Shyamachi Patre - 8 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 8

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र आठवे

भारताचा इतिहासदत्त प्रयोगप्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.आज सकाळी मी अंगणात फिरत होतों. एक लहानसें फुलपाखरूं पडलें होते ! फारच चिमुकले होतें तें. मी हातांत घेतलें. तें मेलेलें होतें. तरीहि त्याचे ते चिमणें पंख किती तजेलदार दिसत होते. चिवरेबावरें असे ते पंख सौंदर्यानें भरलेलें होते. ते पांखरूं किती दिवस जगलें असेल? कदाचित् चार दिवसहि तें नाचलेंबागडलें नसेल ! इतक्या क्षणभंगुर अशा जीवनांत सुष्टीनें किती सौंदर्य ओतलें होते, किती कला ओतली होती? मग मानवी आत्मा निर्मितांना किती कला ओतली गेली असेल? मानवी आत्म्यांत किती रंग भरलेले असतील?

परंतु हे रंग कधी प्रकट होणार? मानवी आत्म्याचे सुंदर रंग प्रकट व्हावे म्हणून कोण धडपडणार? इतकी खोल दृष्टि कोण घेणार? आपण तर एकमेकांस शिव्या देत आहोंत. मनुष्य मनुष्याला गुलाम करीत आहें, तुच्छ लेखीत आहे. इंग्लंडमधील थोर कवि वर्डस्वर्थ म्हणाला ____Much was I grieved to thinkWhat man has made of man करी मानव हा काय मानवाचें मनीं येऊन मज दु:ख होई साचें

वरड्स्वर्थ हे शब्द शंभर-दीडशे वर्षापूर्वी म्हणाला; परंतु आजहि ते खरे आहेत. या जगांत पूर्वी कधीं नव्हता इतका आज द्वेषांना ऊत आला आहे. मधूनमधून मानवी समुद्राला पोटांतील वडवानळी आग ओकण्याची अशीं संवयच आहे कीं काय न कळें?

हिंदुस्थानांत हा द्वेष जातीयवादावर आधारला आहे. मला कळत नाही हे द्वेष कां तें ! शेंकडों हिंदूंच्या घरी मुसलमान नोकरचाकर आहेत. प्रेमळ संबंध आहेंत. परंतु वर्तमानपत्रांतील गोष्टी वाचून बोंबा मारणारें आमचे द्वेषाळ लोक या गोष्टी बघतील तर ना? कावळा सडलेल्या भागाकडे दृष्टि देतो, त्याप्रमाणें हे द्वेंषी लोक नेमकें वाईट तेवढेंच बघतात. हजारों कुटुंबातून व खेडयांतून प्रेमळ संबंध आहेत, ही गोष्ट ते विसरतात. म्हणून माझ्यासारखा लहानसा लेखक त्यांना हें मांगल्य दाखवूं पहात असतो. अंधारांत एक किरण दाखविणेंहि पुण्यकारक आहे. माझी गीता सांगते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ' -थोडें का सत्कर्म असेना तेंहि तारील.

