Goshta premachi... books and stories free download online pdf in Marathi

गोष्ट प्रेमाची...

अर्पण...

आजकालच्या नवयुवांसाठी व प्रेमींसाठी

लेखकाचे मनोगत...

मी शुभंम कानडे मला वाचनाची आवड अकरावीत असतानाच लागली आणि त्याच बरोबर लेखनाचीही आवड लागली मला या वाचनाच्या आणि लिखाणाच्या संयोगामुळे कविता लिहिणे,छोटे लेख लिहिणे, शॉर्ट स्टोरी लिहिणे,फिल्म स्टोरी लिहिणे,पटकथा लेखन,असे खूप काही लिहिण्याची सवयच झाली.आणि मला माझ्यातील एक लेखक आणि एक कवी मला जाणवायला लागला आणि मला लेखकाची आणि कवीची उपमा मिळाली,
पण मी आत्ताचा एक नवीन लेखक कवी आहे.लेखनामध्ये काही चुकलं असेल तर माझी चूक तुमच्या पदरात घ्या आणि मला आणखीन जास्त आणि चांगल्या लिखाणासाठी पाठिंबा द्या म्हणजे मी ही तुम्हाला जितके चांगले माझ्या कडून देता येईल तितके देण्याचा प्रयत्न करिन आणि खूप काही चांगले मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीन माझ्या लिखानामधील एक छोटी कथा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करीत आहे कथा छोटी आहे पण शिकण्यासारखं खूप काही आहे या कथेचं नाव "क्लाँथ"असे आहे ही कथा पूर्ण वाचा आणि मला कळवा म्हणजे मला समजेल की माझ्यामध्ये काय कमी आणि काय जास्त आहे ते म्हणजे पुढल्या वेळेस मी तुम्हाला या कथे पेक्षा ही काही तरी चांगले वाचण्यासाठी आणि काहीतरी शिकण्यासारखे छोटं किंव्हा मोठं ही पुस्तक घेऊन येई

