लैंगिक आकर्षण आणि शिक्षण Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लैंगिक आकर्षण आणि शिक्षण

लैंगिक आकर्षण आणि शिक्षण

२ वर्षांपूर्वी मी चाकण मध्ये जाँब करत होते. त्यामुळे भोसरी गावातील सदगुरु नगर येथे मैञिणींसोबत रुम करुन राहत होते. आम्ही राहायचो ते घर आणि आजुबाजुची काही घर सोडली तर बाकी सर्व झोपडपट्टी वजा घर होती. एकदम छोटी छोटी . सिंगल रुम , डबल रुम वगैरे. आमच्या रुम च्या डाव्या बाजुला थोडे अंतर ठेवुन कंपाऊंड वाँल होती. त्यामुळे तो पुर्ण भाग एखाद्या बोळीप्रमाणे होता. त्या बोळी मध्ये आम्ही फक्त कपडे सुकवण्यासाठीच जात असु. शक्यतो तिकडे कोणी फिरकत नसे. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे कपडे सुकवण्यासाठी गेले आणि जे पाहीलं.. ते पाहुन हातातील बकेट तर गळुन पडलीच पण अंगातील अवसानही गळुन गेल. एक ५ वर्षाचा मुलगा आणि ४ वर्षाची मुलगी ( सख्खे बहिण भाऊ ) कपडे काढुन ' ते' करण्याचा प्रयत्न करत होते. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात मला बघुन ते पटकन उठले आणि कपडे घेवुन पळायला लागले , तसे मी दोघांच्याही हातांना घट्ट पकडल. आणि खडसावून विचारल , ' काय रे... काय करत होतात ? कुणी शिकवल हे ?' त्यावर त्या मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकुन मला दुसरा धक्का बसला. तो मुलगा लाजत म्हणाला , ' आमचे मम्मी पप्पा च असं रोज करतात.' हे ऐकुन माझ्या हाताची पकड कधी ढिली झाली ते कळलच नाही. ते दोघेही पळुन गेले. पण त्या क्षणाला अस वाटलं , की कोणीतरी खाडकन् कानशिलात लगावली आहे. काय बोलाव आणि काय रिअँक्ट कराव हेच कळत नव्हत. मन एकदम सुन्न झाल होतं.

ती मुल आमच्या रुमच्या जवळच राहत होती. त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखीचे होते. पुढे मी त्यांच्या घराच निरीक्षण केल्यावर लक्षात आलं , की त्यांच घर म्हणजे फक्त दहा बाय दहा ची भाड्याची एक खोली. त्यात दोघे नवरा बायको आणि ही दोन मुले आता दोष कुणाला द्यायचा ? द्यायचा की नाही ? चुक कोणाची ? त्या निरागस , चिकीत्सक ५-६ वर्षाच्या मुलांची चुक होती की दहा बाय दहाच्या खोलीत संसार चालवुन आयुष्य ढकलणार्या आई - वडिलांची होती ? हा प्रश्न फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाही , कारण आज भारतात असंख्य लोक आहेत , जी गरिबीमुळे , जागेच्या अभावामुळे फक्त सिंगल रुम , वन आर के मध्ये अँडजस्ट करतात. मोठ मोठ्या शहरात जागे अभावी मोठी मोठी कुटुंब फक्त वन बिएच के मध्ये अँडजस्ट करतात. त्यामुळे घरातील कुठल्याच सदस्याला प्रायव्हसी मिळत नाही.

हि मुले लहान होती , त्यामुळे ती गोष्ट तेवढी गंभीर नव्हती , किंवा तिला अजुन तरी गंभीर घटनेच रुप प्राप्त झाल नव्हत. पण जेव्हा या गोष्टींचा परिणाम तरुण मुलांवर होतो , तेव्हा माञ ती घटना अतिगंभीर होवू शकते. याच उदाहरण म्हणजे काही दिवसांपुर्वी एका १५ वर्षाच्या मुलाने , १० वर्षाच्या मुलीवर रेप केला होता. तो सुधारगृहात असताना एक लेखिका त्याला भेटायला गेली. तिने त्याला एक प्रश्न विचारला , ' तुला का वाटलं की रेप करावा ? 'त्यावर त्या मुलाने दिलेले उत्तर अतिशय धक्कादायक होते. ' माझे काका - काकू रोज अस करतात. पण ते केल्याने काय होतं , हे मला जाणुन घ्यायच होतं...म्हणुन मी ते केलं . ' (तो काकांकडे शिक्षणासाठी राहत होता.) त्याची ती चिकीत्सा खरचं चिकीत्सा आहे का ? वाढत्या वयात नैसर्गिक रित्या असणारं शारीरिक आकर्षण आणि त्यात लैंगिक शिक्षणाचा अभाव जुळून आला तर ते किती गंभीर रुप घेवु शकतं , त्याच हे उदाहरण. त्याच उत्तर ऐकुन जेवढा शाँक तुम्हाला किंवा मला बसला त्यापेक्षाही जास्त त्या लेखिकेला बसला होता. कारण ती सांगते , उत्तर देतेवेळी त्याच्या डोळ्यात निरागसपणा आणि बोलण्यात प्रामाणिकपणा ठळक दिसत होता. मग याचा अर्थ तो गुन्हेगार नाही का ? किंवा मग तो खरच १००% गुन्हेगार आहे का ? हे दोन्ही बुचकळ्यात टाकणारे प्रश्न आहेत.

यावर उपाय म्हणुन मुलांना लैंगिक शिक्षण दिलं तर परिस्थिती बदलेल का ? पण दोन्ही घटनेतील मुलांची वयं वेगवेगळी आहेत. एकवेळ १५ वर्षाचा मुलगा ते समजु शकेल , पण ५-६ वर्षाची मुल हे समजु शकतील का ? त्या गोष्टीच गांभिर्य आपण त्यांना पटवुन देवु शकतो का ? यातील कुठल्याच प्रश्नावर माझ्याकडे तरी सध्या ठोस उत्तर नाही .पण आशा आहे भविष्यात यावर काहीतरी उपाय सुचेल. तुमच्याकडे यावर काही उपाय असेल तर नक्की कळवा.