वसंता, माझा एक बंगाली मित्र अहे. तो दिल्लीहून येत होता. त्याच्या डब्यात एक गुजराती मनुष्य होता. त्या माणसाला खूप ताप भरला. त्याला वांत्या झाल्या. गाडींत का थोंडे हिंदु होते? परंतु त्याची वांती कदाचित् अंगावर पडेल म्हणून ते भीत होते? तो गुजराती कावरा-बावरा झाला. त्या डब्यांत दिल्लीचा एक दिलदार मुस्लीम तरुण होता. तो उठला. त्यानें त्या गुजराती हिंदूला आपल्या बिछान्यावर निजवलें. खांडेवा स्टेशनवर त्यानें त्याला उतरवलें. त्याच्या घरीं तार केली. त्याला स्टेशनमास्तरांच्या स्वाधीन करुन तो मुसलमान तरुण गाडींत बसला. आमचीं वर्तमानपत्रें आग लावायला टपलेलीं आहेत. परंतु ज्यामुळें समाज एकत्र येतील असें कोणी लिहिणार नाहीं !मी शाळेंत शिक्षक असतांना माझ्या एका विद्यार्थ्याच्या घरीं मी गेलों होतों. आम्ही दोघे दुस-या दिवशीं निघणार होतों. त्या विद्यार्थ्याचा मोठा भाऊ सायंकाळी जिनमध्यें पैसे आणण्यासाठीं म्हणून गेला होता. तें जिन गांवापासून दोन मैलांवर होतें. बरीच रात्र झाली तरी भाऊ परत आला नाहीं. त्यांच्या घरीं एक मुसलमान नोकर होता. त्याला घरांतील सारीं मुलें ' अटेलाकाका ' असें म्हणत. त्या नांवांतहि किती गोडी आहे पहा ! तो अटेलाकाका अस्वस्थ झाला. शेवटी हातांत कंदील व काठी घेऊन तो निघाला. रात्रीची वेळे. धनी पैसे घेऊन येणार होता. वाटेंत बरेंवाईट झालें असतें तर? असें मनांत येऊन तो निघाला. ' हा आपला हिंदु मालक करो ' असें का त्याच्या मनांत आलें? घरांतील माणसांना चिंता वाटली नाहीं इतकी त्याला वाटली. तो मुसलमान होता, परंतु दिलदार होता. ज्यांना तुम्ही लांडे लांडगे म्हणतां, त्यांच्यातहि अशी दिलदारी भरलेलीं आहें. परंतु तुम्हाला दिसत नाहीं. मी तरी काय करूं? खानदेशांतील चोपडे तालुक्याकडची गोष्ट आहे. एकदां एक मोटार रस्त्यांत मोंडून पडली. रात्र झाली. गाडींत कुटुंबवत्सल माणसें होतीं. रस्त्याजवळ एक गांव हाता. त्या गावांत एक वृध्द काजीसाहेब होते. त्यांना कळलें कीं, रस्त्यांत मोटार पडली आहे. आंत बायकामाणसें, मुलेंबाळें आहेत. ते लगेच हातांत कंदील घेऊन निघाले. त्या सर्व मंडळींना ते म्हणाले, '' रात्रीं येथें का उघडयावर बालबच्चे घेऊन बसणार? गांवांत चला. मी सारी व्यवस्था करतों. तुम्ही स्वयंपाकपाणी करा. तुम्हांला शिधासामुग्रीं, दूध वगैरे सारें मिळेल. अंथरुण-पांघरुण मिळेल. ''मुसलमानांवर विश्वास ठेवावा की न ठेवावा, अशी त्या मंडळीस चिंता वाटल. त्या वृध्द मुसलमानाच्या लक्षांत ही गोष्ट आली. त्याला दु:ख वाटलें. तो म्हणाला, '' या पांढ-या दाढीवर विश्वास ठेवा. मुसलमानहि माणसेंच आहेत. '' शेंवटीं ती सर्व मंडळी गांवांत आली. त्यांना दूध वगैरे मिळालें. तो काजी म्हणाला, '' घरांत झोपता का? '' ते लोक म्हणाले, '' बाहेरच बरें ! '' त्या मुसलमान वृध्दानें आंथरुण पांघरुण दिलें. तीं मंडळी झोपली.

तो वृध्द मुसलमान पहाटे प्रार्थनेला उठला. एका लहान मुलाच्या अंगावर पांघरुण नव्हतें. त्यानें आपली चादर त्यांच्या अंगावर घातली. त्याची प्रार्थना झाली, आणि आतां सकाळ झाली. ती प्रवासी मंडळी उठली. त्या काजी साहेबांची गाय होती. गायीचें दूध त्यानें त्या मुलाबाळांस, सर्वांस दिलें. मोटार आली तेव्हां त्या मंडळीस, पोंचवावयास गेला. मंडळी मोटारींत बसलीं. म्हातारा उभा होता. लहान मुलानें त्यांच्या पांढ-या दाढीवरुन चिमुकले हात फिरविले काजी म्हणाला, '' बच्चा, तूं नाहीं ना मला भीत? ही दाढी निर्मळ आहे हो ! '' वसंता, अशीं उदाहरणें किती सांगू? मागील वर्षी माझी वैनी कोंकणांत मरण पावली. किती तरी मुसलमान बंधुभगिनी माझ्या दादाच्या समाचारासाठी आल्या होत्या. माझ्या भावाच्या लहान मुलीला खाऊसाठी त्यांनीं एक रुपया दिला ! एक मुसलमान मित्र म्हणाला, '' दादा रडूं नका. काय करायचें ? जो मायच्या पोटीं आला त्याला धरित्रीच्या पोटीं जावेच लागतें ! वाईट नका वाटून घेऊं. तुमचा संसार लंगडा झाला. तुमचावजीरच गेला ! '' त्यानें पत्नीला वजीराची उपमा दिली. मला कवि कुलगुरु कालिदासाच्या '' गृहिणी सचिव: ' या वचनाची आठवण झाली. आणि ' मायच्या पोटीं आला तो धरित्रीच्या पोटीं जायचाच ' ' किती सुंदर वचन ! ' संस्कृत शब्द त्यानें वापरला, अर्थात् न कळत.खेडयापाडयांतून असे हे प्रेमळ संबंध आहेत. आम्ही जाऊन पाहूं तर दिसतील. स्त्रियांच्या जुन्या ओव्या मी गोळा करून प्रसिध्द केल्या. त्यांत मुसलमानास भाऊ मानण्याच्या किती तरी ओव्या आहेत ---

