अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 7 Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 7

डेव्हिल्सेस् गेट - टुगेदर


ऑल डेव्हिल्स व्हेअर गॅदर्ड ऑन द सेम टेबल अगेंस्ड मिस्टर वाघ! पण याचा खरंच काही उपयोग होणार होता का?...
'मला अगदी पहिल्यापासून त्या वाघवर संशय आहे. जिथे - जिथे गुन्हा घडलेला असतो, तिथे - तिथे हा आधीच हजर असतो!' नवीनने बोलायला सुरुवात केली. 
'मीही सहमत आहे. त्याने नेलेल्या इलेक्ट्रोड्सचा रिपोर्ट क्लिअर आलाय.' वरुण बोलला.
'सॉरी टू से. मी ऑफेन्ससाठी बोलत नाही, पण तो तसा तुम्ही नेलेल्या लेक्ट्रोड्सचाही आला आहेच ना? शंका नको म्हणून विचारतोय.' कार्तिक बोलला.
'पण त्याने तेथील इतक्या वस्तू सोडून इलेक्ट्रोड्सच का उचलावीत? शंकेला जागा आहे, की नाही?' वरुणने त्याचा तर्क सांगितला,
'त्याला त्याबद्दल आधीच काही माहीत होते का? त्याचे कॉल रेकॉर्ड्सही रजिस्टर होत नाहीत. त्याच्या मागे लावलेल्या ऑफिसर्सना ही तो कसा चकवा देऊन निघून जातो हे त्यांनाही कळत नाही...'

आपल्या घरी बसून हे ऐकताना मिस्टर वाघ मात्र मनमोकळे स्मित करत होता, चहा घेत. त्याच्या नाकपुड्यांतून निघालेल्या उष्माने त्याच्या ओठांजवळील चहाची वाफ जवळपास विखुरली गेली. त्या वाफेतून मिस्टर वाघचे ते दिलखुलास स्मित सुद्धा काही तरी गूढ भासत होते, काही तरी गूढ सांगत होते...

'शेखरची बायको आणि बाबाराव देसाई यांची पणती प्रभा हिच्याकडे मी शेखरच्या आजाराबद्दल चौकशी केली. तो पहिल्यापासूनच पार्किन्सन्स डिसीजपासून त्रस्त होता. म्हणजे तिने आजाराचा स्पष्ट उल्लेख केला नाही, पण तिने जी सिम्टम्स् सांगितली होती ती बऱ्यापैकी पार्किन्सन्स डिसीजशी जुळतात. फौंड्रीमध्येच काम करत असताना त्याला एकदा सिरीयस हेड इंज्युरी झाली होती. एक हेवी मेटल पार्ट त्याच्या डोक्यावर पडला होता. त्यावेळीही सुशांत निकमने नुकसान भरपाई तर दूर, पण उपचाराचे पैसेही दिली नव्हते. आणि जेवढे दिवस तो कामावर गैरहजर होता तितके दिवस शेखरचा पगारही कापण्यात आला होता. म्हणून मग बाबारावांनी त्यांच्या नांवावर जी काही उरली सुरली दोन एकर जमीन होती, ती विकली होती आणि त्याचे उपचार केले होते. या उपकाराची जाण म्हणूनच प्रभा आणि शेखर ऐपत नसताना बाबारावांना सांभाळत होते.
'प्रभाकडून टेक्निकल इन्फॉर्मेशन मिळणे कठीण होते म्हणून मग मी त्याची ट्रीटटमेंट करत असलेल्या न्यूरॉलॉजिस्टला भेटलो. त्यांच्याकडून समजले, की या डोक्याच्या इंज्युरीमुळेच शेखरला पार्किन्सन्स डिसीज हा आजार झाला होता. हा लॉन्ग टर्म डिजनरेटिव्ह न्यूरॉलॉजीकल डिसऑर्डर आहे. जे मेन्ली मुव्हमेंटवर अफेक्ट करतं. त्याचा मेंदू कधी कधी रिस्पॉन्ड करणे बंद करायचा. डोपामाईन प्रोड्यक्शनही कमी होत चालले होते. तो पार्शिअली पॅरेलाईज्ड् होता ते त्यामुळेच. त्याच्या हातामधील व मेंदूमधील ताळमेळ कधी कधी हरवायचा. तो कित्येकदा रिस्पॉन्ड करायचा नाही. बोलतानाही अडखळायचा. त्याचा मूड, वागणे, विचार बदलत रहायचे. शरीरात कापरे भरायचे. अलीकडच्या काळात तो डिप्रेशनचाही शिकार झाला होता. कसून प्रॉब्लेम चालू झाले होते. गिळण्यासही त्याला त्रास व्हायचा. चालण्यातही त्याची गती कमी झाली होती. ही सगळी सिम्टम्स् पार्किन्सन्स डिसीजचीच आहेत. मी फिजिशियनकडून कंफॉर्म करून घेतलंय. शिवाय ही डिसीज कम्पीट्ली क्युरेबल नाही. पण याला औषधांनी आटोक्यात ठेवता येते.' वरुणने सारे विगतवार विश्लेषण केले.
'म्हणजे हाही निव्वळ एक एक्सिडेंट होता?' कार्तिकने प्रश्न उपस्थित केला.
'हो! कारण अटॉप्सी रिपोर्टवरच माझे समाधान झाले नव्हते. त्यामुळे मी नंतर मिस्टर वाघ आणि कमिशनरच्याही अपरोक्ष शेखरच्या आसपास काम करत असलेल्या सर्व वर्कर्सच्याही टेस्ट्स फॉरेन्सिक कडून करवून घेतल्या. त्याच्यात सुद्धा नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण थोडे अधिक आढळून आले. आणि मगच मी आश्वस्त झालो.' कार्तिक म्हणाला.
'काहीही म्हणा, पण ज्या - ज्या लोकांचे मृत्यू झालेत, त्या सगळ्यांच्या जरी एक्सिडेंटल किंवा नॅचरल डेथ्स् असल्या, तरी ही जरा अतिशयोक्तीच नाही का, की बाबारावांच्या नात्यातील मेलेल्या लोकांना काही ना काही मोठे आजार असावेत? किंवा त्यांच्या माहितीतील लोकच मरत आहेत. त्यामुळे हे सगळेच्या सगळे मर्डर्स आहेत यात मला तरी काही शंका नाही!' नवीन दोघा मोठ्या ऑफिसर्स समोर जरा धिटाईनेच बोलला. कदाचित ही धिटाई मिस्टर वाघवरच्या रागातून आली असावी...

आणखी एक मृत्यू झाला. नवीनच्या ज्यूरिसडिक्शन मधील घटना... पण यावेळी मात्र बाबाराव देसाईंशी या खुनाचा काही संबंध नव्हता. वरकरणी तरी तसेच दिसत होते. म्हणून या केसची संपूर्णतः जबाबदारी ही नवीन खाडेची होती.
                 क्राईम सीनवर तो पोहोचला. एका अरुंद गल्लीतील सिमेंट ब्लॉक्सच्या विटांनी बांधलेली एक साधारण खोली. सिमेंटचे पत्रे असलेले छत. थंडगार जमीन आणि अंधारात पडलेले ते त्याहूनही थंडगार शव...