A Heavy Prize - A Mr. Wagh story books and stories free download online pdf in Marathi

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 6

डिगिंग् अप्


 आतापर्यंत मृत झालेल्या सर्व लोकांच्या अटॉप्सीज् होऊनही त्यांच्या बॉडीज् त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्या नव्हत्या. ही लोकं जोडलीच गेली होतीत अशा कॉन्स्पिरसी सोबत, की त्यांना जावू देणे कोणालाच हितावह नव्हते.
           बाबाराव देसाईंच्या ऐवजी कोणी दुसरी व्यक्ती असती, तर कोणीच त्याला इतके सिरियस्ली घेतले नसते. पण बाबाराव यांचा समाजावर एक प्रभाव होता. लोक त्यांना आदर्श मानायचे. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने जनसमुदाय खवळला होता. त्यामुळे ही केस लवकरात लवकर मार्गी लावण्याकडेच सर्वांचे लक्ष होते. पण ते काही केल्या होत नव्हते. दरवेळी कोणा नवीनच व्यक्तीचा खून व्हायचा आणि या प्रकरणाला फाटे फुटायचे व मूळ तपासाला बगल व्हायची.
   त्यामुळे वरुणने एक गोष्ट पक्की केली, की आता इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालायचे नाही. एकदा का बाबारावांच्या खुन्याचा पत्ता लागला, की सगळ्याच मृत्यूचे खुलासे होतील असे त्याला वाटत होते. कारण एक गोष्ट नक्कीच सगळ्यांच्या निदर्शनास आली होती, की खून त्याच लोकांचे होत आहेत, जे या - त्या कारणाने बाबाराव देसाईंशी जोडले गेलेले आहेत; मग ते त्यांचे नातेवाईक असोत वा त्यांच्या संपर्कात आलेला कोणी...
            मुडद्यांवर मुडदे पडत होते. आणखी किती मरतील याची काही कल्पना नव्हती. आणि आत्तापर्यंत इन्वेस्टीगेशन टीमने जवळपास दोन हजार पानांचा रिपोर्ट समितीसमोर सादर केला होता आणि तोही तसा निरर्थकच. त्यातून ठोस असे काही निष्पन्न होत नव्हते. ना गरजेची माहिती समोर येत होती. आतापर्यंत झालेल्या मृत्यूची आणि मृतांची नोंदच फक्त त्यात नमूद होती.
           म्हणून वरुणने पुन्हा सगळ्या डेडबॉडीजचे पोस्टमार्टम्स् पुन्हा करण्याची परवानगी कोर्टाकडून मिळवली व तसे आदेशही दिले. मृतदेह हाती येत नाहीत म्हणून मृतांच्या सर्व नातेवाईकांचा संताप होत होता. आम्हाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू द्या. त्यांच्या शवांचा असा विटाळ करू नका असा आग्रह काहींचा होता, तर काही नातेवाईकांकडून पोलिसांना शिव्या - शापांच्या लाखोली व्हायल्या जात होत्या. 
          बाबारावांचा मृतदेहही असाच पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे त्यांचे समर्थक, स्नेही सुद्धा पोलिसांवर नाराज होते आणि रस्त्यावर उतरून सर्वांचीच आंदोलने, आक्रोश चालू होते. बाबारावांना वाचवू शकला नाहीत, निदान आता शांतपणे मरू तरी द्या असे काहींचे म्हणणे होते. त्यांच्या खुन्याला लवकरात लवकर पकण्यात यावे असा तगादा सुद्धा काही सेवाभावी संस्थानी लावून धरला होता. पण वरूणने कोणालाच भीक घातली नव्हती. 
         आदेशानुसार पुन्हा सगळ्या मृतदेहांवर अटॉप्सीज् करण्यात आल्या. पूर्वीपेक्षा नवीन काही समोर आले नाही आणि या प्रयत्न देखील फोल ठरला. तसे तर मृत्यू होईन खूप वेळ लोटला होता. या साऱ्याचा तसा काही उपयोग झालाच नसता, तरी एक प्रयत्न म्हणून या अटॉप्सीज् ऑपरेट केल्या गेल्या होत्या. असे नव्हते, की ही गोष्ट वरुणला लक्षात आली नव्हती. पण त्याला काही धागा मिळण्याची एक आशा होती. पण ती निष्फळ ठरली होती. 
         निराश होऊन सर्व डेडबॉडीज् त्यांच्या - त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आल्या. मिस्टर वाघ प्रत्येकाच्या अंत्यसंस्कारासाठी आवर्जून हजर होता. बाबारावांची डेडबॉडी मात्र अजूनही कस्टडीतच ठेवण्यात आली होती. यामुळे तर जनतेचा रोष अधिकच उसळला. 
         या सगळ्या रामरगाड्यात मिस्टर वाघ मात्र शांत होता; चेहऱ्यावर तेच नेहमीचे गूढ स्मित घेऊन. जणू जे काही चालू आहे, ते का आणि कसे होते आहे, कोण करत आहे हे माहीत असल्यासारखा... 