मानीयला भाऊ जातीचा मुसलमानदिवाळीचा सण त्याचा कागदी सलाम

अशा किती तरी सहृदय ओव्या आहेत. ठाणें येथें मला एका मित्रानें विचारलें, '' ही खरी ओवी आहे का? '' द्वेषाचा इतका पूर आम्ही ओतीत आहोंत कीं ते प्रेमळ संबंध, जे पूर्वी होते व ऊन आढळतात ते आम्हाला अशक्य वाटूं लागले आहेत.

काँग्रेस हिंदु-मुस्लीम ऐक्यावर श्रध्दा ठेवून चालली आहे. भारताचा भूतकाळ पाहून श्रध्देनें ती भविष्याकडे पहात आहे. '' महात्माजी किंवा काँग्रेस मुसलमानांना जवळ घेतात, परंतु मुसलमान तर त्यांना लाथा मारतात '' असें आमचे द्वेषपंडित म्हणत असतात, '' मुसलमानांनी गांधींना फसवले, त्यांच्या हातावर तुरी ठेवल्या '' असें ऐक्य-द्वेष्टे म्हणत असतात. परंतु प्रेम हें फसवून घेण्यासहि तयार असतें ! तेंच खरें प्रेम जें निरपेक्ष असतें. कर्तव्य म्हणून आपण प्रेम करतों, सहानुभूति दाखवितों. परंतु महात्माजींना कोणी फसविलें नाहीं. त्यांच्या श्रध्देनें व विश्वासाला फळ लागलें आहे. आपली सर्वांची तशी श्रध्दा असती तर अधिक फळ लागलें असतें.

