A Heavy Prize - A Mr. Wagh Story - 9 books and stories free download online pdf in Marathi

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 9

एन एन्काऊंटर विथ द डेथ गॉड्

               
       'वाघ जाऊन मध्ये दोन - तीन दिवस गेलेत. पण कशातच मन लागत नाहीये...'
मी मिस्टर वाघने सांगितलेली ही घटना लिहून काढत होतो...
'त्याने या लोकांना का मारले हा प्रश्न अनुत्तरीतच होता. शिवाय ते गिल्टी होते म्हणजे नक्की काय? असा काय त्या सगळ्यांनी गुन्हा केला होता, की मिस्टर वाघने इतके मोठे हत्याकांड रचले? आणि कसे? नवीन, कार्तिक, वरुण सगळे त्याच्यावर नजर ठेवून होते. त्यांच्याकडे फिट केलेल्या ट्रान्समीटर्सचे काय? त्याने हे कसे जुळवून आणले? आणि माऊसर...'
'शॅ! काहीच टोटल लागत नाही! मी जीभ आवरायला हवी होती. तो नाराज झाला आणि निघून गेला. आता पुन्हा तो मला भेटेल? बोलेल माझ्याशी? की मला सुद्धा...'
मी लिहिणं थांबवलं. ही उत्तरं मिळाल्या शिवाय कथा पूर्ण कशी होणार? जावं का त्याच्याकडे? नाही नको... नाही! जावंच!

          मिस्टर वाघच्या घराचे मेन गेट पार करत मी आत शिरत होतो, पण सावरतच. सांभाळत आणि अगदी सतर्कतेने! 
         काय माहीत, कुठून एखादा विषारी साप वळवळत पायात यायचा... जीव मुठीत धरून शेवटी मी मिस्टर वाघच्या मेनडोरपाशी पोहोचलो. बेल वाजवली. एक रॉकिंग बेल वाजली. पण त्या ट्यूनमध्येही एक गूढता होती. 
"या आत या!" मिस्टर वाघचा आतून आवाज आला.
        मी अजूनच सावधपणे आत गेलो. इकडे - तिकडे बघत मी मिस्टर वाघच्या लिव्हिंगरूम पर्यंत पोहोचलो. 
       मिस्टर वाघ कॉमिक (?) वाचत बसला होता. 
"तुमचीच वाट बघत होतो. उशीर केलात." वर न पाहताच तो बोलला.
       या कळलं नाही का, की मी आहे ते? हा मला कोणी वेगळाच समजतोय का? कोणीतरी याला भेटायला येणार असेल. तरीच दरवाजाही उघडा होता. आणि त्याने आत यायलाही सांगितले...
"हो तुम्हीच मास्टर सूरज!" कॉमिक खाली ठेवत तो माझ्याकडे पाहत बोलला.
"म्हणजे तुम्हाला माहीत होते, की मी कधी तरी येणार?"
"हो!" त्याचा चेहरा निर्विकार.
"कसे?" मी थोडे बिचकतच विचारले.
"किडे! दुसरे काय!?" हा मला टोमणा होता.
असे म्हणून त्याने नेहमी सारखे स्मित केले. आणि मला बसण्यासाठी खूण केली.
मी बसलो आणि कॉमिक खाली ठेवून तो उभारला. 
"तू चहा घेणार?" 
         असे विचारत माझ्या उत्तराची वाट न पाहताच तो आत निघून गेला. मी भीत - भीत चौफेर नजर फिरवत होतो. कुठे सापबिप दिसतोय का बघत.
         तशातही माझ्या डोक्यात एक भीती डोकावून गेली.
'हा नेहमी मला चहा का पाजतो? मला डायबिटीक करण्याचा तर याचा प्लॅन नाही? म्हणजे मग कधी तरी इन्सुलिनचा ओव्हर डोस देऊन मलाही... याला लोकांच्या आजाराचा किंवा कमजोरीचा वापर करून खून करण्याची सवय आहेच... नाही नाही! मग चहात विष... नाहीच! मी ओव्हर थिंकिंग करतोय! असं काहीच नसणार! आपल्याकडे येणाऱ्या लोकांना आपण चहा ऑफर करतोच की...' एक - एक क्षण अंतासारखा होता.
         मिस्टर वाघ येण्याच्या मधल्या काळात मीच स्वतः पुढे प्रश्न उभा करत होतो आणि मीच त्याची उत्तरं स्वतःला देत होतो. 
         तो काही वेळाने बाहेर आला. हातात चहाचे मग. 
"दार्जिलिंगचा बेस्ट चहा! पिऊन बघ! आवडेल तुला." मग माझ्या समोर धरत बोलला,
"मी काही मळे विकत घेतलेत तिकडे! तिथलाच हा." तो समोर बसला.
'एवढा पैसा हा आणतो कुठून? पण हे मला तो कधीच सांगणार नाही कदाचित.'
"मी सगळ्या हाय प्रोफाईल केसेसच घेतो!'"
'मग ही केस? यात तर सगळेच गरीब...'
"धिस केस वॉज एक्सेप्शनल!" पुन्हा मनातले ओळखल्यासारखा तो बोलला,
"आतली गोष्ट सांगतो. या केसाचेही जाम मिळालेत!" त्याने माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न वाचला होता आणि त्याचेच हे उत्तर होते.
त्याने चहाचा घोट घेतला.
"विचार. काय हवंय?" 
         मी काहीच न बोलता चहाचा घोट घेतला. चहा खरंच खूप मस्त लागत होता. त्याचा आरोमा... अजूनही चव आठवते. नक्कीच महाग असणार!
"सूरज!" त्याने हाक मारली.
"त... तुम्ही म्हणताय की सगळ्यांना तुम्ही मारले, पण जे मेलेत ते कोणत्या ना कोणत्या आजाराने. नाही तरी काही तरी एक्सिडेंट झाल्याने म्हणजे त्यांच्या - त्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि तुम्ही म्हणताय, की तुम्ही त्यांना मारलंय. हे कसे काय? तर मग तुम्ही त्याच्या विक्नेसेसचा उपयोग केला का?" मी घाबरतच विचारले.
        यावर तो हसला,
"दॅट व्हॉज ऑल माय सेट अप!" 
        मी चक्रावलो.
"सेट अप?" मी आश्चर्याने विचारले.