धन्यवाद
. लेखक
शुभंम कानडे


गोष्ट प्रेमाची…

लेखक-शुभम कानडे


रणवीर तसा दिसायला उंच आणि गोरा पान आणि कॉलेज कुमार त्याचे बाबा आणि आई खूपच प्रेमळ ते रणवीर वरती खूप प्रेम करायचे ते स्वतःता पेक्षा आपल्या मुलावरती खूप प्रेम करत होते कारण त्यांना तो एकुलता एकाचं होता रणवीर तसा हुशार ही होता रणवीरला एक जिवलग मित्र ही होता त्याचे नाव सोहम सोहम हुशार आणि जीवलावणारा एखाद्या व्यक्तीला काही क्षणातच आपलंसं करणारा
रणवीर आणि सोहम कँटीन मध्ये नाष्टा करत बसलेले असतात रणवीर ला त्याच्या बाबांचा फोन येतो आणि रणवीरला आठवते की आज बाबांना दवाखान्यात शुगर चेक करायला न्यायचं होत म्हणून नाष्टा निम्यातच सोडून तो गडबडीत उठतो आणि सोहमला "अरे सोहम मी थोड्याच वेळात जाऊन येतो एक काम आठवलं" "पण कसलं रे काम तुला आत्ताच आठवलं"रणवीर डोक्याला हात लावून "अरे बाबांना दवाखान्यात न्यायचं होत आणि ते माझ्या लक्षतच नव्हतं ! बर आलोच ह लगेच " "रणवीर माझी काही मदत" "नाही नको " म्हणून रणवीर गाडी घेऊन घरी येतो आणि बाबांना दवाखान्यात नेतो थोड्या वेळाने चेकअप झाल्यानंतर दवाखान्यातून परत बाबांना सोडायला घरी येतो आणि कॉलेज मध्ये येत असतो तो पर्यंत बाबा रणवीर ला "बाळ सावकाश जा" "हो बाबा "आणि रणवीर कॉलेज मध्ये येतो रणवीर सोहम ला फोन करतो आणि विचारतो " अरे कुठे आहेस " "मी कलासरूम मध्ये आहे तू लवकर ये लेक्चर सूरु झालय"सोहम फोन वरती बोलतो रणवीर धावतच कलासरूम मध्ये जातो आणि सरांचे लक्ष नसतानाच बेंच वरती हळूच जाऊन बसतो सोहमच्या शेजारी तो पर्यंत कलासरूम च्या दरवाज्या वरती "me i come in sir" असा एका मुलीचा आवाज येतो सर "yes come in " बोलतात आणि तिची ओळख सर्वंवर्गात करून देतात तिचे नाव निलम असते दिसायला ती गोरी सडपाटाळू आणि दिसायला attractive कोणालाही लगेच स्वताच्या मोहात पडणारी fancy कपडे वापरणारी बहुतेक मोठ्या बाबाची लाडाची लेक तीचेे second year ला कॉलेज मध्ये नवीन admission होते ती हुशार ही होती,पण सांगायचे तर रणवीर खूपच हुशार होता आत्ता पर्यंत कॉलेज मध्ये त्याच्या पुढे कोणीच गेले नव्हते कॉलेज सुरू असते लेक्चर होत असतात आणि आता तिसरं सेमिस्टर जवळ आलेले असते रणवीर आणि सोहम अभ्यासाला लागलेले असतात,आणि निलम पण सतत कॉलेज च्या लॅब्ररीत अभ्यास करत बसलेली रणवीर ला व सोहम ला दिसत असायची एक दिवस सोहम रणवीर ला "ब्रो या वेळेस तू पाठीमागे पडतोस की काय,तिकडे बघ त्या निलम चा अभ्यास" "अरे! असुदेरे मी पहिल्यांदा जितका अभ्यास करायचो तितकाच आत्ता ही केलाय,मग बघू आत्ता कोण पुढे आणि कोण पाठीमागे" "मला इतकंच म्हणायचं होत की आपल्या compitasion ला आणखीन कोणीतरी आलाय"सोहम म्हणतो लगेच रणवीर कपाळाला आट्या पाडून "हो रे ! सोहम" काही दिवसांवर exam आलेली असते आणि exam ही होते काही दिवसात result ही लागतो result बघतो तर काय! सोहम चा कॉलेज मध्ये तिसरा क्रमांकावर निलम चा दुसऱ्या क्रमांकावर आणि रणवीर दर वर्षी वाणी पहिल्याच क्रमांकावर हे बघून निलम ला कसेच होते आणि मनात ठाम करते की पुढल्या सेमिस्टर ला रणवीर ला मागे टाकणार पण तिला ही ठाऊक होते की रणवीर ला मागे टाकायचे म्हणजे खूप अवघड आहे म्हणून ती एक प्लॅन बनवते आणि या प्लॅन विषयी फक्त तिची मैत्रीण नेहा लाच माहिती असते आणि निलम प्लॅनिंग ला सुरुवात करते ,पण सांगायचे तर नीलम आणि नेहाचे सर्व बोलणे रणवीरने ऐकलेले असते आणि त्याला या प्लानिंग विषयी माहिती असते हा तिचा एक बलिशपणा आहे असे मनाला समजावून तो ते सर्व विसरून जातो ...class room मध्ये रणवीर आणि सोहम दोघेच मध्ये निलम आणि नेहा येतात,आणि नेहा बाजूला थांबते आणि निलम त्या दोघांच्या दिशेनेच जाते,आणि रणवीर च्या दिशेने स्वतःचा हात करून रणवीर ला "congratulations रणवीर"रणवीर thanks म्हणतो तो पर्यंत निलम रणवीर ला