        आणि काही दिवसांनी आणखी मृत्यू; प्रभाच्या नवऱ्याचा, शेखरचा. आता कोणत्या घटनेवर लक्ष द्यायचे नाही असे ठरवूनही वरुणला यावेळी तसे करता आले नाही. कारण आता मृत्यू बाबाराव देसाई मारणापूर्वी राहत असलेल्या घराची चौकट पार करून आत गेला होता...
         यावेळी कोणतीच ढिलाई पत्करायची नाही असे वरुणने ठाम केले. सर्वांत आधी त्याने प्रभाला सिक्युरिटी देऊ केली. काही मेल व लेडी ऑफिसर्सना तिच्या व तिच्या पाच वर्षांच्या मुलीच्या सुरक्षेसाठी तिच्या घरी थांबवण्यात आले. पण तिला नक्की काय झालंय हे अद्यापही कळू दिले नव्हते. सिक्युरिटीचेच कारण आहे, तर तिलाही प्रोटेक्शन दिले आहेच की. मग शेखरला त्यांच्या पासून दूर ठेवण्यामागचे कारण काय अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली. पण तिच्या या शंकेचे तिच्या मनाला पटेल असे उत्तर मात्र कोणी देऊ शकले नाही. गुन्हेगाराला पकडण्याची पॉसीबिलिटी वाढण्याच्या शक्यतेवरून हे केले गेले असल्याचे ती खूपच मागे लागल्यावर तिला सांगण्यात आले. पण याने काही तिचे समाधान झाले नाही. 
       वरूणचा प्लॅन काय होतं माहीत नाही, पण तो वर्क झाला, तर खुनी नक्कीच सापडणार होता...

        शेखरचा मृत्यू तो काम करत असलेल्या निकम फौंड्री मध्ये काम करत असताना झाला. तेथे तो एक वेल्डर म्हणून काम करायचा. दहा - बारा तास काम करूनही नऊ हजार रुओये पगार होता. त्यातही कामावर यायला वेळ झाला, की पगार कापला जायचा.
         मरणापूर्वी शेखरला डायरियाचा त्रास चालू झाला होता. तो सतत टॉयलेटला जात असल्याचे त्याच्या सहकार्यांनी सांगितले. यावरून शेखरला मॅनेजरने खूप झापलेही होते. शेखर कामचुकारपणा करण्यासाठी हे नाटक करतोय असे तो ओरडत होता. पण सहकार्यांच्या मते शेखरला खरेच खूप थकवा जाणवत होता. सतत मळमळ होत होती. डोके दुखत होते. तोंड शुष्क व्हायचे आणि मग इच्छा नसताना त्याला बळजबरी खूप सारे पाणी प्यावे लागायचे. मग पुन्हा त्याला बाथरूमचा त्रास चालू व्हायचा. अशात त्याच्या हृदयाची धडधड खूप जोराने चालू झाली होती.  

"सकाळी आल्या आल्या त्याला हा सगळा त्रास चालू झाला होता?" वरुणने माहिती देणाऱ्या शेखरच्या सहकाऱ्याला विचारले. 
"डोकेदुखी, अस्वस्थपणा नेहमी असायचाच, पण त्या दिवशी त्याला खूपच त्रास झाला होता." त्याने आणखी माहिती पुरवली.
"त्याच्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना सुद्धा थोडी अस्वस्थता, डोकेदुखी जाणवत होती. मी शेखर पासून थोड्याच अंतरावर होतो. माझी पण तीच वाट लागली होती!" एकजण पुढे होऊन म्हणाला.

          त्याचे सहकारी त्याला आराम करण्याचा आग्रह करत होती. त्याचे काम त्याच्यातील कोणी तरी करेल असेही सांगण्यात आले, पण तो ऐकला नाही. पगार कट होऊ नये म्हणून तो तशा बिकट अवस्थेतही काम करत होता. लंच ब्रेकपर्यंत त्याने स्वतःला कसे तरी सांभाळले. 
          लंच ब्रेकमध्ये मात्र तो जेवण्याआधी म्हणून जो बाथरूमला गेला तो दहा - पंधरा मिनिटे परतलाच नाही म्हणून सर्वांनी सावध होऊन टॉयलेटचा दरवाजा फोडला, तर आत त्याचा मृतदेह आढळला.

         प्रभापासून मात्र ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली. सिक्युरिटी रिजन्सचे कारण देऊन शेखरला एका सुरक्षित जागी ठेवलंय एवढेच तिला सांगण्यात आले.

         शेखरचा पोस्टमार्टम रिपोर्ट वरुणच्या हातात पडला. शेखरच्या मृत्यू दरम्यान त्याचे ब्लडप्रेशर खूप लो झाल्याचे पॅथेलॉजिस्ट्सना आढळून आले. त्याच्या शरीरातील झिंकचे प्रमाणही खूप कमी झाले होते. डोपामाईन तयार करणारे सेल्स डेड झाले होते (डोपामाईन हे न्यूरोट्रान्समीटर आहे. जे मेंदूत माहिती प्रसाराचे काम करते. यामुळे आपल्या शरीराच्या अवयवांची हालचाल होत असते). त्यामुळे डोपामाईन प्रोडक्शनही रिड्युस झाले होते. आणि तो पार्किन्सन्स डिसीजचा शिकार झाला होता. त्याचे सेंट्रल नर्व्हस सिस्टीम ब्रेक डाऊन झाली होती आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता. 
         त्याच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त झाले होते. ऑक्युपेशन सेफ्टी अँड हेल्थ अडमिनिस्ट्रेशन या अमेरिका स्थित संस्थेने दिवसाच्या आठ तासाच्या कामात २५ पीपीएम (पार्टस पर मिलियन/मिलिग्राम्स पर लिटर) इतके नायट्रिक ऑक्साईडचे लीगल लिमिट सेट केली आहे. इतक्या प्रमाणात मानवी शरीर नायट्रिक ऑक्साईडशी कॉन्टॅक्ट सहन करू शकते. पण १०० पीपीएमच्या वर नायट्रिक ऑक्साईड हे विनाविलंब घातक ठरते. 
        नायट्रिक ऑक्साईड ही एक शिल्डिंग गॅस आहे. शिल्डिंग गॅसेस हे रासायनिक क्रिया करू न शकणारे इनर्ट किंवा सेमी - इनर्ट गॅसेस असतात, जे वेल्डिंगच्या कामासाठी वापरले जातात. वेल्ड एरिया ऑक्सिजन व वॉटर वेपर पासून संरक्षित करण्याचे काम या गॅसेस् करतात. 
       नायट्रिक ऑक्साईड वेल्डिंगच्या वेळी ओझोन निर्मिती कमी करण्याचे काम करते. ओझोन जास्ती श्वसन करण्याने घसा खराब होवू शकतो. हे फुफ्फुसासाठी घातक असते. फुफ्फुसे काम करणे बंद करू शकतात. श्वसनाचा त्रास संभवू शकतो. अस्थमाची भीती असते. छातीत दुखणे सुरू होऊ शकते. आणि यापासून बाचावासाठीच नायट्रिक ऑक्साईडचा उपयोग होतो. पण त्याचेही प्रमाण ठरवले गेले आहे. अति नायट्रिक ऑक्साईडही घातकच. आणि शेखरचा १०० पीपीएम् पेक्षा जास्त नायट्रिक ऑक्साईडशी संपर्क आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. 
      मिस्टर वाघसह सर्वजण पुन्हा फौंड्रीवर पोहोचले. क्राईम सीन(?)ला प्रोटेक्ट करण्यासाठी आदल्या दिवशी पासून ऑफिसर्स तेथे तैनात करण्यात होते. फौंड्रीच्या भोवतीने क्राईम सीनच्या पट्ट्या लावल्या गेल्या होत्या. सर्व सामान काल शेखर रावराणेच्या मृत्यूवेळी ज्या ठिकाणी पडले होते, ते तसेच आत्तापर्यंत पडून होते. 
      सकाळी आलेले सर्व कर्मचारी काम चालू होऊ शकत नसल्याने फौंड्री बाहेरच उभे खोळंबले होते. आणि आज आलो नसतो, तर बरे झाले असते असे भाव बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावर मिस्टर वाघला दिसत होते. त्यांचेही बरोबरच होते म्हणा. या प्रकारणाचा छडा लागल्याशिवाय आता काम थोडीच चालू होणार होते? 
        फौंड्रीचा मालक सुशांत निकम हा तर खूपच वैतागला होता. वरुणसह सर्वजण आल्यावर त्याने कांगावा करण्यास सुरवात केली. वरपर्यंत जाण्याच्या धमक्याही त्याने देऊन झाल्या, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याला कोणी किंमत देत नाही हे पाहून काही कर्मचाऱ्यांना एक वेगळाच असुरी आनंद मिळत होता. आलो ते बरेच झाले असे आता हिरमुसलेल्या लोकांना वाटू लागले. निदान आपल्याला त्रास देणाऱ्या मालकाची ही फजिती 'याची देही याची डोळा' पाहण्याचे दुर्लभ दृश्य त्यांना पाहायला मिळाले होते. शेवटी त्याचे मुटकुळे करून त्याला त्याच्याच फौंड्रीत एका कोपऱ्यात बसवण्यात आले. 
        वरुणने फौंड्रीचे सगळेच्या सगळे सेफ्टी गियर्स व वेल्डिंगचे सगळे साहित्य तपासण्याचे आदेश दिले. त्याच्या एका वाक्यावर तेथील सर्व सामान फॉरेन्सिक लॅबला हलवण्यात आले. 
        त्या दरम्यान मिस्टर वाघने शेखर वेल्ड करताना वापरत असलेले इलेक्ट्रोड व त्याचा आणखी इलेक्ट्रोड्स असलेला बॉक्स उचलून घेतला. हे नवीनच्या नजरेतून सुटले नाही. तो वरूणच्या कानात काही तरी कुजबुजला, तसा वरुण मिस्टर वाघकडे आला.
"काय उचललंय?" त्याने मिस्टर वाघला जाब विचारला.
"वेल्डिंग करण्यासाठी वापरतात ते इलेक्ट्रोड्स आहेत." मिस्टर वाघ निर्विकार चेहऱ्याने म्हणाला.
"गिव्ह दोज टू मी! तुम्ही कोणतीही वस्तू आणि तीही जी प्राईम एव्हीडेन्स ठरेल अशी तुम्ही घरी नाही घेऊन जाऊ शकत!" वरुणने मिस्टर वाघला खडसावले. 
 या प्रकारामुळे नवीन मात्र आतून चांगलाच सुखावत होता. हे मिस्टर वाघला समजून आलेच. मग त्यानेही कुरघोडी केली. 
"मी देखील या केसवर ऑफिशियल इन्वेस्टीगेटर आहे. तुम्ही मला रोखू शकत नाही!"
'इन्वेस्टीगेटर कसला? तू तर एलिगेटर आहेस.' नवीन पुटपुटला. 
 त्याच्या ओठांची हालचाल झाल्याने तो नेमके काय म्हणाला हे मिस्टर वाघला समजले. तो नवीनकडे रोखून पाहू लागला, तसा नवीन चपापला आणि खाली पाहू लागला.
"बट आय डोन्ट अलाव्ह दॅट! अँड इस्पेशली टू यू!" वरुण रागाच्या फणकाऱ्यातच बोलला.
"वन थिंग ऑलवेज् रिमेंबर मिस्टर वरुण त्रिपाठी; आय एम नॉट बॉण्ड टू यू! मी ही केस कमिशनर यांच्या सांगण्यावरुन हाताळतोय. त्यांनी मला सांगावं. मी निघून जाईन. अदर व्हाईज नो!" मिस्टर वाघने वरुणला ठामपणे ठणकावले,
"आणखी एक! या प्रकारातील बऱ्याच गोष्टींची उकल मीच केली आहे. ज्यात तुम्ही, तुमची संपूर्ण टीम आणि यंत्रणा कुचकामी ठरली आहे!"
"यू बास्टर्ड...!" 
वरुणने मिस्टर वाघाची कॉलरच पकडली! 
          मिस्टर वाघ मात्र काहीच भाव चेहऱ्यावर न आणता त्याच्या कॉलर धरलेल्या हाताकडे पाहत होता फक्त. 
          हा गदारोळ पाहून दूर फौंड्रीतील कर्मचाऱ्यांची चौकशी करत असलेले कमिशनर धावत तेथे आले आणि त्यांनी वरुणचे हात मिस्टर वाघच्या कोलरवरून खाली घेतले,
"हे काय करताय मिस्टर वरुण? पब्लिकमध्ये तेही फिल्डवर आपण आपल्याच सहकाऱ्याशी भांडणे आपल्याला शोभत नाही. अशाने चुकीचा मेसेज जाईल फक्त! विसरू नका मीडिया आपल्या मागावर आहे. आपली एक चूक आणि सगळं संपेल. लोकांना आपल्याला हरलेलेच तर पाहायचंय. त्यामुळे आपण सामंज्यस्याने घ्यायला हवे! लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट्स. आय अशोअर यू!"
 कमिशनर मिस्टर वाघची जबाबदारी घेतायत म्हंटल्यावर वरुण थोडा ढिलवला.
"ओके! पण मी याला सगके इलेक्ट्रोड्स घेऊ जावू देणार नाही!"
"मिस्टर वाघ, इस इट फाईन टू यू?" कमिशनरनी अगदीच नम्रतेने मिस्टर वाघला विचारले.
"तुम्ही त्याला काय विचारताय? मी माझा निर्णय सांगतोय!" वरुण अजूनही ठाम होता.
यावर काहीच न बोलता मिस्टर वाघने सर्व इलेक्ट्रोड्स खुले हात करून वरुण समोर धरले. वरुणने स्वतः काही इलेक्ट्रोड्स त्यांतून निवडले व साथी ऑफिसर करवी फॉरेन्सिकला पाठवून दिले. 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED