मार्ग हा धार्मिक चालीरीती नुसार आहे.

पौराणिक मंत्र: पुराणातील मंत्र हे वैदिक मंत्रानंतरचे आहेत. हे देखील वेदांवरच आधारित आहेत परंतु काव्यरुपी सांगितलेल्या गोष्टीत आहेत. जशी गीता, रामायण इत्यादी. पुराणातील भाषा जर व्यवस्थित समजावून घेतली नाही तर ती मनुष्याला गोंधळात टाकते आणि जर समजली तर एक अतिविशाल माहिती संग्रह मिळतो. पुराणाचे जवळपास अठरा खंड आहेत जे शिव पुराणापासून ते गरुडपुराणा पर्यंत असे अठरा. यात अनेक मंत्र, उपासना, जप, तप यांचा उल्लेख आहे.

मंत्र जे आधुनिक युगात चमत्कार मानल्या जातात त्यावर अधिक काही दाखले देतो. एकदा श्रीकृष्ण आपल्या गोपाळांना सवंगडयांनां घेऊन गोवर्धन पर्वतावर गेले होते. अचानक जोरात पर्जन्यवृष्टी सुरु झाली. यामुळे गोपाळ सवंगड्यांची त्रेधातिरपीट उडाली गोंधळ माजला. तेंव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत हाताच्या करंगळीवर उचलला त्यांचे रक्षण केले अशी एक गोष्ट लहानपणी मी वाचली होती. आता ज्या गोष्टी अशक्यकोटीत मोडतात त्याला आजच्या युगात चमत्कार, जादू अशी नावे देण्यात येतात कारण या गोष्टीवर एकतर विश्वासबसणे कठीण आहे आणि जर बसला तर आजच्या मानवाच्या बुद्धीपलीकडे किंवा आकलन होणारे असे मंत्र ज्ञान आहे.

दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या देवी देवाततात अग्र पूजेचा मान असलेले गणपती ज्यांना हत्तीचे मस्तक आहे. त्यामागे देखील समृद्ध मंत्रांचा प्रभाव आहे. एकदा पार्वतीने स्नान करण्या पूर्वी स्नानगृहात जातांना छोट्या गणेशाची एक मातीची मूर्ती तयार करून तिला स्नानगृहासमोर रक्षक म्हणून बसवले. त्यामूर्तीला तिने स्नान करतांना कोणालाही येऊ देण्याची आज्ञा दिली. थोड्यावेळाने शिव तेथे आले त्यांनी खूपवेळा सांगून देखील मूर्तीने विरोध केला तेंव्हा शिवांना राग आला. त्यांनी त्यांच्या गणांना मूर्ती नष्ट करण्याची आज्ञा केली तेंव्हा गणेशाने त्या गणांचा पराभव केला शेवटी शिवाने त्यांच्या त्रिशुलाने मूर्तीचे मस्तक उडविले.

पार्वतीला हे बातमी कळल्यावर तिने खूप आकांताण्डव केले आणि तिने बनवलेली मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे पाहून ब्रह्मदेव देखील घाबरले आणि त्यांनी पार्वतीला तसे करण्याची विनंती केली. तेंव्हा शिवाने ब्रम्हाला सांगितले कि बाहेर जाऊन जो कोणी जिवंत प्राणी दिसेल त्याचे मस्तक आण. ब्राह्मणे लगेच बाहेर जाऊन हत्तीचे मस्तक आणले. शिवाने ने ते मस्तक मूर्तीला जोडून मंत्राच्या साह्याने पुन्हा मूर्तीत जीव आणला. शिवाने लगेच त्याला स्वतःचा मोठा मुलगा म्हणून त्याच्या गणांचा पती म्हणजेच मुख्य नेमला. आणि म्हणूनच गणपतीला गणाधीश असेही म्हटले जाते. येथे जे आधुनिक वैद्यकीय शास्त्रात चाललेले अवयव बदलांचे उदाहरण म्हणता येईल. आज वैद्यकिय विज्ञानामुळे मृत व्यक्तीचे हृदय, डोळे आणि पुष्कळ अवयव दुसऱ्या जिवंत व्यक्तींना बदलता येतात फक्त डोके बदलणे आजही शक्य झाले नाही जे त्याकाळात मंत्राने होत होते.

तिसरा दाखल महाभारतातील देता येईल. अभिमन्युचा चक्रव्युव मध्ये वाढ झाल्यावर जयद्रथाने त्याच्यावर लत्ताप्रहार केला होता तेंव्हा अर्जुनाने प्रतिज्ञा केली कि उद्या संध्याकाळपर्यंत जयद्रथाचे मस्तक उडविल अथवा अग्नी प्रवेश करेल. संध्याकाळला थोडा अवकाश होता परंतु जयद्रथ अर्जुनाच्या दृष्टीस पडत नव्हता तेंव्हा कृष्णाने संध्याकाळस थोडा अवकाश असतांना सूर्य झाकाळुन अंधार पडला जयद्रथ अतीव आनंदाने बाहेर आल्यावर अर्जुनाला दाखवून जयद्रथ वध करविला. याला देखील चमत्कार या नावे सांगितले जाते. कदाचित या काळातला दृष्टीभ्रम या सदराखाली याला संबोधता येईल. या प्रकारे शिखंडी, शंकराला अर्ध नटिनटेश्वर, हनुमानाने भीमाचा गर्व हरण करणे असे अनेक उदाहरणे देता येतील जे आजच्या युगात देखील बऱ्याचशा फरकाने पाहायला मिळतात.

द्रौपदीचे अक्षयपात्र (थाळी)हे सुर्याने पांडव वनवासात असतांना युधिष्टीराला दिले होते. जो पर्यंत पात्र धुणार नाही तो पर्यंत ते सर्वांना पुरेल इतके अन्न पुरवीत असे पण एकदा का धुतले कि दुसऱ्या दिवसापर्यंत त्यातुन अन्न मिळत नसे. एकदा दुर्वास ऋषी द्रौपदीची परीक्षा पाहण्याकरिता त्यांच्या शिष्यगणांसह मुद्दाम जेवायची वेळ टळल्यावर द्रौपदीकडे आले तिला जेवायचे आहे असे सांगुन शिष्यांसहित स्नान करण्यास गेले. द्रौपदीने पात्र धुतले होते तेंव्हा दुसऱ्या दिवसापर्यंत काहीही मिळणार नव्हते. तेंव्हा द्रौपदीने कृष्णाचा धावा केला आपली कहाणी सांगितली. यावर कृष्णाने अक्षयपात्र द्रौपदी आणायला सांगितले. त्यात शिल्लक असलेले भाजीचे पान खाऊन तृप्त ठेकर दिली तेंव्हा स्नानाला गेलेल्या शिष्यांच्या ऋषींना देखील पोट भरल्याची जाणीव झाली. अशा रीतीने द्रौपदीवरील संकट टळले. असे अक्षयपात्र खरोखरच मंत्राशिवाय अस्तित्वात असू शकत नाही किंवा हि दंत कथा देखील ठरत नाही.

जुन्या म्हणजेच सत्य आणि त्रेता युगात अंतराळाचा वेध घेतला असे उदाहरण सापडत नाही याचे कारण तेंव्हाचे लोक हे स्वतः अंतराळ विहार करित असत आणि कदाचित त्यांनीच हे अंतराळ बनवले असेल.

त्यानंतर द्वापार आणि कलियुगात भविष्याचा वेध घेणे सुरु झाले याचे प्रमाण कलियुगात आधुनिकते कडे वळले. याच युगांत कुंडली, ग्रह, तारे या वर आधारित भविष्य पाहणे सुरु झाले. इच्छीत गोष्ट साध्य करण्याकरिता मंत्र हे उपयोगी पडत त्यामुळे मंत्रांवर त्यालोकांचा ज्यास्त ओढ असत.

या प्रकारे मंत्रात अनेक प्रकारचे ज्ञान सामावलेले आहे. परंतु हे प्राप्त करण्यास मनुष्याला अनके प्रकारचा त्याग, कष्ट, आराधना, उपासना इत्यादी कराव्या लागतात आणि फळ हे मंत्र सिद्ध झाल्यावरच प्राप्त होते.

वरील सर्व मंत्र हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यात लिहिले आहेत. वेद कोणी लिहिले याला काही उत्तर नाही. असे म्हणतात कि वेद हे पृथ्वीवरील सर्वात पहिले लिहीले गेले आहेत (पृथ्वीच्या जन्म सोबतच आले). या नंतर अठरा पुराणे नंतर इतर साहित्य निर्माण झाले किंवा केले गेले.

ज्योतिष महामहोपाध्य पं. किसनलाल शर्मा लिखित 'रावण संहीता' या पुस्तकात अनेक मंत्र, साधना आणि सिद्धी याचे वर्णाला दिलेले आहे. त्यापैकी काही गोष्टी येथे नमूद करतो. येथे एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि सिद्धी आणि मंत्र हे दोन वेगळे आहेत. सिद्धी हि देखील खडतर तपश्चर्यानेच प्राप्त होते तर काहींना उपजतच प्राप्त असतात त्या फक्त स्वतः करीताच उपयोगात आणता येतात. जसे 'हनुमानाला 'नऊ सिद्धी प्राप्त होत्या तर मंत्राचा उपयोग हा एकतर स्वतः करीत अथवा दुसऱ्यांकरितादेखील करता येतात.

या पैकी काही मंत्र म्हणजे ) त्र्यंबक मृत्युंजय ) वशीकरण मंत्र ) डाकिन्यादि भय विनाशक मंत्र ) स्तम्भन मंञ ) विद्वेषण )उच्चाटन मंत्र ) मारणं मंत्र ) आद्र्परी मंत्र ) गुटिका साधन मंत्र १०) पादुका साधन मंत्र ११) जलोपरि भ्रमण मंत्र. हे सर्व मंत्र इतर अनेक भगवान शंकाराकडून रावणाला मिळाले. त्याच प्रमाणे सिद्धी/साधना देखील आहेत त्यापैकी काही ) काली साधना ) तारा साधना ) भुवनेश्वरी साधना ) छिन्नमस्तक साधना ) बगलामुखीसाधना ) यक्षिणी साधना ) वाचासिद्धी साधना )योगिनी साधना. या रावणाने प्राप्त केल्या होत्या. त्याच प्रमाणे हनुमाना जवळ असलेल्या सिद्धी या प्रमाणे अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्र्राप्ति, प्राकाम्या, ईशत्व वस्त. या त्यांना उपजतच प्राप्त होत्या.

महाभारतात श्रीकृष्णाने सत्ययुगाचे केलेले वर्णन असे होतॆ 'या युगात गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता तसेच श्रमिक वर्ग देखील नव्हता कारण श्रमाकरिता लागणाऱ्या सर्व गोष्टी मंत्रानेच होत होत्या. वाईट विचार, दुर्बुद्दीला ठार नव्हता किंवा लोक दुर्बुद्दीला दुर सारत. येथे कोणीच आजारी राहत नसे आणि मानवजातेला उत्कृष्ट आशीर्वाद लाभला होता' म्हणजे अतिशय समृद्ध असा हा काळ होता.

प्रकरण २: मध्यकालीन तांत्रिक युग आणि तंत्रज्ञानाचा उदय

तंत्रयुग हे द्वापार युग संपून त्रेतायुगात सुरु झाले [१] त्रेतायुग विकिपीडिया]. यात रामाचा जन्म झाला तसेच वामन अवतार देखील झाला. यात राम रावण जी काही शस्त्रे वापरल्या गेली ती मंत्रानें चालवाव लागायची. शस्त्रे वापरतांना कुठल्या तरी देवाची आज्ञा / अनुमती /किंवा काहीतरी स्मरून वापरावी लागत. हेकाही तरी’ म्हणजे मंत्र असावेत कारण शस्त्र चालविल्यावर त्याचा प्रभाव सृष्टीवर होणाऱ्या आघाता रूपात दिसायचा उदा. आग लागणे, पाऊस पडणे, एका बाणापासून अनके बाण उत्पन्न होणे वगैरे. त्याच प्रमाणे 'पुष्पक विमानाचा' विमानांचा झालेला वापर. तसेच इंद्रजित ने लक्ष्मण नागपाशातून मुक्त झाल्यावर एका गुप्त ठिकाणी जाऊन 'निकुंभीलयज्ञ' निकुंभी देवीला प्रसन्न करण्यासाठी सुरु केला. यज्ञ संपल्यावर तो अदृश्य रुपे युद्ध करण्याची शक्ती प्राप्त झाली असती. हे सर्व विभीषणाने रामाला सांगितले तेंव्हा रामाने यज्ञ संपण्या अगोदरच इंद्रजितचा वध केला. जर हा यज्ञ पूर्ण झाला असता तर इंद्रजितने राम आणि लक्ष्मणाचा वध करून युद्ध जिंकले असते. येथे एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि शक्ती प्राप्त होणे म्हणजेच एकाची शक्ती दुसऱ्या कडे रूपांतरित होणे तसेच मनाची एकाग्रता मनाच्या अंतिम टप्प्यात आणणे (full mind concentration) लागत असे.