काँग्रेसमध्यें जे कांही थोर मुसलमान आहेत तें गांधीजींच्या श्रध्देचेच फळ आहे. ज्या खैबरखिंडींतून पूर्वी मुसलमानांचे लोंढे आले, त्याच बाजूला देशभक्तीचें फळ आलें ! हजारों खुदाई खिदमतगार तेथें उभे आहेत. त्या प्रातांत काँग्रेसचें मंत्रिमंडळ होते. आज तरी तेथें काँग्रेसचें मंत्रीमंडळ नसले तरी त्या प्रांतांत काँग्रेस-प्रेम आहे. खान अब्दुल गफारखान आज तुरुंगात आहेत. सरकारी कारवायांनी आज सरहृद प्रांतांत, सिंधमध्ये, बंगालमध्यें जरी मुस्लीम लीगचा वरचष्मा दिसला तरी तेथें खरा पाया नाहीं. ब्रिटिशांची व मुस्लीम लीगची ही कुटिल नीति आहे. परंतु कुटिलता नेहमींच फलद्रूप होत नसते. मुस्लीम लीगच्या प्रतिष्ठेचें हें पोकळ डोलारे आहेत. ते पुढें कोलमडतील.पेशावर प्रांतात काँग्रेस-प्रेम आहे. अहरार पक्षहि काँग्रेसला सहानुभूति दाखवायला तयार असतो. जमायल-उल-उलेमा ही संस्थाहि काँग्रेसप्रेमी आहे. बोहरी मुसलमानांत काँग्रेस-प्रेम आहे. शियापंथी मुसलमान अद्याप मुस्लीम लीगला फारसे मिळाले नाहींत. लाखो मोमीनांचा मुस्लीम लीगला विरोध आहे. निरनिराळया प्रांतांतून काँग्रेसला अनुकूल असे मुसलमान आहेत. मुस्लीम लीगच्या गाजावाजामुळें या काँग्रेसप्रेमी मुसलमानांचें स्वरुप दिसून येत नाहीं. परंतु बॅ. जिनांच्या एकान्तिक धोरणास मुसलमान विटतील, आझाद मुस्लीम पक्ष बलवान होतील.मुस्लीम लीग हीच काय ती मुसलमानांची एकमेव संस्था, या गोष्टीला काँग्रेसनें कधीहि मान्यता दिली नाहीं. जिनासाहेबांजवळ काँग्रेसनें पुन:पुन्हां वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केले. आणि वेळ आली तर पुन्हांहि करील. कारण किती झालें तरी आपल्यास राष्ट्रांतील ते भाऊ आहेत. ब्रिटिश सरकारशीं पुन:पुन्हां वाटाधाटी करण्यांत जर आम्हांस कमीपणा वाटत नाही तर जिनांजवळ वाटाघाटी करण्यांत कमीपणा का वाटावा? परंतु जोंपर्यत काँग्रेसबद्दल सहानुभूति दाखविणारे इतर मुसलमान पक्ष आहेत, खुद्द काँग्रेसमध्येंहि जोंपर्यत मुसलमान आहेत तोंपर्यंत मुस्लीम लीग हीच मुसलमानांची एकमात्र संस्था असें काँग्रेस मानणार नाही. जिनासाहेब सारखे सांगत आहेत कीं काँग्रेस फक्त हिंदूंची, परंतु काँग्रेस एका जातीसाठी वा धर्मासाठी कधी जन्मली नव्हती. ती सर्वांसाठी आहे. सर्व राष्ट्रासाठीं म्हणून ती आहे. सर्व राष्ट्राची याच भुमिकेवरून ती वागेल, काँग्रेस केवळ हिंदुची ही गोष्ट काँग्रेसनें कबूल करणें म्हणजे काँग्रेसनं स्वत:ची हत्या करुन घेणे होय. काँग्रेस मग मेलीच ! हिंदुमहासभा व काँग्रेस यांत मग फरक काय? काँग्रेस मरावी हाच तर सर्व जातीय पुढा-यांचा हेतु आहे. मरायचीच असेल तर काँग्रेस मरेल, परंतु ती ध्येयाला सोडणार नाहीं.जिनांची पाकिस्तान-योजना तरी काय? ती व्यवहार्य तरी आहे का? पाकिस्तान-योजनेची स्पष्ट कल्पना त्यांनीं कधीं मांडली नाही. पाकिस्तान हें सर्व बाबतींत स्वतंत्र राष्ट्र होणार का? परंतु पंजाबला बंगाल जोडणार कसा? सरहृद प्रांत, सिंध प्रांत, पंजाब, बंगाल यांचें म्हणे पाकिस्तान बनवा. परंतु बंगाल का पंजाबला जोडलेला आहे? सरहृद प्रांतांत शेंकडो ९० मुसलमान आहेत. येथें म्हणतां येईल की हिंदु अल्पसंख्य आहेत. परंतु पंजाब व बंगालमध्यें मुसलमान शेंकडो ६५ तर हिंदु ४५ आहेत. याला का अल्पसंख्य म्हणावयाचें?

पंजाबमध्यें शीख व हिंदु आहेत. ज्या जिल्हयांतून त्यांची अधिक वस्ती असेल ते अलग करा, असें ते म्हणतील. पश्चिम बंगालमध्यें हिंदुंची संख्या अधिक आहे. तेथील हिंदु म्हणतील आम्ही निराळे होतों. कसें करायचें या पाकिस्तानचें? सरहद्द प्रांत कदाचित् हिंदुस्थानांतच राहूं इच्छील. मग पाकिस्तान कोणाचें? पंजाबचा थोडा भाग, सिंध आणि बंगालचा पूर्व भाग यांचें का पाकिस्तान बनवायचें? आणि लष्कर व आरमार कोठें ठेवणार? पूर्व बंगालचे रक्षण कसे करणार? त्याच्याशीं संबंध कसा ठेवणार? एका पाकिस्तानचे का दोन तुकडे, एक पूर्वेस व एक पश्चिमेस असे ठेवणार? आणि आर्थिक दृष्टया हें सारें कसें शक्य होईल? आणि उद्यां पाकिस्तान एक स्वतंत्र देश मानला तर किती आपत्ति येतील ! हिंदु हिंदुस्थानांत जे दोन तीन कोटी मुसलमान असतील त्यांना का तेथें विदेशी समजायचे? मुसलमान पाहतांच हा दुस-या देशांतील असें का मानायचें? आणि पाकिस्तानांत जे दोन तीन कोटि हिंदु असतील त्यांना मुसलमान का परदेशी मानणार? पाकिस्तानांत हिंदूंना व हिंदूस्थांनांत मुसलमानांना नागरिकत्वाचे हक्क राहतील का? कारण ते निराळया देशाचे मानले जाणार? असें एकमेकांस विदेशी मानणें शक्य होइल का? शेंकडो वर्षे जे एकत्र राहिले ते उद्यांपासून एकमेकांस केवळ दुस-या देशाचे असें मानू शकतील का? आणि अशीं अलग राष्ट्रे करुन राहणें ही गोष्ट कालाच्या ओघाविरुध्द आहे ! लहान लहान तुकडे करुन त्यांचीं राष्ट्रे करण्याचे दिवस संपत आले आहेत. छोटया-छोटया राष्ट्रांचे दिवस जाऊन विशाल राष्ट्रांचे दिवस येत आहेत. हिंदुस्थान आधींच एक विशाल राष्ट्र आहे. सर्वांना एकत्र नांदविण्याचा प्रयोग करितच आलें आहे. आणि हाच प्रयोग उद्यां व्हावयाचा आहे. अशा विशाल राष्ट्रांला खंड-राष्ट्र म्हणा पाहिजे तर. येथें खंड याचा अर्थ तुकडा नसून अशिया खंड वगैरे शब्दांत जो अर्थ आहे, आणि काँग्रेस प्रांताना संपूर्ण स्वायत्तता देऊं करित आहे, आणि काँग्रेस प्रातांना संपूर्ण स्वायत्तता देऊं करित आहे, एवढेंच काय त्यांना अलग राहायचेंच असेल तर तोहि हक्क मान्य करित आहे ! परंतु तेथील सर्व जनतेनें तें ठरवावें. काँग्रेसची श्रध्दा आहे कीं प्रांतांनी एका अर्थी स्वतंत्र राहून दुस-या अर्थी एका विशाल संघटनेंत राहणें हेंच उद्यां सारे मान्य करतील. कारण त्यांतच कल्याण आहे, संरक्षण आहे, विकास आहे.

बॅ. जिनांचें असें कां म्हणणें आहे का एक मुस्लीम फेडरेंशन व एक हिंदू फेंडरेशन असावे? आणि या दोन फेडरेशनांचे कांही प्रतिनिधि घेऊन त्यांचें एक पुन्हा वरिष्ठ कार्यकारी फेडरेशन असावें? या वरिष्ठ संयुक्त फेडरेशनांत प्रतिनिधि का समान घ्यायचे? जिनांच्या मनांत काय आहे? कदाचित जिनांच्या डोळयांसमोर स्वतंत्र हिंदुस्थान ही वस्तुच नसेल ! मुस्लीम पाकिस्तान व हिंदू हिंदूस्थान यांच्या डोक्यांवर सदैव ब्रिटिश सत्ता असावी असेंहि त्यांच्या मनांत असेल. कारण ब्रिटिश नसतील तर कसं व्हायचें? हिंदु फेडरेंशन तर बलवान होईल्. मुस्लीम फेडरेशनला भीति वाटणार. आणि बॅ. जिनांचें पाकिस्तान ब्रिटिशांचें मांडलिक राहूं पाहणार ! मुस्लीम जनतेला हें आवडेल का?

काँग्रेसनें करायचें कांही शिल्लक ठेवलें नाहीं. त्या त्या प्रांतांतील जनतेनें अलगच राहायचें ठरविलें तरीहि मान्यता दिली. प्रांतिक सरकारांस शेष अधिकार देऊं केले. एकदां मध्यवर्ती सरकार व प्रांतिक सरकार यांचे अधिकारहि ठरविल्यावर मधूनमधून जे इतर प्रश्न उत्पन्न होतील त्या बाबतीतील अधिकार ते शेष अधिकार. जवाहरलाल म्हणाले, '' अशानें मध्यवर्ती सरकार दुबळें होईल. परंतु तरीहि ऐक्यासाठी मी याला अनुकूल मत देतों. '' काँग्रेसनें आणखी काय करायचे? पाकिस्तानची योजना अव्यवहार्य वाटते. जिनांचा हा केवळ स्टंट आहे. डॉ. आंबेडकर मध्येंच धर्मान्तराची घोषणा करतात तसाच हाहि एक प्रकार आहे का? अल्पसंख्य लोक नेहमी साशंकच असणार. जासतींत जास्त मिळावे म्हणून ते खटपट करणार. मुसलमान तर बोलून चालून परधर्मी. परंतु ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांची नाहीं का भीति वाटत? ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर एकाच धर्माचे तरीहि परस्पराविषयी किती साशंकता ! या भांडणांच्या मुळाशी पारतंत्र्य आहें. हे सारे आर्थिक प्रश्र आहेत. नोक-याचाक-यांचे प्रश्र आहेत. काँग्रेस मंत्रिमंडळांच्या कारकीर्दीतच हे वाद विकोपास गेले.

परंतु काँग्रेस स्वातंत्र्यासाठीं लढत आहे. माझ्या एका मित्रानें आपल्या एका मुसलमान मित्रास विचारलें, '' काँग्रेसनें लढा सुरूं केला तर यादवी होईल असें जिना म्हणत. परंतु जातीय दंगा कोठेहि झाला नाही. हें आश्चर्य नव्हे का? '' तेव्हां तो मुसलमान बंधु म्हणाला, '' आज काँग्रेस गोळया खात आहें. फाशी जात आहे. फटके खात आहे. आज नोक-यांचा सवाल नाहीं, मरणाला मिठी मारण्याचा सवाल आहे ! आम्ही बोलून दाखविलें नाही तरी बलिदान करणा-या काँग्रेसविषयीं आम्हांला आदर वाटतो. दिल्लीस गोळीबार झाला तर मुसलमानांनी मशिदीचे दरवाजे उघडून हिंदूंना आंत घेतले. '' असो.मुसलमानांनीहि स्वातंत्र्य युध्दांत कुरबानी केली नाही असे नाहीं. ३०-३२ सालच्या सत्याग्रहयुध्दांत पेशावर प्रांतांतून १७ हजार पठाण तुरुंगात गेले ! आणि पेशावर प्रांतांची लोकसंख्या फक्त ४५ लाख !! आपल्याकडे झाला नाहीं इतका अपरपार जुलूम तिकडे झाला. त्या लढाऊ लोकांत काँग्रेसप्रेम वाढूं नये म्हणजे सरकारनें कहर केला. परंतु ते शूर अहिंसक पठाण कसोटीस उतरले.

काँग्रेसनें मुसलमानांस जें जें संरक्षण पाहिजे असेल तें तें देऊं केलें. धर्मांचे, भाषेचें, संस्कृतीचें संरक्षण सर्वांना मिळेल असें कराची काँग्रेसच्या ठरावांत स्पष्ट झाले. स्वातंत्र्य युध्दांत मुसलमानांनी सहकार करावा म्हणून काँग्रेसनें शक्य-तें द्यायची तयारी दर्शवली. १९३१ मध्यें लंडनच्या गोलमेज परिषदेच्या वेळेस गांधींजींनीं त्यांना कोरा चेक दिला ! त्यामुळें हिंदुमहासभावाले रागावतात. परंतु गांधीजी अखिल भारताची तेथें अब्रू सांभाळित होते. ब्रिटिश मुत्सद्यांनी जगासमोर हिंदुस्थानचा फजितवाडा चालवला होता. तुमची एकमुखी मागणी आणा नाहींतर आमचा निर्णय मान्य करा, असें मिश्कीलपणें कुटिल ब्रिटिश मुत्सदी सांगत होते. काँग्रेसनें मुसलमानांस इतक्या जागां देऊं, असें म्हणतांच ब्रिटिश मुत्सदी त्यांना तिकडे बोलावून आम्ही अधिक देऊं असें म्हणत. असा चावटपणा सुरू झाला ! जगाच्यासमोर गांधीजी का घासाघीस करित बसतील? राष्ट्राचे प्रश्र म्हणजे का केवळ आंकडे? तेथें शेवटी मोठी दृष्टि घ्यावी लागते. महात्माजींना ब्रिटिशांनी चालविलेली ही कुतर-ओढ सहन होईना. महात्माजी मुसलमानांस म्हणाले, '' तुम्ही म्हणाल तितक्या जागा; कोरा चेक. आपण एकमुखी मागणीं करूं. परंतु ब्रिटिशांनी मागणी मान्य न केली तर काँग्रेसच्या खांद्याशीं खांदा लावून तुम्ही लढलें पाहिजे, '' कोरा चेक देत असतांना ' स्वातंत्र्यार्थ लढायला या ' ही गांधीची अट होती. गांधीजीनीं जगाच्या बाजारांत हिंदुस्थानची अब्रू सांभाळली. त्यांच्या समोर या ४० कोटि लोकांच्या इभ्रतीचा प्रश्र होता. म्हणून त्यांनी ही मोठी दृष्टि घेतली. तींत चूक काय आहे? परवां राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मागणीच्या वेळेस श्री राजगोपालाचार्य म्हणाले कीं '' मुख्य प्रधान जिना झाले तरी आमची तयारी आहे. '' क्रिप्सजवळ वाटाघाटी करतांना काँग्रेस म्हणाली, '' मध्यवर्ती मंत्रिमंडळ जिनांना बनवूं दे. आमची ना नाहीं. परंतु तुम्ही जा. ''काँग्रेस कोरा चेक देते, जिनांना मुख्य प्रधानकी देऊं करतो, मंत्रिमंडळ बनवा म्हणते, याची हिंदुमहासभावाल्यांस चीड येते परंतु राष्ट्राच्या स्वातंत्र्याची ज्याला कदर आहे, त्याला क्षुद्र दृष्टि घेऊन चालत नाहीं. म्हणून लोकमान्य टिळकहि म्हणत, '' येथल्या मुसलमानांच्या हातीं सर्व सत्ता आली तरी चालेल, परंतु सहा हजार मैलांवरचे हे परके जाऊं देत. ''

अशा म्हणण्यांत काय बरें अर्थ असतो? काँग्रेसला किंवा महात्माजींना मुसलमानांची भीति वाटत नाही. उद्यां आपलें कसें होईल ही भीति काँग्रेसमधील हिंदूंना नाहीं. ३० कोटी हिंदूंना भयभीत होण्याचें काय कारण? हा न्यूनगंड हिंदुमहासभेला आहे, काँग्रेसला नाहीं. हिंदुमहासभेला मुसलमानांची भीति वाटते. म्हणून तिची धांवपळ. काँग्रेस धीरोदात्त वागत आहे. स्वराज्य आलें म्हणजे आर्थिक प्रश्न सुटूं लागून भांडणे आपोआप कमी होतील, ही गोष्ट काँग्रेस जाणते.

स्वराज्य येणें म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे राष्ट्राच्या सर्व शक्तींना वाव मिळणें. राष्ट्राच्या विकासास अवसर मिळणें. अडथळे दूर होणें. आज राष्ट्राच्या कर्तृत्वास वावच नाहीं. नोकरीशिवाय धंदा नाहीं. उद्यां स्वराज्य मिळालें म्हणजे व्यापार वाढेल, उद्योंगधंदे वाढतील. लोकांची कोंडलेली चैतन्यशक्ति शतक्षेत्रात खेळूं शकेल. भांडणे आपोआप बंद होतील. उद्योगी माणसांना भांडायला वेळ आहे कोठें? मुसलमानांतील बोहरी समाज हा व्यापारी आहे. त्यामुळें ते कडवे नाहीत. ते गुजराती भाषा बोलतात, गुजराती वर्तमानपत्रे घेतात. कारण त्यांना उद्योग आहे. रोज त्यांचा व्यापा-यांशीं संबंध, म्हणून त्यांचीं भांडखोर वृत्ति नाहीं. उद्यां स्वतंत्र हिंदुस्थानांत भांडणें उरणारच नाहींत. कोठून का होईना एकदां या देशांतील लोकांच्या हातांत सत्ता येऊं दे. एकदा देश स्वतंत्र होऊं दे. जोंपर्यंत देश परतंत्र आहे तोपर्यंत भांडणें राहणार, कारण कर्म-शक्तीला वाव नसणार. इंग्रज म्हणतात, '' तुमच्यांत भांडणें आहेत म्हणून स्वराज्य देत नाही. '' काँग्रेसचें नेहमी एकच म्हणणे आहे, '' तुम्ही आहांत म्हणून भांडणें आहेत. गुलामगिरीमुळें भांडणे आहेत. तुमचा संबंध सुटताच सलोखा निर्माण होईल. ''वसंता, तूं पानपट्टीवाल्याचें दुकान पाहिलें आहेस का? तो पट्टीवाला हातांत कातरी घेऊन उजाडत दुकानांत बसतो. तो तें सडलेलें पान कापून टाकतों. तसें तो न करील तर सडलेलें पान चांगल्या पानासहि सडवतें. त्याप्रमाणें आम्ही आमच्या देशांत चांगले संबंध निर्मित होतों, परंतु इंग्रज आले. ते फोडा व झोडा असें सडकें धोरण घेऊन आले. त्यांनीं हिंदुस्थानांस कीड लावली आहे. त्यांचा संबंध सुटल्याशिवाय हिंदुस्थानचें ग्रहण सुटणार नाही, भांडणे मिटणार नाहींत, दारिद्रय व दास्य दुरावणार नाहींत. काँग्रेस हें पुरेपूर ओळखते.वसंता, लोकमान्य टिळक, देशबंधु दास-सर्वच पुढा-यांना काँग्रेसच्या या धोरणासारखेंच धोरण ठेवावें लागलें. देशबंधुदासांनींहि १९२४-२५ मध्यें बंगालमध्यें हिंदु-मुस्लीम पॅक्ट केला. त्यांना हिंदुमहासभावाल्यांनीं विरोधी केला. परंतु देशबंधु डगमगले नाहींत. त्यांनीं असा पॅक्ट केला तेव्हांच त्यांना प्रांतिक कायदेमंडळांत सरकारचा सारखा पराभव करता आला ! दिवाणांचा पगार तीन रुपये, असें ठराव त्यांनीं मंजूर केलें !! ब्रिटिशांचा पराभव करण्यासाठीं, ब्रिटिशांची सत्ता येथून घालवण्यासाठी वाटेल ती किंमत द्यावयास भारतील पुढारी तयार असत, त्यांनीं तयार असले पाहिजें. लोकमान्यांची, देशबंधु दासांची परंपरा आज काँग्रेस पुढें चालवीत आहे. तिच्या डोळयांसमोर देशाचे स्वातंत्र्य हीच एक गोष्ट रात्रंदिवस आहे. अर्जुनाला द्रोणाचार्यांनीं विचारलें, '' अर्जुना, तुला काय दिसतें आहे? '' तेव्हा तो नरवीर पार्थ म्हणाला, '' पक्ष्याचे डोके व बाणाचे टोंक याशिवाय मला कांही एक दिसत नाही. '' त्याप्रमाणे काँग्रेसला स्वातंत्र्य मिळणें याशिवाय दुसरी वस्तु दिसत नाहीं. मुसलमानांस किती जागा, हिंदुंस किती, हें भांडण इंग्रजासमोर कशाला? मुसलमानांस दोन जागा जास्त म्हणून तीन कोटी हिंदूनीं भिण्याचे कारण काय? उद्या जे कायदे होतील ते कोणा विशिष्ट जातीसाठी नाही होणार, दरिद्री जनता, श्रमणारी जनता, ती कोणत्याहि जातीची असो त्यांची स्थिती सुधारणें हें उद्यां स्वराज्यातलें मुख्य काम. सर्वसामान्य जनतेचा संसार सुधारणें हें मुख्य काम.

ही अशी काँग्रेसची दृष्टि आहे. पाकिस्तानला महात्माजींनीं प्राणत्यागनेंहि विरोध करण्याचें ठरविले आहे. दहा हजार वर्षाचा अखंड भारताचा प्रयोग का धुळींत मिळवायचा? मुसलमानांनी अलग होणें हा हिंदुस्थानचा अपमान आहे. सर्व जाति, धर्म, संस्कृति यांना एकत्र नांदवण्याचा प्राचीन काळापासूनचा आपला प्रयोग का अर्धवट सोडायचा? छे:, महात्माजी तो प्रयोग पुढें नेतील. आणि सर्वांचा वाढता पाठिंबा मिळेल.एक ' पाकिस्तान ' म्हणूं लागले-तर दुसरे ' हिंदू राष्ट्र ' म्हणून ओरडूं लागले. दोघांचे न कळत एकच धोरण. देशाचे तुकडे करण्याचें. पाकिस्तानमुळें ' हिंदूचा हिंदूस्थान ' जन्माला आला. आणि ' हिंदूओंकाहि हिंदुस्थान ' या घोषणेनें पाकिस्तानाला जोर चढला. दोन्हीं हातांची टाकी आहे ही ! एकानें गाय मारली, दुसरा वासरूं मारतो, हा खरा मार्ग नव्हें. काँग्रेसचा मार्ग हा खरा मार्ग आहे.प्रभु करो व भारतीय तरुणांस सदूबुध्दि देवो.

तुझाश्याम

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED