क्लाँथ... Writer Shubham Kanade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्लाँथ...

अर्पण.

हे छोटे पुस्तक

छोटी स्टोरी अनाथ आश्रमातील

सुसंस्कारी छोट्या मुलांना अर्पण.....

लेखकाचे मनोगत....

मी शुभंम कानडे मला वाचनाची आवड अकरावीत असतानाच लागली आणि त्याच बरोबर लेखनाचीही आवड लागली मला या वाचनाच्या आणि लिखाणाच्या संयोगामुळे कविता लिहिणे, छोटे लेख लिहिणे, शॉर्ट स्टोरी लिहिणे, फिल्म स्टोरी लिहिणे, पटकथा लेखन, असे खूप काही लिहिण्याची सवयच झाली.आणि मला माझ्यातील एक लेखक आणि एक कवी मला जाणवायला लागला आणि मला लेखकाची आणि कवीची उपमा मिळाली,

पण मी आत्ताचा एक नवीन लेखक कवी आहे.लेखनामध्ये काही चुकलं असेल तर माझी चूक तुमच्या पदरात घ्या आणि मला आणखीन जास्त आणि चांगल्या लिखाणासाठी पाठिंबा द्या म्हणजे मी ही तुम्हाला जितके चांगले माझ्या कडून देता येईल तितके देण्याचा प्रयत्न करिन आणि खूप काही चांगले मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीन माझ्या लिखानामधील एक छोटी कथा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत आहे कथा छोटी आहे पण शिकण्यासारखं खूप काही आहे या कथेचं नाव "क्लाँथ" असे आहे ही कथा पूर्ण वाचा आणि मला कळवा म्हणजे मला समजेल की माझ्यामध्ये काय कमी आणि काय जास्त आहे ते म्हणजे पुढल्या वेळेस मी तुम्हाला या कथे पेक्षा ही काही तरी चांगले वाचण्यासाठी आणि काहीतरी शिकण्यासारखे छोटं किंव्हा मोठं ही पुस्तक घेऊन येईन,

धन्यवाद

लेखक

शुभंम कानडे.

***

क्लाँथ…

शुभम कानडे

एक दहा वर्षाचा लहान मुलगा असतो, त्याचे नाव 'सचिन' असते, सचिन तसा दिसायला 'गुबगुबीत' आणि 'गोंडस' आणि 'गोरापान' सतत इतरांचा विचार करणारा आणि 'सुसंस्कारी' पण तो लहान असतानाच त्याची आई कायमचीच देवाघरी राहायला गेलेली असते, त्याचे लहानपणा पासून 'पालनपोषण' हे त्याच्या बाबांनीच केलेले असते, त्याचे बाबा दिसायला 'जाड आणि गोरे' होते, ते सचिन वर खूप प्रेम करायचे लाड तर खूप करायचे कारण त्यांना सचिन शिवाय आपलं म्हणण्यासारखं कोणीच नव्हतं सचिन च्या बाबांचे 'किराणा मालाचे' छोटेसे एक दुकान असते,

सचिन घराबाहेरील रॅकेट मधील शूज पायामध्ये घालत असतो, आणि त्याचे बाबा घरासमोरील अंगणात 'स्कुटर' घेऊन उभे असतात, कारण ते सचिन ला 'शाळेत' सोडायला जाणार असतात, सचिन शूज घालून स्कुटर वरती येऊन बसतो सचिनचे बाबा स्कुटर वरून सचिनला शाळेत सोडायला जातात शाळेला सोडायला जात असताना मध्येच रस्त्यात सचिन बाबांना स्कुटर थांबवायला सांगतो, त्याचे बाबाही स्कुटर थांबवतात सचिनला लांबूनच एका कपड्याच्या दुकानामधील बाहेर अडकवलेला एक ड्रेस खूप आवडतो, आणि सचिन बाबांना त्या दुकानाकडे घेऊन जातो ते दुकान छोटसच "क्लाँथ कलेक्शन" असतं, सचिन तो ड्रेस घेण्यासाठी हट्ट करू लागतो, सचिन व त्याचे बाबा त्या दुकानात जातात आणि सचिन चे बाबा सचिन ला आवडलेला तो ड्रेस त्या दुकानदाराला काढायला सांगतात दुकानदारही तो ड्रेस काढतो आणि सचिनच्या बाबांना त्या ड्रेस बद्दल माहिती सांगतो व त्या ड्रेस ची किंमतही सांगतो, दुकानदाराने किंमत सांगितल्या नंतर सचिन चे बाबा पहिल्यांदा आपल्या पँटच्या खिशात हात घालून ड्रेस घेण्याइतपत पैसे आहेत का नाहीत बघतात तर त्यांच्यांकडे ड्रेस घेण्याइतपत ही पैसे नसतात मग ते नाराज होतात आणि सचिनला काही कारण सांगून त्याला त्या कपड्याच्या दुकानातून घेऊन जातात, आणि सचिन ला शाळेत सोडून ते त्यांच्या दुकानावरती येतात आणि दुकान उघडून दुकानात बसतात तर त्यांचे कुठेच लक्ष लागत नाही फक्त आणि फक्त त्या ड्रेसचाच विचार गिराहीक दुकानात येत असतात जात असतात घड्याळाचाही काटा ही फिरत असतो, आणि वेळ ही पुढे सरकत असते कधी पाच वाजले हे समजतच नाही पाच वाजल्यानंतर सचिन चे बाबा दुकान बंद करून सचिन ला शाळेत आणायला जातात, स्कुटर घेऊन जातात तर सचिन शाळेच्या गेट च्या बाहेर येऊन थांबलेला असतो बाबा त्याला स्कुटर वरून घरी घेऊन येत असतात पण सचिन बाबांवरती रुसलेला असतो त्या मुळे काहीच बाबान बरोबर बोलत नसतो तो गप्प गप्पच असतो मग काय त्याचे बाबा मध्येच स्कुटर एका चहाच्या टपरी जवळ थांबवतात, टपरी एकदम छोटी असते नारळाच्या ढाप्यांचा अडुसा आणि सावलीला वरती लोखंडी पत्रा आणि बसायला लाकडी बाक अशी ती चहाची टपरी त्या टपरी मध्ये सचिन चे बाबा सचिन ला चहा प्यायला नेतात ते दोघे एका लाकडी बाकावर जाऊन बसतात, त्या चहाच्या टपरी मध्ये एक छोटा मुलगा कामाला असतो तो साधारणतः सचिनच्याच वयाचा असेल तो मुलगा त्या टपरी मध्ये आलेल्या एका कस्टमर कडे चहाचा कप घेऊन जात असतो त्या कस्टमर साठी सचिन चे सर्व लक्ष त्याच मुलाकडे असते तो मुलगा त्या कस्टमर ला चहा द्यायला जातो तर चुकून त्याच्या हातून तो चहा त्या कस्टमर च्या अंगावरती सांडतो, आणि त्या कस्टमर चा सर्व ड्रेस खराब होतो चहा सांडल्या नंतर तो मुलगा खूप घाबरतो त्याच्या चेहऱ्यावरती भीती दिसत असते हे सर्व बघून सचिन ही थोडा दचकतो, हा सर्व चहाचा प्रकार बघून टपरीचा मालक त्या मुलाला खूप काही बोलतो खूप कावतो मात्र तो मुलगा मान खाली घालून त्या टपरीच्या मालकाचे बोलणे खात असतो, मात्र तो कस्टमर त्या मुलाला काहीच बोलत नाही आणि उलट त्या टपरीच्या मालकाला ही गप्प बसवतो, तो लहान आहे असे सांगून विषय टाळतो, सचिन ला मात्र या गोष्टीचे आश्चर्यच वाटते की त्या कस्टमर चा इतका ड्रेस खराब झाला तरी तो त्या मुलाला काहीच बोलला नाही किती समजूतदार आहे तो कस्टमर तो पर्यंत तो मुलगा सचिनच्याच दिशेने चालत येत असतो दोन चहाचे कप घेऊन, सचिन चे त्या टपरीत गेल्या पासून फक्त त्या मुलाकडेच खूप बरीकसे लक्ष असते हे त्या मुलालाही माहिती असते अधून मधून तो मुलगा ही सचिन कडे बघत असतो, तो मुलगा चहाचे कप घेऊन त्यांच्या जवळ येतो सचिन आणि त्याच्या बाबांना तो चहाचा कप देतो सचिन चे लक्ष मात्र त्याच्या कडेच असते, त्या मुलाच्या अंगावरच्या कपडयाकडे सचिन चे लक्ष जाते तर त्या मुलाच्या अंगावरती एका ड्रेस ला वेगवेगळ्या कलर ची ढिगळे लावलेली असतात आणि त्यांची चड्डी ही त्याच अवस्थेत असते हे बघून मात्र सचिन ला खूप वाईट वाटते, पण सचिन तर काय करू शकतो त्यालाच एक ड्रेस मिळेना आणि मग या मुलाचं काय सचिन आणि त्याचे बाबा चहा पिऊन त्या टपरीतुन बाहेर येतात आणि स्कुटर वर बसून निघून जातात,

रात्रभर सचिन ला झोप लागत नाही त्याच्या डोक्यात खूप सारे प्रश्न येत असतात, बाबा मला तो ड्रेस घेऊन देतील का, त्यांच्याकडे पैसे तरी आहेत ना तो ड्रेस घेण्यासाठी, असे खूप सारे प्रश्नांनी त्याला गोंधळून सोडले होते,