समर नकातेच्या मृत्यूनंतर सर्वांमते सगळे खुलासे झाले होते. त्यामुळे प्रभाची सिक्युरिटी उठवण्यात आली होती. 
         मिस्टर वाघ तिच्या घराच्या बाहेर उभा होता. त्याने नॉक केले.
"प्रभाताई!" त्याने हाक मारली.
         थोड्याच वेळात प्रभाने येऊन दार उघडले. तिने त्याला आत घेतले.

घरात, 
"या ना बसा." प्रभाने त्याला बसण्यास सांगून चहासाठी आत गेली.
"ताई, चहा करत असाल, तर साखर घालू नका." तो ओरडला. 
त्याची ही विचित्र ऑर्डर ऐकून प्रभा पुन्हा बाहेर आली.
"का? काय झाले?" तिने काही न समजल्याने विचारले.
        मिस्टर वाघने खिशातून शुगर फ्रीची डबी काढली. 
"मी हे वापरतो. चहा अगदी अमृतासारखा लागतो." मिस्टर वाघ हसत म्हणाला.
"बरं." म्हणून ती आत गेली.

       (मिस्टर वाघ शुगर फ्री वापरतो हे ऐकून माझे टेन्शन कमी झाले...)

       प्रभा येईपर्यंत तो ती छोटी पण स्वच्छ, टापटीप खोली मिस्टर वाघ पहात होता. त्याचवेळी त्याची नजर प्रभाच्या मुलीच्या संस्कृतीच्या शाळकरी पुस्तकांवर पडली. त्यांतील एक घेऊन तो चाळत बसला.
      प्रभा चहा घेऊन आली. ट्रे तिने वाघ समोर ठेवला. 
"हे काय एकच कप?" मिस्टर वाघने विचारले.
"मी नाही घेत. घ्या तुम्ही!" 
"मिच्च! असं कसं?" 
त्याने ट्रे आपल्याकडे खेचून शुगर फ्रीच्या ड्रॉप्स कपात सोडल्या. थोडा चहा बशीत ओतला व कप प्रभाला देऊ केला.
"नको. घ्या तुम्ही!" ती नाहीच म्हणाली.
"घ्या हो! दोन घोटांनी काही होत नाही!" 
     मिस्टर वाघने फोर्स केल्यावर नाईलाजाने तिने कप घेतलाच.
"पणजोबांचा खरा खुनी सापडलाय, तर अजून शेखर कसा काय परत आला नाही?" तिने मिस्टर वाघला विचारले. चहाचा कप तसाच हातात होता.
"सॉरी! पण आता ते कधीच येणार नाहीत!" मिस्टर वाघ अतिशय थंडपणे बोलला.
"काय!" प्रभा जोरात किंचाळीच.
"क... कसं?..." तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पण पापणी मात्र लवलली नाही.
"मीच मारलंय त्यांना!" तो अधिकच थंडपणे बोलला.
तशी प्रभा घाबरली.
"सुरुवात दिनेश पासून करूयात." मिस्टर वाघच्या ओठांवर तेच गूढ स्मित तरारले.
"म्हणजे दिनेश यांनाही..." प्रभा वाक्य पूर्ण करू शकली नाही.
"ऑफ कोर्स!"


"एक मिनिट, दिनेशना तर ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर होती ना. त्यामुळेच रक्तस्राव न थांबून त्यांचा मृत्यू झाला..." मी मध्ये बोललो.
"त्याला कसला डिसऑर्डर नव्हता. मीच त्याच्यावर कट करण्यापूर्वी त्याला वॉरफरीन घ्यायला भाग पाडले होते!" तो म्हणाला.
"ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर नसल्याचे त्याच्या घरच्यांना माहीत असणारच त्यांनी कसे कार्तिकला सांगितले नाही, की असे काही नाही म्हणून?" मी त्याला थांबवत मध्येच विचारले.
एक लक्षात घे. स्वतः डॉक्टर सांगत असताना इन्वेस्टीगेशन टीम कोणावर विश्वास ठेवील? घरच्यांवर, की दिनेशवर ब्लड क्लॉटिंगसाठी उपचार करत असलेल्या  डॉक्टरवर? अटॉप्सीमध्ये दिनेशच्या रक्तात वॉरफरीन सापडले होते. त्यामुळे ते सिद्ध झाले." त्याने स्पष्टिकरण दिले.
"पण तरी..." माझे समाधान झाले नव्हते. 
दिनेशच्या घरातील कोणी काही बोलले नसेल असे नाही वाटत.
"खरे तर असा प्रश्न उभा राहिला होता. दिनेशला कसलाच आजार नव्हता. आणि तो कसली औषधेही खात नव्हता. असेच चौकशी दरम्यान त्याच्या घरच्यांनी सांगितले होते.
"मग?"
"मग काय? याचा विचारही मी आधी केला होता. आणि समरकडून डॉक्टर मोहन पाटीलला साफ इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या, की दिनेशला असा काही गंभीर आजार आहे हे त्याने घरच्यांना टेन्शन नको म्हणून त्यांच्या पासून लपवून ठेवले होते आणि म्हणून डॉक्टर विसीट, औषधे घेणे हे तो घरच्यांच्या अपरोक्ष करायचा म्हणूनच केमिस्टकडेही त्याच्या औषधांची नोंद पोलिसांना आढळणार नाही असे त्याने इन्वेस्टीगेशन टीमला सांगावे.


"नंतर विरेन." मिस्टर वाघ प्रभाला म्हणाला.
"आणि लीलावती मामी?"
"माझ्याकडे काही नाही. विरेनचेच काम ते!" 
"म्हणून त्याला संपवावे लागले. आणखी एक कारण होते. ते तुम्हाला माहिती आहेच! 
"तर; विरेनला अनेस्थेशियाचा ओव्हर झाला म्हणून तो मेला. पण डॉक्टरना त्यासाठी भाग मी पाडले."


"कसे?" मी विचारले.


"जॉ सर्जरी साठी विरेनला डेंटल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. सर्जरी आधी त्याला अनेस्थेशिया देण्यात आला. त्यामुळे तो पूर्ण बेशद्धावस्थेत होता. सर्जरी झाल्यावर त्याला आयसीयूला हलवण्यात आले. त्याचे ट्रेचर धकळण्यासाठी मी वॉर्डबॉईज्सना मदत केली. त्याचवेळी विरेनला मी 'रेमिफन्टिनल' हे ड्रग इंजेक्ट केले. सर्जरीपूर्वी त्याला वेदना कमी व्यवयात म्हणून हे ड्रग अनेस्थेशिया सोबत देण्यात आलेला होते. त्यामुळे त्याला याचा ओव्हर डोस झाला.
"जेव्हा विरेन शुद्धीवर आला. रेमिफन्टिनल ओव्हरडोसच्या साईड इफेक्टमुळे विरेनला हिप्नॉटिक्स व एमनियाटिक इशूज सुरू झाले. तो ठराविक वेळेपेक्षा जास्त बेशद्ध राहिलाच, पण विरेनला जाग आल्यावर तो रेमिफन्टिनलच्या मी दिलेल्या डोसमुळे रिसेन्ट घडलेली घटना विसरला होता. त्यामुळे तो विचित्र बिहेव करू लागला. यात तो स्वतःला अधिकच इंज्युअर्ड् करून घेईल म्हणून डॉक्टर्सनी त्याला पुन्हा लोकल अनेस्थेशिया दिली. लोकल अनेस्थेशियामुळे माणूस पूर्ण बेषधावस्थेत जातो. आणि अशा अनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे तो मेला. अशा प्रकारे मी सरविलेन्स कॅमेराज्ना ही अवॉईड केले आणि अटॉप्सी करणाऱ्या पॅथलॉजिस्ट व फिजिशियन सुद्धा ही ट्रिक पकडू शकले नाहीत, कारण 'रेमिफन्टिनल' हे सिडेटिव्ह ड्रग आहे. सिडेटिव्ह ड्रग्स् हे अनेस्थेशियाचा प्रभाव कमी करण्यासाठी वापरतात. पेशंटच्या वेदना कमी करण्यासाठी सर्जरीवेळी अनेस्थेशिया सोबत हे वापरले जाते." 
"विरेनच्या बायकोला रमाला मारायला मला काहीच करावे लागले नाही. तिच्या हॉस्पिटलमधील वागण्यावरून माझ्या लक्षात आले होते, की ती खूप हळवी आणि मनाने कमजोर स्त्री आहे. त्यामुळे हॉस्पिटल कँटीनबाहेर जिथे सीसीटीव्ही कॅमेराज् नाहीत तिथे भेटून मी तिला इतकेच म्हणालो, की 
'एका खुन्याची बायको म्हणून या समाजात जगणे खूपच क्लेशदायक आहे! मी अशा बऱ्याच बायका बघितल्या आहेत, ज्या या अवहेलनेपेक्षा मरण बरे म्हणतात!'    
"आणि काय? राहिलेले काम तिने स्वतःच पूर्ण केले. आपली नस कापून घेतली."
"पुढचा नंबर होता बाबूचा. तो त्याच्या गेमिंग पार्लरला गेल्यावर मीही त्याच्या मागून गेलो. त्याला भेटलो. त्याचा ग्लास मीच भरून दिला. आणि ड्राय आईस सुद्धा मीच त्यात टाकले! नशेत त्याला समजलेच नाही साध्या बर्फाऐवजी ड्राय आईस टाकले ते."
"शेखरला कसे मारले जाणून घायचेय? तो वेल्डिंगसाठी वापरत असलेल्या इलेक्ट्रोड्स मी लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवले होते. त्याने ती इलेक्ट्रोड्स जेव्हा वापरले, तेव्हा त्या नायट्रोजनची ऑक्सिजनशी रिऍक्शन झाली आणि नायट्रोजन मोनोऑक्साईड म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड प्रोड्युस झाले. आणि त्या गॅसमुळे तो मेला." मिस्टर वाघ प्रभाला सांगत होता...


"मग वरुणने नेलेल्या इलेक्ट्रोड्समध्ये फॉरेन्सिकला काहीच कसं नाही सापडलं?" मी मिस्टर वाघला मध्येच विचारले.
"दॅट व्हॉज् जस्ट् ए सिम्पल सायकॉलॉजी! मी ती इलेक्ट्रोड्स एक सारखी न धरता पुढे मागे धरली होती. असे करण्यामागे आणखी एक कारण होते, ते म्हणजे माझी इलेक्ट्रोड्स मला ओळखता यावीत म्हणून मी ती 'पॉईंट २५ सेंटीमीटरने कमी ठेवली होती. ती सरळ धरली असती, तर हा फरक कार्तिकच्या लक्षात आला असता. एरवी ती वापरताना, हाताळताना मोडतातच, पण मी कमी उंची असलेलेच इलेक्ट्रोड्स उचलतोय हे कार्तिक सारख्या ऑफिसरच्या नजरेतून सोतले नसते आणि मग कार्तिकने ते माझ्याकडून घेतले असते."
"तुम्ही आधीच ती इलेक्ट्रोड्स का नाहीत मिळवली? तुम्हाला हे सगळं तर करावं लागलं नसतं?"
"शेखर मेल्यापासून लगेचच तेथे पोलिसांचा पहारा होता. मध्ये मला मोकळा वेळच मिळाला नाही. आणि जरी मिळाला असता, तरी मी इथून इलेक्ट्रोड्स आधीच घेऊन गेलोय हे इंटेरोगेशनमध्ये कोणा ना कोणाकडून कार्तिक किंवा इतर टीम मेम्बर्सना समजले असते. अशाने मी आधी जाऊन तेथील इलेक्ट्रोड्स उचलली असती, तर माझ्यावरील संशय बळावला असता. आणि मला खरेच सर्व इलेक्ट्रोड्स मग त्यांच्या हवाली कराव्या लागल्या असत्या! म्हणून मला हवी ती इलेक्ट्रोड्स इन्वेस्टीगेशन टीम समोरच उचलावी लागणार होती!
 "मला जी इलेक्ट्रोड्स हवेत ते मी मागे ठेवणार, असा वरुण अंदाज लावणार हे मला माहित होते. माझी इलेक्ट्रोड्स मला ओळखणे अवघड नव्हते म्हणून मी मला हवी ती इलेक्ट्रोड्स पुढे धरली. आणि वरुणने मागील इलेक्ट्रोड्स उचलली आणि तो नॉर्मल इलेक्ट्रोड्स घेऊन गेला. लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेली इलेक्ट्रोड्स मी घरी घेऊन आलो. त्याला वाटले त्याने निवड केली, पण त्याच्या निवडीला मी इफेक्ट् केले हे होते आणि ते त्याला कळलंही नाही. चॉईस त्याची होती; पण निर्णय माझा होता! आता तुम्ही नेलेली इलेक्ट्रोड्स वरुणने तपासायला मागितले असते, तर? असं काही विचारू नको!"
त्याने ओळखले मी काय विचारणार होतो ते, त्यामुळे त्याने आधीच उत्तर दिले,
"कारण वरुणने तसं केलं असतंच, तर मी इलेक्ट्रोड्स दुसरीच दिली असती. हे माझ्यावर संशय असणाऱ्या वरुणने अंदाज लावलाच असेल. म्हणून त्याने मी नेलेली इलेक्ट्रोड्स मागीतलीच नाहीत!" तो पुन्हा कपटी हसला.
          मला मात्र काय बोलावे सुचेना...


"माझ्या चहात सुद्धा विष टाकलंय का?" प्रभाने अतिशय थंडपणे शून्यात पाहत विचारले.
"आहा. चहात नाही. पण याच्यात आहे!" त्याने एक पांढरी गोळी प्रभा समोर धरली,
"शुगर टॉफी. टेक इट!" मिस्टर वाघ क्रूरपणे स्मित करत म्हणाला. 
                  त्याने हात पुढे केला. 
"माझी मुलगी?" 
"डोन्ट वरी! मला माणसे जड नाहीत होत! मी तिची काळजी घेईन!" वाघ थोड्या रागाने म्हणाला.
त्याने प्रभाला ती गोळी घेण्यासाठी मानेनेच खूण केली.
         समोर साक्षात मृत्यू देवता बसला होता. प्रभाला आपला मृत्यू समोर दिसत होता. पळून जाण्याचा कोणताच मार्ग नाही हे ती जाणून चुकली होती. त्यामुळे कमालीची शांतता तिच्यात आली होती. प्रभाने त्याच शून्यावस्थेत ती गोळी घेतली आणि तोंडात टाकली.
मिस्टर वाघने आपली बशी प्रभासमोर ठेवली आणि तो शांतपणे उठला. 

         घराबाहेर; प्रभाची मुलगी बाहेरून खेळून घराकडे परतत होती. मिस्टर वाघने बाहेरच तिला अडवले आणि कडेवर घेतले. 
"काका आई कुठे आहे? बाबा पण किती दिवस झाले आलेच नाहीत." तिने निष्पापपणे मिस्टर वाघला विचारले.
"बाळा, ते देव बाप्पाकडे गेलेत. त्यांनी तुला आता इथून पुढे माझ्यासोबत रहायला सांगितले आहे!" मातीने बरबटलेल्या त्या मुलीला कडेवर घेत मिस्टर वाघ म्हणाला.
"नाही...!" मुलीने हट्ट धरला.
"मी तुला चॉकलेट देईन. खूप सारी खेळणी पण. आणि मी तुला शाळेत पण पाठवीन." वाघने चालत चालत तिची समजून काढण्याचा प्रयत्न केला,
"मोठी झाल्यावर तू काय होणार?"
"मी... मी ना, पायलट!" ती म्हणाली.
"अरे बापरे. खरंच?" 
"हो मग?!"
"मी तुला पायलट करीन. मग येणार ना माझ्या बरोबर?"
"हो!"

                        ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED