* ती...
(भाव मनातील)
लेखक-शुभम कानडे
ती त्या दिवशी पाच च्या सुमारास शाळेतून घरी सायकल वरून अली मी तिच्या समोरच होतो ती ड्रेस ची ओढणी खांद्यावरती व्यवस्तीत घेत माझ्याकडे बघत होती ती बघताच मी दचकलो ती माझ्याकडे अशी बघत होती की जणू काही ती आणि मी एकमेकांचे जाणी दुश्मन असल्यासारखे पण तिला बघताच मी दचकलो आणि ती हसली "पण खरं सांगू ती रागाने बघत होती त्या वेळेस ती खूप छान आणि निरागस दिसायची ती रागामध्ये असतानाच खूप छान दिसायची" आणि मी पण तिच्याकडे बघून हसलो आणि या हसण्या हसण्या मुळे मी त्याच क्षणी तिच्या प्रेमात पडलो "ती खुप निरागस होती ती सर्वांना माया लावायची सर्वांसोबत हसतं खेळत असायची आणि रागात असली की खूप छान दिसायची खूप भांडायची पण सर्वकाही विसरून परत गोड बोलून जवळ यायची म्हणूनच ती मला खूप आवडायची"त्या दिवशी पासून मी तिच्या प्रेमात पडलो ती माझ्यासाठी माझी परी होती आणि मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा एक कविता लिहिली ती पण तिच्यावरती तशी साधीच कविता पण त्या मध्ये माझे तिच्या बदल चे पूर्ण भाव कवितेचे नाव
* "माझी परी"
माझी परी दिसत होती खूप छान
म्हणूनच तिला मी म्हणत होतो परी जाण...
माझी परी होती माझ्यासाठी गोडी
म्हणूनच तिला शोभून दिसत होती साडी...
माझी परी माझ्यासाठी होती पूर्ण माणुसकी
म्हणूनच ती माझ्या आयुष्यासाठी होती लकी...
माझी परी माझ्यासाठी होत माझं पाहिलं प्रेम
म्हणूनच आमच एकमेकांवर प्रेम होतं सेम...
माझी परी आणि मी आमची जोडी होती छान
म्हणूनच मी माझी होती आयुष्यभराची जाण...
माझी परी माझ्यासाठी होता पूर्ण विश्वास
म्हणूनच तिच्यासाठी मी सोडीन अखेरचा श्वास...
,पण खरं सांगू मी खरंच तिच्याशिवाय राहू शकत नाही ती मला आवडायची पण तिला मी आवडतो का नाही मला काय माहीत आणि कसल्याही परिस्थितीत ती मला हवी होती कारण तीच माझी लाईफ होती मग एक दिवस आला दिवाळी होती आणि त्या दिवशी लक्ष्मी पूजन होत तिने साडी नेसली होती त्यात आणि नाकावर राग साडी आणि राग म्हंटल्यावर ती खूपच छान दिसत होती त्या दिवशी मग काय तिने मला विचारलं की तुला मी आवडते!तू माझ्यावरती प्रेम करतोस मग काय मी हो म्हणालो पण नाकावरती राग आणत की पण तू मला नाही आवडत मी नाराज झालो आणि तिच्या पासून बाजूला झालो पण ती नंतर म्हणाली की अरे मी मजाक करत होतो तू पण मला खूप आवडतो आणि आमची लव्ह स्टोरी सुरु झाली आम्ही रोज फोन वर बोलायचो कधी कधी समोरा समोर पण बोलायचो या दरम्यान आमची कोणत्या ना कोणत्या गोष्टी वरून भांडणे पण व्हायची पण ती भांडणे मर्यादित काळा पुरतीच असायची कारण आम्ही दोघे पण एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हतो
ती मला फ्लाईंग किस द्यायची पण खरं सांगू मला पहिल्यांदा फ्लाईंग किस वगैरे काहीच माहीत नव्हतं मी ते फक्त पिचर मधेच बघितलं होत पण हिच्यामुळे मात्र ते अनुभवायला ही मिळालं मला खूप हसायला येतंय की मी त्या वेळेस एका लहान मुलां सारखं वागत होतो
"हे सर्व पाहिलं आठवलेंना की खूप हसायला येत आणि कधी कधी तिच्या आठवणीमध्ये राडायलाही येत काही आनंद अश्रू तर काही दुःखद अश्रू पण खरंच तिने मला एक असा आठवणींचा साठा दिला की तो लाईफ टाईम साठी माझ्या ड्राईव्ह मध्ये सेव झाला तिला मी कधीच विसरू शकत नाही तिची एक आणि एक आठवण मी माझ्या जवळ जपून ठेवली आहे"
पण तिची परिस्तिथी खूप चांगली होती पण माझी परिस्तिथी खूपच बिकट होती मला माझं पूर्ण आयुष्य हे तिच्या सोबत घालवायच होत पण कदाचित ते माझ्या नाशीबातच नव्हतं मला माहिती होत की ती मला मिळणार नाही तरीपण तिच्यावरच खूप जीवापाड प्रेम केलं पण खूप अवघड असते की जी व्यक्ती आपली होणार नाही हे माहीत असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करण पण तिला मिळवण्यासाठी मी खूप धडपड करत होतो लवकर सेटल होण्यासाठी आणि सेटल होऊन तिला मिळवण्यासाठी पण हे मी जिच्यासाठी करत होतो तिला मात्र ते दिसलं नाही तीच राघवन सहाजिकच या सेटल होण्याच्या नादात तिला मी वेळच देत न्हवतो म्हणून ती भांडायची पण मी पण हे सर्व तिच्या साठीच कारायचोना पण हे मात्र तिने समजून घेतलं नाही मी तरीपण थोडा वेळ तिच्यासाठी द्यायचो तरीपण ती भांडायची आणि अशी आमची रोज भांडण होत राहिली पण ही भांडणे पहिल्यासारखी नव्हती एकदा भांडण झाले की महिना महिना बर ती बोलायची नाही खरं सांगू मला पण या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आणि माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला आणि मी पण तिच्याशी बोलण्याचं बंद केलं मी जिला मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करत होतो की ती माझ्या सोबत आयुष्यभर माझ्या सोबत असावी
माझी लाईफ टाईम लाईफ पाटनर असावी म्हणून झटत होतो पण तिला मात्र हे समजलं नाही अजूनही मी तिच्यावर पहिल्याइतपत प्रेम करतो तिच्या आठवणी माझ्या ड्राईव्ह मध्ये अजूनही सेव आहेत पण मी आतून अजून आहे तसाच आहे पहिल्यासारखा मात्र बाहेरून बदललोय...