तर तो बाबांकडे पैसे आहेत का हे बघण्यासाठी रात्री बाबा झोपलेलं बघून सचिन बाबांच्या पँट च्या खिशातील पैसे काढून घेतो आणि तो ते पैसे त्याच्या स्कूल बॅग मध्ये ठेवतो, आणि सकाळी लवकर उठून सर्व काही स्वतःच आवरतो त्याचे बाबा कोच वरती बसलेले असतात पेपर वाचत तर सचिन बाबांना मित्रांबरोबर शाळेत जाणार आहे असे सांगून शाळेला निघून जातो, पण तो कोणत्याही मित्रांबरोबर शाळेत जात नाही तर तो एकटाच शाळेत जाणार असतो, सचिन शाळेत जात असताना मध्येच रस्त्यात ते "क्लाँथ कलेक्शन" सचिनला दिसते, मग सचिन त्या दुकानात जातो, आणि त्याला जो ड्रेस आवडलेला असतो तो ड्रेस दुकानदाराला काढायला सांगतो, आणि दुकानदाराने जी किंमत सांगितलेली असते तितकेच पैसे तो त्याच्या स्कूल बॅग मधून काढून देतो आणि तो ड्रेस खरेदी करतो, तो ड्रेस स्काय ब्लू कलरचा टि शर्ट आणि ब्लॅक कलरची शॉर्ट चड्डी असा तो ड्रेस असतो, सचिन सायंकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचच्या सुमारास घरी परत येतो,

सचिन घराबाहेरील रॅक मध्ये शूज काढून ठेवतो आणि घराच्या आत येतो तर सचिन चे बाबा कोच वरती सचिनचिच वाट पाहत बसलेले असतात घरातील घड्याळात साडेपाच वाजलेले असतात, सचिन बाबांबरोबर काहीच न बोलता तो त्याच्या रूम मध्ये जात असतो, इतक्यात त्याचे बाबा त्याला बोलावतात आणि पँटच्या खिशातील पैश्या बद्दल विचारतात तर सचिन बाबांच्या त्या प्रश्नावरती नाही असे उत्तर देतो तरीही त्याचे बाबा त्याला गोड बोलून काऊन पैश्या बद्दल विचारतात ते सचिनची बॅग ही चेक करतात पण काहीच मिळत नाही बाबांच्या त्या बोलण्यामुळे सचिन खूपच रडतो आणि घाबरतोही सचिन रडतेल बघून त्याचे बाबा शांत होतात आणि सचिन ला रूम मध्ये जायला सांगतात,

सचिन चे बाबा सकाळी सचिनला शाळेत सोडायला जात असतात स्कुटर वरून पण सचिन त्याच्या बाबांबरोबर काहीच बोलत नाही सचिनचे बाबा मध्येच रस्त्यात स्कुटर थांबवतात आणि परत त्याच टपरीत चहा प्यायला जातात, तर तो चहाच्या टपरीतील तो लहान मुलगा चहाचे कप धूत बसलेला असतो, त्या टपरीतील मुलाकडे सचिन च्या बाबांचे लक्ष जाते त्या मुलाच्या अंगावरती सचिन ला आवडलेला तो ड्रेस असतो, हे बघून सचिन चे बाबा सचिनला म्हणतात की हाच ड्रेस तुला आवडलेला ना सचिन हो म्हणतो तो पर्यंत त्या टपरीतील मुलाचे लक्ष सचिन वर पडते सचिन आलेला बघून तो मुलगा ते काम तिथेच सोडून सचिन कडे येतो आणि सचिनला म्हणतो सचिन कसा दिसतोय मी सचिन चे उत्तर छान असते तरीपण सचिन काहीच बोलत नाही, तो मुलगा सचिनच्या बाबांना सांगतो की काका हा ड्रेस मला सचिननेच घेऊन दिला आहे हे ऐकून सचिन चे बाबा सचिन ला म्हणतात की हा जे काही सांगतोय ते खरे आहे सचिन खूप धाडसाने मनावर दगड ठेऊन होय म्हणून सांगतो, आणि या ड्रेस ची जास्त गरज माझ्या पेक्षा याला होती म्हणून मी हा ड्रेस याला घेऊन दिला सॉरी बाबा पण हा ड्रेस मी तुमच्या पँन्ट च्या खिशातील पैसे घेऊन आणला होता, सॉरी बाबा त्याचे बाबा सचिन ला जवळ मिठीत घेऊन रडू लागतात आणि जे अश्रू येत असतात ते आनंद अश्रू असतात, त्या टपरीतुन त्याचे बाबा त्याला चहा न पिताच पहिल्यांदा त्या क्लाँथ कलेक्शन मध्ये घेऊन जातात आणि सचिन ला एक ड्रेस घेऊन देतात..…

तात्पर्य:-

मदतीचा एक छोटा हात स्वतः पेक्षा इतरांची गरज ओळखणारा एक छोटा मुलगा या कथेमधून शिकायला मिळाल....

आभार.

हे छोट्या कथेचं छोटं पुस्तक तुम्ही वाचला आणि मला या पुस्तकाबद्दल काही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि माझं लेखनामध्ये काय चुकतंय या बद्दल ही चांगलं मार्गदर्शन केल्या बद्दल सर्वांचे आभार त्याच बरोबर मला लिखाणासाठी आणखीनच उत्स्फूर्त केल्या बद्दल ही सर्व वाचकांच आभार तसेच ही कथा ज्या लहान मुलांनी वाचली आणि या कथेतून काही चांगलं शिकलात आणि इतरांना ही. ही कथा सांगितलंत या बद्दल ही तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार

धन्यवाद

लेखक

शुभम कानडे.