महाभारतात देखील अर्जुनाकडे सुदर्शनचक्र होते. या चक्राचा वापर कृष्णाने देखील संयमाने केला. जेंव्हा शिशुपालाचे शंभर गुन्हे झाले तेंव्हाच कृष्णाने चक्र सोडून त्याचा वध केला. म्हणजेच शस्त्र हे फक्त संयमानेच वापरावी लागत. त्याच प्रमाणे अर्जुनाने आचार्य द्रोणाचार्यांकडून शिकलेल्या विद्या, एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार करून स्वतः मिळविलेल्या विद्या ह्या मनाची एकाग्रता करून मिळविल्या. कृष्णाने करंगळीवर उचललेला गोवर्धनपर्वत, कालियामर्दन हे देखील त्याच्या जवळ असलेल्या मंत्राचे (शक्तीचे) द्योतक आहे.

संत तुकाराम महाराजानीं लिहिलेल्या गाथा, किर्तनाने केलेली समाज जागृती हि सर्व श्रोतच आहे. असे सांगतात कि त्यांना मृत्यूसमयी वैकुंठात न्यायला श्री भगवान विष्णूचे पुष्पक (गरुड) विमान आले होते तसेच विमानाचे काही प्रकार पूर्ण पासून अगदी काही शतकांपूर्वी लोकांना माहित आहे/पहिले आहे. जसे रुक्मा, शकुन पुष्पक ह्या विमानाची माहिती अनेक त्याकाळच्या ग्रंथात सापडते. विमानां बध्दल अधिक माहिती महर्षी भारद्वाज रचित 'थात'बृहद् विमानशास्त्र' या ग्रंथात दिली आहे. या प्रकारचे अनेक दाखले आपल्या धर्मग्रंथातून देता येतील. 'समरांगण सूत्रधार 'हा ग्रंथ मध्यप्रदेशातील उज्जैन जवळ असलेल्या 'धार ' या राज्याच्या ‘भोज’ राजाने लिहला आहे. त्यांच्या मते विमान हे आकाश गमन करणारे एक यंत्र आहे. या पैकी पहिल्याच प्रार्थना मंत्रात राजा लिहतो "सूर्य नक्षत्र रुपी चक्राने फिरविले जाणारे हे एक जगत् यंत्रच आहे, पण त्याचा मध्य दिसत नाही. सर्व भूतांचा बीजांचा पूर्ण विचार करून जो मदनांतक शंकरच त्याला सतत फिरवतो तो तुमचे कृपापूर्ण रक्षण करो".

या प्रार्थनेने असे लक्षात येते की ग्रंथात प्रार्थना लिहणारा तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ता होता. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे संस्कृतातील लिखाण हे पुष्कळदा सुभाषित आणि श्लोकात असते. श्लोकात मंत्रांची माहिती असते हेच मंत्र आजच्या तंत्रज्ञांचे मूलभूत आधार स्तंभ आहेत.

त्याच प्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वादविलेले वेद, चांगदेव महाराजांचे गर्वहरण करण्यासाठी चालविलेली भिंत. या सर्व गोष्टी 'चमत्कार' या नावे जरी सांगितल्या जातात तरी ते चमत्कार केवळ मंत्रशक्तीमुळेच घडत होते. कारण पहिले सांगितल्याप्रमाणे हे सर्व केवळ ती विशिष्ट शक्ती धारण करणाऱ्या देवतेला निस्सीम स्मरूनच केल्या जात होत्या आणि असे करणारे संत हे पूर्वी होऊन गेलेल्या देवांचेच रूप म्हणायला पाहिजे.

त्या नंतर शिवाजी महाराज सन १६३० मध्ये जन्मले आणि त्यांनी १६४५ मध्ये रायरी येथे स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी करंगळी कापून रक्ताभिषेक करतांना भवानी मातेने त्यांना तलवार दिली होती असे सांगितल्या (मानल्या)जाते. हे जर खरे म्हणजे तर भवानी माता मंत्रानेच जागृत झाली असली पाहिजे.

मंत्रशक्तीचा प्रभाव आजही जनमाणसांवर आहे. आजही तांत्रिक मंत्र जसे करणी, जादूटोणा, एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी दिलेला नरबळी तसेच अध्यात्मिक मंत्रांचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी, हरवलेली वस्तू शोधण्याकरिता, मंगल कामांकरितावगैरे केला जातो. पाश्चिमात्य देशात देखील दोन्ही तांत्रिक आणि अध्यात्मिक कामांसाठी मंत्र उपोयोग करणारे लोक आहेत. मंत्रात असणारे अनेक शब्द, श्लोक अगदी त्याच लयीत, सांगितलेल्या विधी प्रमाणे करावी लागतात. मंत्र उच्चरणे देखील चुकले तरी मंत्र निरुपयोगी ठरण्याची शक्यता असते किंवा प्रभावहीन ठरतात. या मुळे सामान्य माणसाला मंत्र शक्ती प्राप्त करणे /मिळणें केवळ अशक्य होते. या मुळे तो एकतर उपाय करीत नसे किंवा यातील जाणकार लोकांकडून करण्याचा प्रयत्न करी.

शेवटी मंत्र म्हणजे काय तर एक (दैवी)शक्ती. हे जेव्हा मनुष्याला समजले तेंव्हा त्याने विविध अस्तित्वात असलेल्या आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींचा वापर करून तंत्रशक्तीचा वापर सुरु केला आणि येथूनच तंत्रयुगाचा प्रारंभ झाला.

यात मनुष्यने मंत्राने मिळणारी अदृश्य ऊर्जा हि दृश्य स्वरूपात अस्तित्वात असलेल्या गोष्टी (तंत्रज्ञान) वापरून मंत्रांवर विसंबने सोडले. जर पाश्च्यात्य ( म्हणजे उत्तरेकडिल देश) देशांचा विचार केला तर असे दिसते कि तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे वातावरण अतिशय विषम आहे. कुठे सतत थंडी, बर्फ, कुठे बाराही महिने पाऊस, कोठेअतिशय उष्ण तर कुठे गरम असा भाग, कुठे नेहमी येणारी वादळ, नैसर्गिक आपत्ती अशा विपरीत परिस्थितीत त्याला निसर्गाशी जगण्याकरिता निसर्गाशी जुळवून घेणे क्रमप्राप्त होते. या साठी हळुहळू दगडांऐवजी विविध आयुधे (शस्त्रे) शिकारी करीता निर्माण करणे, राहण्याकरिता गुहा सोडून समूहाने झोपड्या(झाड्यांच्या, किंवा निसर्गाला अनुकूल), ते आजच्या आधुनिक शश्त्रास्त्रे बनविण्या पर्यंत मजल मारली आहे ती केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर. अशा प्रकारे त्याने तंत्रज्ञानाचा वापर ते निर्माण करण्यापासून ते सर्वतोपरी वापरून आपले राहणीमान उंचावले. यातूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा पाय रोवला गेला.

प्रकरण ३:आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय.

जसा जसा तंत्रज्ञानाचा वापर होत गेला तसे तसे तंत्रज्ञाचा प्रचार आणि प्रसार एकीकडून दुसरीकडे होत गेला. यात लोकांना आणखी काही नवीन कल्पना सुचून तंत्र विकसित होत गेले आणि सोबतच तंत्रज्ञान देखील. जवळपास . सा. पूर्व ३५०० मध्ये चाकाचा शोध लागला तंत्रज्ञानाच्या प्रसाराने वेग धरला. लोक पाळीव प्राण्यांचा वापर करून जलद एकीकडून दुसरीकडे जाऊ लागले, अधिक माहितीचे देवाण घेवाण होऊ लागले. जेंव्हा माहितीचा संग्रह वाढला तेंव्हा तंत्रज्ञानाचे वेगवेगळे भाग पाडण्यात आले आणि त्यातूनच प्रत्येक भागातील माहितीचा साठा वाढत गेला आणि मग याला एक विशिष्ठ माहितीशी संलग्नित नावे देण्यात आली. जसे सूर्य , तारे या शास्त्रांना खगोल, निसर्गाचा अभ्यास करण्यारांना विज्ञान, अंकस्त्राला गणित, भविष्य सांगणाऱ्यांनाज्योतिषशास्त्र वगैरे. नव्याने निर्माण झालेले प्रत्येक शास्त्र हे पहिले सत्ययुग, द्वापारयुगात होते देखिल पण ते मंत्रांच्या रूपात संस्कृतमधे. हे देवांनी सांगितले होते याची मेख हि सर्वसामान्यांना कधीच सुटली नाही किंबहुना ते सर्वसामान्य लोकांसाठी नव्हते.

या नंतर चीन मध्ये बारुदीचा (दारू गोळ्याच्या पावडरचा) शोध जरी १० व्या शतकात लागला तरी तो फटाके संकेत (सिग्नल) पर्यंतच मर्यादित होता. त्या नंतर पाश्चिमात्य देशात तेंव्हा हे तंत्रज्ञान पोहोचले तेंव्हा याचा उपयोग बंदुकीच्या गोळ्यांसाठी, पर्वत फोडण्याकरता वैगरे स्फोटके म्हणुन होऊ लागला. १८ व्या शतकात 'बेंजमिन रॉबिन्स 'या गणितज्ञाने याचा उपयोग बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यास सुरवात केली या नंतरच्या युद्धत मोठ्या प्रमाणात याचा उपयोग या सुधारणा होत गेल्या. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे केल्याने मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.

तंत्रज्ञानातील सुरवातीच्या काळात लोकांना पहिले समुद्राची भीती वाटायची. कालांतराने काहीसे भीतभीत आणि अत्यंत हळुहळूपणे सागर प्रवास सुरु केला. अगदी ओबडधोबड लाकडे, त्यापासून बनविलेल्या नौका यातून प्रवास करून त्याने सागराची आत्यंतिक प्राथमिक तुटपुंजी माहिती संग्रहित केली जी त्याला लाख मोलाची वाटली. अगदी ताज्या फळांसाठी दाण्यासाठी एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावरु जवळच्या बेटावर केलेला प्रवास त्याला काहीतरी साहस केल्याचे आनंद वाटण्याइतका मोठा वाटायचा. या धाडसाने पुढे त्याला गोड पाणी, शिकारीकरिता डोकं लढविण्याकरिता प्रेरित केले असावे. धागे वळून दोरी बनवणे, मासे पकडण्याकरिता जाळे विणणे, गळ तयार करणे, सागरातले छोटे जीव पकडण्याकरिता सापळे लावणे म्हणजे सागरावर विजय मिळविण्याकरिता टाकलेले पाऊल ठरले. त्या नंतर हळुहळु तराफा बनवणे , शिडाची तराफे, शिडाची छोटी जहाजे नंतर कोळश्यावर चालणारीस्वयंचलित जहाजे आजच्या अणूइंधनावर चालण्याऱ्या पाणबुड्या इतपर्यंत त्याने मजल मारली(2 shodh sagracha s. malode).

त्याच प्रमाणे खगोलशास्त्रात देखील ग्रह ताऱ्यांबद्धल वाटणाऱ्या कुतुहलामुळे खगोल शास्त्र उदयास आले. पूर्वीचे लोक अवकाशातील दिसणाऱ्या वस्तूंना देवांच्या नावाने ओळखत. थंडी, वारा, ऊन पाऊस याचा समंध ते अवकाशातील दिसणाऱ्या वस्तूंशी जोडत. सर्वप्रथम सापडलेला . सा. पूर्व ६व्या शतकातील पुरावा हा चीन मध्ये मिळाला. वेळ समजण्यासाठी चिनी लोक चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थितीनुसार वेळ ठरवत.

पाश्चिमात्य देशात खगोल शास्त्राचा उदय अगदी . सा. पूर्व ३५०० तो ३००० पर्यंत सुमेरियन, बॅबीलॉन , आयरिया या संसस्कृती मिळतो. . सा. नंतर आलेले गॅलीलिओ गॅलिली, ऍरिस्टोटल, कोपऱर्निकस, केप्लर , न्यूटन यांनी खगोलशास्त्राचा पाय उभा केला नंतर विश्वरचनेचा कळस चढविला तो हबल, कार्ल सॅगन, अल्बर्ट आइनस्टाइन, यांनी. आता परग्रहावर जीवनाचा तसेच पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहावर लोकवस्ती शोधण्या करीत अनेक उपग्रह हबल, स्पिट्झर हे अंतराळात अतिशय दुरवर डोळा ठेऊन आहेत त्याच प्रमाणे अनेक radio telescopes दुरवर आकाशात संदेश पाठवत/ग्रहण करीत आहेत. SETI(Search for extraterriestrial Intelligance), NASA (National Aeronautic and Space Administration), ESA (europian space agency) सारख्या संस्था कार्यरत आहेत.

रशियाने सर्वप्रथम ऑक्टोबर १९५७ साली 'स्पुटनीक ' हा मानव विरहित उपग्रह यशस्वीपणे पाठवून अवकाश युगाची सुरवात केली. नंतर लगेच 'स्पुटनीक- ' हा 'लायका ' या कुत्रीला घेऊन रशियाने अवकाश युगात आपले पाय भक्कम केले. यावर लगेचच अमेरिकेने दोन उपग्रह पाठविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र ३१ जानेवारी १९५८ ला त्यांनी पाठविलेला 'एक्सप्लोर -' हा यशस्वीपणे पृथ्वीप्रदक्षिणा करू लागला. या नंतर काही काळ रशिया अमेरिका मध्ये अवकाशयुगात वर्चस्व निर्माण करण्याचे एकप्रकारचे शीत-युद्ध सुरु झाले. शेवटी डिसेंबर १९८७ साली दोघांमध्ये समझौता होऊन शीत-युद्ध संपले दोघांनी एकत्र येऊन या क्षेत्रात काम करायचे ठरविले.

अमेरिकेने सर्वप्रथम २० जुलै १९६९ मानवाला चंद्रावर उतरवून इतिहास रचला. या नंतर आंतरग्रहीय अवकाशयाने पाठविण्याचे अभियाने सुरु झाले. यात सर्वप्रथम १९६२ साली 'मॅरिनार -'हे शुक्र ग्रहांजवळून गेले, १९६५ साली मरिनर - हे मंगळाजवळून, १९७४साली पायोनियर-१०हेगुरु, मरिनार-१०हे पुन्हा मंगळाजवळून, पायोनियर -११ हे शनि, व्हॉयेजर १९८६ साली युरेनस , १९८९ नेपच्युन प्लूटो आणि त्यानंतर अंतरग्रहीय प्रवासासाठी निघाले. अमेरिकेचे स्पिरिट अपॉरच्युनिटी २००४ मध्ये मंगळावर उतरून एक यांत्रिकयुगाची सुरवात केली ती आज इतर ग्रहांवर यंत्रमानव पाठविणे , चंद्राचा अभ्यास करणे आपल्यासारखीच संस्कृती इतर ग्रहांवर आहे काय किंवा आपणास राहण्यास योग्य असा कुठला ग्रह आहे काय? हे शोधणे.

भारताने देखील २४ सप्टेंबर २०१४ रोजी 'मंगल यान' मंगळाच्या कक्षेत फिरते ठेऊन स्वतःच्या तांत्रिक प्रगतीची चुणूक दाखविली तसेच या क्षेत्रात फारच उन्नती केली आहे.

मध्याश्मयुगापासून माणसाने शेती करण्यास सुरवात केली. प्रथम त्याने पाळीव प्राणी पाळण्यास सुरवात केली. नंतर हरणाचे कळप, जंगली मेंढी, शेळी, कुत्रे, बैल हे प्राणी पाळले कारण हे प्राणी त्याला केव्हाही खाण्यास उपलब्ध होते. नंतर तयार नैसर्गिकरित्या उगवणारे गहू, बार्ली हि पिके पहिली त्यांची हवामानानुसार लागवड करण्यास सुरवात केली. पाळीव प्राणी आणि शेती करण्यास अशाप्रकारे सुरवात झाल्यावर केल्यावर त्याला एकाठिकाणी वस्ती करणे आवश्यक झाले. यातूनच त्याने झोपडी , धान्य साठविण्यासाठी भांडे कालांतराने हळुहळू कच्या विटा, मातीने लिंपून मोठ्या भिंतीच्या खोल्या बांधल्या. प्रदेशातील हवामानानुसार उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीनुसार झोपड्या (घरे) बांधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती निर्माण झाल्या. कुटुंब पद्धतव संस्कृती अस्तित्वात आली. प्राचीन सिंधू संस्कृतीतील लोक प्रगत शेती करीत होते. अनेक प्रकारची धान्ये, भाजीपाला , फळे ते पिकवत तसेच लाकडी नांगर, त्या काळातील कालवे निर्माण करून बागायती शेती देखील करत. सोबतच शिकार, मासेमारी देखील करून उदरनिर्वाह चालवीत. पुढे अनुभवाने ज्वारी, बाजरी याचे उत्पन्न देखील तो करू लागला. पुढे युगे बदलल्यावर शेतीत उत्क्रांती होत गेली(३).

यात प्रत्येक देशात/खंडात जसे चीन, युरोप, अमेरिका, रशिया, आशिया यात भूप्रदेशा नुसार, हवामानानुसार बदल घडत गेले. हळुहळू अधिक धान्य उत्पादनावर भर देण्याचा बदल झाला. त्याकरिता अधिक उत्पन्न देणारे बियाणे, रसायने यांचा प्रभाव होऊ लागला. या सोबतच मत्स्य व्यवयसाय, मांस व्यवयसाय, दुग्धवयसाय यात देखील प्रगती झाली आणि शेवटी आताच्या यांत्रिक शेतीपर्यंत भरभराट केली.

या प्रकारे जवळपास सर्वच क्षेत्रात जसे शेती, उद्योगधंदे, दळणवळण, संदेशवहन या जवळपास प्रत्येक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे जुने मंत्र जाऊन नवीन तंत्र हेच आजच्या समाजाचा कणा बनला आहे.

सारांश

प्रकरण , २ व ३ मध्ये जुने मंत्र आधुनिक तंत्र यांचा विचार मांडला आहे. काळानुरूप (युगानुरूप) तंत्रज्ञानाचा उदय ते आतापर्यंतचे आधुनिक तंत्र याचा देखील विचार मांडला आहे. जरी जुने मंत्र ज्ञान मागे पडले तरी या काळात देखील काही जनता मंत्रांवर विश्वास ठेवते यातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो. तांत्रिक युगात श्रद्धेचे दोन भाग झाले आहे ते म्हणजे डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा. यापैकी डोळस श्रद्धा हा एक माणसाचा पूर्ण विश्वास असलेला भाग आहे. यात कुठेही किंतु, परंतु नसते एखादी गोष्ट नक्की होणार म्हणजे होणार जसे रोज सुर्य पुर्वेस उगवणार म्हणजे उगवणार परंतु अंधश्रद्धेत मात्र किंतु , परंतु ह्या गोष्टी येतात. उदाहरणार्थ मी खुप अभ्यास केला म्हणजे मी परीक्षेत पास होणारच असा विश्वास असतो पण हाच विश्वास डळमळायला लागला तर मग देवाला पुजा, अंगारेधुपारे लाव असे प्रकार होतात यालाच अंधश्रद्धा असे म्हणतात. हे भारतातच नवे तर परदेशात देखील चालते. परदेश जो अतिआधुनिक समजल्याजातो आहे त्यात देखील भुताखेतांवर विश्वास ठेवणारी लोक आहेत त्याच प्रमाणे एखादी वास्तू किंवा इतर गोष्टी शापित आहे, पाप, पुण्य याचा पाढा देवासमोर वाचला जातो, पुनर्जन्म या वर तेथल्या पुष्कळशा लोकांचा देखील विश्वास आहे.

मंत्रज्ञान मागे पडले याचा अर्थ असा नाही कि ते अस्तित्वातच नव्हते. आजदेखील जे नावे शोध लागतात आहे त्या मागची कल्पना हि मंत्रयुगीन काळातीलच आहेत. फक्त ते मंत्रावर चालता तंत्रावर चालते. आणि म्हणुनच काळ जरी बदलला तरी प्रत्येक काळातील घटना सारख्याच असतात जसे महाभारतातील राज्यावरून झालेला महासंग्राम, रामायणातील सीताहरण, कृष्णा विरुद्ध रचलेले कटकपट, पाण्डवांना जाळण्याचा रचलेला कट, हे सर्व प्रकार आधुनिक युगात देखील घडतात. जुन्या ॠषी, मुनींनी कलियुगात लिहिल्याप्रमाणेच बऱ्याच घटना होतांना दिसतात. उद्या कदाचित एखादा नवीन राहण्याजोगा ग्रह जर शोधला तर याचे वर्णन (स्वर्ग) देखील शास्त्रांत दिलेले आहेच आणि आताची युद्धे हे कधीही महायुद्धाचे स्वरूप घेऊ शकतात. आणि त्यामुळेच कालाय तस्मै नमः असे म्हणतात.

संदर्भ

(१) ‘त्रेतायुग विकिपीडिया’ google. com

(२) 'शोध सागराचा' s. Malode

(३) 'महाराष्ट्राची कुळकथा ' डॉ. मधुकर केशव ढवळीकर

***