अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 5 Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 5

द सस्पेक्ट्



नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद. 
'काही अपडेट्स?' त्याने विचारले.
'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.'
'तसा मला पण आहे. पण तो केस बाबत जास्त सिरीयस नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीये.'
'त्याचे या केस बाबत सिरीयस नसणे हेच तर चिंतेचे कारण आहे. तो पहिल्या पासून ऑफिशियली या केसमध्ये इनवॉल्व्ह आहे. तरी तो इतका निष्काळजी कसा काय आहे? इजन्ट इट सस्पिशियस?' 
'गेस यू आर राईट! नजर ठेव त्याच्यावर!'
'येस सर!'
पण यांना हे कुठे माहीत होते, की मिस्टर वाघच त्यांच्यावर नजर ठेवून होता.

"एक मिनिट! म्हणजे हा नवीन भेटत कुणाला होता?" मिस्टर वाघला मध्येच अडवून मी त्याला प्रश्न केला.
आणि नांव ऐकून मी दचकलोच... 
"कार्तिक रणशिंगे! सीबीआय ऑफिसर."
"म्हणजे?! तो परत गेलाच नव्हता?"
यावर मिस्टर वाघ नुस्ता हसला...

खोटी मेडिकल लिव्ह घेऊन कार्तिक इथेच थांबला होता. त्याला त्याचे रेकॉर्ड खराब होऊ द्यायचे नव्हते. आज पर्यंत एकही केस त्याची अनसोल्व्ह्ड राहिली नव्हती. त्यामुळे त्याला ही केस अनोफिशियली क्रॅक करायची होती आणि म्हणूनच त्याने नवीनला हाताला धरले होते. 
        कार्तिकला ही लिव्ह याच बेसिसवर देण्यात आली होती, की त्याने बाबाराव यांच्या केसपासून दूर रहावे आणि लगेच हे शहर सोडावे. विरेनच्या प्रकरणानंतर कार्तिकची मानसिक स्थिती ठीक नाही हे सीबीआयला तसे पटण्यासारखेच कारण होते. यासाठी त्याला एकदा सीबीआय हेडकोर्टरला जाऊन सुट्टीचा अर्ज देऊन यावे लागले होते. सायकियाट्रिस्टकडून त्याची रीतसर तपासणीही करून घेतली होती. आणि  सायकियाट्रिस्टकडून ही कार्तिक मानसिक तणावाखाली असल्याचे रिपोर्ट्स दिले गेले होते. 
सायकियाट्रिस्टचे म्हणणे होते, की कार्तिकने दिल्लीत राहूनच काऊंन्सिलिंग ट्रीटमेंट घ्यावी. पण कार्तिकमुळे झालेल्या प्रकरणामुळे ब्युरोवर काय ओढवेल याची चिंता करत सीबीआय डिरेक्टरनी त्याची सुट्टी संँग्शन केली होती. 

(कार्तिकवर व पर्यायाने सीबीआयवर विरेनच्या प्रकरणामुळे पुढे काय एक्शन घेतली गेली ते आपल्या विषयासाठी तितकेसे महत्त्वाचे नाही. आणि ते इतके गंभीरही नाही. म्हणून टाळतोय...).

डिरेक्टरनी त्याला त्याच्या गावी जाऊन सायकियाट्रिस्टचे काऊंन्सिलिंग व नीट आराम घेण्यास सांगून धाडले. आणि सोबत एक ऑफिसरही त्याला घरी सोडण्यासाठी पाठवला होता.
         त्यानुसार त्याने आपले मूळ गांव गाठलेही होते, पण फक्त घराला पाय लावून तो परतला होता. 

"पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती?" 
       खरे तर माझा हा मिस्टर वाघला प्रश्न मूर्खपणाचाच होता. त्याला काय अशक्य आहे?...
"आईव्ह फिक्स्ड सम बग्स्!" त्याने स्पष्ट केले.
"कुठे?" 
कपड्यांत तर नक्कीच नाही. कारण कपडे तर रोज बदलले जात असणार. मग कुठे?...
"मी सांगू नये आणि तू ऐकू नये!" तो निर्विकार चेहरा करून मला म्हणाला.
हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर मात्र जे भाव आले ते मी नाही सांगू शकत. माझी ही अवस्था पाहात मिस्टर वाघ काही काळ तसाच बसून राहिला. पण दोन - तीन मिनिटांनी तो बस्ट झाला आणि जोरजोरात हसायला लागला. 
"तू समजतोयस तसे काही नाही. कार्तिकचे हॉटेल रूम, त्याची गाडी, शूज, नवीनचे घर, शूज अशा बऱ्याच ठिकाणी. म्हणून तसे म्हणालो. खूप दमछाकीचे काम होते ते."
                  त्याचा खुलासा ऐकून मी रिलॅक्स झालो. नाही म्हणजे मिस्टर वाघचा काही नेम नाही म्हणून... बाकी काही नाही. 
 मागे नवीन एका हॉटेल रूमवर कोणाला तरी भेटायला गेला होता. त्यावेळी मिस्टर वाघने त्याचा पाठलाग केला होता. त्यावेळी त्याला कुणकुण लागली होती म्हणून त्याने दारामागील 'राक्षस' नक्की कोण हे शोधून काढले होते. आणि तो कार्तिक निघाला होता. आणि त्याच्या जोडीला होते नवीन नांवाचे पिशाच्च... पण हे दोघे मिळून सुद्धा मिस्टर वाघला झपाटू शकणार नव्हते. दोघे कर्तव्यनिष्ठ होते, म्हणूनच ते वाघच्या टप्प्यातून वाचले होते... 
           नाही तर त्याला या दोन शिकारी मिळाल्या असत्या...  