"माझ्याशी Friend ship करायला आवडेल तुला" रणवीर धक्काच होतो आणि सोहम कडे बघतो सोहम रणवीर ला डोळ्यांच्याच
इशाऱ्याने उत्तर हा देण्यास सांगतो आणि रणवीर निलम ला "हा का नाही आवडेल मला " गडबडीत सांगून टाकतो निलम"मग उद्या कॉलेज कॅफे मध्ये भेटू कॉलेज time मध्ये वाट बघेन मी तुझी"रणवीर"हो ठीक आहे म्हणून सांगतो"आणि रणवीर कॅफे मध्ये भेटायला जातो खूप गप्पा मारतात ती त्याला पूर्ण जाणून घेते,वेळ ही पुढे सरकत असतो
खूप वेळ झालेला असतो त्यांच्या गप्पा इतक्या रमलेल्या असतात की त्यांना वेळेचे काहीच भान नसते,एकदाचे रणवीर चे घड्याळाकडे लक्ष जाते आणि तो "बर निलम अशाच गप्पा मारत बसावं अस वाटतय पण घरची वाट बघत असतील चल जाऊया"निलम"का इतक्यात मला कंटाळलास" "नाही ग पण आपलं मैत्रीच्या पलीकडे जाण्याआधी आपण इथेच थांबलेलं बरं" "का मी नाही आवडत तुला" "तस नाही ग पण " "पण काय" "काही नाही मला माझं करियर महत्वाचं आहे चल जाऊ आपण" आणि रणवीर उठतो इतक्यात निलम "थांब रणवीर" "आत्ता काय" "तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे" "आत्तातर इतकं बोललो आणि काय बोलायचंय" " तुझ्या बरोबर च्या पहिल्याच भेटीत तू मला खूप आवडायलागला आहेस तुझा तो खरेपणा आणि तुझा तो भोळेपणा मला खूप आवडतो
तुझ्या सोबत मला माझी दुनिया सजवायची आहे रणवीर i love you रणवीर i love you"रणवीर"आत्ता तरी आपण friend झालो आणि" निलम "आणि काय रणवीर का बरं आपण प्रेम नाही का करू शकत प्रेम हे सांगून होत नाही रे रणवीर ते आपोआप होत आणि मला ते झालंय मी नाही रे तुझ्याशीवाय
राहू शकत" "बरं ठीक आहे पण मला माझ्या कॅरिअर वरती आत्ता लक्ष केंद्रित करायचे आहे" निलम "चालेल काहीही प्रॉब्लेम नाही मग तुला माझे प्रेम मान्य आहे ना" "हो ग" खरं तर रणवीर ला हो म्हणायचं नव्हतं पण त्याला निलम ला हार्ट पण करायचं नव्हतं म्हणून तो हो म्हणतो आणि रणवीर आणि निलम घरी जातात दुसऱ्या दिवशी रणवीर लॅब्ररीत बसलेला असतो अभ्यास करत तो पर्यंत तिथे निलम येते आणि अरे इथे काय करतोयस चल जाऊ रणवीर पण कुठे नीलम चल तरी सांगतो तुला रणवीर अगं एक्झाम जवळ आली आहे नीलम तुला माझ्यापेक्षा एक्झाम इम्पॉर्टंट आहे रणवीर हो नीलम बरं ठीक आहे मग मी जाते नीलम रुसून तिथून बाहेर येते हे बघून रणवीर तिच्या पाठी मागे धावत जातो आणि तिच्या दोन्ही गालांना ओढत नाही ग पिल्लू तूच मला इम्पॉर्टंट आहेस चल कुठे जायचं ते दोघे कॉलेजच्या गार्डनमध्ये जाऊन बोलत बसलेले असतात सोहम त्याच गार्डनमध्ये अभ्यास करत बसलेला असतो त्याच लक्ष या दोघांच्याकडे जात आणि सोहम या दोघांच्याकडे जातो आणि रणवीर ला "अरे रणवीर तू इथे गप्पा का करतोस एक्झाम जवळ आली आहे जरा अभ्यासाचं बघ"मग रणवीर त्याला "तू काय मला सांगतोस मी माझं बघून घेईन तू जा" सोहम रणवीर ला "रणवीर तुझ्यात खूप बद्दल झालाय"म्हणून सोहम तिथुन निघून जातो असेच रणवीर आणि नीलम चे प्रेम सुरू असते दोन दिवसावर एक्झाम येऊन राहिलेली असते इकडे नीलम तर रोज अभ्यासात असते आणि रणवीर ला रोज अभ्यासापासून दूर ठेवत असते पण रणवीर ही आत्ता अभ्यासाला लागलेला असतो एक्झाम येते आणि संपतेही कॉलेज ला सुट्टी लागते काही दिवसांनी result ही असतो पण exam झाल्यानंतर ही हे एकमेकांच्या संपर्कात असतात फोन वरती तर कधी कधी भेटायचे ही आत्ता मात्र नीलम आणि रणवीर एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते आत्ता मात्र असा एकही दिवस नव्हता की ते एकमेकांशी न भेटता व न बोलता रहायचे इव्हडे ते प्रेमाच्या जाळ्यात गुरफटले होते पण ज्या गोष्टीची सर्वजण वाट पाहत होते तो म्हणजे rusult आज result सोहम कॉलेज मध्ये येऊन रणवीर ला फोन लावतो आणि "अरे! रणवीर ये की कॉलेज मध्ये आज result आहे" रणवीर "हो रे येतो येतो एव्हडी काय गडबड येतो मी तो पर्यंत माझा पण result बघ" सोहम "तू काय दरवर्षी वाणी तू नंबरातच असणार" रणवीर "नाही रे मी या वेळेस मात्र नंबरातच येणार नाही" सोहम "का रे! अस का बोलतोयस" रणवीर "काही नाही सोहम तुला एक गोष्ट सांगायची आहे जी तुझ्यापासून मी लपून ठेवली" आणि रणवीर नीलम च्या प्लॅनिंग विषयी सर्वकाही सोहमला सांगतो सोहम रणवीर ला "तुला तीच प्लॅनिग माहिती होत तर तू तिला सांगितलं नाहीस का?" रणवीर "नाही रे तिला माहिती नाही की तिच्या प्लॅनिंग विषयी मला माहिती आहे" सोहम "पण तू अस का केलस फक्त एका मुली साठी" "बरं! पण आज मात्र तिला हे सर्व सांग" रणवीर " हो नक्कीच मी आलोच" आणि रणवीर फोन ठेवतो आणि आवरून कॉलेज ला जातो आणि गेल्या गेल्या नीलम ला भेटायला जात असतो तो पर्यंत नीलम व तिची मैत्रीण नेहा काहीतरी बोलत असतात आणि रणवीर भिंतीच्या अडुशाला लपून सर्व काही ऐकत असतो त्या दोघींचा विषय हा त्या प्लॅनिंग वरतीच असतो अचानक रणवीर त्यांच्या समोर जातो आणि निलम ला तो congratulations देतो आणि निलम ला "निलम तुम्ही दोघी ज्या दिवशी प्लनिग वरती चर्चा करत होता ना त्याच दिवशी हे मला समजलं होतं पण मी तुला हे कधीच सांगितलं नाही आणि या फक्त compitation च्या नादात तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलीस वाह!" निलम "हो तू बोललास हे खरे आहे पण खरंच आत्ता मात्र मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही रणवीर हो माझं चुकलं पण मला माफ कर परत मी कधीच अस वागणार नाही" रणवीर "नाही आत्ता मात्र चुकीला माफी नाही तू माझ्याशी जे वर्तन केलेस ते चुकीचे होते" निलम "हो माहीती आहे पण खरंच मी आत्ता तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि ते खरे आहे" रणवीर "बरं! पण तुला एक शिक्षा तर होणारच" निलम "बरं! ठीक आहे सांग तुझ्यासाठी मी काय करू" रणवीर "अगं नंबरात बसलीस पेढे तरी दे" निलम "काय" रणवीर "काही नाही पेढे" आणि निलम हसून रणवीर ला लाडाने मारते आणि तिघे ही खूप हसतात


तात्पर्य :- प्रेम हे स्वार्थी नसावं तर निरागस असावं..

लेखक :- शुभम कानडे

अभार.
हे पुस्तक तुम्ही वाचला आणि मला या पुस्तकाबद्दल काही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि माझं लेखनामध्ये काय चुकतंय या बद्दल ही चांगलं मार्गदर्शन केल्या बद्दल सर्वांचे आभार
त्याच बरोबर मला लिखाणासाठी आणखीनच उत्स्फूर्त केल्या बद्दल ही सर्व वाचकांच आभार तसेच ही कथा वाचली आणि या कथेतून काही चांगलं शिकलात आणि इतरांना ही. ही कथा सांगितलंत या बद्दल ही तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार
धन्यवाद

लेखक
शुभम कानडे.

इतर रसदार पर्याय