      (या वाक्यावरून एक घटना आठवली, पण ती पुन्हा कधी तरी...).

             दरम्यानच्या काळात बाबू सुतारचा पोस्टमार्टम झाला होता. त्याच्या पोटात व्हिस्की व रावस माशाचे तुकडे सापडले होते. त्याचा मृत्यू मात्र एक्सेसिव्ह कार्बन डायॉक्साईड स्वालोव्ह केल्यामुळे झालाय असा पॅथलॉजिस्टचा निष्कर्ष होता. 
            कार्बन डायॉक्साईड बाबू सुताराच्या शरीरात गेले कसे यासाठी तपास चालू झाला होता. पंचमाना करून त्याचा मृत्यू झालेले त्याचे दुकान सील करण्यात आले होते व तो व्हिस्की घेत असलेला ग्लास, तो खात असलेला 'इले्युथेरोनेमा टेटॅडॅक्टिलम' (रावसचे सायंटिफिक नांव. हो. वाघने मला सांगितल्यावर मीही आठ - दहा वेळा पुन्हा पुन्हा ते नांव विचारले. वैतागून त्याने मला ते लिहून दिले) म्हणजेच सॅलमन मासा, इत्यादी संशयित वाटणाऱ्या गोष्टी जप्त करून फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्या होत्या. 
           फोरेन्सिक रिपोर्ट वरून कळाले, की तो व्हिस्की घेत असलेल्या ग्लास मधून अतिरिक्त कार्बन डायॉक्साईड त्याच्या पोटात गेले होते. 
वाघने सुद्धा बाबूच्या दुकानाची पाहणी केली आणि कोणाच्याही लक्षात न आलेली एक गोष्ट त्याला तेथील स्टोरेजमध्ये सापडली. 
 त्या गेम पार्लरच्या स्टोररूममध्ये वेल इन्सुलिटेड स्टायरोफोम् कुलर मध्ये खूप सारी कार्डिस म्हणजेच ड्राय आईस व व्हिस्कीच्या, बिअरच्या बाटल्या पडल्या होत्या. (स्टायरोफोम् म्हणजे हलका थर्मोकोल सारखा पण त्यापेक्षा टणक पदार्थ आहे जो कंटेनर्स, कप्स्, इ. बनवण्यासाठी वापरतात).
           त्याने तेथील नोकराकडे चौकशी केल्यावर समजले, की शहरात अवेळी लाईट जाते म्हणून बिअर वगैरे थंडगार ठेवण्यासाठी त्या ड्राय आईसचा वापर  केला जायचा. ड्राय आईस म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असलेले कार्बन डायॉक्साईड. यावरून सर्वांना सगळा खुलासा झाला. 
बाबूने टेंशनमध्ये चुकून ड्राय आईस व्हिस्कीत घातले असेल, किंवा मग ड्राय आईस व नॉर्मल आईस मधला फरक बाबूला नशेत लक्षात आला नसेल असा तर्क मिस्टर वाघने काढला; जो सगळ्यांना अगदीच पटण्यासारखा होता. 
"थँक्स मिस्टर वाघ. तुम्ही आणखी एक केस सॉल्व्ह केली. हे प्रकरण खूप जटिल होत असताना तुमची ही मदत खूप मोलाची आहे." कमिशनरनी मिस्टर वाघला धन्यवाद दिले.
"हो. पण तुमच्यातल्या काही जणांना तर असे वाटतेय, की मी इथे फक्त टाईमपास करण्यासाठीच येतोय."
ही केस देखील मिस्टर वाघनेच सॉल्व्ह केली आणि एक उपहासात्मक कटाक्ष त्याने नवीनकडे टाकला. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू नवीनला डागण्या देत होते आणि नवीन यावेळीही चरफडण्याशिवाय काहीच करू शकला